०१ मार्च २०२०

जगात पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश भारत: IQ एअर व्हिज्युअल


- IQ एअर व्हिज्युअल या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रीपोर्ट 2019’ या अहवालानुसार, भारत जगातला पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला. 

▪️अहवालातल्या ठळक बाबी

- 2019 साली जगातल्या सर्वाधिक प्रदूषित राजधानी असलेल्या शहरांच्या यादीत दिल्ली ही शहर अग्रस्थानी आहे.

- जगातल्या पहिल्या 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 21 शहरे भारतात आहेत.

- गाझियाबाद हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. द्वितीय क्रमांकावर चीनचे होतान, तृतीय व चतुर्थ क्रमांकावर पाकिस्तानचे गुजरनवाल आणि फैसलाबाद ही शहर आणि पाचव्या क्रमांकावर दिल्ली हे शहर आहे.

- पहिल्या 30 प्रदूषित शहरांमध्ये असलेली 21 भारतीय शहरे (अनुक्रमाने) - गाझियाबाद, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा, बंधवाडी, लखनऊ, बुलंदशहर, मुझफ्फरनगर, बागपत, जिंद, फरीदाबाद, कोरोट, भिवाडी, पटना, पडवल, मुझफ्फरपूर, हिसार, कुटेल, जोधपूर आणि मुरादाबाद.
देशाला मिळालेल्या क्रमांकानुसार, बांग्लादेश ही जगातले सर्वाधिक प्रदूषित देश ठरले. त्यापाठोपाठ पाकिस्तान, मंगोलिया, अफगाणिस्तान आणि पाचव्या क्रमांकावर भारत हे देश आहेत.

- तथापि, गेल्या वर्षांच्या तुलनेत भारतीय शहरांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) ठरवून दिलेल्या PM 2.5 या प्रदूषकाच्या वार्षिक सरासरी मर्यादेच्या तुलनेनी भारतात PM 2.5 500 टक्क्यांनी अधिक होते.

- राष्ट्रीय वायू प्रदूषण 2018-2019 या काळात 20 टक्क्यांनी कमी झाले असून 98 टक्के शहरांमध्ये सुधारणा दिसून आली आहे.
—————————————————-

तीन भारतीय कलाविष्कारांचा  गिनीज विश्वविक्रम

​​

◾️त्यागया चॅरिटेबल ट्रस्टचा एक भाग असलेल्या त्यागया टीव्ही वाहिनीच्या पुढाकारामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे.

◾️कर्नाटीक संगीत, भरतनाट्यम आणि कुचीपुडी या कलाविष्कारांचा एकजुटीचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला.

◾️या तीनही श्रेणींमध्ये एकाच मंचावर सर्वाधिक कलाकारांनी कलेचे सादरीकरण करून हा विक्रम नोंदवला.

◾️1 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.

भारतीय नृत्यशैली

◾️भारतात दोनशेहून अधिक लोकनृत्ये प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातल्या कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

राज्यात रुजलेले नृत्यप्रकार

📌अरुणाचल प्रदेश - बार्दो छम

📌आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम

📌आसाम - बिहू, जुमर नाच

📌उत्तर प्रदेश - कथक, चरकुला

📌उत्तराखंड - गढवाली

📌उत्तरांचल - पांडव नृत्य

📌ओरिसा - ओडिसी, छाऊ

📌कर्नाटक - यक्षगान, हत्तारी

📌केरळ - कथकली

📌गुजरात - गरबा, रास

📌गोवा - मंडो

📌छत्तीसगढ - पंथी

📌जम्मू व काश्मीर - रौफ

📌झारखंड - कर्मा, छाऊ

📌मणिपूर - मणिपुरी

📌मध्यप्रदेश - कर्मा, चरकुला

📌महाराष्ट्र - लावणी

📌मिझोरम - खान्तुम

📌मेघालय - लाहो

📌तामिळनाडू - भरतनाट्यम

📌पंजाब - भांगडा, गिद्धा (गिद्दा)

📌पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ

📌बिहार - छाऊ

📌राजस्थान - घूमर

पोलीस भरती प्रश्नसंच

1. कॅन्सवर उपचारासाठी अत्याधुनिक सेवा कोठे उपलब्ध आहे.

मुंबई 


पुणे


नागपूर


औरंगाबाद


उत्तर :- मुंबई  

2. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ____ आहे.

हृदय


यकृत 


मोठे आतडे


जठर


उत्तर :- यकृत 

3. स्टार्च हा ____ पदार्थ आहे.

पिष्टमय


स्निग्ध


नायट्रोजनयुक्त


लिपिड  


उत्तर :-पिष्टमय 

4. “सुपरसॉनिक” म्हणजे काय?

प्रकाशापेक्षाही कमी वेगवान


ध्वनीपेक्षा कमी


ध्वनीपेक्षा अधिक वेगवान


प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान


उत्तर :-ध्वनीपेक्षा अधिक वेगवान 

5. प्लेगवर नियंत्रण करणार्‍या लसीचे संशोधन ____ यांनी केले.

डॉ. म़ॉन्टेग्रीअर


डॉ. जोनास सॉल्क


एडवर्ड जेन्नर


डॉ. हाफकीन


उत्तर :-डॉ. हाफकीन 

6. गाईच्या दुधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण ____ आहे.

3 ते 4 %


5 ते 6%


8 ते 9% 


10%


उत्तर :-8 ते 9%  

7. रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास _____ म्हणतात.

दृष्टीपटल


रंजीत पटल


पार पटल


श्वेत पटल


उत्तर :-रंजीत पटल 

8. शरीराच्या सर्व भागांतील रक्त हृदयाकडे वाहून आणणार्‍या रक्तवाहिन्यांना ___ म्हणतात.

रोहिणी (धमान्या)


रक्तकेशिका


केशवाहिनी


शिरा (नीला)


उत्तर :-शिरा (नीला) 

9. प्रौढ माणसाच्या 100 मी.ली. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ____ आहे.

8 ग्रॅम


10 ग्रॅम


14 ग्रॅम


18 ग्रॅम


उत्तर :-14 ग्रॅम 

10. रक्तक्षय म्हणजे काय?

हिमोग्लोबीन कमी होणे


रक्त कमी होणे


वजन कमी होणे


जीवन कमी होणे  


उत्तर :-हिमोग्लोबीन कमी होणे 

11. एच. आय. व्ही. काय आहे?

असाध्य रोग


विषाणू


एड्स ची चाचणी  


वरीलपैकी सर्व


उत्तर :-विषाणू 

12. उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते.

जीवनसत्व – अ   


जीवनसत्व – ई


जीवनसत्व – के


जीवनसत्व – सी


उत्तर :-जीवनसत्व – सी 

13. डॉट्स उपचार पद्धतीमध्ये औषधाची मात्रा कधी दिली जाते?

सकाळी


दुपारी


सायंकाळी


एक दिवस आड


उत्तर :-सकाळी 

14. कोणता ‘रक्तगट’ तुरळक आहे?



बी


एबी




उत्तर :-एबी 

15. कॉलराचा प्रसार कशामुळे होतो?

दूषित पाण्यामधून


हवेमधून


रक्तामधून


वरीलपैकी सर्व


उत्तर :-दूषित पाण्यामधून 

16. विश्व बंधुता दिवस ____ रोजी साजरा केला जातो.

13 सप्टेंबर


23 ऑक्टोंबर


26 ऑगस्ट


1 डिसेंबर


उत्तर :-13 सप्टेंबर 

17. चिकून गुणिया होण्यासाठी कोणते विषाणू करणीभूत आहेत.

कोरोना


इन्फलुएंझा – ए


एव्हियन एन्फलुएंझा


एडिस इजिप्ती डास


उत्तर :-एव्हियन एन्फलुएंझा 

18. अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

25


15


20


10


उत्तर :-25 

10. गंडमाळ/गॉयटर म्हणजे ____ च्या ग्रंथीना आलेली सूज होय.

थायमस


वृषण


थॉयराईड


अॅड्रेनल


उत्तर :-थॉयराईड 

20. मलेरिया ____ मुले होतो.

सारकॉप्टीस स्केबी


कायकोबॅक्टेरियम लेप्री


स्वल्पविरामी जिवाणू


प्लाझमोडीयम


उत्तर :-प्लाझमोडीयम 

21. “बी” (थायमिन) जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?

पेलाग्रा


बेरी-बेरी


अॅनिमिया


क्षयरोग


उत्तर :-बेरी-बेरी

22. रक्तातील तांबडया पेशींचा नाश होतो हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे.

क्षयरोग


मलेरिया


नारू


कुष्ठरोग


उत्तर :-मलेरिया

23. कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते?

क्लोरोव्किन


डॅप्सोन


स्ट्रेप्स


यापैकी नाही


उत्तर :-डॅप्सोन

24. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली.

एडवर्ड जेन्नर


लुई पाश्चर


श्याम विल्मुर


कार्ल स्टिनर


उत्तर :-एडवर्ड जेन्नर

25. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता?

निकोल्स


निकोटीन


फॉस्फेट


कार्बोनेट


उत्तर :-निकोटीन

चालू घडामोडी प्रश्नसंच

1)कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?
(A) योगी आदित्यनाथ
(B) अरविंद केजरीवाल
(C) कॅप्टन अमरिंदर सिंग.  √
(D) बी. एस. येदीयुरप्पा

2)वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी भारत 27 फेब्रुवारी 2020 रोजी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने प्रभावित असलेल्या ‘_____’ या शहराकडे आपले विमान पाठविणार.
(A) वुहान.  √
(B) प्योंगयांग
(C) खार्तूम
(D) हरारे

3)कोणत्या राज्यात 100 टक्के स्वयंपाकाचा गॅस वापरला जात आहे?
(A) केरळ
(B) हिमाचल प्रदेश.  √
(C) सिक्किम
(D) तामिळनाडू

4)ISRO 05 मार्च 2020 रोजी “GISAT-1” उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. “GISAT-1” याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. हा एक भूस्थिर उपग्रह आहे.

2. हा उपग्रह श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित केला जाणार.

दिलेल्यापैकी अचूक विधान निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही. √
(D) ना (1), ना (2)

5)_______ यांनी “मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्व्हे” (MICS) याचा अहवाल तयार केला.
(A) जागतिक आरोग्य संघटना (WHO)
(B) संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF).  √
(C) लॅन्सेट मेडिकल जर्नल
(D) यापैकी नाही

6)________ या राज्यात ‘ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद 2020’ आयोजित करण्यात आली.
(A) त्रिपुरा
(B) मेघालय
(C) आसाम.  √
(D) सिक्किम

7)“ब्लू डॉट नेटवर्क” _ याच्याशी संबंधित आहे.
(A) अमेरिकेचे हिंद-प्रशांत धोरण.  √
(B) चीनचा ‘वन बेल्ट वन रोड’ उपक्रम
(C) भारताचे आग्नेय आशिया धोरण
(D) भारताचे आफ्रिका धोरण

8)भारतीय विधी आयोग हे एक _ आहे.
(A) घटनात्मक मंडळ
(B) नियामक मंडळ
(C) वैधानिक मंडळ
(D) अवैधानिक मंडळ. √

9)ताज्या ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’मध्ये भारताला कोणता क्रमांक प्राप्त झाला?
(A) 73 वा
(B) 74 वा
(C) 75 वा
(D) 77 वा.  √

10)कोणत्या राज्य विधिमंडळात सरपंचांची थेट निवड करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द करणारे विधेयक मंजूर करण्यात आले?
(A) उत्तरप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र   √

२९ फेब्रुवारी २०२०

राज्यसेवा महत्त्वाचे प्रश्नसंच

1)कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?
(A) योगी आदित्यनाथ
(B) अरविंद केजरीवाल
(C) कॅप्टन अमरिंदर सिंग.  √
(D) बी. एस. येदीयुरप्पा

2)वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी भारत 27 फेब्रुवारी 2020 रोजी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने प्रभावित असलेल्या ‘_____’ या शहराकडे आपले विमान पाठविणार.
(A) वुहान.  √
(B) प्योंगयांग
(C) खार्तूम
(D) हरारे

3)कोणत्या राज्यात 100 टक्के स्वयंपाकाचा गॅस वापरला जात आहे?
(A) केरळ
(B) हिमाचल प्रदेश.  √
(C) सिक्किम
(D) तामिळनाडू

4)ISRO 05 मार्च 2020 रोजी “GISAT-1” उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. “GISAT-1” याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. हा एक भूस्थिर उपग्रह आहे.

2. हा उपग्रह श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित केला जाणार.

दिलेल्यापैकी अचूक विधान निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही. √
(D) ना (1), ना (2)

5)_______ यांनी “मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्व्हे” (MICS) याचा अहवाल तयार केला.
(A) जागतिक आरोग्य संघटना (WHO)
(B) संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF).  √
(C) लॅन्सेट मेडिकल जर्नल
(D) यापैकी नाही

6)________ या राज्यात ‘ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद 2020’ आयोजित करण्यात आली.
(A) त्रिपुरा
(B) मेघालय
(C) आसाम.  √
(D) सिक्किम

7)“ब्लू डॉट नेटवर्क” _ याच्याशी संबंधित आहे.
(A) अमेरिकेचे हिंद-प्रशांत धोरण.  √
(B) चीनचा ‘वन बेल्ट वन रोड’ उपक्रम
(C) भारताचे आग्नेय आशिया धोरण
(D) भारताचे आफ्रिका धोरण

8)भारतीय विधी आयोग हे एक _ आहे.
(A) घटनात्मक मंडळ
(B) नियामक मंडळ
(C) वैधानिक मंडळ
(D) अवैधानिक मंडळ. √

9)ताज्या ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’मध्ये भारताला कोणता क्रमांक प्राप्त झाला?
(A) 73 वा
(B) 74 वा
(C) 75 वा
(D) 77 वा.  √

10)कोणत्या राज्य विधिमंडळात सरपंचांची थेट निवड करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द करणारे विधेयक मंजूर करण्यात आले?
(A) उत्तरप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र   √

General Knowledge

▪ कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?'
उत्तर : कॅप्टन अमरिंदर सिंग

▪ ‘राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद 2022’ ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार?
उत्तर : चंदीगड

▪ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मकता शिबीर’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले?
उत्तर : सिक्किम

▪ कोणत्या व्यक्तीने ‘SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2020’ जिंकला?
उत्तर : डॉ. नीती कुमार

▪ पक्के व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

▪ ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ला कोणत्या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत?
उत्तर : कर्नाटक आणि तामिळनाडू

▪ सार्वजनिक वाचनालय कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते होते?
उत्तर : तामिळनाडू (मद्रास)

▪ शास्त्रज्ञांना कोणत्या राज्यात एक नवीन प्रकारचा गुहेमध्ये राहणारा मासा सापडला?
उत्तर : मेघालय

▪ 34 वी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर : डी. गुकेश

▪ ‘राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण 2019-24’ कोणाकडून सादर करण्यात आले?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक

जानेवारी 2020 साठी आठ महत्वपूर्ण उद्योगांचे निर्देशांक (आधार: 2011-12=100)

- आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक जानेवारी महिन्यात 2.2 टक्क्याने कमी होऊन 137.5 इतका राहिला. एप्रिल ते जानेवारी 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0.6 टक्के इतकी राहिली.

▪️कोळसा
जानेवारी 2020 मध्ये कोळशाच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 8 टक्क्याने वाढ झाली. एप्रिल ते जानेवारी 2020 दरम्यान या क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.4 टक्क्याने कमी राहिला.

▪️खनिज तेल
जानेवारी 2020 मध्ये खनिज तेलाच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 5.3 टक्क्याने घट झाली.

▪️नैसर्गिक वायू
जानेवारी 2020 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 9.1 टक्क्याने घट झाली.

▪️रिफायनरी उत्पादने

जानेवारी 2020 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 1.9 टक्क्याने वाढ झाली.

▪️खते
जानेवारी 2020 मध्ये खतांच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 0.1 टक्क्याने घट झाली.

▪️पोलाद
जानेवारी 2020 मध्ये पोलाद उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 2.2 टक्क्याने वाढ झाली.

▪️सिमेंट
जानेवारी2020 मध्ये सिमेंटच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 5 टक्क्याने वाढ झाली.

▪️वीज

जानेवारी 2020 मध्ये वीज निर्मितीत जानेवारी 2019 च्या तुलनेत 2.8 टक्क्याने वाढ झाली.

फेब्रुवारी 2020 साठीचा निर्देशांक 31 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येई
————————————————————

व्यक्तीवेध- लॉरेन्स टेस्लर

- आपला संगणकाशी होणारा संवाद ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून होतो, त्याला ‘इंटरफेस’ म्हणतात. दिवस शालांत परीक्षांचे आहेत. एकेकाळी ‘कॉपी’ हा शब्द या काळात परवलीचा ठरावा, इतका तो चर्चेत येत असे. पण अलीकडे, अगदी पदव्युत्तर शोधनिबंधांपासून पीएच.डी. प्रबंधांपर्यंत ‘कट-कॉपी-पेस्ट’चा प्रयोग बहुतांश कथित विद्वान करीत असतात.

-  संगणकशास्त्रातील प्रगतीमुळे असे अनेक ‘कॉपीकॅट’ तयार झालेत खरे; पण कुठल्याही संशोधनाचा हेतू हा वाईट नसतो. ‘कट-कॉपी-पेस्ट’बाबतही तो नव्हता. अर्थात, या ‘कॉपीकॅट’ची ‘कॉपी’ उघड करणाऱ्या आज्ञावलीही आता उपलब्ध आहेत. त्यामुळे कॉपी म्हणजे नक्कल करून ती स्वत:च्या नावावर खपवणे आता लपून राहू शकत नाही. संगणकीय कामात ‘कट-कॉपी-पेस्ट’ ही युगत प्रथम शोधून काढणारे संगणक वैज्ञानिक म्हणजे लॉरेन्स टेस्लर. त्यांचे अलीकडेच निधन झाले.

- आपला संगणकाशी होणारा संवाद ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून होतो, त्याला ‘इंटरफेस’ म्हणतात. ‘कट-कॉपी-पेस्ट’ हा आदेश म्हणजे ‘कमांड’ हा त्याचाच भाग होता. त्यामुळे एखादा मजकूर पुन्हा टंकण्याची गरज उरत नाही. ही सोय फायद्याचीच ठरली यात शंका नाही. तिच्या वापराचा हेतू हा निराळा भाग. सत्तरच्या दशकात स्थापन झालेल्या ‘झेरॉक्स पार्क’ या कंपनीत काम करीत असताना टेस्लर यांना ‘कट-कॉपी-पेस्ट’ची कल्पना सुचली.

-  त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या आज्ञावलीचे नाव होते- ‘जिप्सी’! या सुविधेमुळे संपादनक्रियेत क्रांतिकारी बदल घडून आले. त्यामुळे संगणकावरील कामात कुठलाही नको असलेला भाग काढणे वा हवा तो भाग योग्य ठिकाणी बसवणे सोपे झाले. त्या वेळी ‘अ‍ॅपल’च्या ‘मॅक’ संगणकाच्या प्रसवकळा सुरू होत्या; ‘अ‍ॅपल’चे कर्तेकरविते असलेल्या स्टीव्ह जॉब्ज यांनी तेव्हा झेरॉक्स कंपनीला भेट दिली होती. त्या वेळी त्यांना सगळी माहिती टेस्लर यांनीच दिली होती.

- पुढे टेस्लरही ‘अ‍ॅपल’मध्ये दाखल झाले. पण अजूनही झेरॉक्स कंपनी टेस्लर यांच्या त्या क्रांतिकारी कल्पनेबाबत कृतज्ञ आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील झेरॉक्स पालो आल्टो रिसर्च सेंटर (पार्क) येथून टेस्लर यांची कारकीर्द सत्तरच्या दशकात सुरू झाली. नंतर ‘अ‍ॅपल’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘याहू’ या कंपन्यांतही त्यांनी काम केले. ‘अ‍ॅपल’मध्ये टेस्लर हे तब्बल १७ वर्षे मुख्य वैज्ञानिक होते.

- न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या टेस्लर यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून गणिताची पदवी घेतली होती. विद्यार्थिदशेत त्यांनी मूळ संख्यांच्या निर्मितीची एक नवीन पद्धत शोधली होती. पदवीनंतर काही ठिकाणी आज्ञावलीकर्ता म्हणून त्यांनी काम केले. नंतरच्या काळात त्यांना ‘एमआयटी’ने तयार केलेला ‘लिंक’ नावाचा संगणक चालवण्याची संधी मिळाली. टेस्लर यांनी ‘डायनाबुक’ ही कल्पना मांडली होती, तो आताच्या लॅपटॉपचाच एक प्रकार होता. त्या काळात संगणक सहज वापरता येतील इतके सुलभ नव्हते.

- टेस्लर यांनी योजलेली ‘कट-कॉपी-पेस्ट’ ही सोय प्रथम १९८३ मध्ये ‘अ‍ॅपल’च्या ‘लिसा’ या संगणकात आणि नंतर ‘मॅकिनटॉश’ या संगणकात उपलब्ध करून देण्यात आली. संगणक आज्ञावलींच्या गुंताडय़ात रमणाऱ्या टेस्लर यांचे कार्यकर्तेपणही उठून दिसे. समाजहिताचे विचार ते नेहमी व्यक्त करत. सिलिकॉन व्हॅलीत बस्तान बसवल्यावर एखादी कंपनी बक्कळ पैसा कमावते हे ठीक आहे; पण नंतर त्यांनी इतर कंपन्यांनाही निधी देऊन उभे राहण्यास मदत करावी, असे त्यांचे मत होते. युद्धखोरीस त्यांचा विरोध होता; त्यामुळे वेळोवेळी त्यांनी युद्धविरोधी आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला होता.
———————————————————--
जॉईन  करा . @chaluGhadamodi

अमेरिका-तालिबानमध्ये आज शांतता करार

-  वॉशिंग्टनअमेरिका आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यामध्ये शांतता करार होणार असतानाच, या करारामध्ये पारदर्शकता असावी आणि तालिबानकडून ...

- अमेरिका आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यामध्ये शांतता करार होणार असतानाच, या करारामध्ये पारदर्शकता असावी आणि तालिबानकडून शांततेची हमी घेण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेतील अनेक लोकप्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान, अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये शनिवारी (२९ फेब्रुवारी) दोहा येथे हा करार होणार आहे. हा करार म्हणजे, अफगाणिस्तानात २००१पासून सुरू असणाऱ्या अमेरिकेच्या हस्तक्षेपातील महत्त्वाचा टप्पा आहे.

- अमेरिका आणि तालिबान यांच्यातील शांतता चर्चा फलद्रुप होण्याच्या मार्गावर असून, सध्या हिंसाचारमुक्त आठवडा पाळण्यात येत आहे. या आठवड्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये या आठवड्यात शांतता करार होईल. अमेरिकेच्या दृष्टीने हा करार ऐतिहासिक आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेततील २४पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींनी परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले असून, पारदर्शकता आणि अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.

-  तालिबानबरोबरील सुरक्षेविषयक हमीही जाहीर करण्यात याव्यात. गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण किंवा संयुक्त दहशतवादविरोधी केंद्राची स्थापन करण्यात येऊ नये, असेही या लोकप्रतिनिधींनी निक्षून सांगितले आहे. 'अमेरिकेवर ९/११चा हल्ला करणाऱ्या अल-कायदाच्या दहशतवाद्यांना तालिबाननेच आसरा दिला होता. अमेरिका त्यांच्याबरोबर शांतता करार करत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे.

-  ट्रम्प यांनी अमेरिकेची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे या आधीही सिद्ध केले आहे. या धोरणाचा विचार करताना, अमेरिकन जनतेची सुरक्षा तालिबानच्या हातामध्ये जाणार नाही आणि अमेरिकेचे मित्र असणाऱ्या अफगाणिस्तानच्या विद्यमान सरकारचे महत्त्व कमी होता कामा नये, ही हमी आम्हाला हवी आहे. तसेच, अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैनिकांची संख्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेच्या गरजांचा विचार करूनच निश्चित करण्यात यावी. कोणत्याही तालिबानच्या कैद्याची मुदतपूर्व सुटका करण्यात येऊ नये,' असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

▪️पाक मंत्र्यांची उपस्थिती

इस्लामाबाद : अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये शनिवारी दोहा येथे होणाऱ्या शांतता करारासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी उपस्तित राहणार आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे माहिती व प्रसारणविषयक विशेष सहायक फिरदौस आशिक अवान यांनी ही माहिती दिली. हा करार होत असताना, कतारचे अमीर, सात देशांचे परराष्ट्र मंत्री आणि ५० देशांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
———————————————————--

“RAISE 2020”: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयावरची भारताची पहिली परिषद

🔰नवी दिल्लीत 11 एप्रिल आणि 12 एप्रिल 2020 रोजी ‘सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार AI’ (RAISE - Responsible AI for Social Empowerment) विषयक एक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलली जाणारी पहिलीच परिषद आहे.

🔰हा कार्यक्रम भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आयोजित करणार आहे.

🔰कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराविषयी नागरिक आणि उद्योगांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षण, स्मार्ट दळणवळण, कृषी, आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रात गुंतलेल्या उद्योगांमध्ये सामाजिक सशक्तीकरण आणि परिवर्तनाच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर विचारांची देवाणघेवाण केली जाणार आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...