२९ फेब्रुवारी २०२०

राज्यसेवा महत्त्वाचे प्रश्नसंच

1)कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?
(A) योगी आदित्यनाथ
(B) अरविंद केजरीवाल
(C) कॅप्टन अमरिंदर सिंग.  √
(D) बी. एस. येदीयुरप्पा

2)वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी भारत 27 फेब्रुवारी 2020 रोजी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने प्रभावित असलेल्या ‘_____’ या शहराकडे आपले विमान पाठविणार.
(A) वुहान.  √
(B) प्योंगयांग
(C) खार्तूम
(D) हरारे

3)कोणत्या राज्यात 100 टक्के स्वयंपाकाचा गॅस वापरला जात आहे?
(A) केरळ
(B) हिमाचल प्रदेश.  √
(C) सिक्किम
(D) तामिळनाडू

4)ISRO 05 मार्च 2020 रोजी “GISAT-1” उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. “GISAT-1” याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. हा एक भूस्थिर उपग्रह आहे.

2. हा उपग्रह श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित केला जाणार.

दिलेल्यापैकी अचूक विधान निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही. √
(D) ना (1), ना (2)

5)_______ यांनी “मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्व्हे” (MICS) याचा अहवाल तयार केला.
(A) जागतिक आरोग्य संघटना (WHO)
(B) संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF).  √
(C) लॅन्सेट मेडिकल जर्नल
(D) यापैकी नाही

6)________ या राज्यात ‘ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद 2020’ आयोजित करण्यात आली.
(A) त्रिपुरा
(B) मेघालय
(C) आसाम.  √
(D) सिक्किम

7)“ब्लू डॉट नेटवर्क” _ याच्याशी संबंधित आहे.
(A) अमेरिकेचे हिंद-प्रशांत धोरण.  √
(B) चीनचा ‘वन बेल्ट वन रोड’ उपक्रम
(C) भारताचे आग्नेय आशिया धोरण
(D) भारताचे आफ्रिका धोरण

8)भारतीय विधी आयोग हे एक _ आहे.
(A) घटनात्मक मंडळ
(B) नियामक मंडळ
(C) वैधानिक मंडळ
(D) अवैधानिक मंडळ. √

9)ताज्या ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’मध्ये भारताला कोणता क्रमांक प्राप्त झाला?
(A) 73 वा
(B) 74 वा
(C) 75 वा
(D) 77 वा.  √

10)कोणत्या राज्य विधिमंडळात सरपंचांची थेट निवड करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द करणारे विधेयक मंजूर करण्यात आले?
(A) उत्तरप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र   √

General Knowledge

▪ कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?'
उत्तर : कॅप्टन अमरिंदर सिंग

▪ ‘राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद 2022’ ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार?
उत्तर : चंदीगड

▪ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मकता शिबीर’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले?
उत्तर : सिक्किम

▪ कोणत्या व्यक्तीने ‘SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2020’ जिंकला?
उत्तर : डॉ. नीती कुमार

▪ पक्के व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

▪ ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ला कोणत्या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत?
उत्तर : कर्नाटक आणि तामिळनाडू

▪ सार्वजनिक वाचनालय कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते होते?
उत्तर : तामिळनाडू (मद्रास)

▪ शास्त्रज्ञांना कोणत्या राज्यात एक नवीन प्रकारचा गुहेमध्ये राहणारा मासा सापडला?
उत्तर : मेघालय

▪ 34 वी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर : डी. गुकेश

▪ ‘राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण 2019-24’ कोणाकडून सादर करण्यात आले?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक

जानेवारी 2020 साठी आठ महत्वपूर्ण उद्योगांचे निर्देशांक (आधार: 2011-12=100)

- आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक जानेवारी महिन्यात 2.2 टक्क्याने कमी होऊन 137.5 इतका राहिला. एप्रिल ते जानेवारी 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0.6 टक्के इतकी राहिली.

▪️कोळसा
जानेवारी 2020 मध्ये कोळशाच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 8 टक्क्याने वाढ झाली. एप्रिल ते जानेवारी 2020 दरम्यान या क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.4 टक्क्याने कमी राहिला.

▪️खनिज तेल
जानेवारी 2020 मध्ये खनिज तेलाच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 5.3 टक्क्याने घट झाली.

▪️नैसर्गिक वायू
जानेवारी 2020 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 9.1 टक्क्याने घट झाली.

▪️रिफायनरी उत्पादने

जानेवारी 2020 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 1.9 टक्क्याने वाढ झाली.

▪️खते
जानेवारी 2020 मध्ये खतांच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 0.1 टक्क्याने घट झाली.

▪️पोलाद
जानेवारी 2020 मध्ये पोलाद उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 2.2 टक्क्याने वाढ झाली.

▪️सिमेंट
जानेवारी2020 मध्ये सिमेंटच्या उत्पादनात जानेवारी 2019 च्या तुलनेत 5 टक्क्याने वाढ झाली.

▪️वीज

जानेवारी 2020 मध्ये वीज निर्मितीत जानेवारी 2019 च्या तुलनेत 2.8 टक्क्याने वाढ झाली.

फेब्रुवारी 2020 साठीचा निर्देशांक 31 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येई
————————————————————

व्यक्तीवेध- लॉरेन्स टेस्लर

- आपला संगणकाशी होणारा संवाद ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून होतो, त्याला ‘इंटरफेस’ म्हणतात. दिवस शालांत परीक्षांचे आहेत. एकेकाळी ‘कॉपी’ हा शब्द या काळात परवलीचा ठरावा, इतका तो चर्चेत येत असे. पण अलीकडे, अगदी पदव्युत्तर शोधनिबंधांपासून पीएच.डी. प्रबंधांपर्यंत ‘कट-कॉपी-पेस्ट’चा प्रयोग बहुतांश कथित विद्वान करीत असतात.

-  संगणकशास्त्रातील प्रगतीमुळे असे अनेक ‘कॉपीकॅट’ तयार झालेत खरे; पण कुठल्याही संशोधनाचा हेतू हा वाईट नसतो. ‘कट-कॉपी-पेस्ट’बाबतही तो नव्हता. अर्थात, या ‘कॉपीकॅट’ची ‘कॉपी’ उघड करणाऱ्या आज्ञावलीही आता उपलब्ध आहेत. त्यामुळे कॉपी म्हणजे नक्कल करून ती स्वत:च्या नावावर खपवणे आता लपून राहू शकत नाही. संगणकीय कामात ‘कट-कॉपी-पेस्ट’ ही युगत प्रथम शोधून काढणारे संगणक वैज्ञानिक म्हणजे लॉरेन्स टेस्लर. त्यांचे अलीकडेच निधन झाले.

- आपला संगणकाशी होणारा संवाद ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून होतो, त्याला ‘इंटरफेस’ म्हणतात. ‘कट-कॉपी-पेस्ट’ हा आदेश म्हणजे ‘कमांड’ हा त्याचाच भाग होता. त्यामुळे एखादा मजकूर पुन्हा टंकण्याची गरज उरत नाही. ही सोय फायद्याचीच ठरली यात शंका नाही. तिच्या वापराचा हेतू हा निराळा भाग. सत्तरच्या दशकात स्थापन झालेल्या ‘झेरॉक्स पार्क’ या कंपनीत काम करीत असताना टेस्लर यांना ‘कट-कॉपी-पेस्ट’ची कल्पना सुचली.

-  त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या आज्ञावलीचे नाव होते- ‘जिप्सी’! या सुविधेमुळे संपादनक्रियेत क्रांतिकारी बदल घडून आले. त्यामुळे संगणकावरील कामात कुठलाही नको असलेला भाग काढणे वा हवा तो भाग योग्य ठिकाणी बसवणे सोपे झाले. त्या वेळी ‘अ‍ॅपल’च्या ‘मॅक’ संगणकाच्या प्रसवकळा सुरू होत्या; ‘अ‍ॅपल’चे कर्तेकरविते असलेल्या स्टीव्ह जॉब्ज यांनी तेव्हा झेरॉक्स कंपनीला भेट दिली होती. त्या वेळी त्यांना सगळी माहिती टेस्लर यांनीच दिली होती.

- पुढे टेस्लरही ‘अ‍ॅपल’मध्ये दाखल झाले. पण अजूनही झेरॉक्स कंपनी टेस्लर यांच्या त्या क्रांतिकारी कल्पनेबाबत कृतज्ञ आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील झेरॉक्स पालो आल्टो रिसर्च सेंटर (पार्क) येथून टेस्लर यांची कारकीर्द सत्तरच्या दशकात सुरू झाली. नंतर ‘अ‍ॅपल’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘याहू’ या कंपन्यांतही त्यांनी काम केले. ‘अ‍ॅपल’मध्ये टेस्लर हे तब्बल १७ वर्षे मुख्य वैज्ञानिक होते.

- न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या टेस्लर यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून गणिताची पदवी घेतली होती. विद्यार्थिदशेत त्यांनी मूळ संख्यांच्या निर्मितीची एक नवीन पद्धत शोधली होती. पदवीनंतर काही ठिकाणी आज्ञावलीकर्ता म्हणून त्यांनी काम केले. नंतरच्या काळात त्यांना ‘एमआयटी’ने तयार केलेला ‘लिंक’ नावाचा संगणक चालवण्याची संधी मिळाली. टेस्लर यांनी ‘डायनाबुक’ ही कल्पना मांडली होती, तो आताच्या लॅपटॉपचाच एक प्रकार होता. त्या काळात संगणक सहज वापरता येतील इतके सुलभ नव्हते.

- टेस्लर यांनी योजलेली ‘कट-कॉपी-पेस्ट’ ही सोय प्रथम १९८३ मध्ये ‘अ‍ॅपल’च्या ‘लिसा’ या संगणकात आणि नंतर ‘मॅकिनटॉश’ या संगणकात उपलब्ध करून देण्यात आली. संगणक आज्ञावलींच्या गुंताडय़ात रमणाऱ्या टेस्लर यांचे कार्यकर्तेपणही उठून दिसे. समाजहिताचे विचार ते नेहमी व्यक्त करत. सिलिकॉन व्हॅलीत बस्तान बसवल्यावर एखादी कंपनी बक्कळ पैसा कमावते हे ठीक आहे; पण नंतर त्यांनी इतर कंपन्यांनाही निधी देऊन उभे राहण्यास मदत करावी, असे त्यांचे मत होते. युद्धखोरीस त्यांचा विरोध होता; त्यामुळे वेळोवेळी त्यांनी युद्धविरोधी आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला होता.
———————————————————--
जॉईन  करा . @chaluGhadamodi

अमेरिका-तालिबानमध्ये आज शांतता करार

-  वॉशिंग्टनअमेरिका आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यामध्ये शांतता करार होणार असतानाच, या करारामध्ये पारदर्शकता असावी आणि तालिबानकडून ...

- अमेरिका आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यामध्ये शांतता करार होणार असतानाच, या करारामध्ये पारदर्शकता असावी आणि तालिबानकडून शांततेची हमी घेण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेतील अनेक लोकप्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान, अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये शनिवारी (२९ फेब्रुवारी) दोहा येथे हा करार होणार आहे. हा करार म्हणजे, अफगाणिस्तानात २००१पासून सुरू असणाऱ्या अमेरिकेच्या हस्तक्षेपातील महत्त्वाचा टप्पा आहे.

- अमेरिका आणि तालिबान यांच्यातील शांतता चर्चा फलद्रुप होण्याच्या मार्गावर असून, सध्या हिंसाचारमुक्त आठवडा पाळण्यात येत आहे. या आठवड्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये या आठवड्यात शांतता करार होईल. अमेरिकेच्या दृष्टीने हा करार ऐतिहासिक आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेततील २४पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींनी परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले असून, पारदर्शकता आणि अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.

-  तालिबानबरोबरील सुरक्षेविषयक हमीही जाहीर करण्यात याव्यात. गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण किंवा संयुक्त दहशतवादविरोधी केंद्राची स्थापन करण्यात येऊ नये, असेही या लोकप्रतिनिधींनी निक्षून सांगितले आहे. 'अमेरिकेवर ९/११चा हल्ला करणाऱ्या अल-कायदाच्या दहशतवाद्यांना तालिबाननेच आसरा दिला होता. अमेरिका त्यांच्याबरोबर शांतता करार करत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे.

-  ट्रम्प यांनी अमेरिकेची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे या आधीही सिद्ध केले आहे. या धोरणाचा विचार करताना, अमेरिकन जनतेची सुरक्षा तालिबानच्या हातामध्ये जाणार नाही आणि अमेरिकेचे मित्र असणाऱ्या अफगाणिस्तानच्या विद्यमान सरकारचे महत्त्व कमी होता कामा नये, ही हमी आम्हाला हवी आहे. तसेच, अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैनिकांची संख्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेच्या गरजांचा विचार करूनच निश्चित करण्यात यावी. कोणत्याही तालिबानच्या कैद्याची मुदतपूर्व सुटका करण्यात येऊ नये,' असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

▪️पाक मंत्र्यांची उपस्थिती

इस्लामाबाद : अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये शनिवारी दोहा येथे होणाऱ्या शांतता करारासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी उपस्तित राहणार आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे माहिती व प्रसारणविषयक विशेष सहायक फिरदौस आशिक अवान यांनी ही माहिती दिली. हा करार होत असताना, कतारचे अमीर, सात देशांचे परराष्ट्र मंत्री आणि ५० देशांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
———————————————————--

“RAISE 2020”: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयावरची भारताची पहिली परिषद

🔰नवी दिल्लीत 11 एप्रिल आणि 12 एप्रिल 2020 रोजी ‘सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार AI’ (RAISE - Responsible AI for Social Empowerment) विषयक एक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलली जाणारी पहिलीच परिषद आहे.

🔰हा कार्यक्रम भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आयोजित करणार आहे.

🔰कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराविषयी नागरिक आणि उद्योगांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षण, स्मार्ट दळणवळण, कृषी, आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रात गुंतलेल्या उद्योगांमध्ये सामाजिक सशक्तीकरण आणि परिवर्तनाच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर विचारांची देवाणघेवाण केली जाणार आहे.

2020 लीप वर्ष

◾️दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस येतात.

◾️ लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जाता. यामुळं फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो.

🔰 लीप वर्ष म्हणजे काय?

◾️पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर सर्वांनाच ठावूक आहे. पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. पण खरंतर, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५.२४२ दिवसांचा काळ लागतो.

◾️०.२४२ या वेळ आपण धरत नाही. दर ४ वर्षांनी या वेळेचे मिळून २४ तास होतात. म्हणजे एक पूर्ण दिवस.

◾️ हा एक दिवस वाढल्याने फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्ष सोडले तर इतर वर्षी फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा होतो.

🔰लीप वर्ष कसं सुरू झालं

◾️ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात ते लीप वर्ष आहे असं मानण्यात येतं

🔰लीप वर्षाची सुरुवात कधी झाली

◾️येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिलं लीप वर्ष होतं. त्यानंतर दर चार महिन्यांनी लीप वर्ष येतं.

◾️लीप वर्ष कसं ओळखावं

ज्या वर्षाला ४ने भाग जातो त्याला लीप वर्ष असं म्हणतात. उदा, २०२० या आकड्यातील २० ला ४नं

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची घोषणा, परमबीर सिंह स्वीकारणार पदभार

      
*मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होत आहेत*

- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याजागी कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागते तसंच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त होणारा अधिकारी महासंचालक दर्जाचा असेल की अतिरिक्त महासंचालक दर्जाचा असेल, याबाबत उत्सुकता होती. अखेर महासंचालक दर्जाचे परमबीर सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

- परमबीर सिंह यांच्या नियुक्तीसंबंधी प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, संजय बर्वे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त पदावर सरकारने १९८८ च्या तुकडीतील परमबीर सिंह, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र, मुंबई या पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची बदलीने नियुक्ती केली आहे.

- दरम्यान परमबीर सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस महासंचालक बिपिन सिंग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

- संजय बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केलं होतं. तसंच नायगाव पोलीस मुख्यालयात बर्वे यांच्या निरोप समारंभाची तयारीही सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा नव्या अधिकाऱ्याकडे सोपवली जाणार, हे निश्चित झालं होतं. मात्र रात्री उशिरापर्यंत नव्या आयुक्ताच्या निवडीची घोषणा न झाल्याने उत्सुकता वाढली होती.

- गेल्या काही दिवसांपासून आयुक्तपदाच्या निवडीवरून तर्कवितर्काना उधाण आलं होतं. अधिकाऱ्याच्या सेवाज्येष्ठतेसोबत त्याचे कार्य, राजकीय जवळीक आदी बाबींवरून अंदाज लावले जात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यासह अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ, केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून अलीकडेच महाराष्ट्रात परतलेले सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आदी अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती.

म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट भारताच्या दौर्‍यावर

◾️म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट 26 फेब्रुवारी 2020 रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर आलेत. म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चा केल्यानंतर विविध क्षेत्रात सहकार्यासाठी करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

🔰झालेले सामंजस्य करार

◾️मानवी तस्करी रोखण्यासाठी सहकार्य करण्याच्या संदर्भातला सामंजस्य करार

◾️भारत सरकार आणि युनियन ऑफ म्यानमार सरकारमधील त्वरित प्रभाव करणाऱ्या योजनांना निधीचे सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार

◾️राखीव राज्य सरकार आणि भारतीय दूतावास यांगॉन यांच्यात माऊक यू येथे भट्टी आणि रुग्णालय वसाहत आणि ग्वा इथं बीज साठवण गृहे आणि पाणी पुरवठा करण्याबाबत सामंजस्य करार

◾️राखीव राज्य सरकार आणि भारतीय दूतावास यांगॉन येथे यांच्यात राखीव राज्यातल्या पाच शहरांमधल्या वसाहतीत राखीव राज्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत सौर ऊर्जेद्वारा विद्युत पुरवठा करण्याबाबत योजना करार

◾️राखीव राज्य सरकार आणि भारत दूतावास (यांगॉन) यांच्यात राखीव राज्य सरकार विकास योजनेच्या अंतर्गत क्वावलाँग-ओहलफायू मार्ग, क्वाँग क्याव पाँग मार्ग निर्मिती संदर्भात योजना करार

◾️सामाजिक आरोग्य कल्याण सुरक्षा आणि पुनर्वसन मंत्रालय, भारतीय दूतावास (यांगॉन) आणि राखीव राज्य विकास योजनेच्या अंतर्गत बालवाडी शाळा उघडण्याच्या संदर्भात सामंजस्य करार

◾️लाकूड तस्करी विरोधी तसेच व्याघ्र संवर्धन आणि वनसंपत्ती देखरेख विषयक सामंजस्य करार

◾️भारत सरकार आणि ऊर्जा व वीज पुरवठा मंत्रालय, म्यानमार यांच्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या विषयक सामंजस्य करार

◾️दळणवळण क्षेत्रात मंत्रालय भारत सरकार आणि परिवहन आणि संपर्क मंत्रालय म्यानमार यांच्यात संपर्काबाबत सामंजस्य करार

◾️भारत आणि म्यानमार यांच्यात सांस्कृतिक, भाषिक आणि वांशिक संबंध आहेत. म्यानमार भारताचा पाचव्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार असून 2018-19 या वर्षात दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारात आठ टक्के वाढ झाली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठी भाषा गौरव दिन

- 27 फेब्रुवारी
- कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
--------------------------------------------------
● विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

- जन्म: 27 फेब्रुवारी 1992, मृत्यू 10 मार्च 1999
- जन्म पुणे येथे तर नाशिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते.
- आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार
--------------------------------------------------
■ ग्रंथसंपदा:

🎭 नाटके:
दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१), दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१)

🏵 काव्यसंग्रह:
जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०)

📚 कादंबर्‍या:
वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६).

📖 कथासंग्रह:
फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८)
--------------------------------------------------
🏆 पुरस्कार:

- 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.
- 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. माहिती संकलन वैभव शिवडे.
- त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.
- 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

कॅथरीन जॉन्सन

◾️ अमेरिकेच्या अपोलो मोहिमा यशस्वी करण्यात ज्या महिलांचा वाटा होता त्यापैकी एक.

◾️त्यांच्या निधनाने प्रखर बुद्धीचा ‘मानवी संगणक’ कायमचा थांबला आहे.

◾️अमेरिकेचे पहिले अवकाशवीर जॉन ग्लेन हे अवकाशात जायला निघाले तेव्हा सगळी पूर्वतयारी झाली होती, पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो यानाची कक्षा ठरवण्याचा. त्या काळच्या आयबीएम संगणकावर आकडेमोड सुरू असताना जॉन ग्लेन तेथे आले व म्हणाले : संगणकाचे जाऊ द्या, त्या मुलीला बोलवा, तिलाच विचारा आता नेमके काय करायचे. ती मुलगी म्हणजे कॅथरीन.

◾️ अतिशय प्रतिभावान गणितज्ञ अशीच त्यांची ओळख होती. पश्चिम व्हर्जिनियात जन्मलेल्या कॅथरीन यांचे वडीलही गणितात हुशार होते.

◾️ लहान असतानापासून त्यांना गणिताची व आकडेमोडीची आवड, रस्त्याने जातानाही कशाची तरी मोजदाद करीत जायचे अशी एक वेगळी सवय त्यांना होती.

◾️वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी सगळे शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर अठराव्या वर्षी पदवीही घेतली. कॅथरीन यांनी सुरुवातीला शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली.

◾️ नंतर नासा म्हणजे तेव्हाच्या एनएसीएमध्ये त्यांनी १९५३ मध्ये अभियंता म्हणून काम सुरू केले.

◾️नासामधील संशोधन निबंधावर प्रथमच त्यांच्या रूपाने एका महिलेच्या नावाची नाममुद्रा उमटली.

◾️ कालांतराने कॅथरीन नासाच्या उड्डाण संशोधन विभागात काम करू लागल्या. तेथे त्यांच्या भूमितीच्या ज्ञानाने सर्वाना चकित केले.

◾️अमेरिकेच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचा मार्ग तर त्यांनी आखून दिला होताच,

◾️शिवाय अपोलो १३ मोहिमेत नासाच्या कक्षातील सर्व संगणक बंद पडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली असताना, अमेरिकेची अवकाश मोहीम कायमची आटोपल्यात जमा असताना कॅथरीन यांनी आकडेमोड करून सगळा प्रश्न सोडवला.

◾️नंतर संगणक सुरू झाले तेव्हा त्यांनी केलेली आकडेमोड तंतोतंत संगणकावर उमटली आणि सगळेच चक्रावले.

◾️लिंगभेद, वर्णभेद या सगळ्यांवर मात करून स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या आधारे अवकाश तंत्रज्ञानात नाव कमावणाऱ्या कॅथरीन या नेहमीच सर्वासाठी आदर्श असतील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतातील 10 सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने

1. Hemis National Park
- जम्मू आणि काश्मीर
- 4400 KM²

2. Desert National Park
- राजस्थान
- 3162 KM²

3. Gangotri National Park
- उत्तराखंड
- 2390 KM²

4. Mamdapha National Park
- अरूणाचल प्रदेश
- 1985 KM²

5. Khangchendzonga National Park
- सिक्किम
- 1784 KM²

6. Guru Ghasidas (Sanjay) National Park
- छत्तीसगढ
- 1440 KM²

7. Gir Forest National Park
- गुजरात
- 1412 KM²

8. Sundarbans National Park
- पश्चिम बंगाल
- 1330 KM²

9. Jim Corbet National Park
- उत्तराखंड
- 1318 KM²

10. Indravati National Park
- छत्तीसगढ
- 1258 KM²

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये, ५ टक्के आरक्षण देणार.

🌅 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थांमध्ये, पाच टक्के आरक्षण देणारा कायदा करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत सांगितलं.

🌅 काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरादाखल मलिक यांनी ही माहिती दिली.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...