27 December 2019

त्रिपुरा राज्याला मिळाले पहिले विशेष आर्थिक क्षेत्र 【SEZ】

🎆 कृषी-पूरक उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने त्रिपुरा राज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) तयार करण्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.

🎆 तसेच त्रिपुरा हे Agro Food Processing उद्योग असणारे देशातील पहिले SEZ ठरले. #1st

🎆 ते राज्यातले पहिलेच विशेष आर्थिक क्षेत्र असेल.

🎆 त्रिपुरा राज्यामधले प्रस्तावित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) पश्चिम जलेफा (सबरूम, दक्षिण त्रिपुरा जिल्हा) येथे स्थापन केले जाणार.

🎆 हे ठिकाण राजधानी आगरतळा या शहरापासून 130 कि.मी. अंतरावर आहे.

🌀 ठळक बाबी

🎆 प्रकल्पातली अंदाजे गुंतवणूक सुमारे 1550 कोटी असणार आहे. या क्षेत्राच्या विकासामुळे 12,000 कुशल रोजगार तयार होण्याचा अंदाज आहे.

🎆 या क्षेत्राचा विकास त्रिपुरा औद्योगिक विकास महामंडळ (TIDC) करणार आहे.

🎆 या क्षेत्रात अन्नप्रक्रियेसाठीचे उद्योग उभारले जातील. अन्नप्रक्रियेसोबतच रबर उद्योग, वस्त्रोद्योग, बांबू उद्योगांची या क्षेत्रात भर असेल.

✅ विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) म्हणजे काय?

🎆 विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे खास आखून दिलेला करमुक्त प्रदेश होय.

🎆 भारत सरकारने सन 2000 मध्ये SEZ धोरण आखले आणि 2005 साली SEZ कायदा करण्यात आला.

🎆 SEZ मधील कोणत्याही प्रकाराच्या म्हणजेच जमीन, शेती, पडीक जमीन, नद्या, तलाव, भूजल अश्या स्त्रोतांवर राज्य वा केंद्र सरकार, ग्रामपंचायत किंवा इतर घटनात्मक संस्थांचा कोणताही अधिकार नसतो.

🎆 तो एक स्वतंत्र आणि स्वायत्त भूप्रदेश असतो.

🎆 या आर्थिक क्षेत्राचा कारभार हा पूर्णपणे खासगी असतो आणि त्यासाठी प्रशासकीय मंडळ असते.

🎆 गुंतवणूकदार, परकीय उद्योग यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून असे धोरण आखले जाते. हा ‘व्यवसाय सुलभतेचा’ एका भाग आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई

अवधच्या भागातील क्रांतीचे नेतृत्व मौलाना अहमदुल्लाशाह (वाजीद अलीशाह) व बेगम हजरत महल हे करीत
होते.
क्रांतिकारकांनी लखनौचे कमिश्नर हेनरी लॉरेन्स यांना ठार केले होते. जनरल नील हे लखनौच्या वेढ्यातच
ठार झाले. त्यांच्या जागी कॅम्पबेलची नियुक्ती झाली. त्यांनी जंगबहादूरच्या नेपाळी सैनिकांच्या सहकार्याने ३१
मार्च १८५८ रोजी लखनौ जिंकले. मात्र अवधमधील तालुकेदाराने गनिमी काव्याने इंग्रजांशी प्रतिकार चालूच ठेवला.
झाशीतील भारतीय सैनिकांनी सशस्त्र क्रांतीस प्रारंभ केला। झांशीच्या राणी लक्ष्मीबाईनेसुद्धवा मेरी झाँशी नही दुँगी'
अशी गर्जना करीत इंग्रजांशी लढा सुरू केला. त्यांनी 'दामोदरराव' या अल्पवयीन दत्तक मुलास गादीवर बसवून
राज्यकारभार हातात घेतला. सर हय रोज यांनी २२ मार्च १८५८ रोजी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. या
वेढ्यातून लक्ष्मीबाई निसटल्या व त्या काल्पीला गेल्या. याच ठिकाणी तात्या टोपे व नानासाहेबांशी त्यांनी पुढील
कार्यक्रमाबद्दल चर्चा केली. इंग्रजांच्या हातात काल्पी गेल्यानंतर ते तिघेही ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरचे राजे
जिवाजीराव शिंदे हे इंग्रजांचे मित्र होते; परंतु त्यांचे सैन्य क्रांतिकारकांना जाऊन मिळाल्यामुळे १ जून १८५८ रोजी
ग्वाल्हेरचा किल्ला क्रांतिकारकांनी जिंकला. सर ह्यू रोज यांनी तात्या टोपेंचा पराभव करून ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर
हल्ला केला. राणी लक्ष्मीबाईने १९ दिवस ग्वाल्हेरचा किल्ला लढविला व इंग्रजांशी झुंज दिली; परंतु इंग्रज सेनापती
सर ह्यू रोज यांच्याशी लढतानाच त्या भयंकर जखमी झाल्या व त्यामध्येच त्या १८ जून १८५८ रोजी मरण पावल्या.
१८५७ च्या क्रांतीचे केंद्र स्थळ उत्तर भारत होते. दिल्ली, मेरठ, आग्रा, अलाहाबाद, अवध, पाटणा, रोहिलखड या
भागात क्रांतिकारकांनी आपापली सरकारे स्थापन केली होती. मध्य भारतात महधार, ग्वाल्हेर, इंदौर, अजमेरा, सागर
व निमच ही क्रांतीची केंद्रे होती. महाराष्ट्रात पेठ , नाशिक, सातारा, बीड, औरंगाबाद, खानदेश, अहमदनगर,
कोल्हापूर, बेळगाव व धारवाड ही क्रांतीची ठिकाणे होती. नानासाहेब, बहादूरशाह, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई,
भगवंतराव कोळी, रंगो बापूजी, कुंवरसिंह, अमरसिंह, मौलवी अहमदशाह, बेगम हजरत महल व खान बहादूर खान
यांनी ठिकठिकाणी क्रांतीचे नेतृत्व केले. मौलवी अहमदशहा यांची इंग्रजांनी हत्या केली. विविध प्रकारे भेद नीतीचा
अवलंब करून लॉर्ड कॅनिंग यांनी सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा बीमोड केला. या युद्धात ३० हजार भारतीय
सैनिक व एक लाख नागरिक मारले गेले.

10 सराव महत्त्वाचे प्रश्न उत्तरे


1) कोणत्या दिवशी भारतात ‘सुशासन दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 25 डिसेंबर

2) कोणत्या शहराने “ऑक्सिजन पार्लर” नावाचा उपक्रम राबविला?
उत्तर : नाशिक

3) कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
उत्तर : राफेल नडाल

4) परराष्ट्र सचिव पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : हर्षवर्धन श्रृंगला

5) अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : चंदीगड

6) 32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ कुठे आयोजित केले गेले?
उत्तर : नवी दिल्ली

7) कोणत्या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 24 डिसेंबर

8) कोणत्या राज्यात ‘नेथन्ना नेस्थम’ योजना लागू करण्यात आली आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

9) ‘FIFA टीम ऑफ द ईयर’चा किताब कोणाला देण्यात आला?
उत्तर : बेल्जियम

10) कोणाच्या हस्ते नवी दिल्लीत 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : उपराष्ट्रपती

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) फळे गोड निघाली या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.

   1) फळे      2) गोड फळे   
   3) गोड      4) निघाली

उत्तर :- 3

2) पुढील पर्यायातून ‘कर्मणी प्रयोग’ ओळखा.

   1) सुरेशने पुस्तक वाचले      2) सुरेश पुस्तक वाचतो
   3) सुरेशने पुस्तक वाचावे      4) सुरेशकडून पुस्तक वाचवले

उत्तर :- 1

3) ‘देशगत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

   1) तृतीया तत्पुरुष    2) षष्ठी तत्पुरुष
   3) व्दितीया तत्पुरुष    4) सप्तमी तत्पुरुष

उत्तर :- 3

4) बापरे केवढा मोठा हा हत्ती ........................

   1) ?      2) !     
   3) -      4)  :

उत्तर :- 2

5) पुढीलपैकी ‘प्रत्ययघटित’ शब्द कोणता ?

   1) दिवाणखाना    2) दुर्जन     
   3) कटकट    4) चुळबुळ

उत्तर :- 1

6) ‘आम्ही गहू खातो.’ या वाक्यातील ‘शब्दशक्ती’ ओळखा.

   1) अभिधा    2) लक्षणा   
   3) व्यंजना    4) वरीलपैकी कोणतीच नाही

उत्तर :- 2

7) पुढीलपैकी कोणता शब्द ‘प्रसिध्द’ या शब्दाचा पर्याय नाही ?

   1) प्रख्यात    2) विख्यात   
   3) आख्यात    4) सर्वज्ञात

उत्तर :- 3

8) शुध्दपक्ष या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) शुक्लपक्ष    2) वद्यपक्ष   
   3) पौर्वात्य    4) कृश

उत्तर :- 1

9) ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून स्पष्ट करा.

   1) प्रत्येक घरात चूल असतेच    2) मातीच्या चुली करण्याची पध्दत घरोघरी आहे
   3) मातीपासून चुली बनतात    4) सर्वत्र सारखीच परिस्थिती असते

उत्तर :- 4

10) मान तुकविणे : या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा.

   1) निरोप देणे    2) अपयश येणे   
   3) नवा रूप येणे    4) आश्चर्यचकीत होणे

उत्तर :- 3

केंद्र व राज्य महिला आयोगाची पुर्नरचना करा'

- राज्य किंवा राष्ट्रीय महिला आयोगाने
कामकाज करून पीडित महिलांना आधार दिला पाहिजे. त्यांचे प्रश्न निकाली काढले पाहिजे. मात्र,

- सध्याचे महिला आयोग कष्टकरी आणि पीडित महिलांचे प्रश्न निकाली काढत नसल्याचा दावा करत महिला आयोगाची पुनर्रचना करावी अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी केली.

- मरियम ढवळे यांनी महिला आयोगाच्या कामकाजावर जोरदार टीका केली. भारतीय संविधानाने मार्गदशक तत्व आखून दिली आहेत. त्यानुसार महिला आयोगाचे कामकाज झाले पाहिजे. मात्र, सध्याचे महिला आयोग कष्टकरी वर्गातील महिलांचे प्रश्न सोडवण्याबाबत उदासीन असल्याचा अनुभव संघटनेला आला असल्याचे मरियम ढवळे यांनी सांगितले. पूर्वी महिला आयोग योग्य त्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम करत होते. महिलांच्या प्रश्नावर तात्काळ कारवाई करत होते.

-  मात्र आताचे महिला आयोग जी भूमिका सरकार घेते तीच भूमिका महिला आयोग घेत असल्याचा गंभीर आरोप करत महिला आयोगाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. महिलांचे प्रश्न ज्यांना समजतात,

- ज्यांना महिलांच्या प्रश्नांबाबत काम करण्याची आणि ते प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे, अशा व्यक्तींना महिला आयोगात असणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.

- अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२ वे राष्ट्रीय अधिवेशन २७ ते ३० डिसेंबर दरम्यान पहिल्यांदाच मुंबईत पार पडत आहे.

- त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मरियम ढवळे यांनी अधिवेशनाबाबतचीही माहिती दिली. भायखळा येथील साबू सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालयात हे अधिवेशन पार पडणार आहे.

- अभिनेत्री स्वरा भास्कर ही या अधिवेशनाचे उद्घाटन करणार आहे. तत्पूर्वी अधिवेशनानिमित्त आझाद मैदानात दुपारी १२ वाजता महिलांची जाहीर सभा होणार आहे.

- या सभेला माकप नेत्या वृंदा करात, माजी खासदार सुभाषिनी अली, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मालिनी भट्टाचार्य, सरचिटणीस मरियम ढवळे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माकपचे आमदार विनोद निकोले आदी संबोधित करणार आहेत.

- या अधिवेशनानिमित्त अत्याचाराविरोधात संघर्ष करणाऱ्या विविध राज्यातील काही महिलांचा प्रातिनिधीक सत्कारही करण्यात येणार आहे.

-ही देशातील सर्वात मोठी महिला संघटना असून २३ राज्यांमध्ये १ कोटीहून अधिक महिला सभासद असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
----------------–--------------------------------

चीन आणि ब्राझिल यांचा ‘CBER-4A’ उपग्रह प्रक्षेपित केला गेला

20 डिसेंबर 2019 रोजी चीनच्या अंतराळ केंद्रावरून चीन आणि ब्राझिल यांनी संयुक्तपणे तयार केलेला ‘CBER-4A’ उपग्रह प्रक्षेपित केला गेला. ‘CBER-4A’ म्हणजे चायना-ब्राझिल अर्थ रिसोर्स (CBER) 4A होय.

ठळक बाबी

हा उपग्रह चीनी बनावटीच्या ‘लाँग मार्च-4बी’ प्रक्षेपकाद्वारे अंतराळात सोडण्यात आला.

हा उपग्रह दोन देशांमधल्या सहकार तत्त्वावरील कार्यक्रमाच्या अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या उपग्रहांच्या शृंखलेमधला सहावा उपग्रह आहे.

हा उपग्रह जागतिक पातळीवर दृक सुदूर संवेदी माहिती प्राप्त करणार. त्याद्वारे अॅमेझॉनचे वर्षावन तसेच पर्यावरण-विषयक बदलांवर देखरेख ठेवण्यात येणार. याव्यतिरिक्त या उपग्रहाद्वारे पृथ्वीवरील संसाधने, शेती, सर्वेक्षण याबाबतीतही सेवा देता येणार.

सध्या, BRICS समुहामधले दक्षिण आफ्रिका या एकमेव देशाकडे स्वतःचे उपग्रह नाहीत.

सरकारी योजना :- जागतिक महायुध्दातील माजी सैनिक/त्यांच्या विधवा यांना निवृत्तीवेतन

⚡ दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत पदमुक्त झालेल्या माजी सैनिकांना सैनिकी सेवेबद्दल निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत अशा महाराष्ट्रातील माजी सैनिकांना व त्यांच्या विधवांना दरमहा मासिक अनुदान दिले जाते.

🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* :

▪ दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या माजी सैनिकांपुरतीच मर्यादीत असल्याने त्या माजी सैनिक/विधवा यांचेकडे सैन्यसेवा केल्याबाबतचा कागदोपत्री पुरवा असणे आवश्यक.
▪ माजी सैनिकास केंद्र/राज्य शासन यांचेकडून काही निवृत्ती वेतन (लष्करी अथवा नागरी, स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन) मिळत असेल व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्ती या योजनेखाली निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असणार नाहीत. मात्र असे निवृत्ती वेतन दरमहा व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा कमी असल्यास ते जेवढया रक्कमेने कमी तेवढी रक्कम या योजनेखाली निवृत्ती वेतन म्हणून मंजूर करण्याची तरतूद आहे.
▪ महाराष्ट्रात 15 वर्षे वा अधिक काळ वास्तव्य असलेले माजी सैनिक इतर अटी पूर्ण करीत असल्यास या योजनेसाठी पात्र.
▪ महाराष्ट्राचे रहिवासी नसलेल्या व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाहीत.

📄 *आवश्यक कागदपत्रे* :

● दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या माजी सैनिक/विधवा यांचेकडे सैन्यसेवाचा पुरवा.
● माजी सैनिकास केंद्र शासनाकडून काही निवृत्ती वेतन (लष्करी अथवा नागरी, स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन) मिळत असेल व आता दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल तर असे माजी सैनिक/विधवा या योजनेखाली निवृत्ती वेतन मिळण्यास अपात्र आहेत. मात्र आता असलेल्या निवृत्तीवेतन रकमेपेक्षा कमी असेल तर जेवढया रक्कमेने ते कमी असेल तर त्याबाबत कागदोपत्री पुरावा
● महाराष्ट्रात 15 वर्षे वा अधिक काळ वास्तव्य असलेल्या कागदोपत्री पुरावा.
● महाराष्ट्राचे रहिवासी नसलेल्या व्यक्ती या योजनेस पात्र असणार नाहीत.
● दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत निवृत्त झालेल्या महाराष्ट्रीय माजी सैनिकांना/विधवांना निवृत्ती वेतन मंजूर करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज

💰 *दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप* : दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या व डिसेंबर 1949 पर्यंत पदमुक्त झालेल्या माजी सैनिकांना सैनिकी सेवेबद्दल निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत अशा महाराष्ट्रातील माजी सैनिक / विधवा यांना दरमहा 3 हजार रुपये मासिक अनुदान दिले जाते.

🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय.

यंदाचा’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ डॉ. देबल देब आणि आरती राव यांना ‘इको जर्नालिस्ट’पुरस्कार


🍀 हवामान बदल, वन्यजीव संवर्धन आणि हिमालय पर्वतरांगांच्या जैववैविध्यावर आधारित चित्रपट या महोत्सवाचे खास आकर्षण

🍀 यंदाचा ’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ ओरिसामधील मुनीगुडा येथील डॉ. देबल देब यांना जाहीर झाला असून, बंगळूरच्या आरती कुमार राव यांना इको जर्नालिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

🍀 चौदावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. ३ ते ७ जानेवारी दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि अर्काइव्ह थिएटर, प्रभातरोड येथे रंगणार आहे.

🍀 त्यानिमित्त देण्यात येणाऱ्या या दोन महत्वाच्या पुरस्कारांची घोषणा किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.च्या संचालक गौरी किर्लोस्कर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम,किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कर्नाटक, गोव्यापेक्षाही महाराष्ट्रातील बंदरे प्लास्टिकग्रस्त...

👉कर्नाटक व गोव्याच्या सागरी बंदरांपेक्षा महाराष्ट्रातील बंदरांवर प्लास्टिक प्रदूषण अधिक आहे असे एका अभ्यासात दिसून आले आहे. या प्लास्टिकचे स्वरूप ‘सूक्ष्म’ व ‘स्थूल’ प्लास्टिक असे आहे. सागर किनारी असलेल्या प्लास्टिक उद्योगांमुळे हे प्रदूषण होत असून त्यात पर्यटनामुळे भर पडत आहे.

👉गोव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील बंदरांवर भरतीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक घटक दिसून आले आहेत त्या तुलनेत कर्नाटक व गोव्यातील बंदरांवर हे प्रमाण कमी होते.

👉महाराष्ट्रातील बंदरानजीक पेट्रोलियम उद्योग, प्लास्टिक उद्योग आहेत शिवाय पर्यटकही मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकत असतात. त्यामुळे हे प्रदूषण जास्तच आहे.

👉‘अ‍ॅसेसमेंट ऑफ मॅक्रो अँड मायक्रो प्लास्टिक अँलाँघ दी वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया- अ‍ॅबंडन्स, डिस्ट्रीब्यूशन, पॉलिमर टाइप अँड टॉक्सिसिटी,’ हा संशोधन अहवाल नेदरलँडस येथील ‘केमोस्फिअर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

👉सूक्ष्म व स्थूल प्लास्टिक घटकांचे निरीक्षण गेली दोन वर्षे पश्चिम भारतातील दहा किनाऱ्यांवर करण्यात आले व त्याचे सागरी जीवांवर होणारे विषारी परिणामही तपासण्यात आले. प्लास्टिक प्रदूषक घटकात रंगीबेरंगी प्लास्टिक घटक सापडले असल्याचे एनआयओच्या वैज्ञानिक महुआ साहा व दुष्यमंत महाराणा यांनी म्हटले आहे.

अटल भूजल योजनेचा प्रारंभ

◾️25 डिसेंबर 2019 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल भूजल योजना (अटल जल) याचा प्रारंभ केला गेला.

◾️या मोहिमेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे ही 2024 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न साध्य करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे.
जल शक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वात ही योजना राबवली जाणार आहे.

◾️लोकसहभागाने जल संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न केले जाणारा आहेत. घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या दिशेने कार्य केले जात आहे.

✅ अटल भूजल योजना (अटल जल)

◾️भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक चौकट मजबूत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

👉गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या सात राज्यांमध्ये ओळखलेल्या भागांमध्ये शाश्वत भूजल संसाधन व्यवस्थापनासाठी समुदाय पातळीवर वर्तनात्मक बदल घडविणे या मुख्य उद्देशाने अटल जलची रचना करण्यात आली आहे.

◾️या योजनेच्या अंमलबजावणीमुळे या राज्यांमधील 78 जिल्ह्यांमधील जवळपास 8350 ग्रामपंचायतींना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

◾️सन 2020-21 ते सन 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 6000 कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी 50 टक्के जागतिक बँक कर्ज रूपात असतील.

◾️सुधारित भूजल व्यवस्थापन पद्धतीत यश मिळवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देणे जेणेकरुन सध्या अस्तित्वात असलेल्या योजना एकत्र करुन राज्य सरकार जल व्यवस्थापनाच्या संदर्भात मागणीनुसार प्राधान्यक्रम ठरवत सुस्पष्ट आखणी आणि अंमलबजावणी करु शकतील.

26 December 2019

CSAT ची तयारी कशी करावी

मित्रांनो....
      राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या जाहिरातीतील वर्ग -1 व  वर्ग-2 ( class 1 व class 2) या पदांची एकूण 200 पदे ही संख्या विचारात घेता आणि गेल्या वर्षीच्या पूर्व परीक्षेचा cut of  पाहता 250 + मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्सचे Target ठेवणे गरजेचे आहे ... त्यामुळे GS 110 + 140 CSAT = 250 मार्क्सचे टार्गेट ठेवावेच लागेल... तरच Safe Zone मध्ये असू.. कारण काठावर (Boundary line) वर असणारे पब्लिक कधीही Mains चा स्टडी prelims नंतर लगेच सुरू करत नाहीत, result ची वाट पाहतात .. आणि त्यामुळे Mains चा study उरलेल्या कालावधीत result oriented होत नाही... म्हणून prelims ला 250 + चे टार्गेट ठेवून अभ्यास सुरू करा...

★ CSAT Paper कसा सोडवावा :--

● 1) प्रथम --- Comprehension
● 2)  Decision Making
● 3) Reasoning + Maths
  
★ ----  D.M. प्रथम घेतल्यास आपणाकडून चुकून जास्त वेळ दिला जातो.. मात्र Comprehension नंतर सोडवल्यास comphn सोडवताना एक speed maintain झालेला असतो , grasping वाढलेली असते. त्यामुळे खूप कमी वेळात(5 मिनिटात) हे 5 प्रश्न सोडवले जातात.. (हा एक Psychological Effect आहे).. D. M. ला जवळपास 10 मार्क्स मिळायला हवीत

★ Comprehension ;--- 
सर्वात Best Method म्हणजे  पाठीमागील सर्व Question Papers (सन 2013 ते 2019) झेरॉक्स करून त्या उताऱ्यांचा अभ्यास करा...किंवा एखादे CSAT विश्लेषण चे दर्जेदार पुस्तक अभ्यासणे..  आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत व उत्तर निवडण्यातील अचूकता याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे ... प्रश्न व उत्तरातील  key words , योग्य-अयोग्य पद्धत ..  यांचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे... कारण Mpsc च्या उताऱ्याचा दर्जा व बाजारात उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांच्या दर्जात नक्कीच थोडा फार फरक आहे... Comprehension हे उगीच जास्त अवघड करून शिकू नका.. सोप्या शब्दात शिका , अभ्यासा.... अचूक उत्तरे शोधण्याच्या technique शिका.. त्यामुळे practice खूप महत्त्वाची आहे.

★ Reasoning + Maths :-( बुद्धिमत्ता + गणित )

● ----  बुद्धिमत्तेची पुस्तके सोडवण्यापेक्षा उत्तरासह वाचा.. खूप वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास झाला पाहिजे.. प्रश्न विचारण्याच्या जास्तीत जास्त possibilities चा अभ्यास झाला  पाहिजे ...( Pass होण्यासाठी सोप्या पुस्तकांचे इथे काम नाही..परीक्षेत काही प्रश्न अर्ध्या page चा एक असा असतो, आणि ते प्रश्न सोडून देणे परवडणारे नसते त्यामुळे त्याचा सराव करा ..
..... ( कारण प्रत्येक परीक्षेत फक्त 3 ते 4 च Quality base प्रश्नांवर तुम्ही Pass होणार की Fail हे ठरणार आहे..)

●---- गणित :--  परीक्षेत प्रत्येक प्रश्न 2.5 मार्क्स चा असतो त्यामुळे गणिताचा प्रश्न हा सरळ न विचारता 2 ते 3 प्रश्नांना एकत्र करून twist करून विचारलेला असतो.. गणिताचा अभ्यास करताना दर्जेदार पुस्तके वापरा (समाधानासाठी सोपी पुस्तके वाचू नका.. ) विविध Type चे प्रश्न सोडवून दिलेली पुस्तके वाचा...  एकाच step मध्ये हे प्रश्न कसे सोडवता येतील याचा सराव करा.. कारण मार्क्स बरोबर आपल्याला Time ही वाचवता आला पाहिजे.. बऱ्याच मुलांचा वेळेत पेपर पूर्ण होत नाही. आणि Attempt कमी दिसल्यामुळे घाबरून जाऊन गोंधळलेल्या मनस्थितीत अचूक उत्तरे शोधू शकत नाही..
( Time Mgt साठी किमान 2 तरी Test Papers सोडवून पहा ).. गणित व बुद्धिमत्ते च्या 25 प्रश्नांपैकी 22+ प्रश्न बरोबर कसे येतील याकडे लक्ष द्या.. पास च्या यादीत आपला नंबर हवा.. त्यासाठी योग्यरीतीने प्रयत्न करा..

17 व्या लोकसभेत महिला खासदारांची सर्वात मोठी संख्या

🌸17व्या लोकसभेत देशभरातील विविध पक्षांमधून 78 महिला खासदार दिसणार आहेत. आतापर्यंतची ही महिला खासदारांची सर्वात मोठी संख्या आहे.

🌸 उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल येथून प्रत्येकी 11 महिला लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

🌸 एकूण 724 महिलांनी ही निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसने सर्वाधिक 54 उमेदवार दिले. त्यापाठोपाठ भाजपचे 53 महिला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते.

🌸1952 पासूनचा हा महिलांचा सर्वात मोठा म्हणजे लोकसभेच्या एकूण जागांच्या 14% सहभाग लोकसभेत असणार आहे.

🌸 मावळत्या म्हणजेच 16व्या लोकसभेत 64 महिला खासदार होत्या.

🌸15व्या लोकसभेत 52 महिलांनी आपल्या भागाचे प्रतिनिधित्व केले होते.

🌸 दरम्यान महिलांना राजकारणात 33% प्रतिनिधित्व देण्याचे विधेयक संसदेत अजूनही प्रलंबित आहे.

🌸 41 महिला खासदारांपैकी 27 खासदारांना यावेळी आपले स्थान अबाधित राखण्यात यश आले.

🌸 या खेपेस उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 104 महिला उमेदवारांनी लोकसभेसाठी आपले नशीब आजमावले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि तामिळनाडूतून 64 महिला उमेदवार रिंगणात होत्या. बिहार 55, पश्‍चिम बंगाल 54 अशा महिलांनी ही निवडणूक लढवली.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धात मनूला दुहेरी सुवर्णपदके

🔰मनू भाकरने राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली.

🔰तर 17 वर्षीय मनूने वरिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 243 गुण मिळवले, तर कनिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 241 गुण मिळवले.

🔰युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मनूने पात्रता फेरीत 588 गुण मिळवले.
वरिष्ठ गटात देवांशी धामाने रौप्य आणि यशस्वी सिंग देशवालने कांस्यपदक पटकावले.

🔰मनू आणि यशस्वी यांनी 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील स्थाने आधीच पक्की केली आहेत.