२० नोव्हेंबर २०१९

भुतान, जगातले प्रथम क्रमांकाचे आनंदी राष्ट्र कसे बनले ?

🔰"भुतान" हिमालयाच्या कुशीत वसलेला एक नितांत सुंदर देश आहे. शून्य प्रदुषण.  देशभर कमालीची स्वच्छता, शांताता, सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे.

🔰मानव विकास निर्देशांक आणि हॅपी इंडेक्स अशा दोन प्रकारे जगातील देशांची सुची तयार केली जाते. जगातील सुमारे 222 देशांच्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत भुतान प्रथम क्रमांकावर आहे.

🔰खरं तर भुतान आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहे. तरीही इथला माणूस आनंदी आहे. प्रसन्न आहे. सुखी आहे.

🔰का आहे? कसं जमलं त्यांना हे?
भुतानमध्ये सर्व प्रकारचे केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत आहे.
भुतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्यसेवा मोफत आहे.

🔰हिमालयात असल्यानं डोंगराळ भाग. पारो हा एकमेव विमानतळ. तोही भारतानं नेहरूंच्या काळात तयार करून दिलेला.

🔰थिंफू हे सध्याचं राजधानीचं शहर.

🔰शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगतच्या हॉटेलात एकही हॉर्न ऎकू येत नाही. सिग्नलची गरज पडत नाही. स्वयंशिस्तीने लोक गाड्या चालवत असल्यानं हॉर्न नाही. सिग्नल नाही. ट्रॅफिक जॅम नाही.

🔰तुम्ही जगात कुठेही गेलात तरी प्रत्येक हॉटेलात पाट्या दिसतात. चोरांपासून सावध रहा. तुमचे किमती सामान चोरीला गेल्यास हॉटेल मॅनेजमेंट जबाबदार नाही. वगैरे.

🔰भुतानमधल्या कुठल्याही हॉटेलात अशा पाट्या दिसल्या नाहीत. कारण प्रवाश्यांच्या सामानाच्या चोर्‍या झाल्या तर ते परत येणार नाहीत, त्यांच्या देशातील इतरांनाही जाऊ नका म्हणून सांगतील. तेव्हा नो चोर्‍या असा संस्कार प्रत्येक भुतानीवर असल्यानं तिथं चोर्‍या होत नाहीत.

🔰हॉटेलातील कष्टाची कामं मुलीही तत्परतेनं करतात. टुरीझम हा मुख्य व्यवसाय. शेती दुसरा. उद्योगधंदे फारसे नाहीत.
चोर्‍या बंद. शील जपा. गरजा कमी. सुख ज्यादा.

🔰भारतीय माणसांना त्यांच्या नोटा घ्यायची गरज नाही.  आपली करंसी तिकडे चालते. हिंदी सर्वांना येते. पासपोर्टची गरज पडत नाही.

🔰भारतीयांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. कारण आपण बुद्धाच्या देशातले म्हणून. भुतान प्रामुख्याने बौद्ध देश आहे.

🔰इतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा नाही.

🔰यातनं भारतानं घ्यायचा धडा हा आहे की भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्‍या बंद करा. शील जपा.

🔰माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार?

🔰हे दोन प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.

🔰भारतानं भुतानकडून हे शिकायल हवं...

18 नोव्हेंबर झटपट दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

केंद्र सरकारने मेघालयमधील फुटीरतावादी एचएनएलसी आणि त्याच्याशी संबंधित सर्व गटांना केले बेकायदेशीर घोषित

▪ जेएनयू विद्यापीठ प्रशासनानं वसतिगृहाच्या शुल्कामध्ये वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक; पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड

▪ पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल पक्षांचं कौतुक; भाजपने आदर्श घेण्याचा सल्ला

▪ व्हॅटिकनपोप फ्रान्सिस धार्मिक तसेच कौटुंबिक दौऱ्यावर जाणार; युद्धातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे करणार सांत्वन

▪ कभी कभी लगता है की अपुन ही भगवान है; संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संजय राऊतांचा भाजपला टोला.

▪ किशोरी पेडणेकर यांचा मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

▪ दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; येत्या वर्षात 3 मार्चपासून दहावी तर 18 फेब्रुवारीपासून बारावीची लेखी परीक्षा होणार सुरु

▪ फेसबुक आणि ट्विटरला टक्कर देण्यासाठी विकिपीडियाचे 'डब्लूटी: सोशल' अ‍ॅप येणार; वेबसाईटही सुरु

▪ धोनीमुळं 2011 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये माझं शतक हुकलं: गौतम गंभीरचा खळबळजनक खुलासा

▪ अभिनेता शाहरुख खानची कन्या सुहाना खानचा 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' हा लघुचित्रपट प्रदर्शित

१९ नोव्हेंबर २०१९

चालू घडामोडी प्रश्नसंच 19 /11/2019

📍 कोणता देश सहावी ‘ASEAN डिफेंस मिनिस्टर्स मिटिंग-प्लस’ या बैठकीचे आयोजन करणार आहे?

(A) थायलँड✅✅
(B) इंडोनेशिया
(C) मलेशिया
(D) भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाच्या नागरिकांना भारत सरकारने व्हिसा-ऑन-अराईव्हल सुविधा प्रदान केली आहे?

(A) कॅनडा
(B) ऑस्ट्रेलिया
(C) संयुक्त अरब अमिराती✅✅
(D) कुवैत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या न्यायमूर्तींनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली?

(A) न्या. अपरेश कुमार सिंग
(B) न्या. एस. चंद्रशेखर
(C) न्या. सुजित नारायण प्रसाद
(D) न्या. डॉ. रवी रंजन✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या तेल कंपनीने हिमाच्छादित प्रदेशात सुद्धा वापरले जाऊ शकणारे विशेष हिवाळी डिझेल तयार केले?

(A) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड✅✅
(B) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(C) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(D) गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10 सराव प्रश्न उत्तरे सोडवून पहा 19/11/2019

1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 6:38::7:?

 51

 52

 50

 48

उत्तर :51

 2. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?

 10

 15

 25

 30

उत्तर :15

 3. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?

 PICEP

 CEPRJ

 PIRCE

 PRICE

उत्तर :PRICE

 4. विसंगत शब्द शोधा.

 जव (सातू)

 कापूस

 तांदूळ

 गहू

उत्तर :कापूस

 5. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?

 2 तास

 अडीच तास

 1 तास

 दिड तास

उत्तर :दिड तास

 6. जर WINTER=2391420518 तर COTTON=?

 31520201514

 31515202014

 32520152014

 31420151520

उत्तर :31520201514

 7. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?

 तीन वेळा

 दोन वेळा

 चार वेळा

 पाच वेळा

उत्तर : दोन वेळा

 8. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?

 1

 25

 5

 15

उत्तर :5

 9. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?

 12

 15

 18

 20

उत्तर :12

 10. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

 9 वाजून 25 मिनिटे

 10 वाजून 35 मिनिटे

 11 वाजून 20 मिनिटे

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

झाशीची राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीची राणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या धाडसी स्त्रीची आज १९१ वी जयंती. कशाचीही भिडभाड न ठेवता इंग्रजांशी लढण्यासाठी सज्ज झालेल्या या राणीबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. झाशीच्या राणीच्या १९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करुया…

१. राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्मदिनाबाबतचा वाद मागच्या अनेक वर्षांपासून कायम आहे. मात्र त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी येथे झाला असे म्हटले जाते.

२. आपल्याला त्यांचे नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई असल्याचे माहित आहे. मात्र त्यांचे खरे नाव मनिकर्णिका तांबे असे होते. अनेक जण त्यांना मनू या नावाने हाक मारत.

३. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.

४. झाशीचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी वयाच्या ७ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.

५. त्या जन्मत: अतिशय धाडसी होत्या. त्यांनी घरी राहून शिक्षण घेतले. त्यांच्या अभ्यासात घोडेस्वारी, बंदूक चालविणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता.

६. अवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या.

७. त्यांनी लढलेल्या युद्धात ह्युज रोज हा वरिष्ठ ब्रिटीश आर्मी ऑफीसर होता. त्याने राणीचे वर्णन चाणाक्ष, सुंदर आणि देखण्या असे केले होते.

८. लक्ष्मीबाई यांचा राजवाडा राणीचा महाल म्हणूनही ओळखला जातो. आता त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे.

९. त्यांचे पहिले मूल ४ महिन्याचे असताना गेले. मग त्यांनी मुलाला दत्तक घेतले.

१०. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

११. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.

१२. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण भारतामध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता.

१३. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले.

१४. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

१५. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

नीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड

🔰विश्वस्त म्हणून निवड झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित 'मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे.

🔰या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

🔰यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

🔰नीता अंबानी यांनी म्युझियमला कायमच मदत केली आहे. या म्युझियमच्या विकासातही त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे म्युझियमच्या संचालक मंडळावर त्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

🔰रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने भारतात कला, संगीत आणि संस्कृती विषयक अनेक उत्सव आणि महोत्सवांचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून केलं जातं आहे.

🔰या उपक्रमांमुळे अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं तर भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख जगभर पोहचण्यास मदत झाली असंही नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

दिनांक 17 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन ह्यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मी ह्यांनी राजभवनात एका सोहळ्यात त्यांना पदाची शपथ दिली.

न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन झारखंड उच्च न्यायालयाचे 13 वे मुख्य न्यायाधीश ठरले आहेत. माजी मुख्य न्यायाधीश अनिरुद्ध बोस ह्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्यावर हे पद मे 2019 या महिन्यापासून रिक्त होते.

✍️भारतीय उच्च न्यायालय

🎯भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो.

🎯सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्याय‍धीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्याय‍धीश असतात. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.

🎯महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत.

चालू घडामोडी प्रश्नावली १९/११/२०१९

प्र.१) कोणत्या नदीच्या भागावर भारतामधील सर्वांत दीर्घ ‘बोगिबील पूल’ उभारण्यात आला आहे?
स्पष्टीकरण : ब्रह्मपुत्रा

प्र.२) भारतातले पहिले संगीत संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे?
स्पष्टीकरण : तमिळनाडू

प्र.३) कोणता देश प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ या प्रदेशात येत नाही?
स्पष्टीकरण : भारत

प्र.४) भारतात कोणत्या ठिकाणाहून ‘अग्नी-४’ या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली?
स्पष्टीकरण :  अब्दुल कलाम बेट, ओडिशा

प्र.५) अमेरिकेच्या संरक्षण सचिव पदी कोणाला नियुक्त केले गेले?
स्पष्टीकरण : पॅट्रिक शनाहन

प्र.६) ‘राष्ट्रीय ग्राहक दिन २०१८’ या दिवसाची संकल्पना काय आहे?
स्पष्टीकरण : टाइमली डिस्पोझल ऑफ कंझ्युमर कम्पलेंट्‌स

प्र.७) कोणत्या दिवशी भारतात दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन पाळला जातो?
स्पष्टीकरण : २४ डिसेंबर

प्र.८) कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘कृषक असिस्टंट फॉर लाइव्हलिहुड अँड इन्कम ऑग्युमेंटेशन’ (KALIA) योजनेला मंजुरी दिली?
स्पष्टीकरण:ओडिशा

प्र.९) केंद्र सरकारच्या ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ या योजनेचा समाजाच्या कोणत्या भागाला जास्तीत जास्त फायदा देण्याचे लक्ष आहे?
स्पष्टीकरण :अनुसूचित जमाती

प्र.१०) केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने कोणत्या प्राणी/प्रजाती/पक्ष्याच्या संख्येच्या दृष्टीने सुरक्षा व संवर्धन करण्यासाठी एक संवर्धन प्रकल्प सुरू केला?
स्पष्टीकरण : अ) आशियायी सिंह

प्र.११) कोणत्या शहरात भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यासाठीच्या संयुक्त आयोगाची बारावी बैठक आयोजित केली गेली?
स्पष्टीकरण :अबुधाबी     
 
प्र.१२) ‘एक्‍स-कोप इंडिया २०१८’ हा कोणत्या दोन देशांच्या दरम्यानचा संयुक्त हवाई सराव आहे?
स्पष्टीकरण : अमेरिका-भारत     
 
प्र.१३) नुकत्याच झालेल्या ‘जी-२० शिखर’ परिषदेदरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅमबर्ग घोषणापत्राचा उल्लेख केला होता. या घोषणापत्राचा संदर्भ कोणत्या क्षेत्राशी आहे ? 
स्पष्टीकरण : दहशतवाद           
 
प्र.१४) अमेरिका आणि चीन या देशांमधील व्यापार युद्धाला किती दिवसांचा विराम देण्याचे मान्य केले आहे?
स्पष्टीकरण :४५ दिवस       
 
प्र.१५) कोणत्या महिला कुस्तीपटूने ‘टाटा मोटर्स वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्‍यपद २०१८’ या क्रीडास्पर्धेत ५७ किलो वजन गटाचा राष्ट्रीय किताब जिंकला?
स्पष्टीकरण : विनेश फोगट   
 
प्र.१६) कोणत्या देशात ‘आशिया प्रशांत शिखर परिषद २०१८’ आयोजित करण्यात आली होती ?
स्पष्टीकरण :नेपाळ       

प्र.१७) कोणत्या देशात २०२२ मध्ये होणारी ‘जी-२० शिखर परिषद’ आयोजित केली जाणार आहे?
स्पष्टीकरण : भारत
 
प्र.१८) पक्ष परिषदेची (COP) २४ वी बैठक कोणत्या देशात आयोजित केली गेली?
स्पष्टीकरण : पोलंड     
 
प्र.१९) पक्ष परिषदेच्या (COP) २४ व्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
स्पष्टीकरण : पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन           
 
प्र.2०) ब्रह्मोस क्षेपणास्त्र ----- येथून सोडले जाऊ शकते?
स्पष्टीकरण : पाणबुडी + जमीन + विमान

प्र.२१) ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा विकास कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे केला?
स्पष्टीकरण : भारत-रशिया         
 
प्र.२२) राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी ‘आंतरराष्ट्रीय CII ॲग्रो टेक २०१८’ या कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले?
स्पष्टीकरण :चंडीगड           
 
प्र.२३) कोणता क्रिकेटपटू ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) क्रिकेट हॉल ऑफ फेम’ यामध्ये समाविष्ट केला जाणारा २५वा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बनला आहे?
स्पष्टीकरण : रिकी पाँटिंग         
 
प्र.२४) कोणता भारतीय जिल्हा ‘आकांक्षित जिल्हे कार्यक्रमा’च्या अंतर्गत द्वितीय डेल्टा क्रमवारीमध्ये अग्रस्थानी आहे?
स्पष्टीकरण : अ) विरुधूनगर, तमिळनाडू         
             
प्र.२५) कोणत्या भारतीय मुष्टियोद्धाला भारताचे मुख्य मुष्टियुद्ध प्रशिक्षक बनविण्यात आले आहे?
स्पष्टीकरण : सी. ए. कुट्टप्पा
 
प्र.२६) आरबीआयने २७ डिसेंबरला आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालन यांच्या नेतृत्वात कोणत्या कार्यचौकटीचे पुनरवलोकन करण्यासाठी समिती नेमली?
स्पष्टीकरण : आर्थिक भांडवलसंबंधी कार्यचौकट
 
प्र.२७) भारतात किती उच्च न्यायालये आहेत?
स्पष्टीकरण :  २५         
 
प्र.२८) कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात जानेवारी २०१९ पासून नवीन उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू केले जाणार? 
स्पष्टीकरण : आंध्र प्रदेश
 
प्र.२९) कोणत्या भारतीय संस्थेकडून ’सर्वे ऑन रिटेल पेमेंट हॅबिट्‌स ऑफ इंडिव्हिज्युल्स’(SRPHi) सुरू करण्यात आले आहे?
स्पष्टीकरण : भारतीय रिझर्व्ह बॅंक 

प्र.३०) कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून 'वैश्विक धोका अहवाल २०१९' प्रसिद्ध करण्यात आला ?
स्पष्टीकरण : जागतिक आर्थिक मंच

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.

   1) आम्ही भारतीय नागरिक    2) भारतीय नागरिक
   3) आज भारताशी      4) प्रामाणिक आहोत

उत्तर :- 1

2) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) भावे प्रयोग    2) सकर्मक कर्तरी प्रयोग   
   3) कर्मणी प्रयोग    4) अकर्मक कर्तरी प्रयोग

उत्तर :- 4

3) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’

   1) नत्र बहुव्रीही समास    2) व्दिगू समास   
   3) समाहार व्दंव्द – समास  4) मध्यमपदलोपी समास

उत्तर :- 1

4) ‘बापरे .................. केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?

   1) पूर्णविराम    2) उद्गारवाचक चिन्ह   
   3) अर्धविराम    4) प्रश्नचिन्ह

उत्तर :- 2

5) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?

   1) मंदाक्रांता    2) वसंततिलका     
   3) शिखरिणी    4) पृथ्वी

उत्तर :- 4

6) उपसर्ग साधित शब्द निवडा.

   1) मोफत    2)‍ बंदिस्त    3) पैठणी      4) भरजरी

उत्तर :- 4

7) मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

   1) अभिधामूल व्यंजना    2) लक्षणामूल व्यंजना
   3) लक्षण लक्षणा      4) सारोपा लक्षणा

उत्तर :- 1

8) खालीलपैकी कोणता शब्द ‘घर’ या अर्थाचा नाही ?

   1) सदन    2) गृह      3) गोठा      4) गेह

उत्तर :- 3

9) पर्यायी उत्तरातील ‘अ’ व ‘ब’ या शब्दगटातून विरुध्द अर्थी शब्द जोडी कोणती ती शोधा.

  अ    ब
         1) अश्व    वाजी
         2) हय    घोडा
        3) अनुज    अग्रज
         4) वारू    तुरंग

उत्तर :- 3

10) गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. –
अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. पण तरीही त्यांना
     स्वत:ला सावरले. कारण म्हणतात ना ..............

   1) वळणाचे पाणी वळणावरच जाणार    2) शीर सलामत तर पगडी पचास
   3) शेंडी तुटो वा पारंबी तुटो      4) पदरी पडले पवित्र झाले

उत्तर :- 2

झटपट 10 सराव प्रश्न - उत्तरे

1) पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : कोलकाता

2) ऑस्ट्रेलियात झालेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
उत्तर : फ्रान्स

3)  ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : केंटो मोमोटा

4) NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान कोणत्या प्रयोगासाठी बनवले आहे?
उत्तर : मॅक्सवेल X-55

5) BRICS व्यापार मंत्र्यांची 9 वी बैठक कोठे होणार आहे?
उत्तर : ब्राझिलिया

6) ‘MILAN’ सरावाच्या संदर्भातली मध्य नियोजन परिषद (MPC) कुठे पार पडली?
उत्तर : विशाखापट्टणम

7) मॉरिशस या देशात झालेल्या निवडणूकीत कोणत्या व्यक्तीच्या पक्षाचा विजय झाला?
उत्तर : प्रविंद जुगनाथ

8) 11 वा बाल संगम महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : नवी दिल्ली

9) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे राज्य समन्वयक कोण आहेत?
उत्तर : हितेश देव शर्मा

10) नवोदय विद्यालय समितीसाठी बनवण्यात आलेल्या डिजिटल व्यासपिठाचे नाव काय?
उत्तर : शाला दर्पण

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...