२५ एप्रिल २०२०

करोना’चा शिरकाव न झालेलं देशातील एकमेव राज्य, पर्यटकांना ऑक्टोबरपर्यंत ‘नो एंट्री’

🅾 करोना व्हायरसविरोधातील लढाईत सिक्किम सरकारने ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे करोना व्हायरसला अद्यापही सिक्किममध्ये शिरकाव करता आलेला नाही.

🅾सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य असं आहे जिथं अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. सात लाख लोकसंख्या असलेल्या हिमालयातल्या छोट्या राज्यात करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पर्यटकांसाठी ऑक्टोबरपर्यंत सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सिक्किम प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सिक्किमशिवाय नागालँडमध्येही सध्या एकही करोनाबाधित नाही. नागालँडमध्ये एकाला करोनाची लागण झाली होती. पण एकमेव रुग्ण असल्याने त्यालाही आसाममध्ये नेण्यात आले. त्यामुळे आता नागालँडमध्येही करोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आहे.

🅾सिक्किममध्ये करोनाचा फैलाव झाला नसल्याची माहिती देताना, देशात जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनची घोषणा होण्याआधी म्हणजे 17 मार्च रोजीच राज्यात लॉकडाउन जाहीर केले होते, असे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. “देशात जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनची घोषणा होण्याआधी म्हणजे 17 मार्च रोजीच राज्यात लॉकडाउन जाहीर केले होते. सिक्किमचे अनेक विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण घेतात. पण, ते सर्व जानेवारीमध्येच परतले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. करोनाची लागण नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच त्यांना घरी परत पाठवलं.” 

करोना व्हायरस मानवनिर्मित; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा दावा

🅾सध्या करोनानं जगभरात थैमान घातलं आहे. सर्वच देश करोनाशी लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी यांसारख्या देशांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यातच चीन आणि अमेरिका हे देश एकमेकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी एक खबळजनक दावा केला आहे. करोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

🅾फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी करोना व्हायरस हा मानवनिर्मित असल्याचा दावा खबळजनक दावा केला आहे. त्यांनी केलेला दावा नक्कीच हैराण करणारा आहे. परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर संपूर्ण कल्पना येऊ शकते. कोविड-१९मध्ये एचआयव्हीचे एलिमेंट सापडले आहेत. तसंच त्यात मलेरियाचेही काही एलिमेंट सापडले असल्याचे ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी सांगितलं. यावरून हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचं सिद्ध होतं. तसंच या व्हायरसचा जन्म प्रयोगशाळेत करण्यात आला असून तो मानवनिर्मित व्हायरस आहे, असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्समधील सीन्यूझ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

🅾एड्सच्या प्रसार करणाऱ्या व्हायरसवर लस तयार करण्याच्या निमित्तानं हा घातक व्हायरस तयार करण्यात आल्याचं ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं. यामुळेच करोना व्हायरसच्या जिनोममध्ये एचआयव्हीचे काही एलिमेंट्स सापडले आहेत. याव्यतिरिक्त त्यात मलेरियाचेही काही एलिमेंट्स असण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.

ग्रेगरी मार्ग्युलिस आणि हिलेल फर्स्टेनबर्ग यांना 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर.

📌 अमेरिकेचे गणितज्ञ ग्रेगरी मार्ग्युलिस
📌 इस्त्राएलचे गणितज्ञ हिलेल फर्स्टेनबर्ग

📌यांना संयुक्तपणे 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर झाला आहे.

📌ग्रेगरी मार्ग्युलिस अमेरिकेच्या येल विद्यापीठात कार्यरत आहेत आणि हिलेल फर्स्टेनबर्ग इस्त्राएलच्या जेरुसलेम विद्यापीठात कार्यरत आहेत.

📌त्यांची संख्या शास्त्र आणि कॉम्बिनेटोरिक्स याबाबतच्या सिद्धांतामध्ये दिलेल्या योगदानासाठी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

🟢 एबेल पारितोषिक विषयी :-

📌‘एबेल पारितोषिक’ हा गणित शास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार आहे.

📌हा पुरस्कार नॉर्वेजियन अकॅडेमी ऑफ सायन्स अँड लेट्टर्स या संस्थेकडून दिला जातो.

“ही तर सुरुवात आहे, खरा विनाश तर अजून दिसायचाय”; WHO चा धोक्याचा इशारा

🅾करोनाने जगभरात थैमान घातला असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून दिसायचाय असं सांगत धोक्याचा इशारा दिला आहे. करोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी यावेळी जगभरात जवळपास १ लाख ६६ हजारांहून जास्त जणांचा बळी घेणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव का वाढेल याचं कोणतंही ठाम कारण सांगितलं नाही.

🅾जागतिक आरोग्य संघटनेने अफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.  “आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय,” असं टेड्रोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “हे संकट रोखायला हवं. हा एक व्हायरस आहे जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही,” असंही ते बोलले आहेत.

🅾आशिया आणि युरोपातील काही देशांनी करोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. यामुळे शाळा, उद्योग सुरु करण्यात आले असून सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी उठवण्यात आली आहे. तसंच क्वारंटाइन होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

इतिहास प्रश्नसंच

🔴 ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?

1⃣ लॉर्ड कॅनिंग
2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅
3⃣ लॉर्ड कर्झन
4⃣ लॉर्ड माउंटबॅटन
__________________________________
🟠 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम
2⃣ एम. ए. जिन्ना
3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅
4⃣ रहीमतुल्ला एम सयानी
__________________________________

🟡 पुढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते
दिल्ली येथे स्थानांतरित झाली?

1⃣ 1911✅✅✅
2⃣ 1857
3⃣ 1905
4⃣ 1919

__________________________________
🔵 खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?

1⃣ चौरी चौरा - 1922
2⃣ भारत सोडा - 1942
3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅
4⃣ बंगालचे विभाजन - 1905

__________________________________
🟣 भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?

1⃣ जवाहरलाल नेहरू
2⃣ राजेंद्र प्रसाद
3⃣ सी राजगोपालाचारी
4⃣ जे.बी.कृपलानी✅✅✅

__________________________________

“तियानवेन 1”: चीनची पहिली मंगळ मोहीम

- चीन देशाने मंगळावर मानवरहित उपग्रह पाठविण्याची योजना तयार केली आहे. पुढील वर्षी प्रत्यक्षात येणाऱ्या चीनच्या मंगळ मोहिमेचे नाव 'तियानवेन 1' असे आहे. 'चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

- चीनचे प्रसिद्ध कवी क्व युआन यांच्या कवितेवरून 'तियानवेन' असे नाव देण्यात आले आहे. 'स्वर्गाला विचारलेले प्रश्न' असा तियानवेन या चीनी शब्दाचा अर्थ आहे. मंगळ मोहिमेची आखणी करताना या कवितेच्या संदर्भाने मोहिमेला नाव देण्यात आले आहे.

- भारत, अमेरिका, रशिया आदी देशांनंतर आता चीनची मंगळ मोहीम चालवली जाणार आहे.

- चीनने आपला पहिला उपग्रह 'डाँग फेंग हों-1' अवकाशात पाठवला त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही घोषणा करण्यात आली आहे. हा दिवस चीनकडून 'अंतराळ दिन' म्हणून साजरा केला जातो.

▪️ ग्रह

- मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला ‘तांबडा ग्रह’ असे सुद्धा म्हटले जाते. आयर्न ऑक्साइडमुळे ग्रहाला तांबडा रंग मिळाला आहे.

- हा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे.

-  सूर्यमालेतला आतापर्यंतचा सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स (उंची: 26.4 किलोमीटर) तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळ ग्रहावर आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.

- मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 23 कोटी किमी (1.5 खगोलशास्त्रीय एकक) असून त्याचा परिभ्रमण काळ पृथ्वीवरील सुमारे 687 दिवस इतका आहे. मंगळावरील एक सौर दिवस 24 तास, 39 मिनिटे व 35.244 सेकंद इतका भरतो.

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच


1] खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.

A) बालदिन - १४ नोव्हेंबर

B)  कामगार दिन -१ मे

C)  शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✔️

D)  बालिका दिन -३ जानेवारी

=========================

2] छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?

A)  तुकाराम - एकनाथ

B) रामदास -तुकाराम✔️

C) तुकाराम - नामदेव

D) रामदास - एकनाथ

=========================

3] शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?

A)  सर्वनाम

B)  नाम✔️

C) क्रियापद

D) विशेषण

=========================

4] मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.

A)  फक्त दिवस

B)  डोपरी किंवा पहाटे

C)  फक्त रात्री✔️

D) दिवस किंवा रात्री

=========================

5] खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:

३८ , २९ , २२ , ? , १४ , १३

A)  १८

B) १६

C)  १७✔️

D)  १९

=========================

6] अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.

सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?

A) १४

B)  ८

C)  ७✔️

D) ११

=========================

7] ३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?

A)  ९२०✔️

B)  २३०

C) ११५

D)  ६९०

=========================

8]    यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर

A) संत गाडगेबाबा✔️

B) संत तुकाराम

C)  संत चोखामेळा

D)  संत शेख महंमद

=========================
9] बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?

A) स्वदेशी आंदोलन

B)  चोरीचौरा आंदोलन

C) फोडा आणि तोडा आंदोलन

D)  बंग - भंग आंदोलन✔️

=========================

10] खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?

A) ५/६

B) ३/५

C) ७/९

D)  ४/७✔️

=========================

🔳धवलक्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?

A)  रेशीम उत्पादन

B)  दुध उत्पादन✅

C)  अंडी उत्पादन

D) कापूस उत्पादन

🔳एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने ८ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी १२ तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल .

A) ४ तास ४८ मिनिट✅

B)  ४ तास ३० मिनिट

C) ४ तास ५८ मिनिट

D) यापैकी नाही

🔳१५  मीटर  लांब व ४ मीटर रुंद अशा जमिनीवर २०cm X २०cm  आकाराच्या फरशा बसविल्या प्रत्येक फरशी बसविण्याच्या खर्च ४८ रुपये असून एक फरशी २५० रुपये किमतीची आहे, तर एकूण खर्च सांगा .

A)  ४१७०००

B)  ४४७०००✅

C) ४३७०००

D)  ४२७००

🔳६ गायी व ४ बैल यांची किंमत सारखीच येते. जर १० गायी व १२ बैल मिळून एकूण किंमत ८४००० रु. येते तर प्रत्येक बैलाची किंमत किती ?

A) ३५०० रु.

B)  ४००० रु.

C)  ४२०० रु.

D)  ४५०० रु.✅

🔳तीन संख्यांची सरासरी १८ आहे व त्यांचे गुणोत्तर २:३:४ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती  ?

A)  १०

B) १४

C) १२✅

D) १६

🔳पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

A)  नाविन्य✅

B)  प्रतीक्षागृह

C)  परीक्षा

D) अध्यात्मिक

🔳ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?

A) क्लाउड कॉम्प्यूटींग

B) क्लाउड कंट्रोल

C)  क्लाउड इंजिनिअरिंग

D)  क्लाउड सिंडीग✅

🔳अजर म्हणजे’ –

A) जो कधी 'जर' म्हणत नाही असा

B) ज्यास कधी म्हतारापण येत नाही असा✅

C) जो नेहमीच जर-तर भाषा वापरतो असा

D)  जो कधी नश पावत नाही असा

🔳‘फासा पडेल तो डाव सजा बोलेल टो न्याय’ -या अर्थच्या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा.

A)  पळणाऱ्यास एक वाट आणि शोधणाऱ्यास बारा वाटा

B)  ऐकावे जनाचे करावे मनाचे✅

C)  पिंडी ते ब्रम्हांडी

D) बडा घर पोकळ वासा

🔳खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा.

A) अनल-विस्तव, पावक-अग्नि, वन्ही

B) घर-सदन, भवन, गृह, आलय

C) अमृत-सुधा, पियुष, रस, चिरंजीवी✅

D) चंद्र-इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी

उन्हाळ्यात करोनाला लगाम!

- सूर्यप्रकाश, उष्णता, आद्र्रता यामुळे करोनाचा विषाणू टिकाव धरू शकत नाही, असे मेरीलँड येथील बायोडिफेन्स अँड काउंटर मेजर यासंस्थने संशोधनाअंती म्हटले असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनातील आरोग्यविषयक अधिकारी बिल ब्रायन दिली आहे.

- या संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार सूर्यप्रकाशात करोनाचा विषाणू टिकू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते अतिनील किरणही या विषाणूला मारू शकतात त्यामुळे उन्हाळ्यात हा विषाणू पसरण्याची शक्यता कमी आहे. भारतात कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने करोनाला अटकाव होण्याची आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. पृष्ठभागावरचे व हवेतील विषाणू सूर्यप्रकाशात मारले जातात. तपमान व आद्र्रतेचाही यात संबंध असतो.

- वाढते तपमान व आद्र्रता या दोन्ही गोष्टी करोनाला मारक असतात.
या शोधनिबंधची शहानिशा अजून तटस्थ तज्ञांकडून झाली नसल्याने तो जाहीर करण्यात आलेला नाही.
ब्रायन यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर जे सादरीकरण केले त्यात असे सांगितले गेले की, हा विषाणू २१ ते २४ अंश सेल्सियस किंवा त्यावरील तपमान व २० टक्के आद्र्रता असेल तर निम्मा होतो.

- थोडक्यात तो क्रियाशील राहत नाही. या तपमान व आद्र्रतेला तो दारांचे हँडल, पोलाद यावरही टिकत नाही. जेव्हा आद्र्रता ८० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल हा सहा तासांपर्यत खाली येतो म्हणजे तो सहा तासात निम्माच राहतो. हा विषाणू सूर्यप्रकाशात दोन मिनिटातच निष्क्रीय होतो. जेव्हा विषाणू हवेत असतो व तपमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर आद्र्रता २० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल एक तास असतो.

-  सूर्यप्रकाशात हवेत असलेला विषाणू ३० सेकंदात निष्क्रिय होतो. त्यामुळे उन्हाळ्यात विषाणूचा प्रसार कमी होतो असे ब्रायन यांनी म्हटले आहे. याचा अर्थ विषाणू नष्ट होतो म्हणजे सामाजिक अंतर पाळण्याची गरज नाही असा घेण्यात येऊ नये.

- भारतात पावसाळ्यात दक्षतेची गरज
शिव नाडर विद्यापाठीच्या गणित विभागाचे सहायक प्राध्यापक समित भट्टाचार्य यांनी सांगितले की, भारतात आता टाळेबंदी उठवल्यानंतर करोना विषाणूचा प्रसार रोखल्याचा आभास निर्माण होईल, त्याचा आलेखही स्थिर येईल, पण नंतर काही महिन्यांनी पुन्हा करोना पुन्हा सक्रिय होईल. आता काही आठवडे किंवा महिने करोना कमी झालेला दिसेल पण नंतर तो पुन्हा उसळी घेईल. सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत गेली असून ती काही काळ कमी दिसेल. आलेख स्थिर होइलही पण ती स्थिती फसवी असण्याचा धोका अधिक आहे.

- दुसऱ्या संसर्गाची लाट जुलै व ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते. बेंगळुरू येथील आयआयएससीचे प्राध्यापक राजेश सुदर्शन यांनी या मताशी सहमती दर्शवली.

कोविड-19 नमुने गोळा करण्यासाठी DRDOने विकसित केली फिरती प्रयोगशाळा

- हैद्राबादमधले ESIC रुग्णालय आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) रिसर्च सेंटर इमारत येथील संशोधकांनी एक मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी (MVRDL) विकसित केली आणि त्याला हैदराबादमध्ये तैनात केली आहे.

- 6 महिन्यांचा कालावधी आवश्यक असलेल्या फिरत्या जैव-सुरक्षा श्रेणी-2 आणि श्रेणी-3 प्रयोगशाळांची स्थापना 15 दिवसांच्या विक्रमी कालवधीत पूर्ण केली गेली आहे.

▪️ठळक वैशिष्ट्ये

- या चाचणी सुविधेत दिवसाला 1000 हून अधिक नमुन्यांची चाचणी होऊ शकते ज्यामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढाईत क्षमता अधिक वृद्धिंगत होणार.

- कोविड-19 ची जलदगतीने चाचणी आणि संबंधित संशोधन आणि विकास कामांना गती देणारी अशाप्रकारची ही पहिलीच फिरती सुविधा आहे.

- ही फिरती प्रयोगशाळा BSL 3 प्रयोगशाळा आणि BSL 2 प्रयोगशाळेचे संयोजन आहे जे उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यासाठी WHO आणि ICMR जैव सुरक्षा मानदंडांनुसार प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे.

-  या प्रणालीमध्ये विद्युत नियंत्रणे, लॅन, टेलिफोन केबलिंग आणि सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

संयुक्त राष्ट्रसंघ ‘इंग्रजी’ आणि ‘स्पॅनिश’ भाषा दिन: 23 एप्रिल


- दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘इंग्रजी भाषा दिन’ आणि ‘स्पॅनिश भाषा दिन’ पाळला जातो.

▪️पार्श्वभूमी

- संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे. या सहाही भाषांना समान रूपाने उपयोगात आणण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी प्रत्येकी एक दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत –

▪️अरबी (18 डिसेंबर)

▪️फ्रेंच (20 मार्च)

▪️चीनी (20 एप्रिल)

▪️इंग्रजी (23 एप्रिल)

▪️स्पॅनिश (23 एप्रिल)

▪️रशियन (6 जून)

- 23 एप्रिलला प्रसिद्ध विल्यम शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू झाला. तसेच प्रसिद्ध लेखक मिगुएल डी. सर्वेन्टेस यांची पुण्यतिथी आणि अनेक महान लेखकांची जयंती याच दिवशी येते.

-  त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी 2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक माहिती विभागाने भाषा दिनाची स्थापना केली.

- बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधता पाळणे तसेच संघटनेत सर्व सहा अधिकृत भाषेचा समान वापर होण्यास प्रोत्साहन देणे हा भाषा दिनाचा उद्देश आहे.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

चीन सीमेजवळ भारताचा नवा पूल, तोफांसह सैन्य वेगाने करु शकते कूच


- चीनच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेशमध्ये सुबानसिरी नदीवर बांधलेला पूल भारताने वाहतुकीसाठी खुला केला आहे. ४० टनापर्यंत भार पेलण्याची या पूलाची क्षमता आहे. त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत या पूलावरुन तोफा नेता येतील तसेच सैन्य तुकडयांची जलदगतीने तैनाती करणेही शक्य होणार आहे.

- या पूलावरुन पुढच्या काही दिवसात भारत आणि चीनमध्ये शाब्दीक वादावादी होऊ शकते. सीमा भाग हा भारत आणि चीनमध्ये नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. अरुणाचलमधील हा पूल आणि सीमा भागात रस्त्याच्या दर्जामध्ये झालेली सुधारणा यामुळे सैन्याला आता विनाखंड आवश्यक साहित्याचा पुरवठा सुरु राहिल. रणनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आहे.

- भारताने शेजारी देशातून होणाऱ्या एफडीआय गुंतवणूकीसंदर्भात नियम अधिक कठोर केल्याने चीन भारतावर नाराज आहे. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर चिनी उद्योगांना भारतीय कंपन्यांचे सहजपणे अधिग्रहण करता येऊ नये, यासाठी एफडीआय नियमात काही बदल करण्यात आले आहेत.

- त्यावर चीनने आपला आक्षेप नोंदवला आहे. अरुणाचल प्रदेशवर चीन नेहमीच आपला दावा सांगत आला आहे. आता या पूलावरुन भारत-चीन संबंध आणखी बिघडू शकतात. भारताने आपले रणनितीक हित लक्षात घेऊनच या पूलाची उभारणी केली आहे. २०१७ साली डोकलामवरुन भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते.

- त्याच भागामध्ये हा पूल बांधण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
---------------------------------------------------

संयम मोबाईल ॲप’ द्वारे पुण्यातील विलगीकरण केलेल्या रूग्णांवर ठेवले जाणार लक्ष.


- स्मार्ट शहर योजनेअंतर्गत(smart cities mission SCM) पुणे महानगरपालिकेने संयम नावाचे मोबाईल ॲप बनवले असून त्याद्वारे विलगीकरण केलेले रुग्ण घरातच रहात आहेत अथवा घराबाहेर पडत नाहीत, याची खातरजमा केली जाणार आहे.

- पुणे शहर व्यवस्थापनाने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शहरातील घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर निगराणी ठेवणे सुरु केले आहे. त्यासाठी शहरात घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर दररोज लक्ष ठेवण्यासाठी  पाच विभागांमधून समर्पितपणे काम करणाऱ्या लोकांची पथके तयार केली आहेत.

- ही पथके परदेशातून प्रवास करून आलेल्या, तसेच कोविड-19 चे उपचार पूर्ण करून घरी पाठवलेल्या रूग्णांवर लक्ष ठेवतील.

- ही पथके या लोकांच्या तब्येतीची अद्ययावत माहिती मिळवतील तसेच त्या रूग्णांच्या सहवासात आलेल्या लोकांची देखील चौकशी करतील.घरगुती विलगीकरण केलेल्या, ज्यांच्यावर शिक्का मारला आहे, असे लोक आपले अन्न ,बिछाने,भांडी, कपडे आणि स्वच्छतागृहे वेगळी ठेवत आहेत किंवा नाही, याचीही खातरजमा करतील.

- संयम मोबाईल ॲप अशा लोकांनी डाऊनलोड केले आहे का,हे देखील पहातील.या मोबाईल ॲपमधे GPS ट्रँकींग बसवले असून घरगुती विलगीकरण केलेले लोक घराबाहेर पडतात का ते कळेल, त्यायोगे शहर आस्थापनेला त्याची माहिती मिळून विभागातील स्थानिक पोलिसांना त्याची वर्दी मिळेल.
---------------------------------------------------

विकास दरात होणार मोठी घट, फिचने दिली चिंता वाढवणारी बातमी

- करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे.

- भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते.

- जागतिक मंदीचे स्वरुप आणखी गंभीर होणार असल्याचा फिचचा अंदाज आहे. २०२० मध्ये चीनची अर्थव्यवस्था ०.७ टक्क्यांनी वाढेल. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर १.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता.

-  त्याच काळात जागतिक बँकेने भारताचा विकासदर १.५ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

- २०१९-२० मध्ये ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण ५.५ टक्के होते. ते घसरुन २०२०-२१ मध्ये ०.३ टक्के होईल असा फिचचा अंदाज आहे. भारतच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, जपान या जगातील सगळयाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांना करोना व्हायरसचा मोठा आर्थिक फटका बसेल असा अंदाज आहे.
---------------------------------------------------

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...