११ फेब्रुवारी २०२०

खवल्या मांजरापासून कोरोना विषाणू मानवात आला: शोध


- चीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढले. संशोधनात असे आढळून आले आहे की खवल्या मांजर (पांगोलिन) या दुर्मिळ वन्यप्राणीपासून हा विषाणू मानवात आला आहे. खवल्या मांजराची आशियात सर्वाधिक तस्करी होते.

- चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे आणि हा आकडा वाढतच आहे. याचा उद्रेक वुहान शहरापासून झाला.

- संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे जैविक स्वरूप हे खवल्या मांजराच्या पेशीपासून मिळविण्यात आलेल्या जैविक स्वरूपाबरोबर 99 टक्के जुळतो. खवल्या मांजराची होणारी तस्करी यासाठी कारणीभूत असल्याचा संशय आहे.

-  चीनमध्ये पारंपरिक औषधांमध्ये या प्राण्याचा वापर केला जातो. तसेच, त्यांच्या मांसाला अधिक मागणी आहे.

- 2002-03 या साली देखील अश्याच SARS विषाणूचा चीनमध्ये उद्रेक झाला होता. तेव्हा विषाणू सिव्हेट या सस्तन प्राण्यापासून मानवांमध्ये आला होता.

▪️खवल्या मांजर

- स्तनिवर्गातल्या फोलिडोटा गणाच्या मॅनिडी कुलातला हा प्राणी आहे. या कुलात मॅनिस हा एकच वंश असून त्यात सात जाती आहेत.

- त्यांपैकी काही आफ्रिकेत व काही आशियात आढळतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतल्या मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात.

- खवल्या मांजराच्या दोन जाती भारतात आढळतात, त्या म्हणजे - भारतीय खवल्या मांजर (मॅनिस क्रॅसिकॉडेटा) आणि चिनी खवल्या मांजर (मॅनिस पेटॅडॅक्टिला).

- भारतीय जाती हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर आणि श्रीलंकेत आढळतात.

- चिनी जाती हिमालय, आसाम, नेपाळ, म्यानमार, दक्षिण चीन, हैनान आणि फॉर्मोसा या देशांमध्ये आढळतात.

उडान योजनेला मदत म्हणून 2024 पर्यंत आणखी 100 विमानतळ विकसित केले जाणार.


🔶चालू आर्थिक वर्षात ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी 22000 कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्ताव.
 
🔶केन्‍द्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री  निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत  2020-21 वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना संगितले की आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्वपूर्ण आहेत.

🔶म्हणूनच हा अर्थसंकल्प सर्व नागरिकांना सुलभ जीवनमान पुरवण्यासाठी समर्पित आहे.भारतीय सागरी बंदरांची कार्यक्षमता वाढवणे आणि तंत्रज्ञानाचा वापरातून त्यांची कामगिरी सुधारण्यावर भर देताना अर्थमंत्री म्हणाल्या कि सरकार किमान एका प्रमुख बंदराचे कंपनीत रूपांतर करण्याबाबत विचार करेल आणि त्यानंतर शेअर बाजारात ते सूचिबद्ध होईल.

🔶अंतर्गत जलमार्गाबाबत बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या कि राष्ट्रीय जलमार्ग-1 वर 'जल विकास मार्ग' पूर्ण केला जाईल आणि 2022 पर्यंत धुबरी-साडिया (890 किलोमीटर) जलमार्ग जोडणी पूर्ण केली जाईल.

🔶सीतारमण म्हणाल्या कि नदी किनाऱ्यालगत आर्थिक घडामोडी वाढवण्याच्या 'अर्थ गंगा ' या पंतप्रधानांच्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी योजना तयार आहे. देशात वाहतूक पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 1.70 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
➡️नागरी विमान क्षेत्राला चालना

🔶 उडान योजनेला मदत म्हणून 2024 पर्यंत आणखी 100 विमानतळ विकसित केले जातील अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्या म्हणाल्या कि जागतिक सरासरीच्या तुलनेत भारताच्या हवाई वाहतुकीत वेगाने वाढ झाली आहे. या कालावधीत विमानांची संख्या सध्याच्या 600 वरून 1200 पर्यंत जाईल अशी शक्यता त्यांनी अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केली.

🔶2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याच्या दिशेने अर्थमंत्र्यांनी "कृषी उडान" या नागरी विमान मंत्रालयाच्या कार्यक्रमाची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मार्गांवर हा कार्यक्रम राबवला जाईल.

🔶यामुळे ईशान्य आणि आदिवासी जिल्ह्यांना कृषिमालाला योग्य मूल्य मिळवण्यात मदत होईल.
 
➡️ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा

🔶अर्थमंत्र्यांनी 2020-21 मध्ये ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी 22000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

🔶सर्व राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशाना पुढील तीन वर्षात पारंपरिक मीटर्सच्या जागी स्मार्ट मीटर्स बसवणे आणि वीज वितरण कंपन्यांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली आहे.

🔶राष्ट्रीय गॅस ग्रीडचा विस्तार सध्याच्या 16200 कि.मी. वरून 27000 किमी पर्यंत वाढवणे आणि पारदर्शक किंमत निर्धारण आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी आणखी सुधारणा करण्यात येतील असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

🔶अर्थमंत्र्यांनी वीज निर्मिती क्षेत्रातील नवीन देशांतर्गत कंपन्यांना 15% कॉर्पोरेट कर आकारण्याचा  प्रस्तावही दिला.

फेब्रुवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार

📌अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प भारत भेटीवर येऊ शकतात. त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी सुरु आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग खटल्याची सुनावणी पुढच्या आठवडयात सुरु होऊ शकते. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्यावेळीच त्यांच्याविरोधात अमेरिकेत हा खटला सुरु असेल असा अंदाज आहे.

📌ट्रम्प यांच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी दोन्ही देश संपर्कात असून, सोयीच्या तारखा ठरवण्यासाठी चर्चा सुरु आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ट्रम्प आणि मोदी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या द्विपक्षीय व्यापार करारासह अन्य करारांवर स्वाक्षरी करु शकतात.

📌भारताची आर्थिक विकासाची गती सध्या मंदावली असून, सीएए कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा दौरा होत आहे. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम झाला होता.

📌डोनाल्ड ट्रम्पही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोदी यांचा हात हातात घेऊन त्यांनी संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मागच्यावर्षी ट्रम्प यांनी भारताचे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 10 फेब्रुवारी 2020.


❇ 10-14 फेब्रुवारी: आर्थिक साक्षरता आठवडा

❇ थीम 2020: "मायक्रो, लघु आणि मध्यम उपक्रम (एमएसएमई)"

❇ एचएएलला हलकी उपयुक्तता हेलिकॉप्टर तयार करण्यास मान्यता मिळाली

❇ भारती एअरटेल सह टाटा समूहाच्या विलीनीकरण मंत्रालयाने मंजूर केले

❇ अंतरावरील 328 दिवस घालवल्यानंतर क्रिस्टीना कोच पृथ्वीवर परतली

❇ सेंट्रल बँकेने रेपो दर 5.15% वर बदलला आहे.

❇ रिव्हर्स रेपो दर 4..90 % वर न बदललेला राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

❇ राजस्थान सरकार ट्रान्सजेंडर समुदायासाठी स्वतंत्र ओळखपत्र तयार करेल

❇ आंध्र प्रदेशातील प्रथम दिशा पोलिस स्टेशनचे राजमहेंद्रवाराम येथे उद्घाटन झाले

❇ आयआयएम बेंगळुरू बिझिनेस स्कूलमध्ये एमओसीच्या जागतिक कामगिरीच्या कामगिरीमध्ये तिसरा या क्रमांकावर आहे

❇ गाझियाबाद पोलिसांनी सर्व ऑटोरिक्षा चालकांची ओळख पटविण्यासाठी 'ऑपरेशन नकईल' सुरू केले.

❇ नेपाळचा कुशल मल्ला (15) एकदिवसीय अर्धशतक झळकावणारा युवा क्रिकेटर ठरला.

❇ सीरियाच्या एलडीलिब प्रांतात मानवतावादी कारवायांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने 30 दशलक्ष डॉलर्स जाहीर केले

❇ हैदराबाद मेट्रो रेल भारताचा दुसरा सर्वात मोठा ऑपरेशनल मेट्रो प्रकल्प झाला

❇ MoHUA ने राहण्याची सुलभता आणि नगरपालिका कामगिरी निर्देशांक 2019 ची सुरूवात केली

❇ जानेवारी 1, 2020 पर्यंत एलपीजी कव्हरेज .96.9..% पर्यंत पोहोचली: शासन

❇ एडीबीने कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी 2 दशलक्ष डॉलर्सच्या निधीस मंजुरी दिली

❇ बिबट्यांची लोकसंख्या भारतात घटून 75-90% झाली आहे

❇ अमेरिकन लेखक रॉजर कहान यांचे नुकतेच निधन झाले

❇ हरियाणा सरकारने मुक्तामंत्र परिवार समृध्दी योजना सुरू केली

❇ आयकर (आयटी) विभागाने "ई-कॅल्क्युलेटर" चे अनावरण केले

❇ मनोज दास यांना गूढ कलिंग साहित्य पुरस्कार मिळाला

❇ ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये गूढ कलिंग महोत्सव आयोजित

❇ मुंबई येथे ई-गव्हर्नन्स विषयी 23 वे राष्ट्रीय परिषद आयोजित

❇ जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पिनेलोपी कौजियानो गोल्डबर्ग राजीनामा

❇ 64 व्या बोकस्काई मेमोरियल टूर्नामेंट हँगरी मधील डेब्रेसेन मध्ये आयोजित

❇ आयओसी लाइफटाइम पुरस्कारांमध्ये पुलेला गोपीचंद यांचा सन्माननीय उल्लेख

❇ फेड कप मार्चमध्ये दुबईमध्ये होणार: आयटीएफ

❇ दक्षिण आफ्रिकेत यु -20 वर्ल्ड कप 2020 चे 13 वे संस्करण

❇ बांगलादेशने यू 19 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी विकेट्सद्वारे भारताला हरवले

❇ बांगलादेश प्रथम जिंकलेला यू 19 विश्वचषक विजेतेपद

❇ नसीम शाह कसोटी हॅट-ट्रिक घेण्यासाठी सर्वात तरुण गोलंदाज बनला

❇ सरकार सर्जिकल मुखवटे, निर्यात बंदी यादीतील दस्ताने काढून टाकते.

१० फेब्रुवारी २०२०

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

💝💝💝💝💝:
⚛⚛ "थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

⚛⚛ लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

⚛⚛ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

⚛⚛ सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास

⚛⚛ 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. गणेश वासुदेव जोशी

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. जगन्नाथ शंकर शेठ✅

⚛⚛ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार

B) भारत आणि नेपाळ

C) भारत आणि बांग्लादेश

D) भारत आणि थायलँड

उत्तर :- A) भारत आणि म्यानमार

स्पष्टीकरण: ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या बंडखोर गटांच्या म्यानमारच्या सीमेवरील शिबिरांना नष्ट करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि म्यानमार ऑपरेशन सनराइझ नावाने एक संयुक्त मोहीम राबववित आहे.

⚛⚛कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
उत्तर :- B) म्यानमार
स्पष्टीकरण: भारत आणि म्यानमारने संयुक्तपणे कलादन प्रकल्प सुरू केला आहे. कलादन प्रकल्प म्यानमारमधील सिट्टवे बंदराला भारत-म्यानमार सीमेशी जोडते. जळमार्गे मालवाहतुकीसाठी बहुउद्देशीय व्यासपीठ तयार करण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला आहे.

⚛⚛राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113
उत्तर :- C-कलम 112

⚛⚛कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही

⚛⚛'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी

(1) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी

(2)निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी

2)दोडाबेटा✅✅

3) अन्ना मलाई

4) उदकमडलम

⚛⚛संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

 १) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

⚛⚛संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत किती देशांचा समावेश होतो?

     1) 192  
     2) 190
     3) 194
     4) 193  
उत्तर :पर्याय : ४

⚛⚛दक्षिण आणि उत्तर सह्याद्री _______नावाच्या खिंडीमुळे वेगळे झाले आहेत

1.    पालघाट
2.    बालघाट
3.    दोडाबेट्टा
4.    अनयमुडी  

⏩⏩उत्तर :पर्याय : १

⚛⚛श्रीशैलम  जवळ ________नदीने केलेली  घळई प्रसिद्ध आहे

1.    गोदावरी 
2.    कृष्णा
3.    नर्मदा
4.    वैनगंगा  

⏩⏩उत्तर :पर्याय : २

⚛⚛_______ही तापीची प्रमुख उपनदी आहे 

1.    महानदी
2.    पूर्णा 
3.    मांजरा
4.    इंद्रावती  

⏩⏩उत्तर :पर्याय : २

ऑस्कर पुरस्कार 2020

अमेरिकी प्रमाणवेळेनुसार ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी होईल.

Que: ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार किती वाजता बघता येईल?
भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजता हा पुरस्कार सोहळा सुरु होईल.

Que: ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा कुठल्या वाहिनीवर लाइव्ह बघता येईल?
स्टार मुव्हीज आणि स्टार मुव्हीज सिलेक्ट एचडी या वाहिन्यांवर तुम्हाला हा पुरस्कार सोहळा लाइव्ह पाहाता येईल. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. शिवाय हॉटस्टार आणि हुलू या ऑनलाईन अ‍ॅपवर देखील ऑस्कर पाहाता येईल.

Que: ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा कुठे होतो?
कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा होईल. ‘अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो.

Que: ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन कोण करणार?
जगभरातील कलाकारांच्या नजरा लागून राहिलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन यंदाच्या वर्षात कोणताही व्यक्ती करणार नाही. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या मदतीने यंदाचे सूत्रसंचालन केले जाणार आहे.

Que: ऑस्कर पुस्कार कोणाच्या हस्ते दिला जाणार?
लिओनार्डो दीकॅप्रिओ, अ‍ॅमी अ‍ॅडम्स, सॅम्युअल एल जॅक्सन, स्कार्लेट जॉन्सन, ड्वाइन जॉन्सन, ब्री लार्सन, हॅले बेरी, जॅमी डोर्नन, डकोटा जॉन्सन, एमा स्टोन, चार्लीझ थेरॉन यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या हस्ते ऑस्कर पुरस्काराचे वितरण केले जाईल.

Que: यंदाच्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याचे वैशिष्टय काय?
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे 'जोकर'. या कॉमिक बूक खलनायकाला एक, दोन नव्हे तर तब्बल ११ विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्याआधी हा पराक्रम १९६९ साली ‘ऑल अबाउट इव्ह’ आणि १९९७ साली ‘टायटॅनिक’ या चित्रपटांनी केला होता.

चालू घडामोडी प्रश्नसंच 10/02/2020


♻️♻️
निवृत्तीवेतन निधी नियंत्रण विकास प्राधिकरणाने (PFRDA) निधी सांभाळणाऱ्या व्यवस्थापकांसाठी असलेली किमान निव्वळ मालमत्ता मर्यादा 25 कोटी रुपायांवरून ____ रुपये एवढी वाढवली आहे.
(A) 75 कोटी
(B) 50 कोटी✅✅
(C) 125 कोटी
(D) 200 कोटी

♻️♻️
कोणत्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करण्याकरीता पहिले दिशा पोलीस ठाणे उघडले गेले?
(A) तेलंगणा
(B) आंध्रप्रदेश✅✅
(C) झारखंड
(D) हरयाणा

♻️♻️
कोणता देश प्रथमच जनगणनेदरम्यान तृतीयलिंगी लोकांची (LGBT) संख्या मोजणार आहे?
(A) बांग्लादेश
(B) भारत
(C) नेपाळ✅✅✅
(D) पाकिस्तान

♻️♻️
__________ या संस्थेनी जगातले पहिले बुलेटप्रूफ हेल्मेट विकसित केले आहे.
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
(B) भारतीय भूदल✅✅✅
(C) आयुध कारखाना मंडळ
(D) यापैकी नाही

♻️♻️
चीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ कोणत्या सस्तन प्राण्यामध्ये असल्याचे शोधून काढले?
(A) पेंग्विन
(B) सरडा
(C) सॅलामेंडर
(D) खवल्या मांजर♻️🚩✅

♻️♻️
फेब्रुवारी 2020 मध्ये पिनेलोपी कौजियानो गोल्डबर्ग ह्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला; त्या कोणत्या बँकेच्या माजी मुख्य अर्थशास्त्री होत्या?
(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(B) जागतिक बँक✅✅
(C) भारतीय रिझर्व्ह बँक
(D) युरोपियन सेंट्रल बँक

♻️♻️
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन या कंपनीने वर्षाला 2 दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला?
(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) इराक
(C) रशिया✅✅✅
(D) इराण

♻️♻️
कोणत्या देशाच्या राजकुमाराने भारतातल्या बालकांसाठी संरक्षण निधी घोषित केला?
(A) सौदी अरब
(B) ब्रिटन✅✅✅
(C) संयुक्त अरब अमिराती
(D) कतार

♻️♻️
कोणत्या व्यक्तीची भारतामधले ब्रिटनच्या उच्चायुक्तपदी नेमणूक झाली?
(A) फिलिप बार्टन✅✅✅✅
(B) डोमिनिक अॅसक्विथ
(C) केंजी हिरामात्सु
(D) ऑस्टिन फर्नांडो

♻️♻️
कोणत्या देशाने भारतीय पारपत्र धारकांसाठी विनाशूल्क प्रवास सुविधा रद्द केली?
(A) श्रीलंका
(B) मालदीव
(C) भुटान✅✅✅
(D) नेपाळ

♻️♻️
____________ यांच्यावतीने ‘आर्थिक साक्षरता आठवडा 2020’ आयोजित करण्यात येणार.
(A) भारतीय रिझर्व्ह बँक✅✅✅
(B) अर्थमंत्रालय
(C) भारतीय स्टेट बँक
(D) यापैकी नाही

जगात कुठेही खेळ शकनारी व्यवसायिक फुटबॉलपटू बनणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू कोन ?
1] अदिति चौहान
2] तनवी हंस
3] ओइनम बेतबेम देवी
4] बाला देवी✅✅

भारतातील कोणत्या राज्य  सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास करण्यासाठी गॕरंटी कार्ड प्रस्तुत केले आहे ?

   1] केरळ
   2] गुजरात
   3] महाराष्ट्र
   4] दिल्ली✅✅✅

०९ फेब्रुवारी २०२०

खुशखबर; लवकरच मोठी भरती

💁‍♂ लोकसेवा आयोगाने यावर्षी पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क या विभागांमधील पदांच्या भरतीचे नियोजन केले आहे.

👉 पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा कधी होतील, जाहिरात कधीपर्यंत प्रसिध्द होईल याचेही नियोजन करुन अर्थ विभागाला सादर केले आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला तर मुख्य परीक्षा 2, 3, 4 ऑगस्ट 2020 मध्ये घेतली जाणार आहे.

🧐 *परीक्षेचे नियोजन :*

▪ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदांडाधिकारी प्रथम वर्गची पूर्वपरीक्षा 1 मार्चला तर मुख्य परीक्षा 14 जूनला घेण्याचे नियोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

▪ राज्य परिवहन विभागात मोठ्या प्रमाणावर सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे रिक्‍त असून या पदांची भरतीही केली जाणार आहे. 15 मार्चला या पदांसाठी पूर्वपरीक्षा होणार असून 12 जुलैला मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.

▪ महाराष्ट्र दुय्यमसेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा 3 मे रोजी होणार असून मुख्य परीक्षा घेण्याचेही नियोजन ठरले आहे. या विभागाकडून आयोगाला मागणीपत्र प्राप्त झाले असून या पदांच्या भरतीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

▪ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2020, पेपर क्रमांक दोन (लिपीक- टंकलेखक), दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन, कर सहायक मुख्य परीक्षा पेपर क्र. दोन आणि महाराष्ट कृषी सेवा परीक्षांचे नियोजन ठप्प आहे.

▪ अभियांत्रिकी सेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा 17 मे रोजी घेण्याचे नियोजन आहे, परंतु, मुख्य परीक्षेचे नियोजन ठरलेले नाही.

📍 दरम्यान, वनसेवा परीक्षेचे नियोजन करुनही मागणीपत्र नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे.

मेरठ येथे प्राण्यांसाठीचे पहिले युद्ध स्मारक नियोजित


--------------------------------------------------------
● प्राण्यांसाठीचे पहिले युद्ध स्मारक मेरठ येथे नियोजित

● ठिकाण :- मेरठ, उत्तर प्रदेश

● योजना :- भारत सरकार

★ विशेषता :- भारताचे पहिले प्राण्यांसाठीचे युद्ध स्मारक

● उभारणी केंद्र :- रिमाउंट आणि पशुवैद्यकीय केंद्र (Remount and Veterinary Corps - RVC) केंद्र आणि महाविद्यालय, मेरठ

----------------------------------------------

🚂 भारतीय रेल्वेचा पहिला कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प भुवनेश्वरमध्ये सुरू 🚂
-----------------------------------------------------
● भुवनेश्वरमध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा भारतीय रेल्वेचा पहिला सुरू

● ठिकाण :- मंचेश्वर कॅरेज दुरुस्ती कार्यशाळा, भुवनेश्वर

● उभारणी सहकार्य:  पूर्व किनारा रेल्वे झोन

काँग्रेसचे माजी खासदार राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले विश्वस्त


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
√सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे.

√ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली. ट्रस्टच्या विश्वस्तांची निवडही सरकारकडून करण्यात आली असून, काँग्रेसकडून दोन वेळा खासदार राहिलेले के. परासरन हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे पहिले विश्वस्त आहेत.
- परासरन यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात केंद्रात महाधिवक्ता म्हणूनही काम केलं आहे.

√ राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली.
- ट्रस्टवर १५ विश्वस्त नेमले जाणार आहेत. त्यातील दहा जणांची निवड केंद्र सरकारनं केली आहे.
-  त्यात पहिलं नाव काँग्रेसचे माजी खासदार के. परासरन याचं आहे..

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

🎯 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)

🎯 देशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?
- डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी

🎯 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?
- अब्दुल कलम आझाद

🎯 तुरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?
- सुभाषचंद्र बोस

🎯 तुरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?
- चित्तरंजन दास

🎯 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?
- नेहरु अहवाल

🎯 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?
- लोकमान्य टिळक

🎯अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?
- महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...