३१ मार्च २०२०

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

 हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.

🟤 उठावाची कारणे  🟤

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

🟤१८५७चे स्वातंत्र्यसमर  : पुस्तक  🟤

वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’

🟤१८५७ च्या उठावाचे स्वरूप 🟤

इ.स. १८५७ च्या या उठावाच्या स्वरूपाविषयी निरनिराळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणण्यात यश मिळविले असले तरी प्रारंभीच्या काळापासूनच कंपनीला भारतीयाचा विरोध सहन करावा लागत होता. इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणामुळे व भारतीयाचे आर्थिक शोषण करण्याच्या त्यांच्या नीतीमुळे ब्रिटिशाविरुद्ध भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषातूनच ठीकठिकाणी बंड व उठाव घडून आले होते . तथापि , या उठावाना स्थानिक स्वरूप असल्याने हे उठाव इंग्र्जी सत्तेपुढे फार मोठे आव्हान उभे करू शकले नाहीत. इ.स. १८५७ च्या उठावाचे स्वरूप मात्र वेगळे व वैशिष्टपूर्ण होते . या उठावाची व्याप्ती मोठी असल्याने ब्रिटिशापुढे हा उठाव एक आव्हान ठरले. भारतातील इंग्र्जी सत्ता नष्ट करण्याचा भारतीय जनतेने केलाला हा मोठ्या प्रमाणावरील एक प्रयत्न होता. या उठावाच्या रूपाने भारतीय समाजाच्या मनात इंग्र्जी सत्तेविषयी असलेला असंतोष उफाळून आला. हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी भारतीय समाजमनात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेल्या असंतोषाचे प्रगट झालेले ते एक रौद् स्वरूप होते. या उठावाच्या स्वरूपाविषयी इतिहासकारांनी पुढीलप्रमाणे वेगवेगळी मते मांडली आहेत.

१) ब्रिटिश इतिहासकारांच्या मते इ.स. १८५७ चा उठाव म्हणजे ' शिपायांचे बंड ' होते .

सर जाॅन लॉरेन्स, जॉन सिली , पी. इ. रॉबट॔स् या इंग्र्ज इतिहासकारांनी या उठावाला ' शिपायांचे बंड ' म्हटलेले आहे. त्यांच्या मते, या उठावामागे सैन्यातील काही असंतुष्ट शिपायांचा वैयक्तीक स्वार्थ होता. उठावामध्ये राष्ट्रभक्तीची भावना नव्हती.

प्रा. न. र. फाटक या प्रसिद्ध भारतीय विचारवंतानेही या उठावाल, ' १८५७ ची शिपाईगर्दी ' असे म्हटले आहे.

शहीद भगतसिंग आणि गांधीजी

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .

महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."

भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली

वनांबद्दल सर्व माहिती

1 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

- 200 सेंमी किंवा त्या पेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात
- जांभा मृदेच्या भागात ही वने आढळतात
- वर्षभर हिरवी दिसतत् म्हणून त्यांना सदाहरित वने म्हणतात
- वृक्षाची उंची 45 ते 60 मी दरम्यान

-भरपूर पाऊस ,आद्रतेचे जास्त प्रमाण व जमिनी मध्ये "ह्युमसचे" मुबलक प्रमाण असल्याने घनदाट वनस्पतींचे आच्छादन पहावयास मिळते

- घनदाट अरण्य मध्ये कमी उंचीच्या वनस्पतीची वाढ होते.

- महाराष्ट्र मध्ये सिधुदुर्ग भगत सावंतवाडी, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, अमरावती- गाविलगड गड, गडचिरोली, चंद्रपूर

- उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये वृक्षाचे प्रकार : पांढरा, सिडार, फणस, नागचंपा, कावसी, जांभूळ,वेत,तेलताड,तसेच बांबू आई कळक 

- त्या घनदाट अरण्यामधेय कमी उंचीच्या वनस्पतींहीदेखील वाढ होते

* आर्थिक महत्व :

-आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो,त्याचे मुख्य कारण या वनस्पतीपासुन तयार होणारे लाकूड अतिशय
कठीण असल्याने ते "टिंबर" म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.

- वृक्षाचे वनसंवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्याच्या साह्याने मृदसंधारण होते

- भूमिगत पाण्याची पातळी वाढते आणि मूळ वनस्पती तोडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या वनस्पतींची निर्मिती होत नाही कमी प्रतीच्या वनस्पती येऊ लागतात

2) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये:

- वार्षिक पर्जन्य 200 सेंमी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात

-पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्याचा एक सलग भाग पाहायला मिळतो 

- सदाहरित आणि पानझडी वने  यांच्या संक्रमण अवस्थेत ही अरण्ये आहेत

- सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावरही काही वनस्पती आढळतात

- आंबोली, लोणावळा, इगतपुरी, या परिसरात निमसदाहरित अरण्ये आढळतात

-ह्याची उंची सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असतात

- वृक्षाची पाने गळण्याचा हंगाम वेगळा असतो यामुळे वर्षभरात सर्वसाधारण स्वरूपात हिरवीगार वने असतात

- वृक्षाचे प्रकार : निमसदाहरित अरण्यात किंडल,रानफणस,नाना, कदंब, शिसम, बिबळा,आईनं, नाना, वावळी ही वृक्ष आढळतात

- बांबूची वने कमी प्रमाणत आहेत

- निमसदाहरित वने कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहेत

3) उपउष्णकटिबंधीय सदाहरित वने

-सहयाद्रीच्या पर्वतावर 250 सेंमी पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आहेत.

- पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान व भीमाशंकर च्या परिसरात उपउष्णसदाहरित वने आढळतात

- उत्तर महाराष्ट्र गाविलगड टेकड्यावरही वने आढळतात

- सह्याद्रीच्या पर्वतामधील वर व पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान व भीमाशंकर च्या परिसरात पावसाचे भरपूर प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता या सर्व घटकामुळे उप उष्ण सदाहरीत वृक्ष आढळतात

- जांभा जमिनीचाही प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर झालेला आहे

-अरण्यात ह्या वृक्षाची फार मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली असून त्यांचे लहान पट्टे राहिलेलं आहेत

- वृक्षचे प्रकार:

जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा, कारवी

आर्थिक महत्व:

- महाबळेश्वर च्या परिसरात "जावळीच्या खोऱ्यात" शिवकाळात अति घनदाट  वनस्पती होत्या त्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात तोड झाली

- हिरडा वृक्षाचे लाकूड चांगले मजबूत असते

- या वनस्पतीचा लाकडाचा उपयोग शेतीच्या अवजारे तयार करण्यासाठी आणि घरबांधणी साठी होतो

- मधूमक्षिपालन हा एक महत्वाचा लघुउद्योगधंदा आहे

4) उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने- उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:

-महाराष्ट्रात ही अरण्ये चंद्रपूर व गडचिरोली जिह्याच्या पूर्व भागात चिरोल व नवेगाव टेकड्यावर आहेत तो परिसर "अलपल्ली अरण्ये" म्हणून ओळखला जातो

- याशिवाय भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात, सातपुडा पर्वतरांगेत गाविलगड टेकड्या(मेळघाट) यांचाही समावेश

- उत्तर कोकणात ठाणे पालघर

- सह्याद्रीच्या पर्वतातील घाटमाथा ओल्डल्यानंतर "पर्जन्यछायेचा प्रदेश" या शिवाय सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या शंभू महादेव डोंगररांगा , हरिश्चंद्राबाला घाट आणि सातमाळा डोंगररंगाच्या पश्चिम भागात आद्रपानझडी अरण्ये पहावयास मिलतात

- कोल्हापूर नाशिक ठाणे पालघर धुळे नंदुरबार जिह्यात पानझडी अरण्ये आहेत

- वृक्षाचे स्वरूप:

-वार्षिक पाऊस 120 ते 160 सेंमी असून  तो प्रामुख्याने पावसाळयात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात नैत्रुत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो आणि वर्षातील बाकीचे आठ महिने जवळ जवळ कोरडे असतात

- पाण्याचा पुरवठा वनस्पतींना वर्षभर पुरेसा असत नाही म्हणजेच वर्षातील  बाराही महिने वनस्पती हिरव्यागार राहण्या
इतपत जमिनी ओल्या राहत नाही विशेषतः उन्हाळयात जडत उष्णतेमुळे  जमिनीत ओलावा वनस्पती ना पुरत राहावा म्हणून अनेक वनस्पती ची पाने गळून पडतात. त्यामुळे या पर्णहीन वनस्पती पुन्हा पावसाळयात सुरू होईपर्यंत कशीतरी तग धरून शकतात म्हणून ह्यांना पानझडी अरण्ये (उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने- उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:) म्हणतात

-या अरण्ये मध्ये घनदाट वृक्षाचे मध्यम स्वरूपाचे असते

- वृक्षाची उंची  30 ते 40  मीटर एवढी असते

- वृक्षाचे प्रकार:

- उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने अरण्यात मुख्य वनस्पती सागवान आहे
- आईन, हिरडा, सिरस, शिसम, कुसुम,आवळा, किंडल,लेंडी, येरुल, बिबळा ही वृक्ष आढळतात

- बांबूची वने मिळतात.

* आर्थिक महत्व:

- सर्वात महत्वाचं वृक्ष म्हणजे सागवान

- चंदनाची वृक्ष अधून मधुन आढळतात

- चंद्रपूर व गडचिरोली  जिह्यात " आल्लापल्ली अरण्यातील" वृक्षची भारतातील प्रसिद्ध वृक्षाची गणना केली जाते

5) उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये:

- सातपुडा पर्वतरांगा आणि अजिठ डोंगररांग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

- घटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालागत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यावरही ही अरण्ये पाहाव्यास मिळतात

-विदर्भाच्या डोंगररांळ भाग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये व्यापलेला आहे

- वृक्षाचे स्वरूप :

- वार्षिक पर्जन्य  80 ते 120 सेंमी असणाऱ्या प्रदेशात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वृक्ष उंच असतात
-काही ठिकाणी कमी उंचीचे सुद्धा आढळतात
- पावसाळ्यात फक्त वनस्पती हिरव्यागार दिसतात
- कोरड्या हवामानात पाण्याच्या अभावामुळे बसरेसचे वृक्ष पर्णहीन  आढळतात

- वृक्षाचे प्रकार :

-सागवान,धावडा, शिसम, तेंदू पळस,बीजसाल लेंडी, हेडी, बेल, खैर, अंजन वैगरे

आर्थिक महत्व:

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये अनेक वनस्पती चा उपयोग टिंबर म्हणून केला जातो

- इंधन म्हणून लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

- खैरसारख्या वनस्पतीच्या उवयोग "कात" निर्माण करण्यासाठी केला जातो

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये मानवाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, बरीचशी जमीन पिकाच्या लागवडीखाली आणण्यात आली आहे

6) उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये

- "दख्खनच्या पठारावर" "मध्य महाराष्ट्र नद्यांच्या खोऱ्यात" च्या लागवडी च्या परिसरात असणाऱ्या डोंगररांग व कमी उंचीच्या पठारावर  काटेरी झाडे आढळतात

- पुणे, सातारा, सांगली , अहमदनगरच्या पूर्व भागात , सोलापूर मराठवाडा विदर्भ भगत काटेरी वनस्पती आढळतात

: वृक्षाचे स्वरूप:

वार्षिक पर्जन्य 80 सेंमी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आढळतात

- कोरड्या हवामानात जुळवून घेणाऱ्या काटेरी वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे

-वृक्षाचे प्रकार:

बाभूळ, खैर, हिवर
-निबं झाड अनेक ठिकाणी सापडतात
- तारवड्यासारख्या झउडुओचा उपयोग टॅनिग साठी केला जातो

आत्तापर्यंतचे वित्त आयोग


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟥 पहिला     ➖ 1951  ➖ के. सी. नियोगी
🟧 दुसरा       ➖ 1956 ➖ के. संथानम
🟨 तिसरा      ➖1960 ➖ ए. के. चंदा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟩 चौथा        ➖1964 ➖ पी.व्ही.राजमन्नावर
🟦 पाचवा      ➖1968 ➖ महावीर त्यागी
🟪 सहावा      ➖1972  ➖ के. ब्रह्मानंद रेड्डी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⬛️ सातवा      ➖ 1977 ➖ J. M. शेलार
⬜️ आठवा     ➖ 1983 ➖ यशवंतराव चव्हाण
🟫 नववा       ➖ 1987 ➖ एन पी के साळवे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟥 दहावा      ➖ 1992 ➖ के सी पंत
🟧 अकरावा  ➖ 1958 ➖ ए. एम. खुश्रो
🟨 बारावा     ➖ 2002 ➖ C. रंगराजन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟩 तेरावा       ➖2007 ➖ विजय केळकर
🟦 चौदावा     ➖2013 ➖ वाय व्ही. रेड्डी
🟥 पंधरावा    ➖ 2017 ➖ एन. के.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

घटना समितीतील प्रमुख स्त्रिया

◾️राजकुमारी अमृता कौर,

◾️अम्मू स्वामीनाथन,

◾️बेगम एझाज रसूल,

◾️दाक्षायिनी वेलायुधान,

◾️रेणुका रे, लीला रे,

◾️कमला चौधरी,

◾️ पूर्णिमा बॅनर्जी,

◾️ मालती चौधरी,

◾️हंसाबेन मेहता,

◾️दुर्गाबाई देशमुख,

◾️विजयलक्ष्मी पंडित,

◾️ नलिनी रंजन घोष,

◾️सरोजिनी नायडू

तुम्हाला हे आठवते का :- अर्थसंकल्प 2020 ठाकरे सरकारचे 1 ले महाबजेट


                                                                                                                                                                                                                                                                                                                                          
▪ राज्यात 1500  आदर्श शाळा समोर आणल्या जाईल, प्रत्येक जिल्ह्यात 4 आदर्श शाळा बनवणार
▪ भूमिपुत्रांना 80% नोकरीसाठी कायदा करू
▪ 35 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग, उरलेली रक्कम खरीप हंगाम 2020 च्या आधी वर्ग करणार
▪ शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार आहेत यासाठी 6700 कोटींची तरतूद
▪अण्णासाहेब पाटील महामंडळास ५० कोटी
▪ पेट्रोल डिझेल च्या दरात 1 रुपयांची वाढ
▪ शिकाऊ योजनेसाठी 6000  कोटी रुपये
▪ 10वी उत्तीर्णांना रोजगार प्रशिक्षण देणार
▪ माध्यमिक शाळांतील मुलींना माफक दरांत सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र बसवणार 
▪ उच्च तंत्र शिक्षणासाठी 1300  कोटी रुपये
▪ 5 वर्षात 100000 बेरोजगार प्रशिक्षित होणार
▪ मेडिकल डिग्री च्या 118 जागा वाढवणार
▪ प्राथमिक आरोग्यसेवेसाठी 5 हजार कोटी, पाटण आणि साकोलीतल्या रुग्णालयांचं 100 खाटांच्या रुग्णालयात रूपांतर होणार
▪ 1657 कोटींचा निधी मेट्रोच्या राज्यभरातल्या कामांसाठी देण्याचा सरकारचा विचार
▪ नंदुरबार मध्ये नवे मेडिकल कॉलेज
▪ कबड्डी कुस्ती स्पर्धांना 75 लाख अनुदान
▪ खो - खो व्हॉलीबॉल स्पर्धांना 75 लाख अनुदान
▪ बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
▪ कर्नाटकात मराठी वृत्तपत्रांना अनुदान देणार
▪ एस टी बसस्थानकांसाठी 456  कोटी
▪ महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बसच्या जागी 1600 नवीन बस येणार, बस स्थानकं अत्याधुनिक होणार त्यासाठी 401 कोटी रुपये 
▪ महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 3500 कोटी तरतूद
▪ महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र, सागरी महामार्गांसाठी 3595 कोटींचा निधी
▪ ऊर्जा विभागास 8  कोटी रुपये
▪ 102 क्रमांकाच्या जुन्या रूग्णवाहिका बदलल्या जाणार
▪ प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे
▪ महिला बचत गटांकडून 1000  कोटींची खरेदी करणार
▪ 10 रुपये शिवथाळी भोजन योजना - प्रत्येक केंद्रावर 500 थाळी - 1 लाख थाळींचं उद्दिष्टं - 150 कोटी रुपये
▪ पेट्रोल डिझेल च्या दरात 1 रुपयांची वाढ
▪ पाणीपुरवठा विभागासाठी 2043  कोटी
▪ मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
▪ मुबंईत वस्तू व सेवा केंद्र बांधणार, त्यासाठी 148  कोटी रुपये
▪ नाग , इंद्रायणी , वालधुनीचे प्रदूषण रोखणार ; पर्यावण विभागासाठी 230 कोटी रुपये
▪ वनविभागाची 1630 कोटी रुपये
▪ वरळीत पर्यटन संकुल उभारणार
▪ सोलापूर व पुणे येथे नवे विमानतळ उभारणार
▪ लोणार सरोवराचाही विकास करणार
▪ मुरुड जंजीरयाचा सुशोभिकरण करणार
▪ कोकणच्या काजू प्रकल्पासाठी 15 कोटी
▪ आमदार विकास निधी दर वर्षी 3  कोटी होणार;
▪ पर्यटन विकासाठी एकूण 1400 कोटी
▪ मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा नवीन कार्यक्रम 2010 कोटींचा निधी तसेच सिंचनासाठी 10,235 कोटी
▪ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठवणी 4  कोटी रुपये
▪ सामाजिक न्याय विभागास 9668 कोटी रुपये
▪ पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह
▪ नाट्यसंमेलनांना 10 कोटी रुपये अनुदान
▪ भारतरत्नांचे एकत्रित स्मारक उभारणार
▪ आदिवासी विकास  विभागासाठी 8853 कोटी रुपये
▪ जिल्हा वार्षिक योजनांसाठी 9800
▪ मुद्रांक शुल्कात 1 % सूट
▪ तृतीयपंथीय मंडळासाठी 5 कोटी

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था ‘कोरोना अभ्यास मालिका’ पुस्तके प्रकाशित करणार

भारत सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयांच्या अंतर्गत पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक संवर्धनासाठी काम करणारी राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) यांनी कोविड-19 या विषयावर अभ्यास मालिका प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

भविष्यकाळात मानवी समाजासाठी कोरोना आजारा विषयीच्या जागरूकतेचे विलक्षण मनोवैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव ओसारल्यानंतर वाचकांच्या गरजेसाठी सर्व वयोगटांकरिता ही पुस्तके तयार करण्यात येत आहे. उपक्रमाच्या अंतर्गत योग्य वाचन साहित्य तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती घेतली जात आहे.

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ‘सायको-सोशल इम्पॅक्ट ऑफ कोरोना पॅन्डमिक अँड वेज टू कोप’ या उप-विषयावर पुस्तके तयार करण्यासाठी अनुभवी मानसशास्त्रज्ञ / सल्लागारांचा समावेश असलेला एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.

कोरोनाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेण्यासाठी मुलांची पुस्तके तयार केली जात आहोत. जागरूकता, कला, साहित्य, लोकसाहित्य, आर्थिक आणि समाजशास्त्रीय बाबी, कोरोना महामारीतून उद्भवणारी विज्ञान / आरोग्य जागरूकता आणि विलगीकरण, संचारबंदी या विषयांवर आधारित पुस्तकेदेखील नियोजित आहेत.

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) विषयी

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) हे एक भारतीय प्रकाशन गृह आहे, ज्याची 01 ऑगस्ट 1957 रोजी स्थापना झाली. हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत एक स्वायत्त संस्था आहे. आता ही संस्था मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

३० मार्च २०२०

करोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या

🔸कोरोनाचा विपरित परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. तसंच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसत आहे.

🔹कोरोनामुळे जगभरात प्रामुख्याने अर्थव्यवस्तेवर कसा परिणाम होतोय हे आपण पाहत आहोतच.
याचच एक अस्वस्थ करणार एक उदाहरण सांगायचं झाल्यास हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांचं. 

🔹जर्मनीत अर्थव्यवस्थेच्या चिंतेतून हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय.
करोनामुळे होत असलेले मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान ला यासर्व परिस्थिला तोंड कसे द्यावे या तणावात होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी.

🔸थॉमस शेफर यांचा मृतदेह रेल्वे रूळाजवळ आढळून आला. त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.

🔹शेफर गेल्या १० वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.


त्यानंतर ही देशातील सर्वांत मोठी दुसरी बँक ठरणार आहे. या बँकेकडे एकूण १७ लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण होणार आहे. त्यानंतर ही देशातील चौथी सर्वांत मोठी बँक ठरणार आहे. या बँकेकडे १५.२० लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

युनियन बँकेचे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेसह विलीनीकरण होणार आहे. विलीनीकरणानंत ही देशातील सर्वांत मोठी पाचवी सरकारी बँक बनणार आहे. या बँकेकडे १४.५९ लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेच्या विलीनीकरणानंतर ही देशातील सातवी मोठी बँक ठरणार आहे.

राजघराण्यातील पहिला बळी स्पेनच्या राजकन्येचा करोना व्हायरसमुळे मृत्यू

🔹करोना व्हायरसचा कहर जगभरात वाढतो आहे आणि जगभरात या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे.

🔸आता त्यात स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तिचाही समावेश झाला आहे.
स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.
त्या ८६ वर्षांच्या होत्या.

🔹मारिया यांचे बंधु प्रिन्स सिक्सटो एनरिक दी बॉरबोन यांनी ही माहिती दिली.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 30 मार्च 2020.

❇ हो संग सॉंग ने किआ मोटर्सचे अध्यक्ष नियुक्त केले

❇ राजस्थान पोलिसांनी 'राजकॉप' सिटीझन्स मोबाइल अॅप सुरू केले
 
❇ मिर्जा वहीदने कल्पित कथेत 'द हिंदू पुरस्कार 2019 'जिंकला

❇ संतानू दास यांनी नॉन फिक्शनमध्ये 'द हिंदू पुरस्कार 2019 'जिंकला

❇ सौदी अरेबियाकडून अखंड एलपीजी पुरवठा करण्यासाठी भारत

❇ मोहम्मद नबी यांना इराणच्या फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून नियुक्त केले

❇ गोवाचे भागीदार इनोव्हेसरसह भारताचे पहिले सेल्फ असेसमेंट टूल लाँच करण्यासाठी

❇ अमेरिकेने 64 देशांना 174 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक सहाय्य जाहीर केली

❇ शासनाने कोविड -19 राष्ट्रीय दूरसंचार केंद्र सुरू केले

❇ सर्वोच्च न्यायालयाने बीएस चतुर्थ ते बीएस सहामध्ये संक्रमणाची अंतिम मुदत वाढविली

❇ नेपाळ सरकारने एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी वाढविली

❇ उत्तर मॅसेडोनिया अधिकृतपणे नाटोमध्ये सामील झाले

❇ उत्तर मॅसेडोनिया नाटोचा 30 वा सदस्य होत

❇ गुजरात सरकारने "एसएमसी कोविड -19  ट्रॅकर" सुरू केले.

❇ भारतीय शॉट पुटर नवीन चिकारा 4 वर्षांसाठी निलंबित

General Knowledge

▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...