०५ ऑगस्ट २०२०

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर.

🔰करोनाच्या साथीमुळे यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा एक किंवा दोन महिने लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती भवनाकडून निर्देश मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

🔰महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद असे प्रतिष्ठेचे पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. परंतु या वर्षी करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पुरस्कारांच्या वितरणास विलंब होणार आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

🔰‘‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही निर्देशांच्या प्रतीक्षेत आहोत. परंतु राष्ट्रपती भवनाकडून आम्हाला अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या तरी याबाबत कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. करोनाच्या साथीमुळे सध्या देशात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणे कठीण आहे,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

पोलीस भरती प्रश्नसंच

2. बीसीजी व्हॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात.

Infra muscular

Sub cutuneous

Intradermal

Inravenous

उत्तर :-Intradermal

3. गोवरची लस बालकाला किती महिन्याला धावयाची असते?

अडीच ते साडेतीन

जन्मल्यानंतर सहाव्या आठवड्याला

18 ते 24 महीने

09 ते 12 महीने

उत्तर :-18 ते 24 महीने

4. केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले.

2004

2005

2006

2007

उत्तर :-2005

5. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?

सदाफुली

सिंकोना

तुळस

अडुळसा

उत्तर :-तुळस

6. कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली?

लुई पाश्चर

अॅलेक्झांडर फ्लेमिंग

जे.जे. थॉमसन

रेबिज

उत्तर :-लुई पाश्चर

7. जगातील पहिली टेस्ट ट्यूब या ____ जन्मली.

1975

1978

1980

1982

उत्तर :-1978

8. 1 जानेवारी, 2010 ला शुक्रवार होता, तर 1 जानेवारी 2013 ला कोणता वार असेल?

सोमवार

मंगळवार

बुधवार

गुरुवार

उत्तर :-मंगळवार

9. अमित, स्वप्नील व आनंद यांच्या वयांची बेरीज पाच वर्षापूर्वी 55 वर्षे होती. तर आज त्यांच्या वयांची बेरीज किती?

74 वर्षे

70 वर्षे

72 वर्षे

60 वर्षे

उत्तर :-70 वर्षे

10. 2 वाजण्यास 10 मिनिट कमी असल्यास घड्याळातील तीस व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल?

245

115

254

151

उत्तर :-115

11. जर 343 : 64 तर 1000 : ?

100

131

172

121

उत्तर :-121

12. गटात न बसणारा अंक ओळखा.3, 5, 7, 11, 13, 15

7

11

13

15

उत्तर :-15

13. पुढे येणारी संख्या कोणती.

9/45

10/50

50/10

10/60

उत्तर :-9/45

14. विसंगत घटक ओळखा.

सतार

वीणा

सरोद

तबला

उत्तर :-तबला

15. ताशी 54 की.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

540 मी.

200 मी.

270 मी.

480 मी.

उत्तर :-200 मी

16. एक व्यवसायात झालेला 7200 रु. नफा A, B व C यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये असेल?

1600 रु.

3200 रु.

2400 रु.

2800 रु.

उत्तर :-2400 रु.

17. पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षा कमी आहे. तर सर्वाधिक लांब काय?

वही

पुस्तक

पेन

पेन्सिल

उत्तर :-पुस्तक

18. My friend called my mother and ____ for lunch.

I

me

my

mine

उत्तर :-me

19. Why don’t you go ____ your friend?

with

by

alongwith

Away

उत्तर :-with

20. Find the correct spelling

Guidance

Guidence

Gaidance

1. ad –, cdb –, adb –.

 a, a, cc

 bb, cc

 bc, a,c

 dd, cc

उत्तर : bc, a,c

2. aab, –, c, — a, abb.

 ac aa

 bb, cc

 ac, b

 aa, cc

उत्तर : bb, cc

3. dad –, cac –, bab –, aaa.

 a,a,a,a

 b,b,b,b

 c,c,c,c

 d,d,d,d

उत्तर : a,a,a,a

4. aa –, bb,ccc –, ddd.

 aa, bb, c, d

 aaaccd

 aab ccc

 aabbcc

उत्तर : aa, bb, c, d

5. add — ddd — ddd — d.

 abcdcb

 abbccd

 dbcddd

 aaccbb

उत्तर : dbcddd

6. dab –, cba, –, dab, –.

 aaa

 abc

 cba

 cdc

उत्तर : cdc

7. cb –, abc, –, a, ab, –.

 acbc

 cbca

 cacb

 cabc

उत्तर : acbc

8. ab –, bca, — abc.

 abbc

 cbca

 cacb

 cabc

उत्तर : cabc

9. ad –, bad –, ba, –, cb.

 abc

 bac

 ccd

 bcc

उत्तर : ccd

10. a, — byc, –, dw, — v.

 zxe

 bxe

 yxu

 yxb

उत्तर : zxe

11. a–y, byx c–w, dw–.

 b,x,z

 z,x,v

 a,b,c

 a,z,z

उत्तर : z,x,v

12. dab –, abc –, –, cda, — dab.

 abcd

 cdbc

 caab

 aacb

उत्तर : cdbc

13. a — cd, b — de, cd — f, — efg.

 abcd

 bced

 acdc

 None

उत्तर : bced

14. –, bc, b, — d, — de.

 acc

 bba

 acd

 ccd

उत्तर : acc

15. aab –, — bcd, –,– de.

 aabb

 babc

 abbc

 cbcc

उत्तर : cbcc

16. aab — ca — bc — abbcc.

 ca, ac, ba

 bc, ab, ca

 cb, ca, ac

 bc, ca, ab

उत्तर : bc, ab, ca

17. acd — cdc — dc

 ac, ca

 ca,ac

 cd, cd

 da, ad

उत्तर : ca,ac

18. ab — cd — cbcd.

 aa, bb

 cc, aa

 ca, bc

 cb, ab

उत्तर : cb, ab

19. ad — adb — dbc.

 aa, dd

 bc, ca

 cb, cb

 ab, da

उत्तर : bc, ca

20. aa — aacc, — dd.

 bb, aa

 aa, ba

 ad, da

 aa, dd

उत्तर : bb, aa

प्रश्मंजुषा

१. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती ? :- गोदावरी

२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८

३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु

४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा

५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ

६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती

७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके

८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण

९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ

१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी

ओपेक.

🅾पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजसंघटना ( 'ओपेक' )  एक आहे संघटना संघटना 13 राष्ट्रे. 

🅾पहिल्या पाच सदस्यांनी ( इराण , इराक , कुवैत , सौदीअरेबिया आणि व्हेनेझुएला ) 14 सप्टेंबर  1060 .

🅾रोजी बगदादमध्ये स्थापना केली होती,   since65पासून ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे त्याचे मुख्यालय आहे . 

🅾सप्टेंबर 2018 पर्यंत , तेलाच्या जागतिक उत्पादनात अंदाजे 44 टक्के 13 सदस्य देशांचा वाटा आहेआणि जगातील तेलाच्या pro१. percent टक्के प्रमाणित तेलाच्या साठ्यामुळे ओपेकला जागतिक तेलाच्या किंमतींवर मोठा प्रभावपडला, ज्याला बहुराष्ट्रीयतेलकंपन्यांच्या तथाकथित " सेव्हन सिस्टर्स " गटातर्फे निश्चित करण्यात आले होते .

🅾 जागतिक क्रूड तेलाच्या बाजारावर अधिक नियंत्रण मिळविण्यासाठी २०१ late च्या उत्तरार्धात ओपेक + नावाचा एक मोठा गट तयार झाला.  

🅾झालेल्या COVID-19 साथीच्या ओपेक तेल मागणी 30 वर्ष कमी करण्यासाठी दुस-या तिमाहीत च्या 2020 पडली आहे .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

०४ ऑगस्ट २०२०

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना

🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई

​2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)

📚पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी जगभरातल्या देशांच्या सरकारांकडून घेतल्या गेलेल्या पुढाकारांचा आढावा घेणारा ‘2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

📚तसेच 32 निर्देशकांचा वापर करून 180 देशांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आला आहे. हा अहवाल येल आणि कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केला आहे.भारत 27.6 एवढ्या गुणांसह 168 व्या क्रमांकावर आहे.

ठळक बाबी:-

📚डेन्मार्क हा देश या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे लक्झेमबर्ग, स्वित्झर्लंड, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन, नॉर्वे आणि जर्मनी या देशांच्या प्रथम दहामध्ये समावेश आहे.तर यादीत तळाशी अफगाणिस्तान, म्यानमार यांच्यानंतर शेवटी लाइबेरिया 180 व्या क्रमांकावर आहे.

📚हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणविषयक इतर धोके यामुळे आरोग्यविषयक खालावलेले परिणाम मिळविणारा भारत क्रमवारीच्या तळाशी आला आहे.हवेची गुणवत्ता, आधुनिक स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी दीर्घ काळापासून वचनबद्धता दर्शविल्यामुळे डेन्मार्क पर्यावरणविषयक आरोग्याच्या जवळजवळ प्रत्येक निर्देशांकांमध्ये उत्कृष्ट आहे.

📚मासेमारीचे प्रमाणही कमी झाले असून हा व्यवसाय आज जागतिक अडचणीत आहे. याचा विपरीत प्रभाव बहरीन, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये नोंदवला गेला आहे.इंडोनेशिया, मलेशिया आणि कंबोडिया या सारख्या देशांमध्ये गेल्या पाच वर्षांत अत्याधिक जंगलतोड झाली आहे.

भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प..

🔰कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.

🔴ठळक बाबी...

🔰हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.

🔰कमीतकमी 1,04,070 हेक्टर भूमी शाश्वत शेतजमीन आणि जलव्यवस्थापनाच्या अंतर्गत आणणे हे या कार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.

🔰शाश्वत पद्धतींच्यामार्फत जवळपास 49 दशलक्ष कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणात उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

🔰हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.

दिल्लीत नायट्रोजन डायऑक्साइड वायूच्या पातळीत 70 टक्क्यांची घट झाली.


🔰 संयुक्त राष्ट्रसंघ  कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे.

🔰या काळात राजधानी नवी दिल्लीमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) वायूच्या पातळीत 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, असे समजले. तसेच जागतिक पातळीवर बेल्जियम देशामध्ये NO2 ची पातळी 40 टक्क्यांनी खाली घसरली तर अमेरिका देशात हे प्रमाण 20 टक्क्यांचे आहे.

🔴नायट्रोजन डायऑक्साइड हानिकारक का आहे?

🔰नायट्रोजन डाय ऑक्साइड लालसर तपकिरी रंगाचा, पाण्यात काही प्रमाणात विरघळणारा वायू आहे. तापमान जास्त असताना झालेले वादळ आणि मातीतील सूक्ष्म जिवाणू तसेच जीवाश्म इंधन वापरणारी औष्णिक विद्युत केंद्रे आणि वाहनांमधून या वायूचे हवेत उत्सर्जन होते.

🔰या वायूमुळे डोकेदुखी, श्वासनलिकेचा व फुप्फुसाचा दाह इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात.

🔰हा वायू आम्लवर्षां, जमिनीलगतचा ओझोन, प्रकाश-रासायनिक धुके अशा पर्यावरणास हानीकारक गोष्टींच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो.
हा हवेची गुणवत्ता कमी करतो. यामुळे खालचा ओझोन थर कमी होतो.

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती.


🔰चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास १० महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

🔰गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.

🔰भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

🔰टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी, “आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही”,अशी माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटील झाले गुजरात भाजपाचे अध्यक्ष.

🔰भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सीआर पाटील यांची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, सीआर पाटील हे गुजरातमधील नवसारी येथील खासदार आहेत.

🔰या अगोदर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जीतूभाई वाघाणी यांच्यकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सीआर पाटील यांची पक्षाने या पदासाठी निवड केली आहे. गुजरातमधील आगामी पोटनिवडणुका, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

🔰एक टेक्नोसॅव्ही नेता म्हणूनही सीआर पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सोशल मीडियाचा वापर करून ते कायम आपला जनसंपर्क वाढवत असतात. त्यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट आहे. १९६० मध्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले.

एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजनेत आणखी चार राज्यांचा समावेश.

🔰31 जुलै 2020 रोजी केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी “एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” योजनेचा आढावा घेतला.

🔰1 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्यप्रदेशासह आंध्रप्रदेश, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, सिक्किम, मिझोरम, तेलंगणा, केरळ, पंजाब, त्रिपुरा, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान अशी एकूण 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेशी जोडली गेली आहेत.
जम्मू व काश्मीर, मणिपूर, नागालँड आणि उत्तराखंड अशी आणखी चार राज्ये शिधापत्रिकांच्या राष्ट्रीय सुसूत्रीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज आहेत.

🔰राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 65 कोटी (म्हणजे सुमारे 85 टक्के) लाभधारकांना या राज्यांत वा केंद्रशासित प्रदेशांत कुठेही  अन्नधान्याचा लाभ संभावत: घेता येणार आहे. उरलेल्या राज्यांना वा केंद्रशासित प्रदेशांना मार्च 2021 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकात्मिकरीत्या जोडण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

🔴योजनेविषयी..

🔰‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-2013’ अंतर्गत देशातल्या सर्व लाभार्थींपर्यंत अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय ग्राहक सेवा, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वतीने 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' ही महत्वाकांक्षी योजना राबवविण्यात येत आहे. ही योजना 1 जून 2020 या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली. देशाच्या कोणत्याही भागात नागरिक असला तरी देखील लाभार्थीला सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मार्फत या योजनेचा लाभ घेता यावा या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे.

🔰प्रामुख्याने कामाच्या शोधार्थ स्थलांतरित होत असणार्‍या कामगारांना शिधेचा पुरवठा अबाधितपणे होत राहावा त्यासाठी तयार केली गेलेली ही योजना सार्वजनिक वितरणातला भ्रष्टाचार लक्षात घेऊन तयार देशभरात राबवली जात आहे.

🔰स्वस्त धान्य दुकानांमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल’ (e-PoS) यंत्रणेमध्ये बायोमेट्रिक-आधार प्रमाणिकरण झाले की, त्यांना शिधापत्रिकावर अन्नधान्य देणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची e-PoS उपकरणे प्रत्येक रास्त धान्य दुकानांमध्ये बसविणे, बायोमेट्रिक-आधार प्रमाणीकरणासाठी लाभार्थींचा आधार तपशील यंत्रणेमध्ये समाविष्ट करून ही कार्यप्रणाली सक्षम करण्याचे काम सुरू आहे. लाभार्थींना त्यांच्या बोटांचे ठसे अथवा डोळ्यांतील बुबुळांच्या आधारे ओळख पटवून आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.

मोहालीच्या INST संस्थेत मोतीबिंदूवरील उपचारासाठी शस्त्रक्रिया-विरहित पद्धती विकसित

🔰मोहाली (पंजाब) इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मोतीबिंदूवरील उपचारासाठी अ‍ॅस्पिरिन औषधापासून नॅनोरोड विकसित केले आहे. अ‍ॅस्पिरिन हे नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग आहे.

🔴मोतीबिंदू विकार....

🔰मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातले नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या भिंगाची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते.

🔰नैसर्गिक भिंग हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नैसर्गिक भिंगाची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नैसर्गिक भिंगाच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

अगरबत्ती उत्पादनामध्ये भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी MSME मंत्रालयाची नव्या योजनेस मान्यता.

🔰भारताला अगरबत्ती उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने (KVIC) प्रस्तावित केलेल्या अनोख्या रोजगार निर्मिती कार्यक्रमास केंद्रिय सूक्ष, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

🔰खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मोहीम" नावाच्या या कार्यक्रमाचा उद्देश देशातल्या वेगवेगळ्या भागात बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि देशांतर्गत अगरबत्ती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे हे आहे.

🔴योजनेविषयी...

🔰KVICने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर केलेली योजना कमी गुंतवणुकीची आणि कारखानदार व भांडवलाशिवाय असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

🔰 व्यवसायिक भागीदार म्हणून जे यशस्वी खासगी अगरबत्ती उत्पादक करारावर स्वाक्षऱ्या करणार, त्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत अगरबत्ती बनविणारे स्वयंचलित यंत्र आणि पावडर मिश्रणाचे यंत्र KVIC तर्फे कारागिरांना पुरविण्यात येणार.

🔰यंत्राच्या किंमतीवर 25 टक्के अनुदान देण्यात येणार आणि उर्वरित 75 टक्के खर्च दरमहा कारागीरांकडून सुलभ हप्त्यांमध्ये वसूल करण्यात येणार.

🔰व्यवसाय भागीदार अगरबत्ती बनविण्यासाठी कारागीरांना कच्चा माल पुरवतील आणि त्यांना रोजगाराच्या आधारावर मजुरी देतील.

🔰कारागिरांच्या प्रशिक्षणाची किंमत KVIC आणि खासगी व्यवसायिक भागीदार यांच्यात सामायिक केली जाणार. ज्यात KVIC 75 टक्के खर्चाचा भार उचलणार तर 25 टक्के व्यवसाय भागीदार देय असणार.

🔰केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पुढाकाराने वाणिज्य व अर्थ मंत्रालयाने कच्च्या अगरबत्तीवरील आयात निर्बंध आणि बांबूच्या लाठीवरील आयात शुल्कात वाढ या प्रमुख दोन निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ही योजना आखण्यात आली आहे.

🔰हा पथदर्शी प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार असून आणि पूर्ण क्षमतेने प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर, अगरबत्ती उद्योगात हजारो रोजगार निर्माण होतील.

🔰देशात सध्या अगरबत्तीचा वापर दररोज अंदाजे 1490 मेट्रिक टन आहे, तथापि भारताचे दररोज अगरबत्तीचे उत्पादन फक्त 760 मेट्रिक टन आहे.

पतहमी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय.

🔰सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या (एमएसएमई) कर्ज हमी योजनेचा विस्तार करून या योजनेत डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल यांच्या व्यावसायिक कर्जाचाही समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी घेतला.यापुढे 250 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्यांनाही कर्ज हमीचा लाभ मिळू शकेल.

🔰एमएसएमई कर्ज हमी योजनेच्या विस्ताराची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, या योजनेत व्यवसायासाठी घेतलेल्या व्यक्तिगत कर्जाचा समावेश करण्यात आला असून पात्रता निकषांत बसणाऱ्या या योजनेचा लाभ मिळेल.

🔰ही योजना डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल इत्यादींच्या व्यावसायिक कर्जासाठीही लागू असेल, असे आर्थिक सेवा खात्याचे सचिव देबाशीष पांडा यांनी स्पष्ट केले.

🔰कर्ज हमी योजनेचा लाभ जास्तीतजास्त कंपन्यांना व्हावा यासाठी 29 फेब्रुवारी पर्यंतच्या कर्ज थकबाकीची मर्यादा 25 कोटींवरून 50 कोटी करण्यात आली आहे. त्यासाठी वार्षिक उलाढालीची अटही 100 कोटींवरून 250 कोटी करण्यात आली आहे.

🔰एखाद्या कंपनीसाठी कमाल कर्ज रक्कम पूर्वी 5 कोटी होती ती आता 10 कोटी करण्यात आली आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी सोमवारपासून आणखी काही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पांडा यांनी केले.

स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन परत येत आहे.

🔰अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे.

🔰खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.

🔰मेक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे.

🔰अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...