०६ फेब्रुवारी २०२०

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला

​​

◾️भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

◾️या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

✍होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी

◾️पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे.

◾️होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे.

◾️ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

◾️या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत.

◾️कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते

महाभियोग खटल्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय

◾️ अमेरिकनं सिनेटनं ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावले आहे.

◾️सिनेटनं आरोपातून निर्दोष मुक्तता केली असून, ट्रम्प यांचा विजय झाला आहे.

◾️ रिपब्लिकन पक्षाने ५२-४८ च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.

◾️ काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून ५३-४७ मतांनी ट्रम्प यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं.

◾️अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला अवघे दहा महिने उरलेले असताना तेथे हे राजकीय नाटय़ सुरू आहे.

◾️ सत्तेचा गैरवापर करणे आणि काँग्रेसच्या कामात अडथळे आणणे, असे दोन आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होते.

◾️या सुनावणीच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस होते.

◾️अमेरिकी लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत महाभियोगाची कारवाई अध्यक्षांवर होण्याची ही तिसरी वेळ आहे.

 

किसान रेलच्या निर्मितीचे कार्य सुरु.

🎆 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी किसान रेलची निर्मिती करण्याकरता साचेबद्ध रीतीने कार्य सुरु आहे, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. 

🎆 किसान रेलची व्याप्ती संपूर्ण देशभर करावी या हेतुने नियोजन सुरु असल्याचे रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी आज वार्ताहारांशी बोलताना सांगितले.

🎆 रेल्वेला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचं इंजिन बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले. 

आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर.

🎆 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. नागरिकांचं उत्पन्न आणि खर्चाची क्षमता वाढवणं हा याअर्थसंकल्पाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

🎆 या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट हे महत्त्वाकांक्षी भारत, सर्वंकष आर्थिक विकास आणि सर्वसामान्यांची काळजी या तीन मुद्द्यांवर अर्थसंकल्प आधारित असल्याचे त्या म्हणाल्या.

🎆 आयकराविषयी नवी व्यवस्था सुरु करण्यासह,त्याअंतर्गत मोठ्या करकपातीची घोषणाही सीतारामण यांनी आज केली.

🎆 यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेले आयकराचे दर आतापर्यंतचे सर्वात कमी दर असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

🎆 नव्या व्यवस्थेअंतर्गत ५ लाख रूपये ते ७.५ लाख रूपयांपर्यंत उत्पन्नासाठी सध्याच्या २० टक्क्यांऐवजी १० टक्के, ७.५ लाख दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी सध्याच्या २० टक्क्यांऐवजी १५ टक्के, तर १० ते १२.५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी सध्याच्या ३० टक्क्यांऐवजी २० टक्के आणि १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी २५ टक्के कर द्यावा लागेल अशी घोषणा त्यांनी केली.

🎆 १५ लाख रुपयांच्यावर उत्पन्न असलेल्यांना सध्याचा ३० टक्के करदर कायम राहील,तर पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल असं त्यांनी सांगितलं.

🎆 नवी आयकर व्यवस्था करदात्यांसाठी वैकल्पिक असेल, करदात्यांना जुन्या सवलती किंवा नव्या व्यवस्थेचा पर्याय निवडण्याची मुभा असेल, असंही त्यांनी सांगितलं.

🎆 लाभांश वितरण कर हटविण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केली.

🎆 आता कंपन्यांना लाभांश वितरण कर भरावा लागणार नाही. मात्र लाभांश मिळालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या कर मर्यादेनुसार कर भरावा लागेल.

🎆 बँकांमधील ठेवीदारांना दिलासा देताना अर्थमंत्र्यांनी आता ठेवींना ५ लाखांपर्यंतचे वीमा संरक्षण देण्याची घोषणा केली.

🎆 सध्या ठेवींना केवळ १ लाखापर्यंतचे वीमा संरक्षण मिळते. त्यामुळे संकटात असलेल्या बँकांमधील ठेवीदारांना ५ लाखापर्यंत रुपये मिळू शकतील. #Investment

🎆 प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत मिळत असलेली कर सवलत आणखी वर्षभरासाठी कायम असेल, ३१ मार्च २०२१ पर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी घोषणात्यांनी केली. #Scheme

🎆 स्वस्त घरांसाठीच्या योजनांना परवानगी देण्यासाठीच्या कालावधीसाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणाही त्यांनी केली. 

🎆 अनुसूचित जाती आणि ओबीसींसाठी आगामी आर्थिक वर्षात ८५ हजार कोटी रुपये, अनुसूचित जमातींसाठी ५३ हजार ७०० कोटी रुपये, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी ९ हजार ५०० कोटीं रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

🎆 एल.आय.सी. मधल्या केंद्र सरकारचा काही हिस्सा आयपीओद्वारे विकण्याची प्रस्तावही सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून मांडला. 

🎆 सरकारी पेन्शन ट्रस्ट पीएफआरडीएपासून स्वतंत्र करण्याची घोषणाही त्यांनी केली.

🎆 अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी केंद्रीय भरती संस्था स्थापन केली जाईल, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संगणकाधारित परीक्षा घेतली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. 

🎆 नागरिकांनी २०१९ च्या निवडणुकीत केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारला देशाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी मोठा जनादेश दिला होता, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांनी हा विश्वास सार्थ ठरवला असं सीतारामन यांनी सांगितलं. 

🎆 २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून शेतकऱ्यांच्या हितासाठी १६ कलमी कृती आराखडा आखल्याचं त्यांनी सांगितलं.

🎆 पाण्याची समस्या असलेल्या जिल्ह्यांसाठी व्यापक उपाययोजनांसह तरतूदी केल्याचं त्यांनी सांगितलं.

🎆 येत्या वर्षात १५ लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरित करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्या म्हणाल्या.

🎆 नाबार्डच्या पुनर्पतपुरवठा योजनेचा विस्तार केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. 

🎆 देशातल्या २० लाख शेतकऱ्यांना सौर पंपासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. अन्नदात्याला उर्जादाता बनवण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

🎆 वीज निर्मितीसाठी नापिक जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्याची आणि विद्युत कंपन्यांना ती वीज विकण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली जाईल अशी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली. 

🎆 ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मत्‍स्‍य व्यवसाय क्षेत्राच्या विकासाला प्राध्यान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

🎆 नाशवंत कृषीमालाच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागिदारीतून किसान रेल्वे योजना सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.

महाराष्ट्र - राज्यव्यवस्था व शासनव्यवस्था - महाराष्ट्रातील केंद्राच्या अखत्यारीतील संशोधन संस्था

* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटीऑरॉजी - पुणे

* सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला - पुणे

* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई

मध्यवर्ती संशोधन संस्था

* वुल रिसर्च असोसिएशन - मुंबई

* नॅशनल केमिकल लेबॉरेटरी - पाषाण पुणे

* मुंबई टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन - मुंबई

* नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट - नागपूर

* ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया - पुणे

संरक्षण मंत्रालयाने चालविलेल्या संस्था

* इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी - पुणे

* आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट - पुणे

* एक्सप्लोझिव्ह रिसर्च अँड डेव्हलोपमेंट लॅबोरेटरी - पुणे

* रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनिअर्स - दिघी पुणे

* नेव्हल केमिकल अँड मेटॉलॉजिकल लॅबोरेटरी - मुंबई

* हाय एनर्जी मटेरियल रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट एस्टॅब्लिशमेंट - अहमदनगर

अणुसंशोधन संस्था

* भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर - मुंबई

* इंडियन रेअर अर्थ लिमिटेड - मुंबई

* टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च - मुंबई

* ऍटोमिक पॉवर प्लॅन्ट - तारापूर - ठाणे

* न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड - मुंबई

अणुक्षेत्रातील अनुदानित संशोधन संस्था

* सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स - मुंबई

* टाटा मेमोरियल सेंटर - मुंबई

* ऍटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी - मुंबई

* बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्सेस - मुंबई

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन संस्था

* नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट [ NARI ] - भोसरी

* आय. सी. एम. आर. जेनेटिक रिसर्च सेंटर - मुंबई

* इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी - पुणे

* इंट्रोव्हायरस रिसर्च सेंटर - मुंबई

* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे

* हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई

* इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसिन - मुंबई

* जसलोक रिसर्च सेंटर - मुंबई

* रिजनल कॅन्सर सेंटर - टाटा मेमोरियल हॉस्पिटल - मुंबई

* इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्शन - मुंबई

* ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन - मुंबई

* इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई

* कुत्रिम अवयव केंद्र - वानवडी पुणे

भारतीय कृषी संशोधन संस्था

* कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी, मुंबई

* नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनींग - नागपूर

* सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च - नागपूर

* सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन - मुंबई

* नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सिट्स - नागपूर

* नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स - पुणे

प्रशिक्षण संशोधन संस्था

* आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट - पुणे

* भारत इतिहास संशोधन मंडळ - पुणे

* फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट - पुणे

* भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे

* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था - पुणे

* भारतीय ऍग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन - उरळी कांचन - पुणे

* मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटी - मुंबई

* टेक्सटाईल इन्स्टिट्युट, इचलकरंजी - कोल्हापूर

पोलीस भरती प्रश्नसंच

1)कोणत्या व्यक्तीला ‘द बॅंकर’ या मासिकाकडून ‘सेंट्रल बॅंकर ऑफ द इयर 2020 - एशिया-पॅसिफिक’ सन्मान बहाल करण्यात आला?
(A) बी. पी. कानुनगो
(B) रजनीश कुमार
(C) शक्तिकांत दास.  √
(D) के. व्ही. कामत

2)कोणता देश राष्ट्रकुल समुहाचा 54 वा सदस्य बनला?
(A) मालदीव.  √
(B) बोत्सवाना
(C) झिंबाब्वे
(D) श्रीलंका

3)_________ या कंपनीने त्याच्या व्यापारी भागीदार आणि SME उद्योगांसाठी ‘ऑल-इन-वन अण्ड्रोइड PoS’ उपकरण सादर केले आहे.
(A) फोनपे
(B) पेटीएम.  √
(C) भारतपे
(D) मोबिक्विक

4)कोणती व्यक्ती इराक देशाचे नवे पंतप्रधान आहेत?
(A) मो. तौफिक अल्लावी.  √
(B) आदिल अब्दुल-महदी
(C) नूरी अल-मालिकी
(D) बारहम सालिह

5)कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोर कुमार सन्मान देण्यात आला?
(A) आशुतोष राणा
(B) वहीदा रहमान.  √
(C) अमिताभ बच्चन
(D) सलीम खान

6)कोणत्या देशाने टोळधाडीला प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे?
(A) सोमालिया
(B) पाकिस्तान
(C) (A) आणि (B).  √
(D) यापैकी नाही

7)कोणती व्यक्ती प्रथम ‘मातृभूमी बुक ऑफ द ईयर’ पुरस्काराची विजेता ठरली?
(A) विनोद कुमार शुक्ला.  √
(B) अरुंधती रॉय
(C) सलमान रश्दी
(D) विक्रम सेठ

8)भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून (BCCI) क्रिकेट सल्लागार समितीवर (CAC) किती सदस्य नेमण्याची घोषणा करण्यात आली?
(A) पाच
(B) दोन
(C) सात
(D) तीन.  √

9)कोणत्या शहरात भारतीय नौदलाचा ‘मतला अभियान’ हा तटीय सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता?
(A) विशाखापट्टणम
(B) कोलकाता.  √
(C) मुंबई
(D) यापैकी नाही

10)कोणत्या व्यक्तीची श्रीलंका देशातले भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली?
(A) गोपाळ बागळे.  √
(B) अजय बिसारिया
(C) मनजीव सिंग पुरी
(D) यापैकी नाही

चालू घडामोडी प्रश्नसंच


♻️♻️
कोणत्या राज्याने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रथम क्रमांक पटकवला?
(A) उत्तरप्रदेश
(B) मध्यप्रदेश✅✅
(C) केरळ
(D) तेलंगणा

♻️♻️
‘अर्थसंकल्प 2020-21’मध्ये हरित ऊर्जेच्या उपकरणांवरील आयात शुल्क ____ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे.
(A) 25 टक्के
(B) 30 टक्के
(C) 20 टक्के✅✅
(D) 15 टक्के

♻️♻️
कोणत्या देशाने स्तनपानास समर्थन देणारी धोरणे आणि कार्यक्रम राबविण्याच्या संदर्भात जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला?
(A) बांगलादेश
(B) नॉर्वे
(C) भुटान
(D) श्रीलंका✅✅

♻️♻️
कोणत्या दिवशी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो?
(A) 3 फेब्रुवारी
(B) 4 फेब्रुवारी✅✅
(C) 6 फेब्रुवारी
(D) 1 फेब्रुवारी

♻️♻️
ICCच्या ताज्या क्रमवारीत कसोटी फलंदाजाच्या मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?
(A) रोहित शर्मा
(B) के. एल. राहुल
(C) स्टीव्हन स्मिथ
(D) विराट कोहली✅✅

♻️♻️
कोणत्या शहरात संपर्क कार्यालय स्थापन करण्यासाठी CSIR-CFTRI या संस्थेनी APEDA बरोबर सामंजस्य करार केला?
(A) गुवाहाटी✅✅
(B) पुणे
(C) नागपूर
(D) नवी दिल्ली

♻️♻️
चीनबाहेर कोणत्या देशात कोरोनाव्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली?
(A) भारत
(B) मालदीव
(C) फिलीपिन्स✅✅
(D) जापान

♻️♻️
कोणत्या शहरात ‘काला घोडा कला महोत्सव’ आयोजित करण्यात आला?
(A) नवी दिल्ली
(B) नागपूर
(C) मुंबई✅✅
(D) अहमदाबाद

♻️♻️
कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी महिन्याभर चालणारा “एक्युषी पुस्तक मेळावा’ याचे उद्घाटन केले?
(A) श्रीलंका
(B) बांगलादेश✅✅
(C) भारत
(D) मालदीव

♻️♻️
कोणत्या व्यक्तीला ‘द बॅंकर’ या मासिकाकडून ‘सेंट्रल बॅंकर ऑफ द इयर 2020 - एशिया-पॅसिफिक’ सन्मान बहाल करण्यात आला?
(A) बी. पी. कानुनगो
(B) रजनीश कुमार
(C) शक्तिकांत दास✅✅
(D) के. व्ही. कामत

♻️♻️
कोणता देश राष्ट्रकुल समुहाचा 54 वा सदस्य बनला?
(A) मालदीव✅✅
(B) बोत्सवाना
(C) झिंबाब्वे
(D) श्रीलंका

♻️♻️
_____ या कंपनीने त्याच्या व्यापारी भागीदार आणि SME उद्योगांसाठी ‘ऑल-इन-वन अण्ड्रोइड PoS’ उपकरण सादर केले आहे.
(A) फोनपे
(B) पेटीएम✅✅
(C) भारतपे
(D) मोबिक्विक

♻️♻️
कोणती व्यक्ती इराक देशाचे नवे पंतप्रधान आहेत?
(A) मो. तौफिक अल्लावी✅✅
(B) आदिल अब्दुल-महदी
(C) नूरी अल-मालिकी
(D) बारहम सालिह

♻️✅♻️
कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोर कुमार सन्मान देण्यात आला?
(A) आशुतोष राणा
(B) वहीदा रहमान✅✅
(C) अमिताभ बच्चन
(D) सलीम खान

♻️♻️
कोणती व्यक्ती प्रथम ‘मातृभूमी बुक ऑफ द ईयर’ पुरस्काराची विजेता ठरली?
(A) विनोद कुमार शुक्ला✅✅✅
(B) अरुंधती रॉय
(C) सलमान रश्दी
(D) विक्रम सेठ

♻️✅♻️
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून (BCCI) क्रिकेट सल्लागार समितीवर (CAC) किती सदस्य नेमण्याची घोषणा करण्यात आली?
(A) पाच
(B) दोन
(C) सात
(D) तीन✅✅

♻️✅
कोणत्या शहरात भारतीय नौदलाचा ‘मतला अभियान’ हा तटीय सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता?
(A) विशाखापट्टणम
(B) कोलकाता✅✅
(C) मुंबई
(D) यापैकी नाही

♻️♻️
कोणत्या व्यक्तीची श्रीलंका देशातले भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली?
(A) गोपाळ बागळे✅✅
(B) अजय बिसारिया
(C) मनजीव सिंग पुरी
(D) यापैकी नाही

♻️♻️
कोणत्या राज्याने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रथम क्रमांक पटकवला?
(A) उत्तरप्रदेश
(B) मध्यप्रदेश✅✅
(C) केरळ
(D) तेलंगणा

♻️♻️
कोणत्या देशाने स्तनपानास समर्थन देणारी धोरणे आणि कार्यक्रम राबविण्याच्या संदर्भात जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला?
(A) बांगलादेश
(B) नॉर्वे
(C) भुटान
(D) श्रीलंका✅✅

०४ फेब्रुवारी २०२०

Current affairs question set

1)मेडागास्करमध्ये आपत्ती निवारणात मदतीचा हात देण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ____' राबवत आहे.
(A) निस्तार
(B) व्हॅनिला.  √
(C) सुनयना
(D) मदद

2)कोणत्या शब्दाची निवड ‘ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर 2019’ म्हणून झाली?
(A) नारी शक्ती
(B) टॉक्सिक
(C) संविधान.  √
(D) क्लायमेट एमर्जन्सी

3)कोणत्या शहरात ‘बीटींग द रिट्रीट’ सोहळा आयोजित केला जातो?
(A) चेन्नई
(B) लखनऊ
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली.  √

4)कोणत्या दिवशी ‘वंश नाश करण्यामध्ये बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?
(A) 26 जानेवारी
(B) 25 जानेवारी
(C) 27 जानेवारी.   √
(D) 29 जानेवारी

5)सुनिता चंद्रा ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या?
(A) हॉकी.  √
(B) क्रिकेट
(C) कुस्ती
(D) बॅडमिंटन

6)माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ____ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा.  √
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

7)टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद.   √

8)कोणता देश शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) चीन.  √
(D) संयुक्त राज्ये अमेरिका

9)कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली.   √
(D) चंदीगड

10)कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर.   √
(C) गोरखपूर
(D) कानपूर

महत्त्वाचे प्रश्नसंच


कोणत्या शहरात 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले गेले?
(A) गुवाहाटी
(B) भुवनेश्वर
(C) पणजी✅✅
(D) नवी दिल्ली

♻️♻️
कोणी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2019-20’ सादर केले?
(A) निर्मला सितारामन✅✅
(B) राम नाथ कोविंद
(C) कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम
(D) नरेंद्र मोदी

♻️♻️
कोणत्या राज्यात तीन दिवस चालणारा नर्मदा महोत्सव आयोजित करण्यात आला?
(A) गुजरात
(B) मध्यप्रदेश✅✅
(C) झारखंड
(D) छत्तीसगड

♻️♻️
दरवर्षी कोणता दिवस ‘भारतीय तटरक्षक दल दिन’ साजरा केला जातो?
(A) 2 फेब्रुवारी
(B) 30 जानेवारी
(C) 31 जानेवारी
(D) 1 फेब्रुवारी✅✅

♻️♻️
प्रथमच ‘डिफेंस एक्स्पो 2020’ दरम्यान ‘भारत आणि ______ संरक्षण परिषद’ आयोजित करण्यात आली आहे?
(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) आफ्रिका✅✅
(C) बांग्लादेश
(D) रशिया

♻️♻️
भारतात ________ या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो.
(A) 30 जानेवारी✅♻️✅
(B) 1 फेब्रुवारी
(C) 31 जानेवारी
(D) 25 जानेवारी

♻️♻️
कोणत्या व्यक्तीला 2019-2020 या वर्षासाठी ‘PEN गौरी लंकेश अवॉर्ड फॉर डेमोक्रेटिक आयडेलिझम’ हा पुरस्कार देण्यात आला?
(A) युसूफ जमील✅♻️✅
(B) रवीश कुमार
(C) राजदीप सरदेसाई
(D) रजत शर्मा

♻️♻️
‘आर्थिक सर्वेक्षण’ याच्यानुसार, 2019-2020 या वर्षात भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर किती असण्याचा अंदाज आहे?
(A) 8.8 टक्के
(B) 5.2 टक्के
(C) 5 टक्के✅✅
(D) 9.9 टक्के

♻️♻️
कोणत्या व्यक्तीची केंद्रीय अप्रत्यक्ष कर व जकात मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
(A) प्रणब कुमार दास
(B) एम. अजित कुमार✅✅
(C) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
(D) यापैकी नाही

♻️♻️
कोणत्या टेनिसपटूने डोमिनिक थिएमचा पराभव करून ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2020’ या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे जेतेपद पटकवले?
(A) नोव्हाक जोकोव्हिच♻️✅✅
(B) राफेल नदाल
(C) डॅनिल मेदव्हेदेव
(D) रॉजर फेडरर

♻️♻️
कोणत्या दिवशी 'जागतिक पाणथळ भूमी दिन’ पाळला जातो?
(A) 1 फेब्रुवारी
(B) 25 जानेवारी
(C) 2 फेब्रुवारी✅✅
(D) 4 फेब्रुवारी

♻️
कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी महिन्याभर चालणारा “एक्युषी पुस्तक मेळावा’ याचे उद्घाटन केले?
(A) श्रीलंका
(B) बांगलादेश✅✅
(C) भारत
(D) मालदीव

♻️♻️
कोणत्या व्यक्तीच्या हस्ते कर्नाटकाच्या हुबळी या शहरात ‘कौशल्य विकास केंद्र’चे उद्घाटन झाले?
(A) एम. वेंकय्या नायडू✅✅
(B) राम नाथ कोविंद
(C) नितीन गडकरी
(D) महेंद्र नाथ पांडे

♻️♻️खालील पैकी भारतातील पहिला मिथेनॉल कुकींग फ्युएल प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला?
अ) राजस्थान
ब) गुजरात
क) आसाम ✅
ड) महाराष्ट्र

स्पष्टीकरण :  खालील पैकी भारतातील पहिला मिथेनॉल कुकींग फ्युएल प्रोग्राम आसाम या राज्यात सुरू करण्यात आला.

♻️♻️कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?
(A) 26 जानेवारी
(B) 24 जानेवारी
(C) 25 जानेवारी✅
(D) 22 जानेवारी

♻️♻️कोणत्या राज्याने कृषी व्यवसायांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेसोबत 210 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार केला?*
(A) आसाम
(B) नवी दिल्ली
(C) मणीपूर
(D) महाराष्ट्र✅✅

♻️♻️पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता ? 
A) आर्य समाज ✅
B) सत्यशोधक समाज
C) ब्रह्मो समाज
D) प्रार्थना समाज

ऐतिहासिक बोडो कराराचे पंतप्रधानांनी केले स्वागत या करारामुळे बोडो नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन येणार.

🌷आज झालेल्या ऐतिहासिक बोडो कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.

🌷हा करार बोडो जनतेच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणणारा ठरेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

🌷‘या करारामुळे शांतता, सौहार्द आणि एकत्रित भावनेची नवी पहाट उजाडली आहे. भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे.

🌷बोडो संघटनांसोबत आज झालेला करार त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल.आज झालेला बोडो करार अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

🌷या करारामुळे विविध हितसंबंधी गट एकत्र आले आहेत.  आजवर जे गट सशस्त्र कारवायांमध्ये गुंतलेले होते ते आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावणार आहेत.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...