२६ जुलै २०२०

ताम्हिणी अभयारण्य (Tamhini Sanctuary)

डोंगर कड्यांवर ओथंबून आलेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी… घेऊन कोसळणाऱ्या पावसाशी झिंगडझुम्मा करायचा असेल तर तुमच्या-माझ्या सारख्यांची पाऊलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पावसाच्या अलौकिक स्पर्शानं दाटीवाटीने फुलून आलेला निसर्ग आणि आपला ताठरपणा बाजूला ठेवत अंगाखांद्यावर वृक्ष वेलींना आणि कोसळणाऱ्या धबधब्यांना घेऊन मायाळू झालेल्या डोंगररांगा यांचं वर्णन कसं करावं ? त्यासाठी शब्दही अपुरे पडतात. त्यामुळेच वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी इथल्या डोंगररांगा आणि घाट रस्ता फुलून जातो. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा मन प्रसन्न करतो.

पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर असलेल्या या घाटाचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणार आहे. मुंबई-गोवा मार्गाने कोलाडपर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे या घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वसलेलं आहे. 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्यात 49.62 चौ.कि.मी.

चंद्रशेखर आझाद

🔸जन्म- 23 जुलै 1906 भाबरा, मध्यप्रदेश.
🔸पूर्ण नाव- चंद्रशेखर सीताराम तिवारी.
🔸मृत्यू- 27 फेब्रुवारी 1931, अलाहाबाद.

🔹आझाद हे कुस्ती, धनुर्विद्या, भालाफेक, नेमबाजीसह पोहण्यात निपून होते.

🔹संघटना - कीर्ती किसान पार्टी ,
                  नवजवान किसान सभा.

🔹रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी "हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA)" या क्रांतीकारी संघटनेची "हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(HSRA)" या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.

🔹इ.स 1921 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात पंधरा वर्षे वयाच्या चंद्रशेखर यांनी सहभाग घेतला.
त्यासाठी त्यांना अटक झाली तेव्हा न्यायालयात चंद्रशेखर याने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले.

🔹चंद्रशेखर आजाद व त्यांचे इतर क्रांतिकारक साथीदार यांनी काकोरी येथे सरकारी कोषागारातील पैसे घेऊन जाणारी रेल्वे लुटली.

🔹लाला लजपत राय यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकारी जेम्स स्टॉक विरुद्ध बदला घेण्यासाठी कट रचला. परंतु ओळखीच्या अभावाने चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केले गेले, पोलीस सहाय्यक अधिक्षक जॉन पी सँडर्स ची हत्या झाली.

🔹HSRA ने या घटनेची जबाबदारी स्वीकारली. राजगुरू सुखदेव यांच्यासहसह 21 क्रांतीकारकांना अटक झाली.

🔹आझाद यांनी वेषांतर केले व राजकोट मार्गे इलाहाबादला गेले.

🔹आझाद आपल्या मित्रांना भेटण्यासाठी २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्कमध्ये गेले असता ब्रिटिश पोलीस व आझाद यांच्यात गोळीबार होऊन चंद्रशेखर यांनी अखेर ची गोळी स्वतःच्या माथ्यावर मारली.

Online Test Series

विद्यासागर, ईश्वरचंद्र.

🅾 (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला.

🅾 त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवतीदेवी असे होते. प्राथमिक शिक्षण जन्मगावी घेऊन कलकत्त्याच्या (कोलकात्याच्या) संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

🅾१८३९ साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती; म्हणून बंदोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले.

🅾ते अठरा वर्षांचे असताना त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्‍न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला.

वल्लभभाई झवेरभाई पटेल

🅾 यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती

🅾 पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती.

🅾 बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत.

🅾 ते१ ८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.

🅾 इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली

🅾- १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.

🅾वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत

खान अब्दुल गफारखान

🅾 (१८९० - १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वतंत्रचा लढ्यामध्ये भाग घेतला होता. 

🅾भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. ही संघटना "सुर्ख पोश" या नावाने देखील ओळखली जात होती.

🅾अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते. ते महात्मा गांधी यांचे चांगले मित्र होते, ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गाँधी’ चा नावाने संबोधले जायचे.

🅾खुदाई खिदमतगारचा यशामुळे ब्रिटि सरकारने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली, आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही या दडपशाहीस बळी पडले.

🅾बच्चा खानने अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या भारताच्या फाळणीच्या मागणीचा जोरदार विरोध केला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विभागीय योजनेची स्वीकृती जाहीर केली. विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तान सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

२५ जुलै २०२०

Online Test Series

महाराष्ट्रातील पहिले----

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 

➡️यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका

➡️मुंबई

महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र 

➡️मुंबई (1927)

महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र

➡️मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण

➡️गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य

➡️कर्नाळा (रायगड)

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र 

➡️खोपोली (रायगड)

महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प

➡️तारापुर

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ 

➡️मुंबई (1957)

महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ

➡️राहुरी (1968 जि. अहमदनगर)

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना

➡️प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी 

➡️कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी

महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे 

➡️देवगड (जि. सिंधुदुर्ग)

महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र 

➡️आर्वी (पुणे)

महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प 

➡️चंद्रपुर

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक 

➡️दर्पण (1832)

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक

➡️दिग्दर्शन (1840)

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र 

➡️ज्ञानप्रकाश (1904)

महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा

➡️पुणे (1848)

महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा 

➡️सातारा (1961)

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी 

➡️मुंबई (1854)

महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल

➡️ताजमहाल, मुंबई

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति

➡️श्री. सुरेन्द्र चव्हाण

भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति 

➡️महर्षि धोंडो केशव कर्वे

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति

➡️आचार्य विनोबा भावे

महाराष्टाचे पहिले रँग्लर

➡️रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर 

➡️आनंदीबाई जोशी

महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा

➡️वर्धा जिल्हा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष 

➡️न्यायमूर्ती महादेव रानडे

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) 

➡️मुंबई ते ठाणे (16 एप्रिल1853 )

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) 

➡️मुंबई ते कुर्ला (1925)

महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक 

➡️सुरेखा भोसले (सातारा)

महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा

➡️सिंधुदुर्ग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा

➡️कुसुमावती देशपांडे

महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त 

➡️डॉ. सुरेश जोशी

महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग 

➡️वडूज

ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट

➡️श्वास (2004)

राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट 

➡️श्वास

राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट

➡️श्यामची आई

भूगोल प्रश्नसंच

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र
______________________________________

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना

•देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

•देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

•देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

•देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

•देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

•देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

•देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

•देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

•देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

•देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

•देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

•देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

•देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

•देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

•देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

•देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

•देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

•देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

•देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा

हे नक्की वाचा :- 'या' 10 मूलभूत कर्तव्यांचा भारतीय घटनेत समावेश

स्वर्णसिंह कमिटीच्या शिफारशिनुसार खालील 10 मूलभूत कर्तव्यांचा भारतीय घटनेत समावेश करण्यात आलेला आहे. त्यावर एक नजर...

*1.* घटनेतील आदर्शचा, राष्ट्रीय ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे.

*2.* स्वातंत्र्य लढ्यापासून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे अनुपालन करणे.

*3.* भारतीय सार्वभौमत्व व एकात्मता यांचे संरक्षण करणे.

*4.* राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्राला गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवेस जाणे.

*5.* सर्व भारतीयांमध्ये एकात्मता बंधुभाव निर्माण करणे.

*6.* जंगल, सरोवरे, नद्या, तळे, वन्य प्राणी यासारख्या नैसर्गिक देणग्यांचे संरक्षण करणे.

*7.* आपल्या संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे.

*8.* शास्त्रीय दृष्टीकोन, मानवता व अभ्यासूवृत्ती यांची वाढ करणे.

*9.* सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे.

*10.* व्यक्तीगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेने वाटचाल करणे.

अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष.

🔰रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

🔰ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.

🔴आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) विषयी...

🔰आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) याची स्थापना 1922 साली झाली आणि त्याचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरात आहे. संघाची उद्दिष्टे तीन स्तरांनुसार परिभाषित केली गेली आहेत; ते आहेत –धोरणात्मक, तांत्रिक/व्यवसायिक आणि समर्थन सेवा.

🔰वर्तमानात इटलीचे जियान्लुइगी कॅस्टेली संघाचे अध्यक्ष आहेत आणि फ्रान्सिओस डेवेन्न महासंचालक आहेत.

🔰UIC संघाचा सुरक्षा विभाग रेल्वे क्षेत्रातली मालमत्ता, स्थापना आणि सुरक्षा यांच्या संबंधित सर्व बाबींसाठी विश्लेषण आणि धोरणे निश्चित करते आणि ते विकसित करण्याचे अधिकार ठेवतो. या व्यासपीठाद्वारे सदस्यांमध्ये माहितीची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते.

75 वर्षांत प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) भरणार

🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) आयोजित केली जाणार आहे.

🔰सत्रासाठी सदस्य राष्ट्रांचे प्रमुख त्यांचे पूर्व-रेकॉर्ड केलेले भाषण संघटनेकडे पाठवतील, जे सभेदरम्यान चालवले जाणार आहेत. सभेला 21 सप्टेंबर 2020 पासून सुरुवात होणार आहे.

🔴संयुक्त राष्ट्रसंघ (UN)  विषयी...

🔰आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.

🔰1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.

🔰संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

🔰संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.

🔰UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.

🔰संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारीपद‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...