१० डिसेंबर २०१९

भारत विकणार सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ मिसाइल

✍ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे.

✍तर लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.

✍ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे.तसेच ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते  जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम  आहे.

✍तर वेगवेगळया चाचण्यांनंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला 10 कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे.

✍पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे.त्यासाठी पुढच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.

✍ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. ब्रह्मोसचा पल्ला 290 किमी असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात.

✍ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 ते 3 पट आहे. म्हणजे ब्रह्मोस एका सेकंदात 1 किमी अंतर पार करते.

✍तसेच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) 1 मीटरपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच त्याची अचूकता 99.99 टक्के  आहे.

✍क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते.
तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपासून बचाव करून घेऊ शकते.

✍ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे.

सराव प्रश्नसंच - चालू घडामोडी

● जगातली सर्वाधिक मानधन मिळविणारी महिला खेळाडू खोण आहे?

अ. सेरेना विल्यम्स
ब. सिमोना हलेप
क. हरमनप्रीत कौर
ड. सानिया नेहवाल

उत्तर - अ. सेरेना विल्यम्स

● कोणत्या शहरात दहाव्या ‘आशिया जलतरण महासंघ एशियन एज ग्रुप अजिंक्यपद 2019’ या स्पर्धा आयोजित केली आहे?

अ. मुंबई
ब. चेन्नई
क. बेंगळुरू
ड. दिल्ली

उत्तर - क. बेंगळुरू

● पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी कोणी स्वीकारली?

अ. के. श्रीकांत
ब. आर. के. मिश्रा
क. सचिन मेहता
ड. मनोज शर्मा

उत्तर - अ. के. श्रीकांत

● ऑगस्टमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार्‍या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचे नाव काय ?

अ. ए.बी.डिव्हीलियर्स
ब. मोर्नी मोर्कल
क. डेल स्टेन
ड. हाशिम अमला

उत्तर - क. डेल स्टेन

● कोणी ATP वॉशिंग्टन ओपन 2019’ या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले?

अ. डॅनिल मेदवेदेव
ब. नोव्हाक जोकोविच
क. राफेल नदाल
ड. रॉजर फेडरर

उत्तर - अ. डॅनिल मेदवेदेव

● बंधन बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधन विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक केली?

अ. प्रमोद वाजपेयी
ब. सिद्धार्थ सन्याल
क. चंद्रशेखर घोष
ड. सागर प्रसाद

उत्तर - ब. सिध्दार्थ सन्याल

● CEO World 2019 या मासिकेच्या जगातले सर्वाधिक प्रभावशाली मुख्य कार्यकारी अधिकारी’ या जागतिक मानांकन यादीत प्रथम क्रमांकावर कोण आहे?

अ. मुकेश अंबानी
ब. सुंदर पिचाई
क. डगलस मॅकमिलन
ड. लक्ष्मी मित्तल

उत्तर - क. डगलस मॅकमिलन

● सीमा सुरक्षा दलाचे नवे महासंचालक (DG) म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?

अ. व्ही. के. जोहरी
ब. राजेंद्र कूमार
क. राहुल वर्मा
ड. दीपक मिश्रा

उत्तर - अ. व्ही. के. जोहरी

● 22 वी ‘राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2019’ आयोजित करण्यात येणार आहे?

अ. दिल्ली
ब. मुंबई
क. रांची
ड. शिलाँग

उत्तर - ड. शिलाँग

● कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक करण्यात आली?

अ. अतनू चक्रवर्ती
ब. अजय सिंग
क. राजेंद्र प्रजापती
ड. राकेश वर्मा

उत्तर - अ. अतनू चक्रवर्ती

● भारताने कोणत्या देशाला विकास प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य म्हणून 100 दशलक्ष डॉलरची पतमर्यादा देवू केली?

अ. श्रीलंका
ब. बेनिन
क. नेपाळ
ड. भूटान

उत्तर - ब. बेनिन

अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी :

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हे चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे असे अमेरिकन आयोगाने म्हटले आहे. हे विधेयक भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत अशी मागणी आयोगाने केली आहे.

आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना यापुढे बेकायद मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येईल.

“कॅब संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर अमेरिकेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य प्रमुख नेत्यांवर निर्बंध लावण्याचा विचार करावा” असे अमेरिकेच्या यूएससीआयआरएफ आयोगाने म्हटले आहे.

जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

☘️ फिनलंडच्या पंतप्रधानपदी साना मरिन (वय 34) यांची निवड झाली आहे. त्या देशाच्या इतिहासातील व जगातीलही सर्वांत कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या आहेत.

🍀 फिनलंडच्या सत्ताधारी सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाने मरिन यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याची घोषणा केली. या आधी त्या परिवहनमंत्री होत्या. 

🍀 मरिन या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.

🍀 माजी पंतप्रधान ऍन्टी रिने यांनी 3 डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल नव्या पंतप्रधानांची निवड झाली.

🍀 "सेंटर पार्टी' पक्षाचे नेते इस्को अहओ हे 1991 फिनलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

🍀 त्या वेळी ते 36 वर्षांचे होते.

🍀 मरिन या त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत.

🍀 जगातील सर्वांत कमी युक्रेनचे 35 वर्षांचे पंतप्रधान ओलेस्की हॉंचारुक हे जगातील सर्वांत कमी वयाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी 21 ऑगस्ट 2019 रोजी देशाचे नेतृत्व स्वीकारले होते.

जगातील : सात खंड 

👉 आशिया - ४,४२,५०,००० चौ किमी

👉 आफ्रिका - ३,०२,६४,००० चौकिमि

👉 उत्तर अमेरिका - २,४३,९७,००० चौकीमी

👉 दक्षिण अमेरिका - १,७७,९३,००० चौकीमी

👉 अंटार्टिका - १,३२,०९,००० चौकिमि

👉 युरोप - १,०४,५३,००० चौकिमि

👉 आस्ट्रेलिया - ८९,२३,००० चौकिमि

जिल्हा व त्याचे महत्व

१)मुंबई*——–भारताचे प्रवेशद्वार,
भारताचे प्रथम क्रमांकाचे
औद्योगिक शहर,भारताची,
राजधानी

*२)रत्नागिरी*—देशभक्त व
समाजसेवकांचा जिल्हा

*३)सोलापूर*—-ज्वारीचे कोठार,
सोलापुरी चादरी

*४)कोल्हापुर*–कुस्तीगिरांचा जिल्हा
गुळाचा जिल्हा

*५)रायगड*—–तांदळाचे कोठार व
डोंगरी किल्ले असलेला
जिल्हा

*६)सातारा*—-कुंतल देश व शुरांचा
जिल्हा

*७)बिड*——जुन्या मराठी कविंचा
जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,
देवळादेवळा जिल्हा, ऊस
कामगारांचा जिल्हा

*८)परभणी*—ज्वारीचे कोठार

*९)उस्मानाबाद*–श्री.भवानी मातेचा
जिल्हा

*१०)औरंगाबाद*–वेरुळ-अजिंठा
लेण्यांचा जिल्हा,
मराठवाडयाची
राजधानी

*११)नांदेड*–संस्कृत कवींचा जिल्हा

*१२)अमरावती*–देवी रुख्मिणी व
दमयंतीचा जिल्हा

*१३)बुलढाणा*–महाराष्ट्राची
कापसाची बाजारपेठ

*१४)नागपुर*—-संत्र्यांचा जिल्हा

*१५)भंडारा*—–तलावांचा जिल्हा

*१६)गडचिरोली*–जंगलांचा जिल्हा

*१७)चंद्रपुर*—-गौंड राजांचा जिल्हा

*१८)धुळे*—-सोलर सिटीचा जिल्हा

*१९)नंदुरबार*-आदिवासी बहुल
जिल्हा

*२०)यवतमाळ*-पांढरे सोने-
कापसाचा जिल्हा

*२१)जळगाव*–कापसाचे शेत,
केळीच्या बागा,
अजिंठा लेण्यांचे
प्रवेशद्वार

*२२)अहमदनगर*-साखर कारखाने
असलेला जिल्हा

*२३)नाशिक*—मुंबईची परसबाग,
द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा
गवळीवाडा

२४) सांगली – हळदीचा जिल्हा ,
कलावंतांचा जिल्हा

चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ नवी दिल्लीत संपन्न

● कालावधी :- 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2019

●विषय:- 'व्हॅल्यूइंग वॉटर - ट्रान्सफॉर्मिंग गंगा'

● उद्घाटन :- जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हस्ते

● आयोजक:-
IIT कानपूरच्या नेतृत्वात भारत सरकारचे 1.जल शक्ती मंत्रालय आणि
2.सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

▪️कार्यक्रमातल्या ठळक बाबी

- पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि त्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

-कार्यक्रमादरम्यान, 'रिव्हर रिस्टोरेशन अँड कन्झर्वेशन - ए कॉन्सिस मॅन्युअल अँड गाईड' यासंबंधीचा अहवाल तसेच आतापर्यंत विकसित केलेल्या 'गंगा हब' यांचा हवाला जाहीर करण्यात आला.
-बैठकीत ग्रामीण व शहरी भागातल्या जलसंपत्तीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
--------------------------------------------------------------
   
--------------------------------------------------------------

परावर्तन

नमुनेदार प्रतिबिंबांचे रेखाचित्र

प्रतिबिंब दोन प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते: स्पेक्युलर रिफ्लेक्शन आणि डिफ्यूज रिफ्लेक्शन्स 

. विशिष्ट प्रतिबिंब मिररसारख्या पृष्ठभागाच्या चमकांचे वर्णन करते, जे प्रकाश, सोप्या आणि अंदाजानुसार प्रतिबिंबित करते. 

हे प्रतिबिंबित प्रतिमांच्या निर्मितीस अनुमती देते जे अंतराळातील वास्तविक ( वास्तविक ) किंवा एक्स्ट्रोपोलेटेड ( आभासी ) स्थानाशी संबंधित असू शकते .

 डिफ्यूज प्रतिबिंब कागदावर किंवा रॉकसारख्या चमकदार नसलेल्या पदार्थांचे वर्णन करते. 

या पृष्ठभागावरील प्रतिबिंबांचे वर्णन केवळ आकडेवारीनुसार केले जाऊ शकते, साहित्याच्या सूक्ष्म रचनांवर अवलंबून प्रतिबिंबित प्रकाशाचे अचूक वितरण. 

लम्बर्टच्या कोसाइन कायद्याद्वारे बरेच डिफ्यूज रिफ्लेक्टर वर्णन केले आहेत किंवा अंदाजे केले जाऊ शकतातजे कोणत्याही कोनातून पाहिले असता समान चमकदार पृष्ठभागांचे वर्णन करते . 

चमकदार पृष्ठभाग सट्टेबाज आणि डिफ्यूज दोन्ही प्रतिबिंब देऊ शकतात.

०९ डिसेंबर २०१९

तुम्हाला हे माहितीच हवे - भारतातील सर्वात मोठे 10 चर्चित घोटाळे

⭐️ देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत देशात अनेक मोठे घोटाळे झाले आहे. परंतु आज आम्ही आपणास अशा घोटाळ्यांची माहिती देत आहोत ज्याची जगभरात चर्चा झाली.

1⃣ जीप घोटाळा : हा देशातील सगळ्यात पहिला घोटाळा होता. भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने लंडनमधील एका कंपनीसोबत 2000 जीपचा करार केला होता. हा करार 80 लाखांचा होता. मात्र 155 जीपच मिळू शकल्या. या घोटाळ्यात भारतीय उच्चायुक्त व्ही.के.मेनन यांचा हात असल्याचे वृत्त समोर आले होते.

2⃣ कोळसा घोटाळा : या घोटाळ्यात कोळशाचे चुकीच्या पद्धतीने वाटप झाले. कोणतीही सनदी प्रक्रिया न करता कोळशाच्या ब्लॉकचा लिलाव करण्यात आला, ज्यामुळे 1.86 लाख कोटींचे नुकसान झाले. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात हा घोटाळा झाला.

3⃣ तेलगी स्टॅम्प घोटाळा : बनावट मुद्रांक शुल्क घोटाळ्यात अब्दुल करीम तेलगीने देशाला जवळपास 20 हजार कोटींचा चुना लावला होता. अब्दुल करीम तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर छापले होते. या बनावट स्टॅम्प पेपरची बँका आणि अनेक संस्थांना त्याने विक्री केली होती.

4⃣ बोफोर्स तोफ घोटाळा : 1987 मध्ये स्वीडनची एक कंपनी बोफोर्स एबी कडून लाच घेतल्याप्रकरणी राजीव गांधीसकट अनेक मोठे नेते अडकले होते. प्रकरण असे होते की भारतीय 155 मिमी च्या फिल्ड हॉवीत्जरच्या बोलीवर या नेत्यांनी जवळपास 64 कोटींचा घपला केला होता.

5⃣ 2जी स्पेक्ट्रम घोटाळा : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा एकूण 1.76 लाख करोड रुपयांचा घोटाळा झाला. माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि कनिमोळी यांना या घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

6⃣ कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा : कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये जवळपास 70 हजार कोटींचा घोटाळा उघड आला होता. घोटाळ्याचे सूत्रधार होते आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यांचे सहकारी.या घोटाळ्यात यंत्रसामग्री निश्चित किमतीपेक्षा दुपटीने खरेदी करण्यात आली होती.

7⃣ सत्यम घोटाळा : सत्यम घोटाळा कॉर्पोरेट जगतातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आयटी कंपनी 'सत्यम कंम्प्यूटर सर्विस'ने रियल इस्टेट आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून जवळपास 14 हजार कोटींची आफरातफरी केली होती.

8⃣ चारा घोटाळा : 1996 मध्ये चारा घोटाळ्यात 900 कोटींचे नुकसान झाले, जी त्या काळची सर्वात मोठी रक्कम होती. या घोटाळ्यात बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव मुख्य आरोपी आहेत.

9⃣ हवाला स्कँडल : हवाला स्कँडल 1996 मध्ये जनतेसमोर आले. यात ज्यांची नावे समोर आली ते सरकार चालवत होते. अनेक नेत्यांवर आरोप लागले की, ते हवालाच्या दलालांकडून लाच घेत होते. या घोटाळ्यात भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव समोर आले होते.

🔟 स्टॉक मार्केट घोटाळा : स्टॉक ब्रोकर केतन पारेखने स्टॉक मार्केटमध्ये 1,15,000 कोटींचा घोटाळा केला होता. डिसेंबर, 2002 मध्ये त्याला अटक करण्यात आले होते.

विज्ञान - शोध व संशोधक

01) विमान – राईट बंधू

02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

03) रडार - टेलर व यंग

04) रेडिओ - जी. मार्कोनी

05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

06) थर्मामीटर - गॅलिलीयो

07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

08) विजेचा दिवा - एडिसन

09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स

10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

12) सायकल - मॅकमिलन

13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

16) ग्रामोफोन - एडिसन

17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

19) उत्क्रांतिवाद - डार्विन

20) भूमिती - युक्लीड

21) देवीची लस - जेन्नर

22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

23) अँटी रेबीज -लुई पाश्चर

24) इलेक्ट्रोन – थॉमसन

25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

26) न्यूट्रोन – चॅडविक

27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

अ) डेव्हिड लिप्टन ✅    
ब) गीता गोपीनाथ
क) रॉड्रिगो रॅटो    
ड) डॉमिनिक स्ट्रॉउस-कान

स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून डेव्हिड लिप्टन यांची नियुक्त करण्यात आले आहे.

प्र.२) भारत आणि ......... गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.

अ) इटली ✅
ब) फ्रान्स      
क) जर्मन
ड) अमेरिका

स्पष्टीकरण : भारत आणि इटली गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.

प्र.३) फिजी या देशाची राजधानी कोणती आहे?

अ) ओस्लो    
ब) हवाना    
क) हेलसिंकी    
ड) सुवा ✅

स्पष्टीकरण : फिजी या देशाची राजधानी सुवा हि आहे.

प्र.४) कोणती व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे?

अ) कर्णम मल्लेश्‍वरी    
ब) पी. टी. उषा ✅
क) अंजली भागवत    
ड) मेरी कोम

स्पष्टीकरण : पी.टी.उषा हि व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे.

प्र.५) ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही परिषद कुठे भरणार आहे?

अ) श्रीनगर    ✅
ब) जयपूर      
क) विजयवाडा    
ड) मुंबई

स्पष्टीकरण : ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही. परिषद श्रीनगर या ठिकाणी भरणार आहे.

प्र.६) फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली?

अ) न्या. चंद्रचूड    
ब) न्या. लोकूर ✅
क) न्या. कमल कुमार    
ड) न्या. ए. के. मिश्रा

स्पष्टीकरण : फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर न्या.लोकूर यांची नेमणूक झाली.

प्र.७) ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती कोण?

अ) सँड्रा टॉरेस    
ब) जिमी मोरालेस
क) अलेजान्ड्रो मालडोनाडो    
ड) अलेजान्ड्रो गियामॅटी ✅

स्पष्टीकरण : ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती अलेजान्ड्रो गियामॅटी हे आहेत.

प्र.८) इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?

अ) चंद्रिमा शहा  ✅
ब) देविका लाल
क) सुब्रत बॅनर्जी    
ड) कविता देसाई

स्पष्टीकरण : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून चंद्रिमा शहा यांची निवड झाली.

प्र.९) मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्‍वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?

अ) अरमान इब्राहिम    
ब) आदित्य पटेल
क) ऐश्‍वर्या पिसे    ✅
ड) समीरा सिंग 

स्पष्टीकरण : मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्‍वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती ऐश्वर्या पिसे आहे.

प्र.१०) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन ____ येथे झाले.

अ) भोपाळ
ब) नवी दिल्ली
क) भुवनेश्वर ✅
ड) आग्रा

०८ डिसेंबर २०१९

*देशातील पहिल्या कंपनी रोखे ईटीएफला अर्थात ‘भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंड’ला (ईटीएफ) केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता


देशातील पहिल्या कंपनी रोखे ईटीएफला अर्थात ‘भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंड’ला (ईटीएफ) केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी येथे केली.

तत्कालिन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेब्रुवारी २०१८ मधील अर्थसंकल्पीय भाषणात सरकारच्या कंपन्यांचा ईटीएफ सुरू करणार असल्याची घोषणा केली होती.

भारत बॉन्ड ईटीएफ हा भारतात सुरू होणारा पहिला कंपनी रोखे ईटीएफ असेल.

किरकोळ गुंतवणूकदारांना भारत बाँड ईटीएफमध्ये किमान १,००० रुपये गुंतवणूक करण्याची अनुमती असून भारत बॉन्ड ईटीएफला ‘आम जनता’ किंवा ‘आम आदमी’ लक्ष्य असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

या माध्यमातून सरकारला निधी उभारणी करता येणार आहे. या ईटीएफमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचा तपशील संबंधितांशी चर्चा झाल्यानंतर निश्चित केला जाईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. Are

PMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थव्यवस्थेला खिळ: राजन

- सर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात  एकवटल्याने इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत त्यामळे भारतीय  झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे.

- अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन, कामगार कायदा या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज राजन यांनी व्यक्त केली आहे.

- राजन म्हणतात की भारताने मुक्त व्यापार करारात उत्स्फूर्तपणे सहभागी झालं पाहिजे. यामुळं देशात स्पर्धा निकोप होईल आणि देशांतर्गत कार्यक्षमता वाढेल, असं राजन यांनी म्हटलं आहे.

- अर्थव्यवस्थेचं गणित कुठं बिघडलं हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा पंतप्रधान कार्यालयात झालेले अधिकारांचे केंद्रीकरण आहे. इथले निर्णय आणि नवं कल्पना या पंतप्रधान आणि आजूबाजूच्या मोजक्या लोकांकडून घेण्यात येत

-  आल्याबद्दल राजन यांनी नाराजी व्यक्त केली. ही यंत्रणा पक्ष आणि राजकारण करण्यासाठी योग्य आहे. मात्र अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी राज्य पातळीऐवजी राष्ट्रीय पातळीवर व्यापक विचार करणारी दृष्टी आणि तज्ज्ञ आवश्यक्य आहेत, असे राजन यांनी म्हटलं आहे.
-------------------------------------------------

पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि केरळ या राज्यांच्या स्थापना दिन – 1 नोव्हेंबर

🔴 भारत - 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश (जम्मू व काश्मीरचा राज्याचा दर्जा रद्द तर जम्मू व काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती).

✅ हरियाणा -
▪️ स्थापना: सन 1966 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: चंदीगड.

✅कर्नाटक -
▪️स्थापना: सन 1956 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: बेंगळुरू.

✅ केरळ -
▪️स्थापना: सन 1956 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: तिरुवनंतपुरम.

✅ मध्यप्रदेश -
▪️स्थापना: सन 1956 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: भोपाळ.

✅ छत्तीसगड -
▪️ स्थापना: सन 2000 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: रायपूर.

✅ पंजाब -
▪️ स्थापना: सन 1966 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: चंदीगड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महत्वाचे व्यक्ती विशेष

💬 पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश - न्यायमूर्ती रविशंकर झा.

💬 हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती एल. एन. स्वामी.

💬 राजस्थान उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती इंद्रजित महंती.

💬 केरळ उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती ए. मणी कुमार.

💬 गुवाहाटी उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती अजय लांबा.

💬 आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी.

💬 सिक्कीम उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती ए. के. गोस्वामी.

💬 24व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एशियन स्टार अवॉर्ड’चा विजेता
- तनिष्ठा चटर्जी (‘रोम रोम में’ चित्रपटाची दिग्दर्शिका).

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सहाय्यक कामगार आयुक्त(Class-I) अनघा कार्ले मॅम यांनी MPSC Rajyaseva Prelims 2020 परीक्षेसाठी सुचवलेली पुस्तक सूची





Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...