२७ जुलै २०२०

पूर्व लडाखमधून सैन्य पूर्णपणे मागे घेण्यास भारत-चीनची मान्यता.

⭐️पूर्व लडाखमधील वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य लवकरात लवकर आणि पूर्णपणे माघारी घेण्याचे शुक्रवारी भारत आणि चीनने मान्य केले. द्विपक्षीय संबंधांमध्ये र्सवकष सुधारणा होण्यासाठी सीमेवरील भागात शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, या बाबतही दोन्ही देशांचे मतैक्य झाले.

⭐️भारत आणि चीन यांच्यात नव्याने ऑनलाइन राजनैतिक चर्चा झाली त्यामध्ये लडाखमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला. कमांडर स्तरावर १४ जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अपेक्षेनुसार होत नसल्याचे लक्षात आल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने चर्चा करण्यात आली.

⭐️दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे मागे घेण्याबाबतची रणनीती ठरविण्यासाठी चर्चेची आणखी एक फेरी लवकरच आयोजित करण्याचे शुक्रवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी मान्य केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ५ जुलै रोजी दूरध्वनीवरून तणाव कमी करण्यासंदर्भात जवळपास अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर ६ जुलैपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. कमांडरांच्या बैठकीत जो समझोता झाला त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे दोन्ही देशांनी शुक्रवारी झालेल्या चर्चेत मान्य केले.

रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द- डोनाल्ड ट्रम्प.

📌रिपब्लिकन पक्षाचे जॅक्सनव्हिल येथे होणारे अधिवेशन करोना विषाणूच्या प्रसारामुळे रद्द  करण्यात आले आहे, हे अधिवेशन पुढील महिन्यात होऊन त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार होती.तर 24-27 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन होणार  होते. आता हे अधिवेशन पूर्ण स्वरूपात होणार नाही.

📌व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार जास्त असल्याने जॅक्सनव्हिल येथील अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या अधिवेशनासाठी ही योग्य वेळ नाही कारण फ्लोरिडात करोनाचा प्रसार जास्त आहे.
फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार झाला असून त्या राज्यात 3,89,868 रुग्ण आहेत. कॅरोलिना व न्यूयॉर्क पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

भारतात 30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला कोरोनाचा पहिला डोस.

💥भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

💥इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार  आहे.

💥भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.

💥स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे.

💥यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस  आहे.डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित 30 वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती.

"तोमान": इराण देशाचे नवे राष्ट्रीय चलन...▪️

▪️ इराण देशाने त्यांचे अधिकृत राष्ट्रीय चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने ‘इराणी रियाल’ हे चलन बदलून त्याऐवजी ‘इराणी तोमान’ हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. बदललेल्या चलनानुसार एका तोमानचे मूल्य हे 10 हजार रियाल एवढे असणार आहे.

▪️ 4 मे 2020 रोजी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातला विधेयक मंजूर करण्यात आला आणि राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

▪️संयुक्त राज्ये अमेरिका देशाने इराणबरोबरचा अणुकरार रद्द करण्याबरोबरच इराणवर अनेक आर्थिक निर्बंधही लादले. याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य 60 टक्क्यांपर्यंत घसरले आणि रियाल डॉलरच्या तुलनेत एक लक्ष 56 हजार इतका घसरला आहे. इराणी चलनाची किंमत घसरल्याने महागाई वाढली. हीच घसरण रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला.

▪️इराण हा मध्यपूर्वेतला एक देश आहे. तेहरान ही राजधानी आहे आणि रियाल हे अधिकृत चलन आहे.

व्यक्ती विशेष : सर जॉन हॉटन

- संयुक्त राष्ट्रांचा हवामान विज्ञान सल्लागार गट हा खास हवामान बदलांच्या अभ्यासांसाठीच नेमण्यात आला. अलीकडेच त्यांच्या सूचना अमेरिकेने अव्हेरल्या हे खरे; पण या सल्लागार गटाला २००७ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. या गटाचे सदस्य असलेले जॉन हॉटन हे वेल्सचे हवामान भौतिकशास्त्रज्ञ.

-  विज्ञान, धोरणनिश्चिती व धार्मिक समुदाय यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे काम केले. हॉटन यांच्या निधनाने हवामान बदलांच्या समस्यांवर संशोधन करणारा एक ख्यातनाम वैज्ञानिक आपण गमावला आहे. त्यांचा मृत्यू हा करोनाशी संबंधित गुंतागुतीने झाला. संयुक्त राष्ट्रांचा हवामान बदल सल्लागार गट (आयपीसीसी) १९८८ मध्ये स्थापन झाला. या गटाचे तीन पहिले अहवाल हॉटन यांच्या मुख्य संपादकत्वाखाली सादर करण्यात आले होते.

- १९९० मध्ये या गटाचा पहिला अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हाच धोक्याची घंटा वाजवली गेली. त्यानंतर दोन वर्षांनी रिओची वसुंधरा परिषद झाली.
त्या वेळी सर्वच देशांनी ही समस्या मान्य केली होती. दुसरा अहवाल १९९५ मध्ये आला. त्यानंतर क्योटो करार झाला. तिसरा अहवाल २००२ मध्ये सादर केला गेला. त्यात सागरी पातळी वाढण्याचे संकेत देण्यात आले.

- २००७ मध्ये या सल्लागार गटाला नोबेल मिळाले तेव्हाही हॉटन त्याचे सदस्य होते. हॉटन हे मूळ साउथ वेल्सचे, ब्रिटनच्या हवामान कार्यालयात ते १९८३ ते १९९१ या काळात महासंचालक होते. त्यांनीच ‘हॅडली सेंटर फॉर क्लायमेट सायन्स अँड सव्‍‌र्हिसेस’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. हवामान विज्ञानातील ती एक नावाजलेली संस्था आहे. १९६० पासून त्यांनी हवामान बदलांवर संशोधन सुरू केले.

-  अणुयुद्धानंतरच्या हवामान बदलांचा त्यांनी अभ्यास केला. त्यात नासाच्या निम्बस उपग्रहांचा वापर करण्यात आला होता.

- वातावरणात कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण वाढत असल्याबाबत त्यांनी १९८० मध्येच लक्ष वेधले होते. हॉटन यांचा जन्म वेल्समध्ये १९३१ मध्ये झाला.
वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना ऑक्सफर्डची शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. तेथेच ते वातावरणीय भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. रॉयल सोसायटीचे ते फेलो होते.

- राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना उमरावपदाने सन्मानित केले होते. रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक व ‘जपान प्राइझ’ हे सन्मान त्यांना मिळाले.
‘ग्लोबल वॉर्मिग- द कम्प्लीट ब्रीफिंग’ (१९८४) या त्यांच्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. विज्ञान व धर्म या विषयांवरही त्यांनी लेखन केले. ‘इन द आय ऑफ द स्टॉर्म’ हे आठवणीपर पुस्तक त्यांनी लिहिले होते.
---------------------------------------------------

वाक्यप्रचार व अर्थ

🌷हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

🌷 गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

🌷अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

🌷पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

🌷वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

🌷कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

🌷नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

🌷दत्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

🌷जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

🌷चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

🌷सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

🌷रामराम ठोकणे - निरोप घेणे

🌷आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

🌷कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे

🌷उमाळा येणे - तीव्र इछा होणे

🌷 वर्ज्य करणे - टाकणे

🌷 काडीमोड करणे - संबंध तोडणे

🌷 अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

🌷 अगतिक होणे - उपाय न चालणे

🌷कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

🌷आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

🌷 इडापिडा टळणे - संकट जाणे

🌷उतराई होणे - उपकार फेडणे

🌷अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

🌷 लकडा लावणे - सारखी घाई करणे

🌷परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

🌷 ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

🌷कागाळी करणे - तक्रार करणे

🌷 खांदा देणे - मदत करणे

🌷 खोबरे करणे - नाश करणे

🌷गय करणे - क्षमा करणे

🌷 न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

🌷जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

🌷जीव ओतणे - मन लावून काम करणे

🌷सुपारी देणे - आमंत्रण देणे

🌷 तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

🌷 डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

🌷 नामोहरम होणे - पराभूत होणे

🌷 पदर पसरणे - याचना करणे

🌷 पाणउतारा करणे - अपमान करणे

🌷 वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

🌷हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे

🌷 हिरमुसले होणे - नाराज होणे

🌷 पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

🌷 विटून जाणे - त्रासणे

🌷 डोके सुन्न होणे - काही न सुचणे

🌷 फडशा पाडणे - संपवणे

🌷गोरेमोरे होणे - लाज वाटणे

🌷आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

🌷धिंडवडे निघणे - फजिती होणे

🌷 आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

🌷माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

🌷वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

🌷हातपाय गाळणे - धीर सोडणे

🌷 कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

🌷गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

🌷झाकड पडणे - अंधार पडणे

🌷पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

🌷टोपी उडवणे - टवाळी करणे

🌷पाणी पाजणे - पराभव करणे

🌷वहिवाट असणे - रीत असणे

🌷छी थू होणे - नाचक्की होणे

🌷प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

🌷दंडेली करणे - जबरदस्ती करणे

🌷दिवा विझणे - मरण येणे

🌷मूठमाती देणे - शेवट करणे

🌷 सुगावा लागणे - अंदाज लागणे

🌷प्रतारणा करणे - फसवणूक करणे

🌷डोक्यावर घेणे - कौतुक करणे

🌷कानाशी लागणे - चहाडी करणे

🌷किटाळ करणे - आरोप होणे

🌷देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

🌷हातावर तुरी देणे - फसविणे

🌷बेगमी करणे - साठा करणे

🌷सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

🌷पोटात तुटणे - वाईट वाटणे

🌷नख लावणे - नाश करणे

🌷डोळो निवणे - समाधान होणे

एकमान पद्धत

(अ) एकमान पद्धत

नमूना पहिला –

उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

252 रु.

336 रु.

168 रु.

420 रु.

उत्तर : 252 रु.  

स्पष्टीकरण :-
दीड डझन = 18 पेन आणि 6 ची 3 पट = 18:: 84 ची 3 पट = 84×3 = 252

नमूना दूसरा –

उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?

16

24

27

36

उत्तर : 27

स्पष्टीकरण :-
एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन :: दीड ग्रोस = 18 डझन18×12/8 = 27 किंवा एक ग्रोस वह्या 144/8 = 18 मुलांना:: 1 ½ = 18 च्या दिडपट = 27 मुलांना



नमूना तिसरा –

उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती?

26

121

84

169

उत्तर : 169

क्लृप्ती :-
एक भाग ‘क्ष’ मानू.उदाहरणानुसार 1/13 क्ष = 13:: क्ष = 13×13 = 132 = 169 अपूर्णांक व्यस्त करुन गुणणे.

नमूना चौथा –

 

उदा. 60 चा 2/5 =?

12

24

18

30

उत्तर : 24

क्लृप्ती :-
60 चा 2/5 = 60×2/5 = 12×2 = 24  किंवा1/5 = 2/10 आणि 2/5 = 4/10, 60 चा = 1/10 आणि 60 चा 4/10 = 6×4

नमूना पाचवा –

उदा. 80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?

5

3

2

8

उत्तर : 3

क्लृप्ती :-
80 चा 3/5 = 80×3/5 = 48, 60 चा ¾ = 60×3/4 = 45,उदाहरणानुसार 48-45 = 3

नमूना सहावा-

उदा. 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे?

200

180

210

240

उत्तर : 240

स्पष्टीकरण :-
400 चा 3/8 = 400×3/8 = 50×3 = 150 आणि क्ष चा 5/8 = 150:: क्ष = 150×8/5 = 240 किंवा5 भाग = 400:: 3 भाग = 400 × 3/5 = 240 किंवा400×3/8×8/5 = 240

नमूना सातवा –

उदा. 350 लीटर पाणी मावणार्‍या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?

3.15 ली.

200 ली.

250 ली.

245 ली.

उत्तर : 250 ली.

स्पष्टीकरण :-
350 चा 2/7 = 50×2 = 100 उदाहरणानुसार 350-100 = 250 लीटर

नमूना आठवा –

उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे?

50

60

120

75

उत्तर : 60

स्पष्टीकरण :-
1/3+1/4=4/12+3/12=7/12;1-7/12=12/12-7/12=5/12=25 एकर,:: एकूण शेत = 5/12  चा व्यस्त 12/5 ने 25 ला गुणणे,यानुसार 12/5×25=60

 

२६ जुलै २०२०

भामरागड अभयारण्या

चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. अभयारण्यातून पार्लोकोटा आणि पामलगौतम नद्या वाहतात. त्या अभयारण्यातील वन्यजीवांसाठी आणि इथे राहणाऱ्या गोंड आणि माडिया जातींच्या आदिवासी बांधवांसाठी पाण्याच्या प्रमुख स्रोत आहेत.

एकेकाळी शिकारीचे स्थळ ६ मे १९७७ रोजी संरक्षित वन झाले असून ते रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण झाले आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी आपण इथे पाहू शकतो.

गोंड आणि माडिया जमातीचे आदिवासी लोक येथे राहत असून माडिया आणि गोंडी या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात.

यावल अभयारण्य (Yawal Wildlife Sanctuary)

सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे मोठे नाले यामुळे यावल अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार आणि जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्त्वाने संपन्न असलेल्या या अभयारण्याची घोषणा शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी केली.

वनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय सुंदर असून ज्यांना वन्यजीव पहायचे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पहायचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पहायचा आहे त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. अनेर आणि सुकी धरणाच्या आसऱ्याला वन्यजीव येतात. रानपिंगळ्याबरोबर गरूड, सुतार या पक्ष्यांसह 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. पट्‌टेदार वाघाचा वावर आणि बिबट्याचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तंदूच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

ताम्हिणी अभयारण्य (Tamhini Sanctuary)

डोंगर कड्यांवर ओथंबून आलेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी… घेऊन कोसळणाऱ्या पावसाशी झिंगडझुम्मा करायचा असेल तर तुमच्या-माझ्या सारख्यांची पाऊलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पावसाच्या अलौकिक स्पर्शानं दाटीवाटीने फुलून आलेला निसर्ग आणि आपला ताठरपणा बाजूला ठेवत अंगाखांद्यावर वृक्ष वेलींना आणि कोसळणाऱ्या धबधब्यांना घेऊन मायाळू झालेल्या डोंगररांगा यांचं वर्णन कसं करावं ? त्यासाठी शब्दही अपुरे पडतात. त्यामुळेच वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी इथल्या डोंगररांगा आणि घाट रस्ता फुलून जातो. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा मन प्रसन्न करतो.

पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर असलेल्या या घाटाचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणार आहे. मुंबई-गोवा मार्गाने कोलाडपर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे या घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वसलेलं आहे. 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्यात 49.62 चौ.कि.मी.

चंद्रशेखर आझाद

🔸जन्म- 23 जुलै 1906 भाबरा, मध्यप्रदेश.
🔸पूर्ण नाव- चंद्रशेखर सीताराम तिवारी.
🔸मृत्यू- 27 फेब्रुवारी 1931, अलाहाबाद.

🔹आझाद हे कुस्ती, धनुर्विद्या, भालाफेक, नेमबाजीसह पोहण्यात निपून होते.

🔹संघटना - कीर्ती किसान पार्टी ,
                  नवजवान किसान सभा.

🔹रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी "हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA)" या क्रांतीकारी संघटनेची "हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(HSRA)" या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.

🔹इ.स 1921 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात पंधरा वर्षे वयाच्या चंद्रशेखर यांनी सहभाग घेतला.
त्यासाठी त्यांना अटक झाली तेव्हा न्यायालयात चंद्रशेखर याने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले.

🔹चंद्रशेखर आजाद व त्यांचे इतर क्रांतिकारक साथीदार यांनी काकोरी येथे सरकारी कोषागारातील पैसे घेऊन जाणारी रेल्वे लुटली.

🔹लाला लजपत राय यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकारी जेम्स स्टॉक विरुद्ध बदला घेण्यासाठी कट रचला. परंतु ओळखीच्या अभावाने चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केले गेले, पोलीस सहाय्यक अधिक्षक जॉन पी सँडर्स ची हत्या झाली.

🔹HSRA ने या घटनेची जबाबदारी स्वीकारली. राजगुरू सुखदेव यांच्यासहसह 21 क्रांतीकारकांना अटक झाली.

🔹आझाद यांनी वेषांतर केले व राजकोट मार्गे इलाहाबादला गेले.

🔹आझाद आपल्या मित्रांना भेटण्यासाठी २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्कमध्ये गेले असता ब्रिटिश पोलीस व आझाद यांच्यात गोळीबार होऊन चंद्रशेखर यांनी अखेर ची गोळी स्वतःच्या माथ्यावर मारली.

Online Test Series

विद्यासागर, ईश्वरचंद्र.

🅾 (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला.

🅾 त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवतीदेवी असे होते. प्राथमिक शिक्षण जन्मगावी घेऊन कलकत्त्याच्या (कोलकात्याच्या) संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

🅾१८३९ साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती; म्हणून बंदोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले.

🅾ते अठरा वर्षांचे असताना त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्‍न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला.

वल्लभभाई झवेरभाई पटेल

🅾 यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती

🅾 पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती.

🅾 बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत.

🅾 ते१ ८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.

🅾 इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली

🅾- १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.

🅾वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत

खान अब्दुल गफारखान

🅾 (१८९० - १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वतंत्रचा लढ्यामध्ये भाग घेतला होता. 

🅾भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. ही संघटना "सुर्ख पोश" या नावाने देखील ओळखली जात होती.

🅾अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते. ते महात्मा गांधी यांचे चांगले मित्र होते, ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गाँधी’ चा नावाने संबोधले जायचे.

🅾खुदाई खिदमतगारचा यशामुळे ब्रिटि सरकारने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली, आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही या दडपशाहीस बळी पडले.

🅾बच्चा खानने अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या भारताच्या फाळणीच्या मागणीचा जोरदार विरोध केला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विभागीय योजनेची स्वीकृती जाहीर केली. विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तान सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...