११ जानेवारी २०२०

खेलो इंडियाचे तिसरे पर्व आजपासून

- पर्व: तिसरे
- स्थळ: गुवाहाटी (आसाम)
- कालावधी: 10 ते 22 जानेवारी 2020
- उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक: आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावणारी युवा धावपटू हिमा दास
- वयोगट: 17 आणि 21 वर्षांखालील
- सहभाग: 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 6800 पेक्षा जास्त खेळाडू 20 खेळांमध्ये आपले नशीब अजमावतील.
- महाराष्ट्र: 20 पैकी 19 प्रकारांमध्ये आपले खेळाडू मैदानात उतरवले आहेत. महाराष्ट्राने सर्वाधिक खेळाडूंची निवड करत तब्बल 751 खेळाडूंचा चमू ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला आहे.
- यजमान आसाम:  विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी कंबर कसली असून 656 खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.
- हरियाणानेही यंदा 682 खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी पाठवला आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. दादरा नगर हवेलीने फक्त तीन खेळाडूंचा चमू पाठवला असून त्यात एक १०० मीटर धावपटू आणि दोन टेबल टेनिस खेळाडूंचा समावेश आहे.

● शानदार उद्घाटन सोहळा
- ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सासूराजाय येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर रंगणार आहेत.
- या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन आणि ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ कार्यक्रमात प्रावीण्य दाखवलेल्या ‘व्ही अनबिटेबल्स’ या मुंबईस्थित नृत्यपथकाची. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. अदाकारी पाहायला मिळणार आहे.
- आसामच्या संस्कृती आणि परंपरेची माहिती देणाऱ्या कार्यक्रमात तब्बल 500 कलाकार सहभागी होणार आहेत.

● वैशिष्टय़े
- 13 दिवस रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 451 सुवर्णपदके जिंकण्याची संधी
- तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, सायकलिंग, टेनिस, जिम्नॅस्टिक्स, जुदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लॉन बॉल.
- यंदा सायकलिंग आणि लॉन बॉल्स या दोन नव्या खेळांचा समावेश
- गुवाहाटीमधील आठ ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धा रंगणार

2018 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र.     राज्य     सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण
१      हरियाणा  ३८     २६        ३८     १०२
२      महाराष्ट्र   ३६      ३२         ४३     १११
३      दिल्ली     २५     २९         ४०     ९४

2019 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र.     राज्य     सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण
१      महाराष्ट्र    ८५     ६२     ८१     २२८
२      हरियाणा   ६२     ५६     ६०     १७८
३      दिल्ली      ४८     ३७     ५१     १३६

रेल्वे मंत्रालय आणि बर्मिंगहॅम विद्यापीठादरम्यान अत्याधुनिक दळणवळण व्यवस्थेच्या उभारणीसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापनेबाबात सामंजस्य करार

रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेले स्वायत्त विद्यापीठ राष्ट्रीय रेल्वे वाहतूक संस्थाआणि बर्मिंगहॅम विद्यापीठादरम्यान नवी दिल्लीत रेलभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.

अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्यादृष्टीने रेल्वेचे पहिले उत्कृष्टता केंद्र भारतात स्थापन करण्याबाबत हा करार करण्यात आला. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

भारतीय रेल्वे हे उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार असून, या केंद्रातून रेल्वेसंदर्भातली अद्ययावत आकडेवारी, माहिती, व्यावसायिक तज्ज्ञ, उपकरणे आणि इतर सर्व संसाधने रेल्वे संस्थांना तसेच संशोधन संस्थांना पुरवली जातील.

या उत्कृष्टता केंद्रात उद्योग जगत आणि अध्ययन संस्थांशी भागिदारीही स्वीकारली जाईल. रेल्वे आणि रेल्वे वाहतुकीच्या क्षेत्रात अत्याधुनिक विकासाला चालना देण्यासाठी हे केंद्र काम करेल.

आधुनिक संशोधनाची तसेच जागतिक पातळीवर रेल्वेत वापरल्या जाणाऱ्या पद्धतींची माहिती या केंद्रातून मिळू शकेल. रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल.
 

महानगरपालिकेविषयी माहिती


💁‍♂ स्थापना व निवडणुका : 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते. महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात.

🧐 *प्रमुख व प्रशासन :*

▪ महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो. महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

▪ महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.

▪ महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्य सरकार 3 वर्षांसाठी करते.

📍 सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका असून पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जाते.

🔎

प्रादेशिक पुरस्कार:- २०१९

• लता मंगेशकर पुरस्कार:-
२०१९:- उषा खन्ना
२०१८;-विजय पाटील (राम लक्ष्मण )
२०१७:- पुष्पा पागधरे

• जनस्थान पुरस्कार:-
२०१९;-वसंत डहाके.
२०१७;- डॉ विजया राज्याध्यक्ष
२०१५:- अरुण साधू

• राजश्री शाहू पुरस्कार:-
२०१९:- अण्णा ह्जारे
२०१८:- पुष्पा भावे
२०१७ :- डॉ रघुनाथ माशेलकर

• पुण्यभूषण पुरस्कार :-
२०१९:-डॉ. गो. ब देगलूरकर
२०१८:- प्रभा अत्रे
२०१७ :-डॉ.के.एस.संचेती

• ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार :-
२०१९:- म.रा.जोशी
२०१८;-डॉ. किसन महाराज साखरे
२०१७ :-ह.भ.प.निवृती महाराज वक्ते
२०१६:-डॉ. उषा माधव देशमुख

• चतुरंग प्रतिष्ठान (जीवन गौरव पुरस्कार)
२०१८ :-सुहास बाहुळकर
२०१७ :- डॉ.गो.ब देगलूरकर
२०१६ :- सदाशीव गोरसकर

• यंशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राष्ट्रीय पुरस्कार )
२०१८:- डॉ. रघुरामन राजन
२०१७:- डॉ. मनमोहन शर्मा
२०१६:- नंदन निलकेणी

• यंशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राज्यस्तरीय पुरस्कार)
२०१९:- एन.डी. पाटील

• कुसुमाग्रजराष्ट्रीय साहित्य पुरस्कार:-
२०१८:- वेद राही
२०१७ :-प्रा.डॉ.एच.एस. शिवप्रकाश
२०१६ :- विष्णू खरे

• व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार :-
२०१९:- श्रीमती सुषमा शिरोमणी
२०१८:- विजय चव्हाण
२०१७ :- विक्रम गोखले

• व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार :-
२०१९:- भरत जाधव
२०१८:- मृणाल कुलकर्णी
२०१७ :- अरुण नलावडे

• राजकपूर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१९:- वामन भोसले
२०१८:- श्याम बेनेगल
२०१७ :-सायरा बानो

• राजकपूर विशेष योगदान पुरस्कार:-
२०१९:- परेश रावल
२०१८:- राजकुमार हिरानी
२०१७ :- जॅकी श्राॅप

• नटवर्य प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार:-
२०१८:- जयंत सावरकर
२०१७ :-बाबा पार्सेकर
२०१६:-लीलाधर कांबळी

• संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८ :-विनायक थोरात
२०१७ :-निर्मला गोगटे
२०१६:-चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर

• विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- बशीर कमरुद्दिन मोमीन
२०१७:- मधुकर नेराळे
२०१६  :- राधाबाई कारभरी खाडे(नाशिककर)

• टिळक पुरस्कार (राष्ट्रीय पत्रकारीता):-
२०१९:-संजय गुप्ता
२०१८:- सिद्धार्थ वरदराजन
२०१७ :- के. सिवन

• लोकमान्य टिळक सन्मान:-
२०१९:- बाबा कल्याणी
२०१८:- डॉ. के. सिवन
२०१७ :-आचार्य बाळकृष्ण

• लोकमान्य टिळक जीवन पत्रकारिता पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचांलनालय)
२०१८:-पंढरीनाथ सावंत
२०१७:-रमेश पतंगे ( दैनिक दिव्य मराठीचे स्तंभलेखक)
२०१६:-विजय फणशीकर (दैनिक हितवादचे संपादक )
२०१५:- उत्तम कांबळे

• वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- महेश एल कुंजवार
२०१७ :-मारुती चितमपल्ली

• विष्णुदास भावे पुरस्कार:-
२०१८ :- डॉ .मोहन आगाशे
२०१७ :- मोहन जोशी
२०१६ :- जयंत सावरकर

• भीमसेन जोशी पुरस्कार :-
२०१९;-अरविंद पारीख
२०१८:- पंडीत केशव गिंडे
२०१७ :- माणिक भिडे
२०१६ :- बेगम परविन रुसताना

• धन्वतरी पुरस्कार:-
२०१८:- डॉ.सुल्तान प्रधान
२०१७ :- डॉ. नागेश्वर रेड्डी
२०१६ :- सुधांशू भट्टाचार्य

• नागभूषण पुरस्कार:-
२०१८:- विजय बारसे
२०१७:- शिरीष देव

• चतुरंग जीवन गौरव पुरस्कार :-
२०१९:-सय्यद भाई

• तन्वीर सन्मान पुरस्कार
२०१९:- नसरूद्दीन शहा

एकूण वन-वृक्ष आच्छादन देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.56 टक्के आहे: ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवाल

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने (FSI) प्रकाशित केला आहे.

अहवालात देशातल्या वन आणि वृक्ष संसाधनांचा द्वैवार्षिक आढावा घेण्यात आला आहे. 1987 सालापासून अशा अहवालांचे प्रकाशन होत असून, हा 16वा अहवाल आहे. वन आच्छादनात सातत्याने वाढ झालेली आहे, असे या अहवालामधून दिसून आले आहे.

👉सध्याच्या आकडेवारीनुसार –

🔸दाट, मध्यम आणि विरळ असे जंगलाचे तीन प्रकार आहेत. या तिन्ही प्रकारच्या जंगलात वाढ झाली आहे.

🔸देशातले एकूण वन आणि वृक्ष आच्छादन 80.73 दशलक्ष हेक्टर इतके असून, ते देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.56 टक्के आहे.

🔸वर्ष 2017 च्या अंदाजाच्या तुलनेत देशातल्या एकूण वन आणि वृक्ष आच्छादनात 5188 चौ. किलोमीटरची वाढ दिसून आली आहे. त्यापैकी वन आच्छादन 3976 चौ. कि.मी. तर वृक्ष आच्छादन 122 चौ. कि.मी. इतके आहे.

🔸कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, जम्मू व काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश ही पाच राज्ये वृक्ष आणि वन क्षेत्राच्या वाढीत आघाडीवर आहेत. मणीपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मेघालय आणि नागालँड या राज्यांतल्या वन क्षेत्रात घट झाली आहे.

🔸देशात क्षेत्रफळाचा विचार करता वन आच्छादनात मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर असून, त्या खालोखाल अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागत आहे.

🔸समुद्राचे पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटीच्या जंगलातदेखील 54 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. यात गुजरात राज्य आघाडीवर असून त्या ठिकाणी 37 चौरस किलोमीटर, महाराष्ट्रात 16 चौरस किलोमीटर तर ओडिशामध्ये 8 चौरस किलोमीटर खारफुटीचे जंगल वाढले आहे.

🔸देशात बांबू आच्छादित क्षेत्र 16.00 दशलक्ष हेक्टर एवढे असल्याचे अंदाजित करण्यात आले आहे.

🔸जंगलातला पाणथळ भाग पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी जैवविविधता आढळून येते. या अहवालानुसार, देशात 62,466 पाणथळ जागा आहेत.

🔸भारताच्या जंगलांतला कार्बनचा साठा 7124.6 दशलक्ष टनच्या जवळपास आहे. गेल्या दोन वर्षांत या साठ्यात 42.6 दशलक्ष टन इतकी वाढ झाली आहे.

🔸सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

General Knowledge

1) ‘ASCEND 2020’ ही जागतिक गुंतवणूकदारांची बैठक कुठे आयोजित केली गेली?
उत्तर : कोची

2) बक्सा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : पश्चिम बंगाल

3) ‘प्रवासी भारतीय दिवस’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 9 जानेवारी'

4) स्पेन या देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : पेद्रो सांचेझ

5) 'सुकन्या' प्रकल्प हा कोणत्या विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी चालू केलेला उपक्रम आहे?
उत्तर : कोलकाता पोलीस

6) क्रोएशियाचे राष्ट्रपती कोण आहे?
उत्तर : झोरान मिलानोव्हिक

7) डॉ. वाय.एस.आर. आरोग्यश्री योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

8) कोणते राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करते?
उत्तर : मिझोरम

9) ISRO ही संस्था कुठे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर' उभारणार आहे?
उत्तर : छल्लाकेरे (कर्नाटक)

10) पद्मभूषण अकबर पदमसी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : पत्रकारिता

आजपासून साहित्य संमेलनाला सुरुवात

💁‍♂ 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून उस्मानाबाद येथे सुरु होत आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारपर्यंत (दि.12) हे संमेलन चालणार आहे.

👉 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्याकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

🧐 *कार्यक्रमाचे स्वरूप :*

▪ सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात होईल. संत साहित्य आणि परिवर्तनवादी साहित्य मांडणारे ग्रंथ पालखीत असणार

▪ सकाळी 11 वाजता ध्वजारोहण तर उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता होणार

▪ संमेलनासाठी राज्यभरातील प्रकाशनांची 200 दालने उभारण्यात आली आहेत.

👀 *प्रमुख उपस्थिती :* संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्य संमेलनाचे निमंत्रक नितीन तावडे इ.

💐 *यांचा होणार सत्कार :* माजी संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, डॉ.सदानंद मोरे, डॉ.श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख इ.

💥 *विरोधाचे सावट :* संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला काही कडव्या संघटनांचा विरोध असल्यामुळे संमेलन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ कवी व उद्घाटक ना. धों. महानोर यांना संमेलनाला न जाण्याची फोनद्वारे धमकी दिली गेली असल्याने त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

📍 दरम्यान, मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी संमेलनास उपस्थित असले तरी त्यांना व्यासपीठावर न बसवता, पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चालु घडामोडी वन लाइनर्स, 11 जानेवारी 2020

● हेन्ले अँड पार्टनर्सने हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2020 जारी केले

● जपानने टॉपमध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स 2020

● हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये सिंगापूर दुसर्‍या क्रमांकावर आहे

● हेनली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये दक्षिण कोरिया तिस्या क्रमांकावर आहे

● हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये जर्मनीचा चौथा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये इटलीने चौथा क्रमांक पटकावला

● हेनली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये स्पेनचा 5 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये फ्रान्सचा 6 वा क्रमांक आहे

● हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये स्वित्झर्लंडचा 7 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये अमेरिकेचा 8 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये युनायटेड किंगडमचा 8 वा क्रमांक आहे

● हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये न्यूझीलंडचा 9 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये कॅनडाचा 9 वा क्रमांक आहे

● हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया 9 व्या स्थानावर आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये युएई 18 व्या स्थानावर आहे

● हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये ब्राझीलचा 19 वा क्रमांक आहे

● हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये इस्रायल 25 व्या क्रमांकावर आहे

● हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये रशियाचा 51 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये तुर्की 55 व्या क्रमांकावर आहे

● हेनली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 56 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये सौदी अरेबियाचा 66 वा क्रमांक आहे

● हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये चीन 72 व्या स्थानावर आहे

● हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये भारताचा 84 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये भूतानचा 89 वा क्रमांक आहे

● हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये श्रीलंकेचा 97 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये इराणचा 98 वा क्रमांक आहे

● हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये नेपाळचा 101 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये पाकिस्तानचा 104 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक 2020 मध्ये इराकचा 106 वा क्रमांक आहे

● हेनले पासपोर्ट इंडेक्स 2020 मध्ये अफगाणिस्तानचा 107 वा क्रमांक आहे

● मार्क हार्डी यांना यूएसए वुमेनच्या हॉकी टीमचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले

● ग्लोबल कमर्शियल सर्व्हिसेस (जीसीएस) इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून मेघा चोप्रा यांची नियुक्ती

● प्रभास सुबसिंगे श्रीलंका निर्यात विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले

● मनमाड आणि भुसावळ स्थानकांना एआय-बॅक्ड फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी मिळाली

● 2021 च्या सुरुवातीच्या काळात भारताचा पहिला स्वदेशी विमान वाहक विक्रांत कार्यान्वित होईल

● मार्च 2020 मध्ये पॅरिस बुक फेअरमध्ये भारत सन्माननीय पाहुणे होईल

● भुवनेश्वर येथे ओडिशाच्या एमएसएमई आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाला प्रारंभ
 
● रम्मी सर्कलने किच्छा सुदीपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

● 1023 फास्ट ट्रॅक विशेष न्यायालये उभारण्यासाठी सरकार

● 16 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 2020 रोजी आहे

● 'महाराष्ट्र एक्सपो २०२०' चे उद्घाटन महाराष्ट्र मुख्यमंत्री करणार

● जसबिंदर बिलानने 2019 कोस्टा चिल्ड्रेन्स अवॉर्ड जिंकला

● महिला वेटलिफ्टर सरबजीत कौर नाडाने 4 वर्ष बंदी घातली

● सेल्फी संग्रहालयाने सेल्फी किंगडम (टीएसके) चे उद्घाटन दुबईमध्ये केले

● लेहमध्ये आयोजित 7 वी राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा

● लडाख वॉन (महिला) 7 वी राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा

● विशाखापट्टणम मार्च 2020 मध्ये नौदल व्यायाम ‘मिलन’ आयोजित करणार आहे

● जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 20 ते 5% पर्यंतच्या जीडीपीचा अंदाज 6% पासून कमी केला.

● हडकोने एम. नागराज यांना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले आहे.

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

🖌व्हाॅईसराॅयच्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून निवडण्यात आलेले पहिले भारतीय व्यक्ती?
- सत्येन्द्रनाथ सिन्हा

🖌कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात अध्यक्ष असणारया पहिल्या महिला?
- अॅनी बेझंट

🖌कांग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात सर्वप्रथम जन गण मन  गाण्यात आले?
- 1911 चे कलकत्ता अधिवेशन

🖌महिलांना मताधिकाराचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते?
- त्रावणकोर कोचिन

🖌टिळक स्वराज्य फंड मध्ये 1 लक्ष रुपये किमतीचे दागिने दान करणारी पहिली महिला कोन?
- मन्नती अन्नपुर्नम्मा

🖌कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातील पहिल्या भारतिय महिला अध्यक्ष?
- सरोजिनी नायडू

🖌भारतातील कयदे मंडळाच्या निवडणूक लढविनार्या पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)

डोंगराचे नाव : जिल्हा

▪ सातमाळा : नाशिक

▪ वणी : नाशिक

▪ निर्मल : नांदेड

▪ चिकोडी : कोल्हापूर

▪ पन्हाळा : कोल्हापूर

▪ चांदूरगड : चंद्रपूर

▪ मांधरादेव : सातारा

▪ महादेव : सातारा

▪ मालिकार्जुन : सांगली

▪ अजिंठा: औरंगाबाद

▪ कळसूबाई : अहमदनगर

▪ भामरागड : गडचिरोली

▪ गाविलगड : बुलढाणा, अकोला

▪ बालाघाट : बीड

▪ तोरणमाळ : नंदुरबार

१० जानेवारी २०२०

चालू घडामोडी वन लाइनर्स, 09 जानेवारी 2020.


❇ 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे येथे आयोजित

❇ हर्षवर्धन सद्गीर विजयी 63 वे महाराष्ट्र केसरी विजेते

❇ ज्युनियर सायकलपटू रोनाल्डो सिंग सर्व स्पिंटिंग इव्हेंट्समध्ये वर्ल्ड नंबर 1 बनला आहे

❇ फौद मिर्झा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारा पहिला भारतीय अश्वारुढ खेळाडू ठरला

❇ कझाकस्तानने चीन आणि भारत येथून प्रवास करणा-या प्रवाश्यांसाठी व्हिसा-रहित रेजिमेन्सची ओळख करुन दिली

❇ 2019 मध्ये रसायनशास्त्रातील नेचर इंडेक्स शीर्ष 50 यंग युनिव्हर्सिटी जाहीर झाले

❇ 2019 मध्ये रसायनशास्त्रातील 50 यंग विद्यापीठांमध्ये आयआयटी गुवाहाटीने 20 वे स्थान मिळविले आहे

❇ संदीप पटेल यांनी भारतीय आयबीएमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला

❇ विमानन मंत्रालय भारतात ड्रोन नोंदणी अनिवार्य करते

❇ लाइफ सायन्सेस इनफोसिस पुरस्कार 2019 डॉ मंजुला रेड्डी यांना प्रदान करण्यात आला

❇ सामाजिक विज्ञानातील इन्फोसिस पुरस्कार 2019 प्रा.आनंद पांदियन यांना प्रदान करण्यात आला

❇ भौतिक विज्ञानातील इन्फोसिस पुरस्कार 2019 जी मुकेश यांना प्रदान करण्यात आला

❇ अभियांत्रिकी व संगणक विज्ञानातील इन्फोसिस पुरस्कार 2019 प्रा.सुनिता सरावगी यांना प्रदान करण्यात आला

❇ गणित विज्ञानातील इन्फोसिस पुरस्कार 2019 सिद्धार्थ मिश्रा यांना प्रदान

❇ मानवतेतील इन्फोसिस पुरस्कार 2019 मनु देवदेवन यांना प्रदान करण्यात आला

❇ इटलीच्या डॅनिएल डी रोसीने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली

❇ वेटलिफ्टर सरबजीत कौर यांनी डोपिंग उल्लंघन केल्याबद्दल 4 वर्षांसाठी बंदी घातली

❇ विराट कोहली रोहित शर्माला मागे टाकत टी -२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला

❇ विराट कोहली कर्णधार म्हणून टी -20 मध्ये 1000 धावा करण्यासाठी वेगवान बनला

❇ बी साई प्रणीत मलेशिया मास्टर्स टूर्नामेंट बाहेर क्रॅश

❇ सॅडिओ मानेने आफ्रिकेचा 2019 चा वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू मुकुट मिळविला

❇ IND Vs SL II T20I: भारताने श्रीलंकेला 7 विकेट्सने हरवले

❇ पुणे येथे आठवा आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक पार पडला

❇ इरशाद अहमद वॉन (पुरुष) आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक

❇ अपूर्व एस वॉन (महिला) आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक

❇ गार्गी नायक जिंकलेला मस्केलेमेनिया इंडिया चॅम्पियनशिप विजेतेपद

❇ आयओए कराटे असोसिएशन ऑफ इंडियाच्या घटनेचे उल्लंघन करण्यासाठी अक्षम करते

❇ राशिद खान टी -20 हॅट-ट्रिक्स घेणारा 5 वा खेळाडू बनला

❇ केंद्राने राष्ट्रीय महामार्गांवरील स्पीड ब्रेकर काढण्याचे आदेश दिले आहेत.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...