१४ जुलै २०२०

राजे उमाजी नाईक

(जन्म: ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते

आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक [खोमणे]
जन्म:
सप्टेंबर ७, १७९१
किल्ले पुरंदर,भिवडी, पुणे, ब्रिटिश भारत
मृत्यू:
फेब्रुवारी ३, १८३२
खडकमाळ आळी , पुणे, ब्रिटिश भारत
चळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म:
हिंदू (रामोशी)
वडील:
दादोजी खोमणे
आई:
लक्ष्मीबाई

■भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले.ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.

■३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, राजे उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.पण सर्व जाती-धर्माँनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

■क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे.मग हे राजे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे ती आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वतःच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्टसन याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?" तर [ मॉकिनटॉस]म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.

°आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक

■उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला.वडिल दादोजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसे उमाजीराजे मोठे होत गेले तसा त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजीराजे बेभान झाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.

■उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखा धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले .या घटनेचे इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने फार आश्चर्य व कौतुक केले.आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्यांचा कारवाया आणखी वाढल्या. उमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीराजेंना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिनटॉस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारासफर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीराजेंच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीराजेंचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका सैन्य तुकडीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.

■इंग्रजांणसारख्या बलाढ्य शत्रुशी मुकाबला करायचा म्हणजे मोठे मणुष्यबळ असायला हवे .म्हणजेच सैन्य व प्रचंड खर्च आलाच.पण उद्देश महान असल्यामुळे ते साधनाअभावी थांबले नाहीत.ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानायचे असे खुद्द इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने नमूद केले आहे. २४ फेब्रुवारी १८२४ ला उमाजीराजेंनी भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. २२ जुलै १८२६ साली आद्यक्रांतिकारक उमाजींचा राज्याभिषेक कडेपठार,जेजुरी या ठिकाणी करण्यातआला.त्यांनी छत्रचामर,अबदागीर,इ.राजचिन्हे धारण केली.दरबारात ते भिक्षुक-पुजारी यांना दक्षिणा व गोरगरिबांना दान देत असत.उमाजीराजेंनी विभागनिहाय सैन्य प्रमुख व त्यांच्या तुकड्या नेमून सर्व भागात तैनात केल्या होत्या आणि त्यांना कामे वाटून दिली होती. तसेच त्यांनी एकमेकांशी संपर्क,दळणवळण,इंग्रजांच्या बातम्या तसेच लोकांचा बातम्या,इ.कामासाठी हेरखातेही निर्माण केले होते.विभागनिहाय गुप्तहेरखाते नेमले होते.सैन्यात व गुप्तहेरखात्यात सर्व जाती-धर्माचे लोक होते. २८ ऑक्टोबर १८२६ साली उमाजीराजेंविरुद्ध इंग्रजांनी १ला जाहिरनामा प्रसिद्ध केला.त्यात उमाजीराजे व त्यांचा साथीदारांना पकडणाऱ्यास मोठ्या रकमेची बक्षिसे व इनाम जाहिर केले व या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्यास शिक्षा जाहीर केली.पण जनतेने इंग्रजांना मदत केली नाही. यातून उमाजीराजेंची लोकप्रियता दिसून येते.अशाच प्रकारे २ रा जाहिरनामा इंग्रजांनी ८ ऑगस्ट १८२७ साली प्रसिद्ध केला.त्यात बक्षिसाची रक्कम वाढवली व शरण येणाऱ्यास माफी देण्याचे अभिवचन देण्यात आले.तरीही कोणीही मदत केली नाही.कारण लोक उमाजीराजेंना इंग्रजांविरुद्ध एक आशास्थान म्हणून पाहू लागले होते . २० डिसेंबर १८२७ साली उमाजीराजे व इंग्रजांच्या झालेल्या युद्धात इंग्रजांना पराभव पत्करावा लागला. उमाजीराजेंनी ५ इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.कैप्टन डेव्हिस पासून ते लेफ्टनंट पर्यंत सर्वच लालबुंद झाले. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. इंग्रजांनी ३ रा जाहिरनामा उमाजीराजेंविरुद्ध प्रसिध्द करुन बक्षिसाची रक्कम दुप्पट केली.त्याचाही काही उपयोग झाला नाही. जंजिऱ्याचा सिद्दी नवाब याने उमाजीराजे कोकणात गेले असताना त्यांना मदत मागितली होती. २४ डिसेंबर १८३० ला उमाजीराजेंनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते आणि काहीचे प्राण घेतले. २६ जानेवारी १८३१ साली इंग्रजांनी ४ था जाहिरनामा प्रसिद्ध केला व त्यात उमाजीराजेंना पकडून देणाऱ्यास ५०००रुपये रोख बक्षिस व २००बिघे (१००एकर)जमीन जाहिर करण्यात आली.पण तरीही कोणीही इंग्रजांना मदत केली नाही.अशा प्रकारे उमाजीराजेंचा भारताचा स्वातंत्र्यासाठी असनाऱ्या लढ्यास सर्व राजे-रजवाडे,संस्थानिक,जनता पाठिंबा देत होते.

■उमाजीराजेंनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, "लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे ,सरदार जमीनदार, वतनदार,देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड पुकारावे आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.असे करणाऱ्यास नवीन सरकारमधून जहागिरी,इनामे वा रोख पैशाची बक्षीसे मिळतील.ज्यांची वंशपरंपरागत वतने,तनखे,इ.इंग्रज सरकारमुळे गेले असतील ती सर्व त्यांना परत केली जातील. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे व नवीन न्यायाधीष्ठीत राज्याची स्थापना होइल. इंग्रजांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल" असे सांगून उमाजीराजेंनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. संपुर्ण क्रांतिकारकांचा इतिहासात अशा प्रकारचा व्यापक जाहिरनामा प्रथमच दिसतो.हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पानच आहे.म्हणूनच उमाजीराजे हे आध्यक्रांतिकारक ठरतात. तेंव्हापासून उमाजी हे जनतेचे राजे बनले. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीराजेंना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली .इंग्रजांनी उमाजीराजेंविरुद्ध ५वा जाहिरनामा प्रसिद्ध केला. माहिती देणाऱ्यास १० हजार रु
पये रोख आणि चारशे बिघे (200एकर) जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.हा इनाम त्या काळात अगनित होता. त्र्यंबक चंद्रस कुलकर्णी हा फितूर झाला व याने उमाजींराजेंची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.

■१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजीराजे नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले.जीवंतपणी सतत ताठ राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वाकली. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीराजेंचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीराजेंसोबत इंग्रजांनी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.

■अशा या धाडसी उमाजीराजेंनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी उमाराजेंचे धोरण डोळ्यासमोर ठेवून ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील

संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी INST संस्थेच्या वैज्ञानिकांनी अतिसूक्ष्म कण तयार केले.


🅾मोहाली (पंजाब) येथील भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या (INST) वैज्ञानिकांनी चिटोसनसह अतिसूक्ष्म कण (नॅनो पार्टिकल्स) तयार केले आणि संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी या कणाला झिंक ग्लुकोनेटसहीत भारित केले.

🔷संशोधनाविषयी..

🅾हाडांची सामान्य स्थिती कायम राखण्यासाठी जस्ताच्या (झिंक) योग्य प्रमाणाची आवश्यकता असते. संधिवाताच्या रुग्णांमध्ये आणि संधिवात-प्रेरित प्राण्यांमध्ये त्याची पातळी कमी झाल्याची नोंद आहे. झिंक ग्लुकोनेटच्या रूपात जस्ताच्या पूरक मात्रेची जैव उपलब्धता मानवांमध्ये खूप कमी आहे हे देखील तितकेच खरे आहे.

🅾चिटोसन हे क्रॉस्टेसियन्सच्या बाह्य कंकालातून प्राप्त केलेल्या बहुतेक बायोपॉलिमरांपैकी एक म्हणजे जैव अनुरूप, जैव विघटनशील नैसर्गिक पॉलिसेकेराइड असून शोषण प्रोत्साहन वैशिष्ट्ये दर्शविते.

🅾वैज्ञानिकांनी विशेषतः चिटोसन निवडले आहे कारण ते जैव विघटनशील, जैव अनुरूप, बिन विषारी आणि नैसर्गिकरीत्या म्यूकोएडेसिव्ह आहे. यापूर्वी 'मॅग्नेशियम रिसर्च' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, उंदरांवर याचा प्रयोग केल्यावर झिंक ऑक्साईडच्या प्रमाणित स्वरुपातील सीरम झिंक पातळीत किंचित वाढ झाली, तर नॅनो स्वरूपात सीरम झिंकच्या पातळीत जास्त वाढ झाली परिणामी जस्ताची जैवउपलब्धता वाढली. यामुळे झिंक ग्लुकोनेट नॅनो स्वरूपात विकसित करण्यासाठी नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या चमूला प्रेरणा मिळाली.

🅾वैज्ञानिकांच्या चमूने जैव रासायनिक विश्लेषण, सुक्षमदर्शकीय निरीक्षणे आणि सूज आल्यासारखी लक्षणे यासारख्या विविध बाबींचे मूल्यांकन केले आणि झिंक ग्लुकोनेट-भारित चिटोसन नॅनो कणांद्वारे झिंक ग्लूकोनेटच्या मुक्त स्वरूपाच्या तुलनेत उत्कृष्ट उपचारात्मक प्रभाव शोधण्याचे सुचविले. झिंक ग्लुकोनेट-भारित चिटोसन नॅनो कणांच्या सूज येण्याच्या गुणधर्मामुळे ते या निष्कर्षाप्रत येऊ शकले.

ओबीसींचा टक्का वाढविण्यासाठी आदिवासींच्या आरक्षणाला कात्री

🔶मुंबई: राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्य़ांतील  अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाच्या टक्के वारीवरून राज्याच्या मंत्रिमंडळात नवा वाद सुरू झाला आहे.  आदिवासींची लोकसंख्या जास्त असलेल्या आठ जिल्ह्य़ांमध्ये अनुसूचित जमातीला अधिकचे आरक्षण देण्यात आले आहे, त्यासाठी ओबीसी व काही ठिकाणी अनुसू्चित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांचे आरक्षण कमी करण्यात आले आहे. आता ओबीसींचा टक्का वाढविण्यासाठी आदिवासींच्या आरक्षणाला कात्री लावण्याचे घाटत आहे. आदिवासी विकासमंत्र्यांचा मात्र त्याला विरोध आहे.

❗️सध्याचे आरक्षण ❗️

🔥 राज्यात शासकीय  सेवेत एकू ण आरक्षणात अनुसूचित जाती १३ टक्के , अनुसूचित जमाती ७ टक्के , ओबीसी १९ टक्के , विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांचे १३ टक्के  आरक्षण आहे. राज्यातील पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे आदिवासीबहुल जिल्हे आहेत. या जिल्ह्य़ांतील आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय सेवेतील वर्ग तीन व चारची पदे भरताना आदिवासींना अधिकचे आरक्षण देण्यात आले आहे.  त्यामुळे इतर राखीव प्रवर्गाचे विशेषत: ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले आहे.

🔥राज्यात ३० नोव्हेंबर २०१८ रोजी सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग (मराठा आरक्षण) आणि केंद्र सरकारचा खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकाला आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यानंतर शासकीय सेवेतील नोकरभरतीसाठी बिंदुनामावलीची फे ररचना करण्यात आली. त्यानुसार पालघर, धुळे, नाशिक व नंदूरबार या चार जिल्ह्य़ांत अनुसूचित जमातीला ७ टक्क्यांऐवजी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात २२ टक्के  आरक्षण देण्यात आले. रायगडमध्ये ९ टक्के , यवतमाळमध्ये १४ टक्के , चंद्रपूरमध्ये १५ टक्के  व गडचिरोलीमध्ये २४ टक्के  आरक्षण लागू करण्यात आले.

🔥एकूण आरक्षणाची टक्के वारी तंतोतंत ठेवण्यासाठी ओबीसींसह इतर प्रवर्गाचे आरक्षण कमी करण्यात आले. पालघर, धुळे, नाशिक व नंदुरबारमध्ये ओबीसींना १९ टक्कयांऐवजी ९ टक्के  आरक्षण देण्यात आले, यवतमाळमध्ये १४ टक्के , चंद्रपूरमध्ये ११ टक्के  आणि गडचिरोलीमध्ये फक्त ६ टक्के  आरक्षण ओबीसींना लागू आहे. सहा जिल्ह्य़ांमध्ये अनुसूचित जमातीचेही आरक्षण कमी करण्यात आले आहे.

महत्त्वाचे प्रश्नसंच

📕भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी असलेल्या रेलगाडीचे नाव काय आहे?

(A) आत्रेय
(B) अधिरीत
(C) शेषनाग✅✅
(D) अभिरथ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 पाकिस्तानी लष्कराची प्रथम महिला लेफ्टनंट जनरल कोण आहे?

(A) बेगम राना
(B) शाहीदा बादशाह
(C) शाहिदा मलिक
(D) निगार जोहर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📘 कोणती कार कंपनी जगातली सर्वात मूल्यवान कार कंपनी बनली आहे?

(A) टेस्ला✅✅
(B) टोयोटा मोटर कॉर्पोरेशन
(C) जनरल मोटर्स
(D) होंडा मोटर कंपनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📙 कोण प्रथम आभासी ‘रेस अक्रॉस अमेरिका 2020’ स्पर्धेत पोडियमवर स्थान मिळविणारा पहिला भारतीय ठरला?

(A) लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू✅✅
(B) कॅप्टन श्रीराम सिंग शेखावत
(C) कॅप्टन गोपाल नारायण देवांग
(D) मेजर जनरल मोहम्मद अमीन नाईक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 कोणत्या संस्थेनी CSIR संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग डिस्कवरी हॅकथॉन’ स्पर्धा आयोजित केली?

(A) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(B) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)✅✅
(C) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT)
(D) भारतीय वैद्यकीय परिषद (MCI)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦ब्राझील देशाच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे नाव ओळखा.

(A) अॅमेझोनिया-1✅✅
(B) ऑफेक
(C) स्रोस-1
(D) एरियल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦9 जुलै 2020 रोजी चीनने _________ या नावाने एका दळणवळण उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले.

(A) CZ-2A
(B) एपस्टार-6D✅✅
(C) हैयांग-1D
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦9 जुलै 2020 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी __ राज्यातल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 6 पुलांचे उद्घाटन केले.

(A) अरुणाचल प्रदेश
(B) सिक्किम
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) उत्तराखंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) _____ सोबत माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार केला.

(A) भारतीय रिझर्व्ह बँक
(B) भारतीय रोखे व विनिमय मंडळ✅✅
(C) इन्फोसिस
(D) टाटा कन्सलटंन्सी सर्व्हिसेस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦__________ यासंबंधी संयुक्तपणे संशोधन करण्यासाठी CSIR-IGIB संस्थेनी आयआयटी अल्युमनी कौन्सिल सोबत एक करार केला.

(A) गोवर
(B) कोविड-19✅✅
(C) रोसोला
(D) देवी

पाकिस्तान सरकारच्या मंजुरीनंतर _ येथे उभारण्यात येत असलेल्या ‘श्री कृष्णा’ मंदिराचे बांधकाम काही दिवसातच थांबविण्यात आले.

(A) इस्लामाबाद✅✅
(B) लाहोर
(C) कराची
(D) यापैकी नाही

झारखंडमध्ये उभारण्यात आलेल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (IARI) नवीन इमारतीला ___ यांचे नाव देण्यात आले.

(A) जगदीप धनका
(B) बिधान चंद्र रॉय
(C) सोनाली चक्रवर्ती बॅनर्जी
(D) डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी✅✅

कोणत्या बँकेनी देशातल्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड या कंपनीला 50 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले?

(A) नवीन विकास बँक (NDB)
(B) जागतिक बँक
(C) आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB)✅✅
(D) आशियाई विकास बँक (ADB)

सर्वात मोठा फुलपाखरू म्हणून नोंदविण्यात आलेल्या भारतीय ‘गोल्डन विंग’ फुलपाखरूचे शास्त्रीय नाव काय आहे?

(A) ट्रॉईडेज आयकस✅✅
(B) रेड-बॉडीड स्वालोटेल
(C) पेपिलियो पॉलिटेस
(D) यापैकी नाही

ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या “इंडिया ग्लोबल वीक 2020” या कार्यक्रमाचा विषय काय आहे?

(A) ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली कंट्री
(B) द हॉट इन्व्हेस्टमेंट डेस्टीनेशन✅✅
(C) बी द रिव्हायवल - इंडिया अँड ए बेटर न्यू वर्ल्ड
(D) यापैकी नाही

महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

१)मुंबई -भारताचे प्रवेशद्वार, भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची राजधानी

२)रत्नागिरी -देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा

३)सोलापूर -ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी

४)कोल्हापुर -कुस्तीगिरांचा जिल्हा, गुळाचा जिल्हा

५)रायगड -तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा

६)सातारा -कुंतल देश व शुरांचा जिल्हा

७)बिड -जुन्या मराठी कविंचा जिल्हा,मिठगरांचा जिल्हा, देवळादेवळा जिल्हा, ऊस कामगारांचा जिल्हा

८)परभणी -ज्वारीचे कोठार

९)उस्मानाबाद -श्री.भवानी मातेचा  जिल्हा

१०)औरंगाबाद -वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा, मराठवाडयाची
राजधानी

११)नांदेड -संस्कृत कवींचा जिल्हा

१२)अमरावती -देवी रुख्मिणी व दमयंतीचा जिल्हा

१३)बुलढाणा -महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ

१४)नागपुर -संत्र्यांचा जिल्हा

१५)भंडारा-तलावांचा जिल्हा

१६)गडचिरोली-जंगलांचा जिल्हा

१७)चंद्रपुर-गौंड राजांचा जिल्हा

१८)धुळे -सोलर सिटीचा जिल्हा
                    
१९)नंदुरबार -आदिवासी बहुल
                                   जिल्हा

२०)यवतमाळ -पांढरे सोने,  कापसाचा जिल्हा
                   
२१)जळगाव -कापसाचे शेत,केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचा प्रवेशद्वार

२२)अहमदनगर - साखर कारखाने असलेला जिल्हा

२३)नाशिक -मुंबईची परसबाग, द्राक्षांचा जिल्हा, मुंबईचा गवळीवाडा

२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,कलावंतांचा जिल्हा

विज्ञान - शोध व संशोधक


◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी

◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो

◾️ विजेचा दिवा - एडिसन

◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

◾️ सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ सायकल - मॅकमिलन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन

◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर

◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन

◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
____________________________________

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...