29 April 2020

महत्त्वाचे 10 सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी 'तिरंगा' नावाचे वाहन सादर केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या व्यक्तीची राष्ट्रपतींसाठीचे नवे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : कपिल देव त्रिपाठी

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘कोविड इंडिया सेवा’ या नावाने एका संकेतस्थळाचे उद्घाटन केले?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪️ "GetCETGo" नावाने एक ऑनलाईन व्यासपीठ कोणत्या राज्याने सुरु केले आहे?
उत्तर : कर्नाटक

▪️ कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : संजय कोठारी

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भागीदारीने टेक महिंद्रा ही कंपनी नवसंशोधन केंद्रांची स्थापना करणार आहे?
उत्तर : IBM

▪️ कोणत्या बँकेनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) विशेष भांडवली मदत योजना जाहीर केली?
उत्तर : भारतीय लघू उद्योग विकास बँक

▪️ कोणत्या अंतराळ संस्थेनी 60 इंटरनेट बीमिंग उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले?
उत्तर : स्पेसएक्स

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘माय बुक माय फ्रेंड’ मोहीमेचे उद्घाटन केले?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

▪️ कोणत्या राज्यात 23 एप्रिल या दिवशी खोंगजोम दिन पाळला जातो?
उत्तर : मणीपूर

भीमा नदी


भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

🔹लांबी ७२५ किमी (४५० मैल)

🔹उगम स्थान उंची १,१०० मी (३,६०० फूट)

🔹पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४८,६३१

🔹उपनद्या - कुंडली घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, मुळा, वेळ

🔹धरणे - उजनी धरण

भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.

भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो.

भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.

लिंग गुणोत्तर (Sex ratio)


              हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.

लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००

काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे :-
केरळ - १०८४,

तामिळनाडू - ९९६ ,

महाराष्ट्र - ९२९ ,

  पंजाब - ८९५ ,

   दिल्ली - ८६८ .

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक

     नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार. कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे. कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.

◾️नियुक्ती◾️

नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.

◾️शपथ किंवा पुष्टीकरणसंपादन◾️

"मी, (नियुक्त केलेल्या व्यक्तीचे नाव), भारताचे नियामक आणि महालेखा परीक्षक नियुक्त केल्यावर मी देवाच्या नावाने शपथ घेतो / कायद्याने स्थापित केल्यानुसार मी भारतीय संविधानाविषयी खरा विश्वास आणि निष्ठा बाळगू शकतो," मी भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करीन, की मी योग्य रीतीने आणि विश्वासूपणाने आणि माझ्या योग्यतेनुसार, ज्ञान व निर्णयाने माझ्या पदाचे कार्य निर्भयपणे किंवा निष्ठेने, आपुलकीने किंवा वाईट इच्छाशक्तीशिवाय करेन आणि राज्यघटनेचे समर्थन करीन. आणि कायदे.

भारताची अर्थव्यवस्था


भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्याविनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) १,०८९ अब्ज डॉलर एवढे आहे (२००७).क्रयशक्तीच्या समानतेचा (Purchasing power parity अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमूख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. भारताचा आर्थिक विकासदर २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात ९.४% एवढा होता. परंतु, अतिशय मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न मात्र ९६१ डॉलर एवढेच आहे, तर PPP वर आधारित वार्षिक दरडोई उत्पन्न ४,१८२ डॉलर एवढे आहे.जागतिक बॅंकभारताची "अल्प-आय असणारी अर्थव्यवस्था" अशी गटवारी करते.

◾️विनिमय दर◾️

१९४६ पर्यंत भारतामध्ये स्थिर विनिमय दराची पद्धत अस्तित्वात होती. ह्या काळात रुपयाचे मूल्य ब्रिटिश पाउंड स्टर्लिंगच्या मूल्याशी जोडलेले होते, स्वातंत्र्यानंतरही भारताच्या परकीय व्यापारापैकी ३०% व्यापार पाउंड स्टर्लिंगमध्ये होत असे. १९७५ नंतर स्थिर विनिमयाची पद्धत बंद होऊन भारताने बदलत्या विनिमय दरांचे अवलंबन केले. परंतु, तेव्हासुद्धा भारतीय रुपयाचे मूल्य विशिष्ट चलनांच्या समूहाच्या मूल्यावरून ठरवले जात असे, आणि रुपयाच्या मूल्याचे रिझर्व बॅंकेकडून कडक नियमन केले जात असे. १९९१ च्या आर्थिक सुधारांनंतर रुपयाचे मूल्य पूर्ण कन्व्हर्टिबल झाले, अर्थात रुपयाचे चलन दुसऱ्या चलनांमध्ये बदलायची सर्व बंधने हटविण्यात आली. इ.स. २००५ पासुन रुपयाचे मूल्य डॉलर, युरो आणि पाउंडच्या तुलनेत सातत्याने वाढत आहे.

'भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् - भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान
46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

27 April 2020

जादव पायेंग यांना ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔶‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने यावर्षीच्या ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी’ पुरस्कारासाठी जादव पायेंग यांची निवड करण्यात आली आहे. मानवनिर्मित जंगल तयार करण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांसाठी जादव पायेंग यांना सहावा कर्मयोगी पुरस्कार दिला जात आहे.

🔶पायेंग यांना हा पुरस्कार 29 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत एका सोहळ्यात दिला जाणार आहे.

🔺जादव पायेंग (द फॉरेस्ट मॅन):+

🔶जादव पायेंग हे भारतातले फॉरेस्ट मॅन म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक पर्यावरणवादी आणि वन कामगार आहे. ते आसाम राज्याच्या जोरहाट गावाचे रहिवासी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी वाळवंटीकरणाला आळा घालण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या लगत एकट्यानेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नातून मिळालेले फलित म्हणजे आज तिथली भूमी वन आच्छादित असून ते अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य प्राण्यांचे घर आहे.

यंदाच्या वर्षातले पहिले चक्रवादळ शुक्रवारी उठणार

👉उत्तर आणि दक्षिण भारतात कमाल तापमान वाढीच्या वेगाचा आलेख उंचावत असतानाच आता २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ १ मे रोजी उठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

👉 बंगालची खाडी, अंदमानचा समुद्र येथे या चक्रीवादळहोण्याचे संकेत मिळाले असून, यानुसार चक्रीवादळाचा पुढील प्रवास म्यानमार आणि बांग्लादेशाच्या दिशेने होईल, अशी माहिती स्कायमेटने दिली.

👉तर दुसरीकडे महाराष्ट्रात २७ आणि २८ एप्रिल रोजी ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर राहील; महत्त्वाचे म्हणजे पारा वाढत असतानाच विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.

👉येत्या आठवड्यात महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे.

👉विखुरलेल्या स्वरुपात तुरळक ते मध्यम प्रमाणात होणारा हा पाऊस मुख्यत्वे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. २७ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल.

👉२८ एप्रिल रोजी विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल. २९ आणि ३० एप्रिल रोजी संपुर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर दुसरीकडे कोरोनाचा कहर सुरु असतानाच २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ बंगालच्या खाडीत उठण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

✅चक्रीवादळ मार्ग बदलण्याची शक्यता

👉अंदमानाच्या समुद्रात २७ एप्रिल रोजी चक्रीवादळाची चिन्हे दिसण्याची शक्यता आहे. २४ तासांत येथे निर्माण झालेल्या चक्रवाताचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरण होईल. आणि यास हवामान पूरक असल्याने २९ ते ३० एप्रिल या काळत कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर आणखी वाढेल. आणि १ मे रोजी २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ अंदमानच्या समुद्राच्या उत्तर भागावर निर्माण होईल.

👉याचा परिणाम म्हणून अंदमान, निकोबार येथे वेगाने वारे वाहतील. पाऊस कोसळेल. हे चक्रीवादळ पुढे सरकत बंगालच्या खाडीवर येईल. भारताच्या किनारी येईपर्यंत चक्रीवादळाचा जोर आणखी वाढेल. मात्र आतापर्यंत मिळलेल्या संकेतानुसार, चक्रीवादळाचा मार्ग बदलण्याची शक्यता असून, हे चक्रीवादळ म्यानमार आणि बांग्लादेशच्या दिशेने रवाना होईल.

General knowledge

▪️ “माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
✍उत्तर : भालचंद्र मुणगेकर

▪️ भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोण आहे?
✍उत्तर : करण बाजवा

▪️ सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
✍उत्तर : लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड

▪️ कोणत्या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला?
✍उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✍उत्तर : तरुण विजय

▪️ ‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ कुणाला देण्यात आला?
✍उत्तर : प्राची साळवे

▪️ ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये कोणत्या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे?
✍उत्तर : नागरी उड्डयण महासंचालनालय आणि नागरी उड्डयण सुरक्षा विभाग

▪️ कोणत्या ठिकाणी ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ आयोजित करण्याचे नियोजित आहे?
✍उत्तर : टोकियो, जापान

▪️ “आफ्रिकन लायन” हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे?
✍उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को

▪️ कोणत्या ठिकाणांदरम्यान नवी सागरी रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे?
✍उत्तर : मुंबई आणि मांडवा

इतिहास प्रश्नसंच

🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान
B. बॅ. महमद अली जीना
C. मौलाना अब्दुल करीम आझाद
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

__________________________
🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत
__________________________
⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873
B. 10 ऑक्टोबर, 1873
C. 14 सप्टेंबर, 1873 ✅
D. 15 ऑगस्ट, 1873
__________________________
🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅
B. विरेंद्रकुमार घोष
C. अरविंदो घोष
D. हेमचंद्र दास

🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले
B. गणेश वासुदेव जोशी
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. जगन्नाथ शंकर शेठ✅
__________________________
🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार☑️
B) भारत आणि नेपाळ
C) भारत आणि बांग्लादेश
D) भारत आणि थायलँड

🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
__________________________
🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113

__________________________
🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही
__________________________
🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी
__________________________
⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी
__________________________
🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी
2)दोडाबेटा✅✅
3) अन्ना मलाई
4) उदकमडलम
__________________________
🟡 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

__________________________

चालू घडामोडी प्रश्नसंच

📕 कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?

(A) हैदराबाद✅✅
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) बंगळुरू

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?

(A) बियास नदी
(B) रावी नदी✅✅
(C) चिनाब नदी
(D) झेलम नदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📘 वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?

(A) अल्जेरिया
(B) ट्युनिशिया
(C) लिबिया
(D) लेबनॉन✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?

(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस✅✅
(B) फ्लिपकार्ट
(C) पेटीएम
(D) इन्फोसिस

📘 कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?

(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तराखंड✅✅
(D) हरयाणा

अंकगणित प्रश्नसंच

◾️पाच निकालांची सरासरी 46 गुण आहे. आणी पहिल्या चार निकालांची 45 गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?

A)  50✅

B)  1

C)  10

D) 12.5

◾️एका 150 मी. लांब आगगाडीला 450 मी. लांबीचा प्लैट फॉर्म-चे अंतर पार करण्या करिता 20 सेंकद लागतात-तर त्या आगगाडीची गती मी/से. किती ?

A)  30 मी/से. ✅

B) 96 मी/से.

C) 22.5 मी/से.

D)  45 मी/से.

◾️खालील अंक मालिकेत कोणता अंक योग्य ठरु शकत नाही ?

2, 3, 6, 15, 45, 135, 630

A) 6

B) 15

C)  2✅

D) 45

◾️जर CANCELLED = 27 आणि POSTPONEMENT = 36 तर REVIVE = ?

A) 6

B) 12

C) 15

D) 18✅

◾️दिलेल्या शब्दात अक्षरांची अदलाबदल करून योग्य शब्द तयार होतो. तयार होणा-या शब्द गटातून विसंगत शब्दगट निवडा.

NVESU, TERAH, NOMO, RASM

A) NVESU

B) TERAH

C) NOMO✅

D)  RASM

◾️जर LONDON लिहितांना HPOEPO असे लिहीत असु तर DVOHSZ काय दर्शविते ?

A)  MEXICO

B) ISLAND

C) HOLAND

D)  HUNGRY✅

◾️समजा मुंबई ने नागपूर हे अंतर 750 कि.मी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 कि.मी. व 55 कि.मी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील ?

A) दु. 2.30 वाजता

B) सकाळी 4.15 वाजता

C)  दु. 3.00 वाजता✅

D) दु. 2.45 वाजता

◾️जर दोन संख्याचा गुणाकार 53125 व म.सा.वि 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?

A) 425

B) 625

C) 75

D) 125✅

◾️एकाच कुटुंबात 4 सदस्य आहेत त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुली पेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलीचे वय काय असेल ?

A) 18 वर्षे

B) 15 वर्षे✅

C)  11 वर्षे

D) 23 वर्षे

◾️खालील दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गाची वजाबाकी 273 येते व त्या संख्यांची बेरीज 39 येते तर त्या संख्या कोणत्या ?

A)  24, 15

B) 23, 16✅

C)  22, 17

D) 20, 19

◾️अमृताने कर्जाऊ घेतलेली रक्कम दोन वर्षानंतर परत केली. तिने एकूण २२०५० रु. परत केले तर चक्रवाढ व्याजाचा दर ५% असेल तर कर्जाऊ घेतलेली रक्कम किती ?

A) १२००० रु

B) १५००० रु

C) २०००० रु✅

D) ५०००० रु

◾️एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनविल्या त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्याचा क्रमांक १५ वा येतो तर एकूण आंबे किती ?

A) २२५

B) ८४१✅

C) २५६

D) २४०



अमेरिकन कला-विज्ञान अकादमीवर भारतीय वंशाच्या रेणू खटोर

- अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्य़ूस्टन सिस्टीमच्या कुलगुरू रेणू खटोर यांची अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. खटोर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे मानले जाते.

- खटोर (५१) या आता अकादमीच्या अडीचशे प्रतिष्ठित सदस्यांपैकी एक असणार आहेत. या अकादमीत साहित्यिक, वैज्ञानिक, स्वयंसेवी संस्था, खासगी क्षेत्र, शिक्षण या क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. खटोर यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. त्या भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी पहिल्या महिला कुलगुरू असून अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पहिल्या स्थलांतरित प्रमुख आहेत.

- खटोर या २००८ पासून कुलगुरू आहेत व त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केल्याने अकादमीवर निवडण्यात आले आहे.

- खटोर यांनी कानपूर विद्यापीठातून पदवी घेतली असून राज्यशास्त्र व लोकप्रशासनात त्यांनी परडय़ू विद्यापीठातून पीएचडी केली आहे. ह्य़ूस्टन विद्यापीठाच्या चार संस्थांचा कारभार त्या पाहत असून एकूण ७१ हजार विद्यार्थी तेथे शिकतात.

- अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यांमध्ये २५० नोबेल व पुलित्झर मानक ऱ्यांचा समावेश आहे.

- या अकादमीची स्थापना १७८० मध्ये झाली असून जॉन अ‍ॅडम्स, जॉन हॅनकॉक यांच्यासह साठ विद्वानांच्या पुढाकारातून ती आकारास आली.

- ‘हा तर विद्यापीठाचा सन्मान!’
अमेरिकी कला व विज्ञान अकादमीकडून मिळालेल्या या सन्मानाने आपण समाधानी असून ह्य़ूस्टन विद्यापीठाचा हा सन्मान आहे. मला यात नेतृत्व कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे, असे मत खटोर यांनी व्यक्त केले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Latest post

2025 चालू घडामोडी

1) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भालाफेकपटू कोण ठरला आहे ? ✅ नीरज चोप्रा 2) नीरज चोप्रा किती गुणसंख्या...