०५ डिसेंबर २०१९

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 5/12/2019

१) असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधीत केली आहे ?
    1) 10 
    2) 14 
    3) 19    
    4) 21

उत्तर :- 2

२) पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?

   अ) एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या, त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरविले जाऊ शकत  नाही.

   ब) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही.

   क) कोणीही स्वत:विरुध्द साक्षीदार होऊ शकत नाही.

   1) अ   
  2) ब   
  3) क    
4) वरील सर्व

उत्तर :- 3

३) “स्वातंत्र्य समतेपासून वेगळे/अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व
     समतेला बंधुते पासून वेगळे करता येणार नाही.” हे उद्गार कोणाचे आहेत ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरु   
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
    3) डॉ. एस. राधाकृष्णन 
    4) डॉ. बी. आर. आंबेडकर

उत्तर :- 4

४). अ) भारताच्या राज्यघटनेत ‘अल्पसंख्य’ शब्दाची व्याख्या नाही.

    ब) अल्पसंख्यांक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था नाही.

   1) अ आणि ब बरोबर आहेत, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब बरोबर आहे, ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ बरोबर आहे, पण ब चूक आहे.

   4) अ चूक आहे, पण ब बरोबर आहे.

उत्तर :- 2

५) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ................... यांनी ‘सर्वात टिकात्मक भाग’ असे केले आहे  ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरु  
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
   3) सरदार वल्लभभाई पटेल   
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

६) खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा,व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?

   अ) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.

   ब) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा  अधिकार राज्यसंस्थेला असेल.

   क) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकांवर लादता येईल.

   ड) अशी बंधने प्रशासकीय आदेशाव्दारेही लादता येतील.

   1) अ, ब 
   2) क, ड  
   3) अ, ब, क  
   4) अ, ब, क, ड

उत्तर :- 3

७) योग्य कथन / कथने ओळखा.
   अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.
   ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे.
   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे

   2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
  
  4) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची
,
उत्तर :- 3

८) सार्वजनिक सेवेच्या (Public employment) अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने  सत्य आहेत ?

   अ) संसद कायदा करुन सार्वजनिक नोक-यांकरिता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.

  ब) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरिता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू  शकते.

   क) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.

   ड) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या  वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात.

   1) अ, ब   
   2) अ, ड   
   3) अ, ब, क, ड  
   4) अ

उत्तर :- 4

९) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ............. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरू 
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
   3) सरदार वल्लभभाई पटेल   
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

१०) कालानुक्रमे मांडणी करा:

   अ) अंतर्गत सुरक्षा कायदा    
   ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा
   क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा   
   ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा

   1) ब, अ, ड, क    2) अ, ब, क, ड    3) क, ड, अ, ब    4) ब, ड, क, अ

उत्तर :- 1

११) कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

   1) 84 वी घटना दुरुस्ती   

  2) 85 वी घटना दुरस्ती

   3) 86 वी घटना दुरुस्ती   

  4) 87 वी घटना दुरुस्ती

उत्तर :- 3

१२) समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या अंतर्भाव होतो ?

   अ) कायद्यासमोर समानता   
   ब) अस्पृश्यतेची समाप्ती
   क) पदव्यांची समाप्ती   
   ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य

   1) अ, ब, ड    2) अ, क, ड   
3) क, अ, ब    4) ब, ड, क

उत्तर :- 3

१३).  खालील विधाने विचारात घ्या :

   अ) मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत.

   ब) राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे.

   क) एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत.

         वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब 
   2) ब आणि क  
   3) अ आणि क 
   4) अ, ब आणि क

उत्तर :- 4

१४).  मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की, .............
     ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे.

   1) सीडॉ (CEDAW)    

2) युएनडीपी (UNDP)

3) सीइसीएसआर (CECSR)  

4) युएनसीएचआर (UNCHR)

उत्तर :- 1

१५).  योग्य कथन / कथने ओळखा :

   अ) अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.

   ब) 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.

   1) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे 

    2) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर

   3) दोन्ही कथने अ आणि ब  बरोबर
आहेत

   4) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत

उत्तर :- 2

१6) खालील विधाने पहा :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पूश्यता नष्ट करण्यात आली आहे.

   ब) भारतीय राज्यघटनेच्या 52 व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी विषयक तरतूदी लागू करण्यात आल्या.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ   
   2) ब   
   3) अ, ब  
   4) यापैकी  नाही

उत्तर :- 3

17) भारतीय संविधान (पहिली सुधारणा) कायदा 1950 कशासाठी आहे.

   अ) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निर्बंध

   ब) व्यापार, धंदे किंवा सेवा यावर अर्हतेचे निकष

   क) लोकसभेतील प्रतिनिधित्व पुर्ननिर्धारित केले गेले

   ड) राज्यांकरिता केंद्रीय अधिनियमावर त्यांचे मत कळविण्यासाठी कालावधी निर्धारित केला गेला.

   1) अ, ब    2) क, ड   
   3) ब, क      4) अ आणि क

उत्तर :- 1

18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले होते ?

     “स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदा-या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि  त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ती आपल्या जबाबदा-यांच्या ओझ्याखाली दबून जाईल.”

   1) मूलभूत हक्क   

    2) सांघिक कार्यकारी मंडळाचे अधिकार
   3) राज्य धोरणांची निदेशक तत्वे  

   4) नियोजन आयोग

उत्तर :- 3

19) खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :

   अ) प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मुलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत.

   ब) देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.

   1) विधान अ सत्य आहे मात्र ब चुकीचे आहे

   2) विधान ब सत्य आहे मात्र अ चुकीचे आहे

   3) दोन्ही विधाने सत्य आहेत

   4) दोन्ही विधाने असत्य आहेत

उत्तर :- 3

20).खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.

     विधी मंत्रालयाने तयार केलेला मसूदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबध्दता वाढविणारे विधेयक मे 1975
     मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली.
अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते ?

   1) विधीमंडळाची सक्रियता   
   2) आत्यंतिक विधीवाद
   3) कार्यकारी मंडळाची सक्रियता   
   4) प्रशासकीय सक्रियता

   उत्तर :- 2

०४ डिसेंबर २०१९

भारतीय राज्यघटना काही महत्त्वाचे प्रश्न


Q) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

   1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 

    2) मुद्रण स्वातंत्र्य

   3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2✅✅✅

Q) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व 
   ब) देशाची एकता   
   क) प्रांताची सुरक्षितता  
   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी

   1) अ, क    2) ब, ड    
  3) अ, ब      4) ड

उत्तर :- 3✅✅✅

Q) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क   
   2) स्वातंत्र्याचा हक्क 
   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 
  4) मालमत्तेचा हक्क

उत्तर :- 4✅✅✅

Q) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा. 

   1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)
   2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)

उत्तर :- 3✅✅✅

Q) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या
अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या   
        अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.

         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ  
2) केवळ ब आणि क   
3) केवळ अ आणि क   
4) केवळ अ, ब आणि क

उत्तर :- 4✅✅✅

चालू घडामोडी प्रश्नसंच

1) भारतात दरवर्षी ............................. महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो.
   1) डिसेंबर    2) सप्टेंबर    3) जून      4) ऑगस्ट
उत्तर :- 2✅✅✅

2) ‘रन फॉर लाडली हाफ मॅरेथॉन स्पर्धा’ कोणत्या कारणसाठी आयोजित करण्यात आली होती ?
   1) महिला सुरक्षासंबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी
   2) लहान मुलांबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी
   3) लहान मुलींच्या भविष्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी
   4) दिव्यांगाप्रती लोकांमध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी
उत्तर :- 1✅✅✅

3) जागतिक आरोग्य संघटनेत ज्येष्ठ पद धारण करणा-या पहिल्या भारतीय व्यक्ती ........................ आहेत.
   1) डॉ. सौम्या स्वामीनाथन    2) डॉ. कादंबिनी गांगुली
   3) बॅरी सी. बरीश      4) डॉ. इंदिरा हिन्दूजा
उत्तर :- 1✅✅✅

4) .................. जगातील असा एक देश जेथे स्त्रियांना चार चाकी गाडी चालवण्याची परवानगी नव्हती परंतु जून 2018 पासून तशी
     परवानगी देण्यात आली.
   1) इराक    2) सऊदी अरेबिया   
   3) कतार    4) इरान

उत्तर :- 2✅✅✅

5) भारतात वार्ताहरांचे हल्ल्यापासून संरक्षण करणारा कायदा मंजूर करणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले आहे ?
   1) गोवा    2) हरियाणा    3) महाराष्ट्र    4) मध्यप्रदेश
उत्तर :- 3 ✅✅✅

Super - 30 Questions 4/12/2019

1.   भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण बनली आहेत?
✅.   लेफ्टनंट शिवांगी

2.    ‘YSR मत्स्यकारा भरोसा’ योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
✅.  आंध्रप्रदेश

3.   ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक 2019’ कोणी जिंकले?
✅.    ग्रेटा थुनबर्ग

4.    “हाऊ ए फॅमिली बिल्ट ए बिजनेस अँड ए नेशन” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅.  गिरीश कुबेर

5.   “अॅग्रोव्हिजन 2019” या भारताच्या प्रमुख कृषी शिखर परिषदेची संकल्पना काय आहे?
✅.   स्मार्ट टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

6.  “शिखर से पुकार” हे शब्द कशाशी संबंधित आहे?
✅.  जलसंधारण विषयक माहितीपट

7.   दहशतवादविरोधी टेबल-टॉप सराव प्रथम कोणत्या संस्थेकडून आयोजित करण्यात आला?
✅.  राष्ट्रीय अन्वेषण विभाग

8.  ‘कार्टोसॅट-3 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे?
✅.  PSLV C47

9.   आरबीआयच्या माहितीनुसार भारताचा परकीय चलन साठा किती आहे?
✅.    448.249 अब्ज डॉलर

10.    ‘जागतिक दूरदर्शन दिन’ कधी साजरा केला जातो?
✅.  21 नोव्हेंबर

11.   कोणत्या राज्यात ‘संगई महोत्सव’ आयोजित केला जातो?
✅.   मणीपूर

12.   ‘एमिशन्स गॅप रिपोर्ट’ हा अहवाल कोणती संघटना प्रसिद्ध करते?
✅.  UNEP

13.   IRDAI सुचविलेल्या नव्या टेलिमॅटिक्स मोटर विम्याचे नाव काय आहे?
✅.   नेम्ड ड्रायव्हर पॉलिसी

14.   12वा ‘फिल्म लंडन जरमन’ पुरस्कार कोणी जिंकला?
✅.    हितेन पटेल

15.   47 व्या आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्काराचा सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार कुणी जिंकला?
✅.   मॅकमाफिया

16.   भारतात ‘राष्ट्रीय दुग्ध दिन’ कधी साजरा केला जातो?
✅.  26 नोव्हेंबर

17.    WATEC 2019 परिषद कुठे आयोजित करण्यात आली?
✅.  इस्त्राएल

18.    “वॉटर 4 चेंज” नावाचा प्रकल्प कोणत्या राज्यात राबवण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
✅.  केरळ

19.   "राष्ट्रीय युवा संसद योजना"च्या संकेतस्थळाचे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले?
✅.   भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद

20.    महिलांवरील अत्याचारांच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो?
✅.    25 नोव्हेंबर

21.   ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
✅.  इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस

22.   ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
✅.   नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

23.   यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
✅.   संयुक्त राज्ये अमेरिका

24.  "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
✅.  आसाम सरकार

25.   भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
✅.  किरण मजुमदार-शॉ

26.   नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
✅.   31 डिसेंबर 2020

27.   राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
✅.   लडाख

28.  ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
✅.  चित्रेश नतेसन

29.   "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
✅.  वाराणसी

30.   ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
✅.   Climate Emergency

चालू घडामोडी प्रश्नसंच 4/१२/२०१९

📍 2019 वरिष्ठ कुस्ती राष्ट्रीय स्पर्धेत 55 किलोग्राम वजन गटाचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

(A) विनेश फोगट✅✅
(B) साक्षी मलिक
(C) अनिता श्योरन
(D) दिव्या काकरान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी ________ या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो.

(A) 30 ऑक्टोबर
(B) 26 नोव्हेंबर
(C) 2 डिसेंबर✅✅
(D) 3 डिसेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने __________  कडून प्राप्त निधीच्या मदतीने “इंटीग्रेटेड रोड अॅक्सिडेंट डेटाबेस (IRDA)” प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

(A) आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक
(B) जागतिक बँक✅✅
(C) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(D) आशियाई विकास बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 _________ या दिवशी “गुलामीच्या उन्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन” साजरा केला जातो.

(A) 30 नोव्हेंबर
(B) 1 डिसेंबर
(C) 29 सप्टेंबर
(D) 02 डिसेंबर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘हँड इन हँड’ हा चीन आणि __________ या देशादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे.

(A) पाकिस्तान
(B) नेपाळ
(C) भारत✅✅
(D) भूतान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____________ या दिवशी “आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन” साजरा केला जातो.

(A) 3 डिसेंबर✅✅
(B) 23 नोव्हेंबर
(C) 25 ऑक्टोबर
(D) 19 नोव्हेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘2019 अबू धाबी ग्रँड प्रिक्स’ ही मोटार शर्यत कोणी जिंकली?

(A) मायकेल शुमाकर
(B) मॅक्स व्हर्स्टपेन
(C) वाल्टेरी बोटास
(D) लुईस हॅमिल्टन✅✅

© संकलन - राम कवले & तुषार शिरगीरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतातील पहिले सागरी संग्रहालय गुजरातमध्ये (लोथल) नियोजित

📌उपयोजन :-

🔰संग्रहालय जहाजाचे बहुआयामी कार्यक्षेत्र

🔰व्यापार केलेल्या साहित्याचा स्वतंत्र शोध

🔰हिंद महासागरातील जहाजांच्या भंगार ठिकाणाहून बचावलेल्या साहित्याचे प्रदर्शन

🔰जहाज बांधणीच्या पुरातत्व विभागासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र

🔰सागरी इतिहासाची पुनर्बांधणी

📌पाण्याखालील पुरातत्व संशोधन :-

🔰पुरातत्व उत्खननातून पाण्यात बुडलेल्या जहाजांचे अवशेष, बंदरे आणि सागरी घडामोडी नोंदींचा समावेश

🔰१९८९: गोव्यातील सांची रीफ मध्ये भारतातील तुकड्यांच्या स्वरूपातील जहाजांचा अभ्यास सुरू

🔰युनेस्कोच्या मते, जगातील सागर पृष्ठभागावर सुमारे ३ दशलक्ष अज्ञात जहाजे उद्ध्वस्त अवस्थेत

📌महत्व :-

🔰समृद्ध सागरी इतिहासाबाबत भारताची अफाट क्षमता

🔰आग्नेय आशिया आणि पर्शियन आखाती प्रदेश येथील पुरातत्व पुराव्यांनुसार उलगडा

🔰४००० वर्षांपूर्वी पूर्व आणि पश्चिम समुद्रात भारतीय समुद्री प्रवास अस्तित्वात असल्याचे संकेत.

🔰बुडलेल्या जहाजांच्या अभ्यासाच्या आधारे भारताचा सागरी इतिहास आणि इतर देशांशी व्यापारिक संबंधातील दुवे शोधणे शक्य

राज्य सरकार मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मत्स्यालय; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना..

🔰देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी शहरात बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या प्रमाणे जागतिक दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) राज्य सरकार उभारणार आहे. मत्स्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

🔰ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

🔰मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्सालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?

   1) अपसरण चिन्ह    2) स्वल्पविराम    3) अपूर्ण विराम    4) संयोग चिन्ह

उत्तर :- 4

2) पुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा.
     भाषेच्या अलंकाराचे ................ हे दोन मुख्य प्रकार आहेत.

   1) यमक – अनुप्रास    2) अनन्वय – दृष्टान्त  3) अन्योक्ती – स्वभावोक्ती  4) शब्दालंकार आणि अर्थालंकार

उत्तर :- 4

3) ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे  ?

   1) अभ्यस्त      2) सामासिक    3) प्रत्ययसाधित    4) यापैकी कोणताही नाही

उत्तर :- 1

4) ‘माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’
      वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
   1) अभिधा      2) लक्षणा    3) व्यंजना    4) धववाणी

उत्तर :- 3

5) ‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
   1) जलद      2) कसर      3) पथ      4) वीज

उत्तर :- 4

6) ............... ! केवढा मोठा हा धबधबा.
 
1) सबब    2) अबब      3) वाहवा      4) यापैकी नाही  

उत्तर :- 2

7) ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे या वाक्यातील काळ ओळखा.

   1) अपूर्ण वर्तमानकाळ  2) पूर्ण वर्तमानकाळ  3) रीति वर्तमानकाळ  4) रीति भूतकाळ

उत्तर :- 4

8) ‘भाऊबहीण’ या शब्दाचे लिंग कोणते ?

   1) पुल्लिंग    2) नपुंसकलिंग    3) स्त्रीलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

9) योग्य जोडया जुळवा.
  विभक्ती      कारक

         a) पंचमी      I) घराशी
         b) तृतीया      II) घरात
         c) षष्ठी      III) घरातून
         d) सप्तमी      IV) घराचा

  a  b  c  d

         1)  II  III  I  IV 
         2)  III  I  IV  II
        3)  I  IV  II  III
         4)  IV  II  III  I

उत्तर :- 2

10) खालील गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा.
     ‘मीनाला नोकरी नाही, रमेशची नोकरी सुटलेली अशा वेळीतिची स्थिती ........................... अशी झाली.’

   1) खाल्ल्या घरचे वासे मोजणारी      2) उघडया डोळयांनी मरणे पाहणे
   3) इकडे आड तिकडे विहीर      4) खुळ लागणे

उत्तर :- 3

चालू घडामोडी प्रश्न 4/12/2019

● ३ डिसेंबर २०१९ रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनाची थीम ------- ही होती.
:- ‘प्रोमोटिंग द पार्टिसिपेशन ऑफ पर्सन्स वीथ डिसअॅबिलिटीज अँड देयर लीडरशिप: टेकिंग अॅक्शन ऑन द 2030 डेव्हलपमेंट अजेंडा’.

●  चीन आणि भारत यांच्या ‘हँड इन हँड 2019’ हा संयुक्त सैन्य सराव ------------- या ठिकणी पार पडला.
:- उमरोई (मेघालय).

●  FSSAI कडून फोर स्टार रेटिंगसह “ईट राईट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक
- मुंबई सेंट्रल रेलवे स्थानक.).

● 17 डिसेंबर रोजी भरणार्यास तिसर्याट ‘ई-मोबिलिटी सोल्यूशन्स विषयक आंतरराष्ट्रीय परिवहन विद्युतीकरण परिषद २०१९ ही परिषद भारतात कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे
:- बेंगळुरू.

● पीपल फोर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ़ अॅानिमल्स (PETA) द्वारे ‘पर्सन ऑफ द इयर 2019------------ यांना जाहिर करण्यात ला ’
- जोएक्वीन फिनिक्स.

● मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) द्वारे ‘क्रिस्टोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड’ हा पुरस्कार कोणत्या संघाला जाहिर झाला
:- न्युझीलँड

●2019 चा अबू धाबी ग्रँड प्रिक्स’ एफ-1 ही शर्यत -------------- याने जिंकली
:- लुईस हॅमिल्टन.

●  1 डिसेंबर रोजी आदिवासी विश्वास दिवस (Indigenous Faith Day -IFD) ----------- येथे साजरा करण्यात आला
- अरुणाचल प्रदेश.

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 4/12/2019

१) कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते, याची दखल संविधानाच्या .................. या  केलमाखाली घेतली जाऊ शकते.

   1) 30   
   2) 31  
   3) 32  
   4) 34

उत्तर :- 3

२) भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतूदी घटनादत्त आहेत ?

   अ) धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो.

   ब) धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याव्दारे नियंत्रित करू शकेल.

   क) सार्वजनिक स्वरुपाच्या हिंदु धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरीकांना खुले करुन देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल.

   ड) कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल.

   1) ब, ड   
   2) अ, ब, क, ड 
  3) अ, ब, क   
  4) कोणतेही अनुज्ञेय नाही

उत्तर :- 1

३) कलम – 23 मधील ‘बिगारी’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणा-या खालील विधानांचा विचार करा.

   अ) सक्तीचे श्रम

   ब) शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणे

   क) अनैच्छिक दास्यत्व

   ड) विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्विकारणे

   1) केवळ अ बरोबर आह 
   2) अ आणि ब बरोबर
   3) अ, ब व क बरोबर   
  4) सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 4

४) भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते विधान अल्पसंख्याकांचे बाबतीत खरे नाही ?

   अ) राज्य घटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दर्ज्यास मान्यता आहे.

   ब) भारतात राहणा-या नागरिकांनाच त्यांची वैशिष्टपूर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे.

   क) फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे.

   ड) कोणत्याही नागरिकाला राज्य निधीतून मदत प्राप्त होणा-या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वर्ण, धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही.

   1) क    
   2) अ   
   3) अ, क  
   4) ब, ड

उत्तर :- 1

५). मूलभूत अधिकार सामान्यत: राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. खालीलपैकी कोणते अधिकार  त्याही पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवतात ?

   अ) कलम 14     आ) कलम 15 (1)    ‍इ) कलम 15 (2)    ई) कलम 16
   उ) कलम 17      ऊ) कलम 22 (1)    ए) कलम 23

   1) अ, आ, इ    2) आ, ई, ऊ  
  3) इ, उ, ए    4) उ, ऊ, ए

उत्तर :- 3

६) खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायद्यात होत नाही ?

   1) टाडा    2) नासा 
   3) रासुका    4) मिसा

उत्तर :- 2

७) भारतीय संविधानातील मूलभूत हक्काच्या संदर्भात कलम 19 (2) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुढीलपैकी  कोणत्या मर्यादा टाकण्यात आल्या आहेत ?

   अ) कोणाची बदनामी, निंदा करणे.

   ब) न्यायालयाचा अवमान करणे.

   क) राज्याची सुरक्षा धोक्यात आणणे.

ड) सभ्यता व नीतिमत्तेच्या मर्यादा भंग करणे.

         वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   1) अ फक्त           2) अ आणि ब फक्त 
3) अ, ब आणि क    4) अ, ब आणि ड

उत्तर :- 3

८) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ............... दिलेले आहेत.

   1) सर्वोच्च न्यायालयास कलम 32 अन्वये   

   2) उच्च न्यायालयास कलम 226 अन्वये

   3) सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही

   4) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास

उत्तर :- 3

९) योग्य कथन / कथने ओळखा.

   अ) पृथ्थकरणीयतेचा सिध्दांत निर्धारित करतो की, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुध्द आहे.

   ब) विकसनशील निर्वचनाचा सिध्दांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक – विधिविषयक संदर्भ  ध्यानात ठेवतो.

   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे  

  2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
   

४) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची

उत्तर :- 3

१०) अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मुलभूत हक्कासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

   अ) अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.

   ब) अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.

   क) हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणतीही बंधने नाहीत.

   ड) कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने शासन घालू शकते.

        वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब आणि क    2) ब आणि ड  
3) ब, क आणि ड    4) अ आणि क

उत्तर :- 2

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...