०१ फेब्रुवारी २०२०

चालु घडामोडी प्रश्नमंजुषा

1)हेलिकॉप्टरच्या अपघातात कोबे ब्रायंट ह्यांचे निधन झाले. ते ___ या खेळाशी संबंधित होते.
(A) क्रिकेट
(B) टेनिस
(C) बास्केटबॉल.   √
(D) कुस्ती

2)कोणत्या राज्याने ‘सुभाषचंद्र बोस आपदा प्रबोधन पुरस्कार 2020’ जिंकला?
(A) उत्तराखंड. √
(B) उत्तरप्रदेश
(C) ओडिशा
(D) हिमाचल प्रदेश

3)कोणत्या व्यक्तीची केरळ मिडिया अॅकॅडमीतर्फे दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट माध्यम व्यक्तीच्या पुरस्कारासाठी निवड केली गेली?
(A) रवीश कुमार
(B) एन. राम.   √
(C) राजदीप सरदेसाई
(D) यापैकी नाही

4)2018-19 या वर्षी सर्वाधिक भाजीपाला उत्पादनात कोणते राज्य अव्वल ठरले आहे?
(A) पश्चिम बंगाल.  √
(B) उत्तरप्रदेश
(C) मध्यप्रदेश
(D) बिहार

5)कोणत्या शहरात तिसरी वैश्विक बटाटा परिषद आयोजित करण्यात आली?
(A) पुणे
(B) बेंगळुरू
(C) गांधीनगर.   √
(D) लखनऊ

6)कोणत्या राज्यात ‘नमामी गंगे’ अभियानाच्या अंतर्गत पाच दिवसांची ‘गंगा यात्रा’ सुरू झाली?
(A) उत्तराखंड
(B) उत्तरप्रदेश.  √
(C) बिहार
(D) पश्चिम बंगाल

7)62 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सादर केलेल्या पुरस्कारांच्या जोडी जुळवा:

(i) सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम (a) ‘बॅड गाय’ (बिली इलिश)

(ii) रेकॉर्ड ऑफ द इयर (b) ‘व्हेन वी ऑल फॉल अस्लीप व्हेअर डू वी गो’

(iii) सर्वोत्कृष्ट नवा कलाकार (c) इगोर (टायलर, द क्रिएटर)

(iv) अल्बम ऑफ द इयर (d) बिली इलिश

(A) i-a , ii-c ,iii-b , iv-d
(B) i-a , ii-c ,iii-d , iv-b
(C) i-c , ii-a ,iii-b , iv-d
(D) i-c , ii-a ,iii-d , iv-b.   √

8)OPPO या कंपनीने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भागीदारीने संशोधन करण्यासाठी कोणत्या IIT संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
(A) IIT दिल्ली
(B) IIT हैदराबाद.  √
(C) IIT रुडकी
(D) IIT मद्रास

9)पंतप्रधान मार्जन सारेक ह्यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत?
(A) स्लोव्हेनिया.  √
(B) क्रोएशिया
(C) सर्बिया
(D) एस्टोनिया

10)खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे:

(i) एम.सी. मेरी कोमला पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे आणि ती मणीपूरची आहे.

(ii) पी. व्ही. सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे आणि ती तेलंगणाची आहे.

(iii) गुरु शशधर आचार्य ह्यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आणि ते एक कलाकार आहेत.

(iv) एकता कपूर ह्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(A) (i), (ii) आणि (iii)
(B) (i), (iii) आणि (iv)
(C) (i), (ii) आणि  (iv).   √
(D) (ii), (iii) आणि (iv)

11) सध्या भारतामध्ये एकूण किती केंद्रशाशित प्रदेश आहेत?

(A) 6
(B) 7
(C) 8.  √
(D) 9
(जम्मू काश्मीर आणि लडाख यां चे विभाजन करून जरी 9 केंद्रशासित प्रदेश झाले होते तरी दमण दीव आणि दादरा नगर हवेली या विलानीकरणा मुळे पुन्हा ती संख्या 8 झाली आहे.)

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)

·        औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? - मराठवाडा.

·        मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? - औरंगाबाद.

·        लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - उस्मानाबाद.

·        जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - औरंगाबाद.

·        महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? - मराठवाडा.

·        गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद-जळगाव.

·        औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? - अजिंठा.

·        जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? - नांदेड.

·        गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? - पैठण-औरंगाबाद.

·        जायकवाडी जलाशयाचे नाव काय? - नाथसागर.

·        जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? - औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड.

·        महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? - कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे.

·        बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? - राहुरी व औरंगाबाद.

·        महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? - मराठवाडा.

·        महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? - कोरडा दुष्काळ.

·        जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? - पैठण, औरंगाबाद.

·        गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? - जपान.

·        हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? - औरंगाबाद.

·        गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? - पैठण.

·        महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? - मराठवाडा.

·        शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? - नांदेड.

·        दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? - पैठण.

·        पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? - संत एकनाथ.

·        औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - हिंगोली.

·        घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? - नांदेड.

·        परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? - बीड.

·        खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - लातूर.

·        अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड.

·        तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद.

·        पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? - औरंगाबाद.

·        धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद.

·        वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? - औरंगाबाद.

·        वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? - शिल्पकला.

·        महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·        मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? - 1972.

·        वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? - औरंगाबाद.

·        श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? - तुळजापूर (उस्मानाबाद).

·        महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? - नांदेड.

·        कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? - अंबेजोगाई.

·        मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? - अक्षी.

·        दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? - उस्मानाबाद.

·        महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·        भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? - एकनाथ.

·        शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? - नामदेव.

·        प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - गोदावरी.

·        बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड.

·        मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? - औरंगाबाद.

·        देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? - अजंठा रांगा.

·        गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? - हरिषचंद्र-बालाघाट.

बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? - गोदावरी.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


⚛⚛कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते 'GATI' संकेतस्थळाचे उद्घाटन झाले?
(1)नितीन गडकरी✅✅
(2)अर्जुन मुंडा
(3)पीयूष गोयल
(4)निर्मला सीतारमण
⏩⏩केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि MSME मंत्री नितीन गडकरी ह्यांनी 'GATI' संकेतस्थळ कार्यरत केले आहे. हे डिजिटल व्यासपीठ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी तयार केले आहे. या व्यासपीठावरून कंत्राटदार प्रकल्पाच्या संबंधित कोणतीही समस्या उपस्थित करू शकतात.

⚛⚛2020 या वर्षासाठी कोणत्या देशाने ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?
(1)भारत
(2)गुयाना✅✅
(3)ट्युनिशिया
(4)अफगाणिस्तान
⏩⏩दक्षिण अमेरिकेच्या गुयाना देशाने हा 2020 या वर्षासाठी ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. गुयानाने पॅलेस्टाईनकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. ‘ग्रुप ऑफ 77’ (G77) याची स्थापना 15 जून 1964 रोजी जिनेव्हामध्ये झाली. ही संयुक्त राष्ट्रसंघातल्यास विकसनशील देशांची सर्वात मोठी आंतरसरकारी संघटना आहे. त्याचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे.

⚛⚛कोणती व्यक्ती 2020 या वर्षासाठी ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याचे अध्यक्ष आहेत?
(1)सुनील अरोरा✅✅
(2)के. एम. नुरुल हुडा
(3)सुशील चंद्र
(4)यापैकी नाही
⏩⏩⏩24 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीत स्ट्रेन्दनींग इंस्टिट्यूशनल कपॅसिटी’ या विषयाखाली ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याच्या दहाव्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. भारतीय निवडणूक आयोग (ECI) याकडे 2020 या वर्षासाठी FEMBoSA याचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. सुनील अरोरा हे भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) अध्यक्ष आहेत. 1 मे 2012 रोजी दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच (फोरम ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज ऑफ साउथ एशिया -FEMBoSA) याची स्थापना झाली.

⚛⚛कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?
(1)जम्मू
(2)लखनऊ
(3)पटना
(4)मेरठ✅✅✅
⏩⏩उत्तरप्रदेशाच्या मेरठ या शहरात प्राण्यांसाठी युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे. युद्धात मदत करणार्‍या कुत्रे, घोडे आणि खेचर अश्या प्राण्यांना हे स्मारक समर्पित आहे.

(1)हेलिकॉप्टरच्या अपघातात कोबे ब्रायंट ह्यांचे निधन झाले. ते ___ या खेळाशी संबंधित होते ?
(1)क्रिकेट
(2)टेनिस
(3)कुस्ती
(4)बास्केटबॉल✅✅
⏩हेलिकॉप्टरच्या अपघातात बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट ह्यांचे निधन झाले. ते अमेरिकेच्या पेन्सिल्वेनियाचे रहिवासी होते.

(2) कोणत्या राज्यात ‘इनोव्हेशन फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाला सुरूवात झाली?
(1)मध्यप्रदेश
(2)गुजरात
(3(मेघालय
(4)अरुणाचल प्रदेश✅✅✅
⏩⏩26 जानेवारी 2020 रोजी अरुणाचल प्रदेशाच्या इटानगर या शहरातल्या विज्ञान केंद्रात ‘इनोव्हेशन फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाला सुरूवात झाली. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या सहकार्याने कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी या संस्थेच्यावतीने दोन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.

(3) कोणत्या व्यक्तीला ‘इंटरएक्टिव फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी’ (IFIE) यांच्यावतीने 2019 सालासाठी "चॅम्पियन्स ऑफ चेंज" पुरस्कार देण्यात आला?
(1)बीरेंदर सिंग योगी✅✅✅
(2)एम. वेंकय्या नायडू
(3)शिल्पा शेट्टी
(4)हेमंत सोरेन
⏩⏩आयुर्वेद आरोग्य सेवा क्षेत्रातल्या अनुकरणीय योगदानाबद्दल चंदीगडचे प्रख्यात लैंगिक तज्ज्ञ डॉ. बीरेंदर सिंग योगी ह्यांना ‘इंटरएक्टिव फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी’ (IFIE) यांच्यावतीने 2019 सालासाठी "चॅम्पियन्स ऑफ चेंज" पुरस्कार देण्यात आला आहे.
 

(4)कोणत्या राज्य सरकारने 'शिवभोजन' योजना लागू केली?
(1)तामिळनाडू
(2)महाराष्ट्र✅✅
(3)ओडिशा
(4)आंध्रप्रदेश
⏩⏩महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात 'शिवभोजन' योजना लागू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत केवळ दहा रुपयांमध्ये ‘शिवथाळी’ म्हणून जेवण दिले जाणार आहे.

(5) कोणता देश नागरिकांना ई-पारपत्र (पासपोर्ट) सुविधा प्रदान करणारा दक्षिण-आशिया प्रदेशातला पहिला देश ठरला?
(1)बांग्लादेश✅✅
(2)श्रीलंका
(3)भारत
(4)अफगाणिस्तान
⏩⏩बांग्लादेश देश नागरिकांना ई-पारपत्र (पासपोर्ट) सुविधा प्रदान करणारा दक्षिण-आशिया प्रदेशातला पहिला देश ठरला आहे. ही सुविधा देणारा बांग्लादेश जगातला 11 वा देश आहे.
 

(6) भारत सरकारने कोरोना विषाणूसाठी _____ शहरांमध्ये सर्वकाळासाठी मदत क्रमांक कार्यरत केलेला आहे ?
(1) 9
(2) 6
(3) 12
(4) 7✅✅✅
⏩⏩भारत सरकारने कोरोना विषाणूसाठी 7 शहरांमध्ये सर्वकाळासाठी मदत क्रमांक कार्यरत केले आहे. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोची या शहरांमधल्या विमानतळावर तज्ञ लोकांच्या चमू सेवेत आहेत.

(7) भारतीय रिझर्व्ह बँकेनी सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड यामध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी अल्प मुदतीच्या गुंतवणूकीची नवी मर्यादा 20 टक्क्यांवरून _______ एवढी केली आहे ?
(1)25 टक्के
(2)35 टक्के
(3)30 टक्के✅✅✅
(4)40 टक्के
⏩⏩सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड (ट्रेझरी बिले आणि कॉर्पोरेट रोख्यांसह केंद्र आणि राज्य सरकारची ऋणपत्रे) यामध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी अल्प मुदतीच्या गुंतवणूकीची नवी मर्यादा भारतीय रिझर्व्ह बँकेनी ठरविलेली आहे. ही मर्यादा 20 टक्क्यांवरून 30 टक्के एवढी करण्यात आली आहे.

(8) कोणत्या राज्यात भारतातल्या पहिल्या ‘सुपर फॅब लॅब’चे उद्घाटन झाले?

(1)तेलंगणा
(2)तामिळनाडू
(3)केरळ✅⏩✅✅
(4)आंध्रप्रदेश
⏩⏩कोची या शहरात केरल स्टार्टअप मिशन येथील इंटेग्रटेड स्टार्टअप कॉम्प्लेक्स येथे इलेक्ट्रॉनिक्स चीप बनविणारी देशातली पहिली ‘सुपर फॅब लॅब’ उभारण्यात आली आहे. ही अमेरिकेच्या बाहेर असणारी एकमेव अशी सुविधा आहे. ही प्रयोगशाळा अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आली आहे.

(9) कोणत्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केन कांग ह्यांची नेमणूक करण्यात आली?
(1)सॅमसंग✅⏩✅✅
(2)ह्युंदाई
(3)किया मोटर्स
(4)LG
⏩⏩दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केन कांग ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 

(10) कोणत्या शहरात “भारत पर्व 2020” हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे?

(1)पुणे
(2)मुंबई
(3)नवी दिल्ली✅✅✅
(4)कोची
⏩⏩26 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीत लाल किल्ला येथे “भारत पर्व 2020” या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे. हा कार्यक्रम 'एक भारत श्रेष्ठ भारत' आणि 'महात्मा गांधींची 150 वी जयंती’ या संकल्पनेखाली आयोजित केला आहे.

(11) "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" हे पुस्तक ________ ह्यांनी लिहिले आहे.

⏩⏩⏩राहुल अग्रवाल
⏩⏩⚛राहुल अग्रवाल आणि भारती एस. प्रधान हे "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" या पुस्तकाचे सह-लेखक आहेत

(12)सहाव्या ‘कतार आंतरराष्ट्रीय चषक’ येथे भारोत्तोलन स्पर्धेत कोणत्या खेळाडूने महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?
⏩⏩मीराबाई चानू

⚛⚛ किरण मजुमदार-शॉ ह्यांना भारताशी देशाचे संबंध वृद्धींगत करण्यात योगदान दिल्याबद्दल कोणत्या देशाने सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला?
(A) न्युझीलँड
(B) कॅनडा
(C) ऑस्ट्रिया
(D) ऑस्ट्रेलिया✅✅✅

⚛⚛ 2025 सालापर्यंत कोणता देश भारताला हवाई संरक्षनार्थ ‘एस-400’ क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविणार?
(A) अमेरिका
(B) इस्त्राएल
(C) रशिया✅✅
(D) फ्रान्स

⚛⚛ ‘जनगणना 2021’ विषयक परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
(A) दिसपूर
(B) नवी दिल्ली⏩✅✅✅
(C) अहमदाबाद
(D) लखनऊ

⚛⚛29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?
(A) के. शिव रेड्डी
(B) ममता कालिया
(C) वासदेव मोही⏩✅✅✅✅
(D) यापैकी नाही

General Knowledge

▪ कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 25 जानेवारी

▪ भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या पेमेंट बँकेचे अधिकृतता प्रमाणपत्र (CoA) रद्द केले?
उत्तर : वोडाफोन एम-पेसा

▪ कोणत्या शहरात “विमेन विथ व्हील्स” टॅक्सी सेवा कार्यरत झाली?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कतरिना साकेल्लारोपौलौ हया कोणत्या देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत?
उत्तर : ग्रीस

▪ कोणती दूरसंचार कंपनी UPI पेमेंट्स वैशिष्ट्य सादर करणारी पहिली दूरसंचार कंपनी ठरली?
उत्तर : रिलायन्स जिओ

▪ 25 जानेवारी रोजी पाळण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय मतदार दिन’ याची संकल्पना काय होती?
उत्तर : बळकट लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता

▪ जागतिक तिरंदाजी महासंघाने कोणत्या देशावरचे निलंबन मागे घेते?
उत्तर : भारत

▪ आशुगंज-अखौरा महामार्ग चौपदरी करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला?
उत्तर : बांग्लादेश

▪ कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना’ लागू करण्यात आली?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪ 21 जानेवारीला कोणत्या राज्याने राज्याचा 48 वा स्थापना दिन साजरा केला?
उत्तर : मेघालय

चालू घडामोडी प्रश्नसंच

🦠 कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?

(A) 26 जानेवारी
(B) 24 जानेवारी
(C) 25 जानेवारी✅✅
(D) 22 जानेवारी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 2020 या वर्षासाठी कोणत्या देशाने ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?

(A) भारत
(B) गुयाना✅✅
(C) ट्युनिशिया
(D) अफगाणिस्तान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणती व्यक्ती 2020 या वर्षासाठी ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याचे अध्यक्ष आहेत?

(A) के. एम. नुरुल हुडा
(B) सुनील अरोरा✅✅
(C) सुशील चंद्र
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?

(A) जम्मू
(B) लखनऊ
(C) पटना
(D) मेरठ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 निवडणूक-विषयक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पापुआ न्यू गिनी आणि ____ या देशांसोबत सामंजस्य करार केला आहे.

(A) ट्युनिशिया✅✅
(B) श्रीलंका
(C) बांग्लादेश
(D) मालदीव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या राज्याने कृषी व्यवसायांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेसोबत 210 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार केला?

(A) आसाम
(B) नवी दिल्ली
(C) मणीपूर
(D) महाराष्ट्र✅✅

पोलीस भरती प्रश्नसंच

Q1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान

Q2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश

Q3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा

Q4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम

Q5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )

Q6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )

Q7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार

Q8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप

Q9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली

Q10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )

वर्ल्ड गेम्स ‍अॅथलिट ऑफ द इअर पुरस्कार मिळवणारी राणी रामपाल ठरली पहिली महिला हॉकीपटू.

🎆 वर्ल्ड गेम्स ‍अॅथलिट ऑफ द इअर हा पुरस्कार मिळवणारी भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली आहे.

🎆 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी ती जगातील पहिली हॉकीपटू ठरली आहे.

🎆 २० दिवसांच्या मतदानानंतर जागतिक क्रीडा परीषदेनं काल ही घोषणा केली.राणीला १ लाख ९९ हजार ४७७ मतं मिळाली.

🎆 गेल्या वर्षी भारतीय महिला हॉकी संघानं जागतिक हॉकी स्पर्धा जिंकली होती, त्यात राणी सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरली होता. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित.

🎆 चीनमध्ये थैमान घालणा-या आणि चीनमधून जगभरात पसरण्याचा धोका असणा-या कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. 

🎆 चीनवर अविश्वास व्यक्त् करण्याचा मानस नसून परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसे सक्षम नसलेल्या इतर देशांना मदत करण्याचा हेतू यामागे आहे,असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रस् अधनोम यांनी सांगितलं. 

🎆 या विषाणूचा उद्रेक टाळण्यासाठी जलद उपाययोजना केल्याबद्दल त्यांनी चीन सरकारचं कौतुक केलं.

🎆 ट्रेड्रस यांनी या आठवडयात चीनमध्ये प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि सामूहिक प्रयत्नांमधूनच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखू शकतो, असंही ते म्हणाले. 

डॉ.अक्षयकुमार काळे यांना कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार जाहीर.

🎆 मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीनं कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार डॉ.अक्षयकुमार काळे यांना जाहीर झाला आहे.

🎆 डॉ.अक्षयकुमार काळे हे २०१७ मध्ये डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

🎆 कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार नांदेडचे कवी डॉ. दिनकर मनवर यांना दिला जाणार असल्याचं परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल जाहीर केलं. 

ब्रिटन अखेर युरोपीय संघातून बाहेर.

🎆 ब्रिटनने अखेर युरोपियन महासंघाचे सदस्यत्व सोडले आहे. काल रात्री ११ वाजता ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला. यावेळी ब्रेक्झिट समर्थकांनी जल्लोष आणि विरोधकांनी निदर्शनं केली.

🎆 ब्रेक्झिटच्या बाजूनं सार्वमत घेतल्यानंतर जवळपास ३ वर्षांनंतर ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला आहे.

🎆 ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपियन महासंघासोबत मैत्रीपूर्ण सहकार्य कायम ठेवण्याचं आश्वासन यावेळी दिलं.

🎆 जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी आगामी वाटचालीत अनेक अडथळे असले तरी यशस्वी होणाऱ्या अनेक संधी असल्याचा आशावादही व्यक्त केला.

🎆 ब्रेक्झिट बाहेर पडण्याचा संक्रमण कालावधी ३१ डिसेंबर पर्यंत आहे.

🎆 तोपर्यंत युरोपियन महासंघाचे अनेक कायदे ब्रिटनमध्ये लागू राहतील तसंच युरोपियन महासंघामधल्या देशांत नागरिकांना मुक्तसंचार करता येईल.

जगप्रसिद्ध आयबीएमच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती.

🎆 जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🎆 अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील. यासंदर्भात आयबीएमनेच पत्रक जारी करुन माहिती दिली आहे.

🎆 ६२ वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ४० वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या २०२० च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

✅✅ कोण आहेत अरविंद कृष्णा

🎆 ५७ वर्षीय अरविंद सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात. आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत.

🎆 त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्याआधी १९९० साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते.

🎆 आयआयटी कानपूरमधून अरविंद यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इलिनॉयमधील उर्बाना चॅम्पियन विद्यापिठातून इलेक्ट्रीक इंजिनियरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...