२८ डिसेंबर २०१९

सुशासन निर्देशांक 2019

🍀25 डिसेंबर 2019 रोजी सुशासन दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारतर्फे ‘सुशासन निर्देशांक’ (GGI) जाहीर करण्यात आला.

🍀हा निर्देशांक प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स या संस्थांद्वारे तयार करण्यात आला.

🍀हा निर्देशांक तयार करण्यासाठी गृहीत धरण्यात आलेल्यांमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण संरक्षण आणि कायदेशीर संरक्षण आणि न्यायालयीन सेवा या मुख्य घटकांचा समावेश आहे.

🍀शेती व संबंधित क्षेत्रे, वाणिज्य व उद्योग, मनुष्यबळ विकास, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उपयोगिता, आर्थिक प्रशासन, समाज कल्याण आणि विकास, न्यायालयीन आणि सार्वजनिक सुरक्षा, पर्यावरण आणि नागरिक-केंद्रित शासन या 10 क्षेत्रांचा निर्देशांक तयार करताना विचार केला गेला आहे.

🔴ठळक बाबी:-

🍀राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तीन गटांमध्ये विभागले गेले आहे, ते आहेत - मोठे राज्य, ईशान्य आणि डोंगराळ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश.

🍀मोठ्या राज्यांमध्ये तामिळनाडू राज्य अव्वल ठरले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो.

🍀ओडिशा, बिहार, गोवा आणि उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये सुशासनाच्या बाबतीत प्रदर्शन कमकुवत होते. या निर्देशांकात झारखंडचा शेवटचा क्रमांक होता.

🍀ईशान्य आणि डोंगराळ राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उत्तराखंड, त्रिपुरा, मिझोरम आणि सिक्कीम यांचा क्रमांक लागतो.

🍀वाईट कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये जम्मू व काश्मीर, मणीपूर, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकत्रित खेळणार नाहीत

🔥बांगलादेशमध्ये होणाऱ्या जागतिक एकादश संघाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-20 सामन्यांत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आशियाई एकादश संघाकडून एकत्रित खेळणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी सांगितले.

🔥बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुढील वर्षी मार्च महिन्यात दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

🔥तसेच 18 आणि 21 मार्चला होणाऱ्या या दोन सामन्यांसाठी भारताच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे.गेली सात वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेल्या नाहीत. परंतु विश्वचषक आणि आशियाई स्पर्धामध्ये या उभय संघांमध्ये सामने झालेले आहेत.

२७ डिसेंबर २०१९

भूगोल सराव प्रश्नसंच

IAF चा पराक्रमी ‘बहादूर’ आज होणार निवृत्त

⚡️_  इंडियन एअर फोर्सचं अत्यंत घातक विमान MIG-27 उद्या सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-२७ विमानांची तुकडी उद्या शेवटचं उड्डाण करणार आहे. मिग-२७ फायटर विमाने इंडियन एअर फोर्सच्या वैभवशाली परंपरेची साक्षीदार आहेत. मागच्या चार दशकापासून ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती.

👉🏻_जोधपूर एअर बेसवर मिग-२७ ची शेवटची स्क्वाड्रन तैनात असून या स्क्वाड्रनमध्ये सात विमाने आहेत. “मिग-२७ चे स्क्वाड्रन आज आपले शेवटचे हवाई कौशल्य सादर करेल. त्यानंतर ही विमाने निवृत्त होईल. देशभरात पुन्हा कुठेही ही विमाने उड्डाण करणार नाहीत” अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल सोमबीत घोष यांनी दिली.

🎯_ काय आहे मिग-२७ चे वैशिष्टय

– भारताने १९८० च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत युनियन म्हणजे आताच्या रशियाकडून ही फायटर विमाने विकत घेतली होती.

– कारगिल युद्धातील मिग-२७ ची कामगिरी पाहून हे विमान चालवणाऱ्या फायटर वैमानिकांनी या विमानाला ‘बहादूर’ हे टोपण नाव दिले होते.

– शक्तीशाली इंजिन असलेल्या मिग-२७ मध्ये मोहिमेच्या गरजेनुसार काही बदल करता यायचे.

– कॉकपीटसह विमानातील अत्याधुनिक सिस्टिममुळे वैमानिकाला अत्यंत अचूकतेने शत्रूवर प्रहार करणे शक्य झाले.

– २० वर्षांपूर्वी १९९९ साली पाकिस्तान बरोबर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात मिग-२७ ने अत्यंत उत्कृष्ट भूमिका बजावली.

– कारगिल युद्धात हजारो फूट उंच शिखरावर दडून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर या विमानातून अत्यंत अचूकतेने बॉम्बफेक करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला आपल्या चौक्या सोडून पळ काढावा लागला.

– मागच्या काही वर्षात मिग-२७ च्या अपघातामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे २०१७ सालापासून भारतीय हवाई दलाने टप्प्याटप्प्याने या विमानांचा वापर बंद केला.

– मिग-२७ ने ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.

– आयएएफची २९ क्रमांकाची स्क्वाड्रन फक्त अपग्रेडेड मिग-२७ ऑपरेट करते. १० मार्च १९५८ साली ही स्कवाड्रन स्थापन झाली आहे.

हर्षवर्धन शृंगला नवे परराष्ट्र सचिव

🅾नवी दिल्ली : अनुभवी राजनैतिक अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांची सोमवारी नवे परराष्ट्र सचिव म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. ते विजय गोखले यांची जागा घेतील.

🅾भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९८४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले शृंगला भारताच्या शेजारी देशांबाबतचे तज्ज्ञ मानले जातात. सध्या ते अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहात आहेत.

🅾वर्चस्ववादी ट्रम्प प्रशासन, लष्करी व आर्थिक प्रभाव वाढवण्याचा चीनचा प्रयत्न, अशी परराष्ट्र धोरणविषयक आव्हाने भारताला भेडसावत असताना शृंगला यांची नियुक्ती झाली आहे. भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्यावर अनेक देशांकडून टीका होत असताना, या संदर्भात जास्तीत जास्त देशांशी राजनैतिक मार्गाने संपर्क साधणे, हे शृंगला यांच्यापुढील तातडीचे काम राहील अशी अपेक्षा आहे

रोहतंग खिंडीतील बोगद्यास वाजपेयी यांचे नाव

- हिमाचल प्रदेशातील रोहतंग खिंडीच्या खालून जाणाऱ्या बोगद्यास  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
- या बोगद्याला 4000 कोटी रुपये खर्च आला असून त्याचे काम 2020 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा बोगदा तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय वाजपेयी पंतप्रधान असताना 2000 मध्ये घेण्यात आला होता.
- रोहतंग या खिंडी खालून हा बोगदा काढण्यात आला आहे.
- रोहतंग खिंडीच्या खालून जाणारा  8.8 किलोमीटर लांबीचा हा बोगदा 3000 मीटर उंचीवर बनवलेला सर्वात मोठा बोगदा आहे.
- बोगद्यामुळे मनाली ते लेह यांच्यातील अंतर 46 कि.मीने कमी झाले आहे. हा बोगदा खुला झाल्यानंतर सर्व हवामानात हिमाचल प्रदेश व लडाख हे भाग जोडलेले राहतील. सध्या हे भाग थंडीत सहा महिने एकमेकांपासून दळणवळणाने जोडलेले राहत नाहीत.

त्रिपुरा राज्याला मिळाले पहिले विशेष आर्थिक क्षेत्र 【SEZ】

🎆 कृषी-पूरक उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने त्रिपुरा राज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) तयार करण्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.

🎆 तसेच त्रिपुरा हे Agro Food Processing उद्योग असणारे देशातील पहिले SEZ ठरले. #1st

🎆 ते राज्यातले पहिलेच विशेष आर्थिक क्षेत्र असेल.

🎆 त्रिपुरा राज्यामधले प्रस्तावित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) पश्चिम जलेफा (सबरूम, दक्षिण त्रिपुरा जिल्हा) येथे स्थापन केले जाणार.

🎆 हे ठिकाण राजधानी आगरतळा या शहरापासून 130 कि.मी. अंतरावर आहे.

🌀 ठळक बाबी

🎆 प्रकल्पातली अंदाजे गुंतवणूक सुमारे 1550 कोटी असणार आहे. या क्षेत्राच्या विकासामुळे 12,000 कुशल रोजगार तयार होण्याचा अंदाज आहे.

🎆 या क्षेत्राचा विकास त्रिपुरा औद्योगिक विकास महामंडळ (TIDC) करणार आहे.

🎆 या क्षेत्रात अन्नप्रक्रियेसाठीचे उद्योग उभारले जातील. अन्नप्रक्रियेसोबतच रबर उद्योग, वस्त्रोद्योग, बांबू उद्योगांची या क्षेत्रात भर असेल.

✅ विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) म्हणजे काय?

🎆 विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे खास आखून दिलेला करमुक्त प्रदेश होय.

🎆 भारत सरकारने सन 2000 मध्ये SEZ धोरण आखले आणि 2005 साली SEZ कायदा करण्यात आला.

🎆 SEZ मधील कोणत्याही प्रकाराच्या म्हणजेच जमीन, शेती, पडीक जमीन, नद्या, तलाव, भूजल अश्या स्त्रोतांवर राज्य वा केंद्र सरकार, ग्रामपंचायत किंवा इतर घटनात्मक संस्थांचा कोणताही अधिकार नसतो.

🎆 तो एक स्वतंत्र आणि स्वायत्त भूप्रदेश असतो.

🎆 या आर्थिक क्षेत्राचा कारभार हा पूर्णपणे खासगी असतो आणि त्यासाठी प्रशासकीय मंडळ असते.

🎆 गुंतवणूकदार, परकीय उद्योग यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून असे धोरण आखले जाते. हा ‘व्यवसाय सुलभतेचा’ एका भाग आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई

अवधच्या भागातील क्रांतीचे नेतृत्व मौलाना अहमदुल्लाशाह (वाजीद अलीशाह) व बेगम हजरत महल हे करीत
होते.
क्रांतिकारकांनी लखनौचे कमिश्नर हेनरी लॉरेन्स यांना ठार केले होते. जनरल नील हे लखनौच्या वेढ्यातच
ठार झाले. त्यांच्या जागी कॅम्पबेलची नियुक्ती झाली. त्यांनी जंगबहादूरच्या नेपाळी सैनिकांच्या सहकार्याने ३१
मार्च १८५८ रोजी लखनौ जिंकले. मात्र अवधमधील तालुकेदाराने गनिमी काव्याने इंग्रजांशी प्रतिकार चालूच ठेवला.
झाशीतील भारतीय सैनिकांनी सशस्त्र क्रांतीस प्रारंभ केला। झांशीच्या राणी लक्ष्मीबाईनेसुद्धवा मेरी झाँशी नही दुँगी'
अशी गर्जना करीत इंग्रजांशी लढा सुरू केला. त्यांनी 'दामोदरराव' या अल्पवयीन दत्तक मुलास गादीवर बसवून
राज्यकारभार हातात घेतला. सर हय रोज यांनी २२ मार्च १८५८ रोजी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. या
वेढ्यातून लक्ष्मीबाई निसटल्या व त्या काल्पीला गेल्या. याच ठिकाणी तात्या टोपे व नानासाहेबांशी त्यांनी पुढील
कार्यक्रमाबद्दल चर्चा केली. इंग्रजांच्या हातात काल्पी गेल्यानंतर ते तिघेही ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरचे राजे
जिवाजीराव शिंदे हे इंग्रजांचे मित्र होते; परंतु त्यांचे सैन्य क्रांतिकारकांना जाऊन मिळाल्यामुळे १ जून १८५८ रोजी
ग्वाल्हेरचा किल्ला क्रांतिकारकांनी जिंकला. सर ह्यू रोज यांनी तात्या टोपेंचा पराभव करून ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर
हल्ला केला. राणी लक्ष्मीबाईने १९ दिवस ग्वाल्हेरचा किल्ला लढविला व इंग्रजांशी झुंज दिली; परंतु इंग्रज सेनापती
सर ह्यू रोज यांच्याशी लढतानाच त्या भयंकर जखमी झाल्या व त्यामध्येच त्या १८ जून १८५८ रोजी मरण पावल्या.
१८५७ च्या क्रांतीचे केंद्र स्थळ उत्तर भारत होते. दिल्ली, मेरठ, आग्रा, अलाहाबाद, अवध, पाटणा, रोहिलखड या
भागात क्रांतिकारकांनी आपापली सरकारे स्थापन केली होती. मध्य भारतात महधार, ग्वाल्हेर, इंदौर, अजमेरा, सागर
व निमच ही क्रांतीची केंद्रे होती. महाराष्ट्रात पेठ , नाशिक, सातारा, बीड, औरंगाबाद, खानदेश, अहमदनगर,
कोल्हापूर, बेळगाव व धारवाड ही क्रांतीची ठिकाणे होती. नानासाहेब, बहादूरशाह, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई,
भगवंतराव कोळी, रंगो बापूजी, कुंवरसिंह, अमरसिंह, मौलवी अहमदशाह, बेगम हजरत महल व खान बहादूर खान
यांनी ठिकठिकाणी क्रांतीचे नेतृत्व केले. मौलवी अहमदशहा यांची इंग्रजांनी हत्या केली. विविध प्रकारे भेद नीतीचा
अवलंब करून लॉर्ड कॅनिंग यांनी सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा बीमोड केला. या युद्धात ३० हजार भारतीय
सैनिक व एक लाख नागरिक मारले गेले.

10 सराव महत्त्वाचे प्रश्न उत्तरे


1) कोणत्या दिवशी भारतात ‘सुशासन दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 25 डिसेंबर

2) कोणत्या शहराने “ऑक्सिजन पार्लर” नावाचा उपक्रम राबविला?
उत्तर : नाशिक

3) कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
उत्तर : राफेल नडाल

4) परराष्ट्र सचिव पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : हर्षवर्धन श्रृंगला

5) अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : चंदीगड

6) 32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ कुठे आयोजित केले गेले?
उत्तर : नवी दिल्ली

7) कोणत्या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 24 डिसेंबर

8) कोणत्या राज्यात ‘नेथन्ना नेस्थम’ योजना लागू करण्यात आली आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

9) ‘FIFA टीम ऑफ द ईयर’चा किताब कोणाला देण्यात आला?
उत्तर : बेल्जियम

10) कोणाच्या हस्ते नवी दिल्लीत 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : उपराष्ट्रपती

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) फळे गोड निघाली या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.

   1) फळे      2) गोड फळे   
   3) गोड      4) निघाली

उत्तर :- 3

2) पुढील पर्यायातून ‘कर्मणी प्रयोग’ ओळखा.

   1) सुरेशने पुस्तक वाचले      2) सुरेश पुस्तक वाचतो
   3) सुरेशने पुस्तक वाचावे      4) सुरेशकडून पुस्तक वाचवले

उत्तर :- 1

3) ‘देशगत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

   1) तृतीया तत्पुरुष    2) षष्ठी तत्पुरुष
   3) व्दितीया तत्पुरुष    4) सप्तमी तत्पुरुष

उत्तर :- 3

4) बापरे केवढा मोठा हा हत्ती ........................

   1) ?      2) !     
   3) -      4)  :

उत्तर :- 2

5) पुढीलपैकी ‘प्रत्ययघटित’ शब्द कोणता ?

   1) दिवाणखाना    2) दुर्जन     
   3) कटकट    4) चुळबुळ

उत्तर :- 1

6) ‘आम्ही गहू खातो.’ या वाक्यातील ‘शब्दशक्ती’ ओळखा.

   1) अभिधा    2) लक्षणा   
   3) व्यंजना    4) वरीलपैकी कोणतीच नाही

उत्तर :- 2

7) पुढीलपैकी कोणता शब्द ‘प्रसिध्द’ या शब्दाचा पर्याय नाही ?

   1) प्रख्यात    2) विख्यात   
   3) आख्यात    4) सर्वज्ञात

उत्तर :- 3

8) शुध्दपक्ष या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) शुक्लपक्ष    2) वद्यपक्ष   
   3) पौर्वात्य    4) कृश

उत्तर :- 1

9) ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून स्पष्ट करा.

   1) प्रत्येक घरात चूल असतेच    2) मातीच्या चुली करण्याची पध्दत घरोघरी आहे
   3) मातीपासून चुली बनतात    4) सर्वत्र सारखीच परिस्थिती असते

उत्तर :- 4

10) मान तुकविणे : या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा.

   1) निरोप देणे    2) अपयश येणे   
   3) नवा रूप येणे    4) आश्चर्यचकीत होणे

उत्तर :- 3

केंद्र व राज्य महिला आयोगाची पुर्नरचना करा'

- राज्य किंवा राष्ट्रीय महिला आयोगाने
कामकाज करून पीडित महिलांना आधार दिला पाहिजे. त्यांचे प्रश्न निकाली काढले पाहिजे. मात्र,

- सध्याचे महिला आयोग कष्टकरी आणि पीडित महिलांचे प्रश्न निकाली काढत नसल्याचा दावा करत महिला आयोगाची पुनर्रचना करावी अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी केली.

- मरियम ढवळे यांनी महिला आयोगाच्या कामकाजावर जोरदार टीका केली. भारतीय संविधानाने मार्गदशक तत्व आखून दिली आहेत. त्यानुसार महिला आयोगाचे कामकाज झाले पाहिजे. मात्र, सध्याचे महिला आयोग कष्टकरी वर्गातील महिलांचे प्रश्न सोडवण्याबाबत उदासीन असल्याचा अनुभव संघटनेला आला असल्याचे मरियम ढवळे यांनी सांगितले. पूर्वी महिला आयोग योग्य त्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम करत होते. महिलांच्या प्रश्नावर तात्काळ कारवाई करत होते.

-  मात्र आताचे महिला आयोग जी भूमिका सरकार घेते तीच भूमिका महिला आयोग घेत असल्याचा गंभीर आरोप करत महिला आयोगाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. महिलांचे प्रश्न ज्यांना समजतात,

- ज्यांना महिलांच्या प्रश्नांबाबत काम करण्याची आणि ते प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे, अशा व्यक्तींना महिला आयोगात असणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.

- अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२ वे राष्ट्रीय अधिवेशन २७ ते ३० डिसेंबर दरम्यान पहिल्यांदाच मुंबईत पार पडत आहे.

- त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मरियम ढवळे यांनी अधिवेशनाबाबतचीही माहिती दिली. भायखळा येथील साबू सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालयात हे अधिवेशन पार पडणार आहे.

- अभिनेत्री स्वरा भास्कर ही या अधिवेशनाचे उद्घाटन करणार आहे. तत्पूर्वी अधिवेशनानिमित्त आझाद मैदानात दुपारी १२ वाजता महिलांची जाहीर सभा होणार आहे.

- या सभेला माकप नेत्या वृंदा करात, माजी खासदार सुभाषिनी अली, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मालिनी भट्टाचार्य, सरचिटणीस मरियम ढवळे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माकपचे आमदार विनोद निकोले आदी संबोधित करणार आहेत.

- या अधिवेशनानिमित्त अत्याचाराविरोधात संघर्ष करणाऱ्या विविध राज्यातील काही महिलांचा प्रातिनिधीक सत्कारही करण्यात येणार आहे.

-ही देशातील सर्वात मोठी महिला संघटना असून २३ राज्यांमध्ये १ कोटीहून अधिक महिला सभासद असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
----------------–--------------------------------

चीन आणि ब्राझिल यांचा ‘CBER-4A’ उपग्रह प्रक्षेपित केला गेला

20 डिसेंबर 2019 रोजी चीनच्या अंतराळ केंद्रावरून चीन आणि ब्राझिल यांनी संयुक्तपणे तयार केलेला ‘CBER-4A’ उपग्रह प्रक्षेपित केला गेला. ‘CBER-4A’ म्हणजे चायना-ब्राझिल अर्थ रिसोर्स (CBER) 4A होय.

ठळक बाबी

हा उपग्रह चीनी बनावटीच्या ‘लाँग मार्च-4बी’ प्रक्षेपकाद्वारे अंतराळात सोडण्यात आला.

हा उपग्रह दोन देशांमधल्या सहकार तत्त्वावरील कार्यक्रमाच्या अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या उपग्रहांच्या शृंखलेमधला सहावा उपग्रह आहे.

हा उपग्रह जागतिक पातळीवर दृक सुदूर संवेदी माहिती प्राप्त करणार. त्याद्वारे अॅमेझॉनचे वर्षावन तसेच पर्यावरण-विषयक बदलांवर देखरेख ठेवण्यात येणार. याव्यतिरिक्त या उपग्रहाद्वारे पृथ्वीवरील संसाधने, शेती, सर्वेक्षण याबाबतीतही सेवा देता येणार.

सध्या, BRICS समुहामधले दक्षिण आफ्रिका या एकमेव देशाकडे स्वतःचे उपग्रह नाहीत.

सरकारी योजना :- जागतिक महायुध्दातील माजी सैनिक/त्यांच्या विधवा यांना निवृत्तीवेतन

⚡ दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत पदमुक्त झालेल्या माजी सैनिकांना सैनिकी सेवेबद्दल निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत अशा महाराष्ट्रातील माजी सैनिकांना व त्यांच्या विधवांना दरमहा मासिक अनुदान दिले जाते.

🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* :

▪ दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या माजी सैनिकांपुरतीच मर्यादीत असल्याने त्या माजी सैनिक/विधवा यांचेकडे सैन्यसेवा केल्याबाबतचा कागदोपत्री पुरवा असणे आवश्यक.
▪ माजी सैनिकास केंद्र/राज्य शासन यांचेकडून काही निवृत्ती वेतन (लष्करी अथवा नागरी, स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन) मिळत असेल व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्ती या योजनेखाली निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असणार नाहीत. मात्र असे निवृत्ती वेतन दरमहा व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा कमी असल्यास ते जेवढया रक्कमेने कमी तेवढी रक्कम या योजनेखाली निवृत्ती वेतन म्हणून मंजूर करण्याची तरतूद आहे.
▪ महाराष्ट्रात 15 वर्षे वा अधिक काळ वास्तव्य असलेले माजी सैनिक इतर अटी पूर्ण करीत असल्यास या योजनेसाठी पात्र.
▪ महाराष्ट्राचे रहिवासी नसलेल्या व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाहीत.

📄 *आवश्यक कागदपत्रे* :

● दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या माजी सैनिक/विधवा यांचेकडे सैन्यसेवाचा पुरवा.
● माजी सैनिकास केंद्र शासनाकडून काही निवृत्ती वेतन (लष्करी अथवा नागरी, स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन) मिळत असेल व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल तर असे माजी सैनिक/विधवा या योजनेखाली निवृत्ती वेतन मिळण्यास अपात्र आहेत. मात्र आता असलेल्या निवृत्तीवेतन रकमेपेक्षा कमी असेल तर जेवढया रक्कमेने ते कमी असेल तर त्याबाबत कागदोपत्री पुरावा
● महाराष्ट्रात 15 वर्षे वा अधिक काळ वास्तव्य असलेल्या कागदोपत्री पुरावा.
● महाराष्ट्राचे रहिवासी नसलेल्या व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाहीत.
● दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत निवृत्त झालेल्या महाराष्ट्रीय माजी सैनिकांना/विधवांना निवृत्ती वेतन मंजूर करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज

💰 *दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप* : दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत पदमुक्त झालेल्या माजी सैनिकांना सैनिकी सेवेबद्दल निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत अशा महाराष्ट्रातील माजी सैनिक / विधवा यांना दरमहा 3 हजार रुपये मासिक अनुदान दिले जाते.

🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय.

यंदाचा’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ डॉ. देबल देब आणि आरती राव यांना ‘इको जर्नालिस्ट’पुरस्कार


🍀 हवामान बदल, वन्यजीव संवर्धन आणि हिमालय पर्वतरांगांच्या जैववैविध्यावर आधारित चित्रपट या महोत्सवाचे खास आकर्षण

🍀 यंदाचा ’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ ओरिसामधील मुनीगुडा येथील डॉ. देबल देब यांना जाहीर झाला असून, बंगळूरच्या आरती कुमार राव यांना इको जर्नालिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

🍀 चौदावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. ३ ते ७ जानेवारी दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि अर्काइव्ह थिएटर, प्रभातरोड येथे रंगणार आहे.

🍀 त्यानिमित्त देण्यात येणाऱ्या या दोन महत्वाच्या पुरस्कारांची घोषणा किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.च्या संचालक गौरी किर्लोस्कर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम,किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कर्नाटक, गोव्यापेक्षाही महाराष्ट्रातील बंदरे प्लास्टिकग्रस्त...

👉कर्नाटक व गोव्याच्या सागरी बंदरांपेक्षा महाराष्ट्रातील बंदरांवर प्लास्टिक प्रदूषण अधिक आहे असे एका अभ्यासात दिसून आले आहे. या प्लास्टिकचे स्वरूप ‘सूक्ष्म’ व ‘स्थूल’ प्लास्टिक असे आहे. सागर किनारी असलेल्या प्लास्टिक उद्योगांमुळे हे प्रदूषण होत असून त्यात पर्यटनामुळे भर पडत आहे.

👉गोव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील बंदरांवर भरतीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक घटक दिसून आले आहेत त्या तुलनेत कर्नाटक व गोव्यातील बंदरांवर हे प्रमाण कमी होते.

👉महाराष्ट्रातील बंदरानजीक पेट्रोलियम उद्योग, प्लास्टिक उद्योग आहेत शिवाय पर्यटकही मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकत असतात. त्यामुळे हे प्रदूषण जास्तच आहे.

👉‘अ‍ॅसेसमेंट ऑफ मॅक्रो अँड मायक्रो प्लास्टिक अँलाँघ दी वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया- अ‍ॅबंडन्स, डिस्ट्रीब्यूशन, पॉलिमर टाइप अँड टॉक्सिसिटी,’ हा संशोधन अहवाल नेदरलँडस येथील ‘केमोस्फिअर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

👉सूक्ष्म व स्थूल प्लास्टिक घटकांचे निरीक्षण गेली दोन वर्षे पश्चिम भारतातील दहा किनाऱ्यांवर करण्यात आले व त्याचे सागरी जीवांवर होणारे विषारी परिणामही तपासण्यात आले. प्लास्टिक प्रदूषक घटकात रंगीबेरंगी प्लास्टिक घटक सापडले असल्याचे एनआयओच्या वैज्ञानिक महुआ साहा व दुष्यमंत महाराणा यांनी म्हटले आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...