२१ जुलै २०२०

भाषेतील रस

🌿रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव  कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.  

🌿साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.  

🌿मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.     

🌿साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.   

🌾🌾१) स्थायीभाव - रती       

🌷🌷रसनिर्मिती – शृंगार🌷🌷

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन 

उदा –

डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.      

२) स्थायीभाव – उत्साह 

🌷🌷रसनिर्मिती - वीर🌷🌷    

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा.

‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

🌷🌷३) स्थायीभाव –शोक🌷🌷

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात   

उदा –

आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हा

४) स्थायीभाव – क्रोध

🌷🌷रसनिर्मिती – रौद्र  🌷🌷      

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन           

उदा –

मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.      

४) स्थायीभाव – क्रोध

🌷🌷रसनिर्मिती – रौद्र     🌷🌷   

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन           

उदा –

मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.    

५) स्थायीभाव – हास      

🌷🌷रसनिर्मिती – हास्य🌷🌷

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.  

उदा –

मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.        

६) स्थायीभाव – भय

🌷🌷रसनिर्मिती- भयानक   🌷🌷        

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.         

उदा.

तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.     

७) स्थायीभाव – जुगुप्सा      

🌷🌷रसनिर्मिती – बीभत्स🌷🌷

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.  

उदा – 

मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.  

८) स्थायीभाव – विस्मय 

🌷🌷रसनिर्मिती- अदभुत   🌷🌷     

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात 

उदा –

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.   

९) स्थायीभाव – शम (शांती)        

🌷🌷रसनिर्मिती – शांत   🌷🌷

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.           

उदा –

सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

भारत सरकार कायदा 1858

👉 कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रदेश व त्यासंबंधी सर्व अधिकार इंग्लंड च्या राजसत्तेला.

👉 Board of directors व board of control बरखास्त.

👉 भारतमंत्री हे पद निर्माण केले, व त्याला सल्ला देण्यासाठी 15 सदस्यांचे इंडिया कौन्सिल. (8 सदस्य राजसत्तेकडून व 7 सदस्य कंपनीच्या संचालकांकडून)

👉 भारत मंत्री व इंडिया कौन्सिल चे वेतन व ऑफिस खर्च भारताच्या तिजोरीवर.

👉  कौन्सिल चा सल्ला भारतमंत्र्यावर बंधनकारक नाही. (अपवाद - वित्तव्यवस्थेसंबंधी सर्व निर्णय)

👉 गव्हर्नर जनरल हा राणीचा व्हाइसरॉय म्हणून काम करेल.

👉 कोणत्याही लष्करी मोहिमांवर भारताच्या उत्पन्नातून खर्च करण्याची परवानगी ब्रिटिशांना.

शब्दांच्या शक्ती

🌿अभिधा ( वाच्यार्थ )

अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणा-या अर्थास वाच्यार्थ असे म्हणतात.  

उदाहरणार्थ   

१) साप मारायला हवा.  

२) मी एक लांडगा पाहिला.  

३) आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे.  

४) बाबा जेवायला बसले.  

५) घरात फार जळवा झाल्या आहेत.  

६) आम्ही गहू खरेदी केला.     

🌷🌷व्यंजना (व्यंगार्थ) 🌷🌷     

मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात.  

उदाहरणार्थ      

१) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.         

२) भुंकणारे कुत्रे चावत नसतात.       

३) निवडणुका आल्या कि कावळ्याची कावकाव सुरु होते.         

४) समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत.        

५) घड्याळाने पाचचे ठोके दिले.     

🌷🌷लक्षणा (लक्षार्थ)   🌷🌷

शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास लक्षार्थे असे म्हणतात.  

ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.         

उदा.              

आम्ही ज्वारी खातो.  

याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.    

उदाहरणार्थ          

1) बाबा ताटावर बसले.      

2) घरावरून हत्ती गेला.       

3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.  

4) मी शेक्सपिअर वाचला.          

5) सूर्य बुडाला.        

6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या. 

 

🌿🌿शब्दसिद्धी 🌿🌿

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.       

शब्दांचे दोन प्रकार आहेत.      

१) सिद्ध शब्द  

२) साधित शब्द       

🌷🌷१) सिद्ध शब्द :-        

शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.      

सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय जा, ये, कर, बस, बोल, पी यासारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.           

उदा.

ये, जा, पी, उठ, कर, गा इ.            

🌷🌷सिद्ध शब्दांचे चार प्रकार पडतात पुढीलप्रमाणे :-🌷🌷   

अ) तत्सम शब्द -          

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात. 

उदाहरणार्थ           

कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्यवान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामती, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल इत्यादी       

🌷🌷आ) तद्भव शब्द -    

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ' तद्भव शब्द' असे म्हणतात.

उदाहरणार्थ  

कान, चाक, आग, पान, विनंती, घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दुध, घास, कोवळा, ओठ, घाम, काम, इत्यादी     

🌷🌷इ) देशी किंवा देशज शब्द -     

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.    

उदाहरणार्थ       

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकुण, कंबर इत्यादी. 

🌷🌷ई) परभाषीय शब्द –  

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.

याचे दोन उपप्रकार पडतात.      

अ. परकीय किंवा विदेशी शब्द  

ब. स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द)

🌷🌷अ) परकीय किंवा विदेशी शब्द

🌿इंग्रजी शब्द –       

टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, म्याडम, ऑफीस, ट्रेन, रेल्वे, बस, टिकीट, इयव्हर, मोटर, कडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पैंट, बटन, बट, बॉल, ड्रेस, ग्लास इत्यादी. 

🌿पोर्तुगीज शब्द –     

बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस इत्यादी. 

🌿फारसी शब्द –      

खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस इत्यादी.                

🌿अरबी शब्द –

अर्ज, इनाम, हुकूम, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, वाद, मदत, बदल इत्यादी   

🌷🌷ब. स्वदेशी शब्द ( परप्रांतीय भारतीय शब्द ) 

🌿कानडी शब्द –    

तूप, कुंची, हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ इत्यादी    

🌿गुजराती शब्द –   

घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी     

🌿तामिळी शब्द –

चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी    

🌿तेलगु शब्द –

ताळा, शिकेकाई, अनरसा, किडूकमिडूक, बंडी, डबी इत्यादी

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1 बायबलचा बंगाली भाषेत कोणी अनुवाद केला
उत्तर विल्यम वोर्ड

2 जॉर्ज मार्शमेनने कोणत्या भारतीय भाषेतील विश्वकोष तयार केला
उत्तर बंगाली भाषा

3 चार्ल्स विलकिन्सने गीता ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला तर त्यास कोणी प्रस्तावना लिहली
उत्तर हेस्टिंग्ज

4 बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना कोणत्या ब्रिटिश व्यक्तीने केली
उत्तर जोनाथन डांकण

5 राजाराम मोहनराय व राधकांत देव यांनी 1817 ला हिंदू कॉलेजची स्थापना केली त्यासाठी त्यांना कोणत्या ब्रिटिश व्यापाऱ्याने मदत केली
उत्तर डेव्हिड हेअर

6 कोणत्या चार्टर ऍक्ट नुसार भारतातील शिक्षणाची जबाबदारी ब्रिटिश कंपनीवर टाकण्यात आली
उत्तर 1813 चा ऍक्ट

7 कोन्सिल ऑफ एज्युकेशन चक्र स्थापना कोणत्या साली करण्यात आलीं
उत्तर 1842

8 1857 ला संपूर्ण भारतात किती महाविद्यालये होती
उत्तर 27

9 1857 ला भारतात कोणत्या दोन ठिकाणी इंजिनेरींग कॉलेज कार्यरत होती
उत्तर रुरकी व कलकत्ता

10 थॉमस रॅले आयोग कोणत्या साली नियुक्त केला होता
उत्तर 1902

१) निती आयोगामार्फत कोणत्या राज्यात ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद २०२० चे आयोजन करण्यात आले ?
अ) त्रिपुरा
ब) सिक्किम
✓क) आसाम
ड) महाराष्ट्र

२) रिझर्व्ह बँकेचे आणि सरकारचे वित्त वर्ष कोणत्या वर्षांपासून एकच असणार आहे ?
✓अ) २०२० - २१ पासून
ब) २०२१ - २२ पासून
क) २०२२ - २३ पासून
ड) २०२४ - २५ पासून

३) देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे ?
अ) पुणे
ब) कोल्हापूर
क) अहमदनगर
✓ड) नागपूर

४) सबका साथ सबका विकास या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
✓अ) विजय प्रतापसिंह
ब) मनोहर मनोज
क) संदीप मिश्रा
ड) राम हूजा

५) अजय वाॅरियर हा लष्करी सैन्याभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला ?
✓अ) भारत - ब्रिटन
ब) भारत - अमेरिका
क) भारत - चीन
ड) यापैकी नाही

______________________________
🟣 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
3) संसद ✔️✔️   
4) न्यायमंडळ

_______________________________
🔵 सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.

1) संसद सदस्य     ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
3) विद्यापीठाचे कुलगुरू   
4) चौकशी आयोगाचे प्रमुख

_______________________________
🟡 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?

1) 2016   
2) 2021     
3) 2026  ✔️✔️   
4) 2031

_______________________________
🟠 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.
3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.

_______________________________
🔴 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
_______________________________

1)"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
=========================
2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942
उत्तर : 1942
=========================
3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
=========================
4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि
तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

=========================
5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
=========================
6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री
=========================
7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)
A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942
=========================
8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)
A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती
=========================
9) "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
=========================
10)खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही? (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P8 - 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
=========================

१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?
अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील

२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च

३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅

४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?
अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया

५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस

महाराष्ट्र वनक्षेत्र विशेष

◾️ अति घनदाट वने 8721 चौरस किलोमीटर

◾️मध्यम घनदाट वने 20572 चौरस किलोमीटर

◾️खुली वने 21485 चौरस किलोमीटर

◾️राज्यांच्या राज्याच्या क्षेत्रफळाची वनांचे प्रमाण 16. 50 %

◾️ नोंदणीकृत वनक्षेत्र मध्ये देशात दुसरा क्रमांक
_____________________________
.     🔰सर्वाधिक वनक्षेत्र असलेली राज्य 🔰
_______________________________

📌 मध्य प्रदेश  77482 चौ. किमी

📌 अरुणाचल प्रदेश  66688 चौ. किमी

📌  छत्तीसगड  55611 चौ. किमी

📌 ओडिसा  51619 चौ. किमी

📌 महाराष्ट्र  50778 चौ. किमी

_______________________________
 _____

संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी


🍀सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन म्हणजेच CBDTने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी आहे. 

🍀देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्ये देशाला आर्धा इनकम टॅक्स देतात.

🍀सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (सीबीडीटी)च्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2017-18 मध्येही इनकम टॅक्स कलेक्शनमध्ये पूर्वेकडील राज्यांनीच बाजी मारली आहे.

🍀 2017-18 या आर्थिक वर्षात प्रमुख 5 राज्यांनी दिलेले योगदान (टक्केवारीमध्ये)-

महाराष्ट्र - 38.3%
दिल्ली -13.7%
कर्नाटक - 10.1%
तमिलनाडु - 6.7%
गुजरात - 4.5%

🍀सर्वाधिक आयकर जमा करणारी पूर्वेकडील प्रमुख 5 राज्ये:

मिझोराम - 41%
नागालँड - 32.1%
सिक्किम - 26%
त्रिपुरा - 16.7%
मेघालय - 12.7%

🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀

महाराष्ट्र बद्दल माहिती


◾️ महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ लोकसंख्येच्या👩‍👩‍👧‍👦 बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.💰💰

◾️ देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३🚂🚃 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.

◾️ महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर 🏬🏢आहे

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते🛤🛣 असणारे राज्य आहे.

◾️ ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

◾️ महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.

◾️ महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.

◾️ एकूण राष्ट्रीय औद्योगिक 🏭 उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

◾️ माहाराष्ट्रातील ३३,५०० चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली🌾 आहे.

◾️ भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर 💰बाजार मुंबईत आहे.

◾️ कोळसानिर्मित 🧱व अणुनिर्मित🛢 वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

◾️ महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.

◾️ राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.☀️🌧🌪

◾️ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

◾️ औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ⛩ ओळखले जाते. या शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार बांधण्यात आले होते

◾️ युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत.
📌 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
📌 अजंठा लेणी,
📌 वेरुळ लेणी आणि
📌 एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.

◾️ शेखरु म्हणजेच Indian giant squirrel 🐿 या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.

◾️  हिरव्या कबुतराला म्हणजेच Green Imperial Pigeon 🕊 राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

◾️ महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.🐅

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच

चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसतो?
1)59%✅
2)48%
3)49%
4)9%

सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो?
1)9 मिनिट
2)8 मिनीट✅
3) 7 मिनिट
4)5 मिनिट

मुचकुंदी प्रकल्प कोणत्या दोन राज्यात आहे?
1)आंध्रप्रदेश ओरिसा ✅
2)महाराष्ट्र मध्य प्रदेश
3)छत्तीसगड मध्यप्रदेश
4)महाराष्ट्र तेलंगणा

उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
1) तापी✅
2) गोदावरी
3) नर्मदा
4) गंगा

कोकणाची सरासरी रुंदी............की. मी आहे.
1)30 ते 50
2)35 ते 55
3)30 ते 60✅
4)15 ते 30

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत?
1)चंद्रपूर
2) भंडारा
3) गडचिरोली ✅
4) गोंदिया

बिग- बॅग थेअरी प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत सर्वप्रथम ....... प्रस्तावित केला  होता?
1)अल्बर्ट आईन्स्टाईन
2)जॉर्जस लिमैत्रे✅
3)आयसॅक न्यूटन
4)स्टिफन हॉकिंग

असा कोणता देश आहे ज्यात कोणताही खानिज आढळत नाही?
1) फ्रान्स
2)पेरू
3)स्विझर्लांड ✅
4)स्वीडन

पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
1) नागपूर ✅
2) औरंगाबाद
3) बुलढाणा
4) नाशिक

पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधील सरासरी अंतर किती आहे?
1)150 दशलक्ष किमी✅
2)150 लक्ष किमी
3)150 प्रकाश वर्ष
4)150 कोटी किमी

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणते डोंगर स्थित आहे?
सातपुडा....

(1)⚛ भारताच्या पहिल्या महिला पुर्ण वेळ स्वतंत्र संरक्षण मंत्री कोण ?
⏩⏩ निर्मला सीतारामन

(2)⚛ RBI चे पहिले गव्हर्नर कोण होते?
⏩⏩ओसबर्न स्मित

(3)⚛  . ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
(1) लाला लजपतराय
 (2)सुभाषचंद्र बोस
(3) बाळ गंगाधर टिळक✅✅✅
(4) रामनाथ गोयंका

(4)⚛कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटन असतो*_
1.लाकूड✅✅✅
2.पाणी
3.धातू
4.स्फोटके

⚛(5)अंतराळातल्या उपग्रहांना सेवा देण्यासाठी प्रथमच कोणते अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले?

(A) ISA-1
(B) MEV-1✅✅✅
(C) Miraj VI
(D) MES-1

(6)⚛: कोणत्या खेळाडूने 59व्या राष्ट्रीय खुल्या क्रिडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?

(A) अन्नू राणी✅✅✅
(B) शर्मिला कुमारी
(C) प्रिती सिंग
(D) अंजू राणी

(7)⚛ १८५७ च्या उठावानंतर कोणत्या दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?*_
1.१ डिसेंबर १८५९
2.१ डिसेंबर १८५८
3.१ नोव्हेंबर १८५७
4.१ नोव्हेंबर १८५८✅✅✅

(8)⚛ पुढीलपैकी इस्राईल ची राजधानी कोणती आहे?
1)जेरुसलेम✅✅✅
2)बीजिंग
3)काबूल
4)तेहरान

(9)⚛: सतार या वाद्यासाठी कोणत्या महान व्यक्तीचे नाव प्रसिद्ध आहे?
उस्ताद अमजदअली खाँ
सादिक अली खाँ
पं. शिवकुमार शर्मा
पं. रविशंकर✅✅✅

(10)⚛: पुढीलपैकी अफगाणिस्तानची राजधानी कोणती आहे?
1)जेरुसलेम
2)बीजिंग
3)काबूल✅✅✅
4)तेहरान

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...