२८ नोव्हेंबर २०१९

*डी.एड. व बी.एड. शिक्षकांना टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी: परीक्षेसाठी १ लाख ८० हजार पेक्षा अधिक अर्ज दाखल*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित केली जाणार आहे.टीईटी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आज दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा सक्तीची आहे. अलीकडेच शासनाकडून TAIT परीक्षा घेऊन  पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जात आहे.TAIT परीक्षेमध्ये पहिली ते आठवी शिक्षक पदाचा अर्ज भरण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होते. त्यामुळे यावर्षी टीईटी परीक्षेसाठी तब्बल १ लाख ८० हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.टीईटी परीक्षेबाबत सविस्तर माहिती   https://mahatet.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

      *TET परीक्षा आयोजन*
■ TET पेपर पहिला - १९ जानेवारी २०२० (१०:३० ते १:००)
■ TET पेपर दुसरा -१९ जानेवारी २०२०(२:०० ते ४.३०)
      
  *टीईटी प्रवेशपत्र प्रिंट*

४ जानेवारी २०२० ते १९ जानेवारी २०२०
*#MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व  उपयुक्त संदर्भ पुस्तक #*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (पाचवी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
के सागर/बाळासाहेब शिंदे
*4.गणित (30 गुण)*
सतीश वसे/नितीन महाले/शांताराम अहिरे
*5.परिसर अभ्यास (30 गुण)*

    यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके तसेच अनिल कोलते/चंद्रकांत गोरे/विनायक घायाळ
*घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ*
     TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (तिसरी आवृत्ती)

परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक संदर्भ
       TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2018 च्या मागील 5 प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते,के'सागर पब्लिकेशन्स,पुणे

TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(पाचवी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
      के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
       के सागर/बाळासाहेब शिंदे
           *# IMP पेपर दोन देतांना ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना घटक चार विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात आणि ज्यांची पदवी कला शाखेतील आहे त्यांना घटक पाच समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न  सोडवावे लागतात.#*
*4.गणित व विज्ञान (60 गुण)*
        यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत.   
4.1- गणित (30 गुण)
सतीश वसे/नितीन महाले/शांताराम अहिरे
4.2- विज्ञान (30 गुण)
अनिल कोलते/चंद्रकांत गोरे/कविता भालेराव/विनायक घायाळ
*5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)*
    5.1- इतिहास (30 गुण)
१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
    5.2 - भूगोल.(30 गुण)
१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
  *TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
१.TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
*टीईटी परीक्षा तयारी महत्वाच्या बाबी*
- बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
-मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.
-बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.
-परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.
-इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पुस्तके वाचावीत.
-शक्य असल्यास नोट्स काढा/पुस्तकांना महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.
-प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.
-टीईटी परीक्षा होईपर्यंत फेसबुक, व्हाट्सप पासून दूर राहिल्यास बराच अभ्यासक्रम कव्हर होईल.
- परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.
              *Best of luck*
*#आपल्या एका share करण्याने गरजू विद्यार्थ्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळेल#*

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे द्वितीय भारत म्यानमार नौदल सराव 'आयएमएनएक्स -२०१.' प्रारंभ झाला..

🔰भारताची दुसरी आवृत्ती- म्यानमार नौदल व्यायाम आयएमएनएक्स -२०१ Vis आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये सुरू झाली आहे.

🔰हे ऑक्टोबर 19-22, 2019 दरम्यान आयोजित केले जाईल.

🔰उद्घाटन समारंभ आयएनएस (इंडियन नेव्हल शिप) रणविजय यांच्या हस्ते पार पडला.

🔰 म्यानमारचे नौदल जहाज यूएमएस सिन फू शिन (एफ -14) आणि यूएमएस ताबीनशवेती ((773) भारतीय नौदलाच्या जवानांशी व्यावसायिक संवाद साधतील.

🔰 आयएनएस रणविजय, एक मार्गदर्शित क्षेपणास्त्र-विनाशक आणि आयएनएस कुथार, एक क्षेपणास्त्र कर्वेट, बंगालच्या उपसागरात युएमएस सिन फियू शिन या फ्रिगेट आणि यूएमएस ताबिन्शवेती या संयुक्त जहाजांचा संयुक्त व्यायाम करणार आहेत.

चीनकडून काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित.

चीनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून हा तंटा संयुक्त राष्ट्र संहिता व सुरक्षा मंडळ ठराव तसेच द्विपक्षीय करारांच्या  मदतीने शांततामय मार्गाने सोडवावा, असा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र असलेल्या चीनने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताना भारताने जम्मू काश्मीरच्या स्थितीत एकतर्फी बदल करू नयेत, असेही म्हटले आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सांगितले,की काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील काही घटनांमुळे मागे राहिलेला तंटा आहे. हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संहिता, द्विपक्षीय करार व सुरक्षा मंडळाच्या ठरावांच्या आधारे सोडवावा.

जम्मू काश्मीरची स्थिती  बदलणारे कुठलेही निर्णय एकतर्फी घेण्यात येऊ नयेत. भारत व पाकिस्तान यांचा शेजारी देश म्हणून हा प्रश्न प्रभावी मार्गाने हाताळून दोन्ही देशातील संबंध सुरळित व्हावेत अशीच चीनची इच्छा आहे.

भारताने पाच ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७० रद्द करून  विशेष दर्जा रद्द केला होता.

NSO अहवाल : ग्रामीण भारत अद्याप मुक्त शौचमुक्त नाही

📌आयोजक :-

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics and Programme Implementation) अंतर्गत NSO कडून

📌कालावधी :-

👉जुलै २०१८ ते डिसेंबर २०१८

📌सर्वेक्षणातील भर द्यावयाचे घटक :-

1.पिण्याचे पाणी

2.स्वच्छता आणि गृहनिर्माण स्थिती

📌सर्वेक्षण निरीक्षणे :-

👉एक चतुर्थांश (१/४) घरात शौचालय सुविधेचा अभाव

📌मुख्य उद्दीष्ट्ये :-

👉घरांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा तसेच घरांच्या आसपासच्या सूक्ष्म वातावरणासह स्वच्छतेविषयी माहिती एकत्रित करणे

👉'२०२४ पर्यंत सर्वांसाठी पिण्याचे पाणी' हे लक्ष्य ठेवून भारत सरकार सध्या काम करत असल्याने सर्वेक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण

📌ठळक मुद्दे :-

👉जवळपास ४२.९% ग्रामीण भागातील आणि सुमारे ४०.९% शहरी भागातील कुटुंबांकडून अद्याप हँडपंप वापर

👉घरगुती परिसरात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबाबत शहरी भागात सुमारे ८०.७% आणि ग्रामीण भागात ५८.२% लोक

👉सुधारित जल संसाधने वापराबाबत ग्रामीण भागातील ९४.५% आणि शहरी भागात ९७.४%

👉सुधारित जल संसाधने मध्ये ट्यूबवेल, संरक्षित स्प्रिंग्स, खाजगी टँकर ट्रक, पाईप वॉटर, हँडपंप, पावसाचे पाणी संकलन आणि बाटलीबंद पाणी यांचा समावेश

📌खुले शौच आणि सद्य स्थिती :-

👉स्वच्छ भारत मिशनने २ ऑक्टोबर २०१९ रोजी भारताला मुक्त शौचमुक्त घोषित

👉सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील ७१.३% आणि शहरी भागातील ९६.२% लोकांमध्ये शौचालय सुविधेचा अभाव

👉सुस्थित गटार व्यवस्था ग्रामीण भागातील ६१.१% आणि शहरी भागातील ९२% कुटुंबांमध्ये आढळ

गॅस पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी राष्ट्रीय धोरण


पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाकडून (Petroleum and Natural Gas Regulatory board - PNGRB) एक उच्चस्तरीय समिती स्थापन

📌हेतू :-

पाइप केलेल्या नैसर्गिक वायूच्या पायाभूत सुविधांच्या विकासास गती देणे

📌महत्वाचे मुद्दे :-

1) समिती कार्ये -

शहर गॅस वितरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्यासाठी कार्य

पाईप गॅस नेटवर्कच्या विकासाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा

धोरण राज्य स्तरावर मान्यता मिळण्यास महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष

इतर क्षेत्रांच्या तुलनेत महत्त्वपूर्ण प्रगती पाहण्यास अडचणी येणारी भौगोलिक क्षेत्रे ओळखणे

राज्य सरकार भूमिका :-

राज्य सरकारद्वारे नोडल ऑफिसरची नेमणूक

जमीन, पर्यावरण, वाहतूक इ.चा समावेशास वेळोवेळी मंजूरी

सवलतीच्या दरात वेळेवर शासकीय वाटप करण्याच्या प्रक्रियेत शहर गॅस वितरण पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी समावेश

आतापर्यंत प्रगती :-

पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चांगल्या शहर गॅस वितरणासह भौगोलिक क्षेत्रा संख्येत २०१७ च्या अखेरीस ७८ वरून २०१९ मध्ये २२९ पर्यंत वाढ

कार्टोसॅट-3 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

पीएसएलव्ही सी 47 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने 'कार्टोसॅट-3' या 1625 किलो वजनाच्या उपग्रहाचे इस्त्रोने यशस्वी प्रक्षेपण केले.
- आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं
- 'कार्टोसॅट-3' उपग्रहासह अमेरिकेतील 13 व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. 13 लघु उपग्रहांमध्ये 'फ्लोक-4 पी' हे 12 लघु उपग्रह असून, एक 'एमईएसएचबीईडी' हा लघु उपग्रह आहे.
-  'कार्टोसॅट-3' उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे.
----------------------------------------
● उपयोग

- कार्टोसॅट-3 भारताचा डोळा असल्याचं सांगितलं जात आहे.
- पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी 'कार्टोसॅट-3' उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
- या उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे.
- या उपग्रहाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणं शक्य होणार आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.
------------------------------------------
● Polar Satellite Lunch Vehicle C47 [PSLV C47]

- या प्रक्षेपकाचे हे 21 वे उड्डाण आहे.
- पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात इंधनाचे सहा टप्पे.
- श्रीहरिकोटा येथून होणारे हे 74 वे उड्डाण आहे.

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 29/11/2019

१)  कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

   अ) मूलभूत अधिकार समिती  
   ब) अल्पसंख्यांक उपसमिती   
   क) सल्लागार समिती   
   ड) राज्ये समिती

   1) फक्त अ, ब, क 
  2) फक्त ब, क, ड   
  3) फक्त अ, ब, ड  
  4) फक्त अ, क, ड

  उत्तर :- 1

२)  भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?

   1) के. सी. व्हिअर 
  2) आयव्हर जेनिंग्ज
  3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन
  4) मॉरिस जोन्स

   उत्तर :- 4

३)  ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

   1) एक राज्यघटना    
   2) व्दिगृही कायदेमंडळ 
   3) राज्यघटनेची सर्वोच्चता  
   4) न्यायालयीन पुनर्विलोकन

   उत्तर :- 1

४) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

   1) स्वातंत्र्य    
   2) समता     
   3) न्याय   
   4) बंधुभाव

   उत्तर :- 3

५) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या .............   घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.

   1) 44 वी      2) 41 वी   
  3) 42 वी      4) 46 वी

  उत्तर :- 3

६) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट – 1935 मधील खालील तरतूदी विचारात घ्या :

   अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व  प्रदान केले.

   ब) शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते.

   क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.

   1) विधाने अ, ब बरोबर आहेत

    2) विधाने ब, क बरोबर आहेत

   3) विधाने अ, क बरोबर आहेत 

   4) विधाने अ, ब, क बरोबर

   उत्तर :- 3

७) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली. 

2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.

   3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.

   4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.

उत्तर :- 3

८) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर

   2) जे. बी. कृपलानी

   3) सरदार वल्लभभाई पटेल 

  4) जवाहरलाल नेहरू

   उत्तर :- 3

९) .घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.

   1) आयर्लंड 
   2) यु. के.  
   3) यु. एस्. ए. 
   4) ऑस्ट्रेलिया

उत्तर :- 3

१०) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे :

     1) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य  

     2) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

     3) सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य 

     4) प्रजासत्ताक गणराज्य

    उत्तर :- 2

११)  कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

   अ) कृषक प्रजा पक्ष  

  ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन

  क) कम्युनिस्ट पक्ष 

  ड) अपक्ष

   1) फक्त अ, क, ड   
   2) फक्त ब, क, ड  
   3) फक्त अ, ब, ड  
   4) फक्त अ, ब, क

    उत्तर :- 4

१२) खालील विधाने विचारात घ्या :
   अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

   ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

   क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

         वरीलपैकी कोणते / ती विधान  / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब    
   2) ब आणि क  
   3) अ आणि क  
   4) अ, ब आणि क

   उत्तर :- 1

१३)  सर्वोच्च न्यायालयाने काही  वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या  वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?

   अ) समतेचे तत्व    
   ब) न्यायालयीन पुनर्विलोकन 
   क) संघराज्य    
   ड) सार्वभौमत्व

   1) अ, ब, क, ड  
   2) ब, क, ड   
   3) अ, ब, क   
   4) अ, ड, क

    उत्तर :- 1

१४). भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.

   2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.

   3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.

   4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.

उत्तर :- 4

१५) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?

   अ) राज्ये अविनाशी नाहीत.  

   ब) आणीबाणी तरतूदी

   क) अखिल भारतीय सेवा  

   ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व   

   इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार

   1) अ, ब, क, ड  
   2) ब, क, ड, इ 
   3) अ, ब, क, इ  
   4) ब, क, इ

   उत्तर :- 3

2 केंद्रशासित प्रदेश - दिव-दमण व दादरा-नगर हवेलीचे विलनीकरण - लोकसभेत विधेयक

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांच्याद्वारे लोकसभेत विधेयक

दिव-दमण आणि दादरा नगर हवेली दोन्ही केंद्रशासित प्रदेश 35 किमीच्या अंतरावर

दोन्हीसाठी सध्या स्वतंत्र सचिवालय आहेत.

दमण-दिव आणि दादरा-नगर हवेली दोन्हीचे भारतात विलनिकरण - 1961 साली

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) विरुध्दार्थी अर्थ लिहा. – ‘अग्रज’

   1) वंशज    2) पूर्वज      3) मनोज      4) अनुज

उत्तर :- 4

2) रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.
     काय नाही आजच्या वर्तमानपत्रात ? लेख, अग्रलेख, वृत्तांत आणि सारे काही. तरी कशाचा प्रभाव मात्र नाही. यालाच म्हणतात,
     ‘......................’

   1) बडा घर अन् पोकळ वासा        2) एक ना धड भाराभार चिंध्या
   3) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता    4) मियाँ मूठभर दाढी हातभर

उत्तर :- 2

3) ‘अल्लाची गाय’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

   1) अतिशय धूर्त      2) अतिशय श्रीमंत   
   3) अतिशय गरीब    4) अतिशय भाग्यवान

उत्तर :- 3

4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता ?
   1) स्थितप्रज्ञता    2) हिंमत     
   3) तितिक्षा    4) शौर्य

उत्तर :- 3

5) खालीलपैकी शुध्द  शब्द कोणते ?

   1) चिंचा, खिंड, टिंब    2) चींच, खींड, टिंब   
   3) चिंच, खिंड, टिंब    4) चींच, खींड, टींब

उत्तर :- 3

6) मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण मानले जातात?

   1) 48      2) 14      3) 34      4) 12

उत्तर :- 2

7) ‘तट्टीका’ या संधीचा विग्रह करा.

   1) तत: +  टीका    2) त् + ट् + ई + का 
   3) तत् + टीका    4) त्रा + टीका

उत्तर :- 3

8) योग्य विधाने निवडा.

   अ) मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती असे म्हणतात.
   ब) प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती असे म्हणतात.

   1) फक्त ब योग्य    2) फक्त अ योग्य   
   3) दोन्ही अयोग्य  4) दोन्ही योग्य

उत्तर :- 4

9) ‘गर्जेल तो करीत काय’ या वाक्याचे संबंधी सर्वनाम (अध्याह्यत) ओळखा.

   1) गर्जेल    2) तो      3) जो      4) काय

उत्तर :- 3

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा.

      तिला बनारसी साडी शोभून दिसते.
   1) नामसाधित विशेषण    2) सार्वजनिक विशेषण
   3) समासघटित विशेषण    4) संबंध विशेषण

उत्तर :- 1

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : आनंदकडून निराशा; कार्लसन विजेता

टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.

मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते. तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

भारताच्या आनंदला १६ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर पी. हरिकृष्णा आणि विदित गुजराथी यांना प्रत्येकी १४.५ गुणांसह आठवे स्थान मिळाले. आनंदला पात्रतेसाठी दीड गुण कमी पडले. लंडन येथे होणाऱ्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी कार्लसन, डिंग लिरेन, अरोनिय, मॅक्झिमे व्हॅचिएर-लॅग्रॅव्ह पात्र ठरले आहेत.

जाणून घ्या - भारतातील केंद्रशासित प्रदेश

⭐️ केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय ? : भारतात 28 राज्यांसह 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.

▪ अंदमान आणि निकोबार
▪ चंदीगड
▪ दमण आणि दीव
▪ दादरा आणि नगर हवेली
▪ दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश
▪ पुडुचेरी
▪ लक्षद्वीप
▪ जम्मू-काश्मीर
▪ लडाख

📚 विज्ञान :- विविध एकके आणि त्यांचा वापर

💁‍♂ विज्ञान तसेच इतर शास्त्रशाखांमध्ये अनेक गोष्टींचे मापन करण्यासाठी वेगवेगळी एकक पद्धती वापरली जाते, त्याविषयी जाणून घेऊयात...

▪ प्रकाशवर्ष : तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक
▪ नॉट : सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक
▪ बार : वायुदाब मोजण्याचे एकक
▪ फॅदम : समुद्राची खोली मोजण्याचे एकक
▪ कॅलरी : उष्णता मोजण्याचे एकक
▪ हँड : घोड्याची उंची मोजण्याचे एकक
▪ अँगस्ट्रॉंम : प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक
▪ मायक्रोन : लांबीचे वैज्ञानिक एकक
▪ पौंड : वजन मोजण्याचे एकक
▪ अॅम्पीअर : विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक

झटपट 10 चालुघडामोडी प्रश्न उत्तरे 27/11/2019


1) ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
उत्तर : इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस

2) ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

3) यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

4) "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
उत्तर : आसाम सरकार

5) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
उत्तर : किरण मजुमदार-शॉ

6) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2020

7) राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
उत्तर : लडाख

8) ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर : चित्रेश नतेसन

9) "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : वाराणसी

10) ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
उत्तर : Climate Emergency

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...