२३ डिसेंबर २०१९

परिणिती चोप्राला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावरुन हटवले.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत.

रविवारी विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारामधून सुरु झालेल्या आंदोलनाची धग गुरुवारी देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनौ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले.

याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनीसोशल नेटवर्किंगवरुन या कायद्याविरोधात आपले मत नोंदवले आहे.

मात्र थेटपणे या कायद्याला विरोध करणे अभिनेत्री परिणिती चोप्राला महागात पडले आहे.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या हरयाणा सरकारच्या अभियानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (सदिच्छा दूत) असणाऱ्या परिणितीला हटवण्यात आलं आहे.

तसेच काही दिवसांपूर्वीच या कायद्याला विरोध करणारा अभिनेता सुशांत सिंहला  ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं आहे.

चालु घडामोडी वन लाइनर्स 22 डिसेंबर 2019

🔶 एस डी मीना यांना पटना मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले

🔶 अँड्र्यू बेली यांना बँक ऑफ इंग्लंडचे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्त केले

🔶मिकेल आर्टेटा यांना आर्सेनलचा मुख्य प्रशिक्षक नियुक्त करण्यात आला आहे

🔶 हसन डायबने लेबनॉनचे नवीन पंतप्रधान म्हणून नेमणूक केली

🔶 नायफँड ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निफियू रिओ निवडले

🔶 यतीन ओझा गुजरात हायकोर्टा अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडले

🔶कडपा स्टील प्लांटसाठी लोह धातूंचा पुरवठा करण्यासाठी एपी सरकारने एनएमडीसीबरोबर सामंजस्य करार केला

🔶बँक ऑफ बडोदा भागीदार एमएसएमई कर्जे प्रदान करण्यासाठी गुजरात सरकारसह भागीदार आहेत

🔶 फिट इंडिया स्कूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आंध्र प्रदेश अव्वल

🔶 एसएपी हे भारतातील सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी वैशिष्ट्यीकृत होते

🔶 अ‍ॅडोबने काम करण्यासाठी भारतामध्ये दुसरे स्थान मिळविले आहे

🔶व्हीएमवेअरने भारतात काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तिसरे स्थान मिळवले

🔶 मायक्रोसॉफ्टने भारतामध्ये कार्य करण्यासाठी सर्वोत्कृष्ट चौथे स्थान दिले आहे

🔶 इस्रोने भारतात काम करण्यासाठी 5 वे स्थान मिळविले आहे

🔶गायिका सविता देवी यांचे नुकतेच निधन झाले

🔶सुश्री धोनी न्यू पनेराई भारतासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

🔶 केरळचे आमदार थॉमस चांडी यांचे नुकतेच निधन झाले

🔶 कन्नड लेखक प्रो एल.एस. शेषागिरी राव यांचे निधन

🔶 सहावा कतार आंतरराष्ट्रीय चषक डोहा, कतार येथे आयोजित

🔶 मीराबाई चानूने सहाव्या कतार आंतरराष्ट्रीय चषकात सुवर्ण जिंकले

🔶 आनंद महिंद्रा महिंद्रा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून राजीनामा देतील

🔶पीयूष चावला आयपीएल 2020 मध्ये सर्वात महागड्या भारतीय खेळाडू बनला

🔶जिग्नेश पटेल यांनी पुण्यात लसीकरण ऑन व्हील्स क्लिनिक सुरू केले

🔶 भारत दरम्यान बरीच पीआरएमसी बैठक - बांगलादेश नवी दिल्ली येथे आयोजित

🔶 केअर रेटिंग्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मोकाशी यांनी राजीनामा दिला

🔶 हिरो मोटोकॉर्पच्या एक्सपुलस 200 ने 2020 ची भारतीय मोटरसायकलची नावे दिली

🔶 एफआयसीसीआय ची  २ वी वार्षिक अधिवेशन नवी दिल्ली येथे आयोजित

🔶 थीम 2019: "भारत: Tr 5 खरब डॉलरची रोडमॅप"

🔶15 वा वार्षिक पर्यटन शिखर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित

🔶 थीम 2019: "पर्यटन: आर्थिक वाढीसह संधी निर्माण करणे"

🔶 विप्रो आणि नॅसकॉम विद्यार्थ्यांसाठी "फ्यूचर स्किल्स" प्लॅटफॉर्म लाँच

🔶इथिओपियाचा पहिला उपग्रह "ईटीआरएसएस" चीनकडून लाँच झाला

🔶अभिनव लोहानने बेंगळुरू ओपन गोल्फ स्पर्धेत बाजी मारली

🔶 जगातील प्रथम क्रमांकाचे राफेल नदालने एटीपी स्पोर्ट्समनशिप पुरस्कार जिंकला

🔶आर ए नदाल यांचा सन् २०१९ एटीपी टूर क्रमांक १ ट्रॉफीने सन्मान करण्यात आला

🔶 अँडी मरे 2019 च्या पुनरागमन प्लेअर म्हणून निवडली गेली

🔶 रॉजर फेडररने चाहत्यांचा आवडता पुरस्कार जिंकला

🔶 इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले गेले

🔶 गिल्स सर्वारा यांना एटीपी कोअर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले

🔶 टोनी रोचे विजयी उद्घाटन टिम गुलिक्सन करिअर प्रशिक्षक पुरस्कार 2019

🔶 Bartश बार्टी ऑस्ट्रेलियाची पहिली महिला आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन आहे

🔶परराष्ट्रमंत्री एस जयशंकर 22 डिसेंबर रोजी इराणला भेट देतील.

२२ डिसेंबर २०१९

शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

🔺गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार.


◾️– गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार.

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा केली.

– ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच सर्व थकीत कर्ज माफ करणार.

– वर्तमानपत्राचा दाखला देऊन विदर्भाचा विकास झालेला नाही हे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

– तुम्ही काम केलेलं नाही असं मी कुठेही म्हटलेलं नाही.

– विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशिर्वाद माझ्यासाठी महत्वाचा आहे.

– विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर ठेवणार नाही.
– पंतप्रधान मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात, मग महाराष्ट्राला का देऊ शकत नाहीत.

– मोदीजी हे भाजपाचे नाही, देशाचे पंतप्रधान ते जागतिक नेते आहेत.

– प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल.

– विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसजी मला तुमची मदत लागेल, विदर्भाचा तुमच्या इतका माझा अभ्यास नाही.
– सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही.

– विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे.

– गोसी खुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करणार.

– यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार
– सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही.

– समुद्धि महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार, कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल.

– व्याजापोटी अडीच हजार कोटी वाचवले.

– कृषी समृद्धि केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु.

– पाच लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.

– धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिकचे २०० रुपये देणार.

– आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद.

– अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार.

– आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार.
– पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.

– लोणार सरोवराचं सौंदर्य संमोहित करुन सोडणार आहे.

– विदर्भात पर्यटनाच्या सोयी-सुविधा वाढवणार.

– जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार.

– विदर्भात मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार.

– मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.
– गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सजातीय’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) उपजातीय      2) विजातीय   
   3) संकीर्णजातीय    4) अजातीय

उत्तर :- 2

2) ‘उचलली जीभ लावली टाळयाला’ या म्हणीचा अर्थ काय ?

   1) घशाला      2) एक सारखे बोलत राहणे
   3) मनात येईल तसे बोलणे  4) काहीच न बोलता गप्प राहणे

उत्तर :- 3

3) ‘धीर सोडणे’ हा अर्थ सूचित करणारा वाक्प्रचार ओळखा.

   1) हात टेकणे    2) हाडाची काडे करणे
   3) हातपाय गाळणे  4) हातखंडा असणे

उत्तर :- 3

4) “बोधपर वचन” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) सुभाषित    2) सुविचार   
   3) ब्रीदवाक्य    4) वरील सर्व

उत्तर :- 4

5) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता  ?

   1) नीयुक्त    2) नीयूक्त   
   3) नियुक्त    4) नियुत्क

उत्तर :- 3

6) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता?
   1) र      2) ग     
   3) ज      4) यापैकी नाही
उत्तर :- 3

7) उच्छेद या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा.

   1) उ + च्छेद    2) उत + च्छेद   
   3) उच् + छेद    4) उत् + छेद

उत्तर :- 4

8) शब्दाची जात बदलून वाक्यरचना करा.
     ‘त्याच्या डोळयात पाणी आले.’

   1) त्याच्या डोळयात पाणी येते    2) त्याच्या डोळयातून पाणी वाहते
   3) त्याचे डोळे पाणावले      4) त्याच्या डोळयांना धरा लागतात

उत्तर :- 3

9) ‘अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप’ ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

   1) पूर्णासूचक संख्या विशेषण    2) अपूर्णांकसूचक संख्याविशेषण
   3) अनिश्चित संख्यासूचक विशेषण    4) साकल्यवाचक संख्याविशेषण

उत्तर :- 2

10) जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना .................... म्हणतात.

   1) सिध्द क्रियापद    2) साधित क्रियापद
   3) संयुक्त क्रियापद    4) व्दिकर्मक क्रियापद

उत्तर :- 1

CBI अधिकारी बी. पी. राजू: ‘इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019’ पुरस्काराचे विजेता

🏵केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी बी. पी. राजू ह्यांना 'इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019' हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.

🏵17 डिसेंबर 2019 रोजी हरयाणाच्या गुरुग्राम या शहरात झालेल्या वार्षिक माहिती सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

🏵राजस्थानातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत झालेल्या फसवणूकीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात त्यांच्या भूमिकेसाठी हा सन्मान बी. पी. राजू ह्यांना NASSCOM-DSCI यांच्यावतीने देण्यात आला आहे.

🏵त्या प्रकरणात बी. पी. राजू यांच्या नेतृत्वात असलेल्या चौकशी पथकाने नऊ आरोपींना अटक केली. छडा लावताना त्यांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल उपकरणांमधून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले. मुख्य म्हणजे हा तपास अल्पावधीतच पूर्ण करण्यात आला होता.

🧩CBI विषयी:-

🏵केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation -CBI) ही भारताची प्रमुख तपास संस्था आहे. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिकया अधिकार क्षेत्रामध्ये ही संस्था कार्य करते. स्पेशल पोलीस इस्टेब्लीशमेंट (SPE) या मूळ नावाने त्याची स्थापना सन 1941 मध्ये झाली.

🏵ही एक वैधानिक संस्था आहे. हा विभाग सरकारी विभागातल्या लाचखोरी, भ्रष्टाचार, घोटाळे प्रकरणी तपास करते.

देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून

◾️देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे.

◾️देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. 

◾️केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे.

◾️१ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे.

◾️पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर
📌इतर प्रवास,
📌 दूरसंवाद,
📌हॉटेल,
📌गाइड,
📌मनोरंजन,
📌पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो.

◾️ दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. 

◾️सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते.

◾️या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते.

✍ असे होणार सर्वेक्षण

◾️किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन  

◾️पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव

✍‘बहु निर्देशक सर्व्हे’

◾️पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे.

◾️संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत.

◾️जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत.

◾️भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अफगाणिस्तानने ‘इंडियन फार्माकोपीया’ (IP) पुस्तकाला मान्यता दिली

अफगाणिस्तान इस्लामिक प्रजासत्ताक या देशाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला मान्यता दिली असून या पुस्तकाला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.

देशाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय औषधी व आरोग्य उत्पादने नियमन विभागाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला औपचारिक मान्यता दिली.

‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक

🔸इंडियन फार्माकोपीया भारताच्या ‘औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा-1940’ अन्वये असलेल्या मानकांचे अधिकृत असे मान्यताप्राप्त पुस्तक आहे.

🔸हे पुस्तक औषधांची ओळख, शुद्धता आणि क्षमता यांच्या बाबतीत भारतामध्ये उत्पादित आणि विक्री केली जाणार्‍या औषधांची मानके निर्दिष्ट करते.

🔸औषधांची गुणवत्ता, क्षमता आणि सुरक्षितता राखण्याच्या उद्देशाने भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) औषधी निर्मितीसाठी कायदेशीर व वैज्ञानिक मानके तयार करते आणि त्याची लिखित स्वरुपात नोंद करते.

🔸दरवर्षाच्या अखेरीस ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक प्रकाशित केले जाते.

भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) विषयी

भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. भारत देशात तयार होणार्‍या औषधांची मानके ठरवण्यासाठी IPCची स्थापना करण्यात आली आहे. प्रदेशात असलेल्या रोगांवरच्या उपचारासाठी सामान्यत: आवश्यक असलेल्या औषधांचे मानके नियमितपणे अद्ययावत करणे, हे या संस्थेचे मूलभूत कार्य आहे. संस्थेची स्थापना 1956 साली झाली.

चालू घडामोडी प्रश्न

● कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजना लागू केली
- सिक्किम.

●---या राज्यात सियांग नदीवर भारतामधील 300 मीटर लांबीचा सर्वात दीर्घ असा एकपदरी स्टील केबल सस्पेंशन ब्रिज (पूल) उभारण्यात आला
- अरुणाचल प्रदेश.

● ISRO भारतीय क्षेत्रात हवाई प्रवासादरम्यान संपर्क यंत्रणा प्रदान करण्यासाठी कोणती अंतराळ मोहीम पाठविणार - GSAT-20.

● कोणत्या शहरात ‘भागीदारी शिखर परिषद 2019’ आयोजित करण्यात आली
- मुंबई.

●दरवर्षी ७७ हजार जेष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा देणारी मुख्यमंत्रीतीर्थयात्रा योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे - दिल्ली

●power १८ ही मोहीम सुरु केली आजे .ज्याअंतर्गत २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये युवकांना सामावून घेण्यसाठी प्रेरणा दिली जाईल
-टीवटर इंडिया

● जगभरात वेगाने प्रवासी वाढणाऱ्या हवाई मार्गाच्या यादीत भारतातील कोणता मार्ग चौथ्या स्थानावर आहे
-पुणे -दिल्ली

●जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचाउभारला आहे हा पुतळा कोणत्या नदीच्या किनारी आहे
-नर्मदा

●शेतकर्यांच्या सशक्तीकरणासाठी कोणत्या राज्यसरकारने रयत बंधू योजना सुरु केली आहे
- तामिळनाडू

● गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे देशातील प्रथम राज्य कोणते
-उत्तराखंड

●देशातील पहिले आभासी चलन एटीएम खालीलपैकी कोठे सुरु करण्यात आले
- बंगळूरु

● कोणत्या शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड करण्यात आली
- पुणे

●  पहिली जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली
-जर्मनी

● नाबार्डचे हवामान बदल केंद्र कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे
-लखनौ

२१ डिसेंबर २०१९

पोलिस भरती प्रश्नसंच

🔳 कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?

(A) जर्मनी
(B) रशिया
(C) पोर्तुगाल✅✅
(D) अर्जेंटिना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अपहरण-रोधी सरावाचे नाव काय आहे?

(A) अद्भुत
(B) अपहरण ✅✅
(C) बंधक
(D) देश हमारा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 डिसेंबर 2019 मध्ये कोणत्या बँकिंग कंपनीने 100 अब्ज डॉलर एवढ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला?

(A) HDFC ✅✅
(B) अ‍ॅक्सिस बँक
(C) कॅनरा बँक
(D) बँक ऑफ म्हैसूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 कोणत्या राज्याने ‘जलसाथी’ नावाने एका महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली?

(A) आंध्रप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) उत्तरप्रदेश
(D) ओडिशा ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 दरवर्षी ____या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा केला जातो.

(A) 25 नोव्हेंबर
(B) 31 ऑक्टोबर
(C) 15 जानेवारी
(D) 20 डिसेंबर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔳 भारतीय रेल्वे “एक भारत श्रेष्ठ भारत” कार्यक्रमात भाग घेणार्‍या तरुणांना _________ सवलत देणार.

(A) 100 टक्के
(B) 25 टक्के
(C) 50 टक्के ✅✅
(D) 55 टक्के

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) Which of the following is not added to chewing tablet ?

A. Lubricant

B. Guidant

C. Disintegrant✅

D. Antiadhesive


2) Rabies bodies are.

A. Cowdry type A inclusion bodies

B. Bollinge bodies

C. Cowdry type B inculsion bodies

D. Negri bodies✅

3) सावळाच रंग तुझा पावसाळी नभावर ! अलंकार ओळखा.

A. उपमा

B. अनुप्रास

C. उत्प्रेक्षा

D. उपमेय ✅


4) जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी यावर्षी ……….जन्मली.

A. १९७५

B. १९८२

C. १९७८✅

D. १९८०

5) अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

A. १०

B. २०

C. १५

D. २५✅

6) कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

A. हरियाना

B. जम्मू-काश्मिर

C. पंजाब

D. राजस्थान✅

7) एच.आय.व्ही. काय आहे  ?

A. वरीलपैकी सर्व

B. एड्स ची चाचणी  

C. विषाणू  ✅

D. असाध्य रोग

8) सुपरसॅनिक’ म्हणजे काय ?

A. प्रकाशापेक्षा कमी वेगवान       

B. ध्वनीपेक्षा कमी   
.
C. ध्वनीपेक्षा अधिक वेगवान✅

D. प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान


9 ) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

A. निकाल्स

B. निकोटीन✅

C. कार्बोनेट

D. फॉस्फेट

10) जर ३४३ : 64 तर १००० : ?

A. १७२

B. १३१

C. १२१✅

D. १००

धक्कादायक ! फडणवीस सरकारच्या एका वर्षात ६५ हजार कोटींचा घोळ; कॅगचा ठपका

◾️: फडणवीस सरकारच्या २०१७-१८ या वर्षात ६५ हजार कोटीचा ताळमेळ लागत नसल्याचे सांगण्यात आले आहे. आज (ता.२०) सभागृहात २०१७-१८ या आर्थिक वर्षात राज्याची स्थिती काय होती यावरचा कॅगचा अहवाल मांडण्यात आला. त्यामध्ये कॅगने हा खळबळजनक खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या या एका आर्थिक वर्षात तब्बल ६५ हजार ९२१ कोटी रुपयांची उपयोगिता प्रमाणपत्रे जोडण्यात आलेली नव्हती. काम पूर्ण झाल्यावर तो-तो विभाग काम योग्यपणे पूर्ण झाले म्हणून जे प्रमाणपत्र देतो त्याला उपयोगिता प्रमाणपत्र म्हणतात. तब्बल ६५ हजार कोटी रुपयांची ही सर्टिफिकेट्स एकाच वर्षात बाकी असणं प्रचंड गंभीर असल्याची बाब निदर्शनास आली आहे. कॅगने स्वतःच यात पुढे निधीचा दुर्विनियोग व अफरातफरीचा धोका होऊ शकतो असं म्हटलं आहे.

दरम्यान, २०१४ साली फडणवीस सरकार सत्तेत आले त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारवर टीका करत सत्तेत आले होते. परंतु, कॅगने तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा घोळ सांगत फडणवीस सरकारलाच आरोपांच्या पिंजऱ्याच उभे केले आहे.

🔹 कॅग अहवालातील काही बाबी

१) राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर झाली असल्याचा संशय कॅगने आपल्या अहवालात व्यक्त केला.

२) एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचे असते.

३) काम योग्यरित्या पूर्ण झाल्याचं हे प्रमाणपत्र असतं. मात्र २०१८ पर्यंत विविध कामांसाठी दिलेल्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली नसल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

४) मात्र 2018 पर्यंतच्या कालावधीत ६५ हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामाची ३२ हदजार ५७० उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत

५) उपयोगिता प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याने निधीचा दुरुपयोग आणि अफरातफरीचा धोका संभवतो असा खळबळजनक संशय कॅगने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. आज विधानसभेत हा अहवाल सादर करण्यात आला.

२०१६-१७ पर्यंत सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - १३०६७

- कामांची किंमत - २८८९४
२०१६-२०१७ वर्षात सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - ४०२७ - कामांची किंमत - १२३०१
२०१७-२०१८ वर्षात सादर न केलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांची संख्या - १५४७६

- कामांची किंमत - २४७२५

झटपट 10 महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

1) अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीने सीईओ कोण आहेत?
उत्तर : रिचर्ड व्हेंट्रे

2) ‘स्ट्रँडहॉग’ हे काय आहे?
उत्तर : ऑपरेटिंग सिस्टममधला बग

3) 2024 पॅरिस ऑलम्पिकमधल्या ‘सर्फिंग’ स्पर्धेचे आयोजन कोणत्या बेटावर केले जाणार आहे?
उत्तर : ताहिती

4) ‘ग्लोबल रिफ्यूजी फोरम’ (GRF) याची प्रथम बैठक कुठे आयोजित केली गेली?
उत्तर : जिनेव्हा

5) कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : आंध्रप्रदेश

6) ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम कधी आयोजित केला गेला होता?
उत्तर : 16 डिसेंबर

7) कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?
उत्तर : अमिताभ बागची

8) "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र कुणी लिहिले आहे?
उत्तर : विश्वनाथन आनंद

9) कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाले?
उत्तर : भारत

10) ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या कमांडंट पदी कोणाची नेमणूक झाली?
उत्तर : डी. चौधरी

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...