२५ जुलै २०२०

ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र

🔰भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.

🔰'ध्रुवास्‍त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.

🔴ठळक वैशिष्ट्ये....

🔰ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.

🔰या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.

🔰हे स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.

🔰या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.

🔰संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले.

🔰हेलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको

🔰राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतू सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत.

🔰प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.

🔰अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे, असे महत्वाचे निर्देश अमित देशमुख यांनी यावेळी दिले आहेत.

🔰पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.

मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती.

🔰उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र 2020 हे वर्ष खूपच चांगलं ठरताना दिसतंय. लॉकडाउनमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली.
त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, आणि आता मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.

🔰अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले  आहेत.प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

🔰रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 75 अब्ज डॉलर झाली आहे.

भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान.

🔰सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका 59 वर्षीय परिचारिकेला (नर्स) राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

🔰करोना महामारीमध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल परिचारिकांसाठी असलेल्या राष्ट्रपती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

🔰सिंगापूरमध्ये करोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पाच परिचारिकांना हा पुरस्कार देण्यात आला असून यात कला नारायणसामी यांचाही समावेश आहे.

🔰सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत मंगळवारी माहिती देण्यात आली.

🔰सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांचं हस्ताक्षर असलेल्या प्रमाणपत्रासह एक ट्रॉफी आणि 10,000 एसजीडी (सिंगापूरचं चलन) देण्यात आले.

व्योमेशचंद्र बॅनर्जी (1844 ते 1906)


🔸28 डिसेंबर 1885 रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज (बॉम्बे) या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते...
🔸जन्म कलकत्त्यातील एका ब्राह्मण कुटुंबात...
🔸वडील गिरीशचंद्र बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टात वकील...
🔸शिक्षण-कलकत्ता विश्वविद्यालयात...
🔸ते प्रथम कलकत्ता सुप्रीम कोर्ट मध्ये लिपिक...
🔸1864 मुंबईच्या जीजीभाई यांची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर शिक्षणासाठी लंडनला...
🔸1866 दादाभाई नौरोजींनी व्योमेशचंद्र बॅनर्जींच्या (सचिव) सहकार्याने लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन संस्था स्थापन...
🔸1868 बॅरिस्टर बनवून भारतात परतले व कलकत्ता हायकोर्टात नावाजलेले वकील बनले...
🔸लंडनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स चे निवडणूक लढवणारे पहिले भारतीय ठरले होते(माञ पराभूत)...
🔸पहिल्या अधिवेशन सोबतच 1892 च्या अलाहाबाद अधिवेशनाचे देखील अध्यक्ष राहिले...
🔸1893 साली दादाभाई नौरोजी,व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि बद्रुद्दिन तय्यबजी द्वारा इंग्लंडमध्ये 'Indian Parliamentary Committee' ची स्थापना...
🔸त्यांनी देशात देशभक्ती जागृत करण्यासाठी 'शारदा उत्सवा'ची सुरुवात केली...
🔸यांचे तसेच गांधीजींचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले होते...
🔸21 जूलै 1906 लंडन येथे निधन...

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती


आसाम -  गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

गुजरात -  भिल्ल

झारखंड -  गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

त्रिपुरा -  चकमा, लुसाई

उत्तरांचल -  भुतिया

केरळ -  मोपला, उरली

छत्तीसगड -  कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

नागालँड -  नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

आंध्र प्रदेश-  कोळम, चेंचू

पश्चिम बंगाल -  संथाल, ओरान

महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

मेघालय-  गारो, खासी, जैतिया

सिक्कीम- लेपचा

तामिळनाडू- तोडा, कोट, बदगा

==============

पिट्स इंडिया ऍक्ट

🔰 पंतप्रधान:-विल्यम पिट

📌 1773 च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पास

📌 तरतुदी:-

📌 कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य वेगवेगळे केले गेले

📌  सहा सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन

📌 मुंबई व मद्रास पूर्णपणे गव्हर्नर जनरल च्या नियंत्रण खाली आले

📌 बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय कार्य पाहणार

📌 बंगाल गव्हर्नर परिषद सदस्य संख्या 3 केली गेली

भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

​​🏆भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार🏆

👉महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य

👉तामिळनाडू - भरतनाट्यम

👉 करळ - कथकली

👉आध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम

👉पजाब - भांगडा, गिद्धा

👉गजरात - गरबा, रास

👉ओरिसा - ओडिसी

👉जम्मू आणी काश्मीर - रौफ

👉आसाम - बिहू, जुमर नाच

👉उत्तरखंड - गर्वाली

👉मध्य प्रदेश - कर्मा, चार्कुला

👉मघालय - लाहो

👉कर्नाटक - यक्षगान, हत्तारी

👉मिझोरम - खान्तुंम

👉गोवा - मंडो

👉मणिपूर - मणिपुरी

👉अरुणाचल प्रदेश - बार्दो छम

👉झारखंड - कर्मा

👉छत्तीसगढ - पंथी

👉राजस्थान - घूमर

👉पश्चिम बंगाल - गंभीरा

👉उत्तर प्रदेश - कथक

संसदेविषयीची काही शब्दावली

गणपूर्ती (Quorram):- कलम 100 अनुसार सदनाच्या बैठकी करिता गंपूर्तीची आवश्यकता असेल लोकसभा भरवण्याकरिता एकूण सदस्य संख्येचा 1/10 th म्हणजेच 55 सदस्यांची गरज असेल तर राज्यसभा भरण्याकरिता 25 सदस्यांची गरज असेल यालाच गणपूर्ती म्हणतात.

L.S तुन सरकार बनते (272 सीट्स)  :-

प्रश्नकाळ (Question Hour)  :-  

→ याचा संबंध त्यावेळेशी आहे ज्याद्वारे संसद सदस्य लोक महत्वाच्या कोणत्याही बाबींवर मंत्रिपरिषदेला प्रश्न विचारतात

→ हा सुरवातीचा एक तासाचा काळ असतो यामध्ये चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

1) ताराकिंत प्रश्न  :-  असे प्रश्न ज्यावर विचारणारा तात्काळ उत्तर मौखिक स्वरूपात मंत्रिपरिषेतील सदस्यांद्वारे देण्याची अपेक्षा करीत असेल.

या प्रश्नाचे उत्तरावर अनुसरून इतर प्रश्न हि विचारले जाऊ शकतात. कागदावर लिहून प्रश्न विचारतात

immediately answer द्यावे लागते.

2)  अंतारांकित प्रश्न  :-  हे प्रश्न लिखित स्वरूपात विचारले जातात व याचे उत्तरही लिखित स्वरूपात दिले जातात.

3)  अल्पसुंचना प्रश्न  :-  यामध्ये उत्तर देण्याकरिता 10 दिवसाची कालावधी दिली जाते.

4)  गैरसरकारी सदस्यास विचारले जाणारे प्रश्न :-

शून्याकाळ :-  संसदेच्या दोन्ही सदनामध्ये प्रश्नकाळ नंतर तात्काळ असणाऱ्या वेळेस शून्य काळ म्हटले जाते. हा 12 वाजता सुरु होतो व 1 वाजेपर्यंत चालते व त्यावर तुरंत कार्यवाही करणारे अपेक्षित प्रश्न विचारले जातात.
स्थगन (Adjournment) :-  स्थगन प्रस्ताव हे अध्यक्ष (लोकसभेचे अध्यक्ष) महाद्याद्वारे केले जातात. याचा अर्थ घर निश्चित काळासाठी बरखास्त केल्या जाते. (तास,दिवस)
स्थगन अनिश्चित काळ (Prorogation) :-  हे अनिश्चित काळासाठी स्थगन राष्ट्र्पतींद्वारे केले जाते जसे बजेट session संपल्यानंतर हिवाळी अधिवेशन चालू होण्याच्या पूर्वीचे दिवस
(Dissolution) विघटन  :- राज्यसभेचे विघटन कधीच होत नाही कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे. लोकसभा विघटन केल्या जाते व यानंतर निवडणूक होतात. बजेटच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती येऊन म्हणतात आता घर पुढचे ssession अनिश्चित काळासाठी स्थगन झाले आहे.        
अविश्वास ठराव (No Confident Motion) :-

कलम 75 अनुसार मंत्रिमंडळ लोकसभेला उत्तरदायित्व असेल.

.

विद्यापीठ विषयी माहिती

◾️ विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ

◾️ शहर   -  मुंबई

◾️स्थापना - 18 जुलै 1857

◾️  विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◾️शहर - नागपूर

◾️स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

◾️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◾️शहर - गडचिरोली

◾️ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

◾️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◾️शहर - मुंबई

◾️स्थापना  - 1916

◾️  विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◾️ शहर - पुणे

◾️स्थापना - 1949

◾️  विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◾️ शहर - औरंगाबाद

◾️स्थापना - 23 ऑगस्ट 1958

◾️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◾️ शहर - कोल्हापूर

◾️ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

◾️  विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◾️शहर - अमरावती

◾️स्थापना - 1 मे 1983

◾️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◾️शहर  - नाशिक

◾️स्थापना - जुलै 1989

◾️  विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◾️ शहर - जळगाव

◾️स्थापना - 15 ऑगस्ट 1989

◾️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◾️शहर - नांदेड

◾️स्थापना - 17 सप्टेंबर 1994

◾️  विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◾️शहर - सोलापूर

◾️ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

महत्त्वाची वृत्ते

​​◾️ विषुववृत्तापासून २३°३०' उत्तर तसेच २३° ३०'   दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी   सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात.

▪️पृथ्वीवर  इतर भागांत सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. 

📌 कर्कवृत्त २३° ३०'उत्तर अक्षवृत्तास  व
📌 मकरवृत्त २३°३०'दक्षिण अक्षवृत्तास  म्हणतात. 

◾️ विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील ६६° ३०' ही   दोन अक्षवृत्तेदेखील महत्त्वाची आहेत.

▪️विषुववृत्त ते   ६६° ३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तेयादरम्यान वर्षभरात 
२४ तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना   अनुक्रमे

📌 आर्क्टिक वृत्त आणि
📌 अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात. 

◾️६६° ३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून ९०° उत्तर  व ९०° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे 
२४ तासांपेक्षा जास्त असू शकतो.

▪️हा दिनमानाचकिंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर 
जास्तीत जास्त ६ महिन्यांचा असतो.

▪️येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्यक्षितिज समांतर दिसतो.

MPSC पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1) ग्रँड  ट्रँक  मार्ग  कोणत्या  शहरांना  जोडला  जातो. ( Asst पूर्व  2011)
A) दिल्ली ते  मुंबई
B) दिल्ली  ते  कोलकाता✍️ 
C) पुणे  ते  मुंबई
D)नाशिक  ते  सुरत  

2) तैनाती  फौजेची  पद्धत  कोणी  सुरु  केली. ( STI  पूर्व  2012 )

A) लॉर्ड  डलहौसी 
B) लॉर्ड  क्लाइव्ह 
C) लॉर्ड  हेस्टिंग्स
D) लॉर्ड  वेलस्ली ☑️

3) लॉर्ड  कर्झन  कालीन  रॅले  आयोग चा  संबंध  होता. ( Asst पूर्व  2013 )

A) प्राथमिक  शिक्षणाशी
B) माध्यमिक  शिक्षणाशी
C) उच्च  शिक्षणाशी ☑️
D) दुष्काळाशी

4) स्वातंत्र्य  भारतातील  पहिले  भारतीय  गव्हर्नर  जनरल  कोण  होते.( PSA पूर्व  2017 )

A)  लॉर्ड  माऊंटबॅटन
B) सी  राजगोपालाचारी ☑️
C) राजेंद्र  प्रसाद 
D) वोरेन  हेस्टिंग्स

5) आधुनिक  भारतात  स्थानिक  स्वराज्य  सरकार  कोणी  स्थापन  केले. ( ESI  पूर्व  2017 )

A) लॉर्ड  रिपन ☑️
B) लॉर्ड  कॉर्नवालिस
C) लॉर्ड  माऊंटबॅटन
D) लॉर्ड  क्लाइव्ह

https://t.me/Dhay_amcheadhikari

6) कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .  ( PSI  पूर्व  2016 )

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ☑️
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो

7) बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली. ( PSI  पूर्व  2012 )

A) 1852
B) 1853☑️
C) 1854
D) 1855

8) इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली. ( Asst  पूर्व  2011 )

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ☑️

9) इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली. (   राज्यसेवा  मुख्य 2012 )

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ☑️
D) लॉर्ड  डलहौसी

10) शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ☑️
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम


🔰खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.
ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.
क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.
ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.

१) फक्त अ,ब, क योग्य
२) फक्त क योग्य 📚✍️
३) सर्व अयोग्य
४) सर्व योग्य

🔰कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली. 

A) 1981-1982 
B) 1994-1995  ✅
C) 1996-1997 
D) 1998-1998 

🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

M) मार्च 1950 ✅
P) एप्रिल 1950
K) मार्च 1951
H) मार्च 1949

🔰 _ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.

A) भुवनेश्वर
B) हाजीपूर 
C)  गुहाटी
D) गोरखपुर ✅

🔰द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील  परिसरात दाट लोकवस्ती आढळते.*

A) लातूर - उस्मानाबाद
B) जलगाव - भुसावल
C) पंढरपूर - सोलापूर
D) पिंपरी -चिंचवड✅

🟢 वरील प्रश्नांची उत्तरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली.

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?

(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मासे उतरविण्याचे सर्वाधिक केंद्र कोणत्या राज्यात आहेत ?

1 - आंध्रप्रदेश ✅✅
2 - गुजरात
3 - ओडिशा
4 - तामिळनाडु
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी प्रश्न उत्तरासहीत

Q1) ____ या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला.
उत्तर :- सायबर गुन्हे

Q2)कोणाच्या हस्ते दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन झाले?
उत्तर:- श्रीपाद येसो नाईक

Q3) कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने _ याची बांधणी करण्यासाठी नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत करार केला.
उत्तर :- विजेवर चालणारे जहाज

Q4) कोणत्या योजनेला ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाते?
उत्तर:- एअर बबल

Q5) 'FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा _ देशात खेळवली जाणार आहे.
उत्तर:- कतार

Q6) कोणत्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन झाले?
उत्तर:-  हरसिमरत कौर बादल

Q7) कोणती व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडली गेली?
उत्तर:-चंद्रिकापरसाद 'चान' संतोखी

Q8) _ यांनी "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.
उत्तर:- पेमा खंडू

Q9) कोणत्या वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर:- पोबा

Q10) _ ही कंपनी “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे.
उत्तर:- के. आर. सी. एल.

• 2020 साली जागतिक क्षयरोग दिनाची (24 मार्च) थीम ............ ही होती.
- “इट्स टाइम”.

• ............. या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या लेखिका ज्यांना ‘ए प्रेयर फॉर ट्रॅव्हलर्स' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2020 पेन/हेमिंग्वे पुरस्कार जाहिर झाला 
- रुचिका तोमर.

• टोकियोमध्ये होणाऱ्या 2020 सालाच्या ऑलंपिक व पॅरालंपिक स्पर्धेतून माघार घेणारा ............... हा पहिला देश ठरला.
– कॅनडा.

• देहरादूनच्या वाडिया हिमालय भूशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की इतर हिमालयाच्या प्रदेशांच्या तुलनेत .............या राज्यातल्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत
- सिक्किम.

• ................या देशाने 26 मार्च 2020 रोजी COVID-19 उद्रेकावर प्रतिसादासाठी आभासी जी-20 शिखर परिषद आयोजित केली होती.
- सौदी अरब.

• COVID-19 याला भारताच्या सक्रिय प्रतिसादाबद्दल व्यवसाय आणि गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया या संस्थेनी ................. हा मंच सुरु केला आहे.
- इन्व्हेस्ट इंडिया बिझिनेस इम्यूनिटी प्लॅटफॉर्म.

• गणितासाठीच्या ‘एबेल पुरस्कार 2020’ ............. याना जाहिर झाला.
- ग्रेगरी मार्गुलिस आणि हिलेल फर्स्टनबर्ग (गणितज्ञ).

• ‘लेगसी ऑफ लर्निंग’ कादंबरीचे लेखक
- सविता छाब्रा.

• भारतातले ................. हे तीन शिक्षक जे वर्क फाऊंडेशन ग्लोबल टीचर प्राइज 2020 साठी निवडलेल्या प्रथम 50 मध्ये आहेत
– शुवाजित पायने (राजस्थान), रणजित सिंग डिसाले (महाराष्ट्र) आणि विनीता गर्ग (दिल्ली).

• गणितासाठी 2020 रॉल्फ शॉक पुरस्काराचे विजेते
- निकोलाई जी. मकरोव्ह.

Q1) कोणते राज्य सरकार "रोको टोको" मोहीम राबवित आहे?
उत्तर :- मध्यप्रदेश

Q2) कोणत्या व्यक्तीला रोटरी फाऊंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन गौरविण्यात आले?
उत्तर:-  एडप्पाडी के. पलानीस्वामी

Q3) __ ह्यांनी 'हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले.
उत्तर:-  टेनझिन गेचे टेथोंग

Q4) 'अरद’ आणि ‘कार्मेल’ ह्या _ आहेत, जे इस्रायल देशाच्या मदतीने मध्यप्रदेशात तयार केले जातील.
उत्तर:- रायफल

Q5) कोणता देश कोविड-19 विषाणूसाठी लसीच्या नैदाणिक चाचण्या पूर्ण करणारा जगातला पहिला देश ठरला आहे?
उत्तर:- रशिया

Q6) माहितीपट श्रेणीत 2020 सालाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?
उत्तर :-  केझांग डी. थोंगडोक

Q7) 'मलबार’ सराव हा एक _ युद्धसराव आहे.
उत्तर :-  नौदल

Q8) कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्कृष्ठ ठरले आहे?
उत्तर:-  नादौन पोलीस ठाणे

Q9) कोणत्या संघटनेचे सदस्यत्व सोडण्याची औपचारिक प्रक्रिया संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने चालवली आहे?
उत्तर:- जागतिक आरोग्य संघटना (WHO)

Q10)हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
उत्तर :- ज्ञानेंद्रो निंगोम्बाम

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...