२६ नोव्हेंबर २०१९

अखेर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, आज सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

1. आयुष्यमान भारत योजना संपूर्ण भारतात कधी लागू करण्यात आली आहे?
-- 25 सप्टेंबर 2018 पासून

2. भगतसिंग कोशारी हे महाराष्ट्र चे कितवे राज्यपाल आहे?
-- 19 वे ( 18 वे विद्यासागर राव )

3. 2000 हजार धावा ( फास्ट धावा )  पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता ?
-- मिताली राज

4. जल धोरण तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
-- महाराष्ट्र

5. " ऑर्डर ऑफ दि सेट अँड्रूअ अ पोस्टल " हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार कोणत्या देशाकडून मिळालेला आहे ?
-- रशिया

6. मैत्री 2019 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये पार पडला ?
-- भारत×थायलंड

7. भारताचे रॉकेट मॅन कोणाला म्हणतात?
-- डॉ.के.वि. सिवन

8. ई - सिगारेट वर बंदी घालणारे प्रथम राज्य कोणते?
-- पंजाब

9. किरण बेदी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत?
-- पद्दुचेरी

10. कोणत्या राज्याची विधान परिषद 31 ऑक्टोबर 2019 ला बरखास्त करण्यात येणार आहे ?
-- जम्मू काश्मीर ( कलम 370 रद्द )

चालू घडामोडी वन लाइनर्स, 25 नोव्हेंबर 2019.

✳ बाबर आझम डब्ल्यूटीसीमध्ये शतक झळकावणारा पहिला पाकिस्तान बॅट्समन ठरला

✳ अ‍ॅग्रो व्हिजन - ची ११ वी आवृत्ती नागपूरमध्ये सुरू झाली

✳ ज्येष्ठ अभिनेते शौकत कैफीचे नुकतेच निधन झाले

✳ इंडियन आर्मीने नायब सुभेदार चुनीलाल यांना गुडविल पार्क समर्पित केले

✳ जम्मू-कश्मीरने 2019 मध्ये पीएमजीएसवाय अंतर्गत सर्वात जास्त रस्ता लांबी मिळविली

✳ भारत एससीओ फोरम ऑफ यंग सायंटिस्ट्स अँड इनोव्हेटर्स 2020 चे आयोजन करणार आहे

✳ जल मंत्रालयाने "शिखर से पुकार" हा माहितीपट प्रदर्शित केला.

✳ 2019 मध्ये नोमुराचा फूड व्हेनेरेबिलिटी इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 44 वा आहे

✳ फिलिपीन्समध्ये  दुसरा भारत एशियन नोनोटेक समिट 2019

✳ मुथूट फायनान्सने आयडीबीआयचा एमएफ बिझिनेस 215 कोटी रुपयांमध्ये संपादन केला

✳ निकांत खाडिलकर ज्येष्ठ पत्रकार नुकतेच निधन झाले

✳ 'तिसरा स्तंभ' रघुराम गोविंद राजन यांनी लिहिलेल्या कादंबरी

✳ आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीचा भारतीय नकाशामध्ये समावेश

✳ मध्य प्रदेश क्रीडा व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण मिळेल

✳ जानेवारी 2019 मध्ये भारतातील नागरी बेरोजगारीचा दर . 9.3 % पर्यंत खाली आला आहे: सरकारी आकडेवारी

✳ इंडियाज फौदाद मिर्झाने पुरूष घोडेस्वारात ऑलिम्पिक कोटा मिळवला

✳ डिजिटल गुरुकुल ब्लॉकचेन समर्थित प्रमाणपत्रे देणारी भारताची पहिली संस्था बनली

✳ मायक्रोसॉफ्टने शाळांचे डिजिटल रूपांतरण सुलभ करण्यासाठी ‘के -12 एज्युकेशन ट्रान्सफॉर्मेशन फ्रेमवर्क’ सुरू केले

✳ एनिंग्ज मार्जिनने 4 सलग कसोटी विजयांची नोंद करण्यासाठी भारत पहिला संघ बनला

✳ इंड वी वि बॅन दुसरी कसोटी: भारताने बांगलादेशला एक डाव व 46 धावांनी पराभूत केले

✳ भारतीय संघाने सातव्या सलग कसोटी विजय नोंदवले

✳ भारतीय संघाने 12 वे सलग होम टेस्ट मालिका विजय नोंदविला

✳ विराट कोहली दिवस / रात्र कसोटी सामना जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार

✳ आयसीसी कसोटी चँपियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये भारत अव्वल

✳ राष्ट्रपती भवनात राज्यपालांची 2 दिवसीय परिषद

✳ एआयएफएफने गैरवर्तन केल्याबद्दल 3 आयएसएल खेळाडू निलंबित केले

✳ पुंच लिंक अप डे 23 नोव्हेंबर रोजी भारतीय सैन्याने साजरा केला

✳ मनीषा कुलश्रेष्ठ यांना 2018 साठी 28 वा बिहारी पुरस्कार प्रदान

✳ ऑस्ट्रेलिया-भारत शिक्षण परिषद बैठक नवी दिल्ली येथे आयोजित

✳ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिली कसोटी: ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला डाव आणि 5 धावांनी पराभूत केले

✳ आरएसपीचे ज्येष्ठ नेते क्षिती गोस्वामी यांचे नुकतेच निधन झाले

✳ ऑक्सफोर्ड शब्दकोषांनी ‘हवामान आणीबाणी’ 2019 चा शब्द जाहीर केला

✳ 172 व्या डिफेन्स पेंशनर्स अदालतची सुरुवात लखनऊ, उत्तर प्रदेश येथे झाली

✳ 13 व्या मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय 2019 ची सुरुवात इम्फालमध्ये झाली

✳ अंडर -15 आशियाई कुस्ती स्पर्धा चिनी तैपेई येथे पार पडली

✳ अंडर -15 आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने 8 सुवर्णपदके जिंकली

✳ एलिउड किपचोजे यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट अथलीट्स (पुरुष) म्हणून नाव देण्यात आले आहे

✳ एम डालीला यांना वर्षातील जागतिक .थलीट्सचे नाव देण्यात आले आहे

✳ राफेल नदाल स्पेनसाठी 6 वे डेव्हिस चषक विजेतेपद

✳ आयआयटी-कानपूरच्या विद्यार्थ्यांनी 'प्रहारी' नावाचे एक ड्रोन विकसित केले

✳ सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीग पुट ऑफ पुल्सचा सामना केला

✳ आठवा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट इम्फाल, मणिपूर येथे प्रारंभ झाला

✳ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे निधन

✳ ह्युमोनॉइड रोबोट वापरण्यासाठी आधुनिक रेल्वे कोच फॅक्टरी ‘सोना 1.5

टेक्नॉलॉजीसह घातक मिग-35 भारताला द्यायला तयार.

अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन प्रमाणे रशियाच्या मिग कॉर्पोरेशननेही भारताला अत्याधुनिक मिग-35 विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे.
भारताकडून फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या चार ते पाच परदेशी कंपन्यांमध्ये मिग कॉर्पोरेशनही आहे.

रोसोबोरोनेक्सपोर्टच्या माध्यमातून मिग कॉर्पोरेशन फायटर विमान पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे.

भारताच्या मेक इन इंडिया धोरणाशी सुसंगत मिग-35 फायटर विमानांची निर्मिती करण्याची तयारी मिग कॉर्पोरेशनने दाखवली आहे.
मिग-35 मध्ये हे नवीन अत्याधुनिक विमान असून त्यामध्ये सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे. पाचव्या पिढीच्या फायटर विमानाचे तंत्रज्ञान यामध्ये आहे.

केंद्रीय माहिती आयोगाचा वार्षिक अहवाल लोकसभेत

📌केंद्रीय माहिती आयोगाचा २०१८-१९ साठीचा वार्षिक अहवाल २० नोव्हेंबर रोजी लोकसभेत सादर

📌तोच अहवाल २१ नोव्हेंबर रोजी राज्यसभा पटलावर

🔵अहवालाची ठळक वैशिष्ट्ये :-

📌२०१८-१९ मध्ये आयोगाच्या केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणामार्फत सुमारे १.७० लाख अर्ज प्राप्त

📌२०१७-१८ च्या तुलनेत ही संख्या ११% जास्त

📌प्राप्त अर्जांपैकी केवळ ७.७ % अर्जांवर आयोगाकडून प्रक्रिया

📌आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून सर्वाधिक अर्ज नाकारणी (२६.५ %)

📌त्यापाठोपाठ गृह मंत्रालयाकडून १६.४१ % अर्ज नाकारणी

📌CIC कडून २०१८-१९ कालावधीत सुमारे १७,१८८ दुय्यम अपील आणि तक्रार प्रकरणे निकालात

🔵केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission - CIC) बद्दल थोडक्यात :-

1.स्थापना : २००५ मध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत

2.आयोग रचना :

-१ मुख्य माहिती आयुक्त
-१० माहिती आयुक्त

3.नेमणूक :

-मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नेमणूक भारतीय राष्ट्रपती समितीच्या शिफारशीनुसार

4.शिफारस समिती सदस्य :

-पंतप्रधान
-विरोधी पक्षनेते
-पंतप्रधानांकडून नेमलेले कॅबिनेट मंत्री

5.भूमिका :

-शासनाच्या यंत्रणेत पारदर्शकता राखणे
-भ्रष्टाचार, शोषण आणि दुरुपयोग यांना आळा घालणे

🔵आयोगाचे अधिकार आणि कार्ये :-

📌एखाद्या प्रकरणाला योग्य आधार असल्यास आयोगाकडून तपासाचे आदेश देणे शक्य

📌सार्वजनिक प्राधिकरणाद्वारा आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरक्षितता प्रदान करण्याचे अधिकार

📌सार्वजनिक प्राधिकरण कायद्याच्या तरतुदी पूर्ण करीत नसेल तर आयोगाकडून समानता स्थापन करण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस

व्हीप म्हणजे नेमके काय?

  ✓ व्हीप' म्हणजे पक्षशिस्तीचे पालन करणे, असा सोपा अर्थ आहे.
     ✓ विविध पक्षांचे गटनेते किंवा प्रतोदही त्या-त्या सभागृहात प्रतिनिधित्व करत असतात. संसदीय कार्यप्रणालीत मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) आणि प्रतोद (व्हीप) यांची भूमिका महत्त्वाची असते.
   ✓ प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप (प्रतोद) असतो. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या व्हीपने करायचे असते. लोकसभेत किंवा विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतदान व्हायचे असेल आणि संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने अथवा विरोधात मतदान करायचा निर्णय घेतला असेल, तर त्याबाबतचा आदेश व्हीपमार्फत जारी करण्यात येतो.

      ✓ व्हीप त्या-त्या पक्षाच्या सर्व आमदारांना बंधनकारक असतो. कुठल्याही आमदाराने हा आदेश धुडकावून पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले, तर त्या व्यक्तीचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो. त्याच्यावर पक्षशिस्तीची कारवाई तर होऊ शकतेच, शिवाय त्याला पदही गमवावे लागू शकते. त्यामुळे आपले आमदार. खासदार फुटू नयेत म्हणून महत्त्वाच्या राजकीय निर्णयाप्रसंगी राजकीय पक्ष व्हीप जारी करतात.

     ✓ दरम्यान, भारतात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेचे सदस्य (खासदार) किंवा विधानसभेचे सदस्य (आमदार) यांना व्हीप बजावून कोणाला मतदान करायचे याचा निर्देश देता येऊ शकत नाही.

संविधान दिन [Constitution Day]

- यावर्षी आपण 70 वा संविधान दिन साजरा करत आहोत.
- 26 Nov 1949: संविधान सभेने संविधान स्विकारले
- 26 Jan 1950: संविधानाची अंमलबजावणी सुरू
- संविधान निर्मितीसाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी (2 वर्षे 11 महिने 18 दिवस) लागला
- या कालावधीत 11 सत्रामधून 165 दिवस कामकाज चालले
- फाळणी अगोदर 389 तर फाळणीनंतर 299 सदस्य संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करत होते.
- जून 2018 पर्यंत भारतीय संविधानात 448 कलमे, 12 अनुसूची, 5 परिशिष्ट आणि 101 घटनादुरुस्ती आहेत.
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर: भारतीय संविधानाचे शिल्पकार

देवेंद्र सरकारला 'सर्वोच्च' धक्का; उद्याच 'विश्वास' सिद्ध करण्याचे आदेश, हंगामी अध्यक्षच घेणार 'खुलं' मतदान

उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे

26/11 मुंबई हल्ला; आज 11 वर्षे पूर्ण

बरोबर आजच्याच दिवशी 11 वर्षा पूर्वी मुंबईवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण देश हादरून गेला होता.

स्फोटांचा, गोळीबाराचा आवाज, हल्लेखोरांचा धुमाकूळ, ताज हॉटेल आणि कधी पाहिले नाही असे दृश्य संपूर्ण देश प्रथमच अनुभवत होता.

या हल्ल्यात तब्बल 166 लोक मारले तर 308 लोक गंभीर जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता.

हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. मात्र, शहीद होता होता मुंबई पोलिस दलाला 9 दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले. आज त्या सर्व कटू आठवणींना उजाळा देऊयात आणि शहिदांना श्रद्धांजली वाहूयात...

या दहशतवादी हल्ल्यात भारताने अनेक शूरवीर अधिकारी गमावले आहेत. भारताचे असली हिरो म्हणून इतिहास त्यांची नक्की नोंद घेईल. त्यांच्या नावावर एक नजर...

*1. हेमंत करकरे (मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख)
*2. तुकाराम अंबोळे (सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलीस)
*3. अशोक कामटे (अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर)
*4. विजय साळस्कर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

महत्त्वाच्या घडामोडी वाचून काढा 26/11/2019

▪ यापुढे माजी पंतप्रधान व त्यांच्या परिवाराला मिळणार 5 वर्षे SPG सुरक्षा व्यवस्था; केंद्र सरकारचे संसदेत बिल

▪ दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; अटक केलेल्या 3 आरोपींचे आयसिसशी संबंध असल्याची शक्यता

▪ प्रदूषणामुळे दिल्लीची अवस्था नरकापेक्षा वाईट; केंद्र व दिल्ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत सुनावले.

▪ सिंचन घोटाळ्यांच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्याचे एसीबी अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांचे आदेश

▪ देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्री पदाचा पदभार; यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली पहिली स्वाक्षरी

▪ आमच्या 162 आमदारांची हॉटेल ग्रँड हयातमध्ये आजच परेड; परेड पाहण्यासाठी संजय राऊतांचे राज्यपालांना ट्विटरवरून आवाहन

▪ फेडरल बँकेत नोकरीसाठी रोबोट घेणार इंटरव्ह्यू ; फेडरिक्रूट नावाच्या रोबोची घेतली जाणार मदत

▪ बॅडमिंटनपटू साईना नेहवालची आगामी प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या पाचव्या मोसमातून माघार; ट्विटव्दारे जाहीर केला निर्णय

▪ अभिनेत्री कंगना रानौत उतरणार चित्रपट निर्मिती क्षेत्रात; राम मंदिर मुद्यावर 'अपराजित अयोध्या' नामक चित्रपट बनवणार

▪ महाराष्ट्र राज्यातील सत्तापेच कायम; आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह सर्व देशाचे लक्ष

▪ संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती कोविंद संसदेला करणार संबोधित; विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ करणार आंदोलन

▪ 27 नोव्हेंबर रोजी ISRO रचणार इतिहास; सत्तावीस मिनिटांमध्ये लॉन्च करणार 14 उपग्रह

▪ नाराजी नाट्यानंतर राज्यसभेतील मार्शलचा ड्रेसकोड बदलला, आता दिसणार जोधपुरी सुटात

▪ महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मान्यता

▪ नेव्हीसील प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याने अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी नौदल प्रमुख रिचर्ड स्पेन्सर यांना पदावरून हटवले

▪ अत्याधुनिक पद्धतीच्या गावठाण मोजणीचा एक कोटी 20 लाख घरमालकांना फायदा : राज्यातील 38 हजार 700 खेडय़ांमध्ये मोजणी

▪ One Plus कंपनीला भारतात 5 वर्ष पुर्ण; वनप्लस च्या दोन फोनवर मिळवा तब्बल 3 ते 5 हजार रुपयांपर्यंतची आकर्षक सूट

▪ डे-नाईट कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे बंगाल क्रिकेट संघटना (कॅब) चाहत्यांना परत करणार

▪ 14 वर्षांनंतर 'बंटी और बबली'चा येणार सीक्वल, मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चनऐवजी दिसणार सैफ अली खान

२५ नोव्हेंबर २०१९

महत्त्वाचे 10 चालुघडामोडी प्रश्न उत्तरे

1) भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण बनली आहेत?
उत्तर : लेफ्टनंट शिवांगी

2) ‘YSR मत्स्यकारा भरोसा’ योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

3) ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक 2019’ कोणी जिंकले?
उत्तर : ग्रेटा थुनबर्ग

4) “हाऊ ए फॅमिली बिल्ट ए बिजनेस अँड ए नेशन” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : गिरीश कुबेर

5) “अॅग्रोव्हिजन 2019” या भारताच्या प्रमुख कृषी शिखर परिषदेची संकल्पना काय आहे?
उत्तर : स्मार्ट टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

6) “शिखर से पुकार” हे शब्द कशाशी संबंधित आहे?
उत्तर : जलसंधारण विषयक माहितीपट

7) दहशतवादविरोधी टेबल-टॉप सराव प्रथम कोणत्या संस्थेकडून आयोजित करण्यात आला?
उत्तर : राष्ट्रीय अन्वेषण विभाग

8) ‘कार्टोसॅट-3 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे?
उत्तर : PSLV C47

9) आरबीआयच्या माहितीनुसार भारताचा परकीय चलन साठा किती आहे?
उत्तर : 448.249 अब्ज डॉलर

10) ‘जागतिक दूरदर्शन दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 21 नोव्हेंबर

यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी.
- महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.

यशवंतरावांची ग्रंथसंपदा
आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.

यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.

यशवंतरावांचे आर्थिक विचार
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

- यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.
- त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता.
- येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.
- 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला.
- 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
- दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली.
- 1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले.
- 1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.
- 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले.
- 1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
- 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.
- यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.

लेफ्टनंट शिवांगी: भारतीय नौदलातली पहिली महिला वैमानिक


- 4 डिसेंबर या नौदल दिनाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार आहेत. त्यासोबतच, त्या भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार्‍या पहिल्या महिला वैमानिक ठरणार.

- शिवांगी या मुळच्या बिहारमधील मुझफ्फरपूरच्या आहेत. भारतीय नौदलाकडून घेण्यात आलेल्या 27 NOC अभ्यासक्रमामध्ये त्यांनी एझिमाला इथल्या नौदल अकादमीत प्रशिक्षण घेतले. ज्यानंतर 2018 साली जून महिन्यात वाईस अॅडमिरल ए. के. चावला यांच्याकडून त्यांना नौदलात सामावून घेण्यात आले.

- सध्या भारतीय नौदलाच्या साऊथर्न नेव्हल कमांड येथे प्रशिक्षणार्थी म्हणून शिवांगी कार्यरत आहेत. त्यांना 2 डिसेंबर 2019 रोजी सागरीक्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘डॉर्नियर’ विमानाच्या उड्डाणाची अधिकृत परवानगी मिळणार.

- भारतीय नौदलातल्या एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागात अधिकाऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असतो. 'ऑब्जर्व्हर' म्हणून रुजू असणाऱ्या या महिला अधिकारी या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जबाबदार असतात.

▪️भारतीय नौदलाविषयी

- भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

- छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.

- 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
--------------------------------------------------

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...