२१ जुलै २०२०

1857 च्या पूर्वीचे उठाव.

🧩आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)

🅾गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.
हटकरांचा उठाव - मराठवाड्यात

🅾नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.नेता - नौसोजी नाईक.प्रमुख ठाणे - नोव्हाब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  खानदेशातील भिल्लाचा उठाव

🅾भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्लभिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

🧩खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

🅾1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

🧩काजरसिंग नाईकचा उठाव:

🅾1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.
1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

होमरूळ चळवळ (1916)

🅾लोकमान्य टिळकांच्या जीवनातील होमरूळ चळवळ म्हणजे शेवटची राष्ट्रव्यापी चळवळ होय

🅾ब्रिटिशांच्या अटकेतून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय चळवळ थंडावली असे वाटले

🅾त्याच वेळी त्यांनी स्वराज्याची मागणी करून राष्ट्रीय आंदोलन सुरू केले .

🅾त्यासाठी महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी व मद्रासमध्ये डॉ  अनी बेझेंट यांनी होमरुळ लीग ची स्थापना केली .

🅾होमरुळ लीगने जागृती घडवून आणली ; त्यामुळे लोकमान्य टिळक व अनि बेझेंट यांना अटक करण्यात आली .

🅾शेवटी लोकमान्य टिळकांनी हाय कोर्टात जाऊन दाद मागितली व सुटका करून घेतली.

🅾होमरुळ म्हणजे स्वराज्य .सरकारच्या दडपशाही व अन्याय्य कायद्याच्या लोकांनी न डगमगता आपली चळवळ पुढे चालू ठेवण्याचा संदेश लोकमान्य टिळकांनी जनतेला दिला .

२० जुलै २०२०

पोलीस भरती प्रश्नसंच

: १. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती ? :- गोदावरी

२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८

३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु

४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा

५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ

६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती

७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके

८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण

९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ

१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी

: 1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - पुणे. 

प्रमुख युद्ध सराव

🔴गरुड़ : भारत-फ्रांस
🔵गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया
🟠वरुण : भारत- फ्रांस
🟣हॅन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन
🟡जिमेक्स : भारत-जपान
⚫️धर्मा गार्डियन : भारत-जपान
🟢कजिन संधि अभ्यास : भारत-
जापान तटरक्षकदल
⚪️सूर्य किरण : भारत-नेपाळ
🟤सिम्बेक्स : सिंगापुर-भारतीय नौदल
🔴लाब्समर : भारत, ब्राझील, दक्षिण
अफ्रीका यांचं नौदल
🟠कोंकण : भारतीय नौदल-ब्रिटन नेवी
🔵इंद्रधनुष : भारत-ब्रिटन
🟣मालाबार : भारत-अमेरिका-जपान
🟡रेड फ्लैग : भारत-अमेरिका
🟤कोप : भारत-अमेरिका
⚫️मित्र शक्ति : भारत-श्रीलंका
🟢सलिनेक्स : भारत नौदल-श्रीलंका
इंद्र : भारत-रशिया
🟠नसीम अल बह्न : भारत-ओमान
🔵सम्प्रीती : भारत- बांग्लादेश
🟤औसीइंडेक्स भारत-ऑस्ट्रेलिया नौदल
🟢नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया-भारतीय सेना
🟡एकुवेरिन : मालदीव-भारत

वृत्तपत्रे व संक्षिप्त माहिती.

🧩दिग्दर्शन:

🅾श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

🧩समाचार दर्पण:  

🅾२३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

🧩सोमप्रकाश: 

🅾पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

🧩तत्त्वबोधिनी पत्रिका: 

🅾देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

🧩सुलभ समाचार :

🅾केशवचंद्र सेन (१८७८)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जालियनवाला बाग हत्याकांड.

🅾पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.

🅾1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.

🅾 त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.

🅾गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.

🅾 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.

🅾या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

🅾 रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

गोपाळ हरी देशमुख

🅾 रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले.पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले.

🅾 इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर यासाप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला.

🅾लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती.

🅾 लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.

🅾इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले.

🅾 हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली.

🅾धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला.

🅾लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले.

🅾 लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ञ.

🅾‘ लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.

🅾मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

समाजसुधारक .

🅾१८६५- न्या. रानडे -पुनर्विवाह उत्तेजक मंडळी 

🅾१८७४ - विष्णू शास्त्री पंडित कुसाबाईशी पुनर्विवाह केला

🅾१८९३ - महर्षी धोंडो केशव कर्वे गोदुबाई शी पुनर्विवाह केला 

🅾१८८९- पंडिता रमाबाई शारदा सदन (मुंबई)

🅾 १८९९ - महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिका आश्रम 

🅾१९०१ - शाहू महाराज विक्टोरिया मराठा बोर्डींग

🅾१९१० - हृदयनाथ कुंझर सेवा समिती 

🅾१९१० - महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठ

🅾१९१८ - शाहू महाराज आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा  

🅾१९२१ - विनोबा भावे पवनार आश्रम

🅾 १९२३ - वि. रा. शिंदे अहिल्याश्रम

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी.

🅾(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२)
.इ स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. 

🅾प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनीसमाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. .
 
🅾भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुटें हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे.

🅾मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

केशवराव मारोतराव जेधे.

🅾 २१ एप्रिल, इ.स. १८९६ - नोव्हेंबर १२, १९५९)

🅾 हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते.

🅾जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते.

🅾 केशवराव जेधे यांचा जन्म २१ एप्रिल, इ.स. १८९६ रोजी पुणे येथे झाला.

🅾केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते.

🅾केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. पुणे येथील जेधे मॅन्शन हे या चळवळीचे केंद्र होते.

🅾केशवरावांनी शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली.

🅾केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळावा काढून टिळकांच्या शिवजयंतीला आव्हान दिले होते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

० महात्मा फुले- पुणे

० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

० गोपाळ हरी देशमुख- पुणे

० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)

० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

० साने गुरुजी- पालघर (रायगड)

० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

० संत ज्ञानेश्वर- आपेगाव

०संत एकनाथ- पैठण

० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)
_______________________

भारतीय शासक

♻️गुलाम वंश ♻️

1=1193 मुहम्मद  घोरी
2=1206 कुतुबुद्दीन ऐबक
3=1210 आराम शाह
4=1211 इल्तुतमिश
5=1236 रुकनुद्दीन फिरोज शाह
6=1236 रज़िया सुल्तान
7=1240 मुईज़ुद्दीन बहराम शाह
8=1242 अल्लाउदीन मसूद शाह
9=1246 नासिरुद्दीन महमूद 
10=1266 गियासुदीन बल्बन
11=1286 कै खुशरो
12=1287 मुइज़ुदिन कैकुबाद
13=1290 शमुद्दीन कैमुर्स
1290 गुलाम वंश समाप्त्
(शासन काल-97 वर्ष लगभग )

♻️खिलजी वंश♻️

1=1290 जलालुदद्दीन फ़िरोज़ खिलजी
2=1296
अल्लाउदीन खिलजी
4=1316 सहाबुद्दीन उमर शाह
5=1316 कुतुबुद्दीन मुबारक शाह
6=1320 नासिरुदीन खुसरो  शाह
7=1320 खिलजी वंश स्माप्त
(शासन काल-30 वर्ष लगभग )

♻️तुगलक  वंश ♻️

1=1320 गयासुद्दीन तुगलक  प्रथम
2=1325 मुहम्मद बिन तुगलक दूसरा  
3=1351 फ़िरोज़ शाह तुगलक
4=1388 गयासुद्दीन तुगलक  दूसरा
5=1389 अबु बकर शाह
6=1389 मुहम्मद  तुगलक  तीसरा
7=1394 सिकंदर शाह पहला
8=1394 नासिरुदीन शाह दुसरा
9=1395 नसरत शाह
10=1399 नासिरुदीन महमद शाह दूसरा दुबारा सता पर
11=1413 दोलतशाह
1414 तुगलक  वंश समाप्त
(शासन काल-94वर्ष लगभग )

♻️सैय्यद  वंश ♻️

1=1414 खिज्र खान
2=1421 मुइज़ुदिन मुबारक शाह दूसरा
3=1434 मुहमद शाह चौथा
4=1445 अल्लाउदीन आलम शाह
1451 सईद वंश समाप्त
(शासन काल-37वर्ष लगभग )

♻️लोदी वंश♻️

1=1451 बहलोल लोदी
2=1489 सिकंदर लोदी दूसरा
3=1517 इब्राहिम लोदी
1526 लोदी वंश समाप्त
(शासन काल-75 वर्ष लगभग )

♻️मुगल वंश ♻️

1=1526 ज़ाहिरुदीन बाबर
2=1530 हुमायूं
1539 मुगल वंश मध्यांतर

♻️सूरी वंश♻️

1=1539 शेर शाह सूरी
2=1545 इस्लाम शाह सूरी
3=1552 महमूद  शाह सूरी
4=1553 इब्राहिम सूरी
5=1554 फिरहुज़् शाह सूरी
6=1554 मुबारक खान सूरी
7=1555 सिकंदर सूरी
सूरी वंश समाप्त,(शासन काल-16 वर्ष लगभग )

♻️मुगल वंश पुनःप्रारंभ ♻️

1=1555 हुमायू दुबारा गाद्दी पर
2=1556 जलालुदीन अकबर
3=1605 जहांगीर सलीम
4=1628 शाहजहाँ
5=1659 औरंगज़ेब
6=1707 शाह आलम पहला
7=1712 जहादर शाह
8=1713 फारूखशियर
9=1719 रईफुदु राजत
10=1719 रईफुद दौला
11=1719 नेकुशीयार
12=1719 महमूद शाह
13=1748 अहमद शाह
14=1754 आलमगीर
15=1759 शाह आलम
16=1806 अकबर शाह
17=1837 बहादुर शाह जफर
1857 मुगल वंश समाप्त
(शासन काल-315 वर्ष लगभग )

♻️ब्रिटिश राज (वाइसरॉय)♻️

1=1858 लॉर्ड केनिंग
2=1862 लॉर्ड जेम्स ब्रूस एल्गिन
3=1864 लॉर्ड जहॉन लोरेन्श
4=1869 लॉर्ड रिचार्ड मेयो
5=1872 लॉर्ड नोर्थबुक
6=1876 लॉर्ड एडवर्ड लुटेनलॉर्ड
7=1880 लॉर्ड ज्योर्ज रिपन
8=1884 लॉर्ड डफरिन
9=1888 लॉर्ड हन्नी लैंसडोन
10=1894 लॉर्ड विक्टर ब्रूस एल्गिन
11=1899 लॉर्ड ज्योर्ज कर्झन
12=1905 लॉर्ड गिल्बर्ट मिन्टो
13=1910 लॉर्ड चार्ल्स हार्डिंज
14=1916 लॉर्ड फ्रेडरिक सेल्मसफोर्ड
15=1921 लॉर्ड रुक्स आईजेक रिडींग
16=1926 लॉर्ड एडवर्ड इरविन
17=1931 लॉर्ड फ्रिमेन वेलिंग्दन
18=1936 लॉर्ड एलेक्जंद लिन्लिथगो
19=1943 लॉर्ड आर्किबाल्ड वेवेल
20=1947 लॉर्ड माउन्टबेटन

ब्रिटिस राज समाप्त शासन काल 90 वर्ष लगभग

🇮🇳आजाद भारत,प्राइम मिनिस्टर🇮🇳

1=1947 जवाहरलाल नेहरू
2=1964 गुलजारीलाल नंदा
3=1964 लालबहादुर शास्त्री
4=1966 गुलजारीलाल नंदा
5=1966 इन्दिरा गांधी
6=1977 मोरारजी देसाई
7=1979 चरणसिंह
8=1980 इन्दिरा गांधी
9=1984 राजीव गांधी
10=1989 विश्वनाथ प्रतापसिंह
11=1990 चंद्रशेखर
12=1991 पी.वी.नरसिंह राव
13=अटल बिहारी वाजपेयी
14=1996 ऐच.डी.देवगौड़ा
15=1997 आई.के.गुजराल
16=1998 अटल बिहारी वाजपेयी
17=2004 डॉ.मनमोहनसिंह
18=2014 से  नरेन्द्र मोदी

प्रश्नसंच

१९ जुलै २०२०

भारतीय संघाच्या क्रिकेट हंगामाची आज निश्चिती.

🔰करोनाची साथ वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम यासह विषयपत्रिकेमधील ११ मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होईल.

🔰भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आमर्यादित षटकांच्या तीन मालिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे दौरे आणि मायदेशात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली आहे.

🔰आयपीएल’च्या आयोजनासाठी सर्व पर्यायांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. पहिला पर्याय हा भारतातच स्पर्धा आयोजनाचा आहे. परंतु करोनाची साथ नियंत्रणात न आल्यास संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंकेचाही विचार करता येईल. पण स्पर्धा देशाबाहेर गेल्यास खर्चही वाढेल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने दिली.

आजची प्रश्न मंजुषा

🔹 राजबेरी (स्ट्रोबेरी) साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे? – महाबळेश्वर.

🔹कागदी लिंबाचे उत्पादन कोठे होते? – अहमदनगर.

🔹कोयना जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? – पोफळी.

🔹भाटघर जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? – पुणे.

🔹तिल्लारी जलविद्यूत केंद्र कोठे आहे? – कोल्हापूर.

🔹पवना जलविद्युत केंद्र कोठे आहे? – पुणे.

🔹कोहापूर जिल्ह्यातील जलविद्युत केंद्र कोणते? – राधानगरी.

🔹महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? – इचलकरंजी.

🔹चपलासाठी प्रसिद्ध असलेले कापसी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? – कोल्हापूर.

🔹सर्वात जास्त हातमाग कोणत्या ठिकाणी उत्पादित केला जातो? – इचलकरंजी.

🔹इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यात आहे? – कोल्हापूर.

🔹महाराष्ट्रात रासायनिक द्रव्य तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? – रसायणी पनवेल.

🔹दारूगोळा बनवण्याचा कारखाना कोठे आहे? – खडकी-पुणे.

Q1)______ येथे भारतातील पहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे.
(A) केरळ◆
(B) गोवा
(C) हैदराबाद
(D) कर्नाटक

Q2) कोणत्या व्यक्तीला ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2020’ कार्यक्रमातला “टॉप पब्लिसिस्ट”चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
(A) सचिन अवस्थी★
(B) नारायण मूर्ती
(C) लेडी गागा
(D) बियॉन्स

Q3) कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी _च्यावतीने “कोविडपश्चातची बोगी’ची निर्मिती करण्यात आली आहे.
(A) भारतीय रेल्वे★
(B) रिलायन्स
(C) अदानी
(D) यापैकी नाही

Q4) ___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.
(A) 14 जुलै
(B) 15 जुलै★
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

Q5) _ याच्या संदर्भात सहकार्यासाठी UNICEF इंडिया या संस्थेनी FICCI सोबत करार केला आहे.
(A) ‘रिइमेजीन’ मोहीम★
(B) ‘कौशल्य भारत’ मोहीम
(C) ‘रोको टोको’ मोहीम
(D) पौधे लगाओ पर्यावरण बचाओ

Q6) कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?
(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’★
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर

Q7) या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.
(A) भारत◆
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन

Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?
(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा◆

Q9) कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा◆
(D) सुशील चंद्र

Q10) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
(A) वेस्ट इंडीज◆
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
========================

अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार


🌷भारत-अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमात महत्वाच्या उपलब्धीवर भर देणे आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम ठरवणे यावर भर देण्यात आला. अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

🌷या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या देशासोबत आभासी पद्धतीने एक सामंजस्य करार केला आहे.

ठळक बाबी

🌷भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा करार अतिशय महत्वाचा ठरतो. करारानुसार, इंधनसाठ्यांसाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे. तसेच तेलाची साठवणूक करण्यासाठी अमेरिकेच्या इंधन साठवण केंद्राचा वापर भारत करू शकतो.

🌷अमेरिकेकडे 71.40 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे. आपत्कालीन इंधन तेलाच्या पुरवठ्याच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

आम्लवर्षा

________________________________________
◾️कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइड वातावरणात सोडली जातात.

◾️ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून
📌 सल्फुरिक आम्ल,
📌 नायट्रस आम्ल व
📌 नायट्रीक आम्ल तयार होते.

◾️ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.

🔰 आम्लवर्षेचे परिणाम

📌  आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते.

📌 यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरित परिणाम होतो.

📌 इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते.

📌 आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमिअम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात.

📌 जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टीकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.

________________________________________

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...