१२ फेब्रुवारी २०२०

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार

१) रामसर करार -
वर्ष - १९७१

दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
अमलात येण्याचे वर्ष - १९७५
भारताने मान्य केला - १९८२

२) CITES -
वर्ष - १९७३

संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
अमलात येण्याचे वर्ष - १९७६
भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार -
वर्ष -१९७९

स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
अमलात येण्याचे वर्ष - १९८३
भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५

ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार -
वर्ष - १९८९

हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
अमलात येण्याचे वर्ष - १९९२
भारताने मान्य केला - १९९

६) UNFCCC -
       वर्ष - १९९२

हवामान बदल रोखणे
अमलात येण्याचे वर्ष - १९९४
भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

हरितवायू उत्सर्जनात घट
अमलात येण्याचे वर्ष - २००५
भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार -
वर्ष -१९९२

जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
अमलात येण्याचे वर्ष - १९९३
भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -वर्ष - २०००

जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
अमलात येण्याचे वर्ष - २००३
भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
अमलात येण्याचे वर्ष - १९९६
भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८

हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
अमलात येण्याचे वर्ष - २००४
भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१

अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
अमलात येण्याचे वर्ष - २००४

बीसीसीआय बनली जगातील सर्वांत शक्तिशाली क्रिकेट संघटना

◾️ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वात शक्तिशाली क्रिकेट संस्था बनली आहे. 

◾️आता एवढ्या मोठ्या संख्येत क्रिकेट फॅन्स असणाऱ्या देशात तितकेच मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे.

◾️गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात येणारे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे.

◾️ मोटेरा स्टेडियममध्ये एकाचवेळी तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसतील एवढी याची आसन क्षमता तयार करण्यात आली आहे.

◾️याचबरोबर हे मोटेरा स्टेडियम सध्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (एमसीजी) मागे टाकेल.

◾️ एमसीजीची आसनक्षमता 1 लाख 24 इतकी आहे. जानेवारी 2018 मध्ये मोटेरा स्टेडियमच्या उभारणीस प्रारंभ झाला असून सध्या याचे निम्म्याहून अधिक काम झाले आहे.

◾️गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या देखरेखेखाली मोटेरा स्टेडियमचे बांधकाम सुरू आहे. भव्यदिव्य अशा या मोटेरा स्टेडियममध्ये तांबड्या आणि काळ्या मातीपासून तयार केलेल्या तब्बल 11 खेळपट्ट्या असतील. आणि फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनविण्यात येत असल्याची माहिती जीसीएचे अध्यक्ष धनराज नथवानी यांनी दिली. 

◾️ मोटेरा हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनलाही मागे टाकेल. ईडन गार्डन्सची आसन क्षमता 68 हजार एवढी आहे.

◾️ऑस्ट्रेलियातील एमसीजीनंतर ईडन गार्डन हे सध्या जगातील दुसरे मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते.

◾️ त्यानंतर पर्थ स्टेडियम आणि हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा क्रमांक लागतो.

✍जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्टेडियम (मोटेरासहित) : 
📌1) मोटेरा क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद (भारत)
📌2) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
📌3) ईडन गार्डन, कोलकाता (भारत)
📌4) पर्थ स्टेडियम, पर्थ (ऑस्ट्रेलिया)
📌5) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद (भारत)

पुण्यात २९ वे मराठी बालकुमार साहित्य संमेल

◾️ अ.भा मराठी बालकुमार साहित्य
संस्थेचे 29 वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन
बालेवाडी, पुणे येथे 8 व 9 फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे.

◾️यामध्ये सुप्रसिध्द लेखक, कवी प्रा. प्रवीण दवणे संमेलनाचे अध्यक्ष
असून, योगिराज पतसंस्था, बाणेरचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 8 रोजी सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

◾️ 9 रोजी दुपारी चार वाजता
संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

◾️अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था गेल्या 44
वर्षांपासून बालसाहित्य क्षेत्रात कार्यरत आहे.

◾️2017 मध्ये ही संस्था विसर्जित करून तिचे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था असे नामकरण करण्यात आले. या संस्थेने मुलांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

◾️बालकुमार साहित्य संमेलन हा त्यातील एक उपक्रम आहे.

◾️मंगेश पाडगावकर, विजया वाड, महावीर जोंधळे, शंकर सारडा, न.भ. जोशी, राजीव तांबे, अनिल अवचट अशा
नामवंत साहित्यिकांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा : मीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम


🏈🏈ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेली आणि माजी जगज्जेती मीराबाई चानू हिने मंगळवारी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने ४९ किलो वजनी गटात आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत २०३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.

🏈🏈मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ८८ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचलत एकूण २०३ किलो वजनाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी तिने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात थायलंड येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१ किलो वजनाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.

🏈🏈रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीराबाईची सहकारी संजिता चानू हिने १८५ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने १६८ किलो वजनासह कांस्यपदक प्राप्त केले.

🏈🏈मीराबाईने मंगळवारी साकारलेल्या या कामगिरीमुळे तिने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी मजल मारली. ती चीनची जियांग हुईहुआ (२१२ किलो) आणि होऊ झिहुई (२११ किलो) आणि कोरियाची री संग गम (२०९ किलो) यांच्यानंतर चौथ्या स्थानी आहे.

🏈🏈आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझ्याकडे अद्याप पुरेसा वेळ आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मी २१० किलो वजन उचलेन, अशी आशा आहे. प्रत्येक दिवस माझ्या कामगिरीत सुधारणा होत असून नियोजित रणनीतीनुसार सर्व काही गोष्टी घडत आहेत. आशियाई स्पर्धेत २०६ किलो वजन उचलण्याचा माझा प्रयत्न असेल. काही तांत्रिक बाबींवर मेहनत घेत आणि स्वत:ची शक्ती वाढवत ऑलिम्पिकमध्ये देशाचा नावलौकिक उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

23 व्या ई -गव्हर्नन्स परिषदेचा मुंबईत समारोप

📌ई-गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह.

📌मुंबई घोषणेतील दहा तरतुदीद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून विशेषत: आरोग्य, शेती, शिक्षण आणि भूमी सार्वजनिक सेवा सुधारण्याचे ध्येय्य

📌मुंबईला भारताची फिनटेक राजधानी म्हणून विकसित करु; मार्च 2020 मध्ये मुंबईत इंडिया फिन्टेक महोत्सवाचे आयोजनही करु: महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील.

📌देशाच्या सुप्रशासनासाठी ई-गव्हर्नन्स हा महत्त्वाचा भाग असून तळागाळातील व्यक्तींपर्यंत शासनाच्या सेवा सुविधा तसेच योजनांचा लाभ पोहोचवणे ही खरी या प्रकल्पाची लिटमस टेस्ट आहे.

📌त्यामुळे भारताच्या विकास प्रवासात ई-गव्हर्नन्स ही भविष्यातील गुरुकिल्ली ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय ईशान्य क्षेत्र
विकास, वैयक्तिक, जन तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अवकाश विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले. 

📌23 व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा समारोप आणि आणि ई गव्हर्नन्स तसेच हॅकेथोन  पारितोषिक प्रदान समारंभ आज मुंबईत एन.एस. सी. आय. डोम वरळी येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

📌केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सिंह पुढे म्हणाले, ई-गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ई राष्ट्रीय कृषी बाजार किंवा आयुष्मान भारत अशा योजनांसाठी व उत्तम प्रशासनासाठी ई-गव्हर्नन्स आवश्यक आहे.

📌हाती घेतलेल्या प्रकल्पाचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे की नाही, यावरून प्रकल्पाचे यशापयश ठरते. 

📌युवकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

📌केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाच्या विविध योजना गरीबांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबांसाठी समर्पित असलेले सरकार ही आपली ओळख सरकारने प्रस्थापित केली आहे.

📌किमान शासन, कमाल प्रशासन ह्या शासनाच्या ध्येयाशी अशा परिषदा सुसंगतच असल्याचे त्यांनी सांगितले.

📌 भारतीय फिन टेक महोत्सव मार्च 2020 मध्ये मुंबईत भरविण्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाला संपूर्ण पाठबळ पुरवेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

अभिमानास्पद ! 'ही' व्यक्ती होणार देशातील पहिली मूकबधिर सरपंच

✍मध्य प्रदेशातील घटना अनुसूचित जमातीतील एकमेव उमेदवार  अपंगत्वावर मात करून धाडस दाखविणाऱ्या लोकांचे नेहमीच कौतुक होत असते. मध्य प्रदेशातील दानसरी गावातील २७ वर्षीय मूकबधिर युवकाने सरंपच होण्याची तयारी केली असून, यानुसार तो भारतातील पहिला मूकबधिर सरपंच ठरण्याची शक्यता आहे.

✍इंदोरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दानसरी गावाची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. या गावात अलीकडेच ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे. रोटेशनप्रमाणे सरपंचपदी गावातील लोक लोकशाहीच्या मार्गाने निवडून येत आहेत. आता सरपंचपद अनुसूचित जमाती (एसटी)साठी सुटले असून गावातील एकमेव अनुसूचित जमातीतील मतदार असणारा मूकबधिर लालू हाच एकमेव सरपंचपदासाठी उमेदवार ठरू शकतो. दानसरी गावाची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र आगामी सरपंचपद एसटीसाठी सुटणार असल्याने गावकरी कामाला लागले आहेत.

✍लालू याचे आई-वडील त्याच्या लहानपणीच दगावले असून, तो शेतीकाम करत आहे. गावातील समस्या त्याला चांगल्या ठाऊक असून, तो सरपंच होण्यासाठी उत्सुक आहे. सामाजिक कार्यकर्ते ग्यानेंद्र पुरोहित हे लालूशी हातवारे, खुणा करत संवाद साधतात. याबाबत पुरोहित म्हणतात, की सरपंच होण्यासाठी लालूने तयारी दाखविली आहे. तो अर्ज भरण्यासाठी तयार आहे. सरपंच झाल्यानंतर तो गावात विकासकामे करू इच्छित आहे. रस्ते चांगले करण्याची तयारी आहे. मूकबधिर लोकांसाठीही त्याला काम करायचे आहे. लालूला सरपंच करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचार सुरू केला आहे.

✍लालू सरपंच झाल्यास मूकबधिर श्रेणीतील लोकांना प्रतिनिधित्व मिळेल, असे पुरोहित यांनी सांगितले. गावातील तरुण राहुल सोनाग्रा म्हणतो, की लालू हा फार शिकलेला नसला तरी गावातील समस्येची त्याला चांगली माहिती आहे. तो सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी काम करेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.

देशाला मिळाला सर्वात तरुण न्यायाधीश.

​​
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️21 वर्षीय मंयक प्रताप सिंह हा तरुण विधी सेवा परीक्षा 2018 उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कोर्टाचे कामकाज पाहणार आहे.

▪️तर 21 व्या वर्षीच तो आता कोर्टात निकाल सुनावणार आहे. या अभुतपूर्व यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

▪️मयंकने सन 2014 मध्ये राजस्थान विद्यापीठातून पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. त्याचा हा कोर्स याच वर्षी पूर्ण झाला आहे.

▪️सन 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा 23 वर्षे होती. मात्र, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 21 वर्षे केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आरक्षण बंधनकारक नाही.

✍सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास राज्ये बांधील नाहीत. तसेच पदोन्नत्यांमध्ये आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

✍तर न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. हेमंत गुप्ता  यांच्या खंडपीठाने उत्तराखंडमधील आरक्षणाबाबतच्या एका याचिकेवर नुकताच हा निकाल दिला.
तसेच ‘आरक्षण लागू करण्याचा कुठलाही आदेश न्यायालय राज्य सरकारांना देऊ शकत नाही,’ असेही सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्टपणे नमूद केले.

✍उत्तराखंडमधील सरकारी सेवांमधील सर्व पदे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण न देता भरण्याचा निर्णय राज्य सरकारने 5 सप्टेंबर 2012 रोजी घेतला होता.

✍त्याला उत्तराखंड उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

✍‘निर्धारित कायद्यानुसार सार्वजनिक पदांवरील नियुक्त्यांमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले जाऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे, पदोन्नत्यांच्या बाबतीतही राखीव जागा ठेवण्यास राज्य सरकार बांधील नाही.

✍तथापि, राज्य सरकारांना त्यांचा विशेषाधिकार वापरून आरक्षणाची तरतूद करण्याची इच्छा असेल; तर त्या संवर्गाचे सार्वजनिक सेवांमध्ये अपुरे प्रतिनिधित्व असल्याचे परिमाण ठरवता येण्याइतपत आकडेवारी सरकारला जमा करावी लागेल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

✍पदोन्नत्यांमध्ये आरक्षण देण्यास राज्य सरकार बांधील नसल्यामुळे उत्तराखंड उच्च न्यायालयाने  राज्य सरकारच्या निर्णयाला बेकायदा ठरवणे गैर असल्याची टिप्पणी करून, उत्तराखंड सरकारची सप्टेंबर 2012ची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली.

✍राज्य सरकारी सेवेत संबंधित समाजांचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचे निदर्शनास आल्यास राज्य सरकार नियुक्त्या आणि पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देऊ शकते. तसा अधिकार संविधानातील अनुच्छेद 16 (4) आणि 16 (4-ए)नुसार राज्य सरकारांना आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.

अंडर १९ वर्ल्डकप / बांगलादेश २२ वर्षात पहिल्यांदा चॅम्पियन; विश्वचषक जिंकणारा ठरला सातवा संघ

◾️बांगलादेश युवा संघाचा फायनलमध्ये चार वेळच्या चॅम्पियन भारतावर तीन गड्यांनी विजय बांगलादेश संघाचा १२ व्यांदा स्पर्धेत सहभाग

◾️२०१६ मध्ये सर्वाेत्तम तिसऱ्या स्थानावर धडक

◾️बांगलादेशच्या युवा संघाने रविवारी एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली.

◾️शहादतच्या नेतृत्वात बांगलादेश संघाने आयसीसीच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला.

◾️ बांगलादेशचा युवा संघ पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरला आहे.

◾️ टीमने स्पर्धेत १२ वेळा सहभागी हाेताना २२ वर्षात पहिल्यांदा ही वर्ल्डकपची ट्राॅफी पटकावली आहे.

◾️ याशिवाय वर्ल्डकप ट्राॅफी जिंकणारा बांगलादेश हा सातवा संघ ठरला.

◾️आशियाईतील संघांनी आतापर्यंत १३ पैकी सात वेळा विश्वविजेता हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे.

◾️📌यामध्ये भारतीय संघ सर्वाधिक चार वेळा या ट्राॅफीचा मानकरी ठरला आहे.

◾️याशिवाय पाकिस्तान आणि श्रीलंका संघाला प्रत्येकी एक वेळा हा वर्ल्डकप जिंकता आला आहे. त्यानंतर आता बांगलादेश यशस्वी संघ ठरला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पश्चिम बंगालमध्ये भाताच्या आर्सेनिक-प्रतिरोधक वाणाची लागवड केली गेली.


⭕️भारताच्या संशोधकांनी भाताचे (तांदूळ) आर्सेनिक-प्रतिरोधक वाण विकसित केले आहे. त्याच्या चाचणी यशस्वी ठरल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये त्याचे व्यापारीकरण केले गेले आहे.

⭕️भारतात पश्चिम बंगाल या प्रदेशामध्ये भूगर्भात आर्सेनिकचे प्रमाण अत्याधिक आहे. राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये 83 विभाग आहेत, ज्यात आर्सेनिकची पातळी मानवी आरोग्याच्या दृष्टीने ठरविलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.

💮नव्या वाणाविषयी...

⭕️“मुक्तोश्री (IET 21845)” असे नाव या भाताला देण्यात आले आहे. हे वाण जेनेटिकली मॉडीफाईड (JM) आहे म्हणजेच भात पिकाच्या मूळ संरचनेत बदल करण्यात आले आहेत.

⭕️पश्चिम बंगालच्या कृषी विभागाच्या अंतर्गत असलेले चिनसुरहमधले तांदूळ संशोधन केंद्र आणि लखनऊची राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था इथल्या संशोधकांनी संयुक्तपणे ही वाण विकसित केले आहे.
ही बियाणे राज्याच्या वेगवेगळ्या भागात ओल्या हंगामात आणि कोरड्या हंगामात यशस्वी चाचण्यानंतर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

⭕️चाचण्यांमधून असे आढळले की इतर विविध प्रकारच्या तांदळाच्या तुलनेत नव्या वाणामध्ये आर्सेनिकचे प्रमाण कमी प्रमाणात होते. या वाणाचे हिवाळ्याच्या हंगामात हेक्टरी 5.5 मेट्रिक टन आणि खरीप हंगामात हेक्टरी 4.5 ते 5 मेट्रिक टन उत्पादन घेतले जाऊ शकते.

💮आर्सेनिक पदार्थ...

⭕️आर्सेनिक नैसर्गिकरीत्या पृथ्वीच्या भूगर्भात विपुल प्रमाणात तसेच खडक, माती, पाणी आणि हवेमध्ये कमी प्रमाणात आढळते. हा पदार्थ बर्‍याच वेगवेगळ्या खनिजांमध्ये देखील आढळतो. वातावरणात असलेल्या आर्सेनिकपैकी एक तृतियांश भाग ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक स्त्रोतांकडून वातावरणात आला आहे आणि उर्वरित भाग मानवनिर्मित स्त्रोतांकडून आला आहे.

⭕️विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की आर्सेनिक हा रासायनिक घटक भूजळ आणि मातीपासून धान्याच्या माध्यमातून अन्न साखळीत प्रवेश करू शकतो.

⭕️जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आर्सेनिकचा दीर्घकाळ होणारा संपर्क विषबाधा होण्यास कारणीभूत ठरते. यामुळे त्वचेचे घाव आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.

११ फेब्रुवारी २०२०

आफ्रिका खंडातील सोमालिया सरकारने टोळधाडींमुळे देशात आणीबाणीची घोषणा केली आहे.

🎆 सोमालियामध्ये टोळ किड्यांची संख्या इतक्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे की तेथे अन्न धान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील कृषीमंत्रालयाने आणीबाणीची घोषणा करण्याची मागणी सरकारकडे केल्यानंतर आणीबाणी घोषित केली आहे.

🎆 सोमालियाच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “टोळांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. टोळधाडीचे प्रमाण वाढल्यामुळे देशातील अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांना अन्नधान्य पुरवणारी पिके या टोळधाडींमुळे नष्ट होत आहेत.

🎆 देशभरामध्ये अनेक ठिकाणी एकाचवेळी टोळांची संख्या हजारोंनी वाढली असून हे टोळ सामान्यपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. हे टोळ मोठ्याप्रमाणात पिके खात असल्याने देशाचा अन्नसुरक्षा कार्यक्रम धोक्यात आला आहे.”

✅ वाळवंटी टोळ म्हणजे काय?

🎆 सोमालियामध्ये ज्या टोळ किटकांमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे ते टोळ वाळवंटी टोळ म्हणून ओळखले जातात.

🎆 नाकतोडा प्रकारातील हे किटक टोळीटोळीने झाडांच्या पानांवर राहतात. प्रजननाच्या काळात यांची संख्या हजारोंच्या पटीत वाढते. आफ्रिकन देशांमध्ये अनेकदा पिकांवर किड लागते. टोळधाडही या भागातील देशांसाठी नवीन नाही. मात्र यंदा या टोळधाडींचे प्रमाण वाढले आहे. मागील २५ वर्षांमधील सर्वात वाईट परिस्थिती यंदा असल्याचे स्थानिक सांगतात.

✅ आधीही पडल्या आहेत टोळधाडी :

🎆 याआधीही सोमालियामध्ये १९९० च्या दशकामध्ये सहा वेळा अशाप्रकारे मोठ्याप्रमाणात टोळधाडींने उच्छाद मांडला होता. त्यानंतर २००३-०४ सालीही मोठ्याप्रमाणात अन्नधान्याची नासधूस केली होती.

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा

🅾महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज संध्याकाळीच विजया रहाटकर यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केला. एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत टिपण्णी केली होती. सरकार बदललं आहे.

🅾त्यामुळे विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यायला हवा आणि 5 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नेमणूक करावी असाही आदेश न्यायालयाने दिला होता. हा आदेश कायद्यातील तरतुदींविरोधात असल्याने रहाटकर यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं.

🅾मात्र आज विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण स्वतःहून राजीनामा देत असल्याचं विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. तसेच मागील साडेतीन वर्षांपासून आयोगाचे अध्यक्षपद सांभाळण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. बालकल्याण विभाग, आयोगाचे कर्मचारी या सगळ्यांचेच आभार विजया रहाटकर यांनी मानले आहेत.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...