१६ नोव्हेंबर २०१९

स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण सराव प्रश्नावली स्पष्टीकरण

विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) यंदाच्या प्रतिष्ठित हिंदी रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रसिद्ध पत्रकाराचे नाव काय आहे?
अ) बोरिया मुजुमदार 
ब) रामबहादूर राय ✅
क) रुबिका लियाकत    
ड) स्वेता सिंग

स्पष्टीकरण: यंदाच्या प्रतिष्ठित हिंदी रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रसिद्ध पत्रकाराचे नाव रामबहादूर राय आहे.

प्र.२) संगीत अकादमीकडून दिल्या जाणाऱ्‍या ‘संगीत कलानिधी’ सन्मानासाठी २०१९ या वर्षासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
अ) एम. एस. शीला    
ब) राजकुमार भारती    
क) एस. सौम्या ✅    
ड) सीता नारायणन

स्पष्टीकरण : संगीत अकादमीकडून दिल्या जाणाऱ्‍या ‘संगीत कलानिधी’ सन्मानासाठी २०१९ या वर्षासाठी एस. सौम्या यांची निवड करण्यात आली आहे.

प्र.३) ‘डिफएक्सपो इंडिया’ याची २०२० मध्ये होणारी ११ वी द्विवार्षिक आवृत्ती पहिल्यांदाच .............. येथे आयोजित करण्यात आली आहे.
अ) भोपाळ, मध्यप्रदेश    
ब) लखनौ, उत्तर प्रदेश ✅
क) कोची, केरळ 
ड) चेन्नई, तामिळनाडू

स्पष्टीकरण : ‘डिफएक्सपो इंडिया’ याची २०२० मध्ये होणारी ११ वी द्विवार्षिक आवृत्ती पहिल्यांदाच लखनौ, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे.

प्र.४) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने राष्ट्रपतींना राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार दिला आहे
अ) कलम १४५    
ब) कलम १५५ ✅
क) कलम १६५ 
ड) कलम १७५

स्पष्टीकरण : भारतीय राज्यघटनेच्या कलम १५५ कलमाने राष्ट्रपतींना राज्याचे राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार दिला आहे.

प्र.५) कझाकिस्तानच्या ‘प्रेसिडेंट चषक’ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी मिळवले?
अ) शिव थापा  ✅
ब) विजेंदर सिंग
क) मेरी कोम    
ड) अखिल कुमार

स्पष्टीकरण : कझाकिस्तानच्या ‘प्रेसिडेंट चषक’ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक शिव थापा यानी मिळवले.

प्र.६) भारतात कारगिल युद्ध ............ या नावानेदेखील ओळखले जाते.
अ) ऑपरेशन किंग    
ब) ऑपरेशन धरोहर
क) ऑपरेशन वतन    
ड) ऑपरेशन विजय ✅

स्पष्टीकरण : भारतात कारगिल युद्ध ऑपरेशन विजय या नावानेदेखील ओळखले जाते.

प्र.७) ‘आफ्रिका करंडक २०१९’ फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोण आहे?
अ) सेनेगल    
ब) अल्जेरिया ✅
क) इजिप्त    
ड) दक्षिण आफ्रिका

स्पष्टीकरण :  ‘आफ्रिका करंडक २०१९’ फुटबॉल स्पर्धेचा विजेता अल्जेरिया आहे.

प्र.८) भारताच्या ६४ व्या ग्रँडमास्टरचे नाव काय आहे?
अ) प्रितू गुप्ता   ✅  
ब) पेंटला हरिकृष्ण
क) विजित गुजराती    
ड) अभिधान

स्पष्टीकरण : भारताच्या ६४ व्या ग्रँडमास्टरचे नाव प्रितू गुप्ता आहे.

प्र.९) ऐतिहासिक सफदरजंग कबर कुठे आहे?
अ) पुणे    
ब) लखनौ      
क) दिल्ली ✅      
ड) सुरत

स्पष्टीकरण : ऐतिहासिक सफदरजंग कबर दिल्ली येथे आहे.

प्र.१०) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) .......... याचे पूर्ण सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
अ) वेस्ट इंडीज    
ब) डेन्मार्क क्रिकेट
क) झिंबाब्वे क्रिकेट    ✅
ड) केनिया क्रिकेट

स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) झिंबाब्वे क्रिकेट  याचे पूर्ण सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण सराव प्रश्नावली स्पष्टीकरणासह उत्तरतालिका....

विषय : महाराष्ट्र राज्य भूगोल स्पष्टीकरण....

प्र.1) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते ?

अ) नाशिक
ब) अहमदनगर
क) कोल्हापूर
ड) पुणे

उत्तर : क) कोल्हापूर

प्र.2) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या किती आहे ?

अ) ११,२०,५४,६६६
ब) ११,२३,७४,३३३
क) १२,३३,७५६,५४२
ड) २१,११,३३,६६६

उत्तर : ब)  ११,२३,७४,३३३ : सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ११,२३,७४,३३३ईतकी आहे.

प्र.3) महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ?

अ) २९ जिल्हे
ब) ३४ जिल्हे
क) ३६ जिल्हे
ड) ३८ जिल्हे

उत्तर : क) ३६ जिल्हे
स्पष्टीकरण : सन २०११ च्या जणगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतात एकूण ६४० जिल्हे होते, त्यांपैकी ३५ जिल्हे महाराष्ट्र राज्यात होते,  आता ०१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 'पालघर' या नवा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आल्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता ३६ इतकी झाली आहे.

प्र.४) दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य देशात कितव्या स्थानावर आहे ?

अ) दुसर्या
ब) चौथ्या
क) सातव्या
ड) नवव्या

उत्तर : महाराष्ट्रात देशातील एकूण दगडी कोळशाच्या साठ्यांच्या ३ % टक्के साठे आहेत, दगडी कोळशाचे साठे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य देशात सातव्या स्थानावर आहे.

प्र.५) उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानावर आहे ?

अ) पहिल्या
ब) दुसर्या
क) तीसर्या
ड) चौथ्या

उत्तर : उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसर्या स्थानावर असला तरी साखरेच्या उत्पादनात मात्र प्रथम स्थानावर आहे.

प्रदूषण विरहित देश

🔸बारबडोस :- सर्वात स्वच्छ हवा असणाऱ्या देशात दुसऱ्या स्थानावर कॅरेबियन देश बारबडोस आहे. इथली हवा 100 टक्के स्वच्छ आहे.

🔸ऑस्ट्रेलिया :- सर्वात स्वच्छ पर्यावरण आणि 100 टक्के स्वच्छ हवा असलेल्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानी आहे.

🔸जॉर्डन :- हा जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारा तिसरा देश आहे. इंडेक्सनुसार इथली हवा 99.61 टक्के स्वच्छ आहे.

🔸 कॅनडा :- सर्वात स्वच्छ हवेच्या या यादीत कॅनडा हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. इथली हवा 99.28 टक्के स्वच्छ आहे.

🔸डेनमार्क :- पर्यावरण कामगिरी निर्देशांकनुसार या देशातील हवा 99.16 टक्के स्वच्छ आहे. सर्वात स्वच्छ हवा आणि पर्यावरणात डेनमार्क देश पाचव्या स्थानावर आहे.

👉भारत :- पर्यावरण कामगिरी निर्देशांकानुसार भारताबद्दल बोलायचे झाले तर आपण 177 व्या स्थानावर आहे. आपल्या देशात हवा फक्त 5.75 टक्के स्वच्छ आहे.

माहितीच्या अधिकाराची वैशिष्ट्ये

माहिती जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला माहिती मागण्याचा अधिकार आहे.

माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे उघड करणे अर्जदारावर बंधनकारक नसते.

माहिती मागण्यासाठी नमुन्यातील अर्ज, संपर्काचा पत्ता आणि 10 रु. शुल्क पुरेसे ठरेल.

एखाद्या महितीसाठीचा अर्ज सहाय्यक माहिती अधिकार्‍याकडे दिलेला असेल व सदरचा अर्ज मुख्य कार्यालयाकडे पाठवावयाचा असेल, तर आणखी पाच दिवसांची जास्त मुदत दिली जाऊ शकते.

एखाद्या नागरिकाने जीवित स्वातंत्र्य या संदर्भात माहिती मागितली असेल तर ती 48 तासांच्या आत देणे बंधनकारक आहे.

जर मागणी केलेली माहिती त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेची असेल तर ती माहिती देण्यासाठी 40 दिवसांची मुदत आहे.

माहितीच्या अधिकारामध्ये कामाचे निरीक्षण किंवा तपासणी या बाबतींचा समावेश करण्यात आला आहे.

सर्वसाधारण माहिती एखाद्या व्यक्तीने मागितली असेल तर ती 30 दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे.

जनमाहिती अधिकाराच्या निर्णयाविरुद्ध प्रथम अपील अधिकार्‍यांकडे 30 दिवसांच्या आत अपील करता येते.

केंद्रीय/राज्य प्रथम अपिल अधिकार्‍यांच्या निर्णयाविरुद्ध केंद्रीय/राज्य माहिती आयुक्ताकडे 90 दिवसांच्या आत अपील करता येते.

चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध कारवाई करता येते.

अर्ज सादर केल्यापासुन वेळेच्या आत माहिती न पुरवल्यास दंड आकारणीची तरतूद आहे.

अर्ज एका सर्व प्राधिकरणाकडून दुसर्‍या प्राधिकरणाकडे वर्ग केल्यास पाच दिवसात करणे बंधनकारक आहे.

माहिती देण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे.

राज्य कारभारात पारदर्शकता आणणे.

राज्य कारभारात खुलेपणा निर्माण करणे.

राज्यकारभार व शासन व्यवस्थेतील भ्रष्टाचारास आळा घालणे.

नागरिकांना शासकीय कारभारात सहभागी करून घेणे आणि सहभाग वाढविणे.

प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक व नागरिकांचे समूह घडविणे.

शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रती उत्तरदायित्व निर्माण करणे.

*‘द वॉल’ राहुल द्रविड दोषमुक्त, BCCI च्या लोकपालांचा मोठा निर्णय*

भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळत असलेल्या राहुल द्रविडची, लाभाचं पद भूषवल्याच्या आरोपांमधून मुक्तता करण्यात आलेली आहे. बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी आज या प्रकरणात आपला निकाल दिला आहे. "राहुल द्रविड विरोधातली तक्रार मी फेटाळत आहे, त्याच्यावर लाभाचं पद भूषवल्याचा आरोप सिद्ध होत नाहीये", जैन यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.

"द्रविडवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये मला कोणत्याही प्रकारे हितसंबंध जपल्याचं किंवा लाभाचं पद भूषवल्याचं जाणवलं नाही. त्यामुळे राहुल द्रविडला मी दोषमुक्त करत आहे." जैन यांनी पत्रकारांशी बोलत असताना माहिती दिली. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविडविरोधात तक्रार दाखल केली होती.

राहुल द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षासोबत इंडियन सिमेंट कंपनीत उपाध्यक्ष पदावर काम करतो. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक एन.श्रीनीवासन यांच्या मालकीची ही कंपनी असल्यामुळे राहुलवर हितसंबंध जपल्याचा आणि लाभाचं पद भूषवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र लोकपालांनी दिलेल्या निर्णयानंतर राहुलची या आरोपांमधून सुटका करण्यात आलेली आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती?

   1) व्दितीया    2) तृतीया    3) षष्ठी      4) सप्तमी

उत्तर :- 2

2) ‘तू मुंबईला जाणार की नाही ? हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

   1) उद्गारार्थी    2) प्रश्नार्थी    3) नकारार्थी    4) संकेतार्थी

उत्तर :- 2

3) ‘अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही’ या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

   1) अद्यापिही          2) जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही
   3) लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर      4) लोकांना बाहेर काढू शकलेलो नाही

उत्तर :- 2

4) ‘मांजराकडून उंदीर मारला गेला’ – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?

   1) भावकर्तरी प्रयोग  2) भावे प्रयोग   
   3) कर्मणी प्रयोग    4) कर्म-भाव संकर प्रयोग

उत्तर :- 3

5) ‘दारोदार’ हा कोणता समास आहे ?

   1) उपपद तत्पुरुष समास      2) कर्मधारय समास 
   3) अव्ययीभाव समास      4) नत्र तत्पुरुष समास

उत्तर :- 3

6) वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्या ठिकाणी..............

     हे चिन्ह वापरतात.
   1) “-”      2) ;      3) ,      4) !

उत्तर :- 2

7) ‘पापणीत गोठविली मी नदी आसवांची’ – अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) रूपक      3) व्यतिरेक    4) दृष्टांत

उत्तर :- 1

8) अनुकरणवाचक गट निवडा.

   1) बडबड, किरकिर, फडफड    2) अर्ज, इनाम, जाहीर
   3) भाकरी, तूप, कांबळे      4) सायकल, सर्कस, सिनेमा

उत्तर :- 1

9) योग्य पर्याय निवडा.

   अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.
   ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात.

   1) अ आणि ब बरोबर  2) अ बरोबर ब चूक  3) अ चूक ब बरोबर  4) अ आणि ब दोन्ही चूक

उत्तर :- 1

10) ‘महान’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

   1) सुरेख    2) मोठा      3) छान      4) स्मृती

उत्तर :- 2

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे

- तेलबिया संशोधन केंद्र जळगाव
- गवत संशोधन केंद्र पालघर
- गहु संशोधन केंद्र महाबळेश्वर (सातारा)
- ऊस संशोधन केंद्र पाडेगाव (सातारा)
- काजू संशोधन केंद्र वेंगुला (सिंधुदुर्ग )
- केळी संशोधन केंद्र यावल (जळगाव)
- नारळ संशोधन केंद्र भाट्ये (रत्नागिरी)
- हळद संशोधन केंद्र डिग्रज (सांगली)
- सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन (रायगड)
- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव (सोलापूर)
- राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर (पुणे)
- मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर.

प्रश्नसंच 16 ऑक्टोबर 2019

1) ब्राझिलिया येथे कितवी BRICS शिखर परिषद पार पडत आहे?
उत्तर : 11 वी

2) 'जागतिक न्यूमोनिया दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

3) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 11 नोव्हेंबर

4) जगातले पहिले 'कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस पोर्ट टर्मिनल' कुठे उभारले जाणार आहे?
उत्तर : गुजरात

5) देशात चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्याने उभारण्यास कोणत्या प्रकल्पांतर्गत मान्यता मिळाली आहे?
उत्तर : मेक इन इंडिया

6) “औद्योगिक उत्पादन निर्देशांक” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर : केंद्रीय सांख्यिकी संस्था

7) “ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर : क्लायमेट ट्रान्सपेरन्सी

8) ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ कधी पाळला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

9) पाचवी ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस’ प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
उत्तर : बेंगळुरू

10) चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?

 30 अंश

 60 अंश

 90 अंश

 10 अंश

उत्तर : 90 अंश

2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.

 2

 4

 3

 5

उत्तर :4

 3. 1/9+1/12=?

 1/36

 7/36

 2/36

 2/21

उत्तर :7/36

 4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?

 रा.म.3

 रा.म.4

 रा.म.5

 रा.म.6

उत्तर :रा.म.5

 5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

 औरंगाबाद

 अमरावती

 पुणे

 कोकण

उत्तर :औरंगाबाद

 6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?

 पंजाब

 उत्तरप्रदेश

 हरियाणा

 हिमाचलप्रदेश

उत्तर :हरियाणा

 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?

 तापी

 महानदी

 गोदावरी

 चंबळ

उत्तर :तापी

 8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 महाराष्ट्र

 आसाम

 मध्यप्रदेश

 गुजरात

उत्तर :गुजरात

 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?

 भूकंपाचे धक्के

 पावसाचे प्रमाण

 योग्य वेळ

 हवेचा दाब

उत्तर :भूकंपाचे धक्के

 10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 परभणी

 यवतमाळ

 अमरावती

 वाशिम

उत्तर :यवतमाळ

 11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?

 25 ऑक्टोबर 2014

 27 ऑक्टोबर 2014

 31 ऑक्टोबर 2014

 1 नोव्हेंबर 2014

उत्तर :31 ऑक्टोबर 2014

 12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.

 नो टू ऑल

 नन ऑफ द अबोह

 नॉट अलाऊड

 यापैकी नाही

उत्तर :नन ऑफ द अबोह

 13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?

 स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन

 स्टॅच्यू ऑफ सरदार

 स्टॅच्यू ऑफ युनिटी

 स्टॅच्यू ऑफ फ्रिडम

उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी

 14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?

 2012

 2013

 2014

 2015

उत्तर :2013

 15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?

 समृद्धि योजना

 सुकन्या योजना

 बेटी बचाव योजना

 निर्भया योजना

उत्तर :सुकन्या योजना

 16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?

 लॅक्टोज

 माल्टोज

 फ्रुक्टोज

 स्रूक्रोज

उत्तर :लॅक्टोज

 17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

 क्षय

 डायरिया

 अॅनिमिया

 बेरीबेरी

उत्तर :अॅनिमिया

 18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

 एडवर्ड जेन्नर

 साल्क

 हरगोविंद खुराणा

 विल्यम हार्वी

उत्तर :साल्क

 19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?

 वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील

 वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील

 वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील

उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?

 रॅपीड अॅक्शन मेमरी

 रॅन्डम अॅक्सेस मेमरी

 राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट

 रोल अँड मेमरी

उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी

‘सजग’ गस्तीनौकेचे जलावतरण

◾️भारतीय बनावटीच्या गस्तीनौकेचे गुरुवारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड येथे जलावतरण झाले.

◾️ त्यांनी या गस्तीनौकेचे ‘सजग’ असे नामकरण केले

◾️यावेळी श्रीपाद नाईक, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव सुभाष चंद्रा, तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन उपस्थित होते.

◾️भारतीय तटरक्षक दलासाठी पाच गस्तीनौका बांधणीचा प्रकल्प गोवा शिपयार्डने हाती घेतला आहे.

◾️ त्यापैकी ‘सजग’ ही तिसरी गस्तीनौका आहे.

◾️पाच गस्तीनौकांच्या प्रकल्पाचे १३ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.

◾️ या नौकांचा वापर प्रादेशिक सागरी सीमांमधील अनन्य आर्थिक क्षेत्राच्या रक्षणासाठी केला जाणार आहे.

◾️अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि संगणकीय नियंत्रण कक्षाने युक्त अशी ही ‘सजग’ नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील सर्वात आधुनिक नौका आहे.

◾️ २४०० टन वजनाच्या या नौकेत बचावकार्यासाठी आणि चाचेगिरीविरोधी शीघ्रकृती नाव, तोफा, इत्यादी शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत.

◾️ गस्तीनौकांचे आरेखन आणि बांधणी यासाठी शिपयार्ड आणि तटरक्षक दलामधील भागीदारीची त्यांनी प्रशंसा केली.

◾️तर ‘सजग’च्या बांधणीत ७० टक्के स्वदेशी घटकांचा वापर झाला असून शिपयार्डच्या परंपरेनुसार आम्ही ही नौका वेळेत पूर्ण केली आहे, असे गौरवोद्गार शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमांडर बी.बी. नागपाल यांनी काढले.

सरन्यायाधीश माहिती अधिकारात

◾️सरन्यायाधीशांचे कार्यालय सार्वजनिक आस्थापना असल्याने ते माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येते, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

◾️ मात्र, ‘जनहिता’साठी माहिती जाहीर करताना न्यायिक स्वातंत्र्य लक्षात घेतले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

◾️या निकालामुळे न्यायिक स्वातंत्र्य आणि पारदर्शकता यांचा समतोल साधला गेला आहे.

◾️दिल्ली उच्च न्यायालयाच्या २०१० च्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव तसेच केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या.

◾️ सरन्यायाधीश रंजन गोगोई,
📌 न्या. एन. व्ही. रामण्णा,
📌 न्या. धनंजय चंद्रचूड,
📌 न्या. दीपक गुप्ता आणि
📌 न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने या याचिका फेटाळून लावत सरन्यायाधीशांचे कार्यालय ‘आरटीआय’ कक्षेत असल्याचा निकाल दिला.

◾️न्यायवृंदाने नेमणुकीसाठी कोणत्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली, हे या कायद्यानुसार जाहीर करता येईल. मात्र, त्यामागची कारणे जाहीर करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

◾️ सरन्यायाधीश गोगोई, न्या. दीपक गुप्ता, न्या. संजीव खन्ना यांनी एक निकालपत्र दिले, तर न्या. रामण्णा आणि न्या.चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्रे लिहिली.

◾️सरन्यायाधीशांचे कार्यालय हे ‘आरटीआय’ कक्षेत येते.

◾️ दिल्ली उच्च न्यायालयाच्या ८८ पानांच्या निकालपत्राने तत्कालीन सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांना धक्का दिला होता. त्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार
न्यायाधीशांबाबतची माहिती जाहीर करण्यास विरोध केला होता.

◾️उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. पी. शहा, न्या. विक्रमजित सेन, न्या. एस. मुरलीधर यांनी हा निकाल दिला होता.

✍ ‘कायद्यापुढे सर्व समान’

◾️ कायद्यापेक्षा कोणीच मोठा नसून, कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे या निकालाने अधोरेखित केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

✍माहिती अधिकाराअंतर्गत कोण?

◾️कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका (सरन्यायाधीशांसह) ही तिन्ही घटनात्मक आस्थापने

◾️ संसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून स्थापन केलेली कोणतीही संस्था किंवा संघटना

◾️केंद्र वा राज्य सरकारने अधिसूचना किंवा आदेश काढून स्थापलेली संस्था किंवा आस्थापना

◾️केंद्र वा राज्य सरकारी आर्थिक मदतीवर आणि नियंत्रणावर चालणाऱ्या संस्था

◾️ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, पूर्ण किंवा भरीव सरकारी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संघटना

◾️खासगीकरण झालेल्या सार्वजनिक उपयोजितेच्या संस्था. उदा. वीज कंपन्या

◾️ अशा खासगी संस्था ज्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक सरकारी पाठबळ मिळते

✍कोण नाही?

◾️खासगी संस्था वा संघटना

◾️राजकीय पक्ष (यासंबंधीची याचिका न्यायप्रविष्ट)

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...