१२ जानेवारी २०२०

ओबीसी जनगणना प्रस्ताव मंजूर

◾️ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली.

◾️दोन्ही सभागृहात ओबीसी जनगणना प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

◾️जणगणना अर्जात जातीचा रकाना असावा, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडला.

◾️ त्यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडली.

◾️विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी जनगणना प्रस्ताव मांडला.

◾️ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत काय कामकाज होणार आहे, याबाबत ठरले आहे.

◾️ छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे.

◾️ लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही. नव्याने जनगणना करण्याची गरज असून, जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवण्याची गरज आहे.

◾️स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांनीही ठराव मांडला होता.

◾️ परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण देण्यास सांगण्यात आले. याबाबत चर्चा झाली तर ओबीसीचा रकाना त्यात समाविष्ट करून त्यांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...

1.पुणे- श्री. अजित अनंतराव पवार

2.मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख

3.मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे

4.ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

5.रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे

6.रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब

7.सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत

8.पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे

9.नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

10.धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार

11.नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

13.अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ

14 सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील

16.सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17.कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18.औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई

19.जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे

20.परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21.हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

22.बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण

24.उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख

25.लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख

26 अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27.अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28.वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई

29.बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30.यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड

31 नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32.वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार

33.भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34.गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख

35.चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार

36 गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” : परराष्ट्र मंत्रालयातला नवा विभाग

भारत सरकारच्या केंद्रीय परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने 1 जानेवारी 2020 रोजी घोषणा केली की नवी दिल्लीत मंत्रालयात “नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” नावाने एका नव्या विभागाची स्थापना करण्यात येणार आहे.

वेगाने वाढणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेत अश्या पुढाकाराने परकीय संबंधातून तंत्रज्ञान क्षेत्रात होणार्‍या गुंतवणुकीला आकर्षित करण्याला प्रोत्साहन मिळणार. सध्या भारत देशात 5G नेटवर्क तंत्रज्ञान आणण्यासाठी त्याच्या क्षेत्रात चाचण्यांमध्ये भाग घेण्यासाठी ह्यूवेई कंपनीसारख्या मोठ्या उद्योगांना परवानगी देण्याच्या विचारार्थ सरकार आहे.

ठळक बाबी:-

NEST विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांकरिता मंत्रालयात एक केंद्र म्हणून काम करणार.
5G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये परदेशी भागीदारांचे सहकार्य घेण्यामध्ये नवा विभाग मदत करणार.

स्थानिक भागधारक आणि परदेशी भागधारक यांच्यादरम्यान समन्वय ठेवण्यासाठी तसेच भारताच्या विकासाची प्राथमिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन धोरणे ठरविण्यामध्ये या विभागाची मदत होणार आहे.

नवा विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संसाधनांविषयीची परकीय धोरणे आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट अश्या बाबींचे मूल्यांकन करणार आणि योग्य परकीय धोरण निवड करण्याविषयीची शिफारस करण्यास देखील मदत करणार आहे.

११ जानेवारी २०२०

इतिहास प्रश्नमालिका

1. पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक कोण?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
दादोबा पांडुरंग तर्खडकर
गोपाळ हरी देशमुख

● उत्तर - आचार्य बाळशास्त्री जांभेकर

2. खालीलपैकी कोणत्या गोष्टीत नाना जगन्नाथ शंकरशेठच्या सहकार्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही?
जे.जे. स्कूल ऑफ आर्टची स्थापना
एलफिन्स्टन कॉलेजची स्थापना
सत्यशोधक समाजाची स्थापना
ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना

● उत्तर - सत्यशोधक समाजाची स्थापना

3. ६१ दिवसाच्या दीर्घ उपोषणानंतर कोणत्या क्रांतकिरकाचे तुरुंगात निधन झाले?
भगतसिंग 
राजगुरू
जतीनदास
रोशनसिंग

● उत्तर - जतीनदास

4. मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
मुंबई
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
ठाणे

● उत्तर - सिंधुदुर्ग

5. भारताची नाईटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते?
विजयालक्ष्मी पंडित 
कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन
सरोजिनी नायडू
डॉ. अॅनी बेझंट

● उत्तर - सरोजिनी नायडू

6. कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनात भारतीयांना सहभागी करण्यात आले?
१८१३
१९०९
१९१९
१९३५

● उत्तर - १९१९

7. महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते?
बसवेश्वर
रामानुज
चक्रधर स्वामी
चांगदेव

● उत्तर - चक्रधर स्वामी

8. खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
बार्डोली सत्याग्रह 
चंफारण्य सत्याग्रह
काळ्या कायाघाचा निषेध
खेडा सत्यांग्रह

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह 

9. तात्या टोपे हे नानापेशवे यांचे कोण होते?
मंत्री 
सचिव
लष्करप्रमुख
प्रशासकीय अधिकारी

● उत्तर - लष्करप्रमुख

10. महात्मा गांधीजानी मजुर महाजन संघाची स्थापना कोठे केली?
मद्रास 
अहमदाबाद
पोरबंदर
सुरत

● उत्तर - अहमदाबाद

चालू घडामोडी प्रश्न

१. कृत्रिम लिंग निर्धारित रेतन लॅब (प्रयोगशाळा) महाराष्ट्रात ----------- या शहरात सुरु करण्यात येणार आहे :-औरंगाबाद

२.  कामगारांसाठी सुरक्षा धोरण आणणारे ---- हे देशातील पहिले राज्य ठरले :- महाराष्ट्र

३. चौथी आपत्ती व्यवस्थापन परिषदेत ----------- येथे आयोजित करण्यात आली होती:- मुंबई

४. महाराष्ट्र राज्यात लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम-1971 नुसार लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांची निर्मिती करण्यात आली. अशी पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील --------राज्य ठरले होते:- पहिले

५. ‘इंडिया रबर एक्स्पो’२०१९ हे आशियातील सर्वात मोठे रबर प्रदर्श कोणत्या शहरात भरले होते:- मुंबई

६. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी २०१९ रोजी -------या शहरात भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन केले :- मुंबई (शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील संग्रहालय सल्लागार समितीने या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. या संग्रहालयाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नाविन्यपूर्ण संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती.)

७. संयुक्त राष्ट्रांच्या दिव्यांगजन अधिकार ठरावाच्या धर्तीवर केंद्र सरकारने व्यंगांची संख्या सात वरुन -----पर्यंत वाढवण्यात आली :- २१

८. पहिल्या आंतरराष्ट्रीय भोजपुरी महोत्सवाचे आयोजन ------- हा देश करणार आहे :-मॉरिशस

९. जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून -------- या योजनेची ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.:-पहल

१०.  ---------- या देशाकडून २०१९ हे सहिष्णुतेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे?:- संयुक्त अरब अमिरात

११. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या .......या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत? :-गीता गोपीनाथ

१२.  भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ‘अटल भाषांतर योजना’ सुरू केली आहे?:- परराष्ट्र कल्याण मंत्रालय

१३. कोणते भारतीय राज्य सार्वभौमिक आरोग्य सेवा पुरविणारे पहिले राज्य बनले आहे?:- उत्तराखंड

१४. कोणत्या नदीच्या भागावर भारतामधील सर्वांत दीर्घ ‘बोगिबील पूल’ उभारण्यात आला आहे? :- ब्रह्मपुत्रा

१५.  राष्ट्रीय ग्राहक दिन २०१८’ या दिवसाची संकल्पना काय आहे?;- टाइमली डिस्पोझल ऑफ कंझ्युमर कम्पलेंट्‌स

१६. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या 2018 च्या अहवालातील मानांकनात भारत सध्या --------- स्थानावर आहे:- तिसऱ्या

१७. ------ देशांच्या नागरिकांसाठी भारताने सध्या ई-व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली आहे :- १६६

१८. शेतकऱ्यांचे उत्पन्न ---------- पर्यंत दुपटीने वाढवण्याचे केंद्र सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे :- २०२२

१९. पहिली जागतिक विमान वाहतूक शिखर परिषद ---------- येथे भरविण्यात आली होती:- मुंबई

२०. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दूरदर्शन, प्रसारभारतीच्या सहकार्याने -------- आणि ----- हे दोन विज्ञान उपक्रम सुरू केले.:-डीडी सायन्स,इंडिया सायन्स

२१.  --------या ठिकाणी देशातले पहिले ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ उभारण्यात आले - नवी दिल्ली (‘इंडिया गेट’ च्या परिसरात)

२२. भारत हा जगातला -------व्या क्रमांकाचा सर्वात मोठा CO2चा उत्सर्जक देश आहे – चौथा.

२३.  देशाची २२ वी अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) येथे उभारली जात आहे – मनेठी (रेवाडी, हरियाणा).

२४. ‘राष्ट्रीय गंगा नदी (पुनरुज्जीवन, संरक्षण व व्यवस्थापन) विधेयक-२०१८ ’ अंतर्गत केंद्र सरकारचे सशस्त्र दल म्हणून-------- या नावाने नवे दल तयार केले जाणार - गंगा प्रोटेक्शन कॉर्प्स (गंगा सुरक्षा दल).

२५. ५-६ फेब्रुवारी २०१९ रोजी -------- ठिकाणी ‘आशिया LPG शिखर परिषद २०१९ ’ आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली (भारत).

२६.  उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) याचा 30 वा सदस्य - मॅकेडोनिया.

२७. जागतिक कर्करोग दिन २०१९ ची थीम ----- ही होती:- आय एम अॅण्ड आय वील.

२८.  ICC तर्फे 'वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू'चा मान म्हणून ‘रिचेल हेहोइ फ्लिंट’ पुरस्कार------ या भारतीय क्रिकेटपटू ला मिळाला :- स्मृती मंधाना (भारत).

२९.  ICCची 'सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडू' या पुरस्काराची विजेती - अलायसा हीली (ऑस्ट्रेलिया).

३०. ३० वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा आठवडा २०१९ ----------- या कालावधी मध्ये साजरा करण्यात आला:-४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी

३१.  १ फेब्रुवारीला ------या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘स्मार्ट खेडे मोहीम’ राबविण्यास मंजुरी देण्यात आली - पंजाब.

३२.  १८६९ वर्षी प्रथमच प्रकाशित करण्यात आलेल्या रासायनिक घटकांच्या ‘पिरियोडिक टेबलचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ --------- हे वर्ष घोषित केले :-२०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 20 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतील ‘लक्षणार्थ’ सूचित करणारा शब्द कोणता?

     ‘आमच्या दारावरुन हत्ती गेला’
   1) आमच्या    2) दारावरून   
   3) हत्ती    4) गेला

उत्तर :- 2

2) समानार्थी शब्द सांगा : ‘हिरमोड’

   1) पदरमोड    2) विरस     
   3) अपयश    4) वाईट वळण

उत्तर :- 2

3) ‘राव’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.

   1) कृश      2) मित्र     
   3) रंक      4) शूर

उत्तर :- 3

4) ‘दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो.’ - या अर्थाची म्हण ओळखा.

   1) अडला हरी गाढवाचे पाय धरी    2) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
   3) इकडे आड तिकडे विहीर    4) उंदराला मांजर साक्ष

उत्तर :- 2

5) ‘मिश्यांना तूप लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय शोधा.

   1) उगीच ऐट करणे    2) शक्तीमान नसणे
   3) सशक्त असणे      4) फजिती होणे

उत्तर :- 1

6) “रात्री हिंडणारे” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) निशाचर    2) उभयचर   
   3) जलचर    4) स्थलचर

उत्तर :- 1

7) पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा.

   1) साहाय्यक    2) साह्यक   
   3) सहायक    4) सहाय्यक

उत्तर :- 3

8) मराठी वर्णमालेतील ‘ह’ हा कोणता वर्ण आहे ?

   1) महाप्राण    2) अल्पप्राण   
   3) लघुप्राण    4) दीर्घप्राण

उत्तर :- 1

9) रंग + छटा = ?

   1) रंगछटा    2) रंगच्छटा   
   3) छटारंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

10) ‘तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.’ या विधानातील अधोरेखित शब्दांच्या नामाचे कार्य ओळखा.

   1) विशेषनाम    2) सामान्यनाम   
   3) सर्वनाम    4) नाम

उत्तर :- 2

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

   1) उपमा    2) उत्प्रेक्षा    3) रूपक      4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) तुरट    2) आंबट चिंबट    3) खारट      4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील
    अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) लक्ष्यार्थ    2) वाच्यार्थ    3) वाक्यार्थ    4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.

   1) दैत्य    2) दानव      3) राक्षस      4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) नापीक    2) सुकाळ    3) अवर्षण    4) कोरडा

उत्तर :- 2

6) या टोपीखाली दडलंय काय?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?

   1) सात    2) आठ     
   3) नऊ    4) दहा

उत्तर :- 3

9) खालील वाक्यातील काळ ओळखा.

     ‘मधू लाडू खात जाईल’
   1) साधा भविष्यकाळ    2) अपूर्ण भविष्यकाळ
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 4

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी

   1) पुल्लिंगी    2) नपुंसकलिंगी   
   3) स्त्रीलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

'२५ राज्यात गरीबी, उपासमार, असमानता वाढली

👉जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (एमपीआय) २०१८ च्या अहवालात भारताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

👉या अहवालानुसार, देशातील २२ ते २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरीबी, उपासमार आणि असमानता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

👉याचप्रमाणे निती आयोगाच्या २०१९ च्या शाश्वत विकास ध्येय अहवालानुसार, गरीबी, उपासमार आणि आर्थिक असमानता अधिक व्यापक असून यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

👉अर्थसंकल्पाच्या अगोदरच हा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात काय तरतूद केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल.

✅काय आहे एमपीआय ?

👉जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सप्टेंबर २०१८ साठी यूएनडीपी-ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून जारी करण्यात आला होता.

👉एमपीआयमध्ये सहभागी असलेल्या लोकांना गरीबी, उपासमार यांचे पीडित मानलं जातं. एमपीआयमध्ये आरोग्य, शिक्षण, जीवनमान यांसारख्या १० निकषांच्या आधारावर गरीबीचं आकलन केलं जातं. २०१५-१६ मध्ये ६४० जिल्ह्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

👉यापूर्वी २००५-०६ ते २०१५-१६ या १० वर्षातील गरीबांच्या संख्येत २७.१ कोटींची घट झाली होती. भारताने सर्वाधिक लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात चीनलाही मागे टाकलं होतं.

✅सध्याची परिस्थिती

👉अहवालानुसार, भारतात सध्याही ३६.४ कोटी एमपीआय गरीब आहेत, ज्यात १५.६ कोटी (जवळपास ३४.६ टक्के) मुलं आहेत.

👉भारतातील जवळपास २७.१ टक्के गरीबांना आपला दहावा जन्मदिवसही पाहायला मिळत नाही. यापूर्वीच या मुलांचा मृत्यू होतो.

👉दिलासादायक बाब म्हणजे १० वर्षांखालील मुलांच्या बाबतीत एमपीआय गरीबी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

👉२००५-०६ मध्ये भारतात २९.०२ कोटी गरीब होते, म्हणजेच यात आता ४७ टक्क्यांनी घट झाली आहे.

👉२०१९ च्या एमपीआयमध्येही २०१५-१६ या वर्षातीलच आकडेवारी आहे. यात कोणताही बदल नाही. पण या अहवालात काही चिंताजनक बाबीही समोर आल्या आहेत.

✅२०१८ नंतर गरीबी वाढली

👉डिसेंबर २०१८ मध्ये निती आयोगाने आधार रेषा अहवाल २०१८ जारी केला होता.

👉संयुक्त राष्ट्राने ठरवलेल्या १७ शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) गाठण्यात भारताने किती प्रगती केली याचं आकलन या अहवालात करण्यात आलं होतं.

👉यात १०० गुण मिळवणाऱ्या राज्याला Achiever, ६५ ते १०० गुणांना Front Runner आणि ५० ते ६५ ला Performer आणि ५० पेक्षा कमी गुण असलेल्या राज्यांना Aspirant ही श्रेणी देण्यात आली होती. यात २८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं आकलन करण्यात आलं होतं.

👉एसडीजी क्रमांक एक, म्हणजे गरीबी कमी करण्याच्या बाबतीत २०१८ च्या ५४ गुणांच्या तुलनेत २०१९ मध्ये ५० गुणांवर घसरण झाली आहे.

👉निती आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरीबी वाढली आहे.

👉गरीबी वाढलेल्या राज्यांमध्ये बिहार, ओदिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

👉आंध्र प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्येच फक्त गरीबी कमी झाली आहे.

👉मेघालय, हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रातील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.

✅उपासमार वाढली

👉शून्य उपासमार हे देखील एसडीजीमधील लक्ष्य आहे. यात २०१८ च्या ४८ गुणांच्या तुलनेत ३५ गुणांवर घसरण झाली आहे.

👉२४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपासमार वाढली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा यामध्ये समावेश आहे.

👉मिझोराम, केरळ, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये उपासमार कमी झाली आहे.

✅आर्थिक असमानताही वाढली

👉असमानतेच्या बाबतीतही ७ गुणांवर घसरण झाली आहे. २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही असमानता वाढली आहे.

👉असमानता कमी करण्याच्या बाबतीत केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांनाच यश मिळालं आहे.

👉एमपीआय २०१८ नुसार २०१५-१६ मध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या सर्वात गरीब चार राज्यांमध्येच १९.६ कोटी एमपीआय गरीब होते. देशातील गरीबांची ही निम्मी संख्या आहे.

👉सर्वाधिक गरीबांमध्ये गावांमध्ये राहणारे वंचित समूह, अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीय यांचा समावेश आहे.

खेलो इंडियाचे तिसरे पर्व आजपासून

- पर्व: तिसरे
- स्थळ: गुवाहाटी (आसाम)
- कालावधी: 10 ते 22 जानेवारी 2020
- उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक: आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावणारी युवा धावपटू हिमा दास
- वयोगट: 17 आणि 21 वर्षांखालील
- सहभाग: 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 6800 पेक्षा जास्त खेळाडू 20 खेळांमध्ये आपले नशीब अजमावतील.
- महाराष्ट्र: 20 पैकी 19 प्रकारांमध्ये आपले खेळाडू मैदानात उतरवले आहेत. महाराष्ट्राने सर्वाधिक खेळाडूंची निवड करत तब्बल 751 खेळाडूंचा चमू ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला आहे.
- यजमान आसाम:  विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी कंबर कसली असून 656 खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.
- हरियाणानेही यंदा 682 खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी पाठवला आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. दादरा नगर हवेलीने फक्त तीन खेळाडूंचा चमू पाठवला असून त्यात एक १०० मीटर धावपटू आणि दोन टेबल टेनिस खेळाडूंचा समावेश आहे.

● शानदार उद्घाटन सोहळा
- ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सासूराजाय येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर रंगणार आहेत.
- या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन आणि ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ कार्यक्रमात प्रावीण्य दाखवलेल्या ‘व्ही अनबिटेबल्स’ या मुंबईस्थित नृत्यपथकाची. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. अदाकारी पाहायला मिळणार आहे.
- आसामच्या संस्कृती आणि परंपरेची माहिती देणाऱ्या कार्यक्रमात तब्बल 500 कलाकार सहभागी होणार आहेत.

● वैशिष्टय़े
- 13 दिवस रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 451 सुवर्णपदके जिंकण्याची संधी
- तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, सायकलिंग, टेनिस, जिम्नॅस्टिक्स, जुदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लॉन बॉल.
- यंदा सायकलिंग आणि लॉन बॉल्स या दोन नव्या खेळांचा समावेश
- गुवाहाटीमधील आठ ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धा रंगणार

2018 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र.     राज्य     सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण
१      हरियाणा  ३८     २६        ३८     १०२
२      महाराष्ट्र   ३६      ३२         ४३     १११
३      दिल्ली     २५     २९         ४०     ९४

2019 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र.     राज्य     सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण
१      महाराष्ट्र    ८५     ६२     ८१     २२८
२      हरियाणा   ६२     ५६     ६०     १७८
३      दिल्ली      ४८     ३७     ५१     १३६

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...