०८ मे २०२०

वायूकांड (विशाखापट्टणम वायुगळती)

भोपाळमध्ये १९८४ ला झालेल्या वायू गळतीच्या आठवणी अजूनही पुसलेल्या नाहीत. तेथील लोकांना काय भोगावे लागले, याच्या करूण कहाण्या अजूनही शहारे आणणा-या आहेत. आता देश एकीकडे कोरोनाच्या संकटाशी लढत असताना विशाखापट्टणम शहराजवळच्या एका रासायनिक प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक जणांना वायूबाधा झाली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईजवळ अशीच छोटीशी वायू दुर्घटना घडली होती. या वायू गळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरात जाणवतो आहे.

नशीब दाट लोकवस्तीच्या भागात ही कंपनी असती, तर वायू गळतीच्या बळींची संख्या वाढली असती. ग्रामीण भाग असल्याने तेथे लोकसंख्येची घनता कमी आहे. त्यामुळे जीवितहानी फार झाली नाही. या परिसरातील लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना जास्त त्रास होत असल्याचे आढळून येत आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. लोकांना मेघाद्री गेड्डा आणि इतर काही ठिकाणी नेण्यात येत आहे. वायू गळतीची माहिती मिळताच आर. आर. वेंकटापूरम्, वेंकटापूरम्, पद्मनाभपूरम्, बीसी कॉलनी आणि कंपारापालेमच्या नागरिकांना इतरत्र हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

काही जण हा वायू नाकावाटे शरीरात गेल्यामुळे बेशुद्ध झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी एलजी पॉलिमर्स कंपनीत झालेल्या या वायू गळतीची माहिती घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा रासायनिक प्रकल्प एलजी पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. 1961 मध्ये सुरू झालेले येथील प्रकल्प हिंदुस्थान पॉलिमर्सच्या मालकीचे होते. 1997 मध्ये दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे याची मालकी आली.

भोपाळचा प्रकल्प अमेरिकेच्या कंपनीचा होता, तर विशाखापट्टणमचा प्रकल्प दक्षिण कोरियाचा आहे. स्टायरिन या वायूची गळती झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टाळेबंदीनंतर कारखान्यात पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. कंपनीच्या आजूबाजूच्या गावातील लोक गाढ झोपेत असताना गुरुवारी पहाटे तीन वाजता वायू गळती सुरू झाली. अनेकांना याबाबत लगेच लक्षात आले नाही; पण हळूहळू वायू गळतीचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली. चाैकशी होईल, कारवाईचे नाटक उभे राहील; परंतु विषारी वायू पोटात गेल्याचे परिणाम कित्येक दशके भोगावे लागतात, त्याची भरपाई कशी करणार, हा खरा प्रश्न आहे.

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या ठिकाणी 2021 साली पुरुषांची जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत?
उत्तर : बेलग्रेड, सायबेरिया

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘आयुर रक्षा क्लिनिक’ कार्यरत केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘समुद्र सेतू’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ निधन झालेले रोनाल्ड व्हिव्हियन स्मिथ कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : इतिहास कार्य

▪️ प्रथमच कोणता देश आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 4 मे

▪️ कोणत्या मंत्रालयाने “अ रे ऑफ जीनीयस” हा लघुपट प्रदर्शित केला?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या मंत्रालयाने “प्रोफ. बी. बी. लाल - इंडिया रिडिसकव्हर्ड” हे शीर्षक असलेले ई-पुस्तक प्रकाशित केले?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) नावाचे उपकरण विकसित केले?
उत्तर : राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था

▪️ कोणत्या संस्थेनी UV ब्लास्टर नावाचे एक निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन

▪️ जेमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला

▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर

▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे

▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र

▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम

▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस

▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी

▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण

राज्यसेवा आणि सयुक्त पुर्व परिक्षासाठी जुन पर्यंत अभ्यास नियोजन पुढीलप्रमाणे असावे..

1) सर्वसाधारण  जून पर्यंत म्हणजेच 50 दिवस

2) कोरोना नंतर साधारण ऑगस्ट  किवा त्यानतंर  पुर्व परिक्षा होतील असा अंदाज

3) जून पर्यंत पुढील विषयावर  विशेष  भर असावा
    (मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून)
   -भूगोल    
   -राज्यघटना
   -अर्थव्यवस्था
   -(फक्त सयुक्त परिक्षा लक्ष्य आसलेले
    विद्द्यार्थ्यांनी काही काही प्रमाणात मराठी आणि
    इंग्लिश ही करुन घ्यावे )

4 ) दररोज किमान एक तास 30 मी csat करावे
    ( सयुक्त पुर्व वर भर असणारे विद्द्यार्थ्यांनी
    बुद्धिमत्ता आणि  गणीत अधिक करावे )

5)बाकी इतर सर्व विषय पुर्व परिक्षेच्या उद्देश  समोर ठेउन पुर्व करण्यावर भर  द्यावा

6) सद्या तुमच्या सोबत अभ्यास साहित्य जेवढे आहे ते उत्तम करण्यावर भर द्या( बाकी साहीत्य  नाही ही समश्या मानू नका)

7) सद्या जे अभ्यास साहीत्य नाही ते जुलै  महिन्यात करण्याचे नियोजन करा.

8) परिक्षा आपली कोणतीही समश्या समजुन घेत नाही ( आपण परीक्षेच्या demand पुर्ण करावेच लागेल )

9)  If u want RESULT  dont give
    REASON (मार्ग शोधा दिशा सापडेल )

10) तूम्ही परिक्षा फॉर्म  भरला आहे तर अभ्यास केलाच पाहिजे.

11) तुमच्या आजुबाजुला लहान भाऊ बहिण आहेत त्यांच्या कडून state board book घ्या आणि  तात्पुरता  आभ्यस चालू ठेवा.

12) अभ्यास होत नसेल तेव्हा सराव प्रश्नसंच अधिक वापरा..

13) आरोग्य आणि अभ्यास  दोन्हीची उत्तम काळजी घ्या...उत्तम रहा.. सकारात्मक रहा..

                                    )

Motivation


आईवडीलांच्या संघर्षातुन निर्माण झालेले मोटीव्हेशन हे जगातील कोणत्याही मोटीव्हेशनल बायोपीक पेक्षा जास्त टचिंग असतात.



०७ मे २०२०

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही.

🅾कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आरोग्यसेवा वगळता इतर विभागांत  नोकर भरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

🅾तसेच शासकीय खर्चाला 67 टक्के कट लावण्यात आला असून, प्रत्येक विभागाला आता त्यांच्या एकूण बजेटच्या फक्त 33 टक्केच रक्कम मिळणार आहे. शिवाय, नवीन कोणतीही योजना सादर करू नये, असे वित्त विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

🅾तर प्रत्येक विभागाने आपल्या चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत किंवा रद्द करण्यासारख्या आहेत त्या निश्चित कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मदत पुनर्वसन हे विभाग प्राधान्य क्रमाचे विभाग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

🅾 या विभागांनी फक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपला निधी खर्च करायचा आहे. अन्य विभागांना कोणत्याही खरेदीच्या नव्या प्रस्तावांना मंजुरी देता येणार नाही.तसेच फर्निचर, दुरुस्ती, झेरॉक्स मशीन, संगणक, कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे, असे खर्चदेखील आता करता येणार नाहीत.

🅾प्राधान्यक्रम नसलेल्या विभागांना, कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना, प्रशासकीय मान्यता देता येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असली तरी निविदा प्रसिद्ध करता येणार नाही.मात्र औषधे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व त्यांचा पुरवठा यांच्या खरेदीसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे.

राज्य ३१ मे पर्यंत करोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश :

राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेतली व ३१ मे पर्यंत राज्य करोनामुक्त करण्याचे आदेश दिले.

‘प्रत्येक जिल्हा ग्रीन झोन बनलाच पाहिजे. भले मग त्यासाठी तुम्ही कितीही कठोर भूमिका घ्या’, असे उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले.

‘स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आवश्यक निर्णय घेऊ शकतात. पण करोना नियंत्रणात आणण्याच्या बाबतीत कुठलीही हयगय अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले’. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.

पोलीस भरती प्रश्नसंच

▶️खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.

A. बालदिन - १४ नोव्हेंबर

B. कामगार दिन -१ मे

C. शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✅

D. बालिका दिन -३ जानेवारी

▶️छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?

A. तुकाराम - एकनाथ

B. रामदास -तुकाराम✅

C. तुकाराम - नामदेव

D. रामदास - एकनाथ

▶️शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?

A. सर्वनाम

B. नाम✅

C. क्रियापद

D. विशेषण

▶️मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.

A. फक्त दिवस

B. डोपरी किंवा पहाटे

C. फक्त रात्री✅

D. दिवस किंवा रात्री

▶️खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:

३८ , २९ , २२ , ? , १४ , १३

A. १८

B. १६

C. १७✅

D. १९

▶️अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.

सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?

A. १४

B. ८

C. ७✅

D. ११

▶️३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?

A. ९२०✅

B. २३०

C. ११५

D. ६९०

▶️_यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर

A. संत गाडगेबाबा✅

B. संत तुकाराम

C. संत चोखामेळा

D. संत शेख महंमद

▶️बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?

A. स्वदेशी आंदोलन

B. चोरीचौरा आंदोलन

C. फोडा आणि तोडा आंदोलन

D. बंग - भंग आंदोलन✅

▶️खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?

A. ५/६

B. ३/५

C. ७/९

D. ४/७✅

▶️◾️◾️इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश

अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत.

ब. स्वतंत्र (विलग) पाय-यांमध्ये सादर केले जातात.

क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात.

ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे :

A) फक्त अ आणि ब

B) फक्त ब आणि के

C) अ, ब आणि क✅

D) वरील सर्व

▶️◾️अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?

A) - 1.51J

B) - 3.4eV

C) - 1.51 eV ✅

D) - 13.6 eV

▶️◾️खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

A)  भारताचे पहिले पर्यावरण पुरक जैव इंधन (bio-fuel) युक्त विमान चेन्नई आणि बेंगलुरु दरम्यान उडाले. ✅

B)  भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018 चे राष्ट्रीय धोरण जाहिर केले आहे.

C) या धोरणानुसार 2030 पर्यत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

D) वरीलपैकी एकही नाही

▶️◾️ नुकताच 'बॉनेटहेड
शार्क' (Bonnethead Shark) मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

अ] तो प्रामुख्याने समुद्र गवत (sea grass) खातो.

ब] तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधान/ने निवडा :

पर्यायी उत्तरे :

A) फक्त अ✅

B) फक्त ब

C) अ आणि ब दोन्हीही

D) अ आणि ब दोन्हीही नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रकिया सुरू.

🏵न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे ई-फायलिंग  पद्धतीने दाखल करतायावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

🏵यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून राज्यात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांची यादी मागविण्यात आली आहे, अशी माहिती बार कौन्सिलतर्फे देण्यात आली.

🏵सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटीकडून या आराखड्यावर सध्या काम सुरू आहे. या कमिटीकडून बार कौन्सिल ऑफ इंडियाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र बरोबरच देशातील इतर राज्यांत कडूनही यासाठी माहिती मागविण्यात आली आहे.

🏵ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर कोर्टात दाखल होणारे दावे ई-फायलिंग द्वारे कसे दाखल करता येतील याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

🏵महाराष्ट्रातील वकिलांची माहिती गोळा करण्यासाठी तसेच ई-फायलिंग या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली अशी माहिती कौन्सिलचे सदस्य अड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

🏵राज्यातील व परराज्यातील माहिती गोळा करण्यात आल्यानंतर ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटी कडे येणार आहे. त्या नंतर पुढील आराखडा तयार केला जाणार आहे.

🏵ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर प्रत्येक वकीलाला तालुका, जिल्हा, हायकोर्ट, आणि सुप्रीम कोर्टातही ई फाइलिंग द्वारे दावे दाखल करता येऊ शकणार आहेत, असे ही अड. उमाप यांनी सांगितले.

करोना व्हायरसवरील औषध निर्मितीमध्ये भारताला महत्वपूर्ण यश.

🔰सध्याच्या घडीला करोना व्हायरसवर अत्यंत परिणामकारक ठरणारे रेमडेसिविर औषध बनवण्याच्या दिशेने भारताने पहिले पाऊल टाकले  आहे.हैदराबाद स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीने रेमडेसिविर औषध बनवण्यासाठी सुरुवातीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती केली आहे.

🔰औषधात वापरण्यात येणारे घटकद्रव्य बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.तसेच उद्या गरज पडली तर भारतात रेमडेसिविर औषधाची निर्मिती सुरु व्हावी, यासाठी IICT ने सिप्ला सारख्या औषध कंपन्यांसाठी टेक्नोलॉजीची प्रात्यक्षिक सुरु केली आहेत. गिलीयड सायन्सेस या औषध कंपनीने रेमडेसिविर औषधाची निर्मिती केली आहे.

🔰तर अमेरिकेत इमर्जन्सीमध्ये या औषधाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग हे औषध करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी ठरत आहे.गिलीयड सायन्सेसकडे रेमडेसिविर औषधाचे पेटंट  आहे. पेटंट कायद्यानुसार व्यावसायिक वापरासाठी नव्हे, फक्त संशोधनासाठी या औषधाची निर्मिती करता येईल.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना.

🔰 जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आदिवासी विकास विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीकरण करीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया…

🔰 डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा १

🔰अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, मातामृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनामध्ये वाढ करणे आणि जन्माला येणाऱ्या सुदृढ बालकांचे प्रमाण वाढविणे, यासाठी अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या आहारासाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली.

🔰 यात अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेतून सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळेचा चौरस आहार देण्यात येत आहे. गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत तर स्तनदा मातांना प्रसूतीनंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी या योजनेचा लाभ देण्यात आहे. त्यामुळेउष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

🔰 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-२०१५-१६) नागरी व ग्रामीण अशी वर्गवारी लक्षात घेता ग्रामीण भागातील स्त्रियांमधील ॲनोमियाचे प्रमाण ४९.९ टक्के तर निकषापेक्षा बीएमआय कमी असलेल्यांचे प्रमाण ३० टक्के एवढे आहे.

🔰आदिवासी क्षेत्रात हे प्रमाण अधिक असल्याने गरोदर स्त्रियांना शेवटचे तीन महिने एक वेळा सकस आहार देण्याऐवजी गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून आहार दिल्यास ॲनेमियाचे प्रमाण कमी होऊन बीएमआय वाढविणे शक्य होईल. या उद्देशाने डॅा. भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे.

🔰 गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळा चौरस आहार देण्याचा कालावधी वाढवून स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून बाळांतपणापर्यंत तसेच स्तनदा मातांना पहिले सहा महिने एकवेळा आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गरोदर असल्याचे निश्चित झालेल्या स्त्रियांची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करतात.

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचा ‘नदी व्यवस्थापनाचे भविष्य’ विषयक ‘आयडियाथॉन’ कार्यक्रम

🔰राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) या संस्थांनी कोविड-19 महामारीमुळे नदी व्यवस्थापन धोरणे भविष्यात कशा प्रकारे आकाराला येऊ शकतात याचा मागोवा घेण्यासाठी “नदी व्यवस्थापनाचे भविष्य” विषयक ‘आयडियाथॉन’ आयोजित केले. आयडियाथॉनमुळे नदी व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.

🔰या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2 मे 2020 रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सुमारे 500 जण सहभागी झाले होते. विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधील तज्ञ यात सहभागी झाले होते.

🔰कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदीमध्ये प्रदूषणाच्या पातळीत घट झालेली दिसून आली आहे आणि त्यामुळे नैसर्गिक वातावरणात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. मात्र ही परिस्थिती किती काळ टिकून राहणार याविषयी चिंता व्यक्त केली गेली. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने, आयडीयाथॉनमध्ये नद्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून अन्य समस्यांचे निराकरण कसे केले जाऊ शकते याची चाचपणी करण्यात आली.

🔰नदी व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष वेधण्यासाठी तसेच नदीशी शहरांची आंतरजोडणी अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे

☘भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी----शिरपूर , महाराष्ट्रा.

☘भारतातील पाहिले इ टेम्पल ---शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा)

☘भारतातील पाहिले खाजगी विमानतळ---कोची(केरळ)

☘भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा--कोट्टायम(केरळ)

☘भारतातील पाहिले पोलीस संग्रहालय----गाझियाबाद(उत्तरप्रदेश)

☘भारतातील पाहिले बायोटेक शहर--लखनौ(उत्तरप्रदेश)

☘भारतातील पाहिले इ कोर्ट---- --- बिहार.

☘भारतातील पाहिले इ पोस्ट------- पाटणा(बिहार)

☘भारतातील पाहिले बायोडिझाल प्रकल्प--काकीनडा (आंध्र प्रदेश)

☘भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग---पोसिंत्रा (गुजरात)

☘भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र---कोलकाता (प. बंगाल)

☘भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कोईम्बबटूर येथे स्थापन करण्यात आला.

☘भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली.

०६ मे २०२०

हिंदू व्यक्तीला पहिल्यांदाच पाकिस्तान एअर फोर्समध्ये पायलट बनण्याचा मान.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखी घटना घडली आहे. पाकिस्तानी एअर फोर्समध्ये एका हिंदु व्यक्तीला पायलट बनण्याचा बहुमान मिळाला आहे.

✍राहुल देव असं या व्यक्तीचं नाव असून तो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपकार भागात राहणारा आहे. सिंध प्रांतातला हा भाग हिंदु वस्तीसाठी ओळखला जातो.

✍पाकिस्तानी एअर फोर्समध्ये काम करणारा राहुल देव हा पहिला हिंदु पायलट म्हणून ओळखला जाणार आहे. मात्र एअर फोर्समध्ये पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळालेला राहुल हा पहिलाच हिंदू व्यक्ती ठरणार आहे.

ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚦पाच वेळेचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हा आज सुरू होत असलेल्या ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.

🚦करोनामुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि चेस डॉट कॉमने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जगातील आघाडीचे खेळाडू सहभागी झाले आहेत.

🚦जगातील सहा संघांचा यात समावेश असून विश्व विजेता मॅग्नस कार्लसन याचा अपवाद वगळता अन्य सर्वच दिग्गज खेळणार आहेत.

🚦तर चीनला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. पाठोपाठ युरोप, रशिया, अमेरिका, भारत आणि शेष विश्व अशी क्रमवारी देण्यात आली.

🚦तसेच पाचवे मानांकन लाभलेल्या भारतीय संघात  आनंदसह विदित गुजराती, पी. हरिकृष्णा, बी. अधिबान, कोनेरू हम्पी आणि डी. हरिकाचा  समावेश आहे.

🚦माजी विश्वविजेता ब्लादिमिर क्रामनिक भारतीय संघाचा सल्लागार आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या चीनच्या संघात डिग लीरेन, वांग हाओ, वेई यी आणि चारवेळेचा विश्व विजेता हाऊ यिफान याचा समावेश आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...