१८ जुलै २०२०

पवन ऊर्जेच्या बाबतीत भारत जगात चौथ्याक्रमांकाचा देश

🔰 ब्लूमबर्ग आणि पॉवर-टेक्नॉलॉजी या संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार, 2018 सालापर्यंत प्रस्थापित झालेल्या पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत आज भारत जगातला चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे.

🔰भारताने आतापर्यंत देशात पवन ऊर्जेच्या निर्मितीसाठी 35 गीगावॉट (GW) एवढी क्षमता प्रस्थापित केलेली आहे.

🔰भारत 35 GW क्षमतेसह भारत आशियातला द्वितीय क्रमांकाचा देश आहे

     🔘तामिळनाडूमध्ये 1,500 MW क्षमतेचा      मुपांडल पवन ऊर्जा प्रकल्प
     🔘   राजस्थानमध्ये 1,064 MW क्षमतेचा जैसलमेर पवन ऊर्जा प्रकल्प

( जगातले 3rd आणि 4th क्रमांकाचे सर्वात मोठे किनारपट्टीलगतचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत )

🔴10 देशांच्या या यादीत

  1)चीन        (221.0 GW )
  2) अमेरिका (96.4 GW )
  3) जर्मनीच  (59.3 GW)
  4) भारत     (35.0 GW)

🔰 पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत, केवळ एकट्या चीनचाच जगात प्रस्थापित करण्यात आलेल्या एकूण क्षमतेच्या जवळजवळ एक तृतियांश हिस्सा आहे. चीनकडे 7,965 मेगावॉट (MW) क्षमता असलेला जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठा किनारपट्टीलगतचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.

🔰 जगातल्या 10 सर्वात मोठ्या किनारपट्टीलगतच्या पवन ऊर्जा प्रकल्पांपैकी सहा अमेरिका या देशात आहेत. कॅलिफोर्निया येथील 1,548 MW क्षमतेचा अल्टा विंड एनर्जी सेंटर हा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा किनारपट्टीलगतचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.अन्य देशांमध्ये स्पेनमध्ये 23 GW, ब्रिटनमध्ये 20.7 GW, फ्रान्समध्ये 15.3 GW, ब्राझीलमध्ये 14.5 GW, कॅनडामध्ये 12.8 GW आणि इटलीमध्ये 10 GW पवन ऊर्जा क्षमता प्रस्थापित केली गेली आहे.

भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे.

🔰भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे.

🔰बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.

🔰COVID-19 ची सामान्य ते गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.

🔰या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये आहे.

🔰बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून इटोलीझुमॅब
इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली आहे.

“भारतात बनवाट अयोध्या, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू रामचंद्र नेपाळी”.

🔰“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली  यांनी केलं आहे. भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत असं वक्तव्य ओली यांनी केलं आहे. तसंच आपल्याला पंतप्रधान पदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत असंही ओली यांनी म्हटलं आहे.

🔰नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे सातत्याने भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचंही त्यांनी म्हटं आहे.

🔰कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचंही म्हटलं आहे. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

महामार्ग संरचना दर्जेदार करण्यासाठी NHAI देशातल्या अव्वल तंत्र संस्थांशी भागीदारी करणार.

🔰जागतिक दर्जाचे महामार्ग जाळे तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, देशातल्या सर्व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्याशी सहयोग करीत जवळचा राष्ट्रीय महामार्ग पट्टा स्वेच्छेने, संस्थात्मक सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्यांच्याशी संपर्क केला आहे.

🔰विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या प्रतिभेचा देशातल्या रस्ते संरचना सुधारण्यासाठी लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यासह संस्थाना स्थानिक आवश्यकता, भौगोलिक रचना, संसाधने क्षमता याविषयी उत्तम जाण असते आणि याचाच NHAI रस्ते बांधकाम करण्यापूर्वी, बांधकाम करण्यासाठी अशा विविध टप्प्यात उपयोग करू इच्छिते.

🔰संस्थेनी पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने वाहतूक कोंडी, अपघात प्रवण स्थळे तातडीने जाणणे, यासह स्थानिक समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक समस्या दूर करण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहेत.

🔰 यामुळे NHAIला सध्याच्या आणि भविष्यातल्या प्रकल्पांसाठी स्थानिक गरजा जाणून घ्यायला, देखभाल सुधारायला आणि प्रवास सुखकर करायला, तसेच महामार्गालगत सुविधा विकसित करायला मदत होणार आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांना अनुकूल आणि आनंददायी प्रवास अनुभवता येणार.

🔴भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विषयी...

🔰भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. हे भारतात 1,15,000 कि.मी.पैकी एकूण 50,000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे. संस्थेची स्थापना 1988 साली झाली. हे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांना दिलेली नावे


● अशोक =  देवानाम प्रिय प्रियदस्स

● समुद्रगुप्त =  भारताचा नेपोलियन

● चंद्रगुप्त मौर्य  = सॅन्ड्रीकोटेस

● बिंदुसार = अमित्रोकोटेस

● कनिष्क = देवपुत्र

● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन

● राजराजा = शिवपाद शिखर

● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल

● चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य

● कुमार गुप्त = महेंद्रादित्य

● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज

● धनानंद = अग्रमिस

● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन

● हर्षवर्धन = शिलादित्य

● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर

● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर

● बलबन = उगलु खान

● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान

● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक

● जहांगीर = सलीम

● शेरशाह = शेरखान

● मलिक सरवर = मलिक उस शर्क

● जगत गोसाई = जोधाबाई

● शहाजहान = शहजादा

● औरंगजेब = जिंदा पिर

● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम

● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज

● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन

● बाळाजी बाजीराव = नानासाहेब

● माधवराव नारायण = सवाई माधवराव

● जवाहरलाल नेहरू = चाचा 

● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी

● चित्तरंजन दास = देश बंधू

● सुभाष चंद्र बोस = नेताजी

● जयप्रकाश नारायण = लोकनायक

● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर

● सरोजिनी नायडू = गानकोकिळा

● के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी

● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार

● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष

● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी

पोलीस दलात १२ हजार पदांची मेगा भरती:-

📚बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

📚गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

📚 डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.

📚या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

१७ जुलै २०२०

Mpsc pre exam samples question

1) ग्राम अभियान मोहिमेचा उद्देश  हा आहे.

A. कर वसुली

B. करमणुक

C. ग्रामिण विकासात जनतेचा सहभाग व जनजागृती ✍️

D. कर्जमाफी.

__________________

2) 'स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✍️

C. र. धों. कर्व

D. डॉ. पंजाबराव देशमुख.

________________

3) अँथ्राक्स हा रोग _ मुळे होतो.

A. पास्चुरेला मल्टीसीडा (Pastarella niultician)

B. ब्रूसेला एन्थेसिस (Brucella arithrasis)

C. बॅसलियस एन्थेसिस (Bacillius anitlirasis) ✍️

D. क्लोसट्रीडियम स्पेशीज (Clostriditum sp.).

________________

4) फुप्फुस दाह विकार असणा-या एड्स रूग्णाला कोणती औषधी तोंडाद्वारे दिली जाते ?

A. पायरीमियँमाइन

B. सल्फाडायाझाईन

C. प्यूटॉमायडीन

D. कॅट्रिमोक्साझोल.✍️

________________

5) _ हे महाराष्ट्रातील जास्त पावसाचे ठिकाण आहे.

A. मुंबई

B. अंबोली✍️

C. पाचगणी

D. कोल्हापूर.

__________________

6) महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र _ जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

A. सातारा

B. रायगड

C. ठाणे

D. गडचिरोली✍️

__________________

7)आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज _ प्रकारची असते.

A. ए.सी.✍️

B. ए.सी. व डी.सी.

C. 50 हर्ट्झ डी.सी.

D. चुंबकीय.

__________________

8) भारतातील पहिला लोहमार्ग इ.स ____ साली सुरु झाला.

A. 1863

B. 1865

C. 1853✍️

D. 1858.

________________

9) रातांधळेपणा हा _ या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.

A. जीवनसत्व-ड

B. जीवनसत्व-ब

C. जीवनसत्व-अ ✍️

D. जीवनसत्व-क.

__________________

10) रेणूचा आकार 1 ते 100 नॅनोमिटर असणा-या शास्त्राला काय म्हणतात?

A. सुक्ष्मशास्त्र

B. अतिसूक्ष्म (नॅनोसायन्स) शास्त्र✍️

C. विशाल वस्तु शास्त्र

D. यापैकी कोणतेही नाही.

________________

वैद्यकीय महाविद्यालय , मुंबई.

🅾कोलकाता या ठिकाणी इ.स.1822 मध्ये एक वैद्यकीय शाळा सुरू केली होती.
याच धर्तीवर इ. स.1826 मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले .

🅾इ.स.1836 मध्ये सर रॉबर्ट ग्रँट यांचे पुण्याजवळ अपघाती निधन झाले.. ते व्हर्नर होते.

🅾पुढे त्यांचे नाव मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालय यास देण्यात आले .

🧩# द बॉम्बे नेटिव्ह व स्कूल बुक सोसायटी-

🅾एल्फिन्स्टन यांच्या प्रेरणेने मुंबई येथे या सोसायटीची इ स 1820 मध्ये झाली .

🅾इ.स.1840 पर्यंत या सोसायटीने याच नावाने कार्य केले .

🅾शिक्षणसाठी निधी जमा करणे हे या सोसायटीचे प्रमुख उद्दिष्ट होते

🅾तसेच अनेक महत्वच्या ग्रंथाचे अनुवाद मराठी व गुजराती भाषेत केले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

🅾बडोदा संस्थानात 1906 साली प्राथमिक शिक्षण आवश्यक केले.

🅾21 फेब्रुवारी 1913 च्या ठरवाद्वारे सरकारने आवश्यक शिक्षण सिद्धांत मान्य केला नाही पण निरक्षरता हटविण्याचे धोरण स्वीकारले .

🅾प्रांतिक सरकारना प्रोत्साहन देण्यात आले की , समाजातील मागास आणि गरीब वर्गाला निःशुल्क प्राथमिक शिक्षण मिळण्याची व्यवस्था करावी.

🅾खाजगी प्रयत्न करणाऱ्यांना संमती देण्याचेही ठरवले .

🅾भारतीय विद्यापीठ कायदा -1904

🅾सॅडलर विद्यापीठ आयोग - 1917 ते 1919

🅾हरटोग समिती -  19129

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राज्यसेवा प्रश्न मंजुषा


Q1) औद्योगिक धोरणा बद्दल खालील विधान ओळखा

1) 24 जुलै 1994 रोजी केंद्र शासनाने आपले नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले.
2) देशातील उद्योगधंद्यांच्या वाढीस व तांत्रिक प्रगतीस पोषक वातावरण निर्माण करणे
3) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आत्मविश्वासपूर्वक उतरण्याची क्षमता निर्माण करणे हा हेतू

१) सर्व बरोबर
२) 1 व 2 बरोबर
३) 2 व 3 बरोबर 💐💐
४) सर्व चूक

Q2) ____ या प्रकारच्या बेरोजगारीस 'बारमाही न्यून रोजगार' किंवा 'व्यापक प्रच्छन्न बेरोजगारी' असेही म्हटले जाते.

१) हंगामी बेरोजगारी
२) खुली बेरोजगारी
३) सुशिक्षित बेरोजगार
४) अदृश्य बेरोजगारी 💐💐

Q3)
समितीचे नाव                         विषय

A) सुबिमल दत्त            1) सार्वजनिक                  
                                    उद्योग बाबतच्या                  
                                  धोरणात सुधारणा

B) सेनगुप्ता                 2) लघु उद्योगांचा                 
                                    दर्जा

C) अबिद हुसेन            3) कर सुधारणा

D) डॉ. राजा चेलय्या     4) औद्योगिक                     परवाना धोरण             
                                     समिती

       A      B      C      D
१)    1      2      3       4
२)    2      1      4       3
३)    3      4      1       2
४)    4      1      2       3💐💐

Q4) एखाद्या देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) वजा घसारा म्हणजे _____

१) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन 💐💐
२) स्थूल देशांतर्गत उत्पादन
३) निव्वळ देशांतर्गत उत्पादन
४) या पैकी नाही

       
Q5) नॅशनल रिन्युअल फंड खालील पैकी कशाशी निगडित आहे ?

१) कारखान्याची पुनर्रचना व आधुनिकीकरण
२) असंघटित कामगारांना विमा संरक्षण
३) बेरोजगारांना बेरोजगार भत्ता
४) सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार साहाय्य

१) सर्व बरोबर
२) फक्त 2 बरोबर
३) फक्त 1 बरोबर 💐💐
४) फक्त 3 बरोबर

Q6) समावेशक आर्थिकवृद्धी (Inclussive Growth) म्हणजे

१) जलद विकास
२) औद्योगिक विकास
३) गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास 💐💐
४) समतोल प्रादेशिक विकास

Q7) महाराष्ट्र राज्यातील पहिला साखर कारखाना खालील पैकी कोठे उभा राहिला ?

१) हरेगाव (बेलापूर- अहमदनगर) 💐💐
२) प्रवरानगर (लोणी- अहमदनगर)
३) माळेगाव (बारामती- पुणे)
४) सोनई (नेवासे- अहमदनगर)

.(प्रवरानगर ला सहकारी तत्वावर उभारण्यात आलेला पहिला साखर कारखाना आहे....)

Q8)
1) निर्यात आयात बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982 रोजी झाली
2) या आधी आयात निर्यातीशी निगडित पतपुरावठ्याची जबाबदारी (IDBI) भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभागावर होती
3) भारताच्या परराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात EXIM बँकेचे स्थान 'सर्वोच्च वित्तसंस्था' असेच आहे

१) 1 व 3 बरोबर
२) सर्व बरोबर 💐💐
३) फक्त 3 बरोबर
४) 1 व 2 बरोबर

Q9) खालील योग्य विधान ओळख

1) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स ची स्थापना ऑक्टोबर 1976 मध्ये झाली
2) रेल्वे आणि रक्षा मंत्रालय यांच्या अंतर्गत येत नाही
3) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स यांनी ठेवलेले हिशेब व त्यांच्या अहवालाची भारताचे सरहिशेबतपासनीस यांच्या कडून तपासणी केली जाते
4) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते

१) सर्व बरोबर 💐💐
२) 1 व 4 बरोबर
३) फक्त 1 व 2 बरोबर
४) सर्व चूक

Q10)

वित्त आयोग                        अध्यक्ष
A) 12 वा वित्त आयोग   1) ऐन के सिंग
B) 13 वा वित्त आयोग   2) वाई वि रेड्डी
C) 14 वा वित्त आयोग   3) विजय केळकर
D) 15 वा वित्त आयोग   4) सी रंगराजन
       A    B    C     D
१)   1     2     3    4
२)   4     2    3     1 
३)   4     3    2     1 ✅
४)   1     3    2     4


Q1) औद्योगिक धोरणा बद्दल खालील विधान ओळखा

1) 24 जुलै 1994 रोजी केंद्र शासनाने आपले नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले.
2) देशातील उद्योगधंद्यांच्या वाढीस व तांत्रिक प्रगतीस पोषक वातावरण निर्माण करणे
3) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आत्मविश्वासपूर्वक उतरण्याची क्षमता निर्माण करणे हा हेतू

१) सर्व बरोबर
२) 1 व 2 बरोबर
३) 2 व 3 बरोबर 💐💐
४) सर्व चूक

Q2) ____ या प्रकारच्या बेरोजगारीस 'बारमाही न्यून रोजगार' किंवा 'व्यापक प्रच्छन्न बेरोजगारी' असेही म्हटले जाते.

१) हंगामी बेरोजगारी
२) खुली बेरोजगारी
३) सुशिक्षित बेरोजगार
४) अदृश्य बेरोजगारी 💐💐

Q3)
समितीचे नाव                         विषय

A) सुबिमल दत्त            1) सार्वजनिक                  
                                    उद्योग बाबतच्या                  
                                  धोरणात सुधारणा

B) सेनगुप्ता                 2) लघु उद्योगांचा                 
                                    दर्जा

C) अबिद हुसेन            3) कर सुधारणा

D) डॉ. राजा चेलय्या     4) औद्योगिक                     परवाना धोरण             
                                     समिती

       A      B      C      D
१)    1      2      3       4
२)    2      1      4       3
३)    3      4      1       2
४)    4      1      2       3💐💐

Q4) एखाद्या देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) वजा घसारा म्हणजे _____

१) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन 💐💐
२) स्थूल देशांतर्गत उत्पादन
३) निव्वळ देशांतर्गत उत्पादन
४) या पैकी नाही

       
Q5) नॅशनल रिन्युअल फंड खालील पैकी कशाशी निगडित आहे ?

१) कारखान्याची पुनर्रचना व आधुनिकीकरण
२) असंघटित कामगारांना विमा संरक्षण
३) बेरोजगारांना बेरोजगार भत्ता
४) सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार साहाय्य

१) सर्व बरोबर
२) फक्त 2 बरोबर
३) फक्त 1 बरोबर 💐💐
४) फक्त 3 बरोबर

Q6) समावेशक आर्थिकवृद्धी (Inclussive Growth) म्हणजे

१) जलद विकास
२) औद्योगिक विकास
३) गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास 💐💐
४) समतोल प्रादेशिक विकास

Q7) महाराष्ट्र राज्यातील पहिला साखर कारखाना खालील पैकी कोठे उभा राहिला ?

१) हरेगाव (बेलापूर- अहमदनगर) 💐💐
२) प्रवरानगर (लोणी- अहमदनगर)
३) माळेगाव (बारामती- पुणे)
४) सोनई (नेवासे- अहमदनगर)

.(प्रवरानगर ला सहकारी तत्वावर उभारण्यात आलेला पहिला साखर कारखाना आहे....)

Q8)
1) निर्यात आयात बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982 रोजी झाली
2) या आधी आयात निर्यातीशी निगडित पतपुरावठ्याची जबाबदारी (IDBI) भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभागावर होती
3) भारताच्या परराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात EXIM बँकेचे स्थान 'सर्वोच्च वित्तसंस्था' असेच आहे

१) 1 व 3 बरोबर
२) सर्व बरोबर 💐💐
३) फक्त 3 बरोबर
४) 1 व 2 बरोबर

Q9) खालील योग्य विधान ओळख

1) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स ची स्थापना ऑक्टोबर 1976 मध्ये झाली
2) रेल्वे आणि रक्षा मंत्रालय यांच्या अंतर्गत येत नाही
3) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स यांनी ठेवलेले हिशेब व त्यांच्या अहवालाची भारताचे सरहिशेबतपासनीस यांच्या कडून तपासणी केली जाते
4) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते

१) सर्व बरोबर 💐💐
२) 1 व 4 बरोबर
३) फक्त 1 व 2 बरोबर
४) सर्व चूक

Q10)

वित्त आयोग                        अध्यक्ष
A) 12 वा वित्त आयोग   1) ऐन के सिंग
B) 13 वा वित्त आयोग   2) वाई वि रेड्डी
C) 14 वा वित्त आयोग   3) विजय केळकर
D) 15 वा वित्त आयोग   4) सी रंगराजन
       A    B    C     D
१)   1     2     3    4
२)   4     2    3     1 
३)   4     3    2     1 ✅
४)   1     3    2     4


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ
४. बोकारो व राजमहाल

२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन

३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅

५.  जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३

६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान
४. जेट ट्रेनर

७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून

८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर

९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९

१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.

११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा

१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१

१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ
४. परम तेज

१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे

१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क

१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते.
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...