२२ जून २०२०

मराठी शुद्ध लेखनाचे नियम

अनुस्वार      

▫️ नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणा-या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.     

उदा.

डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ.

▫️ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.       

उदा.

लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ.         

▫️ आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.     

उदा.

शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी, विवेकानंदांनी, रानडेंनी इ.

▫️ पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये.         

जसे - का, की, केळे, करू, करताना, रवेळू, घरात, घरी, जाऊ, तेथे, तेव्हा, जेथे, जेव्हा, झोप, नाव, नवे, पाच, बसू, माती, लाकूड, शाळेत. (कारण - या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही)

हस्व - दीर्घ अक्षरे

▫️ इ - कारान्त आणि 'उ’ - कारान्त शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.         

उदा -

मी, कवी, गुरू, बाहू जू, ऋषी, गती, वही, गहू पेरू, वाळू, शत्रू.      

परंतु असे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा ई कार व ऊ कार हस्व होतात.         

उदा -

विद्यार्थिभांडार ऋषिकुमार, कविचरित्र, लघुकथा, शत्रुपक्ष इ.         

अपवाद - अति, आणि, नि, परंतु, तथापि, अद्यापि, यद्यपि, प्रभृति, यथामति, यथाशक्ति, इति, ही अवये हस्वातच लिहावी.     

▫️ सामासिक शब्दातील पहिले पद हस्व 'इ' कारान्त किंवा 'उ' कारान्त असल्यास ते हस्वातच राहते. आणि ते पद दीर्घ 'ई' कारान्त किंवा ऊ' कारान्त तत्सम शब्द असल्यास ते दीर्घातच राहते.   

उदा -

कविचरित्र, गतिमान, गुरुवर्य, पशुपक्षी, युक्तिवाद, लघुकथा, वायुपुत्र, शक्तिमान, हरिनाम, गौरीहर, वधूवर इ.

एकाक्षरी शब्द दीर्घ असावेत -

उदा -

मी, तू, ती, ही, जी, ऊ, थू, धू, पी, पू, शी इ.            

▫️ शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे बहुधा हस्व असते.       

उदा-

दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली, गरिबी, गुरुजी, माहिती, सुरू, हुतुतू इ.        

अपवाद - संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.         

उदा -

परीक्षा, प्रतीक्षा, गीता, पूजा इ.

मराठी व्याकरण

▫️  स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.

▫️  संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.

▫️ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.

▫️ अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.

▫️ शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.

▫️ सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.

▫️ शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.

▫️ साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.

▫️ शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.

▫️ प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.

▫️ धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

▫️  धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.

  ▫️टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

▫️ समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.

▫️ शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.

▫️ मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.

▫️ महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.

उपसर्ग जोडून येणारे शब्द


मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द  जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.

                (१) अ + चूक   = अचूक

                (२) अ + मर     = अमर

                (३) अ +पार    =अपार

                 (४) अ + नाथ  = अनाथ

                 (५) अ + पात्र    = अपात्र.

                 (६) अ  + चल   = अचल

                 (७) अ  + शांत  = अशांत

                 (८) अ  +ज्ञान   = अज्ञान

                 (९) अ  + माप   = अमाप

                (१०) अ  +शुभ   = अशुभ

                (११) अ + सत्य  = असत्य

                (१२) अ + बोल  = अबोल

                (१३)  अ + खंड  =अखंड

                (१४) अं  + धार   = अंधार

                (१५)  अ  + समान   = असमान

                (१६) अ  + स्थिर   = अस्थिर

                (१७) अ  + न्याय   = अन्याय
   
                (१८) अ + पचन    = अपचन

                (१९) अ  + जय    = अजय
    
                (२०) अ + प्रगत   = अप्रगत

                (२१) अ + मोल   = अमोल

                (२२)  अ + योग्य    = अयोग्य
    
                (२३)  कु  + रूप    = कुरूप

                (२४) सु  + काळ   = काळ 

                (२५) सु    + गंध    = सुगंध
   
                (२६) सु   + पुत्र     = सुपुत्र

                (२७)  सु   + मार्ग   = सुमार्ग
  
                (२८) सु   + यश    = सुयश

                (२९) सु  +  योग्य    = सुयोग्य

                (३०) वि  + नाश    = विनाश

                (३१) आ  + मरण   =

आमरण

                (३२) ना   + खूष    = खूष
         
                (३३) ना  + पसंत   = नापसंत

                (३४)  ना  + पास   = नापास

                (३५) ना  + बाद    = नाबाद

                (३६)  बिन  + चूक     =

बिनचूक

                (३७)  बिन  + पगारी  =

बिनपगारी

                (३८) गैर  + हजर    =

गैरहजर

                (३९) अप + मान   = अपमान

                (४०) अप + यश    अपयश

जागतिक बँकेचा “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट: जून 2020” अहवाल


🔘 जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाच्या अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.

▪️अहवालानुसार -

🔘 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

🔘 महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे. महामारीमुळे उद्भवलेली मंदी ही 1870 सालानंतर पहिल्यांदाच पाहिली गेली आहे.

🔘 2020 साली महामारीमुळे देशांतर्गत मागणी व पुरवठा, व्यापार आणि वित्तपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रियाकलापांमध्ये सात टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

🔘 2020-21 या आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था 2.5 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे, जे की गेल्या 60 वर्षांत प्रथमच पाहिले गेले आहे.

🔘 दरडोई उत्पन्नात 3.6 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे यावर्षी कोट्यवधी लोक अत्यंत दारिद्र्यात ढकलले जाणार आहेत.

🔘 सध्याच्या अंदाजानुसार महामारीच्या मंदीमुळे जागतिक दरडोई GDP मध्ये 6.2 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

🔘 जागतिक व्यापार, पर्यटन, वस्तूंच्या निर्यातीवर आणि बाह्य वित्तपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या देशांना महामारीचा सर्वात मोठा फटका बसत आहे.

🔘 वर्ष 1870 नंतर 1876, 1885, 1893, 1908, 1914, 1917-21, 1930-32, 1938, 1945-46, 1975, 1982, 1991, 2009 आणि 2020 या वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने 14 वेळा जागतिक मंदी अनुभवली आहे.

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजना


🔸गावात परतलेल्या स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारने “गरीब कल्याण रोजगार योजना’ ही प्रमुख ग्रामीण रोजगार व सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना देशात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 20 जून 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. बिहार राज्यातल्या तालीहार (बेल्दौल तालुका, खगारीया जिल्हा) या गावात या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

🔸सहा राज्यांच्या 116 जिल्ह्यांमधली गावे सामाईक सेवा केंद्र तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून या अभियानात सहभागी होणार आहेत.

अभियानाबाबत

🔸125 दिवसांच्या या अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर केली जाणार आहे. त्यात अत्यंत केंद्रिकृत, निर्धारित लक्ष्य लक्षात घेऊन 25 विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून एकीकडे स्थलांतरित मजुरांसाठी रोजगारनिर्मिती करणे आणि दुसरीकडे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणे अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत.

🔸या अभियानासाठी, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांची निवड करण्यात आली असून या राज्यातल्या 116 जिल्ह्यांमध्ये 25,000 पेक्षा जास्त स्थलांतरित मजुरांना या योजनेच्या लाभ मिळू शकणार. यात 27 आकांक्षी जिल्ह्यांचाही समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन तृतीयांश स्थलांतरित मजूर समाविष्ट केले जाणार आहेत.

🔸या अभियानासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

🔸हे अभियान 12 मंत्रालये / विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारले जाणार आहे. यात ग्रामीण विकास मंत्रालय, पंचायतराज मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, खाण, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय तसेच सीमावर्ती रस्ते, दूरसंचार आणि कृषी या मंत्रालयांचा समावेश आहे.

‘सत्यभामा’: खनिकर्म क्षेत्रात प्रगतीसाठी संशोधन व विकास संदर्भात नवे व्यासपीठ

🕸केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते दिनांक 15 जून 2020 रोजी खाण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘सत्यभामा’ (खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान योजना उर्फ SATYABHAMA) या संकेतस्थळ आधारित व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला.

🕸राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) आणि खाण माहिती विभागाद्वारे व्यासपीठाची रचना, विकास आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे.

🕸हे व्यासपीठ प्रकल्पांवर ऑनलाईन लक्ष ठेवण्यासोबतच वैज्ञानिक / संशोधकांकडून सादर केलेले संशोधनाचे प्रस्ताव आणि त्यासाठी दिलेला निधी/अनुदान वापरण्यास परवानगी देते.

🕸संशोधक यावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकल्पांचे प्रगती अहवाल आणि अंतिम तांत्रिक अहवाल देखील सादर करू शकतात.

महत्त्वाचे प्रश्नसंच

▪️ “माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
✍उत्तर : भालचंद्र मुणगेकर

▪️ भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोण आहे?
✍उत्तर : करण बाजवा

▪️ सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
✍उत्तर : लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड

▪️ कोणत्या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला?
✍उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✍उत्तर : तरुण विजय

▪️ ‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ कुणाला देण्यात आला?
✍उत्तर : प्राची साळवे

▪️ ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये कोणत्या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे?
✍उत्तर : नागरी उड्डयण महासंचालनालय आणि नागरी उड्डयण सुरक्षा विभाग

▪️ कोणत्या ठिकाणी ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ आयोजित करण्याचे नियोजित आहे?
✍उत्तर : टोकियो, जापान

▪️ “आफ्रिकन लायन” हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे?
✍उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को

▪️ कोणत्या ठिकाणांदरम्यान नवी सागरी रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे?
✍उत्तर : मुंबई आणि मांडवा

भारतीय दंड संहिता

भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाच्या लोकांवर गुन्हांबद्दल कारवाई करण्यासाठीच्या नियमांना भारतीय दंड संहिता असे म्हणतात. यालाच भारतीय दंड संहिता कायदा १८६० ही म्हटले जाते. ही मुख्य गुन्हेगारी कारवाई नियमावली आहे.

◾️निर्मिती संपादन करा

भारतीय दंड संहितेची निर्मिती ब्रिटीश कायद्यावर आधारलेली आहे. याची निर्मिती १८६० मध्ये लॉर्ड मेकॉलेने केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कायदा मंडळ स्थापन करण्यात आले. या कायदेमंडळाने मसुदा तयार केला व तो १८६२ ला लागू करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने याच संहितेचा वापर पाकिस्तान दंड संहिता म्हणून सुरू केला.

जगण्याचा हक्क

◾️( व्याख्या कलमे 10 ते 52 ) ( वाढीव शिक्षा कलम 75 )

कलम 10 :-पुरूष किवा स्त्री हया शब्दाचा अर्थ

कलम 11 :-व्यक्ती किवा पुरूष

कलम 14 :-शासनाचा सेवक

कलम 21 :-लोकसेवक

कलम 22 :-जंगम मालमत्ता

कलम 23 :-अन्यायाची प्राप्ती / अन्यायाचे नुकसान

कलम 24 :-लबाडीने

कलम 25 :-कपटाने

कलम 26 :-मानन्यास कारण

कलम 28 :–बनावट वस्तू तयार करणे (नकलीकरण)

कलम 29 :-दस्तऐवज

कलम 30 :-किंमतीचा दस्तऐवज / मूल्यवान रोखा

कलम 34 :-सामाईक इरादा

कलम 39 :-आपखुषीने / इच्छापुर्वक

कलम 40 :–अपराध / गुन्हा

कलम 44 :-क्षती / नुकसान / ईजा

कलम 52 :-इमानाने / प्रामाणिकपणे

कलम 75 :-वाढीव शिक्षा प्रकरण 12 ( खोटी नाणी व स्टॅम्प ) आणि प्रकरण 17 ( मालमत्ते संबंधीचे गुन्हे कलम 378 ते 462 ) याखाली पुर्वशिक्षा असता वाढीव शिक्षा

◾️प्रकरण 4 थे ( साधारण अपवाद )

कलम 76 :-गैरसमजुतीने केलेले कृत्य ( सरकारी नोकरास कायदयाचे संरक्षण ) कायद्याने बांधील असलेल्या सरकारी नोकराने गैरसमजुतीने केलेले कृत्य

कलम 79 :-कायदयाचे समर्थन असणा-य परंतु वस्तुस्थितीच्या चुकभूलीमुळे तसा पाठींबा असल्याचे समजणाच्या मणूष्याने केलेले कृत्य ( खाजगी इसमास कायदयाचे संरक्षण )

कलम 80 :-कायदेशीर कृत्य करित असतांना अपघाताने घडलेले कृत्य

कलम 81 :-गुन्हेगारी उद्देश नसतांना संभाव्य नूकसान टाळण्यासाठी व नुकसानीस प्रतिबंध करण्या साठी केलेले कृत्य

कलम 82 :-7 वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य

कलम 83 :-7 वर्षापेक्षा जास्त व 12 पेक्षा कमी वयाच्या व प्रौढबुध्दी नसलेल्या मुलाचे कृत्य

कलम 84 :-वेडया मणुष्याने केलेले कृत्य 

कलम 85 :-स्वतःच्या इच्छेविरूध्द

चढविलेल्या नशेमुळे विचार करण्यास असमर्थ असलेल्या मणुष्याने केलेले कृत्य

कलम 86 :-ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किवा जाणिव आवश्यक असते असा अपराध ठरणारे कृत्य नशा केलेल्या मणुष्याने केले तर

कलम 90 :-भीतीने अगर गैरसमजुतीने दिलेली भ्रमीष्ठ व्यक्तीची किवा बालकाची संमती

कलम 94 :-धमकी देऊन एखात्याकडून करवून घेतलेले कृत्य

कलम 95 :-क्षुल्लक नुकसान असणारे कृत्य

कलम 96 :-खाजगी नात्याने बचाव करण्याच्या हक्कावरून केलेले कृत्य

कलम 97 :-शरीराचा व मालमत्तेचा खाजगी नात्याने बचाव करण्याचा हक्क

कलम 98 :-वेड्या माणसाने केलेल्या कृत्या पासुन वैयक्तीक संरक्षणाचा हक्क

कलम 99 :-ज्या कृत्यांचे विरूध्द वैयक्तीक संरक्षणाचा हक्क नाही अशी कृत्ये

कलम 100 :-शरीराचा वैयक्तीक संरक्षणाचा हक्क बजावतांना जीव केव्हा घेता येतो

कलम 101 :-मृत्यू शिवाय दुसरे एखादे नुकसान करण्याचा अधिकार

कलम 102 :-खाजगी नात्याने शरीराचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि कधीपर्यंत असतो

कलम 103 :-मालमत्तेच्या वैयक्तीक संरक्षणाचा हक्क बजावतांना जीव केव्हा घेता येतो.

कलम 104 :-मृत्यू शिवाय दुसरे एखादे नुकसान करण्याचा अधिकार

कलम 105 :-खाजगी नात्याने मालाचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि कधीपर्यंत असतो

कलम 106 :-जीव घेण्याच्या उद्देशाने अंगावर चालून आल्याने निरपराध मणुष्यास दूखापत होण्याचा धोका असता त्याविरूध्द वैयक्तिक संरक्षणाचा हक्क

हुंडा प्रतिबंध कायदा


हुंडयासारखी सामाजिक समस्या स्वातंत्र्यनंतर आजही ज्वलंत आहे. आजही आपण हुंडयापायी नववधुंचा छळ, हुंडाबळीच्या घटना ऐकतो. या पध्दतीचे निर्मूलन करणे म्हणजे प्रचलित रुढी, परंपरा विरुध्द जनजगृतीची एक प्रकारची लढाईच आहे.

हुंडा पध्दती ही आपण पुरुष महिला समानतेचा जो नारा देत आहोत त्याच्याशी विसंगतच आहे. त्यातुनच स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीला समजात असणारी किंमत या विषयी समाजाची मानसिकता काय आहे हे कळून येते. हुंडा पध्दतीचे निर्मूलन म्हणजे ही मानसिकता बदलण्याचे मोठे आवाहन सर्व समाजापुढे आहे.

हुंडा पध्दतीविषी जी मानसिकता समाजात आहे ती बदलणे तरुणांच्या व युवा शक्तीच्या हाती आहे. त्यासाठी समाजामध्ये हुंडा विरोधीचे चर्चासत्र, चित्रस्पर्धा, व्यंग चित्रस्पर्धा, प्रदर्शने, आत्मकथन, लघुपट, स्लाईड शो, प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमाव्दारे जनजागृती घडवून आणता येणे शक्य आहे.

हुंडा देणे व घेणे ही परंपरेने अस्तित्वात असलेली अनिष्ठ प्रथा आहे. हुंडयापायी छळ होवून अनेक युवतींना वैवाहिक जीवनातून बाहेर पडावे लागत आहे व समाजात अनेक अडचणींना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. या पध्दतीमुळे कुटूंबाची दुर्दशा होणे, मुले मातेच्या प्रेमापासून पारखी होणे व वैवाहिक जीवनातून बाहेर पडलेल्या युवतींचा प्रश्नही निर्माण होतो. या सर्व समस्यांवर वचक बसावा म्हणून सरकारने हुंडा बंदी कायदा तयार केला आहे.

महात्मा गांधी.


   
            
"महात्मा " ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिली.
"राष्ट्रपिता "  ही पदवी सुभाष चंद्र बोस यांनी दिली.

👉 जन्म 2 ऑक्टोबर1869 पोरबंदर (GJ)

👉 1891 इंग्लंड मधून बॅरिस्टर  पदवी घेतली भारतात आले.

👉 राजकोट ला वकिल व्यवसाय सुरू केला.

👉 1893 आफ्रिकेत  गेले. दादा अब्दुल यांचा खटला चालवण्यासाठी गेले.

👉1906 आयुष्यातला पहिला सत्याग्रह आफ्रिकेत केला. (नाताळ सत्याग्रह)

👉 9 जाने 1915 भारतात परत आले.
( 9 जानेवारी भारतीय प्रवासी दिवस)

👉 1916 साबरमती आश्रम  स्थापना केला.

👉1917 चंपारण्य सत्याग्रह भारतातील पहिला सत्याग्रह (3 काठीया पध्दती विरोधात)
👉1918 अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह.
👉 खेडा सत्याग्रह शेतसारा (गुजराती शेतकऱ्यासाठी )

👉1919 खिलाफत चळवळी चे नेतृत्व केले. (अध्यक्ष) (हिंदू मुस्लिम ऐक्य साधावे म्हणून)

👉  रौलट कायदा,1919  विरोधी आंदोलन
मॉंटेगु चेम्सफर्ड कायदा सर्वांना विरोधात आंदोलन

👉 4 सप्टेंबर 1920 काँग्रेस चे खास अधीवेशन लाला लचपत राय अध्यक्ष 

1 ऑगस्त 1920 असहकार चळवळ सुरू नेतृत्व गांधीजी

👉1924 बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष

👉12मार्च 1930 दांडी यात्रा 78 सहकारी + 1 गांधीजी Total 79
5  April 1930 रोजी दांडीला

👉6 एप्रिल 1930 सविनय कायदेभंग मिठ उचलून कायदेभंग सुरवात (महिलांचा  सर्वाधिक सहभाग)

👉8 ऑगस्ट 1942 मुंबई क्रांती मैदान (ग्वालिया टॅंक) अध्यक्ष मौलाना आझाद  छोडो भारत ठराव मंजूर (गांधी -करेंगे या मरेंगे नारा)

👉9 ऑगस्ट 1942  गांधीना अटक आगाखाणा पॅलेस, पुणे.

👉1944 राजाजी योजना.

👉स्वतंत्र दिनी गांधीजी कलकत्ता परिसरात दंगे शांत करण्यात गुटले होते.

👉30 जानेवारी1948 दिल्ली गांधीचा मृत्यू .🙏

२१ जून २०२०

The Hindu Vocabulary For All Competitive Exams.

1. ONSLAUGHT (NOUN): (हमला):
 attack
Synonyms: assault, onset
Antonyms: defense, repulsion
Example Sentence:
The onslaught was unleashed on the day that G8 world leaders met at Gleneagles.

2. PROXIMITY (NOUN): (निकटता):
 closeness
Synonyms: nearness, presence
Antonyms: distance
Example Sentence:
His close proximity sent her heart racing.

3. APATHY (NOUN): (उदासीनता):
 indifference
Synonyms: unconcern, passivity
Antonyms: enthusiasm, interest
Example Sentence:
Widespread apathy among students was hard to witness.

4. CONVALESCE (VERB): (अच्छा हो जाना): recover
Synonyms: recuperate, get well
Antonyms: deteriorate
Example Sentence:
He spent eight months convalescing after the stroke.

5. SPURT (NOUN): (उछाल): spray
Synonyms: squirt, spout
Antonyms: contain
Example Sentence:
A brief spurt of tears gushed into her eyes.

6. RECUMBENT (NOUN): (समतल): flat
Synonyms: lying, horizontal
Antonyms: erect, standing
Example Sentence:
They are not recumbent, and the hair falling from the head is curled.

7. INCUMBENT (ADJECTIVE): (पदधारी): present
Synonyms: current, existing
Antonyms: past, future
Example Sentence:
The incumbent President was defeated.

8. SHUN (VERB): (टालना): avoid
Synonyms: evade, eshew
Antonyms: accept, welcome
Example Sentence:
He shunned fashionable society.

9. AMELIORATE (VERB): (सुधार होना):
 improve
Synonyms: enhance, better
Antonyms: worsen
Example Sentence:
The reform did much to ameliorate living standards.

10. OUTRAGE (NOUN): (उल्लंघन करना):
 violate
Synonyms: infuriate, enrage
Antonyms: Compliment
Example Sentence:
The public were outraged at the brutality involved.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) 1 ज्यूल म्हणजे किती कॅलरी होय ?

   1) 0.24 कॅलरी ✅
   2) 252 कॅलरी   
   3) 4.18 कॅलरी  
   4) 4186 कॅलरी

2) खालील विधानांचा विचार करा.

अ) वर्णलवकांमध्ये असलेल्या कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे पिवळा रंग येतो.
ब) वर्णलवकांमध्ये असलेल्या झँथोफील या रंगद्रव्यामुळे भगवा रंग येतो.
1) अ सत्य   
2) ब सत्य   
3) दोन्ही सत्य   
4) दोन्ही असत्य✅

3) लेड - ॲसिड बॅटरीत इलेक्ट्रोलाईट म्हणून कोणाचा वापर केला जातो ?

1) ॲसीटीक ॲसिड  
2) नायट्रीक ॲसिड 
3) सल्फ्युरीक ॲसिड  ✅
4) टी. एन. टी.

4) अ) या दृष्टिक्षेपात मानवी डोळयांनी जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात.
ब) या दृष्टिक्षेपाचे निवारण करण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात.

         वरील विधाने खालीलपैकी कोणत्या दृष्टीबाबत संयुक्तिक आहे.

1) दूरदृष्टीता  
2) वक्रदृष्टीता   
3) रंगांधळेपणा   
4) निकटदृष्टीता✅

5) 17 व्या गणातील मूलद्रव्यांना ..................... या नावाने ही ओळखले जाते ?

1) निष्क्रिय मूलद्रव्ये   
2) द्रव रूपातील मूलद्रव्ये
3) हॅलोजन मूलद्रव्ये ✅ 
4) शून्य गणातील मूलद्रव्ये

6) खालील विधानांचा विचार करा.

अ) थॅलसेमिया हा एक अनुवंशिक रोग आहे.     
ब) या रोगामध्ये RBC खूप कमी प्रमाणात तयार होतात.
क) या रोगामध्ये हदयाचा आकार कमी होतो.     
ड) वरील सर्व बरोबर.

1) अ, ब सत्य ✅  
2) अ सत्य   
3) ड     
4) अ, क सत्य

  7) LASER म्हणजे काय ?

👉 Light amplification by stimulated emission of radiation

8) Radar म्हणजे काय ?

  👉 Detection And Ranging

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते✅✅✅
३) कमी होते
४) समान राहते

२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी

४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन

५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅✅
४) मानवी प्राणी

६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे

७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण✅✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा

८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व

९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव✅✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी

१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅✅
४) नाक

११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार

१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...