२७ जानेवारी २०२०

राज्यसेवा 2020 – CSAT Best Strategy

राज्यसेवा २०२० - CSAT

CSAT पूर्वपरीक्षा पास करण्यासाठीचा अनिर्वार्य घटक. 2013 पासून अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला हा घटक आपणापैकी काहींसाठी मित्र आहे तर काहींसाठी कट्टर शत्रू ….शेवटी हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. आपण CSAT ला का घाबरतो? त्याचे मला सापडलेले उत्तर म्हणजे त्याबद्दल निर्माण करण्यात आलेले गैरसमज आणि सोबतच अतिशयोक्ती सुद्धा गैरसमज यासाठी या विषयासाठी काय काय करावे याचे अनेक साधक मार्गदर्शन उपलब्ध आहे परंतु कसे कसे करावे यांच्या मार्गदर्शनाचा अभाव .अतिशयोक्ती यासाठी कोणताही क्लास लावण्याची गरज नाही अशी मांडण्यात आलेली गृहीतके! मार्गदर्शनाशिवाय याला पर्याय नाही हे अमान्य असलेले सत्य आहे.

मित्रांनो , Aptitude म्हणजे काय ? तर तुमचा बुद्धांक होय . तो तर गणित , बुद्धिमत्ता या विषयातून तपासला जाऊ शकत होता . मग उताऱ्यांची संकल्पना का बर परीक्षकांना सुचली असेल ? याचे उत्तर असे आहे की आयोगाला तुमच्यातला Spark, झटपट निर्णय घेण्याची क्षमता , कोड सोडविण्याची हातोटी , शासनाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण करण्याचे कसब किती आणि ते कोणत्या प्रमाणात आहे ते शोधून काढायचे आहे आणि म्हणूनच CSAT ची चाळण त्यांनी तयार केली .

CSAT च्या सर्व पेपर चे घटकनिहाय विश्लेषण येथे दिले आहे संपूर्ण निरीक्षणाअंती हे स्पष्ट आहे की दरवर्षी आकलन या घटकाचे 50 प्रश्न निश्चितच आहेत वर्षागणिक बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची संख्या वाढत जात आहे तर गणिताच्या प्रश्नांची संख्या कमी होत आहेत तसेच निर्णय क्षमता या घटकाचे पाच प्रश्न निश्चित आहेत आपण प्रत्येक घटकाचा अभ्यास कसा करावा याचा संदर्भ पाहू.

आकलन –
आपण जेव्हा उतारे सोडवतो तेव्हा त्यांना आपल्या ज्ञानाची तपासणी करायचीच नाहीये . त्यांना आपण ते सांगतात किंवा आदेश देतात ते पाळण्यासाठी किती तयार आहोत हे तपासायचे आहे . म्हणूनच उतारे सोडविणे ही एक कला आहे . ज्याच्या आधारे आपण पूर्वपरीक्षेचे बरेच मोठे अंतर पार करु शकतो . उतारे सोडविणे ही एक कला आहे असे मी त्यासाठीच म्हटले की पाठ करुन , सगळ्या Trick , क्लुप्त्या वगैरे वगैरे करुनच हे करता येत नाही , तर याचा एकमेव म्हणजे एकमेव मार्ग हा विपुल सराव करणे हाच आहे . पण त्याआधी आयोगाचे उतारे समजून घेऊन यांची प्रश्न पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे .

बरचे जण २०१३ ते २०१९ – हे आयागाचे पेपर बघणे साडेविणे हे महत्त्वाचे समजतच नाहात . ते बाह्य पुस्तकावरच जास्त अवलंबून राहतात . तसे करणे हे अतिशय नुकसानदायक आहे . कारण , कोणताही क्लास , पुस्तक तुम्हाला अधिकारी बनविणार नाही . तुम्हाला अधिकारी पदावर आयोगच नेऊन बसविणार आहे . त्यामुळे आयोगाच्या अटी , दिशा पाहणे अत्यावश्यक आहे .

मागच्या ७ वर्षाच्या पत्रिकांचे विश्लेषण आपण केले तर आपल्या असे लक्षात येईल की , २०१३ – १४ पेक्षा नंतरचे पेपर हे जास्त कठीण आहेत . २०१३ – १2 मध्ये उतारे आणि त्यांचे प्रश्न यामध्ये ससत्रता वगेळ्या प्रकारचा होती . तर २०१५ – २०१६ – २०१७ यामध्ये उताऱ्यांचा दर्जा हा वगेळा होता . तो तपासायचा , समजून घ्यायचा म्हणजे उतारे सोडविताना अनुचित आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होईल . २०१८ चा पेपर हा त्यामानाने सोपा असा म्हणता येईल . . . पण तरीही त्यामध्ये आयोगाने निश्चित केलेली पातळी गाठणे शक्य झालेले नाही . २०१९ चा पेपर हा समसमान काठिण्य पातळीचा ठरला .

1) Reading Comprehension –
उतारे सोडवितांना लक्षात घ्यावयाच्या प्रमुख बाबी :

१ ) आधी उतारा वाचाया की प्रश्न वाचावेत ? — माझे तुम्हाला हेच स्पष्ट सांगणे असेल की आधी उतारा वाचावा . कारण त्यामुळे प्रश्न सोडविताना गोंधळ होणार नाही . सामान्यपणे आपण आधी प्रश्न वाचतो मग उतारा वाचतो . त्यामुळे मूळ उद्देश – आकलन यालाच धमा पोहचतो कारण आपण फक्त त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यावरच नजर भिरभिरवतो . आकलन होत नाही , मग उतारे चुकतात . म्हणून आधी उताराच वाचावा .

२ ) उताऱ्याचे वाचन कसे करावे ? —
याचे योग्य आणि सोपे उत्तर असे आहे की उताऱ्यातील प्रत्येक शब्द फोड करत करत वाचावा . वाक्यामध्ये असणाऱ्या विराम चिन्हांचा म्हणजेच पूर्णविराम , स्वल्पविराम , अवतरणचिन्हे , काळ यांचा व्याकरणीय दृष्टीकोनातून विचार करावा . आपण वाचताना सरळसरळ वाचत सुटतो . विरामाचिन्हांचा विचार करत नाही . हीच चूक कटाक्षाने टाळावी .

३ ) Key – Words किंवा महत्त्वाचे शब्द — बऱ्याचदा आपल्याला महत्त्वाचे वाटणारे शब्द हे प्रश्न कत्यांना महत्त्वाचे वाटतातच असे नाही किंवा त्याने ज्या दृष्टीकोनाने प्रश्न विचारला आहे तो आपल्या जवळ असेलच असेही नाही . मग यावर नेमका उपाय कोणता ? तर वाचन करत असताना की , च , आणि , व , परंतु , किंवा यांसारख्या शब्दांना गोल करा , काही शब्दांचे समानार्थी शब्द शोधा . सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला असणारे ज्ञान आणि उताऱ्यामध्ये दिलेली माहिती यात गल्लत करु नका . समजा उताऱ्यात असे नमूद केले की , राहुल गांधी भारताचे पंतप्रधान आहेत . तर हेच अंतिम सत्य मानावे . In short , Don’t put your own knowledge .

४ ) वेळेचे नियोजन —
१२० मिनीटात आपल्याला ८० प्रश्न सोडवायचे आहेत . त्यामुळे त्यातील ५० प्रश्न उताऱ्याशी संबंधित येतात . एकूण १० उतारे असतात तर प्रत्येक उतारा हा ७ मिनीटात सोडवावा . म्हणजे ७० मिनीटे होतील . Decision Making ५ मिनीटात ५ पूर्ण करावे . अशाप्रकारे केवळ ७५ मिनीटात आपण १३७ . ५ गुणांचे प्रश्न पूर्ण सोडवतो . उर्वरित ४५ मिनीटात गणित व बुद्धिमत्ता सोडवावे आणि शेवटची ५ मिनीटे हे एकदा चेकींगसाठी द्यावेत . सर्वसाधारणपणे ७० – ७५ प्रश्न सोडवणे हे सर्वोत्तम आहे . त्यापेक्षा जास्त सोडवत असाल तर Accuracy चेक करत राहा . उतारे सोडवताना तमचा आत्मविश्वास हाच मोठा साथीदार आहे . आणि तो तुमचा तो तुमच्या सरावानेच विकसित होणार आहे .

2) बुद्धिमत्ता व अंकगणित –
या घटकाचे महत्त्वाचे मुद्दे एकाच गोष्टीशी संबंधित आहेत आणि ती गोष्ट म्हणजे सराव !सराव !! सराव !!!आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत ,प्रश्नांचा बदलत जाणरा trend , कोणत्या घटकाला किती आणि कसं महत्त्व दिले ते पहा .प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेत आलेले या घटकांचे प्रश्न सोडवणे. सरावासाठी R S Agrawal हा उत्तम पर्याय आहेच पण तो सोडवण्यासाठी खूप संयमाची आवश्यकता आहे .सध्या तर बुद्धिमत्तेचे अनेक प्रश्नही निव्वळ आकलनाच्या आधारेही सोडविता येतात. म्हणून हा घटक कमी गुणांना दिसत असला तरी त्याचीही महत्त्वही अनन्यसाधारण आहे.

3) निर्णयक्षमता –
या घटकाचे प्रयोजन तुम्ही निर्णय घेऊ शकता की नाही हे तपासणे नसून कोणत्या पदावर राहून कसा आणि कोणता विचार करता हे तपासणे आहेच .आपली भूमिकाही प्रशासन व सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून पाहण्याची आहेत यासाठी चार गोष्टींचा विचार करावा. त्याम्हणजे —
१.तुमची भूमिका कोणती आहे ? ( Role )
२.परिस्थिती काय दिलेली आहे ? ( Situation )
३.कोणत्या भागाशी संबंधित आहेत ? ( Area )
४.घेतलेल्या निर्णयाचा परिणाम कोणावर होणार आहे? ( Effect )

थोडक्यात परंतु अंतिम महत्त्वाचे काही मुद्दे –
१ . उतारा काळजीपूर्वक वाचला आहे सर्व संपूर्ण समजले आहे म्हणून सर्वच प्रश्न सोडवले गेलेच पाहिजे असा अट्टहास करु नका . एखादा प्रश्न सोडला तरीही चालेल .

२ . प्रश्न काळजीने लक्षपूर्वक वाचावा . म्हणजे काय विचारले आहे ते समजून घ्या . अयोग्य , अचूक , फक्त , केवळ हे शब्द विशेष अधोरेखीत करा . मग विधाने वाचा . प्रत्येक विधानाला स्वतंत्रपणे विचारात घ्या . ते चूक आहे की , बरोबर ते तिथेच ठरवा आणि अंतिम पर्याय निवडा .

३ . कोणताही उतारा पूर्णपणे सोडू नका . उतारा वाचताना तो अवघड वाटत असला तरी आपण २ – ३ प्रश्न नक्कीच सोडवू शकतो . म्हणून तो वाचायचाच .

४ . अनेकदा एखाद्या उताऱ्यावर आपण गरजेपेक्षा जास्त वेळ रेंगाळतो . त्यामुळे पुढचे वेळेचे आपले गणित चूकते . म्हणून अशा चूका करायचे टाळा .

५. पेपर चे कोणतेही नियोजन करण्याआधी पेपर हातात आला की तो दोन-तीन मिनिटांत पूर्ण पहा नेहमीप्रमाणेच असेल तर नियोजनाची अंमलबजावणी करा परंतु वेगळा असेल तर

First plan out Your Strategy then work out Your Plan…

या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या तर एक गोष्ट ठळकपणे स्पष्ट होते की , पूर्व परीक्षा पास करायचीच असेल तर CSAT आणि त्यामध्येही उताऱ्यांना काहीच पर्याय नाही . त्यामुळे वर्षभर ज्याच्या मागे आपण अविरतपणे पळत असतो तो GS थोडासा मनातून डोक्यातून बाजूला सारुन निखळ , स्पष्ट विचारहीन मन आणि बुद्धी यांचा समतोल ताळमेळ साधणे गरजेचे आहे . वेळेत सराव करणे , वेळेचे योग्य नियोजन करणे , Accuracy चे शिखर गाठणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आणि जितकं सांगितले आहे , त्यावरच भर देणे हेच CSAT चे खरे सूत्र आहे .

आजचे महत्त्वाचे प्रश्नसंच


(1)कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?
⏩⏩25 जानेवारी

(2)भारत आणि आफ्रिका या देशांच्या दरम्यान रिअल-टाइम आंतरसीमा पैशाची देवाणघेवाण सुविधा कार्यरत करण्याकरिता _____ या कंपनीने वेस्टर्न युनियन या कंपनीसोबत भागीदारी केली.
⏩⏩एअरटेल

(3)भारतीय रिझर्व्ह बँकेनी _____ पेमेंट बँकेचे अधिकृतता प्रमाणपत्र (CoA) रद्द केले.
⏩⏩वोडाफोन एम-पेसा

(4)कोणत्या शहरात “विमेन विथ व्हील्स” टॅक्सी सेवा कार्यरत झाली?
⏩⏩नवी दिल्ली

(5)कतरिना साकेल्लारोपौलौ हया कोणत्या देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत?
⏩⏩ग्रीस

(6)कोणती दूरसंचार कंपनी UPI पेमेंट्स वैशिष्ट्य सादर करणारी पहिली दूरसंचार कंपनी ठरली?
⏩⏩रिलायन्स जिओ

(7)25 जानेवारी रोजी पाळण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय मतदार दिन’ याची संकल्पना काय होती?
⏩⏩बळकट लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता

(8)जागतिक तिरंदाजी महासंघाने कोणत्या देशावरचे निलंबन मागे घेते?
⏩⏩भारत

(9)आशुगंज-अखौरा महामार्ग चौपदरी करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला?
⏩⏩बांग्लादेश

(10)_______________ राज्याने आसामच्या गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स 2020’ या स्पर्धांचे अजिंक्यपद जिंकले ?
⏩⏩महाराष्ट्र

 

141 पद्म पुरस्कार जाहीर

- देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेले पद्म पुरसकार आज जाहीर करण्यात आले. यंदा 141 पद्म पुरस्कार दिले जाणार असून यात 7 पद्म विभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

- जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिले आहेत. मॉरिशसचे ए. जगन्नाथ यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

- यंदा महाराष्ट्रातल्या 13 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

▪️पद्मभूषण

आनंद महिंद्रा, उद्योगपती

▪️पद्मश्री

-झहीर खान, क्रिकेटपटू
-पोपटराव पवार, समाजसेवक
-डॉ. रमण गंगाखेडकर, विज्ञान आणि अभियांत्रिकी
-करण जोहर, चित्रपट निर्माता
-सरिता जोशी, अभिनेत्री
-एकता कपूर, चित्रपट निर्माती
-राहिबाई पोपरे, कृषी
-कंकणा राणावत, अभिनेत्री
-अदनान सामी, गायक
-सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यद भाई, सामाजिक कार्य
-डॉ. सांद्र देसा सौजा,  वैद्यकीय
-सुरेश वाडकर, गायक
——————————————

पोलीस भरती प्रश्नसंच


1) भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण बनली आहेत?
उत्तर : लेफ्टनंट शिवांगी

2) ‘YSR मत्स्यकारा भरोसा’ योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

3) ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक 2019’ कोणी जिंकले?
उत्तर : ग्रेटा थुनबर्ग

4) “हाऊ ए फॅमिली बिल्ट ए बिजनेस अँड ए नेशन” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : गिरीश कुबेर

5) “अॅग्रोव्हिजन 2019” या भारताच्या प्रमुख कृषी शिखर परिषदेची संकल्पना काय आहे?
उत्तर : स्मार्ट टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

6) “शिखर से पुकार” हे शब्द कशाशी संबंधित आहे?
उत्तर : जलसंधारण विषयक माहितीपट

7) दहशतवादविरोधी टेबल-टॉप सराव प्रथम कोणत्या संस्थेकडून आयोजित करण्यात आला?
उत्तर : राष्ट्रीय अन्वेषण विभाग

8) ‘कार्टोसॅट-3 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे?
उत्तर : PSLV C47

9) आरबीआयच्या माहितीनुसार भारताचा परकीय चलन साठा किती आहे?
उत्तर : 448.249 अब्ज डॉलर

10) ‘जागतिक दूरदर्शन दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 21 नोव्हेंबर

Q1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान

Q2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश

Q3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा

Q4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम

Q5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )

Q6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )

Q7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार

Q8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप

Q9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली

Q10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )

विषय = अर्थशास्त्र प्रश्नसंच

८२१) अर्थशास्त्राचे जनक, भांडवलशाहीचे जनक राष्ट्राची संपत्ती या सर्वाचा कोणत्या अर्थशास्त्रज्ञ संदर्भ येतो?
अ) रॉबीन सन्स    ब) मार्शल    क) अॅडम स्मीथ     ड) थॉमस
१) वरील सर्व बरोबर    २) वरील सर्व चूक
३) फक्त क बरोबर      ४) ब आणि ड चूक

८२२) भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणत्या पंतप्रधानानी केला?
१) लाल बहादुर शास्त्री    २) पंडित जवाहरलाल नेहरू
३) डॉ. मनमोहनसिंग      ४) वरीलपैकी एकही नाही

८२३) भारतीय अर्थव्यवस्थेत सातत्याने कोणत्या क्षेत्राचा वाटा वाढत आहे?
अ) सेवा       ब) उद्योग    क) कृषी    ड) सेवा व उद्योग
१) वरील सर्व बरोबर    २) वरील सर्व चूक
३) फक्त अ बरोबर      ४) ब आणि ड चूक

८२४) श्रमाच्या बदल्यात जे देयके दिले जाते. त्यास.. म्हणतात?
अ) व्याज        ब) खंड       क) वेतन       ड) नफा
१) वरील सर्व बरोबर       २) वरील सर्व चूक
३) फक्त क बरोबर        ४) ब आणि ड चूक

८२५) औद्योगिक अर्थव्यवस्थेचे निकष सांगा.
अ) अर्थव्यवस्थेत द्वितीयक क्षेत्राचा वाटा ५०%
ब) एकूण श्रमिकापैकी ५०% श्रमिक असावेत
क) अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचा वाटा ५०%
१) अ, ब आणि क बरोबर       २) सर्व चूक
३) फक्त अ बरोबर              ४) अ आणि ब बरोबर

उत्तर :- ८२१ -३, ८२२ -२, ८२३ -३, ८२४ -३, ८२५ - ४.
===========================

संपूर्ण पणे जाणून घ्या :- 'स्वर भास्कर 'पंडित भीमसेन जोशी'

भारतरत्न' पंडित भीमसेन जोशी यांचा आज (24 जानेवारी) स्मृतिदीन. धारवाड जिल्ह्यातील रोण येथे 14 फेब्रुवारी 1922 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गुरुराज व चुलते गोविंदाचार्य हे साहित्यिक होते व त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्यांच्या काळातील नाणावलेले गायक होते.

भीमसेन यांना लहाणपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांची ही आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्यासाठी गायन शिक्षकाची नेमणूक केली. मात्र त्यांचे इतक्यात समाधान न झाल्याने ते गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंधर, कलकत्ता आदी ठिकाणी फिरले.

दरम्यान त्यांनी काही काळ लखनऊच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरीही केली. शेवटी त्यांनी सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांचेकडे गाण्याची दीक्षा घेतली. ते गुरुसेवा करून अति कष्टाने गानविद्या शिकले. सवाई गंधर्वानीही त्यांना 5 वर्षे चांगली शिकवण दिली.

सवाई गंधर्व हे किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांनी भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खाँ यांच्या गायकीचे विशेष आत्मसात करून किराणा शैली समृद्ध केली.

भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ 1952 पासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल 1942 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे संगीत मैफिलींसाठी त्यांची धावपळ वाढली. दरम्यान वारंवार होणार्‍या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करत असत.

भीमसेन जोशी यांनी 1940 च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील प्रसिद्ध गायकांकडून ठुमरी शिकून घेतली. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे हजारो कार्यक्रम केले.

भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी व कर्नाटकी या 2 प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या गोष्टी हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत असत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.

अशा या महान गायकाचे 24 जानेवारी 2011 रोजी पुणे येथे वयाच्या 88 व्या वर्षी देहावसान झाले.

शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचा भूगोल पुस्तक नक्की वाचून पहा

🎖 पुरस्कार : पंडितजींना खालील अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविण्यात आले.

● 4 नोव्हेंबर 2008 : भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार
● 1985 : पद्मभूषण पुरस्कार
● 1976 : संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
● 1972 : पद्मश्री पुरस्कार
● 1971 : संगीत-रत्न

जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी दिली, तर पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डि. लिट्. ही पदवी दिली.

👍 इतर पुरस्कार : पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार आदी. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले आहे.

विषय = इतिहास प्रश्नसंच

७२६) लक्ष्मीबाई टिळक यांच्याबाबत पुढील विधाने वाचा चुकीचे विधान ओळखा.

१) 'स्मृतिचित्रे' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
२) नारायण वामन टिळक हे त्यांच्या पतीचे नाव.
३) लक्ष्मीबाई टिळक व त्यांचे पती नारायण वामन टिळक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
४) ब्राह्मण कन्या विवाह विचार हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

१)२ ४,          २)४,        ३) १ व २,        ४) २

७२७) विधाने वाचा समाजसुधारक स्त्री ओळखा.
१) १९२० मध्ये पुण्यात मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला.
२) स्त्रियांना मतधिकार मिळावेत यासाठी त्यांनी आंदोलन हाती घेतले होते.
३) येरवडा तुरुंगाच्या त्या मानद सचिव होत्या.
४) गांधीजींच्या मते, त्या वैधव्य जीवनाचा आदर्श होत्या.

१) अवंतिका गोखले,        २) पंडिता रमाबाई,
३) अनुसया काळे,           ४) रमाबाई रानडे

७२८) विधाने वाचा समाजसुधारक ओळखा.

१) 'वेदोक्त धर्म प्रकाश' या ग्रंथाचे ते लेखक होते.
२) पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट, बाल विवाह, समुद्र पर्यटन, सती याबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते.
३) मार्क्सच्या विचारांशी त्यांचे विचार काही प्रमाणात जुळतात.

१) विष्णुशास्त्री चिपळूणकर,       २) विष्णुबुवा ब्रह्मचारी,
३) विष्णुशास्त्री पंडित,             ४) रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक

७२९) गोपाळराव जोशी यांच्या बाबत पुढील विधाने वाचा. बरोबर विधान ओळखा.
१) गोपाळराव जोशी हे एक विक्षिप्त,जिद्दी,तहेवाईक,जिभेला हाड नसलेले व कशाचा धरबंध नसणारे एक सामान्य गृहस्थ होते. ते पोस्ट खात्यात नोकरीस होते.
२) गोपाळराव जोशी यांनी आपली पत्नी आनंदीबाई जोशींच्या मृत्युनंतर ४ वर्षानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
३) श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रपर कादंबरीमुळे व त्यावर अंधारलेल्या नाटकामुळे गोपाळराव जोशी हे नाव महाराष्ट्राला माहित झाले.
४) आगरकरांची निंदानालस्ती करण्यात ते आघाडीवर होते.
आगरकरांची जिवंतपणीच त्यांनी प्रेतयात्रा काढली होती.

१)१ व ३,           २) १,२,३,४,        ३) १,३,४,         ४)१ व २

७३०) त्र्यंबकजी डेंगळे यांचे दोन पुतणे गोदांजी व महिपा यांनी L000 .... ची पलटण उभी केली होती.
१) भिल्ल,        २) रामोशी,           ३) कोळी,         ४) यापैकी

उत्तर - ७२६- २, ७२७- ४, ७२८-२, ७२९ -२, ७३०-१

तामिळनाडू सरकार राज्यपातळीवर ‘एक राज्य, एक रेशन कार्ड’ योजना राबवत आहे.

🔰 भारत सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजनेच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडू सरकारने रेशनकार्डांची आंतरराज्य मान्यता देण्यासाठीच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

🔰 या योजनेमुळे राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना राज्यातल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे.

☑️ योजनेविषयी..

🔰 ही योजना प्रायोगिक तत्वावर थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे आणि नंतर ती राज्यभरात लागू केली जाणार.

🔰 राज्यभरात सध्या 35,233 स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी एकूण 9,635 ही अर्धवेळ दुकाने आहेत. एकूणच 2,05,03,379 कुटुंबांना स्मार्ट रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहेत.
ही योजना स्थलांतरित कामगारांना उपयुक्त ठरणार. ते स्मार्ट कार्ड, आधार कार्ड किंवा OTP मार्फत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचा वापर करून त्यांच्या हक्काच्या वस्तू मिळवू शकतात.
‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

🔰 1 जून 2020 पासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना लागू होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातल्या कोणत्याही भागातून सध्याच्या रेशनकार्डवरच स्वस्त धान्य घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

🔰 'एक देश, एक रेशन कार्ड' या योजनेचा सर्वात मोठा फायदा दैनंदिन मजूर, कामगार आणि स्थलांतरित कामगारांना होणार आहे. देशभरात 'एक देश, एक रेशन कार्ड' ही योजना लागू करण्यापूर्वी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प म्हणून राबविण्यात आला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...