०८ मार्च २०२०

Quiz 8/03/2020

1)कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
(A) 1 दशलक्ष डॉलर
(B) 4 दशलक्ष डॉलर.  √
(C) 3 दशलक्ष डॉलर
(D) 5 दशलक्ष डॉलर

2)भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
(A) संयुक्त अरब अमिराती
(B) दक्षिण आफ्रिका
(C) अर्मेनिया.  √
(D) न्युझीलँड

3)शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो?
(A) 1 मार्च.  √
(B) 2 मार्च
(C) 3 मार्च
(D) 29 फेब्रुवारी

4)मार्च 2020 या महिन्यात भारत सरकारने UNESCOच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी किती स्थळांचे नामांकन दिले?
(A) 1
(B) 3
(C) 2.  √
(D) 5

5)कोणत्या व्यक्तीची मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली?
(A) मुकेश अंबानी
(B) रतन टाटा.  √
(C) सी. रमेशचंद्र
(D) राघव राजपुरोहित

6)राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला गेला?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020. √
(D) 1 मार्च 2020

7)केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषदेचे उद्घाटन झाले?
(A) 7 वा
(B) 8 वा
(C) 9 वा
(D) 11 वा.  √

8)‘केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019’ राज्यसभेत चर्चेसाठी कधी मांडले गेले?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020
(D) 2 मार्च 2020.  √

9)जुन्या आयफोन संचांचा वेग कमी केल्याचा आरोपाखाली दाखल केलेला खटला निकाली काढण्यासाठी अॅपल कंपनीने किती रक्कम देण्याचे मान्य केले?
(A) 600 दशलक्ष डॉलर
(B) 300 दशलक्ष डॉलर
(C) 200 दशलक्ष डॉलर
(D) 500 दशलक्ष डॉलर.  √

10)सौदी अरबचे ‘प्रीमियम नागरिकत्व’ मिळविणारा पहिला भारतीय कोण आहे?
(A) फारुख अब्दुल्ला
(B) ख्वाजा अब्दुल घानी
(C) गुलाम मोहम्मद अब्दुल खादर
(D) युसुफ अली.  √

प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.
1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल
2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √
3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी
4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल

प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.
अ. पृथ्वीचे परीभ्रमण
ब. पृथ्वीचे परिवलन
क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे   
ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे

1) अ,ब
2) ब, क, ड
3) सर्व कारणीभुत घटक   √
4) अ,ब व क

प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.
अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह

1) अ,ब, क
2) अ, ब, ड
3) अ,ब,ड √
4) वरील सर्व

प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.
अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.
ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.
क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.

1) अ,क
2) अ
3) अ,ब
4) वरील सर्व. √

प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.
अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी
इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच
उ. भुस्तंभ

1) सर्व योग्य
2) सर्व अयोग्य
3) क, ड, इ, ई, उ
4) इ, ई.  √

प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.
अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.
ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.
क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.

1) अ
2) ब
3) क
4) यापैकी नाही.  √

प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?
अ. ऑस्टे्रलिया
ब. नामिबिया
क. ब्राझिल
ड. चिली

1) अ,ब,क
2) ब व क
3) अ,ब, क
4) सर्व योग्य.  √

प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.
अ. छोटा नागपूर
ब.माळवा
क. बुंदेलखंड
ड. बाघेलखंड

1) ब,क,ड,अ.  √
2) क,ब,ड,अ
3) अ,क,ड,ब
4) ब,क,अ,ड

प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)
अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.
ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.
क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची
आहे.

1) अ व ब
2) ब व क
3) अ व क
4) सर्व योग्य.  √

प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.

1. चिरोली  
2. गरमसूर
3. गाळणा
4. मुदखेड

.      अ     ब      क    ड
1)    3     4      2     1.  √
2)    3     4      1     2
3)    1     2      3     4
4)    1     2      4     3

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे.

आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.

1. सत्व – अ  

शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🌷3. सत्व – ब2

शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

🌷4. सत्व – ब3

शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

🌷5. सत्व – ब6  

शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

🌷6. सत्व – ब10  

शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत

द्रव्य बद्दल माहिती

✅ द्रव्य :  सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला ‘द्रव्य’ म्हणतात.

★ द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.

★ अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.

★ अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.

★ लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

★ लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

★ दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

★ मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

★ सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

★ सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

★ ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येतात.

★ स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.

★ द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.

★ अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.

★ आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.

★ दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.

★ लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

★ लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

★ दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

★ मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

★ सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

★ सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

★ लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले. #Invention #Chemistry

★ लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

★ दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

★ मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

★ सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

★ सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे.

आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.

1. सत्व – अ  

शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🌷3. सत्व – ब2

शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

🌷4. सत्व – ब3

शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

🌷5. सत्व – ब6  

शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

🌷6. सत्व – ब10  

शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत

पी.व्ही.सिंधू ठरली 'टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्टस् अवॉर्ड २०१९'ची मानकरी.

🔰 टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्टस् अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार जागतिक बॅटमिंटनपटु पी.व्ही.सिंधू हिला काल नवी दिल्ली इथे जाहीर झाला.

🔰 रिओ ऑलंपिक मध्ये रौप्य पदक आणि स्वित्झर्लंडच्या बासेल इथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सिंधूला गेल्या वर्षी ‘अनब्रेकेबल स्पिरीट ऑफ गोल’ हा पुरस्कारही मिळाला होता. 

🔰 भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याला जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

🔰 त्याचप्रमाणे हॉकीपटू आणि ३ वेळा ऑलंपिक सुवर्णपदक विजेता बलबिर सिंग वरिष्ठ याला ‘आयकॉन ऑफ द सेंचुरी’ या पुरस्काराने सन्मानित केले. 

🔰 राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांना 'मेंटॉर ऑफ द इयर' आणि नेमबाजी प्रशिक्षक जशपाल राणा यांना 'कोच ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आले.  

नागरी उड्डयण क्षेत्रातल्या 100 टक्के थेट परकीय गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

🔰नागरी उड्डयण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी एअर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या बाबतीत गुंतवणुकीचे धोरण बदलण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने सध्याच्या थेट परकीय गुंतवणूक (FDI) धोरणात दुरुस्ती करण्यास मान्यता दिली आहे.

🔰या निर्णयामुळे एअर इंडियामध्ये अनिवासी भारतीयांना स्वयंचलित मार्गाने 100 टक्के परकीय गुंतवणूकीला परवानगी देण्यात येणार.

🔰नव्या निर्णयामुळे एअर इंडियामध्ये सरकारचा कोणताही हिस्सा नसणार आणि ती संपूर्ण खासगी मालकीची बनणार. म्हणूनच, एअर इंडियाला परदेशी गुंतवणूकीच्या मार्गाने इतर अनुसूचित विमान कंपनींच्या श्रेणीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या स्थानावर घसरण


- राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल  राज्यविधानसभेत सादर झाला.

- राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज राज्यविधानसभेत सादर झाला.

-  राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूट देखील वाढली आहे.

- दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

-  राज्यावर चार लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. महसूली तूट २० हजार २९३ कोटी रुपयांनी वाढली आहे.
——————————————————

बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्तपदी शपथ ​​​

▪️शपथ -
      राष्ट्रपती रामनाथ कोविंद

▪️ निवड पद्धत -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समिती

▪️कार्यभार  सध्या -
या पदावरून सुधीर भार्गव ११ जानेवारी २०२० रोजी निवृत्त झाले. त्यानंतर हे पद रिक्त होते. जुल्का यांची या पदावर नियुक्ती करण्यात  आली

🔹बिमल जुल्का यांच्याविषयी
नाव -  बिमल जुल्का
जन्म- २७-०८- १९५५

▪️ अनुभव :

- निदेशक, औद्योगिक विकास विभाग, वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय

- आयुक्त, जनसंपर्क, मध्य प्रदेश सरकार

- निदेशक, नागरिक उड्डयन मंत्रालय, भारत सरकार

- आयुक्त, ग्वालियर डिवीज़न, मध्य प्रदेश

- संयुक्त सचिव (जी/एयर), रक्षा मंत्रालय, भारत सरकार

- रेजिडेंट आयुक्त, मध्य प्रदेश सरकार, नई दिल्ली

अपर सचिव और महा निदेशक (मुद्रा), आर्थिक कार्य विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली

- अपर सचिव / विशेष सचिव और वित्तीय सलाहकार, विदेश कार्य मंत्रालय, भारत सरकार

-  भारत सरकार के सचिव, सूचना एवं प्रसारण मंत्रालय

▪️ केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission - CIC) बाबत थोडक्यात

- स्थापना
१२ ऑक्टोबर २००५

▪️ स्थापना कायदा
- माहिती अधिकार (Right to Information - RTI) कायद्यांतर्गत

▪️अधिकारिता
सर्व केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणे केंद्रीय माहिती आयोगाच्या अखत्यारीत असतात
—————————————————

येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादले निर्बंध

👉YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

👉तर या बँकेवर कर्जाचा बोजा चांगलाच वाढल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. तसेच ग्राहकांना खात्यातून 50 हजार रुपयेच काढता येतील  असंही RBI नं म्हटलं आहे.तसेच 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना RBI ची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

👉खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र RBI ची मंजुरी त्यासाठी घेणं बंधनकारक असणार आहे.खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या या YES बँकेवर 30 दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.

राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ होणार स्थापन..

एकसारखे व उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळाची स्थापना करण्यात येईल. नुकताच सरकारकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

तर त्यानंतर पालक-शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी, पालकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याचे स्पष्टीकरण देत ही माहिती दिली.

राज्यात जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 66 हजार 33 शाळा कार्यरत आहेत. त्यामधील 81 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू होते.तसेच फक्त 81 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण न देता जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये ते देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जनऔषधी दिन 2020

‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना’ याच्या कामगिरीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी भारतात ‘जनऔषधी दिन’ साजरा करण्यात आला.

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना (PMBJP)...

भारत सरकारच्या औषधी (फार्मास्यूटिकल) विभागाने सुरू केलेली एक मोहीम आहे. “सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण औषधे स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत” या उद्देशाने 2008 साली ही योजना “जनऔषधी योजना” या नावाने सादर करण्यात आली.

सप्टेंबर 2015 मध्ये योजनेचे रूपांतर 'प्रधानमंत्री जन औषधी योजना' म्हणून केले गेले. नोव्हेंबर 2016 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यासाठी नाव पुन्हा बदलून “प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना” (PMBJP) ठेवले.

या योजनेच्या अंतर्गत जन औषधी केंद्रांची देशभरात ठिकठिकाणी स्थापना करण्यात आली. त्या केंद्रांवर जेनेरिक औषधांची विक्री केली जाते.

ही केंद्रे जेनेरिक औषधांबद्दल जागृती निर्माण करतात जी नामांकित औषधे नाहीत, मात्र तितकेच सुरक्षित आहेत. त्या नामांकित औषधांपेक्षा खूपच स्वस्त दरात उपलब्ध होतात.

आज भारतामध्ये 6200 हून अधिक केंद्रे आहेत. ही केंद्रे देशातल्या 700 जिल्ह्यांमध्ये आहेत, ज्यामुळे ती जगातली सर्वात मोठी किरकोळ औषधालय शृंखला ठरते.

2019-20 या वर्षात या दुकानांमध्ये झालेली विक्री ही जवळपास 390 कोटी रुपये आहे आणि ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या 2200 कोटी रुपयांची बचत झाली.पहिले “जनऔषधी केंद्र” 25 नोव्हेंबर 2008 रोजी अमृतसर (पंजाब) या शहरात उघडले गेले.

​ “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल; भारत जगात 83व्या क्रमांकावर

🔰 अमेरिकेच्या ‘फ्रिडम हाऊस’ या संस्थेकडून “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात भौगोलिकदृष्ट्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यांच्या संदर्भात विविध देशांमधल्या स्वतंत्रतेचा आढावा दिला गेला आहे.

🔰 स्वतंत्रतेच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेल्या 210 देशांमध्ये भारताचा 83 वा क्रमांक लागतो. भारत तिमोर-लेस्ते आणि सेनेगल या देशांसह “स्वतंत्र लोकशाही” या श्रेणीत शेवटच्या पांच क्रमांकामध्ये आहे.

🔴 अहवलातल्या ठळक बाबी

🔴भारत

🔰 भारताला मिळालेले एकूण गुण 2019 सालाच्या 75 वरून 2020 साली 71 पर्यंत कमी झाले आहेत.
इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत, भारताला 55 गुण मिळाले आणि देशाला "पार्टली फ्री" श्रेणीत वर्गीकृत केले.

🔴जागतिक

🔰 मूल्यांकन करण्यात आलेल्या 195 देशांपैकी 83 (43 टक्के) देश ‘फ्री’ श्रेणीत, 63 देश (32 टक्के) ‘पार्टली फ्री’ श्रेणीत, तर 49 देश (25 टक्के) ‘नॉट फ्री’ श्रेणीत समाविष्ट झाले आहेत.

🔰 गेल्या दशकात ‘फ्री’ श्रेणीतल्या देशांचा वाटा तीन टक्क्यांनी कमी झाला आहे, तर ‘पार्टली फ्री’ आणि ‘नॉट फ्री’ श्रेणीत देशांची टक्केवारी अनुक्रमे दोन आणि एक टक्क्यांनी वाढली आहे.

🔰 'फ्री' श्रेणीत फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड आणि लक्झेमबर्ग ही राष्ट्रे अनुक्रमे प्रथम पाच क्रमांकावर आहेत.

🔰 अहवालात, ट्युनिशिया हा एकमेव असा देश आहे की ज्याने 85 राष्ट्रांच्या 'फ्री' श्रेणीत भारतापेक्षा कमी गुण मिळवले आहेत.

🔰 फ्रीडम हाऊसच्या मते, वर्ष 2019 हे जागतिक स्वातंत्र्यामध्ये आलेल्या घसरणीचे सलग 14 वे वर्ष होते.

🔰 2019 साली 64 देशांमधल्या लोकांना त्यांचे राजकीय हक्क आणि नागरी स्वातंत्र्य हिरावण्याचा अनुभव आला, तर केवळ 37 देशांमध्ये लोकांच्या अनुभवात सुधारणा झाली.

🔰 जगातल्या 41 प्रस्थापित लोकशाहीपैकी 25 मध्ये इंटरनेटवरील बंदी सहन करावी लागली.

Current Affairs - 08/03/2020

1)आपत्ती व्यवस्थापनासाठी हैदराबादच्या ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
(A) पॉलिमर इलेक्ट्रोलक्स मेम्ब्रेन फ्युल सेल्स
(B) पॉलीझोन इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स
(C) पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मटेरियल फ्युल सेल्स
(D) पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स.  √

2)राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाने बचतगटाच्या उत्पादनांच्या ई-विपणनासाठी कोणत्या ई-कॉमर्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला?
(A) स्नॅपडील
(B) अॅमेझॉन.  √
(C) फ्लिपकार्ट
(D) अलिबाबा

3)सर्वोत्तम विद्यापीठांच्या नव्या ‘QS जागतिक क्रमवारी’मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई कोणत्या क्रमांकावर आहे?
(A) 15
(B) 20
(C) 44.  √
(D) 50

4)जम्मू व काश्मीरमध्ये कोणत्या तंत्रज्ञानासह इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे?
(A) IMEI-IP-बाइंडिंग
(B) IMEI-बाइंडिंग
(C) IP-बाइंडिंग
(D) MAC-बाइंडिंग.  √

5)भारताच्या कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय नॅनो विज्ञान व नॅनो तंत्रज्ञान परिषद 2020’ आयोजित करण्यात आली?
(A) कोलकाता.  √
(B) पुणे
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली

6)‘जीनोम इंडिया’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात संदर्भ जीनोम (जनुकीय संरचना) माहिती तयार करण्यासाठी किती व्यक्तींचे नमुने गोळा केले जाणार?
(A) 1000
(B) 5000
(C) 10,000.  √
(D) 11,000

7)भारताच्या कोणत्या शहरात गुगल कंपनी दुसरे क्लाऊड स्टेशन उघडणार आहे?
(A) कोलकाता
(B) पुणे
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली.  √

8)एकात्मिक स्थानिक ऊर्जा प्रणालीच्या संदर्भात कार्य करण्यासाठी भारत कोणत्या राष्ट्रसंघाबरोबर मिळून काम करणार आहे?
(A) युरोपीय संघ.  √
(B) अमेरिका संघ
(C) आफ्रिका संघ
(D) ब्रिटन

9)मार्च 2020 या महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले?
(A) जापान
(B) फ्रान्स
(C) चीन.  √
(D) ब्रिटन

10)_______ हा नागरिकांना सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणार जगातला पहिला देश ठरला?
(A) लक्झेमबर्ग. √
(B) चीन
(C) जापान
(D) कॅनडा

मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण

🔰मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

🔰तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुरुवातीला शिक्षणासाठी हे आरक्षण दिले जाईल आणि नोकऱ्यांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. या आरक्षणास शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
तसेच विधानपरिषदेत शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा केली.

🔰मुस्लिम समाजाला 9 जुलै 2014 रोजी अध्यादेश काढून पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबर 2014 रोजी अंतरिम आदेशाद्वारे शिक्षणामध्ये दिलेले आरक्षण वैध ठरविले, तर नोकऱ्यांमधील आरक्षणाला स्थगिती दिली. पण अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर न झाल्याने 23 डिसेंबर 2014 रोजी अध्यादेश संपुष्टात आला.

🔰मात्र न्यायालयाने आरक्षण लागू काळातील शिक्षण संस्थांमध्ये दिले गेलेले प्रवेश आणि नोकऱ्या अबाधित ठेवल्या असून प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षणात आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढून नोकऱ्यांमध्ये ते देण्याबाबत पुढील टप्प्यात निर्णय घेतला जाईल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

🔰उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर दिल्ली पोलिसांनी देखील उत्तर-पूर्व दिल्लीतील धार्मिक हिंसेदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई हिंसा करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔰तर या हिंसेत वैयक्तीक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत काम करणाऱ्या पोलिसांनी नाव न छापण्याची अटीवर ही माहिती दिली आहे.

🔰गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते.

🔰तसेच उत्तर-पूर्व दिल्लीत मागील चार दिवसांत संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे काम एसआयटीकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यासह अनेक स्थानिक गुन्हेगारांनी जाफराबाद, कर्दमपुरी, करावल नगर, मौजपूर, भजनपूर आणि अन्य भागांतील हिंसक घटनांचा फायदा घेतला आहे.

🔰दरम्यान दिल्ली पोलिसांना आतापर्यंत हिंसा घडविणाऱ्यांची एक हजार जणांची ओळख पटली आहे. यापैकी 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिंसेत झालेल्या नुकसानीचं आकलन करण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र रविवार ते बुधवार या कालावधीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...