२७ एप्रिल २०२०

इतिहास प्रश्नसंच

🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान
B. बॅ. महमद अली जीना
C. मौलाना अब्दुल करीम आझाद
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

__________________________
🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत
__________________________
⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873
B. 10 ऑक्टोबर, 1873
C. 14 सप्टेंबर, 1873 ✅
D. 15 ऑगस्ट, 1873
__________________________
🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅
B. विरेंद्रकुमार घोष
C. अरविंदो घोष
D. हेमचंद्र दास

🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले
B. गणेश वासुदेव जोशी
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. जगन्नाथ शंकर शेठ✅
__________________________
🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार☑️
B) भारत आणि नेपाळ
C) भारत आणि बांग्लादेश
D) भारत आणि थायलँड

🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
__________________________
🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113

__________________________
🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही
__________________________
🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी
__________________________
⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी
__________________________
🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी
2)दोडाबेटा✅✅
3) अन्ना मलाई
4) उदकमडलम
__________________________
🟡 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

__________________________

चालू घडामोडी प्रश्नसंच

📕 कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?

(A) हैदराबाद✅✅
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) बंगळुरू

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?

(A) बियास नदी
(B) रावी नदी✅✅
(C) चिनाब नदी
(D) झेलम नदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📘 वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?

(A) अल्जेरिया
(B) ट्युनिशिया
(C) लिबिया
(D) लेबनॉन✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?

(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस✅✅
(B) फ्लिपकार्ट
(C) पेटीएम
(D) इन्फोसिस

📘 कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?

(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तराखंड✅✅
(D) हरयाणा

अंकगणित प्रश्नसंच

◾️पाच निकालांची सरासरी 46 गुण आहे. आणी पहिल्या चार निकालांची 45 गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?

A)  50✅

B)  1

C)  10

D) 12.5

◾️एका 150 मी. लांब आगगाडीला 450 मी. लांबीचा प्लैट फॉर्म-चे अंतर पार करण्या करिता 20 सेंकद लागतात-तर त्या आगगाडीची गती मी/से. किती ?

A)  30 मी/से. ✅

B) 96 मी/से.

C) 22.5 मी/से.

D)  45 मी/से.

◾️खालील अंक मालिकेत कोणता अंक योग्य ठरु शकत नाही ?

2, 3, 6, 15, 45, 135, 630

A) 6

B) 15

C)  2✅

D) 45

◾️जर CANCELLED = 27 आणि POSTPONEMENT = 36 तर REVIVE = ?

A) 6

B) 12

C) 15

D) 18✅

◾️दिलेल्या शब्दात अक्षरांची अदलाबदल करून योग्य शब्द तयार होतो. तयार होणा-या शब्द गटातून विसंगत शब्दगट निवडा.

NVESU, TERAH, NOMO, RASM

A) NVESU

B) TERAH

C) NOMO✅

D)  RASM

◾️जर LONDON लिहितांना HPOEPO असे लिहीत असु तर DVOHSZ काय दर्शविते ?

A)  MEXICO

B) ISLAND

C) HOLAND

D)  HUNGRY✅

◾️समजा मुंबई ने नागपूर हे अंतर 750 कि.मी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 कि.मी. व 55 कि.मी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील ?

A) दु. 2.30 वाजता

B) सकाळी 4.15 वाजता

C)  दु. 3.00 वाजता✅

D) दु. 2.45 वाजता

◾️जर दोन संख्याचा गुणाकार 53125 व म.सा.वि 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?

A) 425

B) 625

C) 75

D) 125✅

◾️एकाच कुटुंबात 4 सदस्य आहेत त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुली पेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलीचे वय काय असेल ?

A) 18 वर्षे

B) 15 वर्षे✅

C)  11 वर्षे

D) 23 वर्षे

◾️खालील दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गाची वजाबाकी 273 येते व त्या संख्यांची बेरीज 39 येते तर त्या संख्या कोणत्या ?

A)  24, 15

B) 23, 16✅

C)  22, 17

D) 20, 19

◾️अमृताने कर्जाऊ घेतलेली रक्कम दोन वर्षानंतर परत केली. तिने एकूण २२०५० रु. परत केले तर चक्रवाढ व्याजाचा दर ५% असेल तर कर्जाऊ घेतलेली रक्कम किती ?

A) १२००० रु

B) १५००० रु

C) २०००० रु✅

D) ५०००० रु

◾️एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनविल्या त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्याचा क्रमांक १५ वा येतो तर एकूण आंबे किती ?

A) २२५

B) ८४१✅

C) २५६

D) २४०



अमेरिकन कला-विज्ञान अकादमीवर भारतीय वंशाच्या रेणू खटोर

- अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्य़ूस्टन सिस्टीमच्या कुलगुरू रेणू खटोर यांची अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. खटोर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे मानले जाते.

- खटोर (५१) या आता अकादमीच्या अडीचशे प्रतिष्ठित सदस्यांपैकी एक असणार आहेत. या अकादमीत साहित्यिक, वैज्ञानिक, स्वयंसेवी संस्था, खासगी क्षेत्र, शिक्षण या क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. खटोर यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. त्या भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी पहिल्या महिला कुलगुरू असून अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पहिल्या स्थलांतरित प्रमुख आहेत.

- खटोर या २००८ पासून कुलगुरू आहेत व त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केल्याने अकादमीवर निवडण्यात आले आहे.

- खटोर यांनी कानपूर विद्यापीठातून पदवी घेतली असून राज्यशास्त्र व लोकप्रशासनात त्यांनी परडय़ू विद्यापीठातून पीएचडी केली आहे. ह्य़ूस्टन विद्यापीठाच्या चार संस्थांचा कारभार त्या पाहत असून एकूण ७१ हजार विद्यार्थी तेथे शिकतात.

- अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यांमध्ये २५० नोबेल व पुलित्झर मानक ऱ्यांचा समावेश आहे.

- या अकादमीची स्थापना १७८० मध्ये झाली असून जॉन अ‍ॅडम्स, जॉन हॅनकॉक यांच्यासह साठ विद्वानांच्या पुढाकारातून ती आकारास आली.

- ‘हा तर विद्यापीठाचा सन्मान!’
अमेरिकी कला व विज्ञान अकादमीकडून मिळालेल्या या सन्मानाने आपण समाधानी असून ह्य़ूस्टन विद्यापीठाचा हा सन्मान आहे. मला यात नेतृत्व कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे, असे मत खटोर यांनी व्यक्त केले.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

भारतातलं प्रदूषण 20 वर्षांतील नीचांकी पातळीवर.

🔲 करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

🔲 करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने करोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह इतर अनेक देश लॉकडाउन आहेत.तर अशा स्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये, किराणा मालाची दुकाने अशी काही मोजकी आस्थापनेच सुरू आहेत.

🔲 मोठे-मोठे कारखाने, उद्योगधंदे बंद आहेत.तसेच बहुतांश लोक वर्क फ्रॉम होमचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यामुळे कार आणि इतर वाहनांमुळे होणारे प्रदुषणदेखील खूप कमी झाले आहे.

🔲 अशातच भारतासाठी एक अत्यंत चांगली बातमी आली आहे. भारतातील प्रदूषण हे 20 वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर असल्याचे अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने अहवालात म्हटले आहे.

🔲 अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या उपग्रहाची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात, उत्तर भारतातील वायू प्रदूषण हे विविध वर्षांतील या कालावधीत प्रदुषणापेक्षा यंदाचे प्रदुषण हे 20 वर्षातील नीचांकी पातळीवर असल्याचे नमूद केले आहे.

🔲 करोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या उपग्रहाने सेन्सर्सच्या सहाय्याने सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात भारतात 20 वर्षातील सर्वात कमी एरोसोलची पातळी लॉकडाउननंतर आढळली.

​​"जागतिक लसीकरण आठवडा”: 24 एप्रिल ते 30 एप्रिल


📌 “व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल” या संकल्पनेखाली जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत "जागतिक लसीकरण आठवडा” पाळला जात आहे.

📌 जगभरातल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि समुदायांसाठी असलेल्या लसीचे महत्त्व दर्शविणे ही यावर्षीच्या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. मोहिमेच्या माध्यमातून लसीकरणात गुंतवणूक वाढवून त्याच्या प्रमाणात वाढ करणे आणि त्यामधली तफावत कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

▪️पार्श्वभूमी

📌 2012 साली मे महिन्यात स्वीकारलेली जागतिक लस कृती योजना (GVAP) जागतिक आरोग्य संघटनेच्या 194 सदस्य राज्यांमध्ये अंमलात आणली जात आहे. GVAP योजना लसीकरणाला जगभरात प्रवेश देऊन वर्ष 2020 पर्यंत लस-प्रतिबंधात्मक रोगांपासून लक्षावधी मृत्युला आळा घालण्याच्या उद्देशाने आहे.

📌 या मोहिमेचे मुख्य ध्येय म्हणजे जीवनात संपूर्ण लसीकरणाच्या महत्त्वासंदर्भात आणि 2030 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात भूमिकेविषयी जनजागृती निर्माण करणे हे आहे.

▪️हा आठवडा का महत्त्वाचा आहे?

📌 जगभरात सर्व वयोगटातल्या लोकांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लस वापरली जाते. लसीकरण हा जगातला सर्वात यशस्वी कार्यक्रम आहे. आज देखील जगात लसीकरणापासून वंचित जवळपास 20 दशलक्ष मुले आहेत. मात्र अजूनही, गोवर, रूबेला आणि माता आणि धनुर्वात अश्या रोगांच्या बाबतीत लक्ष्य पूर्ण करण्यास जग मागे आहे.

📌 त्याउलट, ज्या देशांनी उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रगती केली आहे किंवा पुढे चालू ठेवलेली आहे, त्यांना त्या प्रयत्नांना टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

📌 लसीकरणाच्या अंतर्गत 25 विविध संक्रामक घटक किंवा आजारांपासून संरक्षण दिले जाते. 2012 साली झालेल्या WHO च्या जागतिक आरोग्य सभेच्या बैठकीदरम्यान जागतिक लसीकरण आठवडा पाळण्याला मान्यता दिली गेली.

चंद्राचा Digital Map तयार.

🔰अमेरिकन जिऑलॉजिकल सर्वे, नासा आणि ल्यूनर प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट यांनी गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे.त्याचा उपयोग पुढील चांद्रयान मोहिमा यशस्वी करण्यासाठी होणार आहे.

🔰अमेरिकेततर्फे येत्या 2024 चंद्रावर माणूस पाठविला जाणार असून या मोहिमेसाठी सुद्धा यामुळे आपला चांगलाच उपयोग करता येणार आहे, असे खगोल अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे यांनी सांगितले.

🔰मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा अपोलो मोहिमा, अमेरिकेचा एल आरओ टॉपोग्राफी अभ्यास ,जपानची कायुगा मोहीम अशा चंद्रावरील विविध मोहिमांतमधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे.

🔰तसेच दहा वर्षांपासून मॅप तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या 51 व्या ल्यूनर प्लॅनेटरी सायन्स काँग्रेस मध्ये चंद्राच्या डिजिटल मॅप ची माहिती दाखविली राहणार आहे, असे अमेरिकन जिऑलॉजिकल सवेर्चे संचालक जीम रॅली यांनी नुकतेच सांगितले.

Police bharti question set

*MTDC चा अर्थ काय?*

A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही

*महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.*

A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही

*पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात  आहे.*

A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅

*भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?*

A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११

*भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?*

A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य

*भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?*

A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच

*मानवामध्ये  गुणसूत्रे असतात.*

A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२

*भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?*

A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅

*‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.*

A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात

*आम्ल पदार्थाची चव कशी असते?*

A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड

*नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)  ठिकाणी स्थित आहे.*

A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर

*आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?*

A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल

*भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?*

A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर

*I.S.I. हि गुप्तहेर संघटना  देशाची आहे?*

A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया

*अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च*

A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन

*‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?*

A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅

*‘नांगर चषक’  खेळाशी संबधित आहे.*

A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅

*भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?*

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर

*अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?*

A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅

*‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*

A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे

*कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?*

A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅

*हिटलरच्या  आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.*

A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा

*‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*

A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे

*‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र  यांचे आहे.*

A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट

*क्रेमलिन हे प्रमुख स्थळ  ठिकाणी आहे?*

A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅

२६ एप्रिल २०२०

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.


◾️ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️ केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद  संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब   संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा- लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).

संसर्गजन्य रोग कायदा 1897

- सुधारणा अध्यादेश 2020
- 22 एप्रिल 2020 केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी
- 23 एप्रिल 2020 राष्ट्रपती मंजुरी

- Violence_हिंसा- छळवणूक/उतपीडन, शारीरिक हानी/अपाय,मालमत्ता नुकसान.
- आरोग्य सेवक डॉक्टर, नर्स, आशा वर्कर्स इत्यादी
- गुन्हा स्वरूप- दखलपात्र, अजामीनपात्र
- शिक्षा - 3 महिने ते 5 वर्ष व 50 हजार ते 2 लाख आणि गंभीर गुन्ह्यात 6 महिने ते 7 वर्ष व 1 लाख ते 5 लाख
- आरोग्य मालमत्ता,गाड्या नुकसान केल्यास झालेले नुकसान बाजार भावच्या दुप्पट वसूल करण्यात येतील
- महाराष्ट्रात कोरोना मुळे 13 मार्च 2020 पासून संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा 1897  लागू

२५ एप्रिल २०२०

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ लांबणीवर जाण्याची शक्यता.

🌿केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

🌿पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीच्या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

🌿गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करून तो १७ वरून २१ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारला मिळणाऱ्या महसूलाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्णय लाबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती एनडीटीव्हीला सूत्रांकडून देण्यात आली.

पश्चिम रेल्वेने बनविले इनट्यूबेशन बॉक्स.

🌺कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार करण्यासाठी रेल्वे प्रशासन आयसोलेशन कक्ष तयार करत आहे. यासह मास्क, सॅनिटायझर, नॉन-कॉन्टॅक्ट वाटर कॅप बनवित आहे.

🌺त्याप्रमाणे आता पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी इनटयूबेशन बॉक्स तयार केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार करताना सुरक्षितता बाळगण्यासाठी या बॉक्सचा वापर केला जातो.तर रुग्णांच्या डोक्याकडील भाग या बॉक्समध्ये टाकण्यासाठी वक्रकार आकार आहे. या बॉक्सला दोन होल आहेत. या होलातून वैद्यकीय कर्मचारी हात घालून उपचार करू शकतो.

🌺परिणामी, रुग्णाची तपासणी करताना, व्हेंटिलेटर लावताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा थेट संबंध या बॉक्समुळे टाळता येणार आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येणे शक्य होणार होणार आहे. या बॉक्सचा आकार 30 बाय 24 बाय 20 असा आहे. हा बॉक्स पारदर्शी असून 2 ते 3 किग्रचा आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज:आतापर्यंतची प्रगती..

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💢प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 33 कोटीहून अधिक गरीबांना 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली.

💢20.05 महिला जनधन खातेधारकांना   10,025 कोटी रुपये वितरित केले.

💢सुमारे 2.82 कोटी वृद्ध व्यक्ती, विधवा आणि अपंग व्यक्तींना 1405 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले.

💢पंतप्रधान-किसानचा पहिला हप्ता: 8 कोटी शेतकर्‍यांना 16,146 कोटी रुपये हस्तांतरित.

💢ईपीएफ योगदानाच्या रुपात 68,775 आस्थापनांमध्ये 162 कोटी रुपयांचे हस्तांतरण, 10.6 लाख कर्मचार्‍यांना लाभ;

💢2.17 कोटी इमारत बांधकाम कामगारांना 3497 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली.

💢प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

💢39.27 कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्यांचे मोफत रेशन वाटप केले.

💢1,09,227 मेट्रिक टन डाळी  विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या

💢प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: 2.66 कोटी मोफत उज्वला सिलिंडर वितरित.

💢कोविड -१९ मुळे घोषित लॉकडाऊनच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी.

💢 केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन 26 मार्च 2020 रोजी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) अंतर्गत 33 कोटीहून अधिक गरीब लोकांना डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करून 22 एप्रिल 2020 पर्यंत 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट देण्यात आली.

💢पीएमजीकेपीचा एक भाग म्हणून, सरकारने महिला आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य आणि रोख रक्कम जाहीर केली. या पॅकेजच्या वेगवान अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. 

💢अर्थ मंत्रालय, संबंधित मंत्रालये, कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालय लॉकडाउनच्या अनुषंगाने गरजूंपर्यंत मदतपर उपाययोजना त्वरित पोहचवण्यासाठी कुठलीही कसर सोडत नाही.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 22 एप्रिल 2020 पर्यंत  पुढील आर्थिक सहाय्य (रोख रक्कम) लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.

इराणचा पहिला लष्करी उपग्रह "नूर" अवकाशात.

🅾अमेरिकेने निर्बंध लादल्याने दोन्ही देशात तणाव असतानाच इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली आहे.

🅾तर गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत इराणने वेळोवेळी दिले आहेत. दरम्यान हा उपग्रह सोडण्यात आल्याची खातरजमा इतर मार्गाने होऊ शकलेली नाही.

🅾रेव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की, आम्ही लष्करी उपग्रह सोडला असून त्याचे नाव ‘नूर’असे आहे.तसेच इराणने जो उपग्रह सोडला आहे तो 425 कि.मी उंचीवरील कक्षेत असून इराणने सोडलेला तो पहिलाच लष्करी उपग्रह आहे.

🅾इराणमधील शाररौद येथील तळावरून हा उपग्रह सोडण्यात आला असून हा तळ सिमनान प्रांतात  आहे. द्रव व घन इंधनावर चालणाऱ्या मेसेंजर प्रक्षेपकाच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला.

सूर्यप्रकाशात करोना विषाणू नष्ट होतात, अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा.


🌺करोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे.

🌺मात्र हा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे. यामुळे उन्हाळ्यात करोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे”.

🌺“आतापर्यंतचा सर्वात मोठं निरीक्षण करताना सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचं लक्षात आलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. “तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. तापमान आणि आर्द्रता वाढवणं करोनाच्या विषाणूंसाठी कमी अनुकूल आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

🌺मात्र अद्याप हा रिसर्च सार्वजनिक करण्यात आलेला नाही. समिक्षा करण्यासाठी हा रिसर्च पाठवण्यात येणार आहे. यानंतरच तज्ज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील.

🌺अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे. तसंच प्रयोग करताना अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता आणि तरंगलांबी कितपत ठेवण्यात आली होती, हा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला करण्यात आला आहे. “प्रयोग कसा करण्यात आला आणि निकालाचे निकष काय होते हे पहावं लागेल,” असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...