२५ नोव्हेंबर २०१९

मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये केवळ चार्टड विमानांसाठी खर्च झाले २५५ कोटी

✍पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांसाठी केवळ चार्टड विमानाचा एकूण खर्च २५५ कोटी रुपये इतका झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेमध्ये दिली. पराराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली आहे.

✍मोदींच्या परदेश दौऱ्यांसाठी चार्टड विमानप्रवासाचा खर्च किती झाला यासंदर्भात केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नाला मुलरीधरन यांनी लेखी उत्तर दिले. यामध्ये २०१६-१७ साली मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान वापरण्यात आलेल्या चार्टड विमानांसाठी ७६ कोटी २७ लाख रुपये खर्च झाल्याचे मुलरीधनरन यांनी सांगितलं.

✍तसेच २०१७-१८ साली हाच खर्च वाढून ९९ कोटी ३२ लाख रुपयापर्यंत गेल्याचे या उत्तरात म्हटलं आहे. २०१८-१९ साली चार्टड विमानांसाठी भारत सरकारने ७९ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे मुलरीधरन यांनी स्पष्ट केलं आहे.

✍चार्टड विमाने ही छोट्या अंतरासाठी वापरली जातात. एखाद्या देशात गेल्यानंतर तेथे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी या विमानांचा वापर जगभरातील नेते करतात.

दूरसंचार क्षेत्राला केंद्र सरकारकडून दिलासा...

🔶वाढत्या कर्जभाराच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांना दिलासा देताना केंद्र सरकारने ध्वनिलहरींसाठी त्यांनी भरावयाचे उर्वरित हप्ते पुढील दोन वर्षांसाठी न भरण्याची मुभा दिली आहे.

🔶सरकारच्या ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या दूरसंचार कंपन्यांना द्यावा लागणाऱ्या रकमेपासून पुढील दोन वर्षांसाठी मोकळीक मिळाली आहे. मात्र या कंपन्यांना याच ध्वनिलहरींसाठी देय असलेल्या रकमेवरील व्याज मात्र भरावे लागणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

🔶केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या निर्णयानुसार, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओला आता 2020-21 व 2021-22 करिता एकूण 42,000 कोटी रुपये लगेच चुकते करण्याची गरज राहिलेली नाही. निरंतर तोटा नोंदवत असलेल्या आणि भांडवलाची चणचण असलेल्या या कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

२४ नोव्हेंबर २०१९

मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) खालीलपैकी किती हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहेत.

      वा, वावा, आहा, ओहो, अहाहा
   1) तीन    2) चार      3) सर्व      4) दोन

उत्तर :- 3

2) ‘मी निबंध लिहितो’ या वाक्याचा रीती भूतकाळ लिहा.

   1) मी निबंध लिहीत असे      2) मी निबंध लिहिला होता
   3) मी निबंध लिहित होतो      4) मी निबंध लिहिला

उत्तर :- 1

3) ‘गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा.

   1) पुल्लिंग    2) स्त्रिलिंग   
   3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

4) खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा.

   1) खेळणे    2) तळे      3) डबे      4) पातेले

उत्तर :- 3

5) पर्यायी उत्तरांत ‘चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ’ असलेले वाक्य कोणते ?

   1) मी नदीच्या काठाने गेलो    2) तो घरातून बाहेर पडला
   3) तू रामाला पुस्तक दे      4) तो दिवसाचा चालतो

उत्तर :- 3

6) ‘ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश्य व एकच विधेय असते’ अशा वाक्यास काय म्हणतात ?

   1) संयुक्त वाक्य    2) केवल वाक्य   
   3) मिश्र वाक्य    4) नकारार्थी वाक्य

उत्तर :- 2

7) ‘अलिकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाला काय म्हणता येईल ते सांगा.

   1) उद्देश्य    2) विधेयविस्तार    3) कर्म      4) क्रियापद

उत्तर :- 2

8) सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) ललिता पाणी आणते      2) ललिताने पाणी आणले
   3) ललिताने पाणी आणावे      4) ललिताने जायचे होते

उत्तर :- 1

9) खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ? – ‘प्रतिवर्षी’

   1) तत्पुरुष समास    2) व्दंव्द समास   
   3) अव्ययीभाव समास    4) व्दिगू समास

उत्तर :- 3

10) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

   1) बघ ! एक रेकॉर्ड, गेली सुध्दा लाव ना    2) “बघ, एक रेकॉर्ड गेली सुध्दा ! लाव ना”
   3) “बघ ! एक रेकॉर्ड गेली सुध्दा – लाव ना”    4) “सोड मला, “तो जोराने ओरडला”

उत्तर :- 3

पोलीस भरतीसाठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) 45 व्या जी-7 शिखर परिषद 2019 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?

*उत्तर* : बिआरिट्झ, फ्रान्स

2) महिलांच्या सुरक्षेसंबंधीचा 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला?

*उत्तर* : दिल्ली

3) "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?

*उत्तर* : तामिळनाडू

4) नुकतीच नव्या “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर” ची चाचणी कोणत्या देशाने घेतली?

*उत्तर* : उत्तर कोरिया

5) अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) याच्या अंतर्गत ऑगस्ट 2019 च्या अखेरीस किती उद्याने विकसित केली गेली?

*उत्तर* : 1,159

6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “ऑर्डर ऑफ जाईद” हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाने बहाल केला?

*उत्तर* : संयुक्त अरब अमिरात (UAE)

अश्वारोहणमध्ये फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र

🔰 आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे.

🔰 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.

🔰 आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी, 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल.

🔰 याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

🔰 ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या फवादने सहा पात्रता प्रकारांमध्ये एकूण 64 गुण कमावले.

पहिल्या ‘AIBA क्रिडापटू आयोग’वर एल. सरिता देवी ह्यांची सदस्य म्हणून निवड झाली

🔰आशियाई विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाने (AIBA) प्रथमच क्रिडापटू आयोगावर पाच खंडांमधून सहा लोकांची निवड केली आहे.

🔰त्यात, भारतीय महिला मुष्टियोद्धा एल. सरिता देवी ह्यांची ‘AIBA क्रिडापटू आयोग’ (AIBA अॅथलीट्स कमिशन) याचा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

🔰AIBA क्रिडापटू आयोगामध्ये आशिया, ओशिनिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या पाच खंडांमधून प्रत्येकी एक पुरुष आणि एक महिला अश्या दोघांचा समावेश केला जात आहे.

🔰2020 ऑलम्पिक स्पर्धेत मुष्टियुद्ध खेळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवस्थेसंबंधी त्रुटींना टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने (IOC) हे आयोग तयार करण्याची शिफारस केली होती. निवड झालेले सदस्य क्रिडा संघ आणि खेळाडूंच्या दरम्यान एक दुवा म्हणून कार्य करणार आहेत.

विज्ञान प्रश्नसंच 24/11/2019

que.1 : पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ……. म्हणतात.

1⃣. प्रकाशाचे अपस्करण✅✅✅

2⃣. प्रकाशाचे विकिरण

3⃣. प्रकाशाचे अपवर्तन

4⃣. पूर्ण अंतर्गत परावर्तन

que.2 : खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.
ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते.

1⃣. केवळ अ

2⃣. केवळ ब✅✅✅

3⃣. अ आणि ब दोन्ही

4⃣. अ आणि ब दोन्ही नाही

que.3 : खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात?

अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो.
ब) आकाश निळे दिसते.
क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.
ड) वाळवंटातील मृगजळ

1⃣. अ आणि ब

2⃣. फक्त ड

3⃣. अ,ब आणि क✅✅✅

4⃣. वरील सर्व

que.4 : चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय?

1⃣. दृष्टिभ्रम✅✅✅

2⃣. प्रकाशाचे विकिरण

3⃣. प्रकाशाचे अपस्करण

4⃣. प्रकाशाचे अपवर्तन

que.5 :  जोड्या जुळवा.

कॅमेऱ्याचे भाग डोळ्याचे भाग

अ) शटर.      १) पापणी(eye-Lid)

ब) डायफ्रॅम.    २) परीतारिका(Iris)

क) अॅपेरचर     ३) बाहुली(Pupil)

ड) फिल्म.       ४) दृष्टीपटल(retina)

   
       अ ब क ड

1⃣. १ २ ३ ४✅✅✅

2⃣. २ ३ ४ १

3⃣. १ २ ४ ३

4⃣. २ १ ३

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44
- पर्वीचे नाव NH 07
- लांबी 3745 km
- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)

2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27
- लांबी 3507 km
- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)

3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48
- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08
- लांबी 2807 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)

4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52
- लांबी 2317 km
- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)

5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30
- पूर्वीचे नाव NH 221
- लांबी 2040 km
- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)

6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06
- लांबी 1873 km
- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)

7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53
- लांबी 1781 km
- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)

8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16
- पूर्वीचे नाव NH 05
- लांबी 1711 km
- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)

9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66
- पूर्वीचे नाव NH 17
- लांबी 1622 km
- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)

10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19
- पूर्वीचे नाव NH 02
- लांबी 1435 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली

📌कोणत्या केंद्रीय सरकारी रुग्णालयाने ‘कायाकल्प पुरस्कार 2018-19’ जिंकला?

(अ) जवाहरलाल स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (JIPMER), पुडुचेरी

(ब) वैद्यकीय शिक्षण व संशोधन स्नातकोत्तर संस्था (PGIMER), चंदीगड

(क) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), दिल्ली✅✅✅

(ड) इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य व वैद्यकीय विज्ञान संस्था (NEIGRIHMS), शिलांग

📌2019 या वर्षी आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिनाची संकल्पना काय होती?

(अ) रिड्यूस डिझास्टर डॅमेज टू क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिसरप्शन ऑफ बेसिक सर्व्हिसेस✅✅✅

(ब) रिड्यूसींग डिझास्टर इकनॉमिक लॉसेस

(क) होम सेफ होम

(ड) लिव्ह टू टेल: राईसिंग अवेयरनेस, रिड्यूसींग मोर्टेलिटी

📌_____ येथे भारत आपले पहिले ऑलम्पिक हॉस्पिटॅलिटी हाऊस उभारणार आहे.

(अ) पॅरिस
(ब) बिजींग
(क) टोकियो✅✅✅
(ड) लंडन

📌‘धर्म गार्डियन 2019’ विषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

I) ‘धर्म गार्डियन’ हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो 2015 या सालापासून भारतात घेतला जातो.

II) ‘धर्म गार्डियन’ हा भारत, रशिया आणि जापान या देशांच्या दरम्यानचा तिरंगी लष्करी सराव आहे.

(अ) केवळ I
(ब) केवळ II
(क) I आणि II दोन्ही
(ड) यापैकी एकही नाही✅✅✅

📌पृथ्वीच्या वातावरणामधला आयनोस्फीयर या थराचा अभ्यास करण्यासाठी NASAने पाठवविलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे?

(अ) ICON✅✅✅
(ब) SEO
(क) IONO
(ड) INO

📌भारत आणि _ या देशांच्या नौदलांचा ‘2019 कोऑर्डिनेटेड पेट्रोल (CORPAT)’ नावाचा सागरी सराव आयोजित केला गेला.

(अ) ऑस्ट्रेलिया
(ब) बांग्लादेश✅✅✅
(क) चीन
(ड) मालदीव

📌पृथ्वीवरील कार्बनच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या जागतिक संशोधनपर कार्यक्रमाचे नाव काय आहे?

(अ) कार्बन रिसर्च प्रोग्राम
(ब) डीप कार्बन ऑब्जर्व्हेटरी✅✅✅
(क) कार्बन अर्थ प्रोग्राम
(ड) कार्बन फॉर अर्थ

📌कोणते राज्य सरकार राज्यामधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी कन्याश्री विद्यापीठाची स्थापना करणार आहे?

(अ) केरळ
(ब) पश्चिम बंगाल✅✅✅
(क) ओडिशा
(ड) आसाम

📌कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?

(अ) करोलिना प्लिस्कोवा
(ब) नाओमी ओसाका
(क) अॅशले बार्टी
(ड) कोको गॉफ✅✅✅

📌जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन _ गव्हर्नन्स’ या युतीमध्ये भारत सामील झाला.

(अ) रोबोटिक्स
(ब) टेक्नॉलॉजी✅✅✅
(क) एज्युकेशन
(ड) हेल्थ

📌 ________ येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

(अ) रशिया✅✅✅
(ब) न्युझीलँड
(क) भारत
(ड) जर्मनी

📌__________ याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

(अ) किमर कोपेजन्स
(ब) लक्ष्य सेन✅✅✅
(क) मॅट मोरिंग
(ड) युसुके ओनोडेरा

प्र१) अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?

(अ) औषधी
(ब) जलशुद्धीकरण✅✅✅
(क) तांत्रिक शिक्षण
(ड) खगोलशास्त्र

स्पष्टीकरण : अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे जलशुद्धीकरण संबंधित आहे.

प्र२) कोणती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे?

(अ) सुकन्या समृद्धी
(ब) CBSE उडान योजना
(क) विज्ञान ज्योती✅✅✅
(ड) बेटी बचाओ बेटी पढाओ

स्पष्टीकरण : विज्ञान ज्योती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे.

प्र.३) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(अ) डॉ. मनमोहन सिंग
(ब) डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम✅✅✅
(क) अटलबिहारी वाजपेयी
(ड) चेतन भगत

स्पष्टीकरण : ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आहेत.

प्र.४) _ या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

(अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(ब) जागतिक आर्थिक मंच (WEF)
(क) जागतिक बँक✅✅✅
(ड) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)

स्पष्टीकरण : जागतिक बँक या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

प्र.५) 📌2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?

(अ) अॅना बर्न्स आणि सॅली रुनी
(ब) जॉर्ज सौन्डर्स आणि अॅना बर्न्स
(क) पॉल बेटी आणि मार्लन जेम्स
(ड) मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो
      ✅✅✅

स्पष्टीकरण : ) 2019 सालाचा बुकर पुरस्कार मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो यांनी जिंकला.

प्र.६) UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

अ) अमेरिकेत बालमृत्यू दर सर्वात कमी आहे.

ब) ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.

(अ) केवळ अ
(भ) केवळ ब✅✅✅
(क) अ आणि ब दोन्ही
(ड) यापैकी एकही नाही

स्पष्टीकरण : UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो, हे विधान चुकीचे आहे.

प्र.७) ___ या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

(अ) 10 ऑक्टोबर
(ब) 12 ऑक्टोबर
(क) 13 ऑक्टोबर
(ड) 15 ऑक्टोबर✅✅✅

स्पष्टीकरण : 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

प्र.८) कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?

(क) करोलिना प्लिस्कोवा
(ब) नाओमी ओसाका
(क) अॅशले बार्टी
(ड) कोको गॉफ✅✅✅

स्पष्टीकरण : कोको गॉफ हि महिला WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली.

प्र.९) __ येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

(अ) रशिया✅✅✅
(ब) न्युझीलँड
(क) भारत
(ड) जर्मनी

स्पष्टीकरण : रशिया येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

प्र.१०) __ याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

(अ) किमर कोपेजन्स
(ब) लक्ष्य सेन✅✅✅
(क) मॅट मोरिंग
(ड) युसुके ओनोडेरा

स्पष्टीकरण : लक्ष्य सेन याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

प्रश्नसंच विषय : चालू घडामोडी स्पष्टीकरण

प्र.०१) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

अ) कटारिना जॉनसन थॉम्पसन✅✅✅
ब) व्हेरेना प्रीनर
क) नाफिसातौ थियाम
ड) लॉरा मुइर

स्पष्टीकरण : प्र.०१) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कटारिना जॉनसन थॉम्पसन यांनी जिंकले.

प्र.०२) भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव _ येथे आयोजित करण्यात आला आहे.

अ) राजस्थान
ब) उत्तराखंड✅✅✅
क) हिमाचल प्रदेश
ड) केरळ

स्पष्टीकरण : भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्र.०३) चीनच्या “DF-41” संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ) “DF-41” म्हणजे डॉन्कफेन्क-41 होय.

ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

अ) केवळ अ ✅✅✅
ब) केवळ ब
क) केवळ अ आणि ब
ड) सर्व बरोबर आहेत

स्पष्टीकरण : केवळ अ हे चुकीचे आहे. ब हे बरोबर आहे. ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

प्र.०४) भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला?

अ) मंगोलिया✅✅✅
ब) कंबोडिया
क) लाओस
ड) व्हिएतनाम

स्पष्टीकरण : भारताच्या मदतीने मंगोलिया या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला

प्र.०५) उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले?

अ) IIT कानपूर
ब) CSIR✅✅✅
क) IISc बेंगळुरू
ड) IIT खडगपूर

स्पष्टीकरण : उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी CSIR संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले.

प्र.०६) भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?

अ) श्रीलंका
ब) बांग्लादेश✅✅✅
क) मालदीव
ड) पाकिस्तान

स्पष्टीकरण : भारताने शेजारच्या बांग्लादेश या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

प्र.०७) संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी _ अंतर्गत देण्यात येणार.

अ) आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज
वेलफेयर फंड✅✅✅
ब) राष्ट्रीय संरक्षण कोष
क) लष्कर केंद्रीय कल्याण कोष
ड) यापैकी नाही

स्पष्टीकरण : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज वेलफेयर फंड अंतर्गत देण्यात येणार.

प्र.०८) 21 ऑक्टोबर 2019 रोजी _ सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

अ) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
ब) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
क) NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन)✅✅✅
ड) ISA (इस्त्राएल स्पेस एजन्सी)

स्पष्टीकरण : ) 21 ऑक्टोबर 2019 रोजी NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन) सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

प्र.०९) UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून  यांची नेमणूक केली.

अ) कॅमेरून डायझ
ब) युना किम
क) मिली बॉबी ब्राउन
ड) यलिट्झा एपारीसिओ✅✅✅

स्पष्टीकरण : UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून  यांची नेमणूक केली. - यलिट्झा एपारीसिओ

प्र.११) जागतिक अधिवास दिन _ या दिवशी साजरा केला जातो.

अ) 7 ऑक्टोबर✅✅✅
ब) 9 ऑक्टोबर
क) 6 ऑक्टोबर
ड) 8 ऑक्टोबर

स्पष्टीकरण : जागतिक अधिवास दिन 7 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो.

२३ नोव्हेंबर २०१९

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच

१) .  खालीलपैकी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते ?

   1) सी. रंगराजन
   2) मनमोहन सिंग   
   3) डॉ. डी. सुब्बाराव   
   4) नरेंद्र जाधव

   उत्तर :- 4

२).  पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

   1) मंत्रीमंडळ 
  2) राष्ट्रपती  
  3) राज्यसभा    
  4) लोकसभा

उत्तर :- 4

३).  कोणत्या घटनादुरुस्तीव्दारे राष्ट्रपतींना मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे ?

   1) 42 वी घटनादुरुस्ती 
   2) 44 वी घटनादुरुस्ती
   3) 24 वी घटनादुरुस्ती  
   4) 52 वी घटनादुरुस्ती

उत्तर :- 1

४) . भारतातील संसदीय शासनपद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे.

   ब) तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो.

   क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात.

   ड) मंत्रीमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तीगतरीत्या जबाबदार असते.

   1) अ, ब, क
   2) ब, क, ड  
   3) अ, क, ड  
   4) अ, ब, ड

उत्तर :- 1

५) . राष्ट्रपतीकडून पंतप्रधान निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते ?

   अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.

   ब) ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी.

   क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.

   ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.

   1) अ   
   2) अ, ब    
   3) अ, क    
   4) अ, क, ड

    उत्तर :- 3

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...