१८ जुलै २०२०

‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX): भारतातला पहिला राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंच.


🔶पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) या नावाने भारतातल्या पहिल्या राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.

🔥मुख्य बाबी

🔶‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) याच्या माध्यमातून नैसर्गिक वायूच्या वितरणासाठी व्यापार मंच म्हणून कार्य करण्यात येणार आहे.
भारतामध्ये ऊर्जा बाजार मंचाचे पूर्ण स्वामित्व असलेली ‘इंडियन एनर्जी एक्सचेंज’ (IEX) या कंपनीची उपकंपनी म्हणून IGX कार्यरत राहणार आहे.नैसर्गिक वायू बाजारपेठेतल्या सर्व सहभागींना प्रमाणित मानकांनुसार व्यापार करण्यासाठी ही नवीन कंपनी समर्थ असणार आहे.

🔶या मंचामुळे ग्राहकांना कोणत्याही समस्येविना, अडथळ्याविना व्यापार करणे शक्य होणार आहे.IGX याचे कामकाज पूर्णपणे संकेतस्थळ-आधारित मंचच्या मदतीने करण्यात येणार आहे.

🔥IGXचे भविष्यकालिन फायदे🔥

🔶नैसर्गिक वायू व्यापारासाठी सुरू केलेल्या या नवीन इलेक्ट्रॉनिक मंचामुळे भारतातल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ झाला. यामुळे नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार मूल्य निर्धारण करण्याच्या दिशेने देशाला पुढे पावले टाकण्यासाठी मदत मिळणार आहे.

🔶बाजार संचलित मूल्य निश्चिती प्रणाली असल्यामुळे इंडिया गॅस एक्सचेंज (IGX) नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार साकार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकणार आहे.

🔶पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) देशातल्या सर्व भागामध्ये नैसर्गिक गॅस योग्य दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी दरांच्या सुसूत्रीकरणावर भर दिला जाणार आहे. या मंचमुळे मुक्त बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा विचार मूल्यनिर्धारण करताना करणे शक्य होणार आहे. IGX बाजारपेठेतले चढ-उतार लक्षात घेवून किंमत निश्चित करू शकणार आहे.

🔶IGXच्या माध्यमातून LNG टर्मिनल, गॅस पाइपलाईन, CGD पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेचा कल पाहून किंमत यंत्रणा यासंबंधी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार, अशी अपेक्षा आहे.

🔶भारताची अर्थव्यवस्था LNG आधारित बनवण्यासाठी हाती घेतलेली कार्ये देशाकडे लवकरच 50 MMT एवढी LNG टर्मिनल क्षमता असणार आहे.

🔶देशाने कतार, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या अनेक देशांबरोबर दीर्घकालीन LNG करार केले आहेत. तसेच मोझांबिक, रशिया आणि इतर देशांमध्ये अतिशय महत्वाच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूकही केली आहे.

🔶देशामध्ये LNG विषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी ऊर्जा गंगा, पूर्व भारत ग्रिड, ईशान्येकडे इंद्रधनुष प्रकल्प, धमरा-दहेज गॅसवाहिनी प्रकल्प, कोळसा गॅसीफिकेशन प्रकल्प आणि CBM कार्यशैली यासारख्या योजना सध्या कार्यरत आहेत.

🔶येत्या काही वर्षामध्ये देशात 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पाइपलाईन तयार असणार आहे.

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

महामार्ग संरचना दर्जेदार करण्यासाठी NHAI देशातल्या अव्वल तंत्र संस्थांशी भागीदारी करणार.

🔰जागतिक दर्जाचे महामार्ग जाळे तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, देशातल्या सर्व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्याशी सहयोग करीत जवळचा राष्ट्रीय महामार्ग पट्टा स्वेच्छेने, संस्थात्मक सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्यांच्याशी संपर्क केला आहे.

🔰विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या प्रतिभेचा देशातल्या रस्ते संरचना सुधारण्यासाठी लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यासह संस्थाना स्थानिक आवश्यकता, भौगोलिक रचना, संसाधने क्षमता याविषयी उत्तम जाण असते आणि याचाच NHAI रस्ते बांधकाम करण्यापूर्वी, बांधकाम करण्यासाठी अशा विविध टप्प्यात उपयोग करू इच्छिते.

🔰संस्थेनी पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने वाहतूक कोंडी, अपघात प्रवण स्थळे तातडीने जाणणे, यासह स्थानिक समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक समस्या दूर करण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहेत.

🔰यामुळे NHAIला सध्याच्या आणि भविष्यातल्या प्रकल्पांसाठी स्थानिक गरजा जाणून घ्यायला, देखभाल सुधारायला आणि प्रवास सुखकर करायला, तसेच महामार्गालगत सुविधा विकसित करायला मदत होणार आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांना अनुकूल आणि आनंददायी प्रवास अनुभवता येणार.

🔴भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विषयी..

🔰भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. हे भारतात 1,15,000 कि.मी.पैकी एकूण 50,000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे. संस्थेची स्थापना 1988 साली झाली. हे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

गुगल कंपनी भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.

🔰13 जुलै 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सुंदर पिचाई यांच्याशी संवाद साधला.

🔰येत्या 5 ते 7 वर्षांत गुगल कंपनी भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा सुंदर पिचाई यांनी केली. ते ‘गुगल फॉर इंडिया डिजिटलायझेशन फंड’ या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.

🔰प्रत्येक भारतीयाला स्वभाषेत माहिती प्राप्त होणे, भारताच्या विशिष्ट गरजांप्रमाणे वस्तू आणि सेवा विकसित करणे, डिजिटल बदलांना आत्मसात करणाऱ्या उद्योगांना मदत तसेच कल्याणकारी योजनांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर या चार क्षेत्रांसाठी ही गुंतवणूक वापरली जाणार.

🔰बंगळुरु शहरातली कृत्रिम बुद्धीमत्ता संशोधन प्रयोगशाळा, पुराचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा तसेच कोविड-19 विषयी अचूक आणि विश्वसनीय माहिती देणाऱ्या यंत्रणेविषयी देखील यावेळी उल्लेख केला गेला.

परदेशी विद्यार्थ्यांना परतपाठवणीच्या निर्णयावरून ट्रम्प प्रशासनाची माघार.

🔰ऑनलाइन वर्गात शिकणाऱ्या अमेरिकी विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे.

🔰हार्वर्ड, एमआयटी यासह अनेक विद्यापीठांनी या निर्णयाविरोधात स्थलांतर व अंतर्गत सुरक्षा विभागाविरोधात न्यायालयात दावे दाखल केले होते. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता. उन्हाळी शैक्षणिक सत्रात जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गासाठी हजेरी लावणार असतील त्यांना देशातून परत पाठवण्याचा निर्णय अमेरिकेच्या स्थलांतर विभागाने ६ जुलै रोजी घेतला होता.

🔰सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानच्या शैक्षणिक सत्रात करोना संसर्गाच्या भीतीने अनेक विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले असताना ट्रम्प प्रशासनाने जे परदेशी विद्यार्थी ऑनलाइन वर्गास हजेरी लावणार असतील त्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन आठवडय़ांनी या निर्णयावर मंगळवारी माघार घेण्यात आली असून एमआयटी, हार्वर्ड विद्यापीठ यांच्यासह एकूण दोनशे शिक्षण संस्थांनी याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते, तसेच या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती. या निर्णयाला विरोध करण्यात १७ राज्ये, गुगल, मायक्रोसॉप्ट, फेसबुक यासारख्या कंपन्याही सहभागी होत्या.

आता मास्क, सॅनिटायझरचे दरही निश्चित होणार; राज्य शासन नेमणार समिती.

🔰करोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढला असून याच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.

🔰आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. करोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटाजरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे.

🔰राज्य शासनाने यापूर्वी करोना रुग्णांकडून मनमानी पद्धतीने बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे आकारणी करण्यास भाग पाडले आहे. त्याचबरोबर करोना चाचण्यांचे तसेच रुग्णवाहिकांसाठीही दर निश्चित करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क आणि सॅनिटायजर उपलब्ध व्हावे यासाठी त्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

पवन ऊर्जेच्या बाबतीत भारत जगात चौथ्याक्रमांकाचा देश

🔰 ब्लूमबर्ग आणि पॉवर-टेक्नॉलॉजी या संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार, 2018 सालापर्यंत प्रस्थापित झालेल्या पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत आज भारत जगातला चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे.

🔰भारताने आतापर्यंत देशात पवन ऊर्जेच्या निर्मितीसाठी 35 गीगावॉट (GW) एवढी क्षमता प्रस्थापित केलेली आहे.

🔰भारत 35 GW क्षमतेसह भारत आशियातला द्वितीय क्रमांकाचा देश आहे

     🔘तामिळनाडूमध्ये 1,500 MW क्षमतेचा      मुपांडल पवन ऊर्जा प्रकल्प
     🔘   राजस्थानमध्ये 1,064 MW क्षमतेचा जैसलमेर पवन ऊर्जा प्रकल्प

( जगातले 3rd आणि 4th क्रमांकाचे सर्वात मोठे किनारपट्टीलगतचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत )

🔴10 देशांच्या या यादीत

  1)चीन        (221.0 GW )
  2) अमेरिका (96.4 GW )
  3) जर्मनीच  (59.3 GW)
  4) भारत     (35.0 GW)

🔰 पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत, केवळ एकट्या चीनचाच जगात प्रस्थापित करण्यात आलेल्या एकूण क्षमतेच्या जवळजवळ एक तृतियांश हिस्सा आहे. चीनकडे 7,965 मेगावॉट (MW) क्षमता असलेला जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठा किनारपट्टीलगतचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.

🔰 जगातल्या 10 सर्वात मोठ्या किनारपट्टीलगतच्या पवन ऊर्जा प्रकल्पांपैकी सहा अमेरिका या देशात आहेत. कॅलिफोर्निया येथील 1,548 MW क्षमतेचा अल्टा विंड एनर्जी सेंटर हा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा किनारपट्टीलगतचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.अन्य देशांमध्ये स्पेनमध्ये 23 GW, ब्रिटनमध्ये 20.7 GW, फ्रान्समध्ये 15.3 GW, ब्राझीलमध्ये 14.5 GW, कॅनडामध्ये 12.8 GW आणि इटलीमध्ये 10 GW पवन ऊर्जा क्षमता प्रस्थापित केली गेली आहे.

भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे.

🔰भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे.

🔰बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.

🔰COVID-19 ची सामान्य ते गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.

🔰या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये आहे.

🔰बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून इटोलीझुमॅब
इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली आहे.

“भारतात बनवाट अयोध्या, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू रामचंद्र नेपाळी”.

🔰“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली  यांनी केलं आहे. भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत असं वक्तव्य ओली यांनी केलं आहे. तसंच आपल्याला पंतप्रधान पदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत असंही ओली यांनी म्हटलं आहे.

🔰नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे सातत्याने भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचंही त्यांनी म्हटं आहे.

🔰कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचंही म्हटलं आहे. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

महामार्ग संरचना दर्जेदार करण्यासाठी NHAI देशातल्या अव्वल तंत्र संस्थांशी भागीदारी करणार.

🔰जागतिक दर्जाचे महामार्ग जाळे तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, देशातल्या सर्व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्याशी सहयोग करीत जवळचा राष्ट्रीय महामार्ग पट्टा स्वेच्छेने, संस्थात्मक सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्यांच्याशी संपर्क केला आहे.

🔰विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या प्रतिभेचा देशातल्या रस्ते संरचना सुधारण्यासाठी लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यासह संस्थाना स्थानिक आवश्यकता, भौगोलिक रचना, संसाधने क्षमता याविषयी उत्तम जाण असते आणि याचाच NHAI रस्ते बांधकाम करण्यापूर्वी, बांधकाम करण्यासाठी अशा विविध टप्प्यात उपयोग करू इच्छिते.

🔰संस्थेनी पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने वाहतूक कोंडी, अपघात प्रवण स्थळे तातडीने जाणणे, यासह स्थानिक समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक समस्या दूर करण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहेत.

🔰 यामुळे NHAIला सध्याच्या आणि भविष्यातल्या प्रकल्पांसाठी स्थानिक गरजा जाणून घ्यायला, देखभाल सुधारायला आणि प्रवास सुखकर करायला, तसेच महामार्गालगत सुविधा विकसित करायला मदत होणार आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांना अनुकूल आणि आनंददायी प्रवास अनुभवता येणार.

🔴भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विषयी...

🔰भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. हे भारतात 1,15,000 कि.मी.पैकी एकूण 50,000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे. संस्थेची स्थापना 1988 साली झाली. हे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांना दिलेली नावे


● अशोक =  देवानाम प्रिय प्रियदस्स

● समुद्रगुप्त =  भारताचा नेपोलियन

● चंद्रगुप्त मौर्य  = सॅन्ड्रीकोटेस

● बिंदुसार = अमित्रोकोटेस

● कनिष्क = देवपुत्र

● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन

● राजराजा = शिवपाद शिखर

● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल

● चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य

● कुमार गुप्त = महेंद्रादित्य

● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज

● धनानंद = अग्रमिस

● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन

● हर्षवर्धन = शिलादित्य

● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर

● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर

● बलबन = उगलु खान

● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान

● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक

● जहांगीर = सलीम

● शेरशाह = शेरखान

● मलिक सरवर = मलिक उस शर्क

● जगत गोसाई = जोधाबाई

● शहाजहान = शहजादा

● औरंगजेब = जिंदा पिर

● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम

● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज

● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन

● बाळाजी बाजीराव = नानासाहेब

● माधवराव नारायण = सवाई माधवराव

● जवाहरलाल नेहरू = चाचा 

● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी

● चित्तरंजन दास = देश बंधू

● सुभाष चंद्र बोस = नेताजी

● जयप्रकाश नारायण = लोकनायक

● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर

● सरोजिनी नायडू = गानकोकिळा

● के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी

● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार

● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष

● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी

पोलीस दलात १२ हजार पदांची मेगा भरती:-

📚बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

📚गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

📚 डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.

📚या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...