११ मे २०२०

राज्यसेवा प्रश्नसंच

1) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?
अ) जे.व्हि.पी. समिती   
ब) सरकारीया आयोग   
क) इंद्रजित गुप्ता समिती   
ड) राजमन्नार समिती
1) फक्त अ, ब, क   
2) फक्त अ, ब, ड   
3) फक्त अ, क, ड   
4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2

2) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.
ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
1) फक्त अ     
2) फक्त ब   
3) अ आणि ब   
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1

3) नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?
अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग
ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष
क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे
ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील

1) फक्त अ, ब, क   
2) फक्त अ, क, ड   
3) फक्त क, ड, ब   
4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 4

4) भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?

1) 1956     
2) 1955     
3) 1935     
4) 1951

उत्तर :- 2

5) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?
   1) भारताचा अधिवास आणि
   2) भारतात जन्म किंवा
   3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
   4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास
उत्तर :- 3

1) अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा.
               प्रकल्प              राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार      ब) गुजरात
         3) रावतभाटा    क) महाराष्ट्र
         4) नरोरा         ड) राजस्थान
                             इ) उत्तर प्रदेश
   1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ     
   2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
   3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
   4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1

2) ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
   1) संतृप्त हायड्रोकार्बन   
   2) असंतृप्त हायड्रोकार्बन   
   3) विवृत्त हायड्रोकार्बन  
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
   1) मोलुस्का    2) आथ्रोपोडा  
   3) दोन्ही        4) दोन्ही  नाही

उत्तर :- 3 

4) फोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
   1) रासायनिक ऊर्जा   
   2) नैसर्गिक वायू   
   3) विद्युतधारा     
   4) भू – औष्णिक ऊर्जा

उत्तर :- 1 

5) खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
   1) अल्केन       2) अल्कीन  
   3) अल्काइन    4) वरील सर्व

उत्तर :- 1

(1) अनैतिक व्यापार ( प्रतिबंध ) अधिनियम , १९५६ अनुसार सात वर्षे ते दहा वर्षे वा आजीवन तुरूंगवासाची  शिक्षा खालीलपैकी कोणत्या अपराधासाठी दिली जाऊ शकते ?
( अ ) १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती अज्ञान व्यक्तीच्या वेश्या व्यवसायाच्या उत्पन्नावर जगत असेल
( ब ) वेश्या व्यवसायासाठी व्यक्तीला फूस लावणे , घेऊन जाणे , पुरवणे ,
( क ) वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यक्तीला डांबून ठेवणे ,
( ड ) जागा कुंटणखान्यासाठी वापरणे , व्यवस्था पाहणे / मदत करणे ,
( १ ) अ फक्त
( २ ) ब फक्त
( ३ ) अ , ब , क ✅🔰✅
( ४ ) ड फक्त
=========================

(2)महाराष्ट्रात महिला धोरण २००१ अनुसार महिला सक्षमीकरण समितीचे गठण केले गेले . या समिती पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
( १ ) मंत्री , महिला व बाल विकास
( २ ) अध्यक्ष , राज्य महिला आयोग
( ३ ) संचालक , माविम
( ४ ) मुख्यमंत्री ✅🔰✅
=========================

(3)योग्य जोड्या लावा .

संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव  ------  वर्ष
(अ) महिलांचे राजकीय हक्क (य) १९६७
(ब) विवाहित महिलांचे राष्ट्रीयत्व (र) १९६२
(क) विवाह , किमान वय व नोंदणी (ल) १९५७
( ड ) महिलांविरुद्ध भेदभाव निर्मूलन (व) १९५२
( १ ) अ - य , ब - र , क - ल , ड - व
( २ ) अ - व , ब - ल , क - र , ड - य✅🔰
( ३ ) अ - र , ब - य , क - व , ड - ल
( ४ ) अ - ल , ब - व , क - य , ड - र
=========================

(4)महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती अशासकीय सदस्य असतात ?
( १ ) चार
( २ ) पाच
( ३ ) सहा ✅🔰✅
( ४ ) आठ
=========================

(5) संयुक्त राष्ट्रसंघाने ३ कलमी मानवी अधिकारांची घोषणा ज्या दिवशी केली तो दिवस . . .
( १ ) १२ डिसेंबर , १९४७
( २ ) १५ ऑगस्ट , १९४७
( ३ ) १० डिसेंबर , १९४८ ✅🔰✅
( ४ ) २ ऑक्टोबर , १९५१
=========================

(6)बाल न्याय अधिनियम , २००० अंतर्गत विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी राज्यात ठिकठिकाणी कोणती गृहे
उभारण्यात आली आहेत ?
( १ ) बालगृहे
( २ ) अनाथालये
( ३ ) विशेष गृहे ✅🔰✅
( ४ ) सेवा गृहे
=========================

(7) महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव दिसतो ?
( १ ) जस्टीस ऑफ पीस
( २ ) रिलीफ अॅक्ट
( ३ ) राईट्स ऑफ मॅन ✅🔰
( ४ ) हू वेअर शुद्राज
=========================

१) खालीलपैकी कोणत्या शहरात पुसा कृषी विज्ञान मेळावा २०२० आयोजित करण्यात आला ?
अ) मुंबई
ब) पुणे
क) नवी दिल्ली ✅✅
ड) हैदराबाद

२) भारतीय बॅटमिंटनचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
अ) ऍगस ड्वी सांतोसो ✅✅
ब) किम जी ह्यून
क) रवी शास्त्री
ड) यापैकी नाही

३) २०२० मध्ये विश्व उत्पादकता काॅग्रेसचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे ?
अ) अमेरिका
ब) भारत ✅✅
क) रशिया
ड) जपान

४) जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ७ मार्च
ब) ९ मार्च
क) १० मार्च
ड) ८ मार्च ✅✅

५) ' मोदी अगेन : व्हाय मोदी इज राईट फाॅर इंडिया ' या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
अ) शरद दत्त
ब) आभास मालदाहीयार ✅✅
क) वेद माथूर
ड) यापैकी नाही

🔹भारतामध्ये केंव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली ?

A) 1 एप्रिल 2005✅
B) 1 एप्रिल 2003
C) 1 एप्रिल 2001
D) 1 एप्रिल 2002

🔹जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत _छापखाना सुरु केला.

A) बुद्धीसागर
B) ज्ञानसागर
C) कालनिर्णय
D) निर्णयसागर✅

🔹विजोड व्यक्ती ओळखा :

A) बॅरिस्टर जयकर
B) वासुदेव दास्ताने
C) अब्दुल सैफ
D) अण्णासाहेब भोकरकर✅

◾️मौर्य पूर्व काळात भारत ___ म्हणून ओळखला जाई.

A) द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज✅
B) द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज
C) द क्वीन ऑफ द सदर्न सीज
D) द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी

1) विजय केळकर समितीने भारतीय कर प्रणाली सुधारणेच्या संदर्भात कोणते धोरण सुचवले आहे ?
  
1) सरकारी खर्चात कपात     
2) करआकारणीचा पाया विस्तृत करणे
3) जास्त कर दर     
4) मूल्यवर्धित कर निर्मूलन
उत्तर :- 2

2) तेराव्या वित्त आयोगाने दिनांक 30 डिसेंबर 2009 रोजी सादर केलेल्या अहवालाबाबत काय खरे आहे ?
   अ) तेराव्या वित्त आयोगाने सध्याची केंद्र व राज्यांमधील कराची विभागणी करणारी वैधानिय पध्दत न्याय मानली आहे. बरेच  सरळ कर केंद्राने लादणे व संकलन करणे नंतर ते राज्यांबरोबर वाटणे.
   ब) गरीब राज्यांना अन्न, खते व पेट्रोलियम या तीन मुख्य सबसिडीज (उपुदाने) मुळे फायदा होतो कारण त्यांना त्यातून पुरेसा आधार / भाग मिळतो आणि म्हणून आहे तश्या त्या चालू राहावयास हव्यात.
  
1) विधान अ खरे आहे परंतु ब नाही.   
2) विधान ब खरे आहे परंतु  अ नाही.
3) दोन्ही विधाने अ व ब खरी आहेत.   
4) दोन्ही विधाने अ व ब चुकीची आहेत.
उत्तर :- 1

3) जनरल अँटी – अव्हायडन्स रूल (GAAR) च्या सुधारित तरतुदी भारतात केव्हा पासून लागू होतील ?
  
1) 1 एप्रिल 2016   
2) 1 एप्रिल 2015   
3) 1 जानेवारी 2015   
4) 1 एप्रिल 2007
उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / आहेत ?
   अ) मूल्यवर्धित कर ही बहु केंद्रीय कर गोळा करणारी पध्दती आहे.
   ब) अमूल्यवर्धित कर ही एक केंद्रीय कर गोळा करणारी पध्दत आहे.
   क) मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल.
1) अ आणि ब    2) ब आणि क   
3) फक्त क         4) वरील सर्व
उत्तर :- 4

5) भारतीय करपध्दतीत बदल घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृतीदलाने केला होता ?
  
1) खर्च नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे.   
2) अनुत्पादक खर्चाचे नियमन करणे.
3) कर चुकवेगिरीचे प्रमाण कठोर उपायांनी कमी करणे.     
4) करांची संख्या वाढविणे.
उत्तर :- 1

6) खालील विधानांचा विचार करा.
   अ) थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरूवात.
   ब) कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण.
   क) वित्तिय सर्वसमावेशकतेबाबची समिती.
  
1) अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा आहेत.   
2) अ फक्त ही प्रस्तावित कर सुधारणा आहे.
3) ब फक्त ही प्रस्तावित कर सुधारणा आहे.       
4) अ आणि ब या क ने सुचविल्या नाहीत.
उत्तर :- 4

7) कर महसूलातील राज्यांचा वाटा ठरवणारा महत्वाचा घटक .......................... हा आहे.
   1) गेल्या पाच वर्षातील दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग
   2) राज्याच्या लोकसंख्येची घनता
   3) विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि देशातील दरडोई उत्पन्न यामधील अंतर
   4) ‍विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्याचे उत्पन्न यातील अंतर
उत्तर :- 4

8) खालीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / आहेत ?
   अ) 2011-12 मध्ये सेवा करातील महसुलात 37.4 टक्के वाढ झाली, हे महसूल स्त्रोतातील सेवा कर महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे निदर्शक आहे.
   ब) प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 सात योजनासह संपूर्ण भारतात सुरू झाली.
1) फक्त अ         2) फक्त ब   
3) अ आणि ब    4) एकही नाही
उत्तर :- 1

9) करेतर महसूलात याचा समावेश होतो :
अ) व्याज प्राप्ती    ब) लांभांश व नफा   
क) अनुदान
1) अ फक्त.          2) अ व ब फक्त   
3) अ व क फक्त    4) वरील सर्व
उत्तर :- 4

10) करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ व सोपी पध्दत :
  
अ) करांचे सकल देशांतर्गत उत्पन्नाशी प्रमाण   
ब) सर्वोच्च कर दर
क) कर लागू होण्याची कमीतकमी उत्पन्न पातळी  
ड) उत्पन्न वजावटीची सर्वात जास्त मर्यादा
   1) ब      2) अ      3) ड      4) क
उत्तर:- 2


लॉर्ड कर्झन (1899 - 1905)

●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय....

●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.

●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.

●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.

●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.

●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली.

●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.

●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.

●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली.

●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला.

●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली.

●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली.

●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.

●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.

●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.

●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते.

●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.

●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.

●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.

“२०२० संपेपर्यंत Work From Home करा”; फेसबुक, गुगलने दिली कर्मचाऱ्यांना मुभा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💮करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. या कंपन्यामध्ये अगदी गुगल आणि फेसबुकसारख्या बड्या कंपन्यांच्याही मसावेश आहे.

💮आता या दोन कंपन्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० संपपर्यंत घरुन काम करण्याची मुभा देणार आहेत. लवकरच दोन्ही कंपन्या यासंदर्भातील औपचारिक घोषणा करणार असल्याचे ‘हिंदुस्तान टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

💮फेसबुक ६ जुलैपासून आपली सर्व कार्यालये पुन्हा सुरु करण्याच्या विचारात असल्याचे प्रवक्त्यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितले आहे. मात्र असं असलं तरी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची इच्छा आहे ते घरुन काम करु शकतात अशी मुभा देण्यात येणार असल्याचे समजते.

💮यासंदर्भात सर्व नियोजन झाले असून कंपनीचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झकेरबर्ग याबद्दलची घोषणा करु शकतो.

💮‘द व्हर्ग’मधील वृत्तानुसार फेसबुकने हा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार केला आहे. आरोग्य यंत्रणांनी दिलेला इशारा, सरकारने दिलेला इशारा या सर्वांचा विचार करुन कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कार्यलयातून काम करण्यासंदर्भात परवानगी देऊ शकते.

💮सध्या तरी कंपनीचे अनेक कार्मचारी हे घरुनच काम करत आहेत. याआधीच फेसबुकने २०२१ पर्यंतचे सर्व इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली आहे.

मान्सून 11 जूनला होणार दाखल, स्कायमेटची माहिती

🔰 मान्सून कोलकाता आणि मुंबईत 11 जून रोजी, तर दिल्लीत 27 जून रोजी दाखल होईल, अशीमाहिती स्कायमेटने दिली आहे.

🔰 मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल होत असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

🔰 देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम 1 जूनपासून सुरू होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो.

🔰 तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

🔰 देशातील परतीच्या पावसाची तारीख 15 ऑक्टोबरच ठेवण्यात आली आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही.

१० मे २०२०

कोण आहेत इक्बाल चहल? (Who is new BMC commissioner Iqbal Chahal )

🔰इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.

🔰इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट असलेले आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. चहल हे 2004 पासून मुंबई मॅरेथॉनच्या शर्यतीत भाग घेतात.

🔰इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत

🔰सध्या इक्बाल चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत

🔰इक्बाल चहल यांनी यापूर्वी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं आहे

🔰इक्बाल हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते

🔰वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे

🔰केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव आणि ओसडी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

🔰इक्बाल चहल हे औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही होते

🔰शिवाय त्यांनी उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून काम पाहिलं

🔰म्हाडाचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे

🔰इक्बाल यांचं शिक्षण राजस्थानातील जोधपूर इथं झालं आहे

🔰इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट अधिकारी म्हणून ओळखले जातात

🔰इक्बाल चहल हे 2004 पासून सलग मुंबई मॅरोथॉनमध्ये सहभागी होतात.

🔰प्रवीण परदेशींच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली?
उत्तर : जर्मनी

▪️ कोणत्या देशात ‘पीच ब्लॅक’ नावाचा शस्त्रास्त्राचा सराव आयोजित केला जातो?
उत्तर : ऑस्ट्रेलिया

▪️ कोणती संस्था ‘ओपन बजेट सर्वे’ आयोजित करते?
उत्तर : इंटरनॅशनल बजेट पार्टनर्शिप

▪️ कोणत्या व्यक्तीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : श्रीकांत माधव वैद्य

▪️ कोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे पुढचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : टी. एस. तिरुमूर्ती

▪️ ‘सयाजीराव गायकवाड III: महाराजा ऑफ बडोदा’ या शीर्षकाखाली ऐतिहासिक चरित्रकथा कुणी लिहिली?
उत्तर : उमा बालसुब्रमण्यम

▪️ कोणत्या देशापुढे भारताने 150 दशलक्ष डॉलर एवढे मूल्य असलेले करन्सी स्वॅप करण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
उत्तर : मालदीव

▪️ कोणत्या राज्यात ‘जीवन अमृत योजना’ लागू करण्यात आली आहे?
उत्तर : मध्यप्रदेश

▪️कोणत्या राज्य सरकारने ‘डोअरस्टेप अंगणवाडी’ नावाने एका उपक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : गुजरात

▪️ HUDCO या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : शिव दास मीना

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) नवी दिल्लीच्या परराष्ट्र सेवा संस्थेला कोणाचे नाव देण्यात आले ?
अ) अटलबिहारी वाजपेयी
ब) दीनदयाळ उपाध्याय
✓क) सुषमा स्वराज
ड) अरुण जेटली

२) २०१९ मध्ये संरक्षण मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन केलेला ' सिस्सेरी पूल ' कोणत्या राज्यात आहे ?
अ) आसाम
ब) सिक्किम
✓क) अरुणाचल प्रदेश
ड) मध्यप्रदेश

३) इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट ने प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड वाईड एज्युकेशन फाॅर द फ्युचर इंडेक्स २०१९ नुसार भारत जगात कितव्या स्थानी आहे ?
अ) ३०
✓ब) ३५
क) २५
ड) २०

४) देशातील पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय कोठे आहे ?
✓अ) चंदीपुर ( ओडिशा )
ब) सालारजंग ( हैदराबाद )
क) भद्रावती ( चंद्रपूर )
ड) यापैकी नाही

५) दाल सरोवर ज्यास लेक आॅफ फ्लाॅवर्स म्हणतात. ते कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे?
अ) आसाम
ब) तामिळनाडू
✓क) जम्मू-काश्मीर
ड) महाराष्ट्र

१) स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार २०२० कोणाला प्रदान करण्यात आला ?
अ) विवेक देबराॅय
ब) बिमला पोद्दार
✓क) जादव पायेंग
ड) यापैकी नाही

२) खालीलपैकी कोणत्या माशांच्या संवर्धनावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे ?
अ) कार्द
✓ब) थाई मांगुर
क) चिवणी
ड) बोंबील

३) देहरादून एअरपोर्टला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?
✓अ) अटलबिहारी वाजपेयी
ब) सुषमा स्वराज
क) अरुण जेटली
ड) श्यामाप्रसाद मुखर्जी

४) यू विन मिंट कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत, ज्यांनी अलीकडे भारत दौरा केला ?
✓अ) म्यानमार
ब) अमेरिका
क) फ्रान्स
ड) जपान

५) कलम ३७१ ( B ) मुळे खालीलपैकी कोणत्या राज्याला विशेष अधिकार मिळाले आहेत ?
अ) मणिपूर
ब) आंध्रप्रदेश
क) अरुणाचल प्रदेश
✓ड) आसाम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१) भारताचे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे ?
अ) A - 05
ब) B - 05✅✅
क) C - 05
ड) D - 05

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

अ) मनीष सिसोदिया
ब) रतन टाटा✅✅
क) नीता अंबानी
ड) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) खालीलपैकी कोणती व्यक्ती ' कुस्ती ' या क्रिडा प्रकाराशी संबंधित नाही ?

अ) युवराज पाटील
ब) खाशाबा जाधव
क) गणपतराव आंदळकर
ड) भाऊसाहेब पडसलगीकर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) हरित अर्थसंकल्प अशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

अ) महाराष्ट्र
ब) पंजाब
क) बिहार✅✅
ड) तेलंगणा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) खालीलपैकी नुकतीच कोणी मलेशियाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ?

अ) मोहिउद्दिन यासीन✅✅
ब) महातीर मोहंमद
क) नजीब रजाक
ड) महम्मद यासीन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1] कोणत्या राज्य सरकारने 'आयुष कवच-कोविड' या नावाचे मोबाइल अॅप तयार केले?

(A) महाराष्ट्र
(B) पश्चिम बंगाल
(C) हरयाणा
(D) उत्तरप्रदेश✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2] कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?

(A) अंतर्गत विस्थापन देखरेख केंद्र (IDMC)
(B) संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO)
(C) संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)✅✅
(D) जागतिक आरोग्य संघटना (WHO)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3] 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची संकल्पना काय आहे?

(A) मिडवाइव्ज, मदर्स अँड फॅमिलीज: पार्टनर्स फॉर लाइफ
(B) मिडवाइव्ज: फॉर ए बेटर टुमॉरो
(C) मिडवाइव्ज विथ विमेन: सेलिब्रेट, डेमोनस्ट्रेट, मोबिलाईज, युनाइट✅✅
(D) मिडवाइव्ज: डिफेंडर्स ऑफ विमेन्स राइट्स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4] कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘बिरसा हरित ग्राम योजना’ लागू केली?

(A) छत्तीसगड
(B) झारखंड✅✅
(C) बिहार
(D) ओडिशा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5] कोणत्या संस्थेनी 'सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान' चालवले आहे?

(A) नीती आयोग✅✅
(B) महिला व बालविकास मंत्रालय
(C) आयुष मंत्रालय
(D) संरक्षण संशोधन व विकास संस्था

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6] कोणते राज्य सरकार “निगाह” योजना राबवत आहे?

(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) गुजरात
(D) हिमाचल प्रदेश✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...