३० मे २०२०

घाट (खिंड):

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)

🍁मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर

🍁नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान

🍁कुसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत

🍁वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड

🍁कुरुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर

🍁चंदनापुरी नगर संगमणेर – पुणे

🍁सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर

🍁बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा

🍁मांजरसुभा घाट बीड बीड – नगर

🍁अंबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर

🍁ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण

🍁धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई

🍁बोर घाट पुणे पुणे – मुंबई

🍁ख्ंबाटकी घाट सातारा पुणे – सातारा

🍁दिवा घाट पुणे पुणे – बारामती

🍁कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण

🍁आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी

🍁आंबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव

🍁फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी

🍁पसरणी घाट सातारा वाई – महाबळेश्वर.
___________________________

राज्य आणि मुख्यमंत्री



● *महाराष्ट्र* : उद्धव ठाकरे

● *आंध्रप्रदेश* : जगमोहन रेड्डी 

● *अरुणाचल प्रदेश* : प्रेमा खांडू

● *आसाम* : सर्बानंद सोनवल

● *बिहार* : नितीश कुमार

● *छत्तीसगड* : भूपेश बघेल

● *दिल्ली* : अरविंद केजरीवाल

● *गोवा* : प्रमोद सावंत

● *गुजरात* : विजय रूपानी       

● *हरियाणा* : मनोहरलाल खट्टर

● *हिमाचल प्रदेश* : जयराम ठाकूर

● *झारखंड* : हेमंत सोरेन

● *कर्नाटक* : बी.एस. येडियुरप्पा

● *केरळ* : पिनराई विजयन

● *मध्यप्रदेश* : शिवराज सिंह चौहान

● *पुदुच्चेरी* : व्ही. नारायणस्वामी

● *पंजाब* : अमरिंदर सिंग

● *राजस्थान* : अशोक गेहलोत

● *सिक्कीम* : प्रेम सिंग तमांग

● *तामिळनाडू* : ई. के. पलानीस्वामी     

● *मणिपूर* :  एन. बिरेन सिंग

● *मेघालय* : कॉनराड संगमा

● *मिझोराम* : झोरामथांगा

● *नागालँड* : नेफिऊ रिओ

● *ओडिशा* : नवीन पटनायक                

● *तेलंगणा* : के. चंद्रशेखर राव

● *त्रिपुरा* : बिप्लब कुमार देब

● *पश्चिम बंगाल* :  ममता बनर्जी

२९ मे २०२०

General Knowledge

▪️ कोणती उड्डाणादरम्यान प्रवाश्यांची कोरोना तपासणी करणारी पहिली हवाई सेवा आहे?
उत्तर : एमिरेट्स

▪️ कोणत्या कलाकाराच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : लिओनार्डो दा विंची

▪️ कोणत्या बँकेनी सामाजिक अंतर पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफ्टी ग्रिड’ मोहीम चालवली आहे?
उत्तर : HDFC बँक

▪️ आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) चे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : उर्सुला पापंड्रिया

▪️ ‘किसान रथ’ अॅपचे कार्य काय आहे?
उत्तर : अन्नधान्यांच्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे

▪️ 2020 साली जागतिक आवाज दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : फोकस ऑन युवर वॉइस

▪️ हांग्जो शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘2022 एशियन पॅरा गेम्स’या स्पर्धांचे शुभंकर काय आहे?
उत्तर : फीफी

▪️ 2020 साली जागतिक हिमोफिलिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : गेट+इनवॉल्व्ड

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सिघाट’ (Cghaat) संकेतस्थळाचे अनावरण केले?
उत्तर : छत्तीसगड

▪️ कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘अॅसेस करो ना’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : दिल्ली

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना.

🅾देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

🅾देशातील पहिले ग्हर्नर
ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

🅾देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

🅾देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

🅾देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

🅾देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

🅾देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

🅾देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

🅾देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

🅾देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

🅾देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

🅾देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

🅾देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

🅾देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

🅾देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

🅾देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

🅾देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

🅾देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

🅾देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

🅾देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

🅾देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

🅾देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

🅾देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

🅾देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

🅾देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

🅾देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

🅾देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

🅾देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

🅾देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

🅾देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

🅾देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

🅾देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

🅾देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

🅾देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

🅾देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

🅾देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

🅾देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

🅾देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

🅾देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

🅾देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

🅾देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

२८ मे २०२०

ठगांचा बंदोबस्त 1829

गर्व्हनर जनलर ⇨लॉर्ड विल्यम बेंटिंगने १८२९ च्या सुमारास ठगीच्या निर्मूलनाची मोहीम हाती घेतली.

◽️ बंगाल सेनेचा एक अधिकारी कॅप्टन विल्यम श्लीमान याने प्रत्यक्ष कामगिरी बजावली.

◽️ त्याच्या व त्याचा सहकारी विल्यम थॉर्नटन याच्या अहवालानुसार ठगांविषयी पुढीलप्रमाणे माहिती मिळते : मध्य हिंदुस्थान, म्हैसूर व अर्काट या प्रदेशांत ठगीचा सुळसुळाट होता.

◽️ ३०० ठगांची एक टोळी असे परंतु बळी घेण्याच्या कामगिरीसाठी ते छोटे गट करीत व सावज हेरल्यावर ते गट एकत्र येत.

General Knowledge

● ‘वर्ल्ड स्टील रिपोर्ट 2020’ या शीर्षकाचा एक अहवाल कोणत्या संस्थेनी प्रकाशित केला?

*उत्तर* : जागतिक पोलाद संघ

● ‘सोलर पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले?

*उत्तर* : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

● ‘खुडोल’ उपक्रम कोणत्या राज्यात चालविला जात आहे?

*उत्तर* : मणीपूर

● ‘गव्हर्नमेंट स्टेटस पेपर ऑन डेब्ट’ या शीर्षकाचे दस्तऐवज कोणत्या मंत्रालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले?

*उत्तर* : अर्थ मंत्रालय

● दरवर्षी जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो?

*उत्तर* : 23 मे     

● जागतिक बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थशास्त्री या पदावर कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* : कारमेन रेनहार्ट

● ‘संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता विषयक जागतिक दिन’ कोणत्या दिवशी पाळतात?

*उत्तर* : 21 मे

● कोणत्या राज्याने ग्रामीण महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी ‘दीदी’ वाहन सेवा सुरू केली?

*उत्तर* : मध्यप्रदेश

२७ मे २०२०

भारतीय रिझर्व बॅंक

◾️

     ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बॅंकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बॅंक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बॅंकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बॅंक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बॅंक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

◾️प्रमुख उद्देश

भारतीय रिझर्व बॅंकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.

भारताची गंगाजळी राखणे.

भारताची आर्थिक स्थिती राखणे.

भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.


◾️राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक

        नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ( नाबार्ड ) ही भारतातील अपेक्स डेव्हलपमेंट फायनान्शियल संस्था आहे. 
बँकेला " ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांच्या पतपुरवठा क्षेत्रात धोरण नियोजन आणि कार्यवाही संबंधी बाबी " देण्यात आल्या आहेत. नाबार्ड आर्थिक समावेशन धोरण विकसित करण्यास सक्रिय आहे .

◾️भूमिका :-

    नाबार्ड ही देशातील सर्वात महत्वाची संस्था आहे जी कॉटेज उद्योग, लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योग आणि इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासाकडे लक्ष देते.

२.नाबार्ड संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांपर्यंत पोहोचतो आणि एकात्मिक विकासास समर्थन व प्रोत्साहन देतो.

N.नबार्ड खालील भूमिका पार पाडून आपले कर्तव्य बजावते:

ग्रामीण भागातील विविध विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवठा करणा institutions्या संस्थांसाठी एक उत्कृष्ट वित्तसंस्था म्हणून काम करते.

पतपुरवठा यंत्रणेची शोषक क्षमता सुधारण्यासाठी संस्था इमारतीच्या दिशेने उपाययोजना करणे, देखरेख करणे, पुनर्वसन योजना तयार करणे, पत संस्थांचे पुनर्गठन, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण इ.

को-ordinates सर्व संस्था ग्रामीण आर्थिक उपक्रम क्षेत्रीय स्तरावर विकास कामात आणि संबंध कायम राखते भारत सरकार , राज्य सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील संस्था धोरण स्पष्ट व स्वच्छ मांडणी संबंधित

सुरु देखरेख आणि मूल्यांकन करून कर्जाची परतफेड प्रकल्प.

ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांची नाबार्ड पुनर्वित्त करते.

ग्रामीण अर्थव्यवस्थेस मदत करणार्‍या संस्थांच्या विकासात नाबार्डचा सहभाग आहे.

नाबार्ड आपल्या ग्राहक संस्थांची तपासणी देखील करते.

हे ग्रामीण अर्थव्यवस्थेस आर्थिक मदत देणार्‍या संस्थांचे नियमन करते.

हे ग्रामीण उत्थान क्षेत्रात काम करणा the्या संस्थांना प्रशिक्षण सुविधा पुरविते.

हे संपूर्ण भारतभर सहकारी बँका आणि आरआरबीचे नियमन व देखरेख ठेवते.

नाबार्डचे मुख्य कार्यालय मुंबई, भारत येथे आहे.

◾️भूमिका

  नाबार्ड आपल्या 'एसएचजी बँक लिंकेज प्रोग्राम' साठी देखील ओळखला जातो जो भारताच्या बँकांना बचत गटांना (एसएचजी) कर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करतो . मुख्यत्वे बचत गट ही मुख्यत: गरीब महिलांची रचना असल्यामुळे हे मायक्रोफाइनेन्सच्या महत्त्वपूर्ण साधन म्हणून विकसित झाले आहे . मार्च २०० By पर्यंत, lakh.3 कोटी सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे २२ लाख बचत गटांना या कार्यक्रमाद्वारे पतपुरवठा करावा लागला. 

नाबार्डकडे पाण्याचे शेड विकास, आदिवासी विकास आणि शेती इनोव्हेशन सारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

◾️नियमन

नाबार्ड राज्य सहकारी बँका (एसटीबी), जिल्हा सहकारी केंद्रीय बँका (डीसीसीबी) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) देखरेखीखाली ठेवतो आणि या बँकांची वैधानिक तपासणी करतो. 

◾️निर्गुंतवणूक

निर्गुंतवणुकीचा अर्थ सरकार, उद्योग किंवा कंपनीवर धोरण बदलण्यासाठी किंवा सरकारांच्या बाबतीत अगदी सत्ता बदलण्याकडे दबाव आणण्यासाठी एकत्रित आर्थिक बहिष्काराचा वापर करणे होय . हा शब्द सर्वप्रथम अमेरिकेत या दशकात वापरला गेला होता, दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदाचे धोरण रद्द करण्यासाठी दबाव आणण्यासाठी एकत्रित आर्थिक बहिष्काराचा वापर करण्यासाठी . मुदत देखील लक्ष्य क्रिया लागू केले गेले आहे इराण , सुदान , उत्तर आयर्लंड , म्यानमार , आणि इस्राएल .

सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे

१) काशी        - बनारस
२) कोसल      - लखनौ 
३) मल्ल        - गोरखपूर
४) वत्स         - अलाहाबाद
५) चेदि          - कानपूर
६) कुरु          - दिल्ली
७) पांचाल     - रोहिलखंड
८) मत्स्य       - जयपूर
९) शूरसेन      - मथुरा
१०) अश्मक  - औरंगाबाद- महाराष्ट्र
११) अवंती    - उज्जैन
१२) अंग       - चंपा-पूर्व बिहार
१३) मगध     - दक्षिण-बिहार
१४) वृज्जी    - उत्तर बिहार
१५) गांधार    - पेशावर
१६) कंबोज   - गांधारजवळ

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

शिखराचे नाव उंची(मीटर) जिल्हे

कळसूबाई 1646 नगर

साल्हेर 1567 नाशिक

महाबळेश्वर 1438 सातारा

हरिश्चंद्रगड 1424 नगर

सप्तशृंगी 1416 नाशिक

तोरणा 1404 पुणे

राजगड 1376 पुणे

रायेश्वर 1337 पुणे

शिंगी 1293 रायगड

नाणेघाट 1264 पुणे

त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

बैराट 1177 अमरावती

चिखलदरा 1115 अमरावती.

जैविक विविधता कायदा, २००२

●भारतातील विपुल जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करणे, त्यातील घटकांचा संतुलित वापर करणे, तसेच जैविक स्रोतांतून मिळणाऱ्या फायद्याचे योग्य आणि सम प्रमाणात वाटप करणे या मूळ उद्दिष्टातून जैविक विविधतेचा कायदा २००२ साली अस्तित्वात आला.

●भारतातील हळद, बासमती तांदळाचे पीक व अशा अनेक पारंपरिक जैविक संसाधनांवर स्वामित्व हक्क सांगण्याचा प्रयत्न अमेरिकेसह काही राष्ट्रांनी केला होता; परंतु भारताने परदेशात कायदेशीर लढा देऊन आपले स्वामित्व हक्क अबाधित राखण्यात यश मिळवले.

● भारतातील जैविक घटक, तसेच त्या घटकांबद्दलची पारंपरिक माहिती परदेशात नेऊन त्याचे स्वामित्व मिळवण्यावर आता या कायद्याने नियंत्रण आणले आहे.

● शोधप्रकल्पांसाठी परदेशी व्यक्तींना तसेच परदेशी व्यक्तींशी संबंधित भारतीय संस्थांना जैवविविधतेच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आणि केंद्र सरकारने आखलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अवलंबन करणे आवश्यक आहे.

●कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर ‘राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण’, राज्य स्तरावर ‘राज्य जैवविविधता मंडळ’ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर ‘जैवविविधता व्यवस्थापन समिती’ अशी त्रिस्तरीय रचना केलेली आहे.

●कोणत्याही व्यक्तीस भारतीय जैवविविधतेशी संबंधित स्वामित्वाचे (बौद्ध्रिक संपदा) अधिकार मिळवण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे.

●राष्ट्रीय प्राधिकरण अर्जदारास स्वामित्वाच्या अधिकारांतून मिळणाऱ्या व्यावसायिक फायद्यातल्या भागीदारीच्या अटी-शर्तीवर परवानगी देऊ शकते.

● भागीदारीतून मिळणारा हा लाभ स्थानिक स्तरावर जैवविविधतेच्या संसाधनांचे पारंपरिक वापर आणि जतन करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे अपेक्षित आहे आणि तशी तरतूद या कायद्यात केलेली आहे.

●परदेशात भारतीय जैविक संसाधनांशी संबंधित कोणी स्वामित्वाचे हक्क मिळवण्याचा प्रयत्न केल्यास, भारतीय हक्क अबाधित राखण्याची कायदेशीर जबाबदारी राष्ट्रीय प्राधिकरणावर आहे.
राज्यातील व्यवस्थापन मंडळाकडे त्या-त्या राज्यातील जैवविविधतेशी संबंधित संसाधनांचा भारतीय नागरिकांकडून होणारा व्यावसायिक वापर आणि जैविक सर्वेक्षण अथवा जैविक वापर नियंत्रित करण्याचे अधिकार आहेत.

●स्थानिक व्यवस्थापन समितीकडे कक्षेतील जैवविविधतेचे जतन आणि संरक्षण करणे, तसेच संतुलित वापर आणि जैवविविधतेशी संबंधित सर्व माहिती एकत्रित करण्याची जबाबदारी आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, अझिथ्रोमायसिन हानिकारक:

●हायड्रॉक्सी क्लोरोक्विन व अझिथ्रोमायसिन या दोन औषधांचा वापर करोना रुग्णांवर करण्यात येत असला तरी ही दोन्ही औषधे घातक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.

●या दोन्ही औषधांचा हृदयावर विपरीत परिणाम होत असतो असे सांगण्यात आले.

●विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आताच्या काळात हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचे घातक परिणाम लक्षात घेऊन या औषधाच्या करोना रुग्णांवरच्या चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस घेब्रेसस यांनी सांगितले.

●व्हँडरबिल्ट विद्यापीठ व स्टॅनफर्ड विद्यापीठ या अमेरिकेतील दोन संस्थांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या माहितीचा वापर करून असे म्हटले आहे,की १३० देशातील २.१० कोटी लोकांना १४ नोव्हेंबर १९६७ ते १ मार्च २०२० दरम्यान जी औषधे देण्यात आली त्यांचा अभ्यास केला असता हायड्रॉक्सी क्लोरोक्विन व अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधांमुळे हृदयावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

●करोनाच्या आधीपासून ही औषधे वापरात आहेत. पण आता ती करोनावरील उपचारात समाविष्ट करण्यात आली आहेत.

●अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधाने हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याचे दिसून आले आहे. २.१ कोटी लोकांपैकी ७६८२२ लोकांमध्ये या काळात वाईट परिणाम झाले होते.

●हायड्रॉक्सीक्लोरोक्विनने २१८०८ म्हणजे २८.४ टक्के लोकांवर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले.

●अ‍ॅझिथ्रोमायसिनमुळे ८९६९२ रुग्णात वाईट परिणाम दिसून आले , हे प्रमाण ६०.८ टक्के आहे. ६०७ रुग्णात दोन्ही औषधांच्या एकत्रित वापराचे दुष्परिणाम दिसून आले .

बेनामी मालमत्ता म्हणजे काय?


🅾 दुसऱ्याच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता म्हणजे बेनामी मालमत्ता होय. ज्याच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते, त्याला बेनामदार म्हणतात. जो मालमत्तेचे पैसे दतो, तो तिचा खरा मालक असतो. आणी ही मालमत्‍ता ज्‍याच्‍याजवळ असते त्‍यास बेनामी मालमत्‍ता म्‍हणतात.

🅾बेनामी व्यवहार म्हणजे असे व्यवहार, ज्यात मालमत्ता ज्याचे नावे रजिस्टर केली जाते, ती व्यक्ती त्या व्यवहाराचे पैसे देत नाही. कोणी तरी दुसरीच व्यक्ती त्याचे पैसे अदा करते. अन्य कोणाच्या तरी फायद्यासाठी दुसराच कोणी तरी हे व्यवहार करीत असतो.

🅾 उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून पत्नी अथवा मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता, भाऊ, बहीण अथवा अन्य नातेवाईकांच्या नावे घेतलेली अशी मालमत्ता जिची किंमत उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून अदा करण्यात आलेली आहे. कुळांच्या नावे घेतलेली, पण या व्यवहारात विश्वस्त अथवा लाभधारक असलेली मालमत्ता. ही मालमत्‍तेला बेनामी मालमत्‍ता म्हणतात.

🅾ज्ञात स्रोताबाह्य उत्पन्नातून पत्नी व मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता, भाऊ अथवा बहिणींसोबत भागिदारीत घेतलेली अज्ञात स्रोतांच्या पैशांतील मालमत्ता. कुळांच्या नावे घेतलेली मालमत्ता. याचा अर्थ असा होतो की, कोणी आपल्या आई-वडिलांच्या नावे मालमत्ता घेतली असेल, तर तीही बेनामी मालमत्ता होऊ शकते.

🅾 चल - अचल संपत्ती, कुठल्याही प्रकारचे हक्क अथवा हित, कायदेशीर दस्तावेज, सोने, वित्तीय रोखे इ. कोणत्याही प्रकारच्या संपत्तीसाठी केलेले सर्व व्यवहार बेनामी व्यवहारात येतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...