१६ जानेवारी २०२०

अमेरिकेच्या संसदेने घटवली ट्रम्प यांची ताकद; घेऊ शकणार नाहीत युद्धाचा निर्णय.

🎍इराण आणि अमेरिका यांच्यामधील राजकीय संबंध प्रचंड ताणवपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच कृती युद्धाला पोषक ठरत आहे. त्यामुळे केव्हाही या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. याचे परिणाम केवळ इराण आणि अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या संसदेने ट्रम्प यांचे विशेषाधिकार कमी करण्याबाबतचा एक ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना इराणवर पलटवार करण्याची खुली मुभा मिळणार नाही.

🎍डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांनी आपले बहुमत असलेल्या कनिष्ठ सभागृहात अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव १९४ मतांच्या बहुमतानं मंजूर करण्यात आला. यानंतर आता तो संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे.

🎍डेमोक्रेटिक पक्षाचा आरोप आहे की, ट्रम्प यांनी संसदेला माहिती दिल्याशिवाय इराकमध्ये इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ल्याची परवानगी दिली होती. यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या खासदारांना पत्र लिहून राष्ट्राध्यक्षांच्या सैन्य कारवायांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव मांडला होता.

सिंधु संस्कृती

ही भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे
. ही संस्कृति प्रामुख्याने सिंधू नदी,सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी (पंजाबातील ५ मुख्य नद्यांच्याकाठी) अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहरली.

🌸सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ.स.१९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरूप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला.
यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल (पुरातत्त्वविभागाचे महासंचालक,इ.स. १९०२ ते १९२८), इ. जे. एच्. मॅके, माधोस्वरूप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.

🌸🌸🌸☘🌸🌸🌸☘🌸🌸🌸☘🌸

ओझोन अवक्षय (Ozone depletion)

ओझोन अवक्षय म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणार्‍या ओझोन वायूच्या थरातील त्याचे प्रमाण कमी होणे. ओझोन हे ऑक्सिजन या मूलद्रव्याचे उच्च ऊर्जा असलेले एक बहुरूप आहे. सामान्य ऑक्सिजनामध्ये दोन अणू (O2) असतात, तर ओझोनाच्या प्रत्येक रेणूत ऑक्सिजनाचे तीन अणू (O3) असतात. १८७२ सालामध्ये बी. ब्रॉडी यांनी ऑक्सिजनाचे तीन अणू एकत्र येऊन ओझोनाचा रेणू बनलेला असतो हे सिद्ध केले. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण ०.००००६ टक्के इतके अल्प असते. सूर्याची अतिनील किरणे वातावरणातून येताना भूपृष्ठापासून ६०-८० किमी. उंचीच्या पट्ट्यात त्यांची ऑक्सिजनाशी रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन वायू तयार होतो. हा वायू स्थितांबरातील १२ ते ४० किमी. उंचीच्या थरात जमा होतो. २० ते २५ किमी. च्या पट्ट्यात त्याचे सर्वाधिक प्रमाण असते. वातावरणातील ९० % ओझोन स्थितांबरात आढळतो. स्थितांबरातील ओझोनाच्या या आवरणालाच ‘ओझोनांबर’ असे म्हणतात. ध्रुवीय प्रदेशात ओझोनाच्या थराची जाडी अधिक असते. विषुववृत्तीय भागात तुलनेने कमी असते.
स्थितांबरात असणार्‍या ओझोनामुळे सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांचा काही भाग शोषला जातो. सजीवांना पोषक एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचे संरक्षण होते. जर ओझोनाचा थर नसता तर अतिनील किरणे जशीच्या तशी भूपृष्ठावर पोहोचली असती आणि मानवासह सर्व सजीवांना अनिष्ट परिणाम भोगावे लागले असते. या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार इ. अनेक विकार जडतात. स्थितांबरातील या ओझोनाच्या रूपाने पृथ्वीभोवती जणू एक संरक्षक कवच निर्माण झाले आहे.

नैसर्गिक रीत्या वातावरणात ओझोनाचे संतुलन राखले जाते. परंतु अलीकडील काही दशकात मानवी कृतींमुळे हे संतुलन बिघडत चालले आहे आणि ओझोन थरातील त्याचे प्रमाण घटत आहे. सजीवसृष्टीच्या दृष्टीने ही बाब चिंतेची आहे. ओझोन अवक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे सीएफसी (क्लोरोफ्ल्युओरोकार्बन). सीएफसी हा वायूचा शीतक, अग्निरोधक, औद्योगिक द्रावक, वायुकलिल (एरोसोल), फवार्‍यातील घटक व रासायनिक अभिक्रियाकारक म्हणून उपयोग होतो. हा वायू वातावरणाच्या वरच्या भागापर्यंत पोहोचतो. तेथे त्याचे विघटन होते आणि त्यातून क्लोरीन वायू निर्माण होतो. हा क्लोरीन ओझोनाचे अपघटन ऑक्सिजनामध्ये करतो.

सीएफसीशिवाय अन्य क्लोरीनयुक्त वायूंमुळेही ओझोन नष्ट होऊ शकतो. या वायूंचे स्रोत काही प्रमाणात नैसर्गिक (ज्वालामुखी उद्रेक, सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिक विघटन इ.) असले तरी प्रामुख्याने ते मानवनिर्मित आहेत.

वातावरणातील ओझोनाची संहती (रेणूंची संख्या) कमी झाल्यामुळे त्याचा अवक्षय दिसून येतो. ओझोनाच्या थराच्या जाडीत फरक होत नाही. १९७० च्या दशकाच्या शेवटी वैज्ञानिकांना अंटार्क्टिका खंडावरील वातावरणातील ओझोनच्या अवक्षयाची खरी जाणीव झाली. १९८५ मध्ये ब्रिटिश वैज्ञानिकांनी ओझोनाचे छिद्र (ओझोनाची संहती लक्षणीय रीत्या कमी झालेले क्षेत्र) १९६० पासून वाढत असल्याचे निदर्शनाला आणून दिले. अंटार्क्टिकावरील काही जागी ओझोनाची संहती ५० % पर्यंत कमी झालेली आढळली.

जागतिक स्तरावर ओझोनाचा अवक्षय थांबवून जीवसृष्टीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न सुरू झाले आहेत. सीएफसीच्या उत्पादनास प्रतिबंध घालणे, त्यांचे उत्पादन कमी करणे किंवा त्याला पर्यायी रसायने शोधणे इ. उपायोजना केल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संरक्षण समितीने सप्टेंबर १९८७ मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार केला. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून १६ सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ पाळला जातो. १९८७ चा माँट्रियल करार व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून सीएफसीची निर्मिती २० टक्क्यांनी कमी झाली आहे. ओझोन समस्येबाबत भारत हे एक जवाबदार व जागरूक राष्ट्र आहे. ओझोन अवक्षय ही एक जागतिक समस्या असल्याचे भान ठेवून भारताने १९९२ मध्ये माँट्रिऑल करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र या प्रकारचे करार हे जगातील सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने सामान्य व न्याय्य स्वरूपाचे असावेत, ही भारताची ठाम भूमिका आहे. भारताने ओझोनाचा नाश करणार्‍या द्रव्यांच्या उत्पादनावर व व्यापारावर बंदी घातलेली आहे.

आयसीसीच्या 2019 मधील पुरस्कारांचे मानकरी

- वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीचा सर गारफिल्ड सोबर्स करंडक - बेन स्टोक्स (इंग्लंड)
- सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू - पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
- सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू - रोहित शर्मा (भारत)
- ट्वेन्टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी - दीपक चहर (भारत)
- सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू - मार्नस लबूशेन (ऑस्ट्रेलिया)
- संलग्न देशांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू - कायले कोएट्झर (स्कॉटलंड)
- खेळभावना पुरस्कार - विराट कोहली (भारत)
- सर्वोत्तम पंचासाठीचा डेव्हिड शेफर्ड करंडक - रिचर्ड इलिंगवर्थ

जागतिक बँकेचा “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स” अहवाल

जागतिक बँकेचा ताजा ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्तवविलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वृद्धिदर हा 5 टक्क्यांवर सीमित राहणार.

अहवालातल्या ठळक बाबी

भारताविषयी

जागतिक बँकेचा अंदाज खरा ठरल्यास भारतीय विकासदराचा तो 11 वर्षांतला नीचांक ठरणार.

GDP दरातल्या घसरणीस कारणीभूत असणारे घटकही जागतिक बँकेने नमूद केले आहेत. भारतात खासगी क्षेत्रातून होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रयशक्तीही घटल्याचे दिसत असून त्याचाही विकासदरास फटका बसणार.

पुढील आर्थिक वर्षात वृद्धिदर वेग धरणार व आर्थिक वर्ष 2020-21 अखेर हा दर 5.8 टक्क्यांवर पोहोचणार.

जागतिक

वर्ष 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ 2.5 टक्के राहणार असा अंदाज आहे.

दक्षिण आशियाचा GDP वृद्धीदर 2019-20 या वर्षी 5.5 टक्क्यांपर्यंत राहण्याचे अपेक्षित आहे.

2020 या वर्षी प्रगत अर्थव्यवस्थांचा एकत्रित वृद्धीदर 1.4 टक्क्यांपर्यंत खालावणार असा अंदाज आहे.

उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर यंदा 4.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.

देशाच्या प्रथम संक्रमण-उन्मुख विकास प्रकल्पाचे बांधकाम नवी दिल्लीत सुरू


- काम किंवा करमणुकीसाठी कराव्या लागणार्‍या प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या आणि शहरी विकासाला अधिक शाश्वत बनविण्याच्या उद्दीष्टांना दृष्टीपथात ठेवत, राजधानी दिल्लीमध्ये देशातल्या पहिल्या संक्रमण-उन्मुख विकास (Transit-oriented development -TOD) प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

- केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालय आणि दिल्ली विकास प्राधिकरण यांच्या TOD धोरणाच्या अंतर्गत चालणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.

▪️ठळक बाबी

- स्मार्ट शहर उभे करण्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीत भारतातली पहिली रीजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (RRTS) उभारली जात आहे. हा प्रकल्प त्याचा एक भाग आहे.

- मेट्रो स्थानके, निवासस्थाने आणि कामाचे ठिकाण तसेच संग्रहालये, ग्रंथालये यासारख्या मनोरंजक जागा यांना एकत्र जोडून प्रवास सुकर करण्याच्या उद्देशाने एकात्मिक विकास केला जात आहे. हा प्रकल्प 2023 सालापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

- एका नियोजनबद्ध पद्धतीने मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानक, आंतरराज्यीय बस सेवा स्थानके, सौर ऊर्जा केंद्रे आणि पुनर्वापरासाठी जलप्रक्रिया यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे.

अटल भूजल योजनेचा प्रारंभ

25 डिसेंबर 2019 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल भूजल योजना (अटल जल) याचा प्रारंभ केला गेला.

या मोहिमेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे ही 2024 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न साध्य करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे.

जल शक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वात ही योजना राबवली जाणार आहे. लोकसहभागाने जल संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न केले जाणारा आहेत. घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या दिशेने कार्य केले जात आहे.

▪️अटल भूजल योजना (अटल जल):-

भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक चौकट मजबूत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या सात राज्यांमध्ये ओळखलेल्या भागांमध्ये शाश्वत भूजल संसाधन व्यवस्थापनासाठी समुदाय पातळीवर वर्तनात्मक बदल घडविणे या मुख्य उद्देशाने अटल जलची रचना करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे या राज्यांमधील 78 जिल्ह्यांमधील जवळपास 8350 ग्रामपंचायतींना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सन 2020-21 ते सन 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 6000 कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी 50 टक्के जागतिक बँक कर्ज रूपात असतील.

सुधारित भूजल व्यवस्थापन पद्धतीत यश मिळवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देणे जेणेकरुन सध्या अस्तित्वात असलेल्या योजना एकत्र करुन राज्य सरकार जल व्यवस्थापनाच्या संदर्भात मागणीनुसार प्राधान्यक्रम ठरवत सुस्पष्ट आखणी आणि अंमलबजावणी करु शकतील.

आता सीएनजीची जागा घेणार बायोगॅस

- कंप्रेस्ड बायोगॅसमार्फत(सीबीजी) संपूर्ण देशामध्ये सीएनजीची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.

- यांच्या माहितीनुसार बायोगॅसची योजना सर्वत्र लागू करण्याचे संकेत आहेत. यामध्ये देशभरात प्रत्येक वर्षाला 6.2 कोटी टन सीएनजीच्या तुलने इतके कंप्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन होण्याचे अनुमान आहे. 

▪️2023 पर्यंतचे ध्येय

- पेट्रोलियम मंत्रालयाने 2018 मध्ये सतत(सस्टेनेबल अल्टरनेटीव्ह टुवार्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन) पहिल्यापेक्षा सक्षम योजना लाँच केली होती.

- याच्या आधारेचे सरकारी तेल ऍण्ड गॅस कंपन्यांना सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी प्रोहोत्सान देण्यात आले आहे. यासाठी सरकारने 2023 पर्यंत 1.5 कोटी टन वार्षिक सीबीजीचे उत्पादन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

▪️सीएनजीची 40 टक्के मागणी पूर्ण

- 1.5 कोटी टन सीबीजी उत्पादनाचे ध्येय नि]िश्चत केले जाणार आहे. सीएनजीची सध्याची वार्षिक विक्री 40 टक्क्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. व्यापारी वर्ष  2018-19 मध्ये 4.4 कोटी टन सीएनजीची विक्री करण्यात आली होती. 

▪️कच्च्या तेलाची आयात घट गरजेची

- सरकार 2022 पर्यंत कच्च्या तेलाची आयात 10 टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करत आहे. त्यात सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास 1.75 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचे संकेत असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले आहे.

- सदरच्या योजनेमधून 75 हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच पाच कोटी टन जैविक खताची निर्मिती होणार असल्याचे नमूद केले आहे.

नवी दिल्लीत 14 जानेवारीपासून  ‘रायसीना संवाद’ याचा प्रारंभ

- 14 जानेवारी ते 16 जानेवारी 2020 या काळात दरवर्षी प्रमाणे नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2020’ ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

▪️कार्यक्रमाचा विषय: “21@20: नेव्हिगेटींग द अल्फा सेंचुरी”

- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे या संमेलनाचे मुख्य वक्ते आहेत. या बैठकीला संबोधित करणार्‍या इतर मंत्र्यांमध्ये यजमान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांचा समावेश आहे.

- तसेच इराण, डेन्मार्क, मालदीव, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, भूतान, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया आणि उझबेकिस्तानमधले प्रतिनिधी यात भाग घेणार आहेत.

- यावर्षी मोठ्या संख्येनी जगभरातल्या परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती भू-राजनैतिक परिषदेत असणार आहे. परिषदेत 90 देशांमधून 150 हून अधिक वक्ता आणि 550  प्रतिनिधी भाग घेणार आहेत.

▪️कार्यक्रमाविषयी

- 'रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे. 2016 सालापासून तीन दिवस चालणारी ही परिषद भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (दिल्लीतली स्वायत्त वैचारिक संस्था) यांच्यावतीने संयुक्त रूपात आयोजित केली जाते.

- "रायसीना" हे नाव नवी दिल्लीमधल्या ‘रायसीना टेकडी’ या ठिकाणावरून ठेवले गेले आहे, जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतीसाठीचे घर आहे.

- हा कार्यक्रम जागतिक समुदायाला भेडसावणार्‍या सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांना सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. इथे धोरण, व्यवसाय, माध्यमे आणि नागरी समाजातले सर्व जागतिक नेते नवी दिल्लीत एकत्र येतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय धोरणांच्या विस्तृत विषयावर चर्चा करतात.
---------------------------------------------------

१५ जानेवारी २०२०

एका ओळीत सारांश, 15 जानेवारी 2020

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉भारतात चौथा सशस्त्र सैन्य दिग्गज दिन - 13 जानेवारी 2020.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉14 जानेवारी रोजी भारतीय रेल्वेचा दक्षिण मध्य विभाग आणि या बँकेत सामंजस्य करार झाला, ज्याद्वारे 585 रेल्वे स्थानकांची थेट कमाई संकलित करण्यासाठी डोअरस्टेप बँकिंग सेवा प्रदान केली जाणार – भारतीय स्टेट बँक.

👉डिसेंबर 2019 मध्ये घाऊक किमतींवर आधारित महागाई - 2.59 टक्के.

👉डिसेंबर 2019 मध्ये मासिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) वर आधारित वार्षिक महागाई - 3.46 टक्के.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉संशोधकांच्या मते, 2019 साली 1981-2010च्या सरासरीपेक्षा इतके डिग्री सेल्सियस जास्त समुद्राचे तापमान वाढले आहे – जवळपास 0.075 डिग्री सेल्सियस.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉13 जानेवारीला भारत आणि या देशाने माहिती व प्रसारण क्षेत्रात महत्त्वपूर्ण करार केला - बांग्लादेश.

👉या व्यक्तीचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी बांग्लादेशाने 17 मार्च 2020 ते 17 मार्च 2021 या काळात ‘मुजीब वर्ष’ साजरा करण्याचा निर्णय घेतला - शेख मुजीबुर रहमान (बांग्लादेशचे पहिले राष्ट्रपती).

👉प्रथमच, हा देश 2021 साली शांघाय सहकार संघटना (SCO) याच्या राष्ट्रप्रमुखांच्या समितीच्या वार्षिक बैठकीचे आयोजन करणार - भारत.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉21 जानेवारी रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू या शहरात सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल तेलुगू (CESCT) याचे उद्घाटन करणार - नेल्लोर.

👉प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार 2020 जिंकलेला जिल्हा - दिब्रूगड, आसाम.

👉हेन्ले पासपोर्ट निर्देशांकात भारताचा क्रमांक - 84 वा (शीर्षस्थान - जापान)

👉शांघाय सहकार संघटनेच्या 8 आश्चर्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला भारतीय पुतळा - स्टॅच्यू ऑफ युनिटी (182 मीटर उंच), गुजरात.

👉ही भारतीय संस्था 17-19 जानेवारी 2020 या काळात ‘ई-समिट-2020’चे आयोजन करणार - IIT, मद्रास.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन डेप्युटी गव्हर्नर - मायकेल पात्रा (विरल आचार्य यांच्या जागी).

👉भरतीत सर्व्हेक्षण विभागाचे सर्वेयर जनरल ऑफ इंडिया ज्यांना एका वर्षासाठी मुदतवाढ मिळाली - लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉जेदाह (सौदी अरब) येथे 2020 स्पॅनश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचा विजेता - रियल माद्रीद.

👉स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्समध्ये ‘टीम ऑफ द इयर’ - भारतीय कसोटी संघ.

👉स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्समध्ये वैयक्तिक श्रेणीत ‘स्पोर्ट्समन ऑफ द इयर’ - कुस्तीपटू बजरंग पुनिया.

👉स्पोर्ट्सवुमन ऑफ दी इयर (वैयक्तिक खेळ) - बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी आणि नेमबाज अपूर्वी चंदेला.

👉क्रिकेटर ऑफ द ईयर - रोहित शर्मा (पुरुष) आणि स्मृती मंधाना (महिला).

👉स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (रॅकेट खेळ) पुरस्कार - पी व्ही. सिंधू.

👉स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्समध्ये विशेष सन्मान - टेनिसपटू लिअँडर पेस.

👉स्पोर्ट्समन ऑफ द इयर (संघ खेळ) - मनप्रीत सिंग (पुरुष हॉकी संघाचा कर्णधार).

👉महिला यंग अ‍ॅथलीट ऑफ द इयर - नेमबाज मेहुली घोष.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉हे राज्य सरकार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीत मुक्त हालचालींसाठी ‘ग्रीन कॉरिडोर अ‍ॅप’ बाजारात आणण्याची योजना आखत आहे - बंगाल.

🌹🌳🌴ज्ञान-विज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय संप्रेषण उपग्रह जो 17 जानेवारी रोजी फ्रेंच गयानाहून एरियन-5 प्रक्षेपकाद्वारे पाठवला जाणार आहे - जीसॅट-30.

👉फाइव-हंड्रेड-मीटर अपर्चर स्फेरीकल रेडिओ टेलीस्कोप (FAST) दुर्बिण - चीनमध्ये (जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण).

👉13 जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेनी चिननंतर आता या देशात SARS सारख्याच कुटुंबातला एका नवीन विषाणूच्या पहिल्या घटनेची पुष्टी केली - - थायलंड.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय सशस्त्र दलांचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ – फील्ड मार्शल के. एम. करियप्पा.

👉केंद्रीय भारतीय भाषा संस्था (CIIL) - स्थापना: वर्ष 1969 (17 जुलै); ठिकाण: मैसूर.

👉मकर संक्रांती - दरवर्षी 14 जानेवारी.

👉कोअला (प्राणी प्रजाती) या देशात आढळते - ऑस्ट्रेलिया.

👉भितरकनिका वन्यजीव अभयारण्य आणि गहिरमाथा सागरी अभयारण्य - ओडिशामध्ये.

👉कैफी आझमी म्हणून ओळखले जाणारे अथर हुसेन रिझवी - भारतीय उर्दू कवी.

👉भारतीय सर्वेक्षण विभाग - स्थापना: वर्ष 1767; मुख्यालय: देहरादून.

👉शांघाय सहकार संस्था (SCO) - स्थापना: वर्ष 2001; मुख्यालय: बिजींग (चीन).

१४ जानेवारी २०२०

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) असला नवरा नको गं बाई! या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे.

   1) गुण विशेषण      2) दर्शक विशेषण   
   3) सार्वनामिक विशेषण    4) अनिश्चित विशेषण

उत्तर :- 3

2) पुढे दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा.

   1) विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे    2) शिक्षक मुलांना शिकवतात
   3) सचिनने चौकार मारला        4) जुन्या आठवणीने माझे डोळे पाणावले

उत्तर :- 4

3) “चमचम” – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

   1) गतिदर्शक      2) स्थितिदर्शक   
   3) अनुकरणदर्शक    4) प्रकारदर्शक

उत्तर :- 3

4) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     ‘ऐवजी’

   1) विनिमयवाचक  2) हेतूवाचक   
   3) कैवल्यवाचक    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

5) भिका-याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. वरील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.

   1) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यये      2) परिणाम बोधक उभयान्वयी अव्यये
   3) समूच्च बोधक उभयान्वयी अव्यये    4) स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यये

उत्तर :- 2

6) ‘ओहो’ या शब्दाची जात ओळखा.

   1) क्रियाविशेषण    2) शब्दयोगी    3) केवलप्रयोगी    4) उभयान्वयी

उत्तर :- 3

7) पुढील वाक्यातील ‘काळ’ ओळखा. – विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.

   1) भूतकाळ    2) पूर्ण वर्तमानकाळ 
   3) रीती भविष्यकाळ  4) साधा वर्तमानकाळ

उत्तर :- 2

8) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा तिन्ही प्रकारे होतो ?

   1) बाग      2) पोर      3) तंबाखू    4) सर्व

उत्तर :- 2

9) “तू” या सर्वनामाची तृतीया विभक्तीचे रूप कोणते. (एकवचनमधील)

   अ) तू      ब) तूते      क) तुशी      ड) तूत

   1) वरील सर्व      2) केवळ अ आणि ड 
   3) केवळ ब आणि क    4) केवळ अ आणि क

उत्तर :- 4

10) खाली दिलेल्या वाक्यातील मिश्रवाक्य कोणते ते ओळखा.

   1) तानाजी शत्रूशी लढता लढता रणांगणातच मेला
   2) आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो
   3) मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी
   4) अबब ! केवढी प्रचंड गर्दी ही !

उत्तर :- 2

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...