24 January 2020

जागतिक अर्थव्यवस्थेवरही भारतीय मंदीचा परिणाम


- बिगरबँक वित्तीय क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मरगळ अशी याविषयीची मीमांसा नाणेनिधीने सोमवारी केली.

▪️नाणेनिधीकडून विकासदरांचे फेरमूल्यांकन

- भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेमधील मंदीचा दाखला देत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) २०१९ या वर्षांसाठीचा जागतिक विकासदर अंदाज २.९ टक्क्यांपर्यंत खाली आणला. याबरोबरच भारताचा विकासदरही ४.८ टक्के असा पुनर्लेखित करण्यात आला. बिगरबँक वित्तीय क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मरगळ अशी याविषयीची मीमांसा नाणेनिधीने सोमवारी केली.

- डावोस येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक परिषदेच्या उद्घाटनापूर्वी नाणेनिधीने ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’ला (डब्ल्यूइओ) हा बहुचर्चित अहवाल सादर केला.

- जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढ २०१९च्या अंदाजे २.९ टक्क्यांपासून २०२० मध्ये ३.३ टक्के आणि २०२१ साठी ३.४ टक्के इतकी वर्तवण्यात आली आहे. हा सुधारित बदल २०१९ आणि २०२० साठी ०.१ टक्क्याने, तर २०२१ साठी ०.२ टक्क्यांनी कमी आहे.

-  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या अधोमुख पुनरीक्षणात खासकरून भारतासह काही उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांमधील नकारात्मक धक्के प्रतिबिंबित होतात, ज्यामुळे येत्या दोन वर्षांसाठीच्या वाढीच्या अंदाजांचे पुनर्मूल्यांकन करणे भाग पडले. काही प्रकरणांमध्ये, हे पुनर्मूल्यांकन वाढलेला सामाजिक असंतोषही प्रतिबिंबित करते, असे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे.

- नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपिनाथ यांनी भारताविषयी सांगितले, की देशांतर्गत मागणीत अपेक्षेपेक्षा अधिक कपात दिसून आली. बिगरबँक वित्तीय क्षेत्रातील मरगळीमुळे पतपुरवठा आक्रसला, असे त्या म्हणाल्या. मात्र नाणे धोरण आणि आर्थिक मदतीच्या रेटय़ावर भारतीय विकासदर २०२०मध्ये ५.८ टक्के आणि २०२१मध्ये ६.५ टक्के राहील, असाही अंदाज नाणेनिधीने वर्तवला आहे.

▪️४.८ टक्के विकासदराचा अंदाज

- जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढ २०१९  मध्ये फक्त २.९ टक्के असेल, असा ‘आयएमएफ’चा अंदाज आहे. तसेच या वर्षांत भारताचा आर्थिक विकासदर ४.८ टक्के इतका असेल, असे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे.

एनआयए कायद्याला छत्तीसगडचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान.

🔰नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत यूपीए १सरकारच्या काळात करण्यात आलेला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायदा घटनाबाह्य़ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

🔰या कायद्यामुळे राज्यांचे सार्वभौमत्व धोक्यात येऊन केंद्राला अनिर्बंध अधिकार मिळतात असा दावा याचिकेत केला आहे.

🔰केरळ सरकारने नागरिकत्व कायद्याला आव्हान दिले होते त्यानंतर आता एनआयए कायद्याला छत्तीसगड सरकारने आव्हान दिले आहे.

🔰मनमोहन सिंग सरकारने २६ नोव्हेंबर २००८ रोजी एनआयए कायदा मुंबई हल्ल्यानंतर केला होता. त्या वेळी काँग्रेस नेते पी.चिदंबरम हे गृहमंत्री होते.

🔰या कायद्यानुसार एनआयएच्या पथकांना राज्यांची परवानगी न घेता कुठेही जाऊन छापे टाकणे व चौकशी करणे असे अधिकार देण्यात आले आहेत.

🔰छत्तीसगड सरकारने कलम १३१ अन्वये दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, एनआयए कायद्याने राज्यघटनेतील तत्त्वांचा भंग झाला असून असा कायदे करणे संसदेच्याही कार्यकक्षेत नाही.

Current affairs questions

📍 कोणत्या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन होणार आहे?

(A) कटक
(B) भुवनेश्वर✅✅
(C) भोपाळ
(D) गुवाहाटी

📍 पद्मभूषण अकबर पदमसी ह्यांचे कोयंबटूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते एक ____ होते.

(A) पत्रकार
(B) कलाकार✅✅
(C) अभियंता
(D) लेखक

📍 ISRO या संस्थेनी _ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?

(A) तिरुवनंतपुरम
(B) बेंगळुरू
(C) छल्लाकेरे✅✅
(D) कोची

📍 __ राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करतो.

(A) नागालँड
(B) मिझोरम✅✅
(C) मणीपूर
(D) अरुणाचल प्रदेश

▪ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद

▪ तंजावूर हे शहर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : तामिळनाडू

▪ कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना’ लागू करण्यात आली?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪ 21 जानेवारीला कोणत्या राज्याने राज्याचा 48 वा स्थापना दिन साजरा केला?
उत्तर : मेघालय

▪ कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये संविधानाची प्रस्तावना याचे वाचन अनिवार्य केले आहे?
उत्तर : महाराष्ट्र

▪ ‘कार्बन डिसक्लोजर प्रोजेक्ट 2019’ या अहवालात भारत कोणत्या क्रमांकावर आहे?
उत्तर : 5 वा

▪ कोणत्या राज्यात ‘फिट इंडिया सायक्लोथन’ आयोजित केले गेले?
उत्तर : गोवा

▪ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा 15 वा उदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 18 जानेवारी

▪ कोणते राज्य 6 मार्च 2020 रोजी ‘चपचार कुट’ महोत्सव साजरा करणार?
उत्तर : मिझोरम

▪ कोणत्या कंपनीने 3.5 अब्ज डॉलर एवढ्या रकमेसह भारतातली ‘उबर इट्स’ ही कंपनी विकत घेतली?
उत्तर : झोमॅटो

1. गोल्डन ग्लोब अवार्ड्स 2020 में किस फिल्म को सर्वश्रेष्ठ फ़ीचर फिल्म का पुरस्कार दिया गया?
a. वन्स अपॉन ए टाइम इन हॉलीवुड
b. जोकर
c. चेरनोबिल
d. 1917✔️

2. निम्नलिखित में से कौन सा खिलाड़ी एक ओवर में 6 छक्के मारने वाला विश्व का सातवां बल्लेबाज बना?
a. लियो कार्टर✔️
b. जॉन मोरिसन
c. बैरी हेडली
d. जियोफ होवार्थ

3. निम्नलिखित में से किस दिन प्रत्येक वर्ष अंतर्राष्ट्रीय ब्रेल दिवस मनाया जाता है?
a. 02 जनवरी
b. 03 जनवरी
c. 04 जनवरी✔️
d. 05 जनवरी

4. निम्नलिखित में किस भारतीय ऑल-राउंडर ने 04 जनवरी 2020 को क्रिकेट के सभी प्रारूपों से संन्यास लेने की घोषणा की?
a. रविंद्र जडेजा
b. इरफ़ान पठान✔️
c. युसूफ पठान
d. पृथ्वी शॉ

5. केंद्र सरकार द्वारा कितने मीडिया संस्थानों के लिए पहले ‘अंतर्राष्ट्रीय योग दिवस मीडिया सम्मान’ की घोषणा की गई है?
a. 30✔️
b. 35
c. 40
d. 45

6. उस ईरानी जनरल का क्या नाम है जिसे हाल ही में अमेरिका द्वारा ड्रोन से मिसाइल हमले में निशाना बनाया गया?
a. जनरल आबिद कयूम
b. जनरल कासिम सुलेमानी✔️
c. जनरल अयूब जहां
d. जनरल रफीक कियानी

7. निम्नलिखित में से किस राज्य सरकार द्वारा महिलाओं की सुरक्षा के लिए ‘दामिनी’ नामक हेल्पलाइन लॉन्च की गई है?
a. गुजरात
b. पंजाब
c. हरियाणा
d. उत्तर प्रदेश✔️

8. निम्नलिखित में से किस दिन सावित्रीबाई फुले की 189वीं जयंती मनाई गई?
a. 1 जनवरी 2020
b. 2 जनवरी 2020
c. 3 जनवरी 2020✔️
d. 4 जनवरी 2020

9. विज्ञान को लोकप्रिय बनाने के लिए किस वैज्ञानिक को वर्ष 2020 के इंदिरा गांधी पुरस्कार से सम्मानित किया गया है?
a. पी. देसाई
b. आर. रामानुजम✔️
c. देविका सुन्दरन
d. कलराज मजूमदार

10. उमारो सिस्सोको निम्नलिखित में से किस देश के राष्ट्रपति चुने गये हैं?
a. मेक्सिको
b. घाना
c. पेरू
d. गिनी बिसाऊ✔️

बीसीसीआयचे पुरस्कार घोषित..

🏏 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आज 2018-19 वर्षासाठीच्या पुरस्कारांसाठीची नावे घोषित केली आहेत. जाणून घेऊयात कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार आणि खेळाडू :

🔰 कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार : के श्रीकांत

🔰 बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार (महिला) : अंजूम चोप्रा

🔰 बीसीसीआय विशेष पुरस्कार : दीलिप जोशी

🔰 पाॅली उम्रीगर पुरस्कार : जसप्रीत बुमराह

🔰 सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महीला क्रिकेटपटू : पुनम यादव

🔰 दिलीप सरदेसाई पुरस्कार : चेतेश्वर पुजारा

🔰 दिलीप सरदेसाई पुरस्कार : जसप्रीत बुमराह

🔰 वनडेमध्ये सर्वाधिक धावा (महिला) : स्मृती मानधना

🔰 वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स (महिला) : झूलन गोस्वामी

🔰 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष) : मयंक अगरवाल

🔰 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला) : शेफाली वर्मा

🔰 लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू (रणजी) : शिवम दुबे (मुंबई)

🔰 लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू : नीतीश राणा (दिल्ली)

🔰 सर्वाोत्तम पंच (देशांतर्गत क्रिकेट) : विरेंद्र शर्मा

🔰 यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ : विदर्भ

🔰 माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू : मिलिंद कुमार (सिक्कीम)

🔰 माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज : आशुतोष अमन (बिहार)

🔰 जगमोहन दालमिया ट्राॅफी (देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारी महिला क्रिकेटर) : दिप्ती शर्मा (बंगाल)

मिस युनिव्हर्स 2019: झोजिबिनी टुंझी (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स 2019’ म्हणजेच विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे.

मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय क्रमांक तर मिस मेक्सिकोने तृतीय क्रमांक पटकावले.

अमेरिकेच्या अॅटलांटा शहरात 9 डिसेंबर 2019 रोजी 68 वी ‘मिस युनिव्हर्स’ ही सौंदर्य स्पर्धा झाली. गतवर्षीची मिस युनिव्हर्स कॅटरिना ग्रे हिने मानाचा मुकूट विजेतीला चढविला.

उपांत्य फेरीत पोहचलेली भारताची वर्तिका सिंग शेवटच्या 20 जणींमध्ये होती.

स्पर्धेविषयी

मिस युनिव्हर्स (विश्वसुंदरी) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे.

अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात मुख्यालय असलेली मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ह्या स्पर्धेचे आयोजन करते.

1952 साली कॅलिफोर्नियामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली होती.

विश्वसुंदरी ठरलेल्या भारतीय - सुष्मिता सेन (सन 1994) व लारा दत्ता (सन 2000)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

23 January 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच


(4) कोणत्या खेळाडूने रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?
(1)बबिता कुमारी
(2)विनेश फोगट✅✅
(3)साक्षी मलिक
(4)लुईसा एलिझाबेथ वाल्व्हर्डे

⚛⏩SOLUTION ⏩रोममध्ये झालेल्या रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगट हिने 53 किलोग्रॅम वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकले. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

(5) शांघाय सहकार्य संघटना (SCO) यांच्या सरकारांच्या प्रमुखांची 19 वी परिषद कोणता देश आयोजित करणार आहे?
(1)भारत✅✅
(2)रशिया
(3)चीन
(4)कझाकस्तान

⚛⏩Solution ⏩2020 साली होणार्‍या शांघाय सहकार्य संघटना (SCO) यांच्या सरकारांच्या प्रमुखांची (पंतप्रधानांची) 19 वी परिषद भारत देश आयोजित करणार आहे. शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 2001 साली झाली आणि त्याचे मुख्यालय चीनच्या बिजींग या शहरात आहे. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.  चीन हा याचा संस्थापक देश आहे.

(6)कोणत्या राज्यात प्रथम ‘कृषी मंथन’ (अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातली सर्वात मोठी शिखर परिषद) सुरू झाली?
(1) तेलंगणा
(2) आसाम
(3) दिल्ली
(4) गुजरात✅✅

⚛⏩Solution ⏩गुजरातच्या IIM अहमदाबाद यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम ‘कृषी मंथन’ या अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या शिखर परिषदेला सुरूवात झाली.

(7) कोणत्या शहरात इंधनाच्या संवर्धनासाठी PCRAच्या 'सक्षम 2020' नावाच्या जागृती मोहीमेला सुरूवात करण्यात आली?
(1)बेंगळुरू
(2)हैदराबाद
(3)नवी दिल्ली✅✅
(4)लखनऊ

⚛⏩Solution ⏩पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेकडून (PCRA) ‘सक्षम’ नावाने इंधन बचतीविषयी महिन्याभराची लोक-केंद्रित मोहीम राबवली जात आहे. 16 जानेवारी 2020 रोजी दिल्लीमध्ये या मोहिमेचे उद्घाटन झाले.

(8)29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?
(1)के. शिव रेड्डी
(2)ममता कालिया
(3)वासदेव मोही✅✅
(4)यापैकी नाही

⚛⏩SOLUTION ⏩सिंधी लेखक वासदेव मोही ह्यांना त्यांच्या ‘चेकबुक’ शीर्षक असलेल्या कथासंचासाठी 29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार देण्यात आला. सरस्वती सन्मान के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिला जातो.

(9) ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?
(1)दक्षिण आफ्रिका✅✅✅
(2)भारत
(3)ऑस्ट्रेलिया
(4)न्युझीलँड

⚛⏩SOLUTION ⏩‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जात आहे. ही स्पर्धा 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत चालणार आहे.

(10) कोणत्या व्यक्तीची पुढील तीन वर्षांसाठी RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
(1)मायकेल देबाब्रत पात्रा✅✅
(2)विरल आचार्य
(3)एस. एस. मुंद्रा
(4)एच. आर. खान

⚛⏩SOLUTION ⏩भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. शक्तिकांत दास हे वर्तमान RBI गव्हर्नर आहेत. RBIचे इतर तीन डेप्युटी गव्हर्नर - एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुंगो आणि एम. के. जैन.

⚛⚛ ____________ येथे ‘राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम’ याला सुरुवात झाली.

(A) पुडुचेरी✅✅
(B) रांची
(C) नवी दिल्ली
(D) रायपूर

⚛⚛नुकतेच निधन झालेले रॉकी जॉनसन हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

(A) कुस्ती✅✅
(B) फुटबॉल
(C) क्रिकेट
(D) हॉकी

⚛⚛2019 या सालासाठी जल-विषयक कार्यक्षमतेच्या ध्येयावर आधारित असलेला केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागांच्या क्रमवारीतेमध्ये कोणते राज्य अव्वल ठरले?

(A) दिल्ली
(B) गुजरात✅✅
(C) मध्यप्रदेश
(D) राजस्थान

शिव केंद्रे:
⚛⚛....यांनी 1929 ते 1944 दरम्यान मद्रास प्रांताचे अँडव्होकेट जनरल म्हणून कार्य केले होते.
1)एन गोपालस्वामी अय्यंगार
2)अल्लादि कृष्णस्वामी अय्यर✅✅
3)स द मुहम्मद सादुल्लाह
4)डॉ के एन मुन्शी

Pratiksha M:
⚛⚛कोणत्या राज्यात “परशुराम कुंड मेळावा’ या उत्सवाला सुरुवात झाली?
(1)हिमाचल प्रदेश
(2)उत्तराखंड
(3)अरुणाचल प्रदेश✅✅
(4)त्रिपुरा

⚛⚛कोणत्या व्यक्तीची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
(1)ए. पी. माहेश्वरी✅✅
(2)एस. एस. देसवाल
(3)राजीव राय भटनागर
(4)रजनी कांत मिश्रा

⚛⚛⏩Solution ⚛केंद्रीय IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.

⚛⚛कोणत्या स्थळाचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या '8 वंडर्स ऑफ SCO' या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे?
(1)स्टॅच्यू ऑफ युनिटी✅✅
(2)कॅपिटल कॉम्प्लेक्स
(3)अजिंठा लेणी
(4)बॅसिलिका ऑफ बॉम जिझस

⚛⏩SOLUTION ⏩जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरातमधले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या '8 वंडर्स ऑफ SCO' या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर सात आश्चर्य - तमगलीचा भूप्रदेश (Archaeological Landscape of Tamgaly), कझाकस्तान; डॅमिंग पॅलेस, चीन; इसिक-कुल तलाव, किर्गिस्तान; मुघल घराण्याचा वारसा, पाकिस्तान; गोल्डन रिंग, रशिया; कोही नवरोझ पॅलेस, ताजिकिस्तान आणि बुखाराचे ऐतिहासिक केंद्र, उझबेकिस्तान

⚛⚛______ येथे ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ आहे ?
(1)गुवाहाटी✅✅
(2)इंफाळ
(3)कोहिमा
(4)कोलकाता

⚛⚛SOLUTION ⏩आसामच्या गुवाहाटी या शहरात असलेले ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ (CBTC) ईशान्य परिषदेच्या अंतर्गत कार्य करते.

22 January 2020

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून आढावा

🔰 गोव्यात 20 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

🔰 केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरण रिजीजू यांनी आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद यांच्यासमवेत आयोजित बैठकीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा आढावा घेतला.

🔰 गोव्यात 20 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2020 या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 

🔰 स्पर्धेत एकूण 37 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

🔰 त्यापैकी दोन क्रीडाप्रकार दिल्ली येथे घेण्यात येतील.

🔰 उर्वरीत 35 क्रीडाप्रकार राज्यात होतील.

🔰 केंद्रीय मंत्र्यांनी आज सचिवालयात झालेल्या बैठकीत तयारीचा आढावा घेतला.

🔰 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व स्टेडिअम सुसज्ज असतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. तसेच 31 ऑगस्ट पर्यंत स्पर्धेसाठीची सर्व साधनं स्टेडिअम आणि इतर ठिकाणी तयार असतील.

🔰 स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या 71 प्रमुख सेवांसाठीच्या कंत्राटाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

🔰 डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअम-बांबोळी, बी के एस स्टेडिअम-म्हापसा, टिळक मैदान- मडगाव आणि जवाहरलाल नेहरु स्टेडिअम-फातोर्दा याठिकाणी प्रमुख क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येणार आहे.

🔰 राज्यात आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरतील, असे किरण रिजीजू म्हणाले.

🔰 केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून राज्याला स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर

- ग्रीनपीसचा वायू प्रदूषण अहवाल जाहीर; मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित

- भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.

- दिल्ली वर्षांपूर्वी आठव्या स्थानावर होते. झारखंडमधील धनबाद हे ठिकाण कोळसा खाणी व उद्योगांसाठी प्रसिद्ध असून ते देशातील दुसरे प्रदूषित ठिकाण आहे. यात पीएम १० कणांचे प्रमाण देशातील २८७ शहरांत मोजण्यात आले.

- मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित असून त्या खालोखाल मेघालयच्या डोवकी या ठिकाणांचा कमी प्रदूषणात दुसरा क्रमांक आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी दहा उत्तर प्रदेशात असून त्यात नॉइडा, गाझियाबाद, बरेली, अलाहाबाद, मोरादाबाद, फिरोजाबाद यांचा समावेश आहे. दक्षिणेकडे सर्वाधिक प्रदूषित शहरात एकूण २८ ठिकाणांचा समावेश असला, तरी त्यात केरळमधील एकही ठिकाण नाही.

- ग्रीनपीसच्या भारतीय शाखेने एअरोपोकॅलप्स ४ अहवाल मंगळवारी जारी केला असून त्यात देशातील शहरांच्या हवा प्रदूषणाचा ताळेबंद मांडला आहे. २०१८ मध्ये देशातील एकूण २८७ शहरांच्या हवेचे ५२ दिवस निरीक्षण करून असे सांगण्यात आले, की २३१ शहरांत पीएम १० कणांचे प्रमाण हे धोकादायक पातळीपेक्षा अधिक आहे. भारतात पीएम दहा कणांचे २४ तासांना १०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर वर्षांला सरासरी ६० मायक्रोग्रॅम घनमीटर इतके प्रमाण सुरक्षित मानले गेले आहे. झारखंडमधील झारिया येथे पीएम १० कणांचे प्रमाण प्रतिघनमीटरला ३२२ मायक्रोग्रॅम होते. धनबाद व नॉइडात ते प्रतिघनमीटरला २६४ मायक्रोग्रॅम होते. गाझियाबादेत २४५ मायक्रोग्रॅम होते.

- कर्नाटकातील बंगळूरु, रायचूर, बेळगावी, तुमकुरु, कोलार, बिजापूर, हुबळी, धारवाड, बागलकोट ही शहरे जास्त प्रदूषित आहेत.

- तमिळनाडूत त्रिची, थुतूकोडी, मदुराई, चेन्नई तर तेलंगणात कोठूर, हैदराबाद, रामगुंडम, करीमनगर, वारंगळ, खम्मम, संगारेड्डी, पटेनतुरू, अदिलाबाद ही शहरे प्रदूषित आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा, विशाखापट्टनम, काकीनाडा, राजमुंद्री, श्रीकाकुलम, अनंतपूर ही ठिकाणे प्रदूषित आहेत. केरळमध्ये एकाही शहरातील हवेत पीएम १० कणांचे प्रमाण धोकादायक दिसले नाही. तेथे कमाल प्रमाण दर घनमीटरला ५७ मायक्रोग्रॅम होते.

▪️सरकारला शिफारस

- भारत सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी) तयार केला असून त्यात जास्त शहरांचा समावेश करावा, असे ग्रीनपीसचे म्हणणे आहे.

केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर प्रदेशातली प्रीपेड मोबाईल सेवा सुरू.

🎆 जम्मू-कश्मीर या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात कालपासून प्रीपेड मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

🎆 काश्मीर खोर्‍यात दोन जिल्ह्यातील टू-जी सेवाही सुरू झाली असल्याची माहिती अधिकृत प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिली.

🎆 या सेवा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून बंद ठेवण्यात आल्या होत्या.

🎆 या प्रदेशात सर्वत्र एस.एम.एस सेवाही सुरू झाली आहे. मोबाईल सिमद्वारे इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांची ओळख पटवण्याचं काम मोबाईल सेवा कंपन्यांनी करायचं आहे.

🎆 ही सेवा जम्मू विभागातल्या सर्व दहा आणि कूपवाडा आणि बांदिपूर या काश्मीर खोर्‍यातील जिल्ह्यांमधे दिली जात आहे. 

🎆 ५ ऑगस्ट २०१९ ला संविधानाच्या ३७० कलमाच्या दुरूस्तीद्वारे जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्द होऊन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमधे विभाजन झाल्यानंतर या सेवा थांबवण्यात आल्या होत्या.

🔹