०८ डिसेंबर २०१९

साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान..

🔰यंदा 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  उस्मानाबाद येथे 10 ते 12 जानेवारी दरम्यान होत आहे.

🔰तर दर वर्षी संमेलनामध्ये एक प्रकाशक आणि एका साहित्यिकाचा विशेष सन्मान केला जातो. साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान केला जाणार आहे.

🔰तसेच शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना संमेलनात गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचाही सन्मान होणार आहे.

🔰साहित्य संमेलनात महिला साहित्यिकांना अध्यक्षपद भुषवण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून एक साहित्यिक आणि एक प्रकाशक यांचा संमेलनात विशेष सन्मान केला जातो.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात भारताची 41 पदकांची कमाई.

🔰दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या पाचव्या दिवशी भारताने एकूण 41 पदकांची कमाई करीत अग्रस्थान कायम राखतानाच यजमान नेपाळपासूनचे अंतरही वाढवले आहे.

🔰भारताने 19 सुवर्ण, 18 रौप्य आणि चार कांस्यपदकांची भर घातली. आता भारताच्या खात्यावर 81 सुवर्ण, 59 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 165 पदके जमा आहेत.

🔰तर दुसऱ्या स्थानावरील नेपाळच्या खात्यावर 116 पदके (41 सुवर्ण, 27 रौप्य, 48 कांस्य) जमा आहेत. शुक्रवारी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णपदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले.

पंतप्रधानांना 'सैनिक फ्लॅग' लावण्याचा मान पंढरपूरच्या वीरकन्येला!

◾️ सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी (ता.7) करण्यात आला.

◾️पुण्यातील राजभवन येथे भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

◾️पुणे येथे शनिवारपासून देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषद भरविण्यात आली आहे.

◾️त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते.

◾️यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

◾️पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला.

◾️कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.

◾️यावेळी वीरपत्नी श्रीमती उमाताई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या निधीचा उपयोग सैनिक कल्याणकारी योजनेसाठी करण्यात येतो.

तुम्हाला माहीत आहे का - फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस का असतात ?

सध्याचे कॅलेंडर हे रोमन कॅलेंडर पासून प्रेरित झालेले आहे. इसवी सन पूर्व रोमन कॅलेंडरमध्ये फक्त 10 च महिने होते. मार्चपासून डिसेंबर पर्यंतच महिने होते.

👉 डिसेंबर ते फेब्रुवारी थंडी खूप असल्याने त्या दिवसात कुठलेच कामे होत नसायची आणि शेवटचे 60 दिवस डिसेंबरमध्येच जोडले जायचे.

👉 काही कालावधीनंतर रोमन राज्यकर्त्यांनी यात सुधार केला आणि डिसेंबर नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने टाकण्यात आले.

👉 यानुसार फेब्रुवारी हा शेवटचा महिना झाला आणि शेवटी उरलेले दिवस फेब्रुवारीमध्ये टाकण्यात आले. त्यावेळेस फेब्रुवारीत 28च दिवस उरले.

👉 नंतर ज्युलियस सीजर या रोमन राजाने प्रथा बदलून जानेवारीपासून वर्षाची सुरुवात केली. पण फेब्रुवारीमधील दिवसांची संख्या मात्र तीच राहिली. नंतर काही भौगोलिक कारणांनी लीप वर्षात एक दिवस जास्त असतो हा शोध लागला.

👉 हा दिवस अॅडजस्ट करण्यासाठी सोयीस्कर महिना फेब्रुवारी सापडला कारण यात आधीच कमी दिवस होते. म्हणून लीप वर्षी फेब्रुवारी 29 दिवसांचा असतो.

पोलीस भरती प्रश्नसंच

📍'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि अचूक विधान ओळखा.

1. पुरस्काराला "पर्यायी नोबेल पुरस्कार" म्हणून ओळखले जाते.

2. 2019 साली हा पुरस्कार केवळ ग्रेटा थनबर्ग यांना देण्यात आला.

(A) केवळ 1✅
(B) केवळ 2
(C) 1 आणि 2 दोन्ही
(D) ना 1 ना 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2019 मध्ये 65,000 कोटी रुपये खर्च असलेल्या औद्योगिक प्रकल्पांना सुरूवात करण्याची योजना तयार केली आहे?

(A) आंध्रप्रदेश
(B) कर्नाटक
(C) उत्तरप्रदेश✅
(D) गुजरात

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत?

(A) दिनबंधू महापात्रा
(B) निलेश शाह✅
(C) अरुंधती भट्टाचार्य
(D) चंदा कोचर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍‘IMD जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’ या यादीत भारताचे स्थान काय आहे?

(A) 46
(B) 44✅
(C) 48
(D) 43

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍DSC पारितोषिक हा _ क्षेत्रातला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

(A) सिनेमा / चित्रपट
(B) साहित्य ✅
(C) संगीत
(D) वास्तुशिल्पी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍2019 सालाच्या जागतिक पर्यटन दिनाचा विषय काय होता?

(A) Tourism and Safety – A better future for all.
(B) Tourism and Cultural Protection.
(C) Tourism and diversity.
(D) Tourism and Jobs – A better future for all.✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍कोणत्या ठिकाणी 26 सप्टेंबर 2019 रोजी SAARC मंत्रिस्तरीय परिषदेची बैठक आयोजित केली गेली होती?

(A) न्यूयॉर्क ✅
(B) श्रीलंका
(C) नवी दिल्ली
(D) बांग्लादेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स .........

पर्याय

१) याने पोर्तुगीजांकडून जिंकले होते
२) याला लग्नामध्ये आंदण मिळाले
३) याने पोर्तुगीजांना भेट दिले होते
४) याच्या मते १० बेटांचा प्रदेश आहे

उत्तर 2)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 योग्य जोड्या लावा

रक्तातील घटक         वैशिष्ट्य
अ. लाल रक्त पेशी     १. १२० दिवसांचे आयुष्य           
       
ब.  पांढऱ्या रक्त पेशी  २. प्रमाण १.५० लाख ते ३.५० लाख प्रति mm-3   

क. रक्तपटीक         ३. पिवळसर रंग

ड. रक्तद्रव्य             ४. शास्त्रीय नाव
Leucocytes

पर्याय
    अ    ब    क    ड
१) २.   ३.   १.    ४.  
२) १.   ३.   २.    ४.
३) १.   ४.   २.    ३.
४) २.   १.   ३.    ४.

उत्तर 3)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍खालील विधानांमधून योग्य विधान निवडा.

अ) कलम १५ मध्ये धर्म जात वंश लिंग जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव नाही अशी तरतूद आहे.

ब) कलम २२ व २४ मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क नमूद केले आहेत.

पर्याय
१) फक्त अ
२) फक्त ब
३) दोन्ही नाही
४) दोन्ही

उत्तर 1)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 जर CAQ = 5040, YAW = 60055, तर MOQ = ?
पर्याय

१) ३०५५४५
२) ३०३५४०
३) ३५५०४०
४) सांगता येत नाही

उत्तर 2)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 १५ सायकलींची संख्या १६५०० आहे, तर १७ सायकलींची किंमत किती?

A) १९७००
B) १८५००
C) १८७०० ✅✅
D) १७५००

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 Central Board of Film (Censor Board) मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?

A) सुभाष घई
B) श्याम बेनेगल ✅✅
C) पहलाज निहलानी
D) संजय लीला भन्साळी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 द.सा.द. शे. ३ दराने २५०० रुपयाचे १४६ दिवसात किती सरळ व्याज होईल?

A) ४५ रु.
B) ३० रु. ✅✅
C) ३३ रु.
D) ३५ रु.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 “ओनामा करणे” या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता?

A) प्रारंभ करणे ✅✅
B) स्तुती करणे
C) मार देणे
D) आरडाओरड करणे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 अनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण?

A) मामी
B) सासू ✅✅
C) काकू
D) आत्या
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुम्हाला पाठ आहेत का ? - 2019 नोबेल पुरस्कार विजेते

💁‍♂ जगभरात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराचे 2019 सालातील मानकरी जाणून घेऊयात...

▪ भौतिकशास्त्र : जिम पीबल्स, मिशेल मेयर, डिडिएर क्वेलोज

▪ रसायनशास्त्र : अकिरा योशिनो, एम.स्टेनली विटिंगम, जॉन बी. गुडएनफ

▪ फिसिओलॉजी किंवा मेडिसिन : विलियम जी. केलिन, ग्रेग एल. सेमेंजा, पीटर जे. रेटक्लिफ

▪ साहित्य : पीटर हैंडके

▪ नोबेल पुरस्कार शांती : अबी अहमद अली

▪ अर्थशास्त्र : अभिजीत बनर्जी, इस्थेर डुफलो, माइकल क्रेमर

पोलीस भरतीसाठी आजचे महत्वाचे प्रश्न

1) कोणत्या विषाणूमुळे विषमज्वर होतो?
उत्तर : साल्मोनेला टायफी

2) पिण्याचे पाणी तपासण्यासाठी BISद्वारे कोणते मानक ठरवण्यात आले आहे?
उत्तर : इंडियन स्टँडर्ड 10500:2012

3) आदी महोत्सव 2019 या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशात “NISHTHA” ही राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

5) कोणत्या शहरात CPR प्रशिक्षणाच्या बाबतीत गिनीज विक्रम करण्यात आला?
उत्तर : कोची

6) कोणते राज्य 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ‘वाळू आठवडा’ पाळत आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

7) ‘ब्रह्मपुत्र पुष्करम’ हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने आयोजित केला?
उत्तर : आसाम

8) राष्ट्रीय नदी गंगा विधेयक-2019 नुसार, गंगा नदी प्रदूषित केल्यास दंड काय असू शकतो?
उत्तर : 50 कोटी रुपये आणि 5 वर्षांचा तुरुंगवास

9) राष्ट्रीय पत्र दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 16 नोव्हेंबर

10) UNESCOच्या शिक्षण आयोगाच्या प्रमुखपदी कोणत्या देशाची निवड झाली?
उत्तर : पाकिस्तान

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?
   1) अपसरण चिन्ह    2) स्वल्पविराम    3) अपूर्ण विराम    4) संयोग चिन्ह
उत्तर :- 4

2) पुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा.
     भाषेच्या अलंकाराचे ................ हे दोन मुख्य प्रकार आहेत.
   1) यमक – अनुप्रास    2) अनन्वय – दृष्टान्त  3) अन्योक्ती – स्वभावोक्ती  4) शब्दालंकार आणि अर्थालंकार
उत्तर :- 4

3) ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे  ?
   1) अभ्यस्त      2) सामासिक    3) प्रत्ययसाधित    4) यापैकी कोणताही नाही
उत्तर :- 1

4) ‘माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’
      वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
   1) अभिधा      2) लक्षणा    3) व्यंजना    4) धववाणी
उत्तर :- 3

5) ‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
   1) जलद      2) कसर      3) पथ      4) वीज
उत्तर :- 4

6) ‘इ, ई’ – या स्वरांची उच्चारस्थाने लिहा.
   1) तालव्य    2) मूर्धव्य      3) दन्त्य      4) ओष्ठय

उत्तर :- 1

7) ‘मनोरथ’ या शब्दाचा विग्रह –

   1) मन + रथ    2) मनो + रथ    3) मन + ओरथ    4) मन: + रथ

उत्तर :- 4

8) ज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून येतो किंवा बदल करता येते त्या शब्दांना ........... असे म्हणतात.

   1) विकारी    2) अविकारी    3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 1

9) पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.

   1) वकिली    2) गुलाम      3) गायक      4) लबाड

उत्तर :- 1

10) ‘मी स्वत: त्याला पाहिले,’ या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) अनिश्चित    2) संबंधी      3) दर्शक      4) आत्मवाचक

उत्तर :- 4

धोंडो केशव कर्वे बालपण

रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.

इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला.
राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. 

लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

विद्यासागर, ईश्वरचंद्र

 (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवतीदेवी असे होते. प्राथमिक शिक्षण जन्मगावी घेऊन कलकत्त्याच्या (कोलकात्याच्या) संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. १८३९ साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती; म्हणून बंदोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले. ते अठरा वर्षांचे असताना त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्‍न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला.

☘🔶☘🔶☘🔶☘🔶☘🔶☘🔶

चालू घडामोडी प्रश्नसंच

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
प्रश्न ०१) 13 नोव्हेंबर 2019 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'www.caneup.in' आणि 'ई-गन्ना' मोबाइल अ‍ॅप वेब पोर्टल लॉन्च केले.  हे वेब पोर्टल आणि मोबाइल अॅप द्वारा विकसित केले गेले आहे
(अ) माहिती तंत्रज्ञान विभाग
(ब) राष्ट्रीय माहिती केंद्र
(क) साखर उद्योग व ऊस विकास विभाग
(ड) उत्तर प्रदेश माहिती विभाग

उत्तर- (क)

प्रश्न ०२) 27-नोव्हेंबर, 2019 दरम्यान 27 व्या केंद्र आणि राज्य सांख्यिकी संघटना परिषद कोठे संपन्न झाली? 
(अ) नवी दिल्ली
(ब) पुणे
(क) मुंबई
(ड) कोलकाता

उत्तर- (ड)

प्रश्न ०३) 11-नोव्हेंबर, 2019 दरम्यान भारत-आसियान व्यवसाय समिट कोठे आयोजित केली गेली होती? 
(अ) जयपूर
(ब) नवी दिल्ली
(क) कोलकाता
(ड) भुवनेश्वर

उत्तर- (ब)

प्रश्न ०४) संयुक्त व्याघ्र सेना मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) व्यायाम 'भारत आणि कोणत्या देशांत 13 ते 21 नोव्हेंबर 2019 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे?  (अ) रशिया
(ब) इंडोनेशिया
(क) अमेरिका
(ड) मंगोलिया

उत्तर- (क)

प्रश्न ०५) 10 नोव्हेंबर 2019 ते 10 डिसेंबर 2019 या काळात ई-सिगारेट व इतर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणालीची उपलब्धता आणि वापर तपासण्यासाठी कोणते राज्य पोलिस विशेष मोहीम राबवित आहेत?
(अ) उत्तर प्रदेश
(ब) मध्य प्रदेश
(क) हरियाणा
(ड) कर्नाटक

उत्तर- (क)
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

झटपट 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1) ‘हँड इन हँड’ हा कोणत्या देशादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे?
उत्तर : चीन आणि भारत

2) “गुलामीच्या उन्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन” कधी साजरा केला जातो?
उत्तर : 02 डिसेंबर

3) राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 2 डिसेंबर

4) नागालँडचा राज्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 1 डिसेंबर

5) 'गेस्ट ऑफ ऑनर कंट्री' हा सन्मान मिळविणारा पहिला आशियाई देश कोणता?
उत्तर : भारत

6) महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती पदावर कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
उत्तर : नाना पटोले

7) हज यात्रेविषयीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालविणारा पहिला देश कोणता?
उत्तर : भारत

8) संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेचे COP 25 सत्र कुठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर : मॅड्रीड

9) सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचा अंतिम सामना कोणी जिंकला?
उत्तर : वांग त्झू वेई

10) 13 वे ‘दक्षिण आशियाई खेळ’ या क्रिडास्पर्धेला कोणत्या ठिकाणी औपचारिकपणे सुरुवात झाली?
उत्तर : काठमांडू

०७ डिसेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ध्वन्यर्थ म्हणजे –

   1) व्यंजना शब्दशक्तीमुळे सुचित होणारा अर्थ      2) भाषेतील मूलध्वनींचा अर्थ
   3) अभिधा शक्तीमुळे जाणवणारा अर्थ      4) लक्षणा शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ
उत्तर :- 1

2) खालील शब्दाला पर्याय सांगा. – ‘खग’

   1) आकाशात फिरणारे    2) पक्षी   
   3) जलचर      4) उडता न येणारे

उत्तर :- 2

3) ‘सुवाच्य’ याचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही ?

   1) गिचमिड    2) दुर्बोध   
   3) अवाचनीय    4) अर्वाच्य

उत्तर :- 4

4) ‘अल्पज्ञानाने ताठा मिरविणे’ म्हणतात ना ........................

   1) उथळ पाण्याला खळखळाट फार      2) नाचता येईना अंगण वाकडे
   3) उंटावरचा शहाणा        4) आढे वेढे घेणे

उत्तर :- 1

5) पुढील वाक्यप्रचाराशी योग्य अर्थ सांगणारा पर्याय शोधा : गाशा गुंडाळणे.

   1) माशा मारणे    2) निघून जाणे   
   3) वाट लावणे    4) चादर पांघरणे

उत्तर :- 2

6) खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

   अ) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण म्हणतात.
   ब) ज्या शब्दांपासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दांस क्रियापदे असे म्हणतात.
   क) सर्वनाम ही नामप्रमाणे लिंग, वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्दजाती नाही तर ती स्वतंत्र आहे.

   1) अ व ब बरोबर    2) ब व क बरोबर   
   3) अ व क बरोबर    4) अ, ब व क बरोबर

उत्तर :- 1

7) खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

   1) बलिष्ट    2) बलीष्ट     
   3) बलिष्ठ    4) भलिष्ट

उत्तर :- 3

8) पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.

   1) प्    2) ख्   3) भ्   4) ध्

उत्तर :- 1

9) ‘नीरव’ या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो ?

   1) नि: + रव    2) नी + रव   
   3) नि + रव    4) नी: + रव

उत्तर :- 1

10) ‘धर्मीवाचक’ नामे कशास म्हणतात ?

   1) सामान्यनामे व विशेषनामे    2) सर्वनामे व विशेषणे
   3) सामान्यनामे व सर्वनामे      4) विशेषनामे व सर्वनामे

उत्तर :- 1

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ध्वन्यर्थ म्हणजे –

   1) व्यंजना शब्दशक्तीमुळे सुचित होणारा अर्थ      2) भाषेतील मूलध्वनींचा अर्थ
   3) अभिधा शक्तीमुळे जाणवणारा अर्थ      4) लक्षणा शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ
उत्तर :- 1

2) खालील शब्दाला पर्याय सांगा. – ‘खग’

   1) आकाशात फिरणारे    2) पक्षी   
   3) जलचर      4) उडता न येणारे

उत्तर :- 2

3) ‘सुवाच्य’ याचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही ?

   1) गिचमिड    2) दुर्बोध   
   3) अवाचनीय    4) अर्वाच्य

उत्तर :- 4

4) ‘अल्पज्ञानाने ताठा मिरविणे’ म्हणतात ना ........................

   1) उथळ पाण्याला खळखळाट फार      2) नाचता येईना अंगण वाकडे
   3) उंटावरचा शहाणा        4) आढे वेढे घेणे

उत्तर :- 1

5) पुढील वाक्यप्रचाराशी योग्य अर्थ सांगणारा पर्याय शोधा : गाशा गुंडाळणे.

   1) माशा मारणे    2) निघून जाणे   
   3) वाट लावणे    4) चादर पांघरणे

उत्तर :- 2

6) खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

   अ) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण म्हणतात.
   ब) ज्या शब्दांपासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दांस क्रियापदे असे म्हणतात.
   क) सर्वनाम ही नामप्रमाणे लिंग, वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्दजाती नाही तर ती स्वतंत्र आहे.

   1) अ व ब बरोबर    2) ब व क बरोबर   
   3) अ व क बरोबर    4) अ, ब व क बरोबर

उत्तर :- 1

7) खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

   1) बलिष्ट    2) बलीष्ट     
   3) बलिष्ठ    4) भलिष्ट

उत्तर :- 3

8) पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.

   1) प्    2) ख्   3) भ्   4) ध्

उत्तर :- 1

9) ‘नीरव’ या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो ?

   1) नि: + रव    2) नी + रव   
   3) नि + रव    4) नी: + रव

उत्तर :- 1

10) ‘धर्मीवाचक’ नामे कशास म्हणतात ?

   1) सामान्यनामे व विशेषनामे    2) सर्वनामे व विशेषणे
   3) सामान्यनामे व सर्वनामे      4) विशेषनामे व सर्वनामे

उत्तर :- 1

मुंबई सेंट्रल: “ईट राइट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक

मुंबई सेंट्रल रेलवे स्थानक हे FSSAI कडून फोर स्टार रेटिंगसह “ईट राइट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ठरले आहे.

‘ईट राइट इंडिया’ चळवळ

भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांनी सन 2018 मध्ये ‘ईट राइट इंडिया’ चळवळ राबवविण्यास सुरुवात केली. प्रवाश्यांना निरोगी आणि स्वच्छ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी ही मोहीम चालवली जात आहे.

या कार्यक्रमात खाद्यान्न सुरक्षा व स्वच्छतेसंबंधी नियमांची अंमलबजावणी, निरोगी आहाराची उपलब्धता, पुरवठा केंद्र, खरखट्याचे व्यवस्थापन, अन्नपदार्थांची हाताळणी, स्थानिक आणि हंगामी खाद्यपदार्थाची जाहिरात आणि जनजागृती अश्या विविध मुद्द्यांना लक्षात घेण्यात आले आहेत.

त्यासंदर्भात विभागीय रेल्वे क्षेत्र यांच्या सहयोगाने FSSAI आणि IRCTC यांच्यातर्फे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) 

FSSAI याची स्थापना 2011 साली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत झाली. भारतात खाद्यान्न सुरक्षा आणि त्याच्या नियमनाशी संबंधित कायदेशीर चौकट प्रदान करणार्‍या ‘खाद्यान्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006’ याच्या अन्वये FSSAIची स्थापना करण्यात आली. ही एक स्वायत्त संस्था आहे. त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.

चालू घडामोडी:- 7/12/2019

● भारत आणि रशिया या देशांच्या ‘इंद्र 2019’ या संयुक्त त्रै-सेवा लष्करी सराव..............या ठिकानी सुरू आहे.
  - बबीना, पुणे आणि गोवा.

● भारत सरकारने ................या देशातल्या मोंगला आणि चटोग्राम बंदरांना ‘पोर्ट ऑफ कॉल’ (मध्यथांबा) म्हणून घोषित केले - बांग्लादेश.

● पोलीस ठाण्यांमध्ये ‘वुमेन हेल्प डेस्क’ची स्थापना करण्यासाठी गृह मंत्रालयाने ............या कोषामधून 100 कोटी रुपये मंजूर केलेत - निर्भया कोष.

● 6 डिसेंबर रोजी झालेल्या ‘सामाजिक परिवर्तनासाठी महिलांचे सशक्तीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे स्थळ .........हे आहे - माउंट अबू, राजस्थान.

● 6 डिसेंबर रोजी झालेली  चौथे ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’.........येथे आयोजित करण्यात आली होती.
- दिल्ली.

● CBSEशी संलग्न शाळांमध्ये सत्र 2019-20 पासून नववीच्या वर्गात.......हा नवीन विषय शिकविला जाणार आहे
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...