०१ जानेवारी २०२०

मेट्रो स्थानकाला मिळणार सुप्रीम कोर्टाचं नाव

🎆 दिल्लीमधील प्रगती मेट्रो स्टेशन यापुढे सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन या नावाने ओळखलं जाणार आहे. दिल्ली सरकारने प्रगती मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

🎆 दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान यासंबंधी घोषणा केली. यावेळी त्यांनी नामांतराची पूर्ण प्रक्रिया तसंच मेट्रो ट्रेनमध्ये होणारी उद्घोषणा यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल अशी माहिती दिली.

🎆 तर मनिष सिसोदिया यांनी यावेळी मुबारक चौकाला शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचं नाव देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
🔸🔹

अंबानींकडून जिओ मार्ट लाँच


🎆 रिलायन्स उद्योग समूहानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण करत जिओ मार्टचं सॉफ्ट लाँच केले आहे.

🎆 त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात दबदबा असलेल्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टशी जिओ मार्टची थेट स्पर्धा होणार आहे.

🎆 मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण भागात प्रथम जिओ मार्ट सुरू करण्यात येणार.

🎆 ‘देश की नई दुकान’, अशी त्याची टॅगलाइन आहे.

🎆 12 ऑगस्ट 2019ला रिलायन्सनं जिओ मार्ट सुरू करण्याची चाचपणी सुरू केली होती.

🎆 जिओ मार्टच्या ग्राहकांना 50 हजार प्रकारची घरगुती उत्पादने घरपोच दिली जाणार असून, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. जिओ मार्टच्या प्लानबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

🎆 जिओ मार्टची सेवा आम्ही सुरू केली असून, जिओ ग्राहकांना नोंदणी करण्यासाठी सवलत दिली जाणार असल्याची माहिती रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
🔹

नवी दिल्लीमध्ये उभी राहणार नवी संसद

🎆 भारतीय संसदेची नवीन इमारत अनेक अर्थांने खास असणार आहे.

🎆 नवीन इमारतीचा आकार त्रिकोणी असणार आहे.

🎆 या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. इतकचं नाही नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.

🎆 याशिवाय पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बंधण्याचीही तयार करण्यात येत आहे.

🎆 पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थान दिल्लीतील महत्वाच्या परिसरात म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा मध्ये असणार असून हे घर बांधण्याचे कंत्राट एका गुजराती कंपनीला मिळाले आहे.

🎆 नव्या योजनेनुसार राष्ट्रपती भवनानंतर पंतप्रधानांचे निवासस्थान असेल.

🎆 त्यानंतर उप-राष्ट्रपतींचे निवासस्थान असेल.

🎆 नवीन संसद भवन हे अत्याधुनिक असेल अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

🎆 नवीन संसदेच्या इमारतीमध्ये तीन मीनार असतील. हे तीन मिनार लोकशाहीच्या तीन स्तंभांचे प्रतिक असतील.

🎆 नवीन संसद भवनाची रचना भारताची विविधता दाखवणारी असेल.

🎆 संसद भवनाच्या खिडक्या या भारतामधील विविधता दाखवतील असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

🎆 संसदेचे ७५ वे अधिवेशन नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.

🎆 नवीन संसदेची इमारत ही सध्याच्या संसदेच्या जवळच असेल. यामध्ये ९०० ते एक हजार लोकप्रतिनिधींची आसनक्षमता असणारी लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉलप्रमाणे संयुक्त सभागृह असेल.

🎆 या इमारतीमध्ये सर्व खासदारांची कार्यालयेही असतील.

स्टिंग ऑपरेशन राबविणारे "नाशिक आयुक्तालय' एकमेव

🔰हैदराबादच्या घटनेमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यातूनच शहरात महिलांच्या निर्भया पथकामार्फत "डिकॉय' ऑपरेशन सुरू केले.

🔰असे डिकॉय ऑपरेशन राबविणारे नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव पोलिस आयुक्तालय आहे.

🔰 "जिची छेड काढावी, तीच महिला पोलिस' असली तर असा संदेशच वासनांधापर्यंत पोचणे हाच या "डिकॉय' ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे. जे यात सापडले त्यांच्यावर पथकाने विनयभंगाचे गुन्हेच दाखल केले आहेत. 

🔰लैंगिक विकृतीला ठेचून काढण्यासाठीच पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून "डिकॉय ऑपरेशन' (स्टिंग ऑपरेशन) साकारले आहे. 

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 कोण अंतराळात सर्वाधिक दिवस वास्तव्य करणारी महिला ठरली?

(A) जेसिका मीएर
(B) अ‍ॅन मॅक्लेन
(C) सॅली राइड
(D) क्रिस्टीना कोच ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 "ड्रीम्स ऑफ ए बिलियन: इंडिया अँड ऑलिम्पिक गेम्स" हे पुस्तक ___ ह्यांनी लिहिले.

(A) चेतन भगत
(B) पी. टी. उषा
(C) उसेन बोल्ट
(D) बोरिया मुजूमदार ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 02 जुलै रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ........ यांच्याविरुद्ध एक विशेष मोहीम सुरू केली.

(A) बँकेची फसवणूक करणारे✅✅
(B) आयकर चुकविणारे गुन्हेगार
(C) मानव तस्करी करणारे
(D) वरील सर्व

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 38 अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या वाटाघाटीसह जगातला सर्वात महागडा घटस्फोट घेणार्‍या महिलेचे नाव काय आहे?

(A) मारिया मॅकेन्झी
(B) शेरल वुड्स
(C) श्रेया सिम्पसन
(D) मॅकेन्झी बेझोस✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 तामिळनाडूच्या राज्य सरकारने घोषित केलेल्या राज्य फुलपाखरूचे नाव काय आहे?

(A) साऊर्थन बर्ड विंग्ज
(B) कॉमन पिकोक
(C) तामिळ योमन✅✅
(D) मलबार बॅंडेड पिकोक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स नेटवर्क (MFIN) याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

(A) विनीत छत्री
(B) हर्ष श्रीवास्तव
(C) मनोज कुमार नांबियार✅✅
(D) ग्यान मोहन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 __________ यांनी ‘बायोमेट्रिक’-क्षम सेंट्रलाइज्ड अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ (CACS) याचे अनावरण केले.

(A) नागरी उड्डयन मंत्रालय✅✅
(B) अर्थमंत्रालय
(C) पर्यटन मंत्रालय
(D) वस्त्रोद्योग मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ___________ प्रकल्प हा नागरी उड्डयनाच्या क्षेत्रात भारत सरकारच्या ‘ई-गव्हर्नन्स’ उपक्रमाच्या अंतर्गत "कागदविरहित कार्यालय" साकारण्याची कल्पना केली.

(A) ई-पेपर
(B) ई-एव्हिएट
(C) ई-BCAS✅✅
(D) ई-हुर्रे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ __________ यासाठी आहे.

(A) हरवलेला मोबाईल फोन✅✅
(B) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करणे
(C) गायींची गणना अद्ययावत करणे
(D) जनगणना 2021 अद्ययावत करणे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ताज्या ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?

(A) आंध्रप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात _________ची वाढ झाली आहे.

(A) 100 चौरस किलोमीटर
(B) 54 चौरस किलोमीटर✅✅
(C) 1500 चौरस किलोमीटर
(D) 2050 चौरस किलोमीटर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दुसरी ‘तेजस’ रेलगाडी ________ या शहरांच्या दरम्यान धावणार आहे.

(A) मुंबई आणि ठाणे
(B) अहमदाबाद आणि मुंबई✅✅
(C) लखनऊ आणि दिल्ली
(D) चेन्नई आणि त्रिची

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालु घडामोडी वन लाइनर्स, 01 जानेवारी 2020.

✍ 2020 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ✍
---------------------------------------------------
🌐  2019 मध्ये भारत एकदिवसीय विजयांसह संघ आहे (19 विजय)

🌐 11 दिवस लाँग 'धनू जत्रा पश्चिम ओडिशामधील बारगड येथे प्रारंभ झाला

🌐 पॅन-आधार लिंक जोडण्याची अंतिम मुदत मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली

🌐  अहमदाबाद-मुंबई तेजस ट्रेन 17 जानेवारी रोजी ध्वजांकित केली जाईल

🌐 एकूण वृक्ष, 2 वर्षात वनक्षेत्र 5,188 चौरस किलोमीटरने वाढले: अहवाल

🌐  जनरल बिपिन रावत यांना भारताचे पहिले संरक्षण संरक्षण कर्मचारी म्हणून नाव देण्यात आले

🌐  जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

🌐  ट्रॅव्हर पेन्नेने वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली

🌐 सोमेश कुमार तेलंगानाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त होऊ शकतात

🌐 अनंत मिश्रा यांनी भाजप अरुणाचल सचिवांची नेमणूक केली

🌐 अनान्य साहित्य पुरस्कार 1426 नदिरा मजुमदार यांच्या हस्ते प्रदान

🌐 अतुल करवाल यांनी राष्ट्रीय पोलिस अकादमीचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला

🌐 छत्तीसगडमध्ये 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन

🌐  रेल्वेने पुरुषांच्या विजेतेपद 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चँपियनशिपमध्ये जिंकले

🌐  एअरपोर्ट थॉरिटी ऑफ इंडियाने व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चँपियनशिपमध्ये महिला विजेतेपद पटकाविला

🌐  दुबई ग्लोब सॉकर अवॉर्ड्समध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने पुरुषांच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा वर्षाव केला

🌐 शासनाने ऑनलाईन सुरू केली अ
लिलाव प्लॅटफॉर्मला "ईब्रे" नामित

🌐 2020 पासून नेदरलँड्स त्याचे नाव टोपणनाव टोपणनाव ‘हॉलंड’

🌐 एमईएमध्ये हिंद महासागर प्रदेश विभागात माडागास्कर आणि कोमोरोस समाविष्ट आहेत

🌐  संजय गुप्ता यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

🌐  जगातील प्रथम क्रमांकाची केंटो मोमोटा बीडब्ल्यूएफ प्लेअर ऑफ दी इयर म्हणून निवडली गेली

🌐  हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

🌐  अबेलाझिज दजेराड यांनी अल्जेरियाचे नवीन पंतप्रधान म्हणून नेमणूक केली

🌐  संगीत दिग्दर्शक इलायराजा यांची निवड २०१९ च्या हरिवरासनम पुरस्कारासाठी

🌐 व्हीएसएससीने रोहिणी (आरएच) 200 साउंडिंग रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च केले

🌐  100 टी -20 विकेट्स घेण्यास मुजीब उर रहमान सर्वात युवा गोलंदाज बनला

🌐  हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी करनाल येथे अटल किसान मजदूर कॅन्टीनचे उद्घाटन केले

🌐 केरळमधील कन्नूर येथे भारतीय इतिहास कॉंग्रेसचे 80 वे सत्र आयोजित

🌐 तिरुअनंतपुरममध्ये 27 व्या राष्ट्रीय मुलांची विज्ञान कॉंग्रेस आयोजित

🌐 नागालँड असेंब्लीचे अध्यक्ष विखो-यो योशु निधन झाले

🌐 शासनाने "इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट" (आयएसएफआर) जारी केला.

आधार आणि पॅन लिंक करण्यास 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ

🎆 ज्यांनी अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे.

🎆 तर सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या संपणार होती. मात्र आधार-पॅन लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे.

🎆 आत्तापर्यंत मुदतवाढ देण्याची ही आठवी वेळ आहे.

🎆 सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एक निर्णय दिला होता. ज्यानुसार आधार कार्ड आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड हवं असल्यास बंधनकारक आहे.

🎆 1 जुलै 2017 पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.

देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी

🎆 भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता 5Gच्या चाचण्या घेणार आहेत.

🎆 तर यापूर्वी 4G इंटरनेट सुविधेमुळे भारतातल्या इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. यामुळे लोकांच्या हातातील जुन्या आणि मर्यादित सुविधा उपलब्ध असणारे मोबाईल फोन जाऊन त्याची जागा स्मार्टफोन्सनी घेतली.

🎆 यानंतर आता भारत इंटरनेटच्या दुनियेत आणखी मोठ्या बदलावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे.

🎆 सरकार टेलिकॉम क्षेत्रातील सर्व कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटणार आहे. त्यासाठी आम्ही 5G तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. यापुढे 5Gचं आता भविष्य आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणार आहोत. सर्व टेलिकॉम कंपन्या या तंत्रज्ञानाच्या चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.
🔹

शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात पुन्हा केरळ अव्वल

🎆 निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात 2019 मध्ये पुन्हा केरळच पहिल्या क्रमांकावर आले असून या शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ती योजनेत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरी तपासली जात असते.

🎆 तर एसडीजी इंडिया निर्देशांक 2019 अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यात उत्तर प्रदेश, ओदिशा, सिक्कीम या राज्यांनी बरीच प्रगती केल्याचे दिसून आले.

🎆 तसेच गुजरातमध्ये 2018 च्या क्रमवारी तुलनेत काही प्रगती झाली नाही.

🎆 केरळने पहिला क्रमांक कायम राखला असून 70 गुण प्राप्त केले. चंडीगड केंद्रशासित प्रदेशात प्रथम क्रमांकावर असून त्याला 70 गुण मिळाले.

🎆 हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.

🎆 बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश यांची कामगिरी खराब झाली आहे.

🎆 निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा अहवाल जारी करताना सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 पर्यंत साध्य करताना त्यात भारताची मोठी भूमिका असणार आहे.

रशियाकडे जगातील पहिली हायपरसोनिक मिसाईल

🎆 रशियाने आज आवाजाच्या वेगापेक्षा 27 पटींनी जास्त वेगवान असलेल्या हायपरसोनिक मिसाईलला त्यांच्या सैन्यदलाकडे सुपूर्द केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी याची घोषणा केली आहे. ही मिसाईल अण्वस्त्र क्षमता ठेवते.

🎆 तर या हायपरसोनिक मिसाईलचा वेगच एवढा प्रचंड आहे की त्याच्याशी कोणतीच डिफेन्स प्रणाली टक्कर देऊ शकत नाही. 

🎆 27 डिसेंबरला ही मिसाईल रशियन सैन्याला देण्यात आली. या मिसाईलची तैनाती कुठे असेल याबाबत कोणतीही माहिती नसून यूरलच्या डोंगररांगांमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

🎆 हायपरसोनिक मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा (1235 किमी) कमीत कमी 5 पटींनी जास्त वेगाने जाऊ शकते. म्हणजेच 6174 प्रति तास वेग. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत.

🎆 तसेच हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे. वेगही प्रचंड असल्याने सध्याचे रडार या मिसाईलला शोधण्यात कुचकामी ठरणार आहेत.

🎆 तर या मिसाईलची धक्कादायक बाब म्हणजे हे मिसाईल तब्बल दोन अब्ज किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. यामुळे एखादा मोठा देश काही क्षणांत बेचिराख होऊ शकतो.

🎆 या मिसाईलच्या टप्प्यात अमेरिकाही येते. 2018 मध्ये या मिसाईलची टेस्टिंग करण्यात आली होती. तेव्हा 6000 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात आला होता.

जनरल बिपिन रावत: भारताचे प्रथम संरक्षण दल प्रमुख (CDS)

- भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख (Chief of Defence Staff -CDS) म्हणून भुदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे. ते 1 जानेवारी 2020 रोजी पदभार स्वीकारतील. तर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे यांनी भारतीय भुदलाच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे.

- लष्करासंबंधी मुद्द्यांवर संरक्षण दल प्रमुख (CDS) हे सरकारचे सल्लागार असणार तसेच भुदल, हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देणार आहेत.

▪️संरक्षण दल प्रमुख (CDS) पद

- भारत सरकारने 4-स्टार जनरलच्या हुद्यामध्ये संरक्षण दल प्रमुख (CDS) पद स्थापन केले. CDSला इतर सेना प्रमुखांप्रमाणेच वेतन आणि सुविधा दिल्या जाणार.

- ते लष्कर व्यवहार विभागाचे (किंवा सैनिकी व्यवहार विभाग) प्रमुख असणार. हा विभाग संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत तयार केला जाणार आहे.

- संरक्षण मंत्रालयाने भुदल, हवाईदल आणि नौदला यांच्यासंदर्भातल्या नियमांमध्ये दुरुस्ती करत त्यात CDS वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत सेवेत राहू शकणार, अशी तरतूद केली आहे.

- CDS हे सशस्त्र दलांच्या कर्मचारी समितीचे अध्यक्ष असणार. तिन्ही दलांच्या सर्व मुद्द्यांवर संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून ते काम करणार.

- तिन्ही दलांचे प्रमुखही आपापल्या विभागांशी संबंधित मुद्द्यांवर संरक्षण मंत्रालयाला सल्ला देणार.

- तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांबरोबर CDS कोणत्याही दलाचे प्रमुखपद सांभाळणार नाहीत. CDS तिन्ही दल प्रमुखांसह कोणत्याही लष्करी कमांडचा उपयोग करणार नाही, जेणेकरून राजकीय नेतृत्वाला नि:पक्षपाती सल्ला देण्यात सक्षम होतील.

- वायफळ खर्च कमी करून, सशस्त्र दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने CDS तिन्ही दलांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार.

- अण्वस्त्र अधिकारातून अण्वस्त्राची कळ दाबण्याबाबत ते पंतप्रधानांचे मुख्य लष्करी सल्लागार राहतील. 2003 साली स्थापना झालेल्या अण्वस्त्र अधिकार प्राधिकरण (NCA) यामध्ये 16 वर्षांनंतर हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

▪️पार्श्वभूमी

- तिन्ही सशस्त्र दलांमध्ये तीनही दलांमध्ये सामंजस्य राखता यावे या विचाराने संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण करण्यात आले.

- कारगिल युद्धानंतर CDS पद बनवण्याची शिफारस झाली होती. यामागे तीन प्रमुख उद्देश आहेत;

- प्रशिक्षण, खरेदी, कर्मचारी आणि मोहिमांना योग्य दिशा देणे.

- राजकीय नेतृत्वाच्या लष्करी सल्ल्याचा दर्जा सुधारणे.

▪️लष्करी बाबीत वैविध्य आणणे.

- हे पद तीनही सशस्त्र दलांच्या प्रमुखांपेक्षा वरचे आहे. सन 1999 च्या कारगिल युद्धानंतर तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाने देखील CDSला तिन्ही दलांमध्ये चांगले समन्वय स्थापित करण्याची शिफारस केली होती.

- अमेरिका, चीन, ब्रिटन, जापानसह जगातल्या बर्‍याच देशांमध्ये चीफ ऑफ डिफेन्स सारखी व्यवस्था आहे.

- लष्कर व्यवहार विभाग खालील बाबींवर कार्य करणार -

- देशाची सशस्त्र दले - भुदल, नौदल आणि हवाई दल

-भुदल मुख्यालय, नौदल मुख्यालय, हवाई दल मुख्यालय आणि संरक्षण कर्मचारी मुख्यालय असलेले संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय

▪️प्रादेशिक सैन्य

- भुदल, नौदल आणि हवाई दलाशी संबंधित कामे

- प्रचलित नियम आणि कार्यपद्धतीनुसार भांडवल संपादन वगळता सेवांसाठीची मिळकत

- एकत्रित संयुक्त योजना आणि आवश्यकतांच्या माध्यमातून खरेदी, प्रशिक्षण आणि कर्मचार्‍यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेचे समन्वय

-सैन्य तुकड्यांचे पुनर्गठन करणे आणि संयुक्त कारवाईद्वारे स्रोतांच्या तर्कशुद्ध वापरासाठी संयुक्त आदेश तयार करणे.

- सेवेद्वारे स्वदेशी उपकरणांच्या वापरास चालना देणे.

-लष्कर व्यवहार विभागाचे प्रमुख असण्याव्यतिरिक्त संरक्षण प्रमुख ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटी’चे स्थायी अध्यक्षही असणार.

- चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष म्हणून, CDSला खालील कार्ये पार पाडावी लागणार.

- CDS त्रिकोणीय सेवा संस्था देणार. सायबर आणि अंतराळाशी संबंधित त्रिकोणीय सेवा संस्था/तुकडी CDSच्या अखत्यारीत असणार.

- संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (NSA) अध्यक्षतेखाली संरक्षण योजना समितीच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण समितीचे CDS सदस्य असणार.

- न्युक्लीयर कमांड अथॉरिटीचे लष्करी सल्लागार म्हणून काम पाहणार.

- CDS पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तीन वर्षांच्या आत तीन सेवांमध्ये कार्यवाही, मालवाहतूक, प्रशिक्षण, पाठबळ सेवा, दळणवळण, दुरुस्ती आणि देखभाल इ. कार्यांमध्ये संयुक्तता आणणार.

- पायाभूत सुविधांचा जास्तीतजास्त वापर करून सेवांमध्ये तर्कसंगतपणा आणणार.

पश्‍चिम घाटात 'या' नव्या फुलवनस्पतींचा शोध

◾️पश्‍चिम घाटातील तिलारी ( जि. कोल्हापूर ) परिसरातील कातळावर नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे.

◾️ "क्‍लोरोफायटम तिलारीएन्स एस. आर. यादव ऍन्ड चांदोरे" असे त्याचे नाव आहे.

◾️शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव आणि रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर तालुक्‍यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरूण चांदोरे यांनी सात वर्षाच्या संशोधनानंतर या फुलवनस्पतीचा शोध लावला. 

◾️संशोधित फुलवनस्पती सफेद मुसळीच्या प्रजातीमधील आहे.

◾️ तिलारी भागामध्ये या वनस्पतीचा शोध लागल्याने या नव्या फुलवनस्पतीला" क्‍लोरोफायटम तिलारीएन्स' असे नाव देण्यात आले आहे.

✍सफेद रंगाचे फुल असलेली वनस्पती
◾️या नव्या संशोधनाबद्दल डॉ. यादव आणि डॉ. चांदोरे यांचे अभिनंदन केले जात आहे.

✍नवीन फुलवनस्पती म्हणून नोंद

◾️त्यानंतर, त्यांनी गेली सात वर्ष डॉ. यादव यांच्या मार्गदशनाखाली या फुलवनस्पतीचा सखोल अभ्यास करून संशोधन केले.

◾️ त्यांच्या या संशोधनाची दखल घेवून न्युझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्‍सा या जागतिक दर्जाच्या नियतकालिकाने "क्‍लोरोफायटम तिलारीएन्स' या नावाची नवीन फुलवनस्पती म्हणून नोंद काल (ता.30) प्रकाशित केले.

🌿 फुल वनस्पतीची वैशिष्ट्ये 

🌱वनस्पतीची उंची - 1 फुटापर्यंत 

🌱पाने - 22 सेंटीमीटरपर्यंत लांब 

🌱फुलांची लांबी - सुमारे 2.8 सेंटीमीटर 

🌱फुले व फळे कालावधी - जुलै ते ऑगस्ट 

🌱कंदमुळे -10 ते 15 व 5 ते 14 सेंटीमीटर लांब 

🌱एकदल वर्गातील वनस्पती 

🌱जास्त उंचीच्या कातळावर आढळ 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कापूस उत्पादनात भारत जगात अव्वल

➖ 2017-18 या हंगामाच्या तुलनेत 2018 - 19 या हंगामात कापसाचे उत्पादन सुमारे 40 ते 50 लाख गाठींनी कमी होईल असा अंदाज 'Cotton Association of India' ने व्यक्त केला आहे.

➖ त्यामुळे भारत सन 2019 मध्ये कापूस उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे.

➖ तथापि 2017-18 च्या जगातील एकूण कापूस उत्पादनात भारत प्रथम स्थानी आहे.

🔰 जगातील सर्वाधिक कापूस उत्पादक पाच देश ( सन - 2017-18)

1. भारत         : 6205
2. चीन           : 5987
3. अमेरिका    : 4555
4. ब्राझील      : 1894
5. पाकिस्तान  : 1785

उत्पादन - 1000 मेट्रिक टनात 

🔰भारतामध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन

1. गुजरात  - सर्वाधिक उत्पादन
2. महाराष्ट्र
3. तेलंगणा
4. आंध्र प्रदेश
5. मध्ये प्रदेश

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...