०२ जुलै २०२०

चीनची नवी खेळी, भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी.

🔰भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमं तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. चिनी सरकारचं मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स तसंच वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. यादरम्यान चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय प्रसारमाध्यमं आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

🔰भारतीय टीव्ही चॅनेल्स सध्या आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केलं जाऊ शकतं.

🔰१५ जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या चकमकीत दोन्ही देशांचं नुकसान झालं असून भारताचे २० जवान शहीद झाले आहेत तर चिनी सैनिकही ठार झाले आहेत.

काँग्रेसचे अधिवेशन व अध्यक्ष

1885 - मुंबई : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

1886 -  कोलकाता : दादाभाई नौरोजी

1887 -  मद्रास : बुद्रुदिन तय्यबजी

1888 -  अलाहाबाद : जॉर्ज युल

1889 - मुंबई : सर विल्यम वेडरबर्न

1890 - कोलकाता : फिरोजशहा मेहता

1891 - नागपूर : पी आनंदा चारलू

1892 -  अलाहाबाद : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

1893 - लाहोर : दादाभाई नौरोजी

1894 -  चेन्नई : आल्फ्रेड वेब

1895 - पुणे : सुरेंद्रनाथ बॅनर्जी

1896 - कोलकाता : महंमद सयानी

मत्स्यव्यवसाय

खाऱ्या पाण्याच्या मत्स्योत्पादनात प्रथम क्रमांक – केरळ

गोड पाण्याच्या मत्स्य उत्पादनात प्रथम क्रमांक – पश्चिम बंगाल

महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचबरोबर सागरी मासेमारी करिता 1.12 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र राखीव आहे.

महाराष्ट्रात सागरी किनाऱ्यावर मासोळी उतरण्याकरिता 173 केंद्र आहे

देशातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 13.1 % इतके आहे सर्वात जास्त बोंबीलचे उत्पादन ठाणे जिल्ह्यात होते.

खोपोली (रायगड) येथे पहिला मत्स्यबीज व केंद्राची स्थापना करण्यात आली होती.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्रांती घडवून आणलेले आहे.

हरितक्रांती

नीळक्रांती मत्स्यउत्पादन

पित्त क्रांती गळीत धान्य तेल उत्पादन वाढविण्यासाठी

श्वेतक्रांती रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी

गुलाबी क्रांती झिंगी उत्पादन वाढविण्यासाठी

इंद्रधनुष क्रांती डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेती विकासासाठी सुचविलेल्या 7 सुधारणांना इंद्रधनुष क्रांती असे म्हटले जाते

सुवर्ण क्रांती फळे व मधमाशी पालन

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती


▪️1. ग्रहाचे नाव - बूध

·         सूर्यापासुन चे अंतर - 5.79  

·         परिवलन काळ - 59 

·         परिभ्रमन काळ - 88 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. 

▪️2. ग्रहाचे नाव - शुक्र

·         सूर्यापासुन चे अंतर - 10.82  

·         परिवलन काळ - 243 दिवस 

·         परिभ्रमन काळ - 224.7 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 

▪️3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

·         सूर्यापासुन चे अंतर - 14.96  

·         परिवलन काळ - 23.56 तास 

·         परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 

▪️4. ग्रहाचे नाव - मंगळ

·         सूर्यापासुन चे अंतर - 22.9  

·         परिवलन काळ - 24.37 तास 

·         परिभ्रमन काळ - 687 

·         इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत. 

▪️5. ग्रहाचे नाव - गुरु

·         सूर्यापासुन चे अंतर - 77.86 

·         परिवलन काळ - 9.50 तास 

·         परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे 

इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

 

▪️6. ग्रहाचे नाव - शनि

·         सूर्यापासुन चे अंतर - 142.6 

·         परिवलन काळ - 10.14 तास 

·         परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष 

·         इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत. 

▪️7. ग्रहाचे नाव - युरेनस  

·         सूर्यापासुन चे अंतर - 268.8  

·         परिवलन काळ - 16.10 तास 

·         परिभ्रमन काळ - 84 वर्षे 

·         इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 

▪️8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  

·         सूर्यापासुन चे अंतर - 449.8 

·         परिवलन काळ - 16 तास 

·         परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे 

·         इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी


📚लोककला क्षेत्रात प्रदीर्घ कामगिरीसाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा मानाचा '**तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ कलावंत गुलाब संगमनेरकर** यांना.

📚तसेच संगीत रंगभूमीवरील प्रदीर्घ कारकिर्दीसाठी देण्यात येणारा 'संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना  जाहीर झाला.

📚 मानपत्र, मानचिन्ह व पाच लाख रुपयेअसे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

📚नारायणगावकर पुरस्कार २०१८-१९ या वर्षासाठीचा तर किर्लोस्कर पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठीचा आहे. सरकार स्थापनेची प्रक्रिया आणि नंतर करोना संकट या कारणांमुळे पुरस्कार घोषणेची प्रक्रिया लांबली.

📚संगमनेरकर यांनी वयाच्या नवव्या वर्षांपासून तमाशा क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यांनी तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर, आनंदराव जळगावकर यांच्यासोबत कामे केली. काही हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या. 'रज्जो' चित्रपटात त्यांची भूमिका आहे.

📚लता मंगशेकर यांच्या 'लताबाईंच्या आजोळची गाणी' या अल्बममध्ये त्यांनी काही गाण्यांवर अदाकारी सादर केली आहे. 'गाढवाचे लग्न' या वगनाट्यात त्यांनी काम केले आहे. ८८ वर्षांच्या संगमनेरकर वयोमानामुळे आता निवडक ठिकाणी गाण्याचे सादरीकरण करतात.

📚बालगंधर्वांना आदर्श मानणाऱ्या दांडेकर यांनी संगीत रंगभूमीची दीर्घ काळ सेवा केली आहे. नाटककार विद्याधर गोखले यांच्या रंगशारदा संस्थेच्या ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘मदनाची मंजिरी’ आणि ‘ध्रुवतारा’ या अभिजात संगीत नाटकांमध्ये काम करून त्यांची कारकीर्द घडली. '

📚एकच प्याला', 'कृष्णार्जुनयुद्ध', 'झाला महार पंढरीनाथ', 'देव दीनाघरी धावला', 'मानापमान', 'मृच्छकटिक', 'संशयकल्लोळ', 'सौभद्र' व 'स्वयंवर' अशा गाजलेल्या संगीत नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. सत्तरी पार केलेल्या दांडेकर आजही संगीत रंगभूमीवर उत्साहाने कार्यरत आहेत.

संजय कुमार नवे मुख्य सचिव; अजोय मेहतांच्या हस्ते स्वीकारला पदभार

📚 राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांनी आज सूत्रे हातात घेतली आहे . मावळते मुख्य सचिव म्हणून अजोय मेहत यांचा आज मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. नवे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार यांच्या नियुक्तीचा आदेश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज संजय कुमार यांनी पदाची सूत्रे हाती घेतली आहे.

📚संजय कुमार हे अजोय मेहता यांच्याप्रमाणेच १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असून त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारदेखील आहे.

📚अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रवीणसिंह परदेशी हेही मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते मात्र ज्येष्ठतेनुसार संजय कुमार यांना संधी देण्यात आली.

📚संजय कुमार यांनी प्रशासनात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. बीड, उस्मानाबाद, औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जून १९९२ ते सप्टेंबर १९९७ दरम्यान काम पाहिले. त्याआधी ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी होते.

📚पुणे महापालिका आयुक्त, औरंगाबादचे विभागीय आयुक्त, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिवही होते अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदाची मुदत आज संपली आहे. त्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र आता त्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच वेळी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात महत्त्वाची
जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहता हे विश्वासू मानले जातात.

मेहतांकडे ही जबाबदारी:-

📚कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

📚कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असे मुख्यमंत्री सचिवालययाने म्हटले आहे.

०१ जुलै २०२०

प्रमुख युद्ध सराव

गरुड़ : भारत-फ्रांस
गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया
वरुण : भारत- फ्रांस
हॅन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन
जिमेक्स : भारत-जपान
धर्मा गार्डियन : भारत-जपान
कजिन संधि अभ्यास : भारत-जापान तटरक्षकदल
सूर्य किरण : भारत-नेपाळ
सिम्बेक्स : सिंगापुर-भारतीय नौदल
लाब्समर : भारत, ब्राझील, दक्षिण
अफ्रीका यांचं नौदल
कोंकण : भारतीय नौदल-ब्रिटन नेवी
इंद्रधनुष : भारत-ब्रिटन
मालाबार : भारत-अमेरिका-जपान
रेड फ्लैग : भारत-अमेरिका
कोप : भारत-अमेरिका
मित्र शक्ति : भारत-श्रीलंका
सलिनेक्स : भारत नौदल-श्रीलंका
इंद्र : भारत-रशिया
नसीम अल बह्न : भारत-ओमान
सम्प्रीती : भारत- बांग्लादेश
औसीइंडेक्स भारत-ऑस्ट्रेलिया नौदल
नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया-भारतीय सेना
एकुवेरिन : मालदीव-भारत

महत्वाचे प्रश्नसंच

*सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

*देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

*देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

*देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

*देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

*देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

*देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

*देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

*देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

*देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

*देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

*देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

*देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

*देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

*देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

*देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

*देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

*देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

*देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

*देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

*देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

*देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

*देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

*देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

*देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

*देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

*देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

*देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

*देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

*देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

*देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

*देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

*देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

*देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

*देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

*देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

*देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

*देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

*देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

*देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

*देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

*देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

*देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

*देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

*देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

*देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

*देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

*देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा (नागालँड)

१)महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना १९२० बेलापूर (अहमदनगर)

२)महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना - १९५० प्रवरानगर (अहमदनगर)

३)सर्वाधिक गाळप क्षमता असलेला कारखाना - वसंददादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली.

४) प्रथम महिला सहकारी साखर कारखाना - तांबाळे (कोल्हापूर)

५) साखरेचे जास्त उत्पादन करणारा जिल्हा - कोल्हापूर

६) सर्वाधीक शुगर कारखाने असलेला जिल्हा - सोलापूर

७) वसंतदादा शुगर रिसर्च इन्स्टिटयुट- मांजरी पुणे

८) मध्यवर्ती उस संशोधन केंद्र - पाडेगांव (सातारा)

९) महाराष्ट्रातील सर्वाधीक साखर उतारा कारखाना - हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना वाळवे जि. सांगली (१२.६०%)

१०) महाराष्ट्रातील सर्वाधीक गळीत हंगाम कालावधी कारखाना - यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर जि. पुणे ( २६९ दिवस)

११) महाराष्ट्रातील सर्वाधीक ऊस गाळप कारखाना - कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे जि. सांगली ( १४ लाख मे टन)

१२) महाराष्ट्रातील सर्वाधीक क्षमतेचा वापर करणारा कारखाना - विघ्नहर्ता सहकारी साखर कारखाना जुन्नर जि. पुणे (१७२% )

लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनचा दावा.


💠दक्षिण चीन महासागरापासून लडाखपर्यंत दादागिरी करत असलेल्या चीननं आता भूतानमधील भूभागावर आपला दावा सांगितला आहे. ग्लोबल एन्वायरमेंटफॅसिलिटी कौन्सिलच्या ५८ व्या बैठकीत चीनने भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा भूभाग वादग्रस्त असल्याचं म्हटलं. दरम्यानस भूतानने चीनच्या या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला आणि तो भूतानचा अविभाज्य भाग असल्याचंही म्हटलं.

💠चीनच्या दाव्याच्या विरोधात, वास्तविकता अशी आहे की मागील अनेक वर्षांमध्ये अभयारण्याच्या भूभागाबद्दल कधीही वाद झाला नव्हता. तथापि, भूतान आणि चीन दरम्यान कोणतंही सीमांकन झालेलं नाही. चीनच्या या कृतीचा भूतातनं कडाडून विरोध केला आहे, “साकतेंग वन्यजीव अभयारण्य भूतानचा अविभाज्य व सार्वभौम भूभाग आहे,” असं भूताननं स्पष्ट केलं आहे.

💠इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण वादातील एक महत्त्वाची बाब म्हणजे हे वन्यजीव अभयारण्याला कोणत्याही प्रकारचा जागतिक निधी देण्यात आलेला नाही. परंतु जेव्हा या अभयारण्यासाठी पहिल्यांदा निधी देण्याची गरज भासली तेव्हा चीननं या संधीचा फायदा घेत या भूभागावर आपला दावा केला. चीनच्या या प्रकल्पावा केलेल्या विरोधानंतरही कौन्सिलनं याला मंजुरी दिली आहे.

“प्रोजेक्ट प्लॅटिना”: महाराष्ट्रात चाललेला जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प.

L▶️कोविड-19च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरतो. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प राबवविला जात आहे. या प्रकल्पाला “प्रोजेक्ट प्लॅटिना” असे नाव देण्यात आले आहे.

▶️नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ‘प्लॅटिना’ प्रकल्प केंद्राचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याप्रसंगी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले.

▶️महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये या ठिकाणी या उपचार पद्धतीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. राज्यात ज्या 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही, तिथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहेत. हा संकलीत केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाणार.

🟣प्लाझ्मा थेरपीविषयी....

▶️प्लाझ्मा थेरपीमध्ये आजारातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यात येतात. जे रुग्ण बरे होऊन चालले आहेत त्यांनी 10 दिवसानंतर 28 दिवसांच्या आत प्लाझ्मा दान करणे आवश्यक आहे.

▶️विकित्सक रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढतात. बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तात प्रतिजैवकांचा विकास झालेला असतो. प्लाझ्मापासून ही प्रतिजैवके प्राप्त करून एखाद्या रोग्याला दिले जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.

▶️मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण यासाठी निवडला जातो.

मुखपट्टय़ा न वापरणाऱ्यांना १ हजार रुपये दंड

🚫प्रशासनाचा इशारा

◾️मुंबई : करोना संसर्गाचा उद्रेक कधीही होण्याची भीती असल्यामुळे घराबाहेर पडताना तोंडावर मुखपट्टया लावण्याचे बंधन न पाळणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिली आहे.

◾️ सार्वजनिक स्थळी वावरताना तसेच खासगी कार्यालयात व खासगी वाहनातही मुखपट्टी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

धुपेचे प्रकार

नाली धूप

पर्वतावर पाऊस पडतो मग तिथून नाले वाहतात व ते आपल्या सोबत मृदा वाहून नेतात

पर्वतीय प्रदेशात पावसामुळे अनेक नाले वाहू लागतात त्यामुळे पर्वत उतारावर खोल घड्या निर्माण होतात व फार मोठ्या प्रमाणावर धूप होते धूप च्या या प्रकाराला नाली धूप अथवा घडी धूप असे म्हणतात

सह्याद्री महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगा व सातपुडा पर्वत मी पर्वतीय प्रदेशात या प्रकारची धूप होते

चादर धूप

उदरावर जोरदार वृष्टी च्या वेळी पाण्याचे लोटे वाहत येतात त्याचबरोबर मृदेचा विस्तृत थर वाहून जाते यालाच चादर धूप असे म्हणतात

महाराष्ट्र पठारावर होणारी धूप या प्रकारचे असते

झोड धूप

पावसाच्या थेंबाच्या आकार व रीतीने झालेल्या जमिनीच्या धूपला झोड धूप म्हणतात. मातीचे शितोळे फुकले जातात.

कडाच्या पडझडीची धूप

खूप पाऊस पडत असताना पाणी जमिनीत खोल पर्यंत मूर्ती व खालच्या खडकाच्या किंवा कठीण जमिनीच्या थरामुळे आणखी खाली पाणी जाऊ शकत नाही तेव्हा पाण्याच्या दाबाने पूर्ण बाजूचा भाग कोसळतो असे कोसळण्याचे प्रकार घाटांमध्ये खिंडीमध्ये दिसून येतात

नदीकाठची होणारी धूप

नद्या आणि नाले आपला मार्ग बदलतात व एका किनाऱ्याची जमीन कापड दुसऱ्या किनाऱ्यावर रेती आणि पोयटा साठवितात

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...