२५ मे २०२०

ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता.


1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

🅾ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

🅾सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

🅾सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

🧩राजीनामा :

🅾सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

🅾उपसरपंच - सरपंचाकडे

🧩निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

🅾सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

🧩अविश्वासाचा ठराव :

🅾सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

🅾अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

🅾तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

🅾अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

🅾आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

२४ मे २०२०

घटनेतील मूलभूत कर्तव्य.


1.घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  

2.ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 

3.भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 

4.देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 

5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 

6. आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 

7. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 

8. विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 

9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 

10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 

11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.   

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

दादासाहेब फाळके पुरस्कार.


🅾  सुरुवात -1969

🅾 स्वरूप - दहा लाख रुपये सुवर्णकमळ आणि शाल

🅾  चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जातो

🅾 पहिले विजेते -देविका राणी

🅾 भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार. भारतीय चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते

🅾 अलीकडील पुरस्कार विजेते
   1) 2014 - शशि कपूर
   2) 2015 - मनोज कुमार
   3) 2016- के विश्वनाथ
   4) 2017 विनोद खन्ना
   5) 2018 अमिताभ बच्चन

🅾 आतापर्यंत सहा महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये 3 महिला महाराष्ट्रीयन आहेत

🧩  पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन:-

1)  दुर्गा खोटे 1983
2) वी शांताराम 1985
3) लता मंगेशकर 1989
4) भालजी पेंढारकर 1991
5) आशा भोसले 2000

🅾 अमिताभ बच्चन हे या पुरस्काराचे 50 वे मानकरी ठरले आहेत

🦋 🦋 🦋🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

२३ मे २०२०

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?

*उत्तर* : बी एंगेज्ड

● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?

*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?

*उत्तर* : बंगळुरू

● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?

*उत्तर* : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?

*उत्तर* : कर्नाटक

● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?

*उत्तर* : इटली

● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?

*उत्तर* : बेंजामिन नेतन्याहू

● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

*उत्तर* : डॉ. हर्ष वर्धन

पश्चिम घाटातल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाबाबत अधिसूचना जाहीर करण्याची राज्यांची मागणी.

🌦 21 मे 2020 रोजी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पश्चिम घाटातल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांबाबत अधिसूचना जाहीर करण्याच्या मुद्यांवर चर्चा केली.

🌦 या चर्चेदरम्यान पश्चिम घाटाचे महत्त्व लक्षात घेता या घाटाचे संरक्षण करण्याची गरज असल्याबाबत या सर्व राज्यांनी सहमती व्यक्त केली. पर्यावरण आणि जैवविविधता यांचे संरक्षण करण्यासाठी अधिसूचना लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी या राज्यांनी केली आहे.

🌑पार्श्वभूमी-

🌦 पश्चिम घाटांच्या जैव विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या भागाचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना केली होती. या समितीने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पश्चिम घाटाच्या अंतर्गत येणारे भौगोलिक क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून घोषित करावे अशी शिफारस केली होती. हे भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करणाऱ्या अधिसूचनेचा मसुदा ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

🌑पश्चिम घाट-

🌦 जैवविविधता, खनिज संपदा यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचे वस्तीस्थान असलेला पश्चिम घाट हा भारताच्या पश्चिमेला आहे. पश्चिम घाटाला ‘सह्य़ाद्री’ म्हणूनही ओळखले जाते.

🌦 ही पर्वतराजी तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी सुरू होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून या पर्वतरांगा दक्षिण टोकाच्या जवळ पोचतात. या पर्वतराजीची लांबी 1600 कि.मी. असून याचा 60 टक्के भाग कर्नाटकात येतो. या पर्वतरांगांचे क्षेत्रफळ 60 हजार वर्ग कि.मी. असून पश्चिम घाटाच्या एकूण भूभागांपकी 30 टक्के भूभाग हा जंगलक्षेत्रात मोडतो. पश्चिम घाट हा जगातल्या जैवविविधतेच्या प्रमुख आठ (हॉटस्पॉट) प्रदेशांपैकी एक असून जगभरातल्या महत्त्वाच्या एकूण 34 प्रदेशांपैकी एक मानला जातो.

🌦 भारताच्या एकूण जैवविविधतेपकी 25 टक्के जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. दरवर्षी प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक नवीन प्रजाती पश्चिम घाटामध्ये सापडतात. पश्चिम घाटातल्या जंगलांमुळे या प्रदेशातल्या हवामानावर अनुकूल परिणाम होतो. यामुळे पश्चिम उतार आणि पश्चिम किनारपट्टीवर अधिक पाऊस पडतो तर पूर्व उतारावर मध्यम पाऊस पडतो. पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे आणि खाड्या हे वाहतूक व अर्थोत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

🌑टिप्पणी:

🌦 1988 साली नॉर्मन मेअर या संशोधकाने सर्वप्रथम जैवविविधता ‘हॉटस्पॉट’ याविषयी संकल्पना मांडली होती. जैवविविधता ‘हॉटस्पॉट’ हे धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न प्रदेश असतात. हिमालय, हिंद-म्यानमार, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार हे चारही जैवविविधतेचे क्षेत्र भारतात अंशत: वसलेले आहेत.

ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर.

🔰करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसी आणि अनेक क्रिकेट बोर्ड प्रेक्षकांविना सामने खेळवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अद्याप याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून, बीसीसीआय देशात क्रिकेटची बंद पडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यात तिरंगी मालिका खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं. बांगलादेशच्या संघही या मालिकेत सहभागी होणं श्रीलंकेला अपेक्षित आहे.

🔰श्रीलंकेनंतर आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आफ्रिका दौरा करेल यासाठी आशादायी आहे.

🔰दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दौऱ्याबद्दल क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय या दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरु असल्याचं फॉल म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यातील भारतीय संघाचा प्रस्तावित टी-२० दौरा हा आयसीसीच्या नियमांनुसार नाहीये.

🔰दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात फेब्रुवारी महिन्यात याविषयी चर्चा झाली होती. यानंतर २० मे रोजी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये टेलि-कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हा दौरा निश्चीत झाल्याचं फॉल यांनी सांगितलं. दोन्ही क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना सरावाची संधी कशी उपलब्ध करुन देता येईल याची चाचपणी करत आहेत.

राज्य निर्वाचन आयोगाची कार्य.

1. राज्य सरकार आणि राज्यपाल निवडणूक विषयक सल्ला देणे.

2. जिल्हापरिषद, पंचायतसमिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका यांचा मतदार याद्या तयार करणे.

3. वरील निवडणुका घेतल्यानंतर त्यांचे निकाल लावणे आणि विजयी उमेदवारांची नवे जाहीर करणे.

4. राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्ह बहाल करणे.

5. निवडणूक चिन्हांच्या बाबतीत राजकीय पक्षाद्वारे वाद निर्माण झाल्यास तो सोडविणे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

राज्य निर्वाचन आयोगाबद्दल संपूर्ण माहिती.

🅾1993 च्या 73 आणि 74व्या घटनादुरूस्तीनुसार राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वातंत्र्य राज्ये निर्वाचन आयोग स्थापन करण्यात आला आहे.

🧩रचना :

🅾प्रत्येक राज्य निर्वाचन आयोगासाठी एक निवडणूक आयुक्त असेल.

🧩नेमणूक :

🅾राज्याचे राज्यपाल करतात. (मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडल यांच्या सल्ल्याने)

🧩शपथ :

🅾राज्यपाल देतात.

🧩राजीनामा :

🅾राज्यपालाकडे

🧩कार्यकाल :
🅾 अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 62 वर्ष

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

२२ मे २०२०

प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था.


(Primary Agricultural Credit Co-Operatives)

🅾प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात.

🧩स्थापना -

🅾गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते.

🧩कार्ये -

🅾ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते.

🧩भांडवल उभारणी -

🅾स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली.

🧩विस्तार -

🅾भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या.

🧩महाराष्ट्रातील विस्तार -

🅾31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना.

🅾 ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.

🅾 सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.

🅾 राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.

🅾त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.

🅾 कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

२१ मे २०२०

Railway.

🅾डलहोसीने 1853 मध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरु केली

🅾 हि रेल्वे सिंध, साहीब, सुलतान या इंजिनांनी आेढली

🅾 या रेल्वेने पहिल़्यांदा प्रवासाचा मान जगन्नाथ शंकर शेठ यांना मिळाला

🅾 भारतात रेल्वे मार्गांची उभारणी ब्रिटिश भांडवलदारांनी व भारतातील ब्रिटिश सरकारने केली

🅾रेल्वे मार्ग बांधण्यासाठी ब्रिटिश भांडवलदारांनी 350 कोटी रुपये गुंतवले, त्यावर सरकारने 5 टक्के व्याज दिले.

🅾1869 पर्यंत 6 हजार किमी रेल्वेमार्ग उभारला

🅾 1905 पर्यंत 45 हजार किमी रेल्वेमार्ग बांधले

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋🦋 🦋

पीएम ई विद्या’: विद्यार्थ्यांना डिजीटल/ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नवा उपक्रम.

🅾आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या अंतर्गत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 17 मे 2020 रोजी प्रोत्साहन निधीच्या अंतिम भागातल्या घोषणा केल्या.

🅾टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, याची खातरजमा सरकारने केली आहे.

🅾सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध नाही, हे लक्षात घेत ‘स्वयम प्रभा’ DTH वाहिन्यांवरून शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे.

🅾तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने ‘पीएम ई विद्या’ हा डिजीटल/ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त आणि विविध उपकरणांच्या माध्यमातून लाभ घेता येईल, असा कार्यक्रम तात्काळ सुरू केला जाणार आहे.

🅾‘पीएम ई विद्या’ अंतर्गत कम्युनिटी रेडियो आणि पॉडकास्टचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. दिव्यांग बालकांसाठी विशेष डिजीटल साहित्य उपलब्ध करून दिले जाणार.

🅾30 मे 2020 पर्यंत 100 अग्रणी विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

भारतातील सर्वात लांब.

1.भारतातील सर्वात लांब नदी -
🅾 गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण -
🅾हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा

3.भारतातील सर्वात लांब बोगदा -
🅾 जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी -
🅾अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग-
🅾जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल -
🅾सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता -
🅾पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग-
🅾दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल -
🅾हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
🅾 सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे.

  🧩भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

आत्मचरित्र-कादंबर्‍या-नाटके-पुस्तके.

🅾अॅडव्हान्टेज इंडिया फ्रॉम चॅलेंग्ज टू अपॉर्च्युनिटी हे ए.पी.के. अब्दुल कलाम यांनी सृजनपालसिंह यांच्यासोबत लिहिलेले शेवटचे पुस्तक आहे.

1. नाटके - यातनाघर, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, युगांत
🅾लेखक - महेश एलकुंचवार

2. पुस्तक - स्मिता पाटील अ ब्रिफ इनकंडेसन्स
🅾लेखिका - मैथिली राव.

3. पुस्तक - ड्रिमिंग बिग : माय जर्नी टू कनेक्ट इंडिया
🅾लेखक - भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोडा

4. पुस्तक - वाचणार्‍याची रोजनिशी
🅾लेखक - विक्रम सेठ

5. कादंबरी - फायर ऑन द माऊंटन
🅾लेखिका - अनिता देसाई

6. आत्मचरित्र - जिहाद
🅾लेखक - हुसेन जमादार (कोल्हापूर)

7. कादंबरी - पारखा
🅾लेखक - एस.एल. भैरप्पा

8. पुस्तक - टर्न ऑफ द टॉरटॉईज
🅾लेखक - टी.एन. निनान

9. पुस्तके - जिगसॉ, मोहनमाया
🅾लेखक - रामदास भटकळ

10. आत्मचरित्र - इडली, ऑर्किड आणि मी
🅾लेखक - प्रसिद्ध हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत

11. पुस्तके - प्रकाशवाटा, रानमित्र
🅾लेखक - डॉ. प्रकाश आमटे

12. पुस्तक - द ग्रेट इंडियन डायट
🅾लेखिका - अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

चंद्रासंबंधीची माहिती.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...