०३ फेब्रुवारी २०२०

2024 सालापर्यंत सर्व रेलगाड्या वीजेवर धावणार: भारतीय रेल्वे

इंधनावर होणारा प्रचंड खर्च आणि पर्यावरणाचे नुकसान पाहता 2024 या वर्षापर्यंत सर्वच रेलगाड्या वीजेवर चालविण्याचे ध्येय भारतीय रेल्वेनी निश्चित केले आहे. ते साध्य केल्यानंतर 2030 सालापर्यंत संपूर्णपणे (अक्षय ऊर्जेद्वारे) हरित रेल्वे जाळ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेनी कार्बनचे उत्सर्जन शून्य करण्याचा मानस ठेवला आहे. NITI आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2014 साली भारतीय रेल्वेकडून होणारे कार्बन डाय-ऑक्साईड वायूचे उत्सर्जन सुमारे 6.84 दशलक्ष टन एवढे होते.

आज, अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतात जगातले चौथे सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. या जाळ्यात सुमारे 7300 स्थानकांना जोडणारा 67,368 किलोमीटर एवढ्या एकूण लांबीचा लोहमार्ग पसरलेला आहे. त्यावर 13 हजार प्रवासी रेलगाड्या धावतात आणि दररोज 23 दशलक्षपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

भारतीय रेल्वे विषयी...

भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातली सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे.

भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातला विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. रेल्वे खात्याचा कारभार कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.

भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

भारतात पहिली रेल्वेगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.

1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला.

उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

इस्रो देणार ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट.

देशाच्या संरक्षणात, आपत्ती व्यवस्थानात उपयोगी ठरणारं असं अमूल्य गिफ्ट इस्रो व्हॅलेंटाईनच्या कालावधीत देशाला देईल.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात इस्रोकडून जीआयसॅट-1 (GiSAT-1) उपग्रह अवकाशात सोडणार आहे.
तर जीआयसॅट-1 उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये एकाच ठिकाणी थांबून देशाच्या सीमांची टेहळणी करेल. हा उपग्रह दर अर्ध्या तासाला देशाचा एक फोटो पाठवेल.

तसेच यामुळे पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमांवरील हालचालींची माहिती सतत मिळत राहील.
पाकिस्तानमधून सतत भारतीय हद्दीत घुसखोरींचे प्रयत्न सुरू असतात. त्यावर अंतराळातून  जीआयसॅट-1 रुपी तिसरा डोळा लक्ष ठेवेल.

जीआयसॅट-1 मध्ये पाच प्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. इस्रो जीआयसॅट मालिकेतले दोन उपग्रह अवकाशात सोडणार आहे. जीआयसॅट-1 च्या प्रक्षेपणानंतर इस्रो जीआयसॅट-2 अवकाशात पाठवेल.

जीआयसॅट-1चं प्रक्षेपण 15 जानेवारीला करण्यात येणार होतं. इस्रोनं ही तारीख जाहीरदेखील केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यानं हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं.

आंध्रप्रदेशातल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून जीआयसॅट-1 चं प्रक्षेपण करण्यात येईल. या मोहिमेत जीएसएलव्ही-एके2 प्रक्षेपक म्हणून काम करेल.

तसेच जीआयसॅट-1 मध्ये कार्टोसेट उपग्रहात अतिशय सामर्थ्यशाली पॅनक्रोमॅटिक कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा अर्ध्या तासानं देशाचा फोटो काढेल.

याशिवाय उपग्रहातले बाकीचे कॅमेरेदेखील सतत फोटो टिपून ते इस्रोला पाठवतील. जीआयसॅट-1 केवळ दिवसाच फोटो काढू शकतो. रात्रीचे फोटो टिपण्यासाठी इस्रो जीआयसॅट मालिकेतला दुसरा उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

स्मृतीदिन, महान योद्धा सुभेदार मेजर रामजी सकपाळ


आज सुभेदार मेजर रामजी सकपाळ यांचा १०७ वा स्मृतीदिन. ते एक महान योद्धा होते. त्यांनी अफगाणिस्तानच्या युद्धात प्रत्यक्ष लढाई केलेली होती. त्यांच्यातील कुशल शिक्षकाचे गुण ओळखून ब्रिटीश सरकारने त्यांना पुण्याला पाठवून टिचर्स ट्रेनिंग दिले. त्याकाळात त्यांचा महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई यांच्याशी परिचय झाला. पुढे त्याचे रूपांतर घनिष्ट मैत्रीत झाले. शूद्र अतिशूद्रांमधून कोणी तरी महापुरूष जन्माला येईल आणि तो या घटकांची गुलामी संपवील असे फुले म्हणत असत. तसे त्यांनी आपल्या पुस्तकात भाकीतही वर्तवलेले आहे. आपल्या १४ व्या अपत्याकडे,भीमाकडे, सु.मे.रामजी त्यादृष्टीने पाहात असत. त्यांना प्रथम पत्नी भीमाबाईंपासून झालेल्या १४ मुलांमधली अवघी ६ जगली. बाळाराम, गंगा, तुळसा, मंजुळा, आनंद आणि शेंडेफळ भीमराव.

सु.मे. रामजी इंदूरजवळच्या लष्कराच्या छावणीत शिक्षक होते. पुढे ते मुख्याध्यापक झाले. याच " मिल्ट्री हेडक्वार्टर ऑफ वॉर " म्हणजेच MHOW महू मध्ये भिमरावांचा १४ एप्रिल १८९१ ला जन्म झाला.
भिवा ३ वर्षांचा असताना ते लष्करातून निवृत्त झाले. काही काळ दापोलीला राहिल्यावर नोकरीच्या शोधात ते सातार्‍याला गेले. भिवाचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यातच झाले.

सु.मे.रामजी हे रामानंदी पंथाचे असल्याने त्यांच्यावर संत कबीर, संत तुकाराम आणि अन्य संतांच्या विचारांचा खोलवरचा प्रभाव होता. " आपले वडील गुणी शिक्षक होते. त्यांनी बालपणी आपल्यावर उत्तम संस्कार केले. धार्मिक बाबतीत ते रोमन हुकुमशहासारखे वागत असत, " असे बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या पुस्तकाच्या [बुद्ध आणि त्यांचा धम्म] प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ ला स्वत: बौद्ध धम्माची दिक्षा घेताना व लक्षावधी बांधवांना दिक्षा देताना बाबासाहेबांनी नागपूरच्या दिक्षाभुमीवर सर्वप्रथम सु.मे.रामजींना आदरांजली अर्पण केलेली होती.
त्यांनी आपल्या मुलींना घरीच इतके उत्तम शिक्षण दिलेले होते की, त्या सगळ्याजणी ग्रंथवाचन करीत आणि प्रसंगी धर्मग्रंथावर उत्तम प्रवचनंही देत असत असेही बाबासाहेबांनी नमूद केलेले आहे.

संगीतप्रेमी बाळाराम फारसे शिकले नसले तरी त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. आनंदरावला कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून नोकरी धरावी लागली. भिमरावला मात्र खूप शिकवायचे अशी सु.मे.रामजीबाबांची महत्वाकांक्षा होती. भिवा १९०७ साली मॅट्रीक झाल्यानंतर त्याला त्यांनी पुढे २ वर्षे महाविद्यालयीन शिक्षण दिले.

आपल्या तुटपुंज्या पेन्शनमधून भागत नसतानाही त्यांनी त्यासाठी खूप हालअपेष्टा भोगल्या. भीमरावांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सु.मे.रामजी दापोली आणि सातारा येथे काही वर्षे काढल्यानंतर मुंबईला आले. चाळीच्या एका खोलीत भिवाचा अभ्यास होत नसल्याने स्वत: रामजीबाबा रात्री २ वाजेपर्यंत जागे राहायचे, २ वाजता भिवाला झोपेतून ऊठवून अभ्यासाला बसवायचे आणि मगच झोपायचे. पुन्हा दिवसभर ते नानाविध नोकर्‍या किंवा अन्य काबाडकष्ट करायचे.

केवळ भिवाच्या अभ्यासासाठी परवडत नसतानाही त्यांनी चाळीतली समोरची खोली घेतली. भिवामध्ये त्यांनी अभ्यासाची व वाचण्याची आवड निर्माण केली. भिवाने मागितलेले प्रत्येक पुस्तक ते त्याला आणून देत असत. स्वत:जवळ पैसे नसले तर आपल्या विवाहीत मुलींकडून त्यांचे दागिने उसने आणून ते गहाण ठेऊन त्यावर ते कर्ज काढीत पण पुस्तक आणून देतच.

प्रख्यात सत्यशोधक लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर आणि दा. सा. यंदे यांच्या प्रयत्नातून भीमरावला सयाजीराव गायकवाड यांची स्कॉलरशीप मिळाली आणि ते पदवीधर झाले. शिष्यवृत्तीच्या अटी आणि शर्तींनुसार बडोद्यात काही वर्षे नोकरी करणे आवश्यक होते.

त्यानुसार भीमराव नोकरीवर जायले निघाले तेव्हा सु.मे. रामजींनी त्यांना बडोद्याला जायला विरोध केला. सनातन्यांच्या गुजरातेत भीषण जातियता असल्याने आपल्या मुलाचा छळ होईल अशी साधार भिती त्यांना वाटत होती. ती पुढे खरीही ठरली. बडोद्यात भीमरावांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांना राहायला घरही मिळाले नाही. कार्यालयातही त्यांचा पदोपदी अपमान करण्यात आला.

भीमरावांनी बडोद्याला जाण्यासाठी घर सोडले त्याच दिवशी मुलाच्या काळजीने हा योद्धा पुरूष आजारी पडला आणि पंधरवड्याभरात त्यांचे २ फेब्रुवारी १९१३ ला दु:खद निधन झाले. वडील आजारी असल्याची तार मिळताच भीमराव मुंबईला यायला निघाले. वडीलांची आवडती मिठाई घेण्यासाठी ते सुरत रेल्वे स्टेशनवर उतरले आणि त्यांची ट्रेन सुटली. पुन्हा गाडी २४ तासांनीच होती. भीमराव घरी पोचले तेव्हा माझा भिवा आला म्हणून सु.मे.रामजींनी २ आनंदाश्रू ढाळले आणि त्यांचे तात्काळ निधन झाले. जणू फक्त भिवाला पाहायला, भेटायलाच ते थांबले होते.

असे होते रामजी म्हणून घडले ग्रंथप्रेमी भीमजी हे आपण कधीही विसरता कामा नये. 

सोफियाने ऑस्ट्रेलियन ओपन वर नाव कोरले, १२ वर्षातली सर्वात तरुण विजेती ठरली


◾️ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीत अंतिम सामन्यात अमेरिकेच्या सोफिया केनिनने अनुभवी गारबिन मुगुरुझाचा पराभव करत आपल्या पहिल्याच ग्रँडस्लॅमवर नाव कोरले.

◾️तिने आपल्या पहिल्याच ग्रँडस्लॅम फायनमध्ये गारबिन मुगुरुझाचा
📌 ४-६,
📌६-२,
📌६-२
असा पराभव केला.

◾️या बरोबरच २१ वर्षाची सोफिया ऑस्ट्रेलिया ओपन जिंकणारी गेल्या १२ वर्षातील सर्वात तरुण खेळाडू ठरली
आहे.

◾️ हा सामना २ तास ३ मिनिटे चालला. गेल्या वर्षी जपानच्या नोआमी ओसाकाने २१ वर्षे आणि ८०
दिवसाची असताना ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती त्यावेळी ती ११ वर्षानंतर सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन ओपन विजेती ठरली होती.

यंदा तिच्यापेक्षा २२ दिवसांनी लहान असलेल्या केनिनने विजेतेपद मिळवत तिचा विक्रम मोडला.

◾️सर्वात तरुण विजेती होण्याचा विक्रम आजही मारिया शारापोवाच्या नावावर आहे.

◾️तिने २००८ ला वयाच्या २० व्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली
होती.

राजपथावरील संचलनात पहिल्यांदाच घडल्या ‘या’ गोष्टी

👉 प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्यांचे दर्शन घडवले जाते.

👉 चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग यंदाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नवं बरंच काही पहायला मिळालं.

👉 त्यानुसार, प्रथमच अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर संचलनात दिसून आलं. ही दोन्ही हेलिकॉप्टर काही दिवसांपूर्वीच भारतीय वायू सेनेमध्ये दाखल झाली आहेत. त्यांचं दर्शन देशवासीयांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त घडलं.

👉महिलेनं केलं पुरुषांच्या तुकडीचं नेतृत्व कॅप्टन तानिया शेरगिल यांनी राजपथावर संचलनादरम्यान पुरूषांच्या तुकडीचं नेतृत्व केलं. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

👉'धनुष्य' तोफ आली जगासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात तयार झालेली 'धनुष्य' तोफ पहिल्यांदाच जगासमोर आली.

👉गेल्या आठवड्यातच या तोफा सैन्यात सहभागी झाल्या होत्या.

👉 सैन्यातील महिलांच्या तुकडीने केले स्टंट राजपथवरील संचलनात पहिल्यांदाच सैन्य दलातील महिलांनी मोटरसायकलवर स्टंट केले.

👉६५ सदस्यांच्या या टीमने ३५० सीसी रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकलवर आपल्या कवायती सादर करुन उपस्थितांना आश्चर्यचकीत केलं.

👉राफेल विमानाची प्रतिकृती दरम्यान, गेल्या काही वर्षात सर्वाधिक काळ चर्चेत राहिलेल्या राफेल लढाऊ विमानांचे यावेळी पहिल्यांदाच जनतेला दर्शन घडले.

👉वायू दलाने आपल्या पथसंचलनात या विमानांची प्रतिकृती सादर केली.

संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी

🍀सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन म्हणजेच CBDTने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी आहे. 

🍀देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्ये देशाला आर्धा इनकम टॅक्स देतात.

🍀सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (सीबीडीटी)च्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2017-18 मध्येही इनकम टॅक्स कलेक्शनमध्ये पूर्वेकडील राज्यांनीच बाजी मारली आहे.

🍀 2017-18 या आर्थिक वर्षात प्रमुख 5 राज्यांनी दिलेले योगदान (टक्केवारीमध्ये)-

महाराष्ट्र - 38.3%
दिल्ली -13.7%
कर्नाटक - 10.1%
तमिलनाडु - 6.7%
गुजरात - 4.5%

🍀सर्वाधिक आयकर जमा करणारी पूर्वेकडील प्रमुख 5 राज्ये:

मिझोराम - 41%
नागालँड - 32.1%
सिक्किम - 26%
त्रिपुरा - 16.7%
मेघालय - 12.7

आता २४व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; सुधारित विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

◾️केंद्रीय मंत्रीमंडळाने आज (बुधवारी) सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक २०२० ला मंजुरी दिली.

◾️त्यामुळे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायदा, १९७१ मध्ये सुधारणा केली जाणार आहे.

◾️ हे नवे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे.

◾️ याद्वारे महिलांना यापूर्वी गर्भपातासाठी असलेली
📌 २० आठवड्यांची मर्यादा वाढवत

📌 २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

◾️यामुळे देशातील माता मृत्यूदर कमी होण्यासही मदत होणार आहे.

◾️मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, “२० आठवड्यांत गर्भपात केल्यानंतर आईच्या जीवाला धोका निर्माण होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

◾️त्यामुळे २४व्या आठवड्यात गर्भपात करणे महिलांसाठी सुरक्षित राहिल. त्यामुळे गर्भपातासाठी २४ आठवड्यांपर्यंत मुदत वाढवण्यात आल्याने बलात्कार पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींना यामुळे मोठा दिलासा मिळेल.”

अर्थसंकल्प Live 2020 : उद्योग आणि दळणवळण

⚡ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला संसदेत सुरुवात :

👉 *भाषणातील ठळक मुद्दे* :

▪ भारतीय उत्पादनाचा निर्यातीवर भर, प्रत्येक जिल्हा निर्यात केंद्र व्हावा यासाठी प्रयत्न करणार.

▪ मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती भारतात व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करणार.

▪ उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद, पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद.

▪ रस्ते विकासावर सरकारचा भर, 2 हजार किलोमीटरचे किनारी रस्ते तयार करणार.

▪ देशभरात 9 हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करणार.

▪ दिल्ली -मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार,

▪ 550 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देणार, रेल्वेच्या रिकाम्या जागेत सौर प्रकल्प उभारणार.

▪ तेजस सारख्या गाड्यांनी पर्यटन स्थळे जोडणार, पीपीपी तत्वावर रेल्वेच्या खाजगीकरणाची चाचणी करणार.

▪ मुंबई-अहमदाबाद दरम्यान जलद रेल्वे गाड्या वाढविणार.

▪ उडान योजनेअंतर्गत 100 नव्या विमान तळांची निर्मिती करणार.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी

जाणून घ्या नवीन 22 जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव!

⚡ राज्यात नवे 22 जिल्हे व 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे.

💁‍♂ देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते.

📌 या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे व 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होता. अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

👀 *या जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव?* :

▪ *नाशिक* : मालेगाव आणि कळवण
▪ *ठाणे* : मीरा-भाईंदर आणि कल्याण
▪ *बुलडाणा* : खामगाव
▪ *यवतमाळ* : पुसद
▪ *अमरावती* : अचलपूर
▪ *भंडारा* : साकोली
▪ *चंद्रपूर* : चिमूर
▪ *गडचिरोली* : अहेरी
▪ *जळगाव* : भुसावळ
▪ *लातूर* : उदगीर
▪ *बीड* : अंबेजोगाई
▪ *नांदेड* : किनवट
▪ *सातारा* : माणदेश
▪ *पुणे* : शिवनेरी
▪ *पालघर* : जव्हार
▪ *रत्नागिरी* : मानगड
▪ *रायगड* : महाड
▪ *अहमदनगर* : शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर.

मूकनायक : पहिला अंक


बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या खालील ओव्या छापल्या जात असे.

काय करुन आता धरुनिया भीड |नि:शक हे तोड वाजविले ||१||नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||

पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये खालील जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली[६] —

आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.

मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हा ही मजकूर पुढीलप्रमाणे होता — "हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही."

महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी

📚 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल हा विषयी अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज या विषयातील महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची प्रसिद्धी याविषयी जाणून घेऊ.

🧐  जिल्हे : प्रसिद्धी

1) मुंबई : भारताचे प्रवेशद्वार, भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची, राजधानी

2) रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा

3) सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी

4) कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा

5) रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा

6) सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा

7) परभणी : ज्वारीचे कोठार

8) नागपुर : संत्र्यांचा जिल्हा

9) भंडारा : तलावांचा जिल्हा

10) जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचे, प्रवेशद्वार

अभिमानास्पद Google, Windows पाठोपाठ आता IBM च्या CEO पदीही भारतीय कंपनीने पत्रक जारी करुन दिली माहिती- IBM CEO अरविंद कृष्णा


- जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील. यासंदर्भात आयबीएमनेच पत्रक जारी करुन माहिती दिली आहे.

- ६२ वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ४० वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या २०२० च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

▪️कोण आहेत अरविंद कृष्णा

- ५७ वर्षीय अरविंद सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात.

- आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत. त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.

- त्याआधी १९९० साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते. आयआयटी कानपूरमधून अरविंद यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इलिनॉयमधील उर्बाना चॅम्पियन विद्यापिठातून इलेक्ट्रीक इंजिनियरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.

▪️रोमेटी यांच्याकडून कौतुक

- “सीईओपदी अरविंद यांची निवड अगदी अचूनक आहे. आमच्या कंपनीसाठी महत्वाचे तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी अरविंदचे मोलाचे योगदान आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड, क्वॉंटम कंप्युटींग, बॅकचैन असे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्याने योगदान दिले आहे. अरविंदकडे नेतृत्व करण्याचेही कौशल्य आहे

- . कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अॅक्वेझिशन्सचे नेतृत्व अरविंदने केले आहे. त्याची कंपनीमधील कामगिरी पाहिल्यास ती सातत्यपूर्ण तरी सतत नवीन बदल स्वीकारणारी आहे. त्याच्या याच वृत्तीचा कंपनीला फायदा झाला आहे. आयबीएमचे नेतृत्व करण्यासाठी तो योग्य आहे,” असं मत रोमेटी यांनी व्यक्त केलं आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...