३० डिसेंबर २०१९

विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) कोणता देश भारतात पर्यावरणपूरक शहरी वाहतूक तयार करण्यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये एक अब्ज युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे?
अ) इस्राईल      ब) स्वीडन      क) जर्मनी ✅     ड) फ्रान्स

स्पष्टीकरण : जर्मनी देश भारतात पर्यावरणपूरक शहरी वाहतूक तयार करण्यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये एक अब्ज युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे.
 
प्र.२) चित्रपट क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीला ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार देण्याचे जाहीर झाले?
अ) अमिताभ बच्चन     ब) कमल हसन
क) राज बब्बर              ड) रजनीकांत ✅

स्पष्टीकरण : चित्रपट क्षेत्रातल्या रजनीकांत व्यक्तीला ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार देण्याचे जाहीर झाले.

प्र.३) पवन कपूर यांची .....................मधील नवे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अ) सौदी अरेबिया     ब) संयुक्त अरब ✅ अमिराती    क) कुवेत    ड) बहरीन
 
स्पष्टीकरण : पवन कपूर यांची संयुक्त अरब मधील नवे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्र.४) .....................या दिवशी जागतिक व्हेगन दिन पाळतात.
अ) १ ऑक्टोबर         ब) १५ ऑक्टोबर   क) १ नोव्हेंबर ✅    ड) १५ नोव्हेंबर
 
स्पष्टीकरण :  १ नोव्हेंबर या दिवशी जागतिक व्हेगन दिन पाळतात.

प्र.५) .....................मध्ये ‘डिझाइन फेस्टा’ नावाचा कलात्मक कार्यक्रम आयोजित केला गेला.
अ) पॅरिस     ब) टोकियो ✅     क) बीजिंग     ड) रोम

स्पष्टीकरण : टोकियो मध्ये ‘डिझाइन फेस्टा’ नावाचा कलात्मक कार्यक्रम आयोजित केला गेला.

प्र.६) हळद पिवळ्या रंगाची असते हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
अ) साम्यानुमान                     ब) केवलगणनात्मक विगमन ✅
क) अभ्युपगमात्मक निगमन    ड) सर्व योग्य

स्पष्टीकरण : हळद पिवळ्या रंगाची असते हे खालीलपैकी केवलगणनात्मक विगमन उदाहरण आहे.

प्र.७) मेंदूतील गाठी व कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
अ) कोबाल्ट ६०    ब) सोडिअम २४   क) आयोडीन १३१✅    ड) वरील सर्व

स्पष्टीकरण : मेंदूतील गाठी व कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी आयोडीन १३१ वापर केला जातो.

प्र.८) नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स' संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्देशांक प्रसिद्ध केला आहे.

II. या यादीत केरळ आणि बिहार अनुक्रमे प्रथम व तळाशी आहेत.

III. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचे मूल्यांकन केले गेले नाही.

वरती दिलेले कोणते विधान अचूक आहे?

अ) केवळ I
ब) एकही नाही✅✅✅
क) I आणि II
ड) II आणि III

स्पष्टीकरण : दोन्ही विधाने चूक आहेत.

प्र.९) ____________ याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

अ) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
✅✅✅
ब) कामगार व रोजगार मंत्रालय
क) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
ड) मनुष्यबळ विकास मंत्रालय

स्पष्टीकरण :  कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

प्र.१०) _____ याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अ) आयुषमान भारत✅
ब) स्वच्छ भारत
क) राष्ट्रीय पोषण मिशन
ड) मिशन इंद्रधनुष

स्पष्टीकरण :  आयुषमान भारत याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

देशातील सव्वालाख गावांत मार्चपर्यंत मोफत वाय-फाय..

भारत नेटशी जोडलेल्या देशभरातील सव्वा लाख गावांत मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हरियाणातील रेवाडी येथे केली.

तर येत्या चार वर्षांत देशभरातील 6 लाख गावांपैकी 15 टक्के गावांचे रुपांतर डिजिटल गावांत केले जाईल, असे सांगत त्यांनी बुधवारी रेवाडीस्थित गुरुवारा गाव डिजिटल गाव म्हणून घोषित केले.

देशभरातील 1.3 लाख ग्राम पंचायती भारत नेट प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. अडीच लाख ग्रामपंचायती भारत नेट आॅप्टिकल फायबरशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

इंटरनेट सेवा लोकप्रिय करण्यासाठी भारतनेटशी जोडल्या गेलेल्या सर्व गावांना मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सुविधा दिली जाईल. सध्या 48 हजार गांवात वाय-फाय सुविधा आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी रेवाडी गावाचे रुपांतर डिजिटल गावांत झाल्याने आनंद होत आहे. यामुळे गावकऱ्यांना शहर, तालुक्याला न जात गावातच एक क्लिकवर सरकारी योजना व सेवा उपलब्ध होईल.

या गावांतील प्रत्येक घर वाय-फाय सुविधा उपलब्ध असेल. एक लाख गावांचे रुपांतर डिजिटल गावांत करण्याच्या  घोषणेनंतर भिवाडी नजीक अल्वरस्थित करींदा गावात व्हीएनएल कंपनीने डिजिटल गावांचे प्रारुप तयार केले होते. तत्कालीन दूरसंचार सचिवांनीही हा एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले होते.

महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

🅾चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता.

🅾चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.

🅾त्यामुळे हा पुरस्कार आज (२९ डिसेंबर) प्रदान करणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं

UPSC मार्फत रेल्वेमध्ये सर्व नवीन भरती करण्यात येणार

🌷भारतीय रेल्वेमध्ये होणारी सर्व नवीन भरती आता पुढे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत केली जाणार आहे. याबाबत सुधारणा करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या आठ संवर्गांचे एकाच मंडळात विलीनीकरण करून नवे ‘भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा’ (IRMS) हा संवर्ग तयार करण्याला मान्यता दिली आहे.

🌿मंडळाविषयी:-

🌷IRMS मंडळ ही एकमेव संस्था असेल जी उमेदवाराद्वारे अर्ज भरताना सूचित केलेली पसंती लक्षात घेणार.नवीन व्यवस्थेनुसार, नव्या विस्तारीत मंडळात रेल्वे मंडळाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असणार. त्याव्यतिरिक्त रेल्वेकडेचे 4 सदस्य आणि उर्वरित स्वतंत्र सदस्य असणार. हे सदस्य वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रातली 30 वर्षांचा अनुभव असलेले अत्यंत प्रतिष्ठित व्यवसायिक असणार आहेत.

🌷स्वतंत्र सदस्य मंडळाच्या बैठकीत उपलब्ध असणार परंतू ते रेल्वेच्या दैनंदिन कारभारात नसणार.पुढे होणारी सेवा भरती सुलभ करण्यासाठी ‘कार्मिक व प्रशिक्षण विभाग’ आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्याशी सल्लामसलत करून नवीन सेवा तयार केली जाणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी

🌷भारत सरकारचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या संस्थेची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातली कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.

🌿भारतीय रेल्वे विषयी:-

🌷भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातली सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातला विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. रेल्वे खात्याचा कारभार कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.

🌷भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

🌷भारतात पहिली रेल्वेगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.

🌷1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

🌷आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

हेमंत सोरेन बनले  झारखंडचे ११वे मुख्यमंत्री

🍀 झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली.

🍀 राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला.

🍀 राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

🍀 हेमंत सोरेन (वय ४४) हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत.

🍀 हेमंत सोरेन यांचा पहिला कार्यकाळ हा १३ जुलै २०१३ – २३ डिसेंबर २०१४ इतका होता ह्या पदावर असणारा हेमंत सोरेन आपल्या कार्यकाळामध्ये भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

🎇 झारखंड राज्य माहिती 🎇

🍀 झारखंड हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे.

🍀 बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला.

🍀 भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले.

13 वे दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धा - 2019

स्थळ - काठमांडू-पोखरा, नेपाळ

कालावधी - 1 ते 10 डिसेंबर 2019

सर्वाधिक पदक विजेता - भारत (312 पदके)

1984 साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांची सुरुवात

भारत 1984 पासून सलग आजपर्यंत पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला आहे.

सर्वाधिक पदक विजेते 5 देश
1. भारत (312 - 174 सुवर्ण, 93 रौप्य, 45 कांस्य)

2. नेपाळ (206 - 51 सुवर्ण, 60 रौप्य, 95 कांस्य)

3.श्रीलंका (251 - 40 सुवर्ण, 83 रौप्य, 128 कांस्य)

4. पाकिस्तान (131 - 31 सुवर्ण, 41 रौप्य, 59 कांस्य)

श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना 'सी. के. नायडू जीवनगौरव

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि १९८३चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य कृष्णमाचारी श्रीकांत आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना बीसीसीआयकडून देण्यात येणारा यंदाचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या १२ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार असून या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

श्रीकांत आणि अंजुम यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.

टीम इंडियाचे शतकांचे महाशतक

श्रीकांत यांनी १९८१ ते १९९२ यादरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

६० वर्षीय श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवला होता.

वनडेत त्यांनी भल्याभल्या गोलंदाजांची पिसं काढली. वेगवान गोलंदाजांनाही श्रीकांत हेल्मेटविना खेळायचे.

याच दौऱ्यात सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ही मालिका बरोबरीत राहिली. त्यानंतर श्रीकांत यांना कर्णधारपदावरून दूर करण्यात आले.

१९९२च्या वर्ल्डकपनंतर श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

२००९ ते २०१२ पर्यंत श्रीकांत यांच्याकडे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद होते.

अंजुम चोप्रा भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

मलाला यूसुफझाई जगातील ‘सर्वात प्रसिद्ध किशोरी’

🍀 संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफझाई यांना ‘डिकेड इन रिव्यू’ अहवालात ‘जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन’ घोषित केले आहे.

🍀 २०१४ मध्ये मलालाला नोबेल पारितोषिक (शांती) देण्यात आले.

🍀 हा पराक्रम गाठणारी मलाला ही सर्वात कमी वयाची तरुणी आहे.

🍀 अहवालात असेही म्हटले होते की, या प्राणघातक हल्ल्यानंतर मलालाचे आणखी वलय वाढले.

🍀 सन २०१७ मध्ये मुलींचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवून मलालाला यूएन’ने शांतिदूत म्हणून बनवले.

🍀 २२ वर्षीय मलाला अलीकडेच टीन वोग मॅगझिनने ‘कव्हर परफॉरमन्स’साठी निवडले होते.

असे असेल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ

🎆 महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. आज एकूण ३६ जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

🎆 राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

🎆 पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. 

🎆 राज्य मंत्रिमंडळाची यादी खालीलप्रमाणे :

✅ मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे, शिवसेना

✅ उपमुख्यमंत्री - अजित पवार, राष्ट्रवादी

✅✅ कॅबिनेट मंत्री :

१. एकनाथ शिंदे, शिवसेना

२. सुभाष देसाई, शिवसेना

३. बाळासाहेब थोरात, काँग्रेस

४. नितीन राऊत, काँग्रेस

५. जयंत पाटील, राष्ट्रवादी

६. छगन भुजबळ, राष्ट्रवादी

७. अशोक चव्हाण, काँग्रेस

८. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी

९. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी

१०. विजय वडेट्टीवार, काँग्रेस

११. अनिल देशमुख, राष्ट्रवादी

१२. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

१३. वर्षा गायकवाड, काँग्रेस

१४. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी

१५. नवाब मलिक, राष्ट्रवादी

१६. राजेश टोपे, राष्ट्रवादी

१७. सुनिल केदार, काँग्रेस

१८. संजय राठोड, शिवसेना

१९. गुलाबराव पाटील, शिवसेना

२०. अमित देशमुख, काँग्रेस

२१. दादा भुसे, शिवसेना

२२. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी

२३. संदिपान भुमरे, शिवसेना

२४. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी

२५. यशोमती ठाकूर, काँग्रेस

२६. अनिल परब, शिवसेना

२७. उदय सामंत, शिवसेना

२८. के.सी. पाडवी, काँग्रेस

२९. शंकरराव गडाख, अपक्ष

३०. असलम शेख, काँग्रेस

३१. आदित्य ठाकरे, शिवसेना

✅✅ राज्यमंत्री :

१. अब्दुल सत्तार, शिवसेना

२. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस

३. शंभूराजे देसाई, शिवसेना

४. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी

५. विश्वजीत कदम, काँग्रेस

६. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

७. आदिती तटकरे, राष्ट्रवादी

८. संजय बनसोडे, राष्ट्रवादी

९. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी

१०. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष

असे असेल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ

🎆 महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. आज एकूण ३६ जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

🎆 राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

🎆 पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. 

🎆 राज्य मंत्रिमंडळाची यादी खालीलप्रमाणे :

✅ मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे, शिवसेना

✅ उपमुख्यमंत्री - अजित पवार, राष्ट्रवादी

✅✅ कॅबिनेट मंत्री :

१. एकनाथ शिंदे, शिवसेना

२. सुभाष देसाई, शिवसेना

३. बाळासाहेब थोरात, काँग्रेस

४. नितीन राऊत, काँग्रेस

५. जयंत पाटील, राष्ट्रवादी

६. छगन भुजबळ, राष्ट्रवादी

७. अशोक चव्हाण, काँग्रेस

८. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी

९. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी

१०. विजय वडेट्टीवार, काँग्रेस

११. अनिल देशमुख, राष्ट्रवादी

१२. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

१३. वर्षा गायकवाड, काँग्रेस

१४. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी

१५. नवाब मलिक, राष्ट्रवादी

१६. राजेश टोपे, राष्ट्रवादी

१७. सुनिल केदार, काँग्रेस

१८. संजय राठोड, शिवसेना

१९. गुलाबराव पाटील, शिवसेना

२०. अमित देशमुख, काँग्रेस

२१. दादा भुसे, शिवसेना

२२. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी

२३. संदिपान भुमरे, शिवसेना

२४. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी

२५. यशोमती ठाकूर, काँग्रेस

२६. अनिल परब, शिवसेना

२७. उदय सामंत, शिवसेना

२८. के.सी. पाडवी, काँग्रेस

२९. शंकरराव गडाख, अपक्ष

३०. असलम शेख, काँग्रेस

३१. आदित्य ठाकरे, शिवसेना

✅✅ राज्यमंत्री :

१. अब्दुल सत्तार, शिवसेना

२. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस

३. शंभूराजे देसाई, शिवसेना

४. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी

५. विश्वजीत कदम, काँग्रेस

६. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

७. आदिती तटकरे, राष्ट्रवादी

८. संजय बनसोडे, राष्ट्रवादी

९. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी

१०. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष

चालू घडामोडी प्रश्नसंच

🔳 कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?

(A) जर्मनी
(B) रशिया
(C) पोर्तुगाल✅✅
(D) अर्जेंटिना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अपहरण-रोधी सरावाचे नाव काय आहे?

(A) अद्भुत
(B) अपहरण ✅✅
(C) बंधक
(D) देश हमारा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 डिसेंबर 2019 मध्ये कोणत्या बँकिंग कंपनीने 100 अब्ज डॉलर एवढ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला?

(A) HDFC ✅✅
(B) अ‍ॅक्सिस बँक
(C) कॅनरा बँक
(D) बँक ऑफ म्हैसूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 कोणत्या राज्याने ‘जलसाथी’ नावाने एका महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली?

(A) आंध्रप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) उत्तरप्रदेश
(D) ओडिशा ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 दरवर्षी ____या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा केला जातो.

(A) 25 नोव्हेंबर
(B) 31 ऑक्टोबर
(C) 15 जानेवारी
(D) 20 डिसेंबर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 भारतीय रेल्वे “एक भारत श्रेष्ठ भारत” कार्यक्रमात भाग घेणार्‍या तरुणांना _ सवलत देणार.

(A) 100 टक्के
(B) 25 टक्के
(C) 50 टक्के ✅✅
(D) 55 टक्के

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 लडाख केंद्रशासित प्रदेशात नवीन वर्षाच्या निमित्ताने ___ हा उत्सव साजरा केला जातो.

(A) लोसार उत्सव✅✅
(B) चेती चंद उत्सव
(C) अंबुबाची उत्सव
(D) संम्मक्का सारक्का उत्सव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____ येथे प्रथम ‘मंडू महोत्सव’ आयोजित करण्यात आले.

(A) मध्यप्रदेश✅✅
(B) राजस्थान
(C) तामिळनाडू
(D) उत्तरप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?

(A) चीन
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) रशिया ✅✅
(D) इस्त्राएल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?

(A) इंडोनेशिया
(B) फिलीपिन्स✅✅
(C) जापान
(D) चीन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे एक प्रसिद्ध _____ होते.

(A) वास्तुकार
(B) राजकीय व्यंगचित्रकार✅✅
(C) गायक
(D) राजकारणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राच्या सालसा आहेरला दुहेरी मुकुट

👉रवाइन हॉटेलतर्फे आयोजित केलेल्या ‘एमएसएलटीए’ अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महिला गटात
महाराष्ट्राच्या सालसा आहेरने दुहेरी मुकुट पटकावला.

👉तर एकेरी गटात तिने तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा पराभव केला, तर दुहेरी गटात युब्रानी बॅनर्जीच्या साथीने तेजस्वी काटे व सृष्टी दास जोडीला नमवले.

👉तसेच चौथ्या मानांकीत सालसाने तेलंगणाच्या दुसऱ्या मानांकित संस्कृतीचा 6-1, 6-1 एक तास, 10 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात पराभव केला.

👉त्यानंतर दुहेरीच्या अंतिम सामन्यात सालसाने पश्चिम बंगालच्या युब्रानीसह खेळताना महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि सृष्टीचे आव्हान 6-2, 6-3 असे मोडीत काढले.

👉पुरुष एकेरीत कर्नाटकच्या अव्वल मानांकित सूरज प्रबोधने महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित कैवल्य कलमसेचा 6-3, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...