३० जून २०२०

महत्त्वाच्या दऱ्या :

काश्मीर दरी- पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रूंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.

कांग्रा दरी- हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

कुलू दरी- रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.

काठमांडू दरी –  नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
शिवालिक रांगा / बाह्य हिमालय – हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालिक रांग आहे. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला. येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच डून (Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू-काश्मीर), शिवालिक रांगाच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.

हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण

बुरार्ड यांच्या मते हिमालयाचे वर्गीकरण खालील प्रकारे करण्यात आले आहे – १. पंजाब हिमालय २. कुमाऊँ हिमालय ३. नेपाळ हिमालय ४. आसाम हिमालय.
पंजाब हिमालय- सिंधू आणि सतलज नदी दरम्यान पंजाब हिमालयाचा भाग असून याची लांबी ५६० किमी इतकी आहे.

कुमाँऊ हिमालय – सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान कुमाँऊ हिमालयाचा भाग असून याची लांबी ३२० किमी इतकी आहे.

नेपाळ हिमालय – काली नदी आणि तिस्ता नदी यांदरम्यान नेपाळ हिमालयाचा भाग असून याची लांबी ८०० किमी इतकी आहे.
आसाम हिमालय – तिस्ता नदी आणि दिहांग नदी यांच्यादरम्यान आसाम हिमालयाचा भाग असून यांची लांबी ७२० किमी इतकी आहे.

पूर्वाचल – पूर्वेकडे दिहांग घळई ओलांडल्यानंतर हिमालय पर्वतरांगा दक्षिणेकडे वक्राकार गतीने वळलेल्या दिसतात. उत्तर दक्षिणेकडे जाताना यांमुळे टेकडय़ांची एक मालिकाच तयार झाली आहे. यामध्ये पुढील उपविभागांचा समावेश होतो – पूर्व-नेफा, नागा रांगा, मणिपूर टेकडय़ा, उत्तर केचर टेकडय़ा, मिझो टेकडय़ा, त्रिपुरा टेकडय़ा.

पूर्व-नेफा: यांमध्ये मिश्मी टेकडय़ा आणि पतकोई रांगा यांचा समावेश होतो.
मिश्मी टेकडय़ा: मिश्मी टेकडय़ांमध्ये पूर्वाचलमधील सर्वात उंच रांगांचा समावेश होतो. येथील अनेक शिखरांची उंची ४५०० मी. पेक्षा अधिक आहे.

नागा रांगा: नागालँड आणि म्यानमार यांदरम्यान, नागा रांगा या जलविभाजक म्हणून कार्य करतात. नागा रांगांच्या पश्चिमेला कोहिमा टेकडय़ा आहेत.

मणिपूर टेकडय़ा: भारत आणि म्यानमारच्या सरहद्दीला लागून मणिपूर टेकडय़ा आहेत. मणिपूर टेकडय़ांमध्ये लोकटॅक  सरोवर आहे. लोकटॅक सरोवरात अभिकेंद्री नदीप्रणाली (Centripetal Drainage) आढळून येते.

सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली.

🔰अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली आहेत.

🔰त्यामुळे आता एकूण लक्षणांची संख्या बारा झाली आहे. नव्या लक्षणात नाक गळणे, अतिसार, मळमळ यांचा समावेश आहे.

🔰या आधीच्या लक्षणात ताप, अंगाला थंडी वाजून येणे, कफ, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे,घसा खवखवणे यांचा समावेश  होता.

🔰2-14 दिवसांत करोनाची लक्षणे दिसतात. त्यात सार्स सीओव्ही 2 विषाणू कारण असतो.

🔰सुरुवातीला श्वासात अडचणी, ताप व कफ ही तीन लक्षणे देण्यात आली होती नंतर त्यात थंडी वाजणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे या लक्षणांची भर पडली.
आता करोना रुग्णांची संख्या 1कोटीच्या दिशेने असून 4,99,000 बळी गेले आहेत.

भारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनची रशियाला विनंती


🧬पूर्व लडाखसह चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. चीनने पुन्हा आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सध्याचा रशिया दौरा त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्यात फायटर विमानांसाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

🧬पीपल्स डेलीने रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये असे मत व्यक्त केले आहे. “तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत” असे पीपल्स डेली या वर्तमानपत्राने फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

🧬पीपल्स डेली हे चिनी सरकारचे मुखपत्र आहे. रशियाकडून आवश्यक युद्धसाहित्याची खरेदी करुन आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न सुरु असताना चिनी सरकारच्या मुखपत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. इमर्जन्सीमध्ये खरेदी करण्यासाठी केंद्राने ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

〰〰〰〰📕🔷📕〰〰〰〰
प्रश्न :-१- हिवाळी(शीतकालीन) आॕलिम्पिक स्पर्धांची सुरवात कोणत्या वर्षापासून  झाली ?

१) १८९६
२) १९४८
३) १९२८
४) १९२४✅
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-२- आॕलिम्पिक म्युजियम कोठे आहे ?

१) चीन
२) स्वित्झर्लंड✅
३) रशिया
४) यूरोप
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-३- 'बनाना किक'हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?

१) टेबल टेनिस
२) व्हाॕकी
३) फुटबाॕल✅
४) कबड्डी
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-४- 'ग्राउंड स्ट्रोक' हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?

१) टेबल टेनिस✅
२) व्हाॕकी
३) डाॕज बाॕल
४) बेसबाॕल
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-५- 'अमेरिका कप'हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?

१) टेबल टेनिस
२) व्हाॕली बाॕल
३) बास्केट बाॕल✅
४) बेसबाॕल
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-६- 'चायना कप' हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?

१) जिम्नास्टिक✅
२) पोलो
३) गोल्फ
४) शतरंज
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-७- गोळा फेक मैदानामध्ये फेक प्रदेशाचा वर्तुळातील कोण किती अंश असतो ?

१) ३५.६५°
२) ४०°
३) ३४.९२°✅
४) ४५°
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-८- सवाई मानसिंह स्टेडियम कोठे आहे ?

१) जयपूर✅
२) कोलकत्ता
३) मुंबई
४) विशाखापट्टन
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-९- अष्टांग योग चे प्रथम अंग कोणते आहे ?

१) आसन
२) प्राणायाम
३) नियम
४) यम✅
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-१०- 'अंजली भागवत'ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

१) टेनिस
२) जिम्नास्टिक
३) रायफल शुटिंग✅
४) अॕथेलॕटिक्स

➖➖➖➖📗🔷📗➖➖➖➖

जाणून घ्या विषाणू व होणारे आजार

💁‍♂️ *आजार व विषाणू*

● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू

● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C)

● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G)

● *पोलिओ* : पोलिओ विषाणू

● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus

● *रेबिज* : लासा व्हायरस

● *डेंग्यू* : Arbo-virus

● *चिकुनगुन्या* : Arbo-virus

● *अतिसार* : Rata virus

● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)

● *देवी* : Variola Virus

● *कांजण्या* : Varicella zoaster

● *सर्दी* : सर्दीचे विषाणू

● *गालफुगी* : Paramixo virus

● *जर्मन गोवर* : Toza virus

२९ जून २०२०

पोलीस भरती प्रश्नसंच

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड 🏆
२.जम्मू काश्मीर
३.सिक्किम
४.उत्तर प्रदेश

२.भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट
२.त्रिभुजप्रदेश
३.द्वीपकल्प 🏆
४.मैदानी प्रदेश

3. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश
२. हिमाचल प्रदेश
३. उत्तराखंड 🏆
४. जम्मू-काश्मीर

४. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. ०२ वर्ष
२. ०४ वर्ष
३. ०५ वर्ष
४. ०६ वर्ष🏆

५) भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे
२. हैदराबाद
३. चेन्नई
४. मुंबई🏆

६) मार्च 2019 मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग
२.  रघुराम राजन🏆
३.  विमल जलान
४.  उर्जित पटेल

७) चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

१. जानेवारी - २००७
२. ऑक्टोबर- २००८🏆
३. सप्टेंबर-  २०११
४. ऑक्टोबर -२०१२

८) ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?

१. अरबी समुद्र 🏆
२. बंगालचा उपसागर
३. पॅसिफिक महासागर
४.  हिंदी महासागर

९) लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2019 पुरस्कार कोणी जिंकला?

१. नोवाक जोकोविक🏆
२.  रॉजर फेडरर
३. राफेल नदाल
४.टायगर वूड्स

१०) मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२
२. भाग -३
३. भाग -४
४. भाग -४अ🏆

११) 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती🏆
२. स्वामी विवेकानंद
३. राजाराम मोहन राय 
४. स्वामी परमहंस

१२) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
१. क्षय
२.  डायरिया
३. ॲनिमिया🏆
४. बेरीबेरी

१३) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो
२. लॉर्ड कर्झन🏆
३. लॉर्ड रिपन
४. लॉर्ड डलहौसी

१४) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले
२. सावित्रीबाई फुले
३. लोकमान्य टिळक
४.वि.रा. शिंदे 🏆

१५)दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली?

👍 12 डिसेंबर 1911

प्रश्नसंच


📌 शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते ?

1) गोवा
2) तेलंगणा✅✅
3) गुजरात
4) पंजाब

📌 भारतातील पहिली करेन्सी प्रिंटिंग प्रेस ( टाकसाळ ) कोठे स्थापन करण्यात आली ?

1) मुंबई
2) कोलकाता
3) नाशिक✅✅
4) हैदराबाद

📌 महाराष्ट्रात सर्वात जास्त खेडी असणारा जिल्हा कोणता ?

1) पुणे ✅✅
2) सिंधुदुर्ग
3) अमरावती
4) सोलापूर

📌कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?

(A) मोतिहारी आणि अमलेखगंज✅✅✅
(B) सबा आणि सारवाक
(C) हजीरा आणि विजयपूर
(D) ताशकंद आणि बिश्केक

📌कोणत्या सालापर्यंत पाय व मुखरोगांचे निर्मूलन करणे हे पाय व मुखरोग (FMD) यासाठीच्या ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’चे उद्दीष्ट आहे?

(A) 2025
(B) 2035
(C) 2030✅✅✅
(D) 2027

📌भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ____ यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.

(A) बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना
(B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली✅✅✅
(C) चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
(D) म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट

📌कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?

(A) दिल्ली
(B) राजस्थान
(C) महाराष्ट्र
(D) केरळ✅✅✅

📌“सावरकर: इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट, 1883-1924” पुस्तकाचे लेखक कोण आहेत? #books

(A) विक्रम संपथ✅✅✅
(B) श्री प्रह्लादसिंग पटेल
(C) रीना बॅरॉन
(D) व्यंकय्या नायडू

📌कोणत्या समूहाने भारतासह वस्तूंसंदर्भातल्या मुक्त व्यापार कराराचा (FTA) आढावा घेण्यास सहमती दर्शविली?

(A) जागतिक व्यापार संघटना
(B) ASEAN✅✅✅
(C) BRICS देश
(D) बांग्लादेश

📍 _______ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 107 व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

(A) बेंगळुरू✅✅
(B) चेन्नई
(C) मुंबई
(D) लखनऊ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणते राज्य वाळू दारापर्यंत पोहचविण्याची योजना आखत आहे?

(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आंध्रप्रदेश✅✅
(D) कर्नाटक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्य प्राणीसंग्रहालयाने अस्तित्व धोक्यात असलेल्या ‘हरगिला’ या पक्षीप्रजातीचे संवर्धन करण्यासाठी प्रथम पुढाकार घेतला?

(A) आसाम✅✅
(B) नागालँड
(C) पश्चिम बंगाल
(D) मेघालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 समुद्रातल्या प्रवाळी प्रदेशाला विषारी ठरणारी ‘सनस्क्रीन’ यावर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे?

(A) फिजी
(B) किरीबाती
(C) नऊरू
(D) पलाऊ✅✅

📍 ____ कडून चलनी बँकनोट ओळखण्यासाठी दृष्टिहीन व्यक्तींसाठी ‘MANI / मनी’ अ‍ॅप सादर करण्यात आला.

(A) भारतीय स्टेट बँक
(B) एक्सिस बँक
(C) भारतीय रिझर्व्ह बँक✅✅
(D) HDFC बँक

-----------------------------------

१. मॅरेथाॅन स्पर्धा किती अंतराची असते
१. ४३.१९५ किलोमीटर
२. ४२.१९५ किलोमीटर👈
३. ४२.१८५ किलोमीटर
४. ४१.१८५ किलोमीटर

२. ------------- या देशाच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे
१.  यूएई
२. बहरीन👈
३. इराक
४. घाना

३. मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा ------------ मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.
१. भूतान- भारत👈
२. भारत- नेपाळ
३. म्यानमार-भारत
४. भारत- बांगलादेश

४. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी -------------------- या देशात रूपे कार्ड लांच केले
१. भूतान👈
२. बहरीन
३. फ्रान्स
४. नेपाळ

५. भारताचा ५० वा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नोव्हेंबर२०१९ रोजी कोणत्या शहरात पार पडणार आहे.
१ नवी दिल्ली
२ गोवा👈
३ पुणे
४ राजकोट

६.. कनेक्टिंग इंडिया हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचे आहे.
१. एअर इंडिया
२. भारतीय स्टेट बँक
३. भारतीय रेल्वे
४. बीएसएनएल👈

७. भारतीय हॉकी संघाने आत्तापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत --------- पदके जिंकली आहे
१. ८ सुवर्ण, १ रौप्य, १ कास्य
२. ७ सुवर्ण, २ रौप्य,२  कास्य
३. ८ सुवर्ण, १ रौप्य, २ कास्य👈
४. ७ सुवर्ण, १ रौप्य, १ कास्य

८. बुली हा शब्द कोणत्या खेळादरम्यानवापरतात
१. क्रिकेट
२. फुटबॉल
३. गोल्फ👈
४. हॉकी

1. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे —— आहे.

100, 525
125, 450
100, 500
125, 500
उत्तर : 125, 500

2. 7,11,15,19, —— ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज —– आहे.

750
7500
7700
770
उत्तर : 7500

3. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी —– आहे.

13 सेंमी
7 सेंमी
10 सेंमी
8 सेंमी
उत्तर : 10 सेंमी

4. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती?

5,8,11,14, —–.

21
23
24
22
उत्तर : 21

5. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?

4
3


उत्तर : 4

6. 4,10,12,24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणार्‍या संख्या प्रमाणात येतील?

5
2
3
4
उत्तर : 4

7. 1,3,4 या अंकांपासून तयार होणार्‍या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?

1776
1876
1666
1676
उत्तर : 1776

8. दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे, जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या?

24
22
18
28
उत्तर : 18

9. कवायतीसाठी मुलांच्या जेवढया रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत, जर एकूण मुले 484 असतील, तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती?

24
22
18
28
उत्तर : 22

10. एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थांनाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?

34
62
43
26
उत्तर : 26

11. चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला, तर त्या गोलाची त्रिज्या किती?

7 सेंमी
7 सेंमी
8 सेंमी
9 सेंमी
उत्तर : 7 सेंमी

12. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट, तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?

1500
2000
3000
2500
उत्तर : 3000

२८ जून २०२०

आजची प्रश्नमंजुषा

🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.? 
 
      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास
____________________________
🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?

     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952
____________________________
🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?

     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी
____________________________

🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?

     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका
____________________________

⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*

       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352
____________________________
⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?

      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या
____________________________

🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?

     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966
____________________________
🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?

     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

संपूर्ण मराठी व्याकरण वाक्यप्रचार व अर्थ


1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

12)रामराम ठोकणे - निरोप घेणे

13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे

15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे

16) वर्ज्य करणे - टाकणे

17) काडीमोड करणे - संबंध तोडणे

18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

19) अगतिक होणे - उपाय न चालणे

20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

22) इडापिडा टळणे - संकट जाणे

23) उतराई होणे - उपकार फेडणे

24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

25) लकडा लावणे - सारखी घाई करणे

26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

28)कागाळी करणे - तक्रार करणे

29) खांदा देणे - मदत करणे

30) खोबरे करणे - नाश करणे

31) गय करणे - क्षमा करणे

32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

34) जीव ओतणे - मन लावून काम करणे

35) सुपारी देणे - आमंत्रण देणे

36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

38) नामोहरम होणे - पराभूत होणे

39) पदर पसरणे - याचना करणे

40) पाणउतारा करणे - अपमान करणे

41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे

43) हिरमुसले होणे - नाराज होणे

44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

45) विटून जाणे - त्रासणे

46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे

47) फडशा पाडणे - संपवणे

48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे

49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

50)धिंडवडे निघणे - फजिती होणे

61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

64)हातपाय गाळणे - धीर सोडणे

65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

67)झाकड पडणे - अंधार पडणे

68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

69)टोपी उडवणे - टवाळी करणे

70)पाणी पाजणे - पराभव करणे

71)वहिवाट असणे - रीत असणे

72)छी थू होणे - नाचक्की होणे

73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे

75)दिवा विझणे - मरण येणे

76)मूठमाती देणे - शेवट करणे

77) सुगावा लागणे - अंदाज लागणे

78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे

79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे

80)कानाशी लागणे - चहाडी करणे

81)किटाळ करणे - आरोप होणे

82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

83)हातावर तुरी देणे - फसविणे

84)बेगमी करणे - साठा करणे

85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

86)पोटात तुटणे - वाईट वाटणे

87)नख लावणे - नाश करणे

88)डोळो निवणे - समाधान होणे

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

________________________

1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.

A. 1/2 सदस्य संख्या

B. 1/3 सदस्य संख्या✅

C. 1/4 सदस्य संख्या

D. 1/10 सदस्य संख्या.

________________________

2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?

A. 30 दिवस

B. 60 दिवस

C. 90 दिवस✅

D. वरीलपैकी काहीही नाही.

________________________

3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?

A. राज्य शासन

B. स्थायी समिती✅

C. जिल्हा परिषद

D. मुख्य कार्यकारी अधिकारी.

________________________

4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.

A. सहाय्यक अधिकारी

B. सल्लागार समिती

C. कक्ष अधिकारी✅

D. मुख्य अधिकारी.

________________________

5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका
भरविण्याचा अधिकार कोणास आहे?

A. सरपंच

B. गट विकास अधिकारी

C. मुख्य कार्यकारी अधिकारी

D. वरील सर्वांना.✅

________________________

6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?

A. डॉ. बी.आर, आंबेडकर

B. वल्लभभाई पटेल✅

C. जवाहरलाल नेहरू

D.  डॉ. राजेंद्र प्रसाद.

________________________

7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.

(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.

(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.

(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.

सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

A. (a) आणि (b)

B. (b), (c) आणि (d)

C. (a), (c) आणि (d)

D. (a), (b), (c) आणि (d). ✅

________________________

8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?

(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.

(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.

(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.

(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.

पर्यायी उत्तरे :

A. (a), (b), (c)

B. (b), (c), (d)

C. (a), (c), (d)

D. (a), (b), (c), (d). ✅

________________________

9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.

A. संसद ठराव करून

B. संसद कायदा तयार करून✅

C. राष्ट्रपती आदेश पारित करून

D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.

________________________

10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते.

A. वित्त विधेयक

B. विनियोजन अधिनियम ✅

C. वित्तीय अधिनियम

D. संचित निधी अधिनियम.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...