२५ जून २०२०

काही राष्ट्रीय महामार्ग

1)NH३ मध्य प्रदेश सीमेपासून - सांगवी - धुळे - मालेगाव - नाशिक - इगतपुरी - भिवंडी - ठाणे - मुलुंड - मुंबई ३९१

2)NH1४ ठाण्याजवळ रा.म.क्र.३शी तिठा - पनवेल - पुणे - सातारा - कोल्हापूर - कागल कर्नाटक सीमेपर्यंत ३७१

3)NH४B जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - पळस्पे फाटाजवळ रा.म.क्र.४शी तिठा २०

4)NH ४C कळंबोलीजवळ रा.म.क्र.४ (किमी ११६)- रा.म.क्र.४ब (किमी १६.६८७) ७

5)NH ६ गुजरात सीमेपासून - विसारवाडी - धुळे - एरंडोल - जळगाव - एदलाबाद - खामगांव - अकोला - अमरावती - नागपूर - भंडारा - देवरी छत्तिसगढ सीमेपर्यंत ८१३

6) NH७ मध्य प्रदेश सीमेपासून - देवळापूर - नागपूर - हिंगणघाट - करंजी आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. २३२

7)NH८ गुजरात सीमेपासून - तलासरी - बांद्रा - मुंबई १२८

8)NH१३ सोलापूर - नंदनी - कर्नाटक सीमेपर्यंत ४३

9)NH १६ आंध्र प्रदेश सीमेपासून - सिरोंचा - कोपेला छत्तिसगढ सीमेपर्यंत ३०

10)NH१७ पनवेल - पेण - महाड - पोलादपूर - खेड - आसूर्डे - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरी - लांजा - राजापूर - कुडाळ - वेंगुर्ला गोवा सीमेपर्यंत. ४८२

11)NH५० नाशिक - संगमनेर - नारायणगांव - खेड - पुणे १९२

12)NH६५ पुणे - इंदापूर - सोलापूर - उमरगा कर्नाटक सीमेपर्यंत. ३३६

13)NH६९ नागपूर - सावनेर मध्य प्रदेश सीमेपर्यंत ५५

.14)NH२०४ रत्‍नागिरी - पाली - शाहूवाडी - कोल्हापूर १२६

15)...NH २११ सोलापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई - औरंगाबाद - वेरूळ - चाळीसगाव - धुळे ४००

16)NH२२२ कल्याणजवळ रा.म.३शी तिठा - अहमदनगर - पाथर्डी - परभणी - नांदेड आंध्र प्रदेश सीमेपर्यंत.

संस्था आणि संस्थापक

◆ १८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
◆ १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
◆ १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
◆ १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
◆ १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
◆ १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
◆ १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
◆ १८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
◆ १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
◆ १९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
◆ १९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
◆ १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
◆ १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
◆ १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

सोसायटी 

● १७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
● १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
● १८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
●  १८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
● १८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
● १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
● १८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
● १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
● १८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
● १८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
● १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
● १९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
● १९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
● १९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी

वारेन हेस्टिंग


_________________________________
◾️ कालावधी: 1774 ते 1785

◾️बंगाल चा पहिला गव्हर्नर जनरल

◾️कलेक्टर पद निर्माण केले

◾️चार्ल्स विलकिन्स ने भगवद्गीता इंग्रजीत लिहली

◾️विलियम जोन्स ने शाकुंतल इंग्रजीत लिहले

◾️पहिले इंग्रज-मराठा युद्ध(सलबाई तह)

.              🔰 वादग्रस्त प्रकरणे 🔰
_________________________________

◾️रोहिले युद्ध

◾️नंदकुमार फाशी प्रकरण

◾️अयोध्या बेगम अन्याय

◾️चेतसिंग प्रकरण

◾️सदर दिवाणी व सदर निझामी अदालत सुरू केले

◾️दुसरे इंग्रज मैसूर युद्ध

◾️साहित्य विद्ववता कला वर लक्ष देणारा

◾️दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली

◾️शेतजमिनीचे लिलाव पद्धत सुरू केली

◾️बोर्ड ऑफ रेव्हनू ची स्थापना केली

◾️महाभियोग लावण्यात आलेला एकमेव गव्हर्नर
________________________________

पोलीस भरती प्रश्नसंच

1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?
30 अंश
 60 अंश
 90 अंश
 10 अंश

उत्तर : 90 अंश

2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.
 2
 4
 3
 5

उत्तर :4

 3. 1/9+1/12=?
 1/36
 7/36
 2/36
 2/21

उत्तर :7/36

 4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?
 रा.म.3
 रा.म.4
 रा.म.5
 रा.म.6

उत्तर :रा.म.5

 5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
 औरंगाबाद
 अमरावती
 पुणे
कोकण

उत्तर :औरंगाबाद

 6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?
 पंजाब
 उत्तरप्रदेश
 हरियाणा
 हिमाचलप्रदेश

उत्तर :हरियाणा

 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?
 तापी
 महानदी
 गोदावरी
 चंबळ

उत्तर :तापी

 8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
 महाराष्ट्र
 आसाम
 मध्यप्रदेश
 गुजरात

उत्तर :गुजरात

 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?
भूकंपाचे धक्के
पावसाचे प्रमाण
 योग्य वेळ
 हवेचा दाब

उत्तर :भूकंपाचे धक्के

 10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
 परभणी
 यवतमाळ
 अमरावती
 वाशिम

उत्तर :यवतमाळ

 11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?
 25 ऑक्टोबर 2014
 27 ऑक्टोबर 2014
 31 ऑक्टोबर 2014
 1 नोव्हेंबर 2014

उत्तर :31 ऑक्टोबर 2014

 12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.
 नो टू ऑल
 नन ऑफ द अबोह
 नॉट अलाऊड
 यापैकी नाही

उत्तर :नन ऑफ द अबोह

 13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?
 स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन
 स्टॅच्यू ऑफ सरदार
 स्टॅच्यू ऑफ युनिटी
 स्टॅच्यू ऑफ फ्रिडम

उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी

 14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?
 2012
 2013
 2014
 2015

उत्तर :2013

 15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?
 समृद्धि योजना
 सुकन्या योजना
 बेटी बचाव योजना
 निर्भया योजना

उत्तर :सुकन्या योजना

 16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?
 लॅक्टोज
 माल्टोज
 फ्रुक्टोज
 स्रूक्रोज

उत्तर :लॅक्टोज

 17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
 क्षय
 डायरिया
 अॅनिमिया
 बेरीबेरी

उत्तर :अॅनिमिया

 18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
 एडवर्ड जेन्नर
 साल्क
 हरगोविंद खुराणा
 विल्यम हार्वी

उत्तर :साल्क

 19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?
 वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील
 वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील
 वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील
 वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील

उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?
 रॅपीड अॅक्शन मेमरी
 रॅन्डम अॅक्सेस मेमरी
 राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट
 रोल अँड मेमरी

उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार.

१) रामसर करार - वर्ष - १९७६

🅾 दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९७५

🅾 भारताने मान्य केला - १९८२

२) CITES - वर्ष - १९७३

🅾 संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९७६

🅾 भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार - वर्ष -१९७९

🅾 स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९८३

🅾 भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -वर्ष - १९८५

🅾 ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

🅾 भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार - वर्ष - १९८९

🅾 हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९९२

🅾 भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC - वर्ष - १९९२

🅾 हवामान बदल रोखणे

🅾 अमलात येण्याचे वर्ष - १९९४

🅾 भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

🅾 हरितवायू उत्सर्जनात घट

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - २००५

🅾 भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

🅾 जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९९३

🅾 भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००

🅾 जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - २००३

🅾 भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -वर्ष - १९९४

🅾 वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९९६

🅾 भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार - वर्ष - १९९८

🅾 हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - २००४

🅾 भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार - वर्ष - २००१

अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

🅾 अमलात येण्याचे वर्ष - २००४

🅾भारताने मान्य केला - २००६

विटामिन तथा उनके रासायनिक नाम


👉  विटामिन- A
रासायनिक नाम : रेटिनाॅल
कमी से रोग: रतौंधी
स्त्रोत : 🥕गाजर,🥛 दूध, 🥚अण्डा ,🍓फल🍉

👉  विटामिन – B1
रासायनिक नाम: थायमिन
कमी से रोग: बेरी-बेरी
स्त्रोत : 🥜मुंगफली, आलू, 🥦सब्जीयाँ🍆

👉  विटामिन – B2
रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन
कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग
स्त्रोत : 🥚अण्डा,🥛 दूध,🥦 हरी सब्जियाँ

👉  विटामिन – B3
रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल
कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद
स्त्रोत :🍗 मांस🍖,🥛 दूध, 🍅टमाटर, मुँगफली🥜

👉  विटामिन- B5
रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)
कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)
स्त्रोत : 🍗मांस🍖, 🥜मूंगफली, आलू

👉  विटामिन- B6
रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन
कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग
स्त्रोत : 🥛दूध, 🍗मांस,🥦 सब्जी🍆

👉  विटामिन – H / B7
रासायनिक नाम: बायोटिन
कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग
स्त्रोत : यीस्ट, गेहूँ, 🥚अण्डा

👉  विटामिन – B12
रासायनिक नाम: सायनोकोबालमिन
कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग
स्त्रोत : 🍗मांस, 🍖कजेली, 🥛दूध

👉  विटामिन- C
रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड
कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना
स्त्रोत : आँवला, 🍋नींबू, 🍑संतरा, 🍊नारंगी

👉  विटामिन – D
रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल
कमी से रोग: रिकेट्स
स्त्रोत :☀ सूर्य का प्रकाश,🥛 दूध, अण्डा🥚

👉  विटामिन – E
रासायनिक नाम: टेकोफेराॅल
कमी से रोग: जनन शक्ति का कम होना
स्त्रोत: 🥦हरी सब्जी, 🍚मक्खन, दूध🥛

👉  विटामिन- K
रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन
कमी से रोग: रक्त का थक्का न बनना
स्त्रोत: 🍅टमाटर, 🥦हरी सब्जियाँ, 🥛दूध

२४ जून २०२०

भूगोल : पर्वतांचे प्रकार

◆ सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग म्हणजे 'पर्वत' होय.

जाणून घेऊयात पर्वतांचे प्रकार

★ वलित पर्वत :

◆ वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना वलीत पर्वत असे म्हणतात.

★ विभंग-गट पर्वत :

◆  विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेल्या पर्वतांना विभंग-गट पर्वत असे म्हणतात.

★ घुमटी पर्वत :

◆ भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

★ ज्वालामुखी पर्वत :

◆ पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. यातून तयार होणाऱ्या पर्वताला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.

★ अवशिष्ट पर्वत :

◆ कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते, त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात.
===========================

★ महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :

जलाशय            नदी         स्थळ/जिल्हा

●जायकवाडी/नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

● भंडारदरा –    (प्रवरा)    अहमदनगर

● गंगापूर –       (गोदावरी)       नाशिक

● राधानगरी – (भोगावती)    कोल्हापूर

● शिवाजी सागर -- (कोयना)   सातारा

● उजनी –       (भीमा)         सोलापूर

● तोतलाडोह/ मेघदूत जलाशय (पेंच)   नागपूर

● यशवंत धरण –    (बोर)        वर्धा

● मोडकसागर –    (वैतरणा)     ठाणे

● खडकवासला –    (मुठा)        पुणे

● येलदरी –            (पूर्णा)        परभणी

● बाभळी प्रकल्प – (गोदावरी)   नांदेड
▂▂▂

Daily Practice Test


1) भारतातून मलेरियाचे - - - -  सालापर्यंत निर्मूलन करण्यासाठी ' मेरा इंडिया ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

( 1 ) 2025
( 2 ) 2022
( 3 ) 2050 👈
( 4 ) 2028

2) खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोक विशू हा सण नववर्षाचा दिवस म्हणून साजरा करतात ?

( 1 ) कर्नाटक
( 2 ) मणिपूर
( 3 ) नागालँड
( 4 ) केरळ 👈

3) महिलांच्या सुरक्षिततेसाठी खालीलपैकी कोणत्या दूरसंचार कंपनीने माय सर्कल ' हे अॅप्लिकेशन सुरू केले आहे ?

( 1 ) रिलायन्स लिमिटेड
( 2 ) भारती एअरटेल 👈
( 3 ) बीएसएनएल
( 4 ) व्होडाफोन

4) एप्रिल 2019 मध्ये खालीलपैकी कोणत्या बँकांचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये करण्यात आले ?

( अ ) युनियन बँक ऑफ इंडिया
( ब ) देना बैंक
( क ) इंपेरियल बँक
( ड ) विजया बैंक

( 1 ) अ , ब , ड
( 2 ) ब आणि ड 👈
( 3 ) ब , क , ड
( 4 ) अ आणि क

5) ' टाईम्स ' या नियतकालिकाने जाहीर केलेल्या 2019 मधील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तींचा समावेश आहे ?

( अ ) अरुंधती काटजू
( ब ) मेनका गुरुस्वामी
( क ) नरेंद्र मोदी
( ड ) मुकेश अंबानी
( इ ) निर्मला सीतारामन

( 1 ) अ , ब , ड 👈
( 2 ) अ , ब , क , ड
( 3 ) क , ड , इ
( 4 ) वरीलपैकी सर्व.

6) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

विधान अ : भारतामध्ये प्रत्येकी 10189 लोकांसाठी एक सरकारी डॉक्टर उपलब्ध आहे.
विधान ब : प्रत्येकी 1000 लोकांसाठी एक सरकारी डॉक्टर असावा, अशी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे.

( 1 ) अ बरोबर , ब चूक
( 2 ) ब बरोबर , अचूक
( 3 ) अ व ब दोन्ही बरोबर 👈
( 4 ) अ व ब दोन्ही चूक

7) ' वसुंधरा दिन ' - - - - - - - रोजी साजरा करण्यात येतो.

( 1 ) 26 जून
( 2 ) 12 मार्च
( 3 ) 22 एप्रिल 👈
( 4 ) 5 जून 

8) खालीलपैकी सत्य विधान / ने कोणते / ती ?

( अ ) वरुण ' हा भारत व रशियाच्या नौदलांदरम्यान घेण्यात येणारा युद्धसराव आहे.
( ब ) 2019 सालचा वरूण नौदल सराव मे महिन्यात गोवा येथे पार पडला.

( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब 👈
( 3 ) अ व ब दोन्ही
( 4 ) वरीलपैकी एकही नाही.

9) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

( अ ) या संघटनेची स्थापना 1919 मध्ये पॅरिसच्या तहाद्वारे करण्यात आली.
( ब ) या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.
( क ) या संघटनेला 1969 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.
( ड ) भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे . वरीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत ?

( 1 ) अ , ब , क
( 2 ) ब , क , ड 👈
( 3 ) अ , ब , ड
( 4 ) वरीलपैकी सर्व

10 ) खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

( अ ) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ' वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द केली.
( ब ) एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

( 1 ) अ बरोबर , ब चूक
( 2 ) ब बरोबर अचूक
( 3 ) दोन्ही बरोबर 👈
( 4 ) दोन्ही चूक

23 जून 1757 प्लासीची लढाई

प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली.

ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले.

पोखरणच्या प्राचीन कुंभार कलेचे KVIC कडून पुनरुज्जीवन

▪️राजस्थान राज्यातल्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण या छोट्या गावातल्या प्रसिध्द कुंभार (मातीची भांडी तयार करणे) कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 20 जून 2020 रोजी 80 कुटुंबाना 80 इलेक्ट्रिक मातीकाम चाकांचे वितरण केले.

▪️इलेक्ट्रिक चाकांबरोबरच KVICने माती मिश्रणासाठीच्या 8 यंत्रांचेही वाटप केले.

▪️भारताची पहिली अणुचाचणी झालेल्या या गावाला टेराकोटा उत्पादनांची समृध्द परंपरा लाभली आहे.

▪️पोखरणमधे 300 कुंभार कुटुंबे अनेक दशके ही कुंभार कामात गुंतलेले आहेत.

▪️KVICने गावात 350 थेट रोजगार निर्माण केले आहेत.

▪️या 80 कुंभाराना KVICने 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले असून त्यांनी उत्कृष्ट भांडी घडवली आहेत.

▪️कुल्हड पासून ते फुलदाणी, मूर्ती, पारंपरिक भांडी, स्वयंपाकासाठी तसेच शोभेच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू हे कारागीर घडवतात.

▪️राजस्थान, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, हरयाणा, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, तामिळनाडू, ओडीशा, तेलंगणा, बिहार राज्यातल्या अनेक दुर्गम भागात KVICने कुंभार सशक्तीकरण योजना सुरु केली आहे.

▪️या योजनेच्या अंतर्गत KVIC माती मिश्रणासाठी यंत्र आणि भांडी तयार करण्यासाठी इतर साहित्य पुरवते.

विषाणूमुळे होणारे रोग

पोलिओ (Poliomycetis)

हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.

लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.

१) Salf  V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.

२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.

WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.

November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.

गालफुगी (Mums)

हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.

लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.

हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.

लस: गालफुगीविरोधी लस.

रुबेला (Rubella किंवा Gernman measles)

हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.

लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,

गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.

लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण.

गोवर (Measles)

हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ

लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण

भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.

कांजण्या (Chicken Pox)

हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.

हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.

हा रोग धोकादायक नाही.

लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ

लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण.

देवी (Small Pox)

हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.

या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.

या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.

लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा

लस: देवीची लस

1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.

महाराष्ट्र

🔹 महाराष्ट्राची पूर्व - पश्चिम लांबी 800 कि. मी आहे

🔹 महाराष्ट्राची दक्षिण - उत्तर लांबी 700 कि. मी आहे

🔹 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 03, 07, 713 चौ. कि. मी

🔹 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या 9.36%  आहे

🔹 महाराष्ट्रात 27 महानगर पालिका आहेत

🔹 महाराष्ट्रात 234 नगरपालिका आहेत

🔹 महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत

🔹 1 जानेवारी 1981 साली कुलाब जिल्ह्याचे नाव बदलून रायगड रायगड करण्यात आले.

🔹 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती

🔹 महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक लागतो

🔹 महाराष्टाचा भारतात लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक लागतो

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...