३० एप्रिल २०२०

आधार अपडेट करणे होणार सोपे.

🔰यूआयडीएआयने ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आधार अपडेशन करण्यासाठी आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयांतर्गत एका कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) परवानगी दिली आहे.

🔰तर सीएससीकडून 20 हजार बिझनेस करस्पाँडंटकडून (बीसी) ग्रामीण भागात सुविधा देण्यात येत आहेत.केंद्रीय दूरसंचार आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी टष्ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

🔰तसेच आधार सेवा त्यांच्या निवासस्थानाजवळ आणण्यास यामुळे मदत होईल. सीएससीचे सीईओ डॉ. दिनेश त्यागी यांनी सर्व बिझनेस करस्पाँडंट यांना सांगितले आहे की, त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण त्वरित पूर्ण करावे.न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर 2018 मध्ये सीएससीच्या माध्यमातून होणारे आधारचे काम बंद करण्यात आले होते.

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती.

🔰गेल्या काही दिवसांत पुण्यातील प्रामुख्याने शहरात  कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

🔰पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून, त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰तर पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.राज्याच्या मुख्य सचिव कार्यालया मार्फत सोमवार रोजी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले.

🔰तर अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. तर सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त व कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तीन वर्षांची बंदी.

🔰पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते.

🔰तर मॅच फिक्सिंगप्रकरणी तो दोषी आढळला असून त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

🔰पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठवली आहे. या काळात त्याला क्रिकेटची संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होता येणार नाही.

प्रमुख दिन व घोष वाक्य 2018 -19

● 28 फेब्रुवारी:- राष्ट्रीय विज्ञान दिन
विषय (थीम) - भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान

● 22 मार्च:- जागतिक जल दिन
विषय (थीम) - नेचर ऑफ वाॅटर

● 24 मार्च :- जागतिक क्षय रोग दिन
विषय (थीम) - Wanted: Leaders for a TB-Free world

● 5 एप्रिल :-राष्ट्रीय सागरी दिन
विषय (थीम) - हिंदी महासागर:-संधीचा महाराष्ट्र

● 7 एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
विषय (थीम) - सर्वासाठी आरोग्य

● 22 एप्रिल :- जागतिक वसुंधरा दिन
विषय (थीम) - प्लास्टिक प्रदूषणचा अंत

● 15 मे :- जागतिक कुटुंब दिन
विषय (थीम) - कुटुंब व समावेशक समाज

● 31 मे :- जागतिक तंबाखूविरोधी दिन
विषय (थीम) - तंबाखू आणि हृदयविकार

● 5 जून:- जागतिक पर्यावरण दिन
विषय (थीम) - Best Plastic Pollution

● 8 जून :- जागतिक महासागर दिन
विषय (थीम) - Preventing plastic pollution and encouraging solution for a health ocean

● 11 जुलै:- जागतिक लोकसंख्या दिन
विषय (थीम) - कुटुंब  नियोजन हा मानवी हक्क आहे

● 12 ऑगस्ट:-आंतराष्ट्रीय युवा दिन
विषय (थीम) - Safe Spaces For Youth

● 8 सप्टेंबर :- आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस
विषय (थीम) - Literacy and skills Development

● 1 डिसेंबर :- जागतिक एड्स दिवस
विषय (थीम) - Know your status

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

» जागतिक वसुंधरा दिवस
International Mother Earth Day

» 22 एप्रिल
» 1970 पासून

» 2019 Theme : Protect Our Species

» 2020 Theme : Climate Action

» SDG तील 13 वा गोल Climate Action असे आहे.

» या दिवसाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत.

» 22 एप्रिल 2016 रोजी पॅरिस ऍग्रिमेंट वर सह्या केल्या आहेत.

जॉईन करा ​​❇️ प्रमुख दिन व घोष वाक्य 2018 -19
------------------------------------------------------

● 28 फेब्रुवारी:- राष्ट्रीय विज्ञान दिन
विषय (थीम) - भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान

● 22 मार्च:- जागतिक जल दिन
विषय (थीम) - नेचर ऑफ वाॅटर

● 24 मार्च :- जागतिक क्षय रोग दिन
विषय (थीम) - Wanted: Leaders for a TB-Free world

● 5 एप्रिल :-राष्ट्रीय सागरी दिन
विषय (थीम) - हिंदी महासागर:-संधीचा महाराष्ट्र

● 7 एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
विषय (थीम) - सर्वासाठी आरोग्य

● 22 एप्रिल :- जागतिक वसुंधरा दिन
विषय (थीम) - प्लास्टिक प्रदूषणचा अंत

● 15 मे :- जागतिक कुटुंब दिन
विषय (थीम) - कुटुंब व समावेशक समाज

● 31 मे :- जागतिक तंबाखूविरोधी दिन
विषय (थीम) - तंबाखू आणि हृदयविकार

● 5 जून:- जागतिक पर्यावरण दिन
विषय (थीम) - Best Plastic Pollution

● 8 जून :- जागतिक महासागर दिन
विषय (थीम) - Preventing plastic pollution and encouraging solution for a health ocean

● 11 जुलै:- जागतिक लोकसंख्या दिन
विषय (थीम) - कुटुंब  नियोजन हा मानवी हक्क आहे

● 12 ऑगस्ट:-आंतराष्ट्रीय युवा दिन
विषय (थीम) - Safe Spaces For Youth

● 8 सप्टेंबर :- आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस
विषय (थीम) - Literacy and skills Development

● 1 डिसेंबर :- जागतिक एड्स दिवस
विषय (थीम) - Know your status

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मोदी सरकारचा मोठा निर्णय: इतर राज्यात अडकलेले विद्यार्थी, कामगारांना जाता येणार घरी


◾️केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित
📌 कामगार,
📌पर्यटक आणि
📌 विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येणार आहे.

◾️ केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

◾️ त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे.

🔰 आदेशात काय म्हटलं आहे ?

लॉकडाउनमुळे अनेक स्थलांतरित कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना काही नियमांतर्गंत आपल्या घरी पाठवण्याची परवानगी देण्यात येत आहे.

🔴 सर्व राज्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं गरजेचं असून अडकलेल्या लोकांना पाठवताना किंवा प्रवेश देताना प्रोटोकॉलचं पालन करणं गरजेचं आहे. राज्यात अडकलेल्या लोकांची यादी नोडल अधिकाऱ्यांनी तयार करणं गरजेचं आहे.

🟠 जर एखाद्या ग्रुपला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असे तर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी संपर्क साधून रस्त्याने वाहतूक करण्यावर संमती दर्शवणं गरजेचं आहे.

🟡 प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं स्क्रिनिंग केलं जावं. ज्यांच्यामध्ये लक्षण नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जावी.

🔵  प्रवासासाठी बसचा वापर केला जावा. या बसेसचं निर्जुंतीकरण करणं तसंच बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असेल.

🟣 आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर संबंधित लोकांची आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी करावी. .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

निर्देशांकाचे प्रकार

1] मूल्‍य निर्देशांक
2] विशिष्‍ट हेतू निर्देशांक
3] संख्यात्‍मक निर्देशांक
4] किंमत निर्देशांक

🔹 स्पष्टीकरण :-

       🍀 निर्देशांक 🍀

1) किंमत निर्देशांक :
हे वस्‍तूच्या किमतीतील सामान्य 
बदलाचे मापन करते. ते दोन भिन्न कालावधी दरम्‍यान किमतीच्या पातळीची तुलना करते.

2) संख्यात्‍मक निर्देशांक :
याला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही 
म्‍हणतात. अर्थव्यवस्‍थेच्या उत्‍पादनातील किंवा उत्‍पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजते.
उदा., कृषी उत्‍पादन व औद्योगिक उत्‍पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेला बदल.

3) मूल्‍य निर्देशांक :
वस्‍तूचे मूल्‍य म्‍हणजे किंमत व परिमाण 
यांचा गुणाकार होय.(p×q) मूल्‍य निर्देशांक हा चलाच्या मूल्‍यातील बदलाचेरुपयाच्या स्‍वरूपात मोजमाप करतो.
हा निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोन्हींतील बदलाचे एकत्रीकरण करतो. त्‍यामुळेतो अधिक माहितीपूर्ण आहे.

4) विशिष्‍ट हेतू निर्देशांक :
काही विशिष्‍ट हेतूने हे निर्देशांक
तयार केलेजातात. उदा. आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्‍पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक इत्‍यादी.

        ✍️[ संदर्भ :- शालेय पुस्तके ]
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

"नॅशनल आयुष मिशन"


🛄सुरुवात -15 सप्टेंबर 2014🛄

 
🔴ठळक वैशिष्टे:-
 
🛄सार्वजनिक आरोग्य सेवामधील त्रुटी दूर करण्यासाठी या मिशन ची सुरुवात करण्यात आली आहे.
 
🛄विशेषत: दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे मिशन राबविण्यात येणार.
 
🛄नॅशनल आयुष मिशन मध्ये:-

📛आयुर्वेद,

📛योग,

📛नॅचरोपॅथी,

📛युनानी, सिद्धा,

📛होमिओपॅथी

अशा उपचार पद्धतींचा समावेश आहे.
 
🔴उद्देश:-
 
🛄विकसित शिक्षण संस्थांमध्ये वाढ करून आयुषच्या शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणणे.
 
🛄औषध निर्मितीसाठी उच्च प्रतीचा कच्चा माल उपलब्ध करून देणे.
 
🛄आयुषच्या तत्पर सेवा उपलब्धीसाठी दवाखाने, औषधे, मनुष्यबळ वाढविणे.

महत्त्वाचे प्रश्नसंच


◾️भारताची जनगणना करण्याचे काम कोणत्या खात्याअंतर्गत केले जाते ?

A) मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ✅

B) मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अण्ड फॅमीली वेलफेअर

C) मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलप मेंट

D) एज्यूकेशन मिनिस्ट्री

◾️श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा कालावधी ____ होय.

A) 1977-78

B) 1987-88

C)  1989-90

D) 1990-91✅

◾️5 जून हा दिवस _ दिन म्हणून साजरा केला जातो.

A)  पर्यावरण दिन✅

B)  शिक्षक दिन

C)  साक्षरता दिन

D) महिला दिन

◾️7 सप्टेंबर 2011 रोजी शक्तीशाली बॉम्बस्फोट झालेले भारतातील शहर कोणते ?

A)  मुंबई

B) हेद्राबाद

C)  दिल्ली✅

D)  चंडीगढ़

◾️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ 'युनेस्कोने' जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केलेले नाही ?

A)  अजंठा लेणी

B)  एलीफंटा लेणी

C)  छत्रपती शिवाजी टर्मीनस

D) महाबळेश्वर✅

◾️डाँग फेंग 21डी' हे नाव कशाशी संबंधीत आहे ?

A) उपग्रह

B) क्षेपणास्त्र ✅

C) शस्त्रास्त्र

D) अण्वस्त्र

◾️MKCL च्या ___ शाखेमुळे महाराष्ट्रातील लोकांना संगणक शिक्षण घेण्याची सोय अधिक सुलभ झाली आहे.

A) DTH

B)  ETH ✅

C) STD

D)  यापैकी नाही

◾️इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ?

A) 60

B) 65✅

C) 58

D)  55

◾️भारतीय संविधानच्या 113 व्या घटनादुरूस्तीन्वये कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ?

A)  बिहार

B)  ओरिसा ✅

C)  मध्य प्रदेश

D) अरुणाचल प्रदेश

२९ एप्रिल २०२०

महत्त्वाचे प्रश्नसंच

1)महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
~ यशवंतराव चव्हाण

2)महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल
~श्री. प्रकाश

3)महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका
~मुंबई

4)महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र
~मुंबई (1927)

5)महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र
~मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

6)महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण
~गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

7)महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य
~कर्नाळा (रायगड)

8)महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र
~खोपोली (रायगड)

9)महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प
~तारापुर

10)महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ
~मुंबई (1957)

11)महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ
~राहुरी (1968 जि. अहमदनगर)

12)महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
~प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)

13)महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी
~कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी

14)महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प ~जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)

15)महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र
~आर्वी (पुणे)

16)महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प
~चंद्रपुर

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक
~दर्पण (1832)

17)महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक
~दिग्दर्शन (1840)

18)महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र
~ज्ञानप्रकाश (1904)

19)महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा
~पुणे (1848)

20)महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा
~सातारा (1961)

21)महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी
~मुंबई (1854)

22)महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल
~ताजमहाल, मुंबई

23)एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति
~श्री. सुरेन्द्र चव्हाण

24)भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति
~महर्षि धोंडो केशव कर्वे

25)महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति
श्री. सुरेन्द्र चव्हाण

26)रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति
~आचार्य विनोबा भावे

27)महाराष्टाचे पहिले रँग्लर
रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

28)महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर
~आनंदीबाई जोशी

29)महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा
~वर्धा जिल्हा

30)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष
~न्यायमूर्ती महादेव रानडे

31)महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन )
~मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )

32)महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील)
~मुंबई ते कुर्ला (1925)

33)महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक
~सुरेखा भोसले (सातारा)

34)महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा
~सिंधुदुर्ग

35)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा
~कुसुमावती देशपांडे

36)महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त
~डॉ. सुरेश जोशी

37)महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग
~वडूज

38)ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट
~श्वास (2004)

39)राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट
~श्वास

40)राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट
~श्यामची आई

पोलीस भरती प्रश्नसंच

♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले.

🔰पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर आर्क्टिकच्या ओझोन थरात एक मोठे छिद्र पडले होते. हे छिद्र नैसर्गिकरीत्या संपूर्णपणे भरून निघाले आहे. ही बातमी कॉपरनिकन अॅटमॉस्फियर ऑब्झर्वेशन सर्व्हिसने दिली.

🔰शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छिद्र बंद होण्यामागचे कारण स्थितांबर गरम होणे हे आहे. एप्रिलपासून उत्तर ध्रुवाचे तापमान वाढू लागते. यामुळे, आर्क्टिकच्या वरील स्थितांबराचा थर देखील गरम होऊ लागला आणि ओझोन थरात ओझोन वाढू लागतो. त्यामुळेच ते छिद्र बंद झाले.

✅ओझोन वायू:-

🔰ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे ओळखले जाते. क्रिस्टियन फ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला.

🔰ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो, ते म्हणजे जमिनीपासून 10 ते 16 किलोमीटर पर्यंतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere) आणि तपांबराच्या वर 50 किलोमीटर पर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर (stratosphere). एकूण प्रमाणाच्या 10 टक्के ओझोन तपांबरात तर 90 टक्के ओझोन स्थितांबरामध्ये आढळतो. स्थितांबरमधला ओझोनचा थर हा ‘ओझोन थर’ म्हणून ओळखला जातो. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.

🔰तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे. तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते जंगलांच्या वाढीस मारक तसेच विविध श्वसनविकारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. ओझोन हा हरितगृह वायू असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो.

🔰स्थितांबरातला ओझोन हा नैसर्गिकरीत्या दोन टप्प्यांमध्ये तयार होतो. पहिल्या टप्प्यांत सौरप्रारणांमुळे ऑक्सिजनच्या रेणूंचे (O2) विघटन होऊन ऑक्सिजनचे अणू (O+O) वेगळे होतात. दुसर्‍या टप्प्यामध्ये विघटित ऑक्सिजन अणूंचा (O) ऑक्सिजनच्या रेणूंशी (O2) संयोग होऊन ओझोनचे रेणू (O3) तयार होतात. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या ओझोनचा सौरप्रारणांमुळे व मानवनिर्मित रसायनांशी संयोग पावल्याने नाश होतो. सूर्यकिरणांतल्या अतिनील (UV) प्रारणांमुळे ओझोनच्या रेणूंचे विघटन होते आणि अशाप्रकारे ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. अतिनील किरणे जमिनीपर्यंत पोहोचल्यास ती आपल्यासाठी हानीकारक असतात.

🔰मानवनिर्मित रसायनांमुळे अंटार्क्टिक स्थितांबरात ओझोनचे प्रमाण खूप कमी होण्याला ओझोन छिद्र असे म्हणतात. ह्या ओझोन छिद्राची पहिली नोंद 1985 साली जे. सी. फार्मन, बी. जी. गार्डिनर आणि जे. डी. शांकलिन ह्यांनी एका शोधनिबंधामध्ये केली. वातानुकूलन प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFC) वायूमुळे ओझोन थराचे नुकसान होते.

🔰1990च्या दशकात जवळपास ओझोनच्या थरात 10 टक्के घट झाल्याचे दिसून आले होते. ओझोन थराच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ओझोन थराच्या संरक्षणासाठी कॅनडाच्या मॉन्ट्रिएल शहरात जगभरातल्या प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. हा करार ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा होता. या देशांनी क्लोरोफ्लोरोकार्बन्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचे मान्य केले. 2000 सालापासून दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा झाली आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...