१२ डिसेंबर २०१९

मानव विकास निर्देशांक 2019 [Human Development Index 2019]

- जारी करणारी संस्था - UNDP
- निकष: दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, योग्य राहणीमान

- भारताचा क्रमांक - 188 देशांच्या यादीत 129 वा (2018 साली 130 वा)
- भारताचा HDI - 0.647 
- भारताचा समावेश - मध्यम मानव विकास गटात

2019 च्या HDI नुसार प्रथम 5 देश
1. नॉर्वे (HDI - 0.954)
2. स्वित्झर्लंड (HDI - 0.946)
3. आयर्लंड (HDI - 0.942)
4. जर्मनी (HDI - 0.939)
5. हँगकाँग (HDI - 0.939)

मानव विकास निर्देशांकात ब्रिक्स राष्ट्रे 
1. चीन 85 वा क्रमांक
2. ब्राझील 79 वा क्रमांक
3. दक्षिण आफ्रिका 113 वा क्रमांक
4. रशिया 49 वा क्रमांक
5. भारत 129 वा क्रमांक

भारताच्या  शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI नुसार क्रमांक
1. नेपाळ 147
2. पाकिस्तान 152
3. बांग्लादेश 135
4. श्रीलंका 71

HDI मध्ये जगातील शेवटचे राष्ट्र 
1. नायजर - 189 वा
2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक - 188 वा
3. चाड - 187 वा
4. दक्षिण सुदान - 186 वा
5. बुरुंडी - 185 वा

शस्त्र कायदा 1969, मध्ये सुधारणा करणार्‍या विधेयकाला लोकसभेची मंजुरी

2 पेक्षा जास्त बंदूक जवळ बाळगण्यास या विधेयकामुळे प्रतिबंध बसणार आहे. कायद्यातील सध्याच्या तरतुदीनुसार एका व्यक्‍तीस तीन बंदुका जवळ बाळगता येतात.

काही अपवाद वगळता नागरिकांना यापुढील काळात दोनपेक्षा जास्त बंदुका जवळ ठेवता येणार नाही.

शस्त्र सुधारणा कायद्याचे उल्‍लंघन करणार्‍यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.

लष्कर किंवा पोलिसांची शस्त्रे लुटल्यास, संघटित गुन्हेगारी टोळ्यांसाठी शस्त्रांचा वापर केल्यास, अवैधरित्या शस्त्रांची तस्करी तसेच बेदरकारपणे शस्त्रांचा वापर केल्यास दोषींना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जाण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे.

लग्‍नसमारंभ वा इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी गोळीबार केल्याचे सिध्द झाल्यास दोन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली असून एक लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.

कायद्यातील नव्या तरतुदीमुळे खेळाडुंना शस्त्र बाळगण्यावर मर्यादा येणार नाहीत.

अवैधरित्या शस्त्रांची निर्मिती वा त्याची विक्री करणार्‍यांना सात वर्षे ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून अशी शस्त्रे बाळगणार्‍यांसाठी सात ते चौदा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

चालू घडामोडी प्रश्नसंच

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी _______ या दिवशी नागरी संरक्षण दिन पाळला जातो.

(A) 1 मार्च
(B) 6 डिसेंबर✅✅
(C) 4 डिसेंबर
(D) 26 नोव्हेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 _____ या शहरात चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली.

(A) नवी दिल्ली✅✅
(B) मुंबई
(C) लखनऊ
(D) चेन्नई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा अखिल भारतीय क्रिडा स्पर्धा’ _______ येथे आयोजित करण्यात आली आहे.

(A) भोपाळ✅✅
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) लखनऊ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणी ‘मिस युनिव्हर्स 2019’चा किताब जिंकला?

(A) मॅडिसन अँडरसन
(B) झोजिबिनी टुंझी✅✅
(C) वर्तिका सिंग
(D) सोफिया अरागॉन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी ______ हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

(A) 7 डिसेंबर
(B) 9 डिसेंबर✅✅
(C) 26 नोव्हेंबर
(D) 1 ऑक्टोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणती व्यक्ती भारताचे प्लॉगमॅन म्हणून प्रसिद्ध आहे?

(A) नारायणन किशोर
(B) रिपू ​​दमन बेवली✅✅
(C) राम सिंग यादव
(D) नितेंद्र सिंग रावत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी किती संमतिदर्शक अव्यये आहे.

     हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा

   1) सर्व      2) सहा      3) पाच      4) चार

उत्तर :- 1

2) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) अपूर्ण भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ 
   3) रीती भूतकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 3

3) “हंस” या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.

   1) हंसी    2) हंसा      3) हंसीण      4) हंसीका

उत्तर :- 1

4) रामाहून गोविंदा मोठा आहे.
     अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?

   1) कर्ता    2) संप्रदान    3) अपादान    4) करण

उत्तर :- 3

5) वाक्यप्रकार ओळखा.
     आई वडिलांचा मान राखावा.

   1) आज्ञार्थी    2) विध्यर्थी   
   3) संकेतार्थी    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

6) ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या वाक्यात विधेय कोणते आहे?

   1) गावा    2) आमुच्या   
   3) आम्ही    4) जातो

उत्तर :- 4

7) ‘तुम्ही कामे केलीत’, हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे ?

   1) कर्तृ – कर्मसंकर  2) कर्मकर्तरी   
   3) कर्तृ – भावसंकर  4) कर्मृ – भावसंकर

उत्तर :- 1

8) खालील शब्दाचा समास ओळखा. – ‘सादर’

   1) विभक्ती – तत्पुरुषस      2) सहबहुव्रीही   
   3) व्दंव्द        4) नत्र बहुव्रीही

उत्तर :- 2

9) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल.

   1) पूर्णविराम    2) अर्धविराम   
  3) स्वल्पविराम    4) अपूर्णविराम

उत्तर :- 4

10) पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखा.

   1) जल      2) गाव     
   3) एजंट    4) मंजूर

उत्तर :- 2

ज्वालामुखी चे प्रकार

ज्वालामुखीचे वर्गीकरण पुढील मुद्द्याच्या आधारे केले जाते एक उद्रेकाचे स्वरूप उद्योगाचा कालखंड व त्याची क्रियेचे स्वरूप
*1】 उद्रेकाच्या स्वरूपानुसार*

*अ】मध्यवर्ती केंद्रीय प्रकार*  [Central Type]
जेव्हा ज्वालामुखी मध्यवर्ती नलिका किंवा एक नलिकेद्वारे लावारस बाहेर पडतो त्याला मध्यवर्ती प्रकार असे म्हणतात अशा प्रकारचे ज्वालामुखी प्रक्षोभक व विध्वंसक असतात.
उदाहरण इटलीमधील *व्हेसूव्हिएस* , जपानमधील *फुजियामा* पर्वत .

*१】ज्वालामुखी स्तंभ :*
ज्वालामुखीच्या अंतिम अवस्थेमध्ये या नलिकेत लाव्हारसाचे निक्षेपण होते आणि ती थंड होऊन लाव्हास्तंभाची निर्मिती होते त्याला ज्वालामुखी स्तंभ असे म्हणतात.

*२】क्रेटर /कुंड :*
ज्वालामुखी शंकूच्या शिरोभागात तयार होणाऱ्या गर्त किंवा विस्तृत खोलगट भागाला क्रेटर असे म्हणतात.
उदाहरण *आलास्का* मधील मृत ज्वालामुखी *अँनिअँकचॅक* या क्रेटरचा व्यास 11 किमी आहे.

*३】 घरट्याकार /क्रेटर /निडाभ कुंड:*
ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाल्यास क्रेटर मध्येच लहान-लहान शंकू तयार होतात या भुरूपाला घरट्याकार क्रेटर असे म्हणतात. उदाहरण *व्हेसूव्हिएस* ज्वालामुखी, *फिलिपिन्समधील मऊताल*
.
*४】 कँलडेरा /महाकुंड :*
भूगर्भातील शीलारसाचा कोठीमधून जेव्हा भयंकर विस्पोट होतो तेव्हा ज्वालामुखीच्या शिरोभागाचा बराचसा भूभाग अंतराळात फेकला जातो आणि तेथे विस्तीर्ण काहिलीसारखा खोल खड्डा निर्माण होतो याला कॅलडेरा असे म्हणतात.
उदाहरण *इंडोनेशियामधील* *क्राकाटोआ* , *वेस्टइंडीज* मधील *पिली पर्वत* , *अलास्का* मधील *कॅटमई* पर्वत.

*ब】 भेगी उद्रेकाचे ज्वालामुखी(Fissure type of Volcanoes)*
अशाप्रकारचे उद्रेक प्रस्तरभंग ,भ्रंश आणि भेगीमध्ये आढळतात.

*१】लाव्हा शंकू:* ज्वालामुखीच्या नलिकेभोवती लाव्हा रसाचे निक्षेपण होते व त्यास शंक्वाकृती आकार प्राप्त होतो म्हणून त्याला लाव्हा शंकू असे म्हणतात .
त्याचे दोन उपप्रकार पाडले जातात

*a) ॲसिड लाव्हा शंकु:*
ॲसिड लाव्हारस घट्ट असल्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या ॲसिड लाव्हा शंकू जास्त उंचीचा व कमी विस्ताराचा असतो ,या शंकूचा उतार तीव्र स्वरूपाचा असतो.

*b) बेसिक लाव्हा शंकु:*
लाव्हा पातळ असल्याने या पासून तयार होणाऱ्या बेसिक लाव्हा शंकूची उंची कमी असते आणि त्याचा विस्तार जास्त असतो ,या शंकुचा उतार मंद स्वरूपाचा असतो.

*२】 राख किंवा सिंडर शंकु:*
ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ज्वालामुखीय राख मोठ्या प्रमाणात बाहेर पडते ,ज्वालामुखीय राखेमध्ये धुळे राख खडकाचे लहान-मोठे तुकडे वगैरे पदार्थाचा समावेश होतो ,हे पदार्थ ज्वालामुखी भोवती असतात यापासून तयार होणाऱ्या शंक्वाकृती रुपाच राख व सिंडर संकु म्हणतात

*३】 संमिश्र शंकु:*
एखाद्या उद्रेकाच्या वेळी फक्त लाव्हारस बाहेर पडतो व त्याचे ज्वालामुखी भोवती निक्षेपण होते आणि काही काळ उद्रेक  होण्याचे थांबते पुन्हा काही दिवसांनी ज्वालामुखी जागृत होऊन उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी राख बाहेर पडते त्या मधून धूळ ,खडक ,खडकांचे तुकडे इत्यादी पदार्थ बाहेर पडतात आणि त्यांचे निक्षेपण होते अशा रीतीने आलटून-पालटून लाव्हारस आणि ज्वालामुखीय राखेचे थर जमा होऊन तयार होणार्‍या ज्वालामुखीस *संमिश्र शंकु* असे म्हणतात.

*2】 उद्रेकाचा कालखंड आणि त्यांच्या क्रीयेच्या स्वरूपानुसार*

*अ】 जागृत ज्वालामुखी :*
ज्वालामुखी मधून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो तसेच त्यांच्या उद्रेक केव्हाही होऊ शकतो त्यांना जागृत ज्वालामुखी असे म्हणतात जगामध्ये सुमारे 500 जागृत ज्वालामुखी आहेत.
उदाहरण भूमध्य समुद्रातील *सिसिली* बेटा मधील *स्ट्रोम्बोली* हा जागृत ज्वालामुखी असून त्याला *भूमध्य समुद्रातील द्वीपगृह* असे म्हटले जाते कारण ते सातत्याने वायूचे ज्वलन करत आणि प्रकाशमान प्रदीप्त असतात.

*ब】 निद्रिस्त ज्वालामुखी:*
ज्वालामुखी मधून एकेकाळी जागृत ज्वालामुखी प्रमाणे सतत उद्रेक होत असत परंतु सध्या उद्रेक होणे थांबली आहे आणि पुन्हा अचानक पणे उद्रेक होण्याची शक्यता आहे अशा ज्वालामुखीस निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात.
उदाहरण *इटलीमधील व्हेसूव्हिएस* ज्वालामुखीचा उद्रेक इ.स.79 मध्ये झाला अधून मधून उद्रेक होतात अलीकडे 1944 साली ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्यापैकी सर्वात भीषण उद्रेक 1906 साली  झाला , अलास्का मधील कॅटमई पर्वत.

क】 *मृत ज्वालामुखी* :
ज्वालामुखी मध्ये पुर्वी एकेकाळी उद्रेक होत असत ,आता उद्रेक होत नाही त्यास मृत ज्वालामुखी असे म्हणतात .
उदाहरण *जपानमधील* *फुजियामा* पर्वत.

पोलीस भरतीसाठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) नवी दिल्लीत तिसर्‍या ‘राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी परिषद’चे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
उत्तर : वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल

2) भारत आणि रशिया या देशांदरम्यानचा संयुक्त त्रैसेवा लष्करी सरावाचे नाव काय आहे?
उत्तर : इंद्र

3) ‘हीट वेव्ह 2020’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन कोठे झाले?
उत्तर : बेंगळुरू

4) UNICEFच्या ‘डॅनी काय ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड’ या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर : प्रियंका चोप्रा

5) नागालँड राज्याने कोणत्या दिवशी द्वितीय ‘मधमाशी दिन’ साजरा केला?
उत्तर : 5 डिसेंबर

6) देशातला पहिला कॉर्पोरेट बाँड ETF कोणता आहे?
उत्तर : भारत ETF

7) ISRO ने कुठे नवीन ‘स्पेस टेक्नॉलॉजी इंक्युबेशन सेंटर’ उघडले आहे?
उत्तर : तिरुचिरापल्ली

8) द्वितीय ‘स्टार्टअप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट’ या परिषदेचे आयोजन कुठे झाले?
उत्तर : गोवा

9) PACS 2019 हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : हवाई

10) ‘UNCTAD B2C ई-कॉमर्स इंडेक्स 2019’ याच्यानुसार, भारताचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 73 वा

१० डिसेंबर २०१९

महत्त्वाचे प्रश्नसंच

1)जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वत:कडे ठेवू शकते?
७ 
१५
१६
१४👈

2)अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे?

लोकसभा 
राज्यसभा 👈
लोकसेवा आयोग
मंत्रीमंडळ

3)'विटाळ विध्वंसन' या आपल्या पुस्तकातून कोणी अस्पृश्यतेचे खंडन केले
आहे
1. गोपाळबाबा वलंगकर👈
2. वि.रा.शिंदे
3. वीरेशलिंगम पतलू
4. नारायण गुरु

4)आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?
सावित्रीबाई फुले
महात्मा गांधी
पंडिता रमाबाई 👈
दयानंद सरस्वती

5)अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते?
स्वामी सहजानं सरस्वती 👈
प्रा. एन.जी.रंगा
बाबा रामचंद्र
दिनबंधुमित्र

6)डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ची स्थापना कधी केली
1906
1925👈
1930
1934

7)1921 साली कोणाच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतात हिंदू-मुस्लिम
शेतकऱ्यांचे ऐक्य आंदोलन घडून आले
मदारी पासी 👈
एन.जी.रंगा
सहजानंद सरस्वती
महात्मा गांधी

8)मोपला शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागात घडून आला
बिहार
केरळ👈
बंगाल
पंजाब

9)तामिळनाडूमध्ये 'नाडरमहाजन संघ' ही संस्था कधी स्थापन झाली
1910👈
1916
1925
1931

10)दलित चळवळीत अग्रस्थानी असलेल्या जस्टीस पक्षाचे कार्य कोणत्या
प्रांतात विशेषत्वाने दिसून येते
बंगाल
मद्रास👈
महाराष्ट्र
पंजाब

11)कोणाच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला व्यापक चळवळीचे स्वरुपप्राप्त झाले?
महात्मा गांधी
राजर्षी शाहू महाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👈
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

12)भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली
1931
1934
1919
1925👈

13)अहमदाबाद कापड गिरणी कामगार असोसिएशन ची स्थापना कोणीकेली?
जे.बी. कृपलानी
एन.एम.जोशी
महात्मा गांधी👈
सरदार वल्लभभाई पटेल

14)सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली
पंडिता रमाबाई
सावित्रीबाई फुले
रमाबाई रानडे 👈
ताराबाई शिंदे

15) मुंबई ते इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस  ची स्थापना कोणी केली?
महात्मा गांधी
सरदार वल्लभाई पटेल👈
लाला लजपतराय
पंडित नेहरु

*1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते. ?*

अ. *ध्वनी ☑*
ब. प्रतिध्वनी
क. अवतरंग
ड. प्रकाश

*2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल. ?*

अ. पाणी
ब. वायू
क. *लाकडी ठोकळा ☑*
ड. निर्वात वातावरण

*3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे ?*

अ. बल
ब. *ऊर्जा ☑*
क. शक्ती
ड. गती

*4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?*

अ. डाल्टन
ब. *चॅडविक ☑*
क. रूदरफोर्ड
ड. थॉमसन

*5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ?*

अ. आठ
ब. *सात ☑*
क. नऊ
ड. सहा

*6. हा वैश्विक द्रावक आहे.?*

अ. हवा
ब. अल्कोहोल
क. *पाणी ☑*
ड. रॉकेल

*7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते. ?*

अ. *ऑक्सीजन ☑*
ब. नायट्रोजन
क. सल्फर डाय ऑक्साईड
ड. कार्बन डाय ऑक्साईड

*8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ?*

अ. शाकाहारी
ब. मिश्राहारी
क. कीटकहारी
ड. *मांसाहारी ☑*

*9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते?*

अ. ऑक्सीजन
ब. *सुर्यप्रकाश ☑*
क. माती
ड. अंधार

*10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ?*

अ. डास
ब. मासे
क. *उंदीर ☑*
ड. मासे

*11. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?*

अ. सातारा
ब. नाशिक
क. *रायगड ☑*
ड. पुणे

*12. मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे?*

अ. *मुळा ☑*
ब. तापी
क. गोदावरी
ड. कृष्णा

*13. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?*

अ. पुणे विद्यापीठ
ब. *मुंबई विद्यापीठ ☑*
क. शिवाजी विद्यापीठ
ड. नागपूर विद्यापीठ

*14. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?*

अ. *307713 ☑*
ब. 407434
क. 503932
ड. 603832

*15. महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?*

अ. पहिला
ब. *दुसरा ☑*
क. तिसरा
ड. चौथा

*16. चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?*

अ. रायगड
ब. ठाणे
क. *पालघर ☑*
ड. नाशिक

*17. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?*

अ. रायगड
ब. पुणे
क. नागपूर
ड. *ठाणे ☑*

*18 कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?*

अ. पुणे
ब. *नाशिक ☑*
क. नागपूर
ड. कोल्हापूर

*19. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?*

अ. *अहमदनगर ☑*
ब. पुणे
क. सोलापूर
ड. रायगड

*20. सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?*

अ. पुणे
ब. सांगली
क. *वर्धा ☑*
ड. अहमदनगर

*21. पंचायत समितीचा सचिव कोण असतो?*

अ. सभापती
ब. तहसीलदार
क. *गटविकास अधिकारी ☑*
ड. विस्तार अधिकारी

*22. पंचायत समितीचा उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?*

अ. *सभापती ☑*
ब. जिल्हाधिकारी
क. तहसीलदार
ड. गटविकास अधिकारी

*23. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे?*

अ. विषय समिती
ब. *स्थायी समिती ☑*
क. अर्थ समिती
ड. शिक्षण समिती

*24. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते?*

अ. महात्मा गांधी
ब. जवाहरलाल नेहरू
क. वसंतराव नाईक
ड. *लॉर्ड रिपन ☑*

*25. स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले ?*

अ. *जवाहरलाल नेहरू ☑*
ब. महात्मा गांधी
क. बलवंतराय मेहता
ब. वसंतराव नाईक

*26. पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते?*

अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. कर्नाटक
ड. *राजस्थान ☑*

*27. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवतो?*

अ. ग्रामसेवक
ब. *सरपंच ☑*
क. तलाठी
ड. तहसीलदार

*28. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असते?*

अ. *18 ☑*
ब. 21
क. 23
ड. 25

*29. पंचायत व्यवस्थेविषयी घटनात्मक तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?*

अ. 73
ब. 14
क. *40 ☑*
ड. 44

*30. ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी किती गणपूर्ती आवश्यक असते?*

अ. 10%
ब. *15% ☑*
क. 20%
ड. 25%

*31. वेबसाईट वरील वेब पेजचा पत्यास काय म्हणतात?*

अ. *URL ☑*
ब. HTTP
क. Browser
ड. Email

*32. इंटरनेट मध्ये जोडलेल्या संगणकाच्या ॲड्रेसला काय म्हणतात?*

अ. Email
ब. Browser
क. WWW
ड. *इंटरनेट प्रोटोकॉल ☑*

*33. FTP चे विस्तारीत रूप काय आहे?*

अ. File Transfer Procedure
ब. File Transport Protocol
क. *File Transfer Protocol ☑*
ड. Fully Transfer Protocol

*34.खालील पैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो?*

अ. जीएसएम
ब. *युएलबी ☑*
क. सीडीएमए
ड. जीपीएस

*35. सायबर स्पेस ही प्रथम संकल्पना कोणी मांडली?*

अ. विल्यम वर्डसवर्थ
ब. विल्यम जॉर्डन
क. *विल्यम गिब्सन ☑*
ड. विल्यम स्मिथ

उत्तर - क. विल्यम गिब्सन

*36. खालील पैकी कोणता आऊटपुट डिव्हाइस आहे?*

अ. की बोर्ड
ब. जॉयस्टीक
क. माऊस
ड. *मॉनिटर ☑*

*37. कोणत्या कंपनीने पहिले व्यावसायिक संगणक तयार केले?*

अ. *रेमिग्टंन रॅड ☑*
ब. IBM
क. पास्कल
ड. मायक्रोसॉफ्ट

*38. _ चा वापर हे तिसर्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य होते.?*

अ. व्हक्युम ट्यूब
ब. *इंटिग्रेटेड सर्किट ☑*
क. चीप
ड. आर्टीफीशल इंटलिजन्ट

*39. ____ हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे साधन आहे. ?*

अ. दुरदर्शन
ब. टेलिफोन
क. उपग्रह
ड. *वरील सर्व ☑*

*40. जगभरात पसरलेल्या व एकमेकांना जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला काय म्हणतात?*

अ. *इंटरनेट ☑*
ब. ईमेल
क. टेलिफोन
ड. ईकॉमर्स

*41. खालील पैकी कोणता आऊटपुट डिव्हाइस आहे?*

अ. की बोर्ड
ब. जॉयस्टीक
क. माऊस
ड. *मॉनिटर ☑*

*42. कोणत्या कंपनीने पहिले व्यावसायिक संगणक तयार केले?*

अ. *रेमिग्टंन रॅड ☑*
ब. IBM
क. पास्कल
ड. मायक्रोसॉफ्ट

*43. _ चा वापर हे तिसर्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य होते.?*

अ. व्हक्युम ट्यूब
ब. *इंटिग्रेटेड सर्किट ☑*
क. चीप
ड. आर्टीफीशल इंटलिजन्ट

*44. ____ हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे साधन आहे. ?*

अ. दुरदर्शन
ब. टेलिफोन
क. उपग्रह
ड. *वरील सर्व ☑*

*45. जगभरात पसरलेल्या व एकमेकांना जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला काय म्हणतात?*

अ. *इंटरनेट ☑*
ब. ईमेल
क. टेलिफोन
ड. ईकॉमर्स

सराव प्रश्नसंच - अर्थशास्त्र

*46. कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोन्हीचा समावेश असतो?*

अ. समाजवादी
ब. भांडवलशाही
क. साम्यवादी
ड. *मिश्र ☑*

*47. गरीबी हटाव ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती?*

अ. पहिल्या
ब. सहाव्या
क. चौथ्या
ड. *पाचव्या ☑*

*48. सेज हे कशाशी संबंधित आहे?*

अ. *उद्योगधंदे ☑*
ब. शेती
क. मत्यव्यवसाय
ड. पर्यावरण

*49. चलनाच्या अवमुल्यनाने काय होते?*

अ. आयात वाढते
ब. *निर्यात वाढते ☑*
क. बेरोजगारी वाढते
ड. निर्यात कमी होते

*50. मुंबई योजनेला प्रत्युत्तर म्हणून कोणी जनता योजना मांडली?*

अ. नारायण अग्रवाल
ब. जयप्रकाश नारायण
क. *एम. एन. रॉय ☑*
ड. सदाशिव वर्ते

भारत विकणार सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ मिसाइल

✍ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे.

✍तर लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.

✍ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे.तसेच ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते  जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम  आहे.

✍तर वेगवेगळया चाचण्यांनंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला 10 कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे.

✍पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे.त्यासाठी पुढच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.

✍ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. ब्रह्मोसचा पल्ला 290 किमी असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात.

✍ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 ते 3 पट आहे. म्हणजे ब्रह्मोस एका सेकंदात 1 किमी अंतर पार करते.

✍तसेच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) 1 मीटरपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच त्याची अचूकता 99.99 टक्के  आहे.

✍क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते.
तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपासून बचाव करून घेऊ शकते.

✍ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...