२५ डिसेंबर २०१९

महत्वपूर्ण घटनादुरुसत्या (Important Constitutional Amendments)


1  ली घटनादुरुस्ती 1951:

1)  सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला.

2) मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतुदी असणारे कायदे

3) जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी ९व्या परिशिष्टाचा समावेश

4) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या तीन आधाराचा उदा. सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्याला उत्तेजन देणे इ. बाबींचा समावेश ह्या मर्यादा वाजवी असतील, म्हणून न्याय प्रविष्ट असतील.

5) राज्यातील व्यापार: राज्यसंस्थेने कोणताही व्यापार वा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्यास त्यामुळे व्यापार आणि उद्योग करण्याच्या हक्काचा भंग होतो, या आधारावर ती कृती अवैध ठरविता येणार नाही.

2री घटना दुरुस्ती 1952:

1)  लोकसभेचा एक सदस्य 7,50,000 लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करेल. या पध्द्तीने लोकसभेतील प्रातिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना

3 री घटनादुरुस्ती 1954

1)  सार्वजनिक हितासाठी अन्नधान्य, जनावरांचा चारा, कच्चा कापूस, कापूस बियाणे आणि कच्चा ताग यांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेला अधिकार दिले.

4थी घटनादुरुस्ती 1955

1)  खाजगी मालमत्तेची अनिवार्यपणे प्राप्ती केल्यानंतर देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईचे प्रमाण ठरविले आणि हि बाब न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवली.

2) कोणताही व्यापार राष्ट्रीयकृत करण्यासाठी राज्यसंस्थेला सत्ता बहाल केली आहे.

3) ९व्या परिशिष्टामध्ये आणखी काही कायदे समाविष्ट केले

4) अनुच्छेद ३१ (अ) ची व्याप्ती वाढविली.

5 वी घटनादुरुस्ती 1955

1) राज्यांचा क्षेत्रावर, सीमारेषांवर आणि नामाभिधानांवर परिणाम करू शकणाऱ्या प्रस्तावित केंद्रीय कायद्यावर मत प्रदर्शन करण्यासाठी राज्यांची कालमर्यादा निश्चित केली जावी याकरिता राष्ट्रपतींना अधिकार दिले.

6 वी घटनादुरुस्ती 1956

1) केंद्र सूचीमध्ये एका नवीन विषयाची भर घालण्यात आली.

उदा. राज्यांतर्गत व्यापार आणि दळणवळण दरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर कर लावणे या संदर्भात राज्यांच्या अधिकारांवर निर्बंध घातले.

7 वी घटनादुरुस्ती 1956

1)  अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण उदा. भाग अ, ब, क, ड रद्द करून भाग 7 वगळण्यात येऊन 14 घटकराज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांना मान्यता दिली.

2) केंद्रशासित प्रदेशापर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्यात अली .

3) दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी सामाईक उच्च न्यायालयाची स्थापना करणे.

4) उच्च न्यायालयात सहाय्यक आणि हंगामी न्यायाधीशांच्या नियुक्ती संबंधी तरतूद

8 वी घटनादुरुस्ती 1960

1)  अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आंग्ल भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षाकरिता वाढविली (1970 पर्यंत)

9वी घटनादुरुस्ती 1960

1)  भारत -पाकिस्तान करारनाम्यानुसार (1958) बेरुबारी संघाचा (प. बंगालमधील) भारतीय भूप्रदेश पाकिस्तानला हस्तांतरित करण्यात आला

10वी घटनादुरुस्ती 1961

1) भारतीय  संघराज्यात दादर  आणि नगर हवेलीचा समावेश केला

11वी घटनादुरुस्ती 1961

1) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेण्या ऐवजी  स्वतंत्र निर्वाचन मंडळाची तरतूद करून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यात आला.

2) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला निर्वाचन मंडळामध्ये रिक्त असलेल्या जागेच्या आधारे आव्हान देता येणार नाही.

12वी घटनादुरुस्ती 1962

1) भारतीय संघराज्यात गोवा, दमण आणि दीव यांचा समावेश करण्यात आला.

13वी घटनादुरुस्ती 1962

1)नागालँडला घटकराज्याचा दर्जा देण्यात आला आणि त्यासंदर्भात विशेष तरतुदी

14वी घटनादुरुस्ती 1962

1)  भारतीय संघराज्यात पॉंडिचेरीचा समावेश

2) हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोआ, दमन-दीव  आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांसाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाच्या निर्मितीची तरतूद

15वी घटनादुरुस्ती 1963

1)  एखादी कृती, गुन्हा, कृत्य एखाद्या उच्च न्यायालयाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रात घडलेले असेल तर त्या संबंधातील खटल्याच्या न्यायनिवाड्यात उच्च न्यायालय त्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिसत्तेला न्यायालयीन आदेश बजावू शकते.

2) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय ६० वरून ६२ करण्यात आले.

3) उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीशाला त्याच उच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद

4) एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली केलेल्या न्यायाधीशाला हानिपूरक भत

पृथ्वी एक दृष्टिक्षेप 

👉 पृथ्वीचे वय - सुमारे ४६० कोटी वर्षे.

👉 जलपृष्ठ - सुमारे ३६१,३००,००० चौ किमी

👉 भूपृष्ठ - सुमारे १४८,४००,००० चौ किमी

👉 एकूण पृष्ठभाग - ५०९,७००,००० चौ किमी

👉 ध्रुवीय व्यास - १२,७१३,५४ किमी

👉 विषुववृत्तीय - १२,७५६.३२किमी

👉 ध्रुवीय परीघ - ४०,००८.०० किमी

👉 विषुववृत्तीय परीघ - ४०,०७५.०० किमी

👉सूर्यापासूनचे अंतर - १५२,०००,००० किमी

👉 परिवलन काळ - २३ तास, ५६ मिनिटे, ४.०९ सेकंद

👉 परिभ्रमण काळ - ३६५ दिवस, ६ तास, ९ मिनिटे, ९.५४ सेकंद

👉 वस्तुमान - ६,०००,०००,०००,०००,०००,०००,मेट्रिक टन

👉 खंड - पृथ्वीच्या वर्तमान पृष्ठभागावरील समुद्रव्यतिरिक्त निसर्गतः सलग असणारा विस्तृत भूभाग म्हणजे खंड होय. किंवा भूमिखंड होय.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 24 डिसेंबर 2019.

🔶 आंध्र प्रदेशात "नेथना नेस्थम योजना" सुरू

🔶 मॅन्युएल मॅरेरो क्रूझ यांनी क्युबाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले

  🔶भारत वेस्ट इंडीजने 3 विकेट्सनी मात केली

  🔶आबिद अली त्याच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावणारा पहिला पाकिस्तान बॅट्समन ठरला

🔶 उत्तराखंडला  66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वाधिक फिल्म-अनुकूल राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

🔶 न्यायमूर्ती गुलजार अहमद यांना पाकिस्तानचे 27 वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले

🔶 केरळ सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी 2024 अंतिम मुदत सेट करते

🔶 भारत-इराण 19 वी संयुक्त आयोगाची बैठक इराणमध्ये आयोजित

🔶 इंटिग्रल कोच फॅक्टरी 215 दिवस विक्रमी 3000 कोच तयार करते

🔶 मीराबा लुवांगने बांगलादेश ज्युनियर इंटर्स बॅडमिंटन मालिका जिंकली

🔶 आठ वेस्ट आफ्रिकन नेशन्स इकोला सामान्य चलनाचे नाव बदला

🔶 युएईने असंतुष्टांच्या कुटुंबियांचे नागरिकत्व रद्द केलेः एचआरडब्ल्यू

🔶 इटालियन सुपर कप 2019 जिंकण्यासाठी लाझिओ बीट जुव्हेंटस 3-1

🔶 पाकिस्तानने श्रीलंकेला कराचीमध्ये विजय मिळवण्यासाठी 263 धावांनी विजय मिळवला

  🔶अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूच्या वर्ष 2019 साठी मोहम्मद सालाह यांना नामांकित केले

🔶  गौरव गिलने 5 व्या वेळी लोकप्रिय रॅली जिंकली

🔶  आयुषी ढोलकिया मिस किशोर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किरीट 2019 जिंकली

🔶 कॅमिली शुरियर मिस अमेरिका क्राउन 2020 जिंकली

🔶 मिस ग्वाडेलूपने मिस फ्रान्स 2020
निशा तालमपल्ली मिस इंडिया आंतरराष्ट्रीय 2019 म्हणून मुकुटली

🔶  हर्षवर्धन श्रृंगला यांना नवीन परराष्ट्र सचिव म्हणून नेमणूक केली

🔶 एम.एस. राव यांनी मेघालयचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली

🔶 वर्नॉन फिलँडरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली

🔶जोव्हानोविक युएई फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.

२४ डिसेंबर २०१९

त्रिपुरा राज्याला पहिले विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) मिळाले

- कृषी-पूरक उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने त्रिपुरा राज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) तयार करण्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. ते राज्यातले पहिलेच विशेष आर्थिक क्षेत्र असेल.

- त्रिपुरा राज्यामधले प्रस्तावित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) पश्चिम जलेफा (सबरूम, दक्षिण त्रिपुरा जिल्हा) येथे स्थापन केले जाणार. हे ठिकाण राजधानी आगरतळा या शहरापासून 130 कि.मी. अंतरावर आहे.

▪️ठळक बाबी

- प्रकल्पातली अंदाजे गुंतवणूक सुमारे 1550 कोटी असणार आहे. या क्षेत्राच्या विकासामुळे 12,000 कुशल रोजगार तयार होण्याचा अंदाज आहे.

- या क्षेत्राचा विकास त्रिपुरा औद्योगिक विकास महामंडळ (TIDC) करणार आहे.

- या क्षेत्रात अन्नप्रक्रियेसाठीचे उद्योग उभारले जातील. अन्नप्रक्रियेसोबतच रबर उद्योग, वस्त्रोद्योग, बांबू उद्योगांची या क्षेत्रात भर असेल.

▪️विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) म्हणजे काय?

- विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे खास आखून दिलेला करमुक्त प्रदेश होय. भारत सरकारने सन 2000 मध्ये SEZ धोरण आखले आणि 2005 साली SEZ कायदा करण्यात आला.

- SEZ मधील कोणत्याही प्रकाराच्या म्हणजेच जमीन, शेती, पडीक जमीन, नद्या, तलाव, भूजल अश्या स्त्रोतांवर राज्य वा केंद्र सरकार, ग्रामपंचायत किंवा इतर घटनात्मक संस्थांचा कोणताही अधिकार नसतो. तो एक स्वतंत्र आणि स्वायत्त भूप्रदेश असतो. या आर्थिक क्षेत्राचा कारभार हा पूर्णपणे खासगी असतो आणि त्यासाठी प्रशासकीय मंडळ असते.

-  गुंतवणूकदार, परकीय उद्योग यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून असे धोरण आखले जाते. हा ‘व्यवसाय सुलभतेचा’ एका भाग आहे.
-------------------------------------------------

पोलीस भरती प्रश्नसंच

1) अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीने सीईओ कोण आहेत?
उत्तर : रिचर्ड व्हेंट्रे

2) ‘स्ट्रँडहॉग’ हे काय आहे?
उत्तर : ऑपरेटिंग सिस्टममधला बग

3) 2024 पॅरिस ऑलम्पिकमधल्या ‘सर्फिंग’ स्पर्धेचे आयोजन कोणत्या बेटावर केले जाणार आहे?
उत्तर : ताहिती

4) ‘ग्लोबल रिफ्यूजी फोरम’ (GRF) याची प्रथम बैठक कुठे आयोजित केली गेली?
उत्तर : जिनेव्हा

5) कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : आंध्रप्रदेश

6) ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम कधी आयोजित केला गेला होता?
उत्तर : 16 डिसेंबर

7) कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?
उत्तर : अमिताभ बागची

8) "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र कुणी लिहिले आहे?
उत्तर : विश्वनाथन आनंद

9) कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाले?
उत्तर : भारत

10) ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या कमांडंट पदी कोणाची नेमणूक झाली?
उत्तर : डी. चौधरी

मानव विकास निर्देशांक 2019 [Human Development Index 2019]

- जारी करणारी संस्था - UNDP
- निकष: दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, योग्य राहणीमान

- भारताचा क्रमांक - 188 देशांच्या यादीत 129 वा (2018 साली 130 वा)
- भारताचा HDI - 0.647 
- भारताचा समावेश - मध्यम मानव विकास गटात

2019 च्या HDI नुसार प्रथम 5 देश
1. नॉर्वे (HDI - 0.954)
2. स्वित्झर्लंड (HDI - 0.946)
3. आयर्लंड (HDI - 0.942)
4. जर्मनी (HDI - 0.939)
5. हँगकाँग (HDI - 0.939)

मानव विकास निर्देशांकात ब्रिक्स राष्ट्रे 
1. चीन 85 वा क्रमांक
2. ब्राझील 79 वा क्रमांक
3. दक्षिण आफ्रिका 113 वा क्रमांक
4. रशिया 49 वा क्रमांक
5. भारत 129 वा क्रमांक

भारताच्या  शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI नुसार क्रमांक
1. नेपाळ 147
2. पाकिस्तान 152
3. बांग्लादेश 135
4. श्रीलंका 71

HDI मध्ये जगातील शेवटचे राष्ट्र 
1. नायजर - 189 वा
2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक - 188 वा
3. चाड - 187 वा
4. दक्षिण सुदान - 186 वा
5. बुरुंडी - 185 वा

नोबेल पुरस्कारांबाबत माहिती नसलेल्या गोष्टी

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. 1901 मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.

_*नोबेल पुरस्काराबाबतच्या काही रोचक गोष्टी*_

👉 या पुरस्कारातील लॉरीएट या शब्द हा ग्रीक पुरातन काळात खेळाडू आणि कवींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारावरुन घेतला आहे. देवता अपोलो आपल्या डोक्यावर जो मुकुट घालयचे त्याला लॉरेल व्रेएथ म्हणतात.
   
👉 नोबेल पुरस्काराचे प्रमाणपत्र स्विडीश आणि नॉर्वेचे कॅलिग्राफर आणि कलाकार तयार करतात.

👉 नोबेल मेडल हे हाताने तयार केलेले असून 18 कॅरेट ग्रीन प्लेटेड तर 24 कॅरेट सोने वापरण्यात आले आहे.
  
👉 आतापर्यंत देण्यात आलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्यांचे सरासरी वय 59 वर्ष आहे.

👉 नोबेल विजेत्यांपैकी अधिक जणांचे वाढदिवस हे जून महिन्यात येतात.

👉 1901 पासून 49 वेळा नोबेल पुरस्कार देण्यात आले नाहीत. पुरस्कार न देण्याच्या घटना पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध या काळात सर्वात जास्त आहेत.

👉 लीयनिड हुरविक्ज़ यांना 2007 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी अर्थशास्त्राचे नोबेल मिळाला होता. नोबेल पुरस्कार मिळवणारे ते सर्वात वयस्कर आहेत.

👉 पाकिस्तानची मलाला सर्वात कमी वयातील नोबेल पुरस्कार विजेती आहे. तिला वयाच्या 17व्या वर्षी 2014 मध्ये शांततेसाठी पुरस्कार मिळाला होता.

👉 आतापर्यंत 48 महिलांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी दोन महिलांनी हे पुरस्कार नाकारले.

👉 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेला आतापर्यंत 3 वेळा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. या संघटनेला 1901 मध्ये शांततेचा पहिला नोबेल देण्यात आला होता.

👉 Linus Pauling ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांना दोन वेगवेगळ्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. 1954 मध्ये रसायनशास्त्रसाठी तर 1962 मध्ये शांततेसाठी हे पुरस्कार मिळाले होते.  

👉 आतापर्यंत 5 भारतीय नागरिकांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तर भारतीय वंशाच्या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

👉 केवळ जिवंत असणाऱ्या व्यक्तींनाच नोबेल पुरस्कार दिला जातो. मात्र आतापर्यंत तिघांना मृत्युनंतर हा पुरस्कार दिला गेला आहे.

👉 सर्वात जास्त नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागतो.

👉 नियमानुसार प्रत्येक क्षेत्रासाठी जास्तीत जास्त तिघांना पुरस्कार देता येतो.

👉 नोबेल पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबर रोजी दिले जातात. याच दिवशी 1896 मध्ये आल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले होते.

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर

📛निरनिराळ्या कारणांमुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

📛यावर्षी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये विविध कारणांमुळे 95 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

📛नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर त्या विरोधात देशातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.

📛त्यानंतरही कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये यासाठी देशाच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

📛इंटरनेट सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती ‘इंडियन कौन्सिल फॉक रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स’सोबतच दोन थिंक टँकनं सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

📛2012 पासून आतापर्यंत देशभरात 367 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

📛2018 मध्ये जगभरातील इंटरनेट सेवेच्या बंदच्या प्रकरणांपैकी तब्बल 67 टक्के प्रकरणं ही भारतातील आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख पिके

📚 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्र्राचा सर्वांगीण अभ्यास करणे अगत्याचे ठरते. आज जाणून घेऊयात महाराष्ट्रात घेतली जाणारी प्रमुख पिके

● *तृणधान्य :* ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू

● *कडधान्य :* तूर, मूग, उडीद, मटका, हरभरा

● *गळीत धान्य :* भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई

● *नगदी पिके :* कापूस, ऊस, हळद, तंबाखू

● *वन पिके :* बाभूळ, नेम, सारा, चिंच, निलगिरी

● *चारा-पिके :* नेपियर गवत, मक्का, लसूण, घास, चवळी हि दुहेरी फायद्याची पिके

नैसर्गिक मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता अर्थसाहाय्य मिळणार

⚜‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय,’ या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांहून अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.

⚜सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

⚜तर पोलीस महासंचालक विशेष साहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाईल.

⚜पोलीस शिपाई ते सहायक फौजदार या दर्जापर्यंतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत मिळेल. दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे मिळणारा निधी, मदतीव्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाईल.

⚜ याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना नुकतेच दिले आहेत.

⚜विविध घटनांमध्ये ‘ऑनड्युटी’ मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून वेगवेगळे अनुदान, विम्याची रक्कम, तसेच पोलीस कल्याण निधीतून विविध स्वरूपात मृतांच्या वारसांना मदत दिली जाते.

⚜मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास यापूर्वी त्यांच्या वारसांना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रकमेच्या स्वरूपात वाढ करावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अंमलदार वर्गातून केली जात होती.

जागतिक उत्तेजक प्रकरणांत २०१७ मध्ये १३ टक्क्यांनी वाढ

✍‘वाडा’च्या अहवालात भारताचा क्रमांक सातवा

◾️आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक चाचणीत दोषी खेळाडूंच्या आकडेवारीत २०१७मध्ये आधीच्या वर्षांपेक्षा १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) अहवालात म्हटले आहे.

◾️२०१६मध्ये उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचे १५९५ खेळाडूंनी उल्लंघन केले होते, तर २०१७मध्ये १८०४ खेळाडूंनी उत्तेजकांचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती माँट्रिअल स्थित एका संस्थेने अभ्यासांतर्गत दिली आहे.

◾️२०१७मध्ये ११४ देशांच्या आणि ९३ क्रीडा प्रकारांमध्ये उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे खेळाडू दोषी सापडले आहेत.

◾️रशियाचा क्रमांक या यादीत पाचवा लागतो.

◾️ ‘वाडा’ने १० डिसेंबरला रशियावर चार वर्षे बंदी घातली आहे.

◾️त्यामुळे २०२०चे टोक्यो ऑलिम्पिक आणि २०२२मध्ये कतारला होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रशियाला सहभागी होता येणार नाही.

✍ इटलीचे खेळाडू अग्रेसर

🔘उत्तेजक चाचणीत दोषी खेळाडूंमध्ये
📌 इटलीचे खेळाडू (१७१)
📌 फ्रान्स (१२८), 
📌 अमेरिका (१०३),
📌  ब्राझील (८४) आणि
📌 रशिया (८२) यांचा क्रमांक लागतो.  ‘वाडा’च्या अव्वल १० देशांच्या यादीत चीन, भारत, बेल्जियम, स्पेन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही क्रमांक लागतो.

✍शरीरसौष्ठवपटूंचा सर्वाधिक समावेश

◾️उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन करणारे सर्वाधिक २६६ खेळाडू हे
📌शरीरसौष्ठवमधील आहेत. त्यानंतर 📌अ‍ॅथलेटिक्स (२४२) आणि
📌सायकलिंग (२१८) यांचा क्रमांक लागतो. फुटबॉल आणि रग्बी हे अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –

   1) धरसोड करणे    2) टंगळमंगळ करणे    3) सोडून देणे    4)  पुढे पुढे जाणे

उत्तर :- 2

2) ‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) परात्म      2) ऐतखाऊ      3) घरकोंबडा    4) एकलकोंडा

उत्तर :- 3

3) खालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.

   1) अमिबा      2) अमीबा      3) अब्मिबा    4) अम्बिमा

उत्तर :- 1

4) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ...............

   1) सजातीय      2) विजातीय      3) संयुक्त      4) –हस्व

उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

   1) कवीश्वर      2) दुरात्मा      3) सज्जन    4) गणेश

उत्तर :- 3

6) योग्य पर्याय निवडा.

   अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
   ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.

   1) अ      2) दोन्ही      3) ब      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

7) ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

   1) भाववाचक    2) सामान्यनाम    3) क्रियावाचक    4) धातुसाधित

उत्तर :- 1

8) सर्वनामाचे एकूण मूळ ............ प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

   1) नऊ    2) तीन      3) चार      4) सात

उत्तर :- 1

9) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) सर्वनाम साधित विशेषण    2) धातुसाधित विशेषण
   3) अव्ययवसाधित विशेषण    4) नामसाधित विशेषण

उत्तर :- 4

10) ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

   1) आख्यात    2) वाख्यात    3) ताख्यात    4) लाख्यात

उत्तर :- 2

७३ वी घटना दुरुस्ती

देशाच्या विकासाच्या दृष्टीने पंचायत राज्याचे महत्त्व ओळखून त्याला आपल्या राजकीय कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान देण्याचा निर्णय भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकार द्वारे व त्यांच्या सहभागानेच राबविणे शक्य होते. पंचायत राज व्यवस्थेविषयी राज्य सरकारे उदासिन होती. देशातील लोकशाही व्यवस्थेमध्ये “पंचायत राज व्यवस्थेला” स्वायत्त संस्था म्हणून स्थान दयावयाचे असेल तर त्याच्या मुलभूत व्यवस्थेची तरतूद असणारी घटना दुरुस्ती करण्याचे नक्की ठरले. त्यासाठी ६४ वे घटना दुरुस्तीचे विधेयक लोकसभेपुढे मांडण्यात आले. लोकसभेने ते १८८९ च्या ऑगस्टमध्ये मंजूर केले. परंतु कॉंग्रेस या सत्ताधारी पक्षाला राज्य सभेत बहूमत नसल्यामुळे ह्या विधेयकाला राज्य सभेची मंजूरी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी ते विधेयक पून्हा दुसऱ्यांदा १९९० च्या सप्टेंबर महिन्यात व्ही.पी.सिंग यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडी सरकारने लोकसभेत मांडले. परंतु बिलावर चर्चा होण्यापूर्वीच राष्ट्रीय आघाडी सरकार कोसळले व लोकसभा बरखास्त झाली. त्यामुळे हे विधेयक आपोआप बारगळले. त्यानंतर ते विधेयक पी.व्ही.नृसिंहराव सरकारने सप्टेंबर १९९१ मध्ये लोकसभेत तिसऱ्यांदा मांडले. त्याला २२ डिसेंबर १९९२ रोजी मंजूरी दिली. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ डिसेंबर १९९२ रोजी राज्य सभेने ते मंजूर केले.
अशा तऱ्हेने केंद्र सरकारने पंचायत राज्य पद्धतीला बळकट करणारी ७३ वी घटना दुरुस्ती केली. राष्ट्रपतींनी त्या दुरुस्तीला २० एप्रिल १९९३ रोजी मान्यता दिली आणि भारतात तिची अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ पासून सुरु झाली. केंद्र सरकारने राज्य सरकारांना पंचायती राज्य पद्धती सुरु करण्याकरीता कायदे करण्यास सांगितले. लोकसभेने ७३ वी व ७४ वी घटना दुरुस्ती कायदा केला

चालू घडामोडी ( जाने. १९ ते मार्च १९) महत्वाचे ...


--------------------
• २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापासून ब्रिटीश मार्शल धुनएवजी,प्रथमच भारतीय मार्शल धून 'शंखनाद" वाजवण्यात आली.भारतीय लष्करासाठी ही धून नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयाच्या संगीताच्या प्राध्यापिका डॉ.नाफडे यांनी संगीतबद्ध केली आहे.

• औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचा कॅडेड सागर मुगले याला राजपथावरील १४४ सदस्यीय एनसीसी पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला .राज्यातील २२ कॅडेडस पथसंचलनात सहभागी झाले.

• २०२२ वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आत्तापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

• भारतात होणाऱ्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. २०२५ वर्षापर्यंत महाराष्ट्र हे पहिले ट्रीलिअन डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य बनेल

• केंद्र सरकारने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सातारा जिल्हाचा स्वच्छतेमध्ये पहिला क्रमांक लागला. तर नाशिक व सोलापूर जिल्हा परीषदेचा नागरीकांचा प्रतिसाद या घटकात विशेष सन्मान करण्यात आला.

• स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशपातळीवर स्वच्छता दर्पण या घटकाखाली मुल्यांकन करण्यात आले .यामध्ये देशस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्धा, सिंधूदुर्ग ,सांगली आणि कोल्हापूर या जिल्हांचा सन्मान करण्यात आला.

• युनिसेफच्या आणि इतरसामाजिक संस्थांच्या साह्यानेप्रत्येक गावाचा शाश्वत स्वच्छतेचा आराखडा तयार केला जात आहे.यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग घेतला असल्याने यातून स्वच्छविषयी लोकशिक्षणही घडत आहे असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले.

• ग्रामीण भागात शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे,यासाठी मुख्यंमंत्री ग्रामीण पेयेजल योजना राबविण्यात आली

• २०२२ पर्यंत प्रत्येक बेघर कुटुंबकडे आपला हक्काचा निवारा असावा असा निर्धार केद्र सरकाने केला

• प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १२ लाख घरांची निर्मिती व २०२० पर्यंत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गातील एकही गरजू कुटुंब घराविना वंचित राहू नये असे महाराष्ट्र सरकारनेठरवले आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...